टू बी ऑर नॉट टू बी (अर्थात या बी चे करायचे काय?)
"टू बी ऑर नॉट टू बी?" असा गहन प्रश्न रॉबर्ट वेलिंग्टनकर या माणसाला पडला होता म्हणे. अहो, "नावात काय आहे?" हेसुध्दा तोच म्हणाला होता ना!
पण हाच प्रश्न मला पोह्यांमध्ये लिंबू पिळतांना नेहेमी पडतो. पण मला पडलेल्या प्रश्नातील बी म्हणजे लिंबाची बी बरं का!
असो, तर मूळ मुद्दा असा आहे की पोह्यात लिंबू पिळण्याआधी बिया (कारल्याच्या सॉफ्ट बहिणी) निघून जाव्या म्हणून अर्धा कापलेला लिंबू जर आपण प्लेटबाहेर हलकाच दाबला तर हटकून त्यातील रस निघून वाया जातो पण बिया मात्र हट्टाने लिंबामध्येच राहतात. पण जर का डायरेक्ट प्लेटमधल्या पोह्यांवरच लिंबू हलका जरी पिळला तरी पहिल्याच प्रयत्नांत हटकून सर्वच्या सर्व बिया पोह्यांमध्ये पडतात! नुसत्या पडत नाहीत तर पोह्यांमध्ये आतमध्ये लपून दडून बसतात.चमच्याने शोध शोध केल्यावरही प्लेटमधील पोह्यांत त्या सापडत नाहीत आणि बरोबर पोहे खायला सुरुवात केली रे केली की पहिल्याच घासाला चमच्यामधून बेमालूमपणे घासात येतात आणि जिभेला कडवट करतात!
हेच थोड्याफार फरकाने लिंबू सरबत बनवताना अनुभवास येते. सरबतातील पेल्यातून बियांना काढायला गेले की बिया चमच्याशी खो खो आणि कबड्डी खेळतात करतात आणि चमचात येत नाहीत.
यावर अद्भुत वैज्ञानिक उपाय असा होऊ शकतो की, आपण एखाद्या ठिकाणी जमिनीवर पसरलेले किसलेले लोखंड (चुरा) किंवा बारीक खिळे जसे लोहचुंबकाद्वारे (म्हणजे सोप्या मराठीत "मॅग्नेट") ओढून घेतो तसे एखादे लिंबीचुंबक (लिंबी = लिंबाची बी) असले पाहिजे जेणेकरून ते कापलेल्या लिंबासमोर, पोह्यांसमोर किंवा सरबताच्या पेल्यासमोर धरले की बिया आपोआप ओढल्या जाऊन त्याला चिकटतील.
बाय द वे, एखाद्या गाळणीतून लिंबू पिळावा असा वास्तववादी एक उपायसुद्धा यावर आहे म्हणतात.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
रास्त प्रश्ण आहे
हा..हा
:=)
तुमच्या समस्येवर अजून एक उपाय
दुसर्या दिवशी सगळ्या बिया
तुमच्या समस्येवर अजून एक उपाय
प्रश्न
मी सरळ ते लिंबु पिळायचे उपकरण
ह्म्म्म
ह्म्म्म
लिंबीचुंबक चे पेटम्ट रजिस्टर
अरे देवा...
( एक शंका : तुळशीबागेत हरवलेले बायको शोधायला काय करायचे हे कोणी
च्यायला तास्भर हरवली तर इतका आनंद?
कायमस्वरुपी हरवण्यासाठी कुठे जावे?
शोधू नका
एका टपरी वर पाहिलेला उपाय ...
बॅ अमर विश्वास कथेतले सरकारी
पाहण्याच्या कार्यक्रमात कांदे-पोहे
त्यापेक्षा पाहण्याच्या
बाकी, पैजारबुवांचे उपाय आणि
सगळ्यात वास्तववादी उपाय अगदी सोपा आहे
हे एकदम पटणेबल आहे
१. लिंबाच्या ऐवजी दही खा.
श्रावणातले कूट प्रश्न
हाहाहा
सम्दे जीतले
आंग्लोपाय
लिंबाचा किस .... मराठीत की
किस खुशीमे ?
लई कीस पाडता बॉ तुम्ही . .
आमच्या किसला पण काही सुचल तर
व्वा
सोप्पा उपाय
जादूटोणाविरोधक येतील ....
भारी आहे
धन्यवाद मित्रहो सर