रॉकेट्री-नंबी इफेक्ट
लेखनप्रकार
आर.माधवन दिग्दर्शित,लिखित,निर्मित ‘रॉकेट्री’ सिनेमा पाहण्याचा अमाझोन योग प्राईममुळे मिळाला.
नंबी नारायण हे मूळ केरळातील इस्त्रोतील शास्त्रज्ञ होते. नंबीनी मदुराई येथे बी.टेक. मेकानिकल इंजिनीअरिंग पूर्ण केले व १९६६ पासून ते थुंबा येथे इक्वेटोरीयलं रॉकेट लौन्चींग स्टेशनला रुजू झाले.विक्रम साराभाई यांना ते गुरु,फिलोसोफर सर्व मानत.१९६९ ला ते प्रिन्स्टन विद्यापीठात प्रोफेसर क्रोक्रो मार्गदर्शनाखाली प्रोपल्शनअभ्यास) आणि लिक्विड प्रोपल्शन यामध्ये ज्ञान मिळवून भारतात परतले.याचा दरम्यान त्यांना नासामध्ये काम करण्याची ऑफर त्यांनी देशप्रेमामुळे नाकारली.येथेच भारताचे नशीब फळाला आले.पुढे जाऊन नंबी यांनी फ्रांस मध्ये ५२ भारतीय अभियांत्याच्या चमूचे नेतृत्व करत एका करारा नुसार वायकिंग इन्जीन तंत्रज्ञान तेथे राहून आत्मसात केले.याचा फायदा म्हणजे विकास (१९८५ )या भारतीय बनावटीचे रॉकेट इंजिन तयार करण्यात झाला.अमेरिकाचा विरोध असूनही रशियाकडून विशेष इंजिन मिळवण्यातही त्यांनी दाखवलेले धाडसही अचंबित करते.
एवढे सुंदर घोडदौड सुरु असतांना दृष्ट लागते.नंबी यांना १९९४ हेरगीरीच्या खोट्या आरोपात अटक केली जाते. ५० दिवस जेलमध्ये,नंतर समाजात कुटुंबाची झालेली अवहेलना अशा अनेक गोष्टी समोर उभ्या ठाकतात.परंतु नंबी यांचा न्यायाचा संघर्ष सुरूच राहतो.सुप्रीम कोर्ट लवकरच त्यांना निर्दोष म्हणून घोषित करतात.केरळ सरकारही १.३ कोटी रुपये मानहानी मोबदला म्हणुन देऊ करतात.
एका निर्दोष देशभक्ताला देखील केवळ काही भ्रष्ट लोकांमुळे इतक्या अग्निदिव्यातून जावे लागले.या महान शास्त्रज्ञाची ओळखही आपल्याला इतके दिवस नसावी याचे आश्चर्य वाटले.२०१९ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते.सिनेमात कलाम,नील आर्मस्ट्रॉंग ,युरी गागारीन,विक्रम साराभाई यांची छोटी पात्रे पाहून लहानपणापासून ओळखीचे नाव पाहून मज्जा वाटते.
सॉलिड,लिक्विड,क्रायगेनिक इंजिन रॉकेटयाविषयी माहिती या निमित्ताने मिळाली,ठेओडे अजून वाचन झाले.
सिनेमात एकही गाण नाही.तरीही सिनेमा वेगवान घडणाऱ्या घडामोडींमुळे खिळवून ठेवतो.आर .माधवन याने या सिनेमासाठी केलेली मेहनत प्रकर्षाने दिसते.
शेवटच्या दृश्यानुसार “सारा देश या महान देशप्रेमीची मनापासून माफी मागतो”
-भक्ती
वाचने
14299
वाचनखूण
प्रतिक्रिया
52
छान परिचय
In reply to छान परिचय by हेमंतकुमार
+१
वाटच पहात होतो मी ह्या
In reply to वाटच पहात होतो मी ह्या by कानडाऊ योगेशु
नाही दक्षिण भारतीय आणि
In reply to नाही दक्षिण भारतीय आणि by Bhakti
Voot Select वर हिंदीत आलाय
In reply to Voot Select वर हिंदीत आलाय by टर्मीनेटर
+१
परिक्षण आवडले
In reply to परिक्षण आवडले by मुक्त विहारि
_/\_
साधे सुटसुटीत परीक्षण
In reply to साधे सुटसुटीत परीक्षण by जेम्स वांड
मी खूप ठरवते कमी चुका होऊ
परिचय आवडला
In reply to परिचय आवडला by यश राज
_/\_
इस्त्रो rocket प्रगती एक
छान परिचय... पूर्ण लेखाला
परिचय आवडला.
छान परिचय
छान लिहिलंय, भक्ती!
अग्निबाणाश्वनिर्मितीतंत्राची चोरी
In reply to अग्निबाणाश्वनिर्मितीतंत्राची चोरी by गामा पैलवान
_/\_
In reply to _/\_ by राघव
धन्यवाद , श्री.वर्तक यांचा हा
सर्वांना धन्यवाद.
माहितीपुर्ण परीक्षण . या
In reply to माहितीपुर्ण परीक्षण . या by सिरुसेरि
वाह,आता पुर्ण मुलाखत
In reply to वाह,आता पुर्ण मुलाखत by Bhakti
छान परिचय
In reply to छान परिचय by तर्कवादी
+१
In reply to +१ by Bhakti
मलापण तेलगू शिकायचं आहे
In reply to छान परिचय by तर्कवादी
त्या त्या ठिकाणची भाषा जुजबी
छान परिचय..!
छान चित्रपट ओळख करून दिलीत.
छान.
ओळख त्रोटक वाटली. थोडं
देशातील सर्वोच्च स्तर वर
.
In reply to . by कॉमी
+१ नक्की पाहणारं
In reply to . by कॉमी
वाह
त्याचा सिक्युरिटी क्लिअरन्स
In reply to त्याचा सिक्युरिटी क्लिअरन्स by शाम भागवत
सुरक्षा स्तर
In reply to सुरक्षा स्तर by गामा पैलवान
महती नव्हे माहिती
In reply to सुरक्षा स्तर by गामा पैलवान
धन्यवाद. _/\_
सिनेमा पाहणार होतोच; आज पाहीन
In reply to सिनेमा पाहणार होतोच; आज पाहीन by वामन देशमुख
तेलुगू सिनेमा काल रात्री पहिला
In reply to सिनेमा पाहणार होतोच; आज पाहीन by वामन देशमुख
तेलुगू सिनेमा काल रात्री पहिला
परिचय आवडला
भारत स्पेस व न्युक्लियर
बी आर श्रीकुमार नावाच्या आय
In reply to बी आर श्रीकुमार नावाच्या आय by डँबिस००७
मराठी संस्थळ
In reply to मराठी संस्थळ by कपिलमुनी
खरंय.
कालच वूटवर हिंदीमध्ये पाहिला
चित्रपटाइतकाच हा लेखही वेगवान
Sreekumar’s web of lies in
सर्वांना धन्यवाद!
मतदान करताना जात पात सोडून