Skip to main content

ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग ५)

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 21/07/2022 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याने अभिनंदन! या निवडणुकीत महाराष्ट्रातील २८७ आमदारांपैकी २७९ मते वैध ठरून त्यातील १८१ मते मुर्मूंना मिळाली. ९८ मते यशवंत सिन्हांना मिळाली. मुर्मूंना महाराष्ट्रातून किमान २०० आमदारांची मते मिळणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत होते. प्रत्यक्षात १९ मते कमी पडली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडे एकत्रित ९६ मते आहेत. परंतु यशवंत सिन्हांना ही ९६ अधिक सप, एम आय एम वगैरे मिळून १०१ मते अपेक्षित होती. परंतु त्यांची फक्त ३ मते फुटलेली दिसतात. पूर्वीच्या सेनेच्या सर्व ५५ आमदारांनी, भाजपच्या १०४ आमदारांनी व अपक्ष आणि ३ फुटीर आमदार धरून अजून २२ मते मुर्मूंना मिळाली. एकंदरीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसची पडझड जवळपास थांबलेली दिसते. सेनेला कधी राष्ट्रवादी-कॉंग्रेसमागे तर कधी भाजप-शिंदे गटामागे फरपटत जावे लागणार आहे असं दिसतंय. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही ठाकरेंच्या सेनेला भाजप उमेदवारालाच मत द्यावे लागण्याची शक्यता आहे कारण प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वा ख्रिश्चन आहेत व त्यांना मत देणे म्हणजे आपलं हिंदुत्व हेच खरं हिंदुत्व, आम्हीच अस्सल हिंदुत्ववादी वगैरे बडबडीला छेद देणे होईल. अर्थात १९६६ मध्ये पांघरलेली मराठी बाण्याची झूल १९९० मध्ये अचानक कचरापेटीत फेकून हिंदुत्वाचे सोंग आणलेल्या सेनेला आणि २०१९ मध्ये हिंदुत्वाचा मुखवटा उतरवून निधर्मी बुरखा पांघरलेल्या सेनेला मार्गारेट अल्वा ख्रिश्चन असल्याचे वावडे नसावे. तसेही पूर्वी बाळ ठाकरेंनी प्रीतिश नंदी नामक उत्तर भारतीय ख्रिश्चनाला महाराष्ट्रातून सेनेच्या तिकिटावर राज्यसभेत खासदार केले होतेच. बघूया काय होतंय ते.

वाचने 16893
प्रतिक्रिया 136

प्रतिक्रिया

नॅशनल हेराल्ड प्रकरण: जामिनावर बाहेर असलेल्या सोनिया गांधी अखेर ईडी कार्यालयात पोहोचल्या. ही एक ऐतिहासिक घटना आहे. सोनियाची भारतात आजवर कधीही चौकशी झालेली नाही. अगदी इंदिरा गांधी हत्या प्रकरणातही यांची चौकशी झाली नाही. असे म्हणतात की या खुनाच्या सर्वात प्रथम साक्षिदार त्याच होत्या. (पण मला नक्की माहीत नाही.) इतका मोठा खटला असूनही त्यात त्यांची चौकशी झाली नव्हती. कारण गांधी नेहमी कायद्यापेक्षा मोठे मानले गेले. पण परिस्थिती बदलते आहे असे दिसते. नॅशनल हेराल्ड घोटाळा हा भारतीय इतिहासातील सर्वात उल्लेखनीय कायदेशीर प्रकरणांपैकी एक आहे, कारण गांधींवर थेट आरोप आहे. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या अधिग्रहणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचा मुलगा राहुल यांची आई-मुलगा जोडी, त्यांचे सहकारी - ऑस्कर फर्नांडिस, मोतीलाल वोहरा आणि सॅम पिथ्रोडा यांच्यावर मोठ्या प्रमाणावर 'फसवणूक आणि विश्वासभंग' केल्याचा आरोप आहे. कोट्यवधी रुपयांची जनतेची मालमत्ता गांधींच्या घशात घातली गेली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील दोन जणांना अल्पवयीन मुलांसह तरुणांना बंदुक कशी चालवायची हे शिकवले जायचे. याचा व्हिडियो ही काढला गेला होता. पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशिक्षकांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांची ओळख इंतजार हुसैन आणि गुलजार हुसेन अशी झाली असून ते सख्खे भाऊ आहेत. प्रशिक्षणासाठी वापरलेली रायफलही पोलिसांनी जप्त केली आहे. या व्हिडिओमध्ये काही किशोरांना काही प्रौढांकडून रायफल चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे दिसत होते. या व्हिडिओमध्ये दिसणारे सर्व लोक मुस्लिम आहेत. प्रौढ आणि किशोरवयीन मुले रायफल चालवायला शिकताना दिसत आहेत, त्यांच्यामध्ये मुले देखील दिसतात.

In reply to by निनाद

आखाती देशांत असतांना, एका कंपनीत काम करत असतांना, तिथले भारतीय मुसलमान म्हणत होतेच की, पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये जे गैर मुस्लिम लोकांचे झाले तेच भारतात करणार...

मार्गारेट अल्वा बाईंनी गांधी घराण्याची खूप नालस्ती केलेली पण सोनियांसाठी bitter pill to swallow असं लिहिलेलं आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंसाठी असलेली रेल्वे भाड्यामधील सवलत सध्याच्या सरकारने रद्द केली आहे. व्हाट्सअप वर सरकारची लाल करणाऱ्या म्हाताऱ्यांचे अभिनंदन

In reply to by कपिलमुनी

सार्वजनिक सेवा, तोट्यात चालवण्यात अर्थ नाही... आजच आमच्या घरी हा विषय बोलण्यात आला. आई आणि वडील दोघांचेही हेच म्हणणे आहे की, सार्वजनिक सेवा, तोट्यात चालवण्यात अर्थ नाही..... एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात.... (वरील प्रतिसाद, कपिलमुनी, यांनाच आहे. इतरांनी उगाच चोंबडेपणा करायला येऊ नये...)

In reply to by मुक्त विहारि

वरील प्रतिसाद, कपिलमुनी, यांनाच आहे. मग फक्त त्यांनाच व्यनि करायचा ना? :)

In reply to by मुक्त विहारि

एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात.... एका नाण्याला दोन बाजू असतात हे माहीत होतं, पण असंख्य बाजू?? खिक्क.

In reply to by मुक्त विहारि

भारतातील बहुतांश ज्येष्ठ नागरिक हे असंघटित क्षेत्रातील काम करणारे आहेत. ज्यांना पुरेशी पेन्शन किंवा इन्कम सोर्स नाहीये. इन्कम टॅक्स सोडला तरी ते इतर सर्व मार्गाने सरकारला टॅक्स देत असतात.. (खरेदी ,विक्री, जी एस टी , टोल वगैरे) .. त्यामुळे आपल्याच देशातील लोकांचे जीवन सुखकर किंवा कमी त्रासाचे बनवण्यासाठी ही सवलत गरजेची आहे . सरकार इतर ठिकाणीही पैसे कमावत आहेच.. यात काही बदल करून रेल्वेमधील ही सोय चालू ठेवता येऊ शकते उदा - ए सी डब्या साठी सवलत लागू नसावी.. विस्ताडोम सारख्या डब्यांना सवलत नसावी.. पण संवेदनशीलपणें विचार केला तर आयुष्य भर टॅक्स भरून म्हातारंपणी सुद्धा सरकारने एवढी सवलत देऊ नये याचे आश्चर्य वाटते..

In reply to by कपिलमुनी

पण त्याच बरोबर सरकार, इतर प्रवाशांना पण काही प्रमाणात सवलत देत आहेच की, जसे की विद्यार्थी, कॅन्सरग्रस्त रुग्ण. सवलत हे दुधारी आहे, इतपत तरी भुमिका झाली... (आमदार-खासदार यांना मिळणारी सवलत, ही तिसरी बाजू झाली, पण ह्या सवलतीला कुणीच धक्का लावण्याची शक्यता नाही) (रेल्वे कर्मचारी वर्गाला मिळणारी तहहयात सवलत, ही पण एक सवलतीच्या बाबतीत बाजू आहेच) अपेक्षा होती, तसाच कपिलमुनी यांचा संतुलित प्रतिसाद आला. धन्यवाद, कपिलमुनी...

In reply to by मुक्त विहारि

त्यांचे "अंताजींची बखर" हे मला वाटते समरसून लिहिलेले पुस्तक खूप प्रसिद्ध होते. चक्क काल्पनिक असलेली ही कादंबरी लोकांना खरोखर बखर वाटावी इतकी ताकदीने लिहिलेली होती. विनम्र श्रद्धांजली.

केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडताना केजरीवाल म्हणाले, “आम्ही तुरुंगवासाला घाबरत नाही, हे या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकरांची तुम्ही मुलं आहात, आम्ही भगतसिंग यांची मुलं आहोत. भगतसिंग यांनाच आम्ही आमचा आदर्श मानतो. ज्यांनी इंग्रजांसमोर नतमस्तक व्हायला नकार दिला आणि फासावर गेले. तुमच्या तुरुंगवासाला आणि फाशीला आम्ही घाबरत नाही, आम्ही अनेकदा तुरुंगात जाऊन आलो आहोत” असंही केजरीवाल म्हणाले.
सावरकर म्हणा, गांधीजी म्हणा किंवा भगतसिंग म्हणा. यांच्या नखाची सर नसलेल्या व्यक्ती त्यांची थट्टा उडवितात, त्यांच्याविषयक अपमानजनक वक्तव्ये करतात तेव्हा सखेद आश्चर्य वाटते. कहासे आता है इतना कॉन्फिडन्स ??

In reply to by धर्मराजमुटके

आजकाल ह्याची फॅशन आली आहे. सनसनाटी निर्माण करुन फुटेज खाने याउपर अशा बाबतीत काही जास्त अपेक्षित नसते. म्हणुन काहीतरी बोलावे ज्याने जनमानसात प्रक्षोभ निर्माण होइल. म्हणतात ना "घटं भिंद्यात, पटं छिंद्यात . . ." तसेच आहे हे.

In reply to by सुक्या

हे ह्या केजरीवालांच्या बाबत एकदम खरे आहे. काहिही करून चर्चेत राहिले पाहिजे, बस्स..! बाकि अरविंद केजरीवालने स्वतः अकाली दलाचे नेते मजिठिया, अ‍ॅड. अमित सिब्बल, नितीन गडकरी, आणि अरूण जेटलींची वेगवेगळ्या प्रसंगी नाक घासत माफी मागितली होती.

In reply to by धर्मराजमुटके

महाराष्ट्र विधानसभेसाठी आआप या एका पर्यायावर मी विचार करीत होतो कारण कॉंग्रेस, राष्ट्रवादी व सेना हे पक्ष माझ्यासाठी कधीच पर्याय नव्हते. मनसे हा तर पक्षच संपलाय. फडणवीस-चंपा (आणि आयाराम) व्यतिरिक्त भाजप हा पर्याय शिल्लक आहे, परंतु फडणवीस-चंपा इतक्यात बाजूला होण्याची किंवा त्यांना मोदी-शहा बाजूला करण्याची पुढील काही वर्षे तरी शक्यता दिसत नाही. परंतु आजची केजरीवालांची द्वेषपूर्ण, पूर्वग्रहदूषित व असत्य मुक्ताफळे वाचल्यानंतर आआप या पर्यायावर अजिबात विचार करणार नाही असे ठरविले आहे. महान स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या दिल्याने कोणत्याही पक्षाला नवीन मते मिळत नाहीत व पक्षाकडे वळू पाहणारी मते जवळ न येता दूर जातात, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. सावरकरांना शिवीगाळ करून कॉंग्रेसच्या मतात एक मताचीही भर पडल्याचे दिसत नाही. उलट आहे ती मते सुद्धा कमी होण्याची शक्यता असते. केजरीवालांना अजून हे समजलेले दिसत नाही. जो मध्यमवर्ग आआपकडे वळण्याची थोडी शक्यता निर्माण होण्याची शक्यता होती, ती शक्यता आजच्या मुक्ताफळांमुळे केजरीवालांनी उमलण्याआधीच खुडून फेकून दिली आहे. असो. हा माणूस सुधारत आहे असे थोडे वाटायला लागले तेवढ्यातच हा आपल्या मूळ स्वरूपात परत आला.

In reply to by श्रीगुरुजी

>>>आजची केजरीवालांची द्वेषपूर्ण, पूर्वग्रहदूषित व असत्य मुक्ताफळे वाचल्यानंतर आआप या पर्यायावर अजिबात विचार करणार नाही असे ठरविले आहे. अरे देवा...! आपल्या या निर्णयामुळे उद्यापासून या सृष्टीत सुर्याभोवती इतर ग्रहांचे भ्रमण बंद होईल. सगळे ग्रह-तारे कुठंतरी हेलपाटून पडतील. सर्व चराचर सृष्टीत हाहाकार माजेल. या जगाचा नियमित राहाटगाडा रुटीन चालावे असे वाटत असेल तर, प्लीज प्लीज प्लीज . असा विनाशकारी निर्णय घेऊ नये अशी आमची तमाम जीवसृष्टीच्या लोकांची इच्छा आहे. विचार व्हावा. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जे काय असेल ते असेल. आपण येथे जी नियमित आगपाखड करता त्यामुळे मोदींना जितका फरक पडतो, त्यापेक्षा कमी फरक तुमच्या नीलाक्षतनय केजरीवालांना पडला तरी हरकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

केजरीवालांनी सावरकरांवर केलेली व्यक्तव्ये वाचल्यावर हा माणुस मनातुन उतरला.(केजरीवाल.) ह्या सगळ्या नव नेत्यांना शरद पवार बनायची का हुक्की येते कोण जाणे? केजरीवालचे कामच बोलते आहे असे इथेच म्हटले जाते मग हे असे विधान करुन सुशिक्षित वर्ग (जो केजरीवालांची व्होट बँक आहे) संभ्रमित झाला तर त्यात काही आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by कानडाऊ योगेशु

ठाकरे व ठाकरेनिष्ठ विरहीत सेना निर्माण होत आहे, तसाच पवार व पवारनिष्ठ विरहीत राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाकरे व ठाकरेनिष्ठांच्या बेतात वक्तव्याने तो पक्ष आता संपला. पवार व पवारनिष्ठांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी पक्ष त्याच मार्गावर घोडदौड करीत आहे. https://www.loksatta.com/pune/babasaheb-purandars-speeches-and-writings… काल केजरीवालांनी विनाकारण सावरकरांविरूद्ध गरळ ओकली. आज फक्त कलाकार बदललेत, थोडी कथा बदलली, पण मूळ संहिता व बरेचसे कथानक तेच आहे. जातीयवादी आग लावण्याचे प्रयत्न इतक्या उतारवयातही अथक सुरू आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

मी तरी केजरीवालांना हुशार नेता मानतो. तसंही सावरकरा्वर टिका केल्यावर त्यांचे कुठेलही मतं कमा होनार नाहीयेत. पण भगतसिंगाच्या नावाची मते त्यांच्या बाजूने आणखी वाढतील. केजरीवाल लंबी रेस का घोडा आहेत. सावरकरांच्या नावाचा मते हा भाजपला बांधलेली आहेत हे भाजप सह सर्व पक्ष जानतात त्यामुळे भाजपही सावरकरांता अपमान मूकाटपणे गिळून नितेश राणेंना पक्षात घेतो, भारतरत्नही देत नाही. कारण सावरकरवाद्यांना भाजपला मत देण्या शिवाय पर्याय नाहीये.

In reply to by धर्मराजमुटके

माफी मागायचा इतिहास पाहू : १. मार्च १५ ला केजरीवाल ह्यांनी बिक्रम सिंग माकिजा ह्यांची जाहीर रित्या माफी मागितली. हे नेते ड्रग्स विकतात असा बिनबुडाचा आरोप ह्यांनी केला होता. २. त्या आधी केजरीवाल आणि त्यांचे मंत्री ह्यांनी अमित सिब्बल ह्यांची जाहीर माफी मागितली. कपिल सिब्बल ह्यांच्या मुलावर केजरीवाल ह्यांनी असेच बिनबुडाचे आरोप केले होते. ३. अरुण जेटली ह्यांची पुन्हा लेखी माफी केजरीवाल ह्यांनी मागितली होती. मी तुमच्यावर खोटे आरोप केले आणि त्यामुळे तुम्हाला त्रास झाला, कृपया माज्यावर गुन्हा दाखल करू नये असे त्यांनी त्यांत म्हटले होते. ४. नितीन गडकरी आणि त्यांच्या वडिलांवर सुद्धा केजरीवाल ह्यांनी गलिच्छ आरोप केले आणि नंतर कोर्टांत खेचतंच साष्टांग लोटांगण घालून माफी मागितली. हि ४ उदाहरणे फक्त मला आठवली म्हणून लिहिली आणखीन किमान २ लोकांची माफी ह्यांनी मागितली आहे. प्रतिसाद संपादित.

In reply to by साहना

केजीवालांना २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा मिळाल्यानंतर अक्षरशः स्वर्ग दोन बोटे राहिला होता आणि दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून आपले काम सोडून इतर सगळ्या भानगडीत नाक खुपसणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे अशाप्रकारे बेताल वर्तन त्यांचे झाले होते. त्यातच अरुण जेटलींनी दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख असताना तिथे भ्रष्टाचार केला हा आरोप केजरीवालांनी केला. मग अरुण जेटलींनी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. त्यावर आपल्या बचावासाठी एका हिअरींगला २२-२५ लाख रुपये घेणारा राम जेठमलानी हा महागडा वकील केला होता. जेठमलानी यांनी केजरीवालांना सव्वा कोटी रुपयांचे बिल लावले ते बिल स्वतच्या खिशातून न भरता दिल्ली सरकारला पाठवून द्यायचा शहाजोगपणा नव्हे हलकटपणा याच केजरीवालांनी बाळगला होता. म्हणजे एक मुख्यमंत्री म्हणून अपेक्षित नसलेली बडबड हे करणार आणि त्याचे बिल करदात्यानी भरायचे. वा रे आम आदमी. हा मनुष्य अरुण जेटली गेल्यानंतर तिथे अंत्यदर्शन घ्यायला म्हणून गेला होता. खरं तर असल्या निर्ल्लज माणसाला तिथून चपला मारून हाकलून द्यायला हवे होते. तरीही केजरीवाल हे देशातील सगळ्यात वाईट आणि निलाजरा राजकारणी आहे असे की तरी म्हणणार नाही. उध्दव ठाकरे त्याहून कितीतरी वाईट आहेत. सध्या तरी केजरीवालांचा नंबर दुसरा पक्का आहे.

In reply to by क्लिंटन

मी सध्या त्यातल्या त्यात कमी वाईट पर्यायाचा विचार करीत होतो. परंतु महान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काल केजरीवालांनी विनाकारण द्वेषपूर्ण गरळ ओकल्याने अतिशय संताप आला. हा माणूस सूधारण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. पूर्वी संघ, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर गरळ ओकणाऱ्या नितेश राणेला फडणवीसांनी पायघड्या अंथरून पक्षात आणून आमदार केले (आता कदाचित मंत्रीपद सुद्धा देतील), तेव्हापासून असाच संताप आला आहे. परंतु फडणवीस भाजपचे एक दुय्यम नेते व भाजपचे शीर्ष नेतृत्व सावरकरप्रेमी आहे. पण येथे तर आआपचा एकमेव सर्वात मुख्य नेताच काहीही कारण नसताना स्वातंत्र्यवीर सावरकरांविरूद्ध.गरळ ओकतोय हे अक्षम्य वर्तन आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अक्षम्य आहेच... आणि महात्मा गांधी यांच्या बद्दल हि जो अपप्रचार केला जातो... आणि जसा नथुराम चा जो उदो उदो मधल्या काळात केला गेला, त्याबद्दल हि घृणा आहे... सगळ्या स्वातंत्र्य विरांनी घेतलेल्या सगळ्या भूमिका कदाचीत मान्य नसतील परंतु ते नेते पुर्ण पणे चूक दाखवणे हे चूकच आहे.. आणि हे द्वेषाचे राजकारण कारण्यातच आजकालचे बरेचसे नेते.. त्यांचे अनुयायी आणि कार्यकर्ते धन्यता मानतात, हे चुकीचेच आहे.. आता गांधी विरुद्ध सावरकर कोण भारी कोण चुकीचे हेच बोलणार असतील तर त्या मूर्ख नेत्यांच्यात आणि आपल्यात असा काय फरक?

In reply to by गणेशा

नथुरामने जे केले ते चूक आहेच. गांधींना असलेला विरोध हा जनउठावातून पुढे आणण्याचा पर्याय योग्य असता. सावरकर हे काळाच्या १०० वर्षे तरी पुढे असणारे नेते. त्यामुळे त्यांचे विचार जसे च्या तसे मान्य होतील असे शक्यच नाही. पण केजरीवाल सारखा माणूस त्यांच्या नखाच्या सरीचाही नाही आणि सावरकरांच्या नावाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करतो, हे बघून तिडिक उठते. असो. स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेणारे बरेच असतात, त्यातलाच हा एक.

In reply to by गणेशा

सावर्करांनबद्दल बोलाताना "गोडसे" उल्लेख करायलाच पाहिजे का? जणूकाही सावर्करांच्या विचारांचा पाठींबामा देणार हा "आपोआप" गोडसेंच्या कृतीचे समर्थन करतो असे भासवायचे हा छूपा हेतू ! अर्बन नक्षल टूल किट मधील अजून एक टूल

In reply to by गणेशा

सावरकरणाचे विचार पटणाऱ्याकडून हि घ्या गांधींची स्तुति १) गांधी - दक्षिण अफ्रकेत वर्णद्वेषाबद्दल जो उठाव करण्यात गांधींनी पुढाकार घेतला त्याला नामसकर - भारतात आल्यावर काँग्रेस मध्ये घुसून आपल्या पद्धतीने काँग्रेसच्या स्वान्त्र्यत्याचं चळवळीत "असहकार" हा विरोधाचा नवा प्रकार राबवून एक वेगळी अध्यात्मिक प्रकारची झळाळी त्या चलवलालीला प्राप्त करून दिली - एकूणच स्वातंत्र्य चळवळ बांधून ठेवण्याचे काम आणि दिशा दिली आणि अर्हताःहातच झळाळी दिली - अगदी मेक इन इंडिया नसले तरी "आयात करू नका" हे धोरण जनतेला समजवून सांगितले - चिकाटी बाकी महान आत्मांसाच्यातील त्रुटी बद्दल बोलण्याचे टाळतो २) आता सावर्करांमधील एक त्रुटी - विचारनची स्पष्टता आणि भव्यता असली तरी त्याचे रूपांतर "जन आधारात" म्हणावा तेवढा गोळा करू शकले नाहीत असे वाटते बाकी सवारकरांच्या कौतीकाचे बोलण्याचे टाळतो

In reply to by चौकस२१२

सावरकरांबद्दल अश्लाघ किंवा त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत जे कष्ट भोगले त्यावर प्रश्न उभा करणे आजिबात पटत नाही, निषेधार्ह आहे. पण, सावरकरांबद्दल हा लेख वाचनात आला, आणि त्यामुळे सावरकरांच्या मनातल्या प्रतिमेला तडा गेला हे नक्की. https://indianexpress.com/article/opinion/columns/truth-about-savarkar-…

In reply to by कॉमी

तुमच्या मुद्दलाच घोळ आहे. ---------- चातुवर्ण आणि जात ह्यात फरक आहे. त्या लेखकाने त्यात गल्लत केली आहे. ---------- एकादा मनुष्य जर कायदा आणणार नाही असे म्हणला तर त्याचा अर्थ तो जातीव्यवस्थेच्या बाजुने होत आहे असा होत नाही. काहींना हळुहळु समाज सुधारणा जास्त पसंत असतात तर काहींना सरळ कायद्याचा दणका आवडतो, प्रत्येकाची गोष्ट वेगळी. जहाल - मवाळ वाद आठवा. -- १९४० चा हिंदु धर्म आणि आताचा हिंदु धर्म ह्यात खुप फरक आहे. बाकी आंबेडकरांनी इस्लाम आणि ईसाई रिलिजनबद्दल काय म्हटले आहे ते पहा.

In reply to by Trump

चातुवर्ण आणि जात ह्यात फरक आहे. त्या लेखकाने त्यात गल्लत केली आहे.
कसलाही फरक नाही. असला तरीही दोन्हीही तितक्याच वाईट प्रथा आहेत.
बाकी आंबेडकरांनी इस्लाम आणि ईसाई रिलिजनबद्दल काय म्हटले आहे ते पहा.
माहिती आहे आणि मान्य सुद्धा आहे. इथे काय संबंध आहे पण त्याचा ?

In reply to by कॉमी

माहिती आहे आणि मान्य सुद्धा आहे. इथे काय संबंध आहे पण त्याचा ? विषयबदल करायचा प्रयत्न बाकी काही नाही.

In reply to by श्रीगुरुजी

राम गणेश गडकरींचा पुतळा तोडणाऱ्यांना बक्षीस देण्याचे जाहीर करणारे महान नेते आहेत ते.

In reply to by जेम्स वांड

लक्षात आहे ते. अश्या व्यक्तीला आणि अश्या व्यक्तीला पायघड्या घालणाऱ्यांना क्षमा नाही.

In reply to by जेम्स वांड

ते आता भाजपात आल्याने त्यांना आम्ही सावरकरभक्तांनी राष्ट्रहीतासाठी माफ केलेत. फडणवीसांची खुर्ची मजबूत करून हवीय आम्हाला बाकी काही घेणेदेणे नाही.

दिल्ली सरकारचा बराच सुविधा फूकट देऊनही करातून जमा झालेला पैसा वाढतोय, केंद्रातील भाजप सरकार अमाप महागाई वाढवूनही सवलती बंदं करत आहे, नेमका पैसा जातो कुठेय? कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आमदार खरेदीत का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

दिल्ली सरकारचा बराच सुविधा फूकट देऊनही करातून जमा झालेला पैसा वाढतोय, हा दिल्लीचा ईमानदार माणूस कधीच खोटे बोलत नाही. डीटीसीचा तोटा 26000 कोटीहून जास्त होऊन चुकला आहे. दिल्ली जल बोर्ड व्याज सकट 60000 कोटींचा वर. (आरटीआय करून सर्व आकडे तपासू शकतात). वीज रोज दोन तास जाते. पानी एक तास ही येत नाही. ते ही सकाळी 6च्या आधी. जर दिल्ली एक स्वतंत्र देश असता तर आजच्या घटकेला श्रीलंका झाला असता.

In reply to by विवेकपटाईत

महाराष्ट्राताल लोक कुठं जानारेत चेक करायला? म्हणून हलॅ ते ठोकून द्यायचं?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

महाराष्ट्रातील गुजरात मधील लोक कुठं जाणारेत, चेक करायला? म्हणून हलॅ ते ठोकून द्यायचं? म्हणूनच केजरीवाल धाधांत खोट बोलु शकतो. पंजाबात निवडणुकीच्या वेळेला "विज मुफ्त" "पाणी मुफ्त " वैगेरे घोषणा देऊन टाकल्या. दरम्यान च्या काळात मिडीया बरोबरच्या एका मुलाखतीत केजरीवालने चक्क अस म्हंटलेल होत की आम्ही आलो की १५ दिवसात सर्व भ्रष्टाचार नाहीसा करु ज्याने सरकारचे ३५,००० कोटी वाचतील आणि हेच वाचवलेल्या निधीतुन लोकांसांठी "विज मुफ्त" "पाणी मुफ्त " च्या योजना राबवता येतील शपथविधीनंतर मु मंत्र्याला केंद्र सरकारकडे, ५०,००० कोटी दर वर्षाला निधी पाहीजे म्हणुन विनंती करायला पाठवल. खोट्या आश्वासनावर निवडणूका हे जिंकणार आणि ह्यांच्या योजनेसाठी निधी केंद्र सरकारने द्यायचा.

नुपूर शर्मा यांना मारण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी घुसखोराकडून धक्कादायक खुलासा; म्हणाला, “पाकिस्तानात….” https://www.loksatta.com/desh-videsh/pakistani-infiltrator-rizwan-ashra… CAA आणि NRC कायदे, लवकरात लवकर व्हायला पाहिजे....

रणवीर सिंह नेहमी त्याच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असतो... यावेळी तेच कपडे काढुन, दिगंबर अवस्थेत राहुन चर्चेत आहे ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Full Song (Video) Shyama Aan Baso X Arre Dwaarpalon Kanhaiya Se Kehdo♥️ | Sachet♥️Parampara

In reply to by मदनबाण

बहुतेक त्याने "ना रहेगा कपडा ना होगी चर्चा" असा काहितरी विचार केला असावा.

सावरकरांच्या वक्तव्याबद्दल केजरवाल चा तीव्र निषेध ... असला पप्पू पणा सोडला तरच टिकेल . नाहीतर सूर्यावर थुंकून स्वतः चा तोंड खराब करून घेणार हा

मविआ सरकारच्या वेळेला गडचिरोली जील्ह्याचे पालक मंत्री असलेल्या मा. मु मं ए शिंदेंची सुपारी देण्यात आली होती. तिथल्या नक्षल गटाकडुनच ही भिती होती. ह्यावर केंद्रीय व राज्याच्या गृहखात्याने मिळुन ए शिंची सुरक्षा वाढवायचा प्रस्ताव म राच्या राज्य सरकारला दिला. पण ए शिंची सुरक्षा वाढवायची नाही असा आदेश मातोश्रीतुन दिला होता असा खळबळजनक आरोप तेंव्हाचे राज्य गृहमंत्र्यांनी (शिवसेनेचेच सुहास कांदे) केलेला आहे. ही बातमी TV-9 ने दिलेली आहे. आपल्याच पक्षाच्या जेष्ठ नेत्याला मरणाच्या दारात लोटायच काम ऊ ठा नी केलेल होत. https://youtu.be/8YuV2KqWWvk

In reply to by डँबिस००७

तो आरोप केव्हाच खोट सिध्द झालाय. गद्दारांवर विश्वास काय ठेवावी?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मा ए शिंदेची सुपारी नक्षलवाद्यांना दिली होती. पं प्र मोदींच्या हत्त्येची योजना सुद्धा त्यांचीच होती. ह्या प्रकणात अनेक अर्बन नक्षल लोकांना अटक झालेली होती. मविआ सरकार आल्या आल्याच, रा कॉं च्या नेत्यांनी ह्या लोकांना सोडायची भाषा सुरु केली होती. तसे प्रयत्नही केले गेले. कॉं व रा कॉंचे नक्षलवाद्यांशी जुने संबंध आहेत. मा ए शिं च्या हत्येची सुपारी कोणी दिली हे स्पष्ट आहे. पण ऊ ठा वर सुद्धा संशय आहे. आता अशी अनेक प्रकरणे आता उघड होत आहेत.

In reply to by डँबिस००७

पुराव्याविना असे भाष्य म्हणजे हवेथ लाथा. ठाकरेद्वेष्ट्यांकडून ठाकरेंना बदनाम करायचा आणखी एक फूसका प्रयत्न चाललाय. जो बाटगा जेवढ्या जोरात ठाकरेंविरूध्द बांग देईल त्याला तेवढं मंत्रीपद मिळायची शक्यता जास्त.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जो बाटगा जेवढ्या जोरात ठाकरेंविरूध्द बांग देईल शिवसेने तर्फे अझान प्रतिस्पर्धा आयोजित करताना ह्याचा विचार केलेला होता वाटत !!

In reply to by डँबिस००७


पाकिस्तानात बरेच प्राचिन मंदिरे १९४७ पुर्वी अस्तित्वात होती. त्यातली बरीच पाडली गेलेली असुन ती जागा तिथल्या धन दांडग्यांनी कब्जा केलेली आहे. अश्याच एका जागेवर सार्वजनीक शौचालय उभारुन आपली हिंदु घृणा दाखवलेली आहे. पाकिस्तानतल्या पखतुनख्वा मधल्या प्राचिन हिंदु मंदिराला तिथल्या लोकांनी पुर्णपणे पाडुन टाकले आहे. पाकिस्तान कोर्टाने ह्या केसवर सुनावणीच्या दरम्यान गुन्हेगारांकडुन ३ कोटि पाकीस्तानी रुपयाचा दंड ठोठावलेला आहे. ईतका मोठा दंड कोर्टाने ठोठावला असल्याने तो भरण भाग आहे, पण मूसलमान समाज सधन नसल्याने त्यांच्याकडुन तो भरला जाण शक्य नाही, त्यामुळे तिथल्या नेत्यांनी हिंदु समाजाकडुनच आपलच मंदीर मुसलमानांनी तोडल्याच्या गुन्ह्यासाठीचा दंड ३ कोटी रुपये, कोर्टात भरायचा आदेश दिलेला आहे. हा निर्णय अमान्य करायचा पर्याय तिथल्या हिंदु समाजाकडे नसल्याने त्यांनी तो मान्य केलेला आहे.

In reply to by डँबिस००७

भारतात जर, मिशन 2047 पुर्णत्वास गेले तर, भारतातील गैर-मुस्लिम लोकांना पण असाच न्याय मिळण्याची शक्यता जास्त आहे का?

In reply to by मुक्त विहारि

मुविकाका बांग द्यायची तयारी करुन ठेवा! :)

In reply to by डँबिस००७

भयंकर आहे! मंदीर तोडले मुसलमानांनी - गुन्ह्यासाठीचा दंड ३ कोटी रुपये, हिंदु समाजाकडुनच कोर्टात भरायचा? या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. हा तर सिस्टेमिक प्रकार आहे. म्हणजे पुराव्या सह शाबीत करण्यासारखा अत्याचार आहे. काय करता येण्यासारखे आहे? कुठे आवाज उठवला पाहिजे?

In reply to by निनाद

सदर प्रतिसाद कोणत्याही मिपाकरांच्या भावनांचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही.
काय करता येण्यासारखे आहे? कुठे आवाज उठवला पाहिजे?
ज्या हिंदू लोक, रास्वसं, भाजप, भारत सरकार, मोदी, शाह, भागवत इत्यादी entities - स्वतःच्या देशातील हिंदूंना वाचवू शकत नाहीत, ते जाऊ द्या किमान स्वतःच्या स्वयंसेवकांना वाचवू शकत नाहीत, ते जाऊ द्या किमान स्वतःच्या पक्ष कार्यकर्त्यांना वाचवू शकत नाहीत, ते जाऊ द्या किमान स्वतःच्या प्रमुख नेत्यांच्या बाजूने उभ्या राहू शकत नाहीत त्या entities दुसऱ्या कोणत्यातरी देशातील कोणत्यातरी नागरिकांना काय मदत करणार? --- भारतीय हिंदूंनाचा असा भ्रम आहे की त्यांचा सनातन धर्म आहे तो कधीच नष्ट होणार नाही. पण भारतीय उपखंडात हिंदूंना हिंदू म्हणून जिवंत राहता येईल असा भूभाग शतकानुशतके आक्रसत चालला आहे. भारत नावाचा जो काही जमिनीचा तुकडा उरला आहे त्याच्या काही भागावर फारतर त्यांना २०४७ पर्यंत हिंदू धर्माचरण करता येईल. --- जे निर्माण झाले आहे ते कधीनाकधी नष्ट होणार आहे असे (बहुधा) भगवदगीता सांगते. हिंदू धर्म त्याला अपवाद कसा असेल?

सेल्फ गोल https://www.loksatta.com/maharashtra/chandrakant-khaire-slams-cm-eknath… निवडणुकीचा अर्ज भरताना उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिलेले स्वतःच्या कुटुंबाच्या संपत्तीचे विवरणपत्र यांनी वाचले नसावे.

In reply to by श्रीगुरुजी

हा स्वतः जाऊन शिंदे गटात कधी सामील होतो याची वाट बघतोय. आतापर्यंत इतिहास बघता अश्या प्रकारे कडवी बंग देणारे सगळे नंतर शिंदे गटात गेले आहेत, हा पण त्याच मार्गावर असावा.

पश्चिम बंगालमध्ये ईडीची मोठी कारवाई! तब्बल २० कोटींची रोकड जप्त https://www.loksatta.com/desh-videsh/ed-raid-20-crore-rupees-cash-found… ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात पार्थ चटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. एसएससी घोटाळा झाला तेव्हा चटर्जी शिक्षणमंत्री होते. याच चटर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अर्पिता चटर्जी यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकली. या कारवाईत ईडीने २० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे......

ओबीसी आरक्षणाशी संबंधित ही बातमी आली नाही इथे ? टाईम अँड अगेन भाजपला केंद्र किंवा राज्य पातळीवर ब्राह्मणांची गरज नाही हे परत परत वाटते आहे.... काय ती कार्यतत्परता अन काय तो बाठिया आयोगाचा रिपोर्ट फायनल करून कोर्टासमोर सादर करण्याची घाई, सगळंच कसं सुशासित.

In reply to by जेम्स वांड

ब्राम्हणांना भाजपची गरज आहे भाजपला ब्राम्हणांची नाही. हे भाजप पक्षातील लोक चांगलेच जाणून आहेत. ब्राम्हण मते भाजपलाच पडतात ती कुठेही जात नाहीत हे कोंग्रेससह सर्व पक्ष जाणतात त्यामुळे सावरकर वगैरेंवर टिका करायला ते कधीही भित नाहीत. भाजपला ही हे चांगंलंच माहीत असल्याने ते ब्राम्हण मतांनान गृहीत धरतात त्यामुळेच चंद्रकांत पाटील कोल्हापुरातून येऊन कोथरूडात ऊभे राहतात नी निवडूण ही येतात, पुन्हा मेधा कुळकर्णींना विधानपरिषदेवर घेतलं जात नाही कारण त्या्ना घेतलं नाही घेतलं तरी कोथरूडातून चंपा पुन्हा जिंकनार आहेत.

In reply to by जेम्स वांड

१) हा मुद्दा फक्त १९९३ मध्ये मंडल आयोगाच्या सूचनांच्या अंमलबजावणीनंतर इतर मागासवर्गीय उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे मतदारसंघ राखीव ठेवले आहेत/होते त्यासंबंधात आहे. शैक्षणिक संस्था व सरकारी नोकऱ्यांमध्ये इतर मागासवर्गीयांना जितक्या जागा राखीव ठेवल्या आहेत, त्याला धक्का लागलेला नाही. अनेक जिल्ह्यात, महापालिकांमध्ये त्या त्या विशिष्ट प्रदेशात इतर मागासवर्गीय लोकसंख्येचे प्रमाण तुलनेने कमी असूनही २७+ टक्के मतदारसंघ/प्रभाग राखीव ठेवल्याने एकूण राखीव मतदारसंघ/प्रभागांचे प्रमाण ५०% हून अधिक झाल्याने ते कमी करण्यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. ३) यावरील सुनावणीत न्यायालयाने एक आयोग नेमून अश्या सर्व क्षेत्रात सर्वेक्षण करून इतर मागासवर्गीय लोकसंख्येची वस्तुनिष्ठ आकडेवारी निश्चित करण्यास सांगितले व ती आकडेवारी जमा करेपर्यंत हे मतदारसंघ राखीव ठेवण्याचा निर्णय रद्द केला. हा निर्णय सुमारे अडीच वर्षांपूर्वी दिला होता. ३) परंतु मागील अडीच वर्षे मविआ सरकार किमान समान कार्यक्रमाच्या (म्हणजे सत्ता टिकवून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या) अंमलबजावणीत व्यग्र राहिल्याने हे सर्वेक्षण केले गेले नाही. परंतु मागील काही महिन्यात दबाव प्रचंड वाढल्याने व स्थानिक निवडणुका तोंडावर आल्याने अत्यंत नाईलाजाने मविआ सरकारने बांठिया आयोग नेमून सर्वेक्षण सुरू केले. ४) या आयोगाने प्रत्यक्ष सर्वेक्षण न करता केवळ मतदारयादीतील आडनावावरून जात ठरविण्याचे काम केले असे आरोप होत आहेत. आपली लोकसंख्या ५२-५४% आहे असा इतर मागासवर्गीयांचा दावा आहे. परंतु ही संख्या ३७% आहे असा बांठिया आयोगाचा निष्कर्ष आहे व त्यामुळे अनेक प्रदेशात इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या राखीव मतदारसंघांचे प्रमाण २७% हून कमी झाले आहे व काही ठाकरे हे शून्य झाले आहे. याविरूद्ध अर्थातच काही जण सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. ४) मुळात हे मतदारसंघ २०१९ पर्यंत राखीव होतेच व अडीच वर्षे ते राखीव नसल्याने किंवा त्यातील काही परत राखीव झाल्याने ब्राह्मणांना कणभरही फरक पडत नाही कारण ब्राह्मण राजकारणात क्वचितच दिसतात. ५) सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक संस्था यातील राखीव जागा पूर्वी होत्या तितक्याच आहेत त्यात कोणतीही घट पडलेली नाही किंवा भर पडलेली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने ब्राह्मणांना शष्प फरक पडलेला नाही. म्हणून तर मी याआधीच्या प्रतिसादात लिहिले आहे की या निर्णयावर मी निर्विकार आहे. ५) २०१८ मध्ये फडणवीसांनी, मराठे सर्व क्षेत्रात अत्यंत मागासलेले आहेत असा एक पूर्ण बनावट अहवाल तयार करून (हा अहवाल व त्यातील निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अस्वीकृत केले आहेत), शैक्षणिक संस्था व सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठ्यांना तब्बल १६% राखीव जागा दिल्या. त्यामुळे महाराष्ट्रात राखीव जागांचे प्रमाण ७८% होऊन राउंडिंगमुळे प्रत्यक्ष प्रमाण ८५-९०% झाले होते. मराठ्यांची मतपेढी करण्यासाठी जाहीर केलेल्या या अन्यायकारक निर्णयाचा थेट फटका विशेषतः ब्राह्मणांना बसला होता. २०१९ व २०२० मध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये अराखीव विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप कमी झाले होते. मी त्यावेळी या अन्यायकारक निर्णयाला विरोध केला होता (अर्थात माझ्या विरोधाला शष्प किंमत नव्हती). यापुढे फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असेपर्यंत भविष्यात कधीही विधानसभा किंवा स्थानिक निवडणुकीत भाजपला मत देणार नाही हे मी तेव्हाच ठरविले होते. सुदैवाने माझ्या विचारांचे अजून काही जण असणार कारण २०१९ मध्ये युती करूनही भाजपची २.७५% मते कमी झाली व परीणामी भाजपला १८-१९ जागा गमावून सत्ता गेली होती. अश्या वेळी गुणरत्न सदावर्ते नामक एका सामान्य वकीलाने आधी उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागून सिब्बल, रहोटगी अश्या अत्यंत नामवंत वकीलांना हरवून हा राखीव जागांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला रद्द करायला लावला. याबद्दल मी सदावर्तेंचा कायमच ऋणी आहे. तात्पर्य - इतर मागासवर्गीयांना राखीव मतदारसंघ पुन्हा एकदा देण्याने ब्राह्मणांना शष्प फरक पडत नाही. परंतु सर्व क्षेत्रात राखीव जागांचे प्रमाण वाढविले तर ब्राह्मणांचे निश्चितच नुकसान होते.

In reply to by श्रीगुरुजी

सुदैवाने माझ्या विचारांचे अजून काही जण असणार कारण २०१९ मध्ये युती करूनही भाजपची २.७५% मते कमी झाली व परीणामी भाजपला १८-१९ जागा गमावून सत्ता गेली होती. २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर १२२ जागा व २८.५०% मते होती. २०१८ मध्ये मराठ्यांना तब्बल १६% राखीव जागा दिल्या व त्यापूर्वी सारथी संस्था स्थापून त्याद्वारे मराठा जातीवर अनेक सवलतींचा वर्षाव केला गेला. यातून पुढील निवडणुकीत आपल्याला मराठा जातीची अजून काही मते मिळतील हे गणित फडणवीसांनी कागदावर मांडले. बफर म्हणून सेनेशी युती सुद्धा केली. आता आपल्याला स्वबळावर १४४ जागा मिळून निकालानंतर सेनेला लाथ घालता येईल असेही गणित असावे. पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी तर संपविलेच होते. अश्या परिस्थितीत ३-४% ब्राह्मण मतांचा आवळा गेला तरी मराठ्यांचा किमान ८-१०% वाढीव मतांचा कोहळा मिळेल, हे सुद्धा गणित मांडले असावे. त्यामुळेच लबाडी करून ब्राम्हणांचे नुकसान करून ठेवले. पण हाय रे दैवा. २०१९ विधानसभा निवडणुकीत भाजपला २.७५% मते कमी मिळून २५.७५% मते व १२२ ऐवजी १०३ जागा मिळाल्या. पारंपरिक समर्थक ब्राह्मण व इतर मागासवर्गीय मतदारांपैकी काही मतदार विरोधात गेल्याने आणि (for obvious reasons) सर्व सवलती व राखीव जागा मिळूनही मराठ्यांची फारशी मते भाजपला मिळालेली दिसत नाही. जनतेनेच फडणवीसांच्या विश्वासघाताची शिक्षा दिली. ब्राह्मण मतदारांमुळे अगदी २-३ मतदारसंघात भाजपचा पराभव झाला असेल तरीही बहुमतापासून दूर असलेल्या भाजपसाठी हे २-३ मतदारसंघ सुद्धा मौल्यवान आहेत. यानिमित्ताने निवडणुकीच्या तोंडावर राखीव जागा देणारा पक्ष ऐन निवडणुकीत कसा तोंडावर आपटतो हा इतिहास रोचक आहे. - १९९० मध्ये मंडल आयोग आणूनही पुढील लोकसभा निवडणुकीत जनता दलाच्या जागा घटल्या होत्या. -१९९३ मध्ये जयललिताने तामिळनाडूत राखीव जागांचे प्रमाण ६९% इतके वाढवूनही पुढील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. -२००८ मध्ये वसुंधरा राजेंनी राजस्थानात गुज्जरांना राखीव जागा देऊनही पुढील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. - २०१३ मध्ये अशोक गेहलोटांनी राजस्थानात गुज्जरांना राखीव जागा देऊनही पुढील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. - २०१३ मध्ये मनमोहन सिंगांनी देवभरात जाटांना राखीव जागा देऊनही पुढील लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. - २०१४ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्रात मराठ्यांना राखीव जागा देऊनही पुढील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. - २०१८ मध्ये फडणवीस सरकारने महाराष्ट्रात मराठ्यांना राखीव जागा देऊनही पुढील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला.

In reply to by श्रीगुरुजी

आपली लोकसंख्या ५२-५४% आहे असा इतर मागासवर्गीयांचा दावा आहे. परंतु ही संख्या ३७% आहे असा बांठिया आयोगाचा निष्कर्ष आहे व त्यामुळे अनेक प्रदेशात इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या राखीव मतदारसंघांचे प्रमाण २७% हून कमी झाले आहे व काही ठाकरे हे शून्य झाले आहे. आपली संख्या ५२-५४% आहे असे इतर मागासवर्गीय सांगतात तर आपली संख्या ३२-३४% आहे असे मराठे सांगतात. हे दोन्ही आकडे खरे असतील तर या दोन जातसमूहांची संख्या ८४-८८% होते. यात १३-१४% मुस्लिम, ७-८% दलित, २-३% इतरधर्मीय, ३-४% ब्राह्मण, आदिवासी, भटक्या जमाती वगैरेंची संख्या मिळविली तर एकूण आकडा १२५% हून अधिक होतो. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये सर्वाधिक मोठ्या जातीच्या यादवांची संख्या १२-१४% आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक मोठी जात पटेल १४-१५% आहेत. कर्नाटकात लिंगायत १७% व वोक्कलिंग १६% आहेत. आंध्रात रेड्डी १५% आहेत. अश्या परीस्थितीत महाराष्ट्रात एका विशिष्ट जातीची संख्या ३२-३४% इतकी जास्त नसावी. तसेच बांठिया आयोगानुसार महाराष्ट्रात इतर मागासवर्गीय ५२-५४% नसून ३७% आहेत. आकडेवारीतील ही विसंगती पाहता पुढील जनगणनेत सर्व जातींची स्वतंत्र मोजणी करावी ज्यातून जातीनिहाय खरी आकडेवारी कळेल. परंतु ही आकडेवारी काही जातींसाठी प्रचंड धक्का देणारी ठरू शकेल व त्यातून पुन्हा एकदा सामाजिक अशांतता निर्माण होईल कारण राखीव जागा एकूण जातीच्या संख्येच्या प्रमाणात दिल्या जातात. त्यामुळेच आजतागायत सर्व सरकारांनी जातीय जनगणनेस विरोध केला आहे.

https://www.loksatta.com/politics/bjp-state-president-chandrakant-patil… काही जण कधीही सुधारत नाहीत. ही चित्रफीत भाजपने अधिकृतपणे काढून टाकली असली व सारवासारव सुरू असली तरी ती इतरत्र उपलब्ध आहे . https://youtu.be/s5haQJQp1yc हे पाहून सहज विचार आला की ऑक्टोबर २०१९ मध्येच असाच मनावर दगड ठेवला असता तर?