Skip to main content

ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग ३)

लेखक क्लिंटन यांनी बुधवार, 13/07/2022 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग सुरू करत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात आणि नवा कोणता मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रोच्या प्रमुखपदावर अश्विनी भिडे या आय.ए.एस अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या त्याच पदावर कार्यरत होत्या. महाविकास आघाडी सरकारने त्यांना पदावरून हटविले होते. त्यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती केली आहे. महाविकास आघाडी सरकारने मुंबई मेट्रोच्या कामात अक्षम्य दिरंगाई केली होती. ते काम वेगाने पुढे सरकून मेट्रोच्या सगळ्या लाईन्स पुढील दोन अडीच वर्षात सुरू झाल्या तर मुंबईकर नक्कीच फडणवीसांना शतशः धन्यवाद देतील. https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/ashwini-bhide-is-back…

वाचने 23763
प्रतिक्रिया 176

प्रतिक्रिया

युएईला फॉलो करत गल्फ मधले ईतर देशही भारताकडे आपल्या फुड सेक्युरीटीच्या गरजेसाठी वळण्याची शक्यता आहे. ह्या मुळे भारतातील शेतकर्याला मोठी हक्काची बाजारपेठ निर्माण होईल. कशी? सेंद्रिय शेती करून? देशाच्या अन्नसुरक्षेसाठी गव्हावर निर्यातबंदी करणाऱ्या देशाने फार मोठ्या बाता करू नये. भारतातल्या शेतकर्याच्या दुर्दैवाने त्यांना एकही चांगला नेता मिळाला नाही, हे अगदी खरे आहे. आणि केन्द्रसरकारही त्याबाबतीत करंटे निघाले. अन्यथा ज्या परिस्थितीत सरकारने कृशी कायद्ये मागे घेतले त्यावेळेला ज्या शेतकर्यांना हे कायदे हवे होते त्यांनी सुद्धा सरकारवर आपल्या नेत्यांकरवी दबाव आ णायला पाहिजे होता. कायदे करण्यापूर्वी कोणाशी चर्चा केली होती सरकारने? सगळ्याच गोष्टी हम करे सो कायद्याने करून चालत नाही. शेतकऱ्यांना हे कायदे समजावण्यात कमी पडलो असे सरकारने कबूल केले आहे. कधी समजवायला गेले होते हे त्यांनाच ठाऊक.

In reply to by आग्या१९९०

भारतातल्या शेतकर्याच्या दुर्दैवाने त्यांना एकही चांगला नेता मिळाला नाही, हे अगदी खरे आहे. आणि केन्द्रसरकारही त्याबाबतीत करंटे निघाले.
बारामतीचे जाणते राजे अगदी स्वतःहुन मागुन कृषीमंत्री झाले. त्यांची तुम्ही इज्जत काढता आहात.

In reply to by आग्या१९९०

कधी समजवायला गेले होते हे त्यांनाच ठाऊक. दलाल लोकांच्या आंदोलनादरम्यान त्यांचे प्रतीनिधी व सरकार चे कृषीमंत्री यांच्यात ११ वेळा बैठका झाल्या. त्यात अडेलतट्टू भुमिका घेउन आधी कायदे मागे घ्या, फलाना कायदा बनवा मग बोलु ही ह्यांची भुमीका होती. त्याउपर सुप्रीम कोर्टाने समीती पण गठीत केली होती तिथेही हे गेले नाही. वरुन आता त्यांचे पाय धरावे अशी तुमची अपेक्षा आहे काय? आता काळे कायदे नाहीत, तेव्हा सारे मंगल आहे. जे मिळते आहे ते आनंदाने घ्यावे. पांडुरंगाचे स्मरण करावे .. सरकार कडे भिक मागायला जाउ नये ... अपमान होइल .. :-)

In reply to by आग्या१९९०

Kerala becomes the only State in the country with its own internet service. सरकारने स्वतःची इंटरनेट सेवा सुरु केली आहे ती सगळ्या गरिबांना पोचली असे कुठे वाचलंय तुम्ही? मग बी एस एन एल सेवा देते ती केंद्र सरकारची सेवा सुद्धा सर्व गरिबांपर्यंत पोचली म्हणावी लागेल. आणि हो बी एस एन एल काँग्रेसच्या काळातच सुरु झाली आहे म्हणजे श्री मोदींना त्याचे श्रेय द्यायची गरज नाही

In reply to by आग्या१९९०

गरज काय होती सरकारी पैसे खर्च करून अशी सेवा द्यायची जी देशांत आधीपासूनच स्वस्तांत उपलब्ध होती ?

बी एस एन एल काँग्रेसच्या काळातच सुरु झाली आहे म्हणजे श्री मोदींना त्याचे श्रेय द्यायची गरज नाही राज्य आणि राष्ट्र फरक कळतो का? मोदी काय पत्त्यातील जोकर वाटला का जिथे तिथे टाकत बसायला?

Now, our prestigious #KFON project can kickstart its operations of providing the internet as a basic right to our people," Vijayan tweeted. Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/india/kerala-becomes-first-st… आपल्याच दुव्यात लिहिलेलें आहे. भाजप द्वेष इतका कि कुणीही लुंग्या सुंग्या ने काहीही केलं तरी त्याचा भरमसाट कौतुक करावं हि वृत्ती आहे. जाऊ द्या तुम्हाला थोडं सं का होईना समाधान मिळालं ना ? मग झालं तर पण ते सर्व ठीक आहे २०२४ मध्ये मोदीच परत येणार बाकी चालू द्या

तिस्ता सिटलवाडच्या बेल विरुद्ध कोर्टात एस आय टी ने दिलेल्या पत्रकात ति. सि. विरुद्ध भक्कम पुरावे सादर केलेले आहे. गुजरात मध्ये श्री मोदींजींच्या विरुद्ध केस बनवण्यासाठी अहमद पटेल कडुन ति. सि. ला ३० लाख रु दिले गेले होते असे ति. सि नेच कोर्टात सादर केलेल्या साक्षिदाराने एस आय टी ला सांगितले आहे. आता ह्या प्रकरणाचे धागे दोरे सो गां पर्यंत पोहोचलेले आहेत. सु कोर्टाच्या आदेशावरुनच ति. सि. विरुद्ध तपास सुरु आहे. गुजरात दंगा पिडीतांना मिळालेली ८० लाख रु च्या मदतीचा अपहार ति. सि. ने केलेला आहे असे पुरावे सापडलेले आहेत. एकंदरीत ति. सि. समोर कठीण समय आलेला आहे. ह्या प्रकरणात अहमद पटेल व सो गांधींच नाव आल्याने कॉंग्रेस नेते चवताळलेले आहेत.

अहमदाबादमध्ये पुराचे पाणी साचलेय. लोकांच्या मालमत्ता डूबल्या आहेत. ५० अधिक लोक मेलेत. मुंबईत जरा पाणी साचलं का शिवसेनेच्या नावाने गळे काढनारे आता चूप बसलेत. ज्या व्यक्तिने १२ वर्षात अहमदाहाद चांगले झाले नाही त्या व्यक्तिच्या हातात देश गेलाय. भोगा आता.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

येडीच आहेत अहमदाबादची लोकं उगाच मोदींना मत देतेत. महाराष्ट्रचे लोक पण येडीच आहेत उगाच भाजपला सगळ्यात जास्त आमदार आणि खासदार दिलेत. सध्या तरी राजस्थान, पंजाब आणि दिल्लीतील लोक फक्त हुशार दिसतायेत.

In reply to by रात्रीचे चांदणे

येडीच आहेत. म्हणून तर ४५० चं सिलेंडर १०५० ला विकत घेताहेत. आता तर २० टक्के जास्त विजबीलही भरनार आहेत महाराष्ट्रातील जनता.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ओ कायच्या काय सांगु नका. मी सध्य आहमदाबादमधे रहातोय. सखल भागात पाणी साठले हे खरे आहे. मात्र तुम्ही म्हणता तसे काहिही झालेले नाहिय्ये. दक्षीण गुजरात आणि पश्चिमेला पूर आले हे खरे आहे. पण अहमदाबाद अगदी ठणठणीत आहे

In reply to by विजुभाऊ

अच्छा. मग ते लोक कसे मेले? सर्वच्या सर्व वृत्तपत्रे, बातम्या, न्यूज चॅनल्स खोटी का?

गेले 8 वर्ष दिवसाचे 18-20 तास, वर्षातून एकही सुट्टी न घेता आपल्या मोदीजींनी डॉलरच्या तुलनेत रुपया 60 वरून 80 च्या पलीकडे नेला आहे, पेट्रोल 70 रुपयांवरून 120 रुपये लिटर पर्यंत नेले आहे आणि LPG 450 रुपयांवरुन 1100 रुपयांवर नेला आहे. धन्यवाद मोदीजी .

रेवड्या न वाटता काय दिवे लावले? ना स्विस बँकेतील पैसे परत आले, ना पेट्रोल स्वस्त झाले, ना गॅस स्वस्त झाला, ना देशातील काळा पैसा नष्ट झाला, ना स्मार्ट सिटी झाल्या,ना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले, ना वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचे वचन पूर्ण केले. तरुणांना कोविड लस विकत घ्यायला लागल्या. सैनिकांना पेन्शन बंद.

In reply to by सुबोध खरे

वो सब तो ठीक है
यालाच अंध भक्ती म्हणतात. आणि काहीही केले किंवा काहीच नाही केले तरी मोदीच येतील, कारण विरोधक येन केन मार्गाने निवडणुकी अगोदर आपल्या पक्षात घ्यायचे आणि नाही आले तर निवडणुकी नंतर फोडाफोडी करायची यामुळे पुन्हा भाजपाच येईल हे नक्की...

In reply to by गणेशा

+१, ईडी, सिबीआय, राज्यपाल, पैसा, विरोधकांना नाहक त्रास देणे, पत्रकारांना त्रास देणे, रात्री दोन वाजता राष्ट्रपतींना ऊठवून सही घेणे व राज्यात भाजपचं सरकार आनायला राषट््रपती राजवट ऊठवणे, पत्रकरांना त्रास देणे, संसदेजवळ आंदोलने करायला बंदा घालणे. असे प्रकार केल्यावर आयेंगे तो मोदीजीही.

In reply to by गणेशा

तुमच्या आणि भुजबळांच्या एकांगी आणि अंध सैनिकी गुणगुणण्याला कंटाळून आता मी कोणताही प्रतिसाद न देता केवळ एवढाच प्रतिसाद देणार आहे. कुणाच्या का कोंबड्याने होवो सूर्य उजाडल्याशी (श्री मोदी आल्याशी) कारण. येणार तर मोदीच. मग तुम्ही हवं ते म्हणा.

In reply to by सुबोध खरे

कुणाच्या का कोंबड्याने होवो सूर्य उजाडल्याशी (श्री मोदी आल्याशी) कारण. येणार तर मोदीच. ऊद्या मोदी हरले तर तुम्ही लोक अंतरिगत ऊठाव करून चिनला भारतावर हल्ला करायला सांगाल नी मोदींना गादीवर बसवाल. नग म्हणाल कुणाच्या का कोंबड्याने होवो सूर्य उजाडल्याशी (श्री मोदी आल्याशी) कारण. येणार तर मोदीच.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ऊद्या मोदी हरले तर तुम्ही लोक अंतरिगत ऊठाव करून चिनला भारतावर हल्ला करायला सांगाल नी मोदींना गादीवर बसवाल हायला इतका कडक माल थेट कंदाहार वरून आणला काय?

In reply to by सुबोध खरे

मातृभूमी गुजरात मधील मुंद्रा पोर्ट वर नेहमी सापडत असतो. त्या शिवाय का सगळी कडे लोक आयेगा तो मोदीही म्हणत असतात? :)

In reply to by आग्या१९९०

चला हे मान्य करु की मोदी सरकार वाईत आहे. त्यांना काही जमत नाही. पण कल्पना करुन बघा विरोधी पक्षांचे ( कॉंग्रेस्च्या पुढाकाराने - पप्पु पंतप्रधान असलेले) सरकार आले असते तर काय झाले असते ? नुसती कल्पना केलीत तरा अंगाला दरदरुन घाम फ़ुटेल. हार्ट एटॅक आला म्हणुन रुग्णालयात भरती भावे लागेल. आम्ही लोक भक्त असलो तरी पुढील १० वर्षांत परिस्थीती पूर्ण बदलेल. गेल्या आठ वर्षांत बदल झालाय पण तुम्हाला तो मान्य करायचा नाहीय. पण तुमच्यासारख्या लोकांना विचारतोय कोण ? परत एकदा मोदी सरकारच येणार २०२४ ला

In reply to by सामान्यनागरिक

पप्पु पंतप्रधान असलेले मग सध्याचे काय आहेत?? चला हे मान्य करु की मोदी सरकार वाईत आहे. त्यांना काही जमत नाही. त्यात मान्य काय करायचे? आम्ही लोक भक्त असलो तरी पुढील १० वर्षांत परिस्थीती पूर्ण बदलेल. मागच्या आठ वर्षात कमी वाट लागलीय का? तरी पुढील दहा वर्षाचे स्वप्न पाहताय.

विरोधक एकाच पटावर येत नाहीत. प्रत्येक जण आपला वेगळा पट आणि सोंगट्या घेऊन येतोय. मुख्य आहे ममतादीदी.

अहमदाबाद मध्ये पुर, गोहत्त्ती मध्ये पुर, अमरनाथ मध्ये ढग फुटीने पुर या सगळ्याला श्री मोदी जीच जवाबदार आहेत. त्वरीत त्यांना काढुन श्री रा हुल गांधीना पंत प्रधान करण्यात याव म्हणजे अश्या प्रकाराला आळा बसेल . ;-)

In reply to by डँबिस००७

पाणी साचण्याला कोंग्रेस जबाबदार आहे. किंवा पाकिस्तान, केजरीवाल ह्यांचा हात असावा. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काँग्रेस तर कश्यालाच जवाबदार नाही, देशात तिन दशक "गरीबी हटाव" अशी घोषणा देणारी काँग्रेस "गरीबी हटाव" करायला जवाबदार नव्हती. पाकिस्तानचे दोन तुकडे ईंदिरा गांधीनी केले पण त्यावेळे ला भारताच्या आ श्रयाला आलेले २० लाख बंगाली निर्वासित हे मात्र परत कधीच पाठवले नाहीत. त्यांचा मुस्लिम व्होट बँक म्हणुन उत्तम उपयोग करुन घेतला गेला. पण ह्या निर्वासितामुळे येत्या काळात भारतात किती प्रश्न निर्माण होतील ह्याची काळ्जी ना ईंदिरा गांधीनी केली ना काँग्रेस ने.

आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण ब्यूरोला खटला चालवण्याची परवानगी दिली गेली आहे. अमानतुल्ला वक्फ बोर्डाचे अध्यक्ष असताना बेकायदेशीरपणे सरकारी खर्चाने नियुक्त्या केल्या. ओखला विधानसभेतील आप आमदारावर सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि आयपीसीच्या इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. खान यांच्यावर भ्रष्ट कृत्ये आणि फौजदारी गुन्ह्यांसह नियम, नियमांचे जाणीवपूर्वक आणि गुन्हेगारी उल्लंघन आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. यानेच दासना मंदिराचे मुख्य मठाधिपती स्वामी यती नरसिंहानंद सरस्वती यांना मारण्याची धमकी दिली होती. आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान दिल्लीच्या मदनापूर खादरमध्ये रोहिंग्या मुस्लिमांच्या वस्ती बनवण्यासाठी कथितपणे मदत केल्याबद्दलही चर्चेत होते. भारतात मदनपूर खादरमध्ये अनेक एकर जमीन बळकावून बेकायदेशीरपणे राहणारे रोहिंग्या मुस्लिम देशभर कसे पाय पसरत चालले होते आणि त्याना आम आदमी पक्षाची स्थानिक मदत होत होती.

अन्नधान्या वर ५ टक्के जीएसटी लावल्याविरोधात व्यापार्यांनी बंदं पुकारलाय म्हणे. ह्या देशद्रोहा व्यापार्यांना स्वतच्या खिशातून जीएसडी द्यायचाय का? जनतेकडून लूटून मगच सरकरी तिजोरीत भरायचाय ना? मग का देशद्रोहीपणा करताहेत? आता महाराष्ट्रात सत्ता पालट झालाय. ईडी मोकळाच असेल क्लीनचीट द्यायची प्रोसेस चालू असेल. एकदा का आमदारांना क्लिनचीट देऊन झाली की माननीय मोदीजींनी ईडीला ह्या व्यापार्यांवर सोडावे. सरळ होतील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मला ही हाच प्रश्न पडलाय ? जीएस्टी लावलाय सरकारने --> देणार जनता. मग व्यापारी का संप करत आहेत?

In reply to by सुक्या

आणी विशेष म्हणजे श्री. मोदी हे फक्त आणी फक्त व्यापार्‍यांसाठीच काम करतात अस हे वरचे साहेब जिथे तिथे बोंबलत असतात मग व्यापारी संप कसे काय करु शकतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ते सगळं खरं आहे हो. माझा प्रश्न वाचला का तुम्ही? जीएसटी घेणार सरकार .. तो देणार जनता .. मग मधेच व्यापारी लोक का संप करत आहेत?

In reply to by सुक्या

महागाई वाढली की लोक खर्च कमी करणार आणि त्यामुळे नुकसान व्यापाऱ्यांचं होत असेल, कदाचित हे कारण असेल.

In reply to by रात्रीचे चांदणे

नाही हो. खरे कारण सरकारला सर्व कर द्यायचा आहे. घपला करायला जागा कमी होत आहे. सगळा हिशेब ठेवावा लागेल हे आहे. व्यापारी लोकांना फक्त स्वतःची काळजी असते .. बाकी सब झुट.

In reply to by सुक्या

एक मोदीजी सोडले तर ह्या देशात शेतकरी, व्यापारी, मजूर, अग्नीवीर, नोकरदार, व्यावसायीक सर्वच देशद्रोही आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शेतकरी, व्यापारी, मजूर, अग्नीवीर, नोकरदार, व्यावसायीक सर्वच देशद्रोही आहेत. ते सर्व ठीक आहे पण येणार श्री मोदीच

In reply to by सुक्या

व्यापारी लोकांना फक्त स्वतःची काळजी असते बरोबर जसे सोनारांवर १ % अबकारी कर लावला होता तेंव्हा त्यांनी बेमुदत संप केला होता. अर्थात सरकार त्याला बधले नव्हते. कारण प्रश्न १ % कि ५ % हा नसून तुम्ही सरकारच्या नजरेत येता. आणि जो रोखीचा व्यवहार करून कर चुकवला जात होता तो आता जास्तीत जास्त कठीण होईल म्हणून हे सर्व छप्पन लप्पन चालले आहे. उद्या सरकार वार्षिक १० लाखांवर उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांवर कर लावेल या भीतीने ते लोक सुद्धा आतापासून काव काव करायला लागले तर मला आश्चर्य वाटणार नाही.

नेतृत्वावर टीका केल्याने माजी आमदार रामदास कदम व माजी खासदार आनंद अडसूळ यांची सेनेतून हकालपट्टी झाली आहे. काही दिवसांपूर्वी सेनेच्या लोकसभेतील प्रतोद भावना गवळी यांना देखील प्रतोदपदवरून हटविण्यात आले. https://www.lokmat.com/maharashtra/expulsion-of-ramdas-kadam-anandrao-a… या पार्श्वभूमीवर मोदींची निर्णय प्रगल्भता दृग्गोचर होते. २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर यशवंत सिन्हा, शत्रुत्व सिन्हा, कीर्ति आझाद सातत्याने मोदींवर टीका करीत होते. परंतु मोदींनी त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही. यथावकाश हे नेते राजकारणातून बरेचसे संपले. याउलट आपल्यावर किंवा पक्षावर टीका केली म्हणून उद्धव ठाकरे तातडीने आपल्याच नेत्यांवर कारवाई करीत आहेत. कारवाई करून ठाकरे या नेत्यांना नवसंजीवनी देत आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

संपले की संपवले? हो संपवायलाच पाहिजे आमची अशीच इच्छा आहे कि श्रीमती ममता, सोनिया, श्री लालू प्रसाद, अखिलेश, केजरीवाल, फारूक आणि ओमर अब्दुल्ला, श्री शरद पवार याना मोदींनी कालबाह्य करून घरीच बसवावे म्हणजेच नव्या पिढीचे ताजे नेते विरोधाची पक्षासाठी तयार होतील.

In reply to by सुबोध खरे

श्री शरद पवार याना मोदींनी कालबाह्य करून घरीच बसवावे खिक्क. आपल्या गुरू विरूध्द मोदी कधीच जानार नाहीत. पवारांशी पंगा घेनारे १०५ आणूनही घरी बसवले जातात. मोदींना हे माहीतीय. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सध्या पवार साहेब काय करताहेत हो? आम्ही तर ऐकलं होतं कि राष्ट्रवादीची शिवसेना होऊ नये म्हणून सारखे बैठकांवर बैठक घेत आहेत. चालायचंच बाकी तुम्ही काही म्हणा येणार तर मोदीच

In reply to by सुबोध खरे

सध्या पवार साहेब काय करताहेत हो? आपल्या शिष्यासा पंतप्रधान बनवून नार्गदर्शन करत असतात. शिष्यही अध्येमध्ये गोविंदबागेत येत असतो. नाहीतर पवार साहेब काय करतील हे फडणवींसांच्या ऊदाहरणावरून शिष्य चांगलाच जाणून आहे. :) बाकी तुम्ही काही म्हणा येणार तर मोदीच हे असं तुम्ही बोलत असतात ते ठिकाय. मोदींना बोलायला सांगा. त्यांचाही फडणवीस करतील मग पवार साहेब. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

का?? पत्ता काढून काही करन्याचा बेत आहे का >>>> हायला मी इथून ठाण्याहून तिकडं संभाजीनगरला माझं पैसा आणि वेळ खर्चून उगा कशाला येऊ. आणि मी सुकड्या आणि ५० शी ओलांडून गेलेला. तर तुम्ही २५ शी तले आडदंड मी कसं तुम्हाला बरोबरी करणार. मला तो भाग पर्यटन करायचे आहे म्हूणन माहिती हवी होती. Mi कोकण पुणे सोडून कुठं भटकलो नाहीये. विदर्भ मराठवाडा खान्देश एक एक करायचं आहे निवृत्त झाल्यावर.

गहू निर्यातीची घोषणा केल्यावर आठवड्याभरात निर्यातबंदी केली जाते. बाजारभाव सरकारी हमीभावापेक्षा जास्त असल्याने असंही सरकारने कितीही आटापिटा केला तरी शेतकरी हमीभावाने सरकारला गहू देणार नाहीत. देशातील अन्नसुरक्षा योजना धोक्यात आहेच. सरकारने दबावाखाली हा निर्णय घेतला हे स्पष्ट आहे. इतके रामायण घडूनही सध्या अर्थमंत्र्यांच्या नथीतून तीर मारायचे काम हेकटपणे चालूच आहे. विकसनशील देशांना गहू निर्यात करायचे डोहाळे लागले सरकारला. शेतकऱ्यांकडून सबसिडी भावात गहू खरेदी करायचा आणि निर्यात करून जगाचा अन्नदाता बनायचे स्वप्न WTO ने धुळीस मिळवले. India urged the World Trade Organization (WTO) to relax rules to allow the country to export foodgrains from its public stocks to nations facing food crises. WTO ने सरकारचे कान टोचताना सांगितले, WTO norms do not allow countries to export foodgrains from their public stocks procured at subsidised rates. WTO ने भारतासाठी नियम शिथिल करावे असे अर्थमंत्र्यांनी विनवणी केली आहे. कच्चे तेल आणि खते पुरवणाऱ्या देशांनी दबाव आणल्याने सरकार अडचणीत आले असावे असा कयास आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील याऔची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वी सामनात छापून आली होती. ती वाचून आढळरावांनी संताप व्यक्त केल्यानंतर, ती बातमी चुकून छापली, असे स्पष्टीकरण सेनेकडून आले होते. परंतु आज आढळराव शिंदे गटात सामील झाले. आज शिंदेनी बोलविलेल्या ऑनलाईन बैठकीस सेनेच्या लोकसभेतील १९ खासदारांपैकी १४ खासदार उपस्थित होते अशी बातमी आहे. काही दिवसांनी सेनेत ठाकरे पितापुत्र, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल परब, अरविंद सावंत, मनीषा कायंदे व किशोरी पेडणेकर हे अष्टप्रधान मंडळच शिल्लक असेल व बाकी सेना शिंदे गटात गेली असेल. आधी महाविनाश आघाडी सरकार गेल्याचा अत्यानंद झाला. नंतर फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने हा अत्यानंद द्विगुणित झाला. आता ठाकरे हुकुमशाही अधिपत्याखालील सेना संपत येत असल्याने हा अत्यानंद त्रिगुणित झाला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ते लोक भाजपची “आॅफर” आल्याने शिंदेगटात गेले असावेत. अथवा ईडीला घाबरून. पण सामान्य शिवसैनिक अजूनही ठाकरेंसोबतच आहे. निवडणूकांत हे दिसेलच. सेना संपन्याची स्वप्ने पाहनारे ५० वर्षांपासून तोंडावर आपटत आहेच. बाकी फडणवीस मामू न झाल्याच्या तुमच्या आनंदात आम्ही ही सहभागी आहोत. :) दरवेळी असंच तोंडावर पडत राहो.

In reply to by श्रीगुरुजी

परंतु आज आढळराव शिंदे गटात सामील झाले. ते आढळराव नाही. अडसूळ आहेत गुरूजी. आढशराव सेनेतच आहेत अजून.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मते दिली गेली. मनमोहन सिंग चाकांच्या खुर्चीत बसून मत द्यायला आले होते. ते बरेच आजारी असावे. ते राज्यसभेत खासदार आहेत व २०२० मध्ये ते राजस्थान विधानसभेतून राज्यसभेत गेले तेव्हा त्यांचे वय जवळपास ८८ होते. परंतु मागील २ वर्षात राज्यसभेतील कामकाजात त्यांचा सहभाग जवळपास शून्य आहे. वयाच्या ९० व्या वर्षी गलितगात्र अवस्थेत सुद्धा व सलग १० वर्षे पंतप्रधान पदावर असून सुद्धा खासदारकीचा मोह कायम आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हो. मोहच. आज मनमोहन सिंग यांना बघितल्यावर राजकारणी लोकांना पण रिटायरमेंट चे वय असावे हे माझे मत पक्के झाले. काही आमदार / खासदार गंभीर आजारी असले तरी पद सोडत नाहीत. त्यांच्या नसलेल्या सहभागाने ते ज्या प्रांताचे प्रतीनीधित्व करतात त्यात ते असुन नसल्यासारखेच असतात. मागे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी पण महाराष्ट्राचे दोन आमदार गंभीर आजारी होते. पर्रीकर पण तसेच .. भाजपा चे असले तरी ते चुकीचे आहे .. कुठेतरी हे थांबायला हवे ..

In reply to by सुक्या

प्रकाशसिंग बादल वयाच्या ८९ वर्षापर्यंत सलग १० वर्षे मुख्यमंत्री होते. २०१७ मध्ये जनतेनेच त्यांच्या पक्षाला ११७ पैकी फक्त १८ जागा देऊन सत्तेतून बाहेर फेकले. तरीही २०२२ मध्ये वयाच्या ९४ व्या वर्षी परत आमदारकीसाठी उभे राहिले. पण यावेळी जनतेने त्यांना, त्यांचा मुलगा सुखवीरसिंह व जावई मजीठीयाला पराभूत करताना त्यांच्या पक्षाला फक्त ३ जागा दिल्या. आता तरी मोह सुटेल अशी अपेक्षा आहे.

In reply to by सुक्या

ही बरीच निसरडी बाजू आहे आणि मी स्वतः याविषयी मत बनवू शकलेलो नाही. काही झाले तरी आपल्याला श्वास घेणे शक्य होत आहे तोपर्यंत काम केलेच पाहिजे असे वाटणारे लोक असतात आणि दुसरीकडे पदाचा मोह न सुटलेले लोकही असतात. तेव्हा असे कोणी खूप आजारी असताना पदावर दिसल्यास तो नेता दोनपैकी कोणत्या प्रकारात मोडतो हे सांगता येणे कठीण आहे. मनोहर पर्रीकर कर्करोगाने आजारी असले तरी मला वाटते शेवटचे ८-१० दिवस सोडले तर बाकी पूर्ण काळ एक मुख्यमंत्री म्हणून त्यांची कामे करत होते. स्टीव जॉब्स पण पित्ताशयाच्या कर्करोगातून बाहेर येऊन आणखी ५-७ वर्षे राहिला होता. तसे आपणही करू शकू अशी आशा त्यांना वाटत होती का? असेलही कदाचित. आता त्यांना ती आशा वाटत होती की त्यांना मोह सुटत नव्हता? हे आपण सांगणार कसे आणि कोणत्या आधारावर? त्या प्रश्नाचे उत्तर बऱ्याचदा आपण कोणत्या बाजूला आहोत यावर अवलंबून असते. तेव्हा या बाबतीत मी तरी संबंधित नेत्याला benefit of the doubt देईन. २००७ च्या राष्ट्रपती निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी हे माजी पंतप्रधान व्हील चेअर वरून मतदानाला आले होते. १५ वर्षांनी मनमोहन सिंग हे दुसरे माजी पंतप्रधान असेच व्हील चेअर वरून मतदानाला आले हा योगायोग.