Skip to main content

मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?

लेखक Trump यांनी बुधवार, 29/06/2022 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण? ------ हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल. शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला. राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला. कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला. भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच. जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.

वाचने 39016
प्रतिक्रिया 222

प्रतिक्रिया

In reply to by शाम भागवत

अगदी जेन्यूईन प्रश्न. जो पक्ष हिंदुत्वाकडे झुकेल तो जिंकेल. जो हिंदुत्वाकडे पाठ फिरवेल त्याची मतदान टक्केवारी घटेल. नास्तीक वाले आस्तिक असल्याचे भासवायला लागले आहेत. इफ्तारवाले देवपूजा करायला लागले आहेत कोणी तर हिंदू आहोत हे दाखवण्यासाठी जानवी घालायला लागले आहेत. ह्याचा तुम्हाला, मला किंवा आणि कोणाला काय उपयोग आहे ?

In reply to by कॉमी

हे सर्व प्रकार प्रामाणिकपणे केले तरी कोणाला काहीही फायदा नाही. मग असल्या प्रकारांचे ढोंग करून तर अजिबातच फायदा नाही.

In reply to by कॉमी

ह्याचा तुम्हाला, मला किंवा आणि कोणाला काय उपयोग आहे ? माझे २ पैश्याचे नास्तिक उत्तर - प्रत्यक्ष आणि ताबडतोब जरी फायदा नसाल हे मान्य केले तरी लांब पल्याचाच फायदा आहे ते असे जसे ख्रिस्ती धर्मप्रचारक कष्ट करून लांब पल्य्याच्या दृष्टितीने आपलं धर्म वाढवतात तसेच काहीसे ( यात धर्माची पकड = आर्थिक साम्राज्य हे गृहीत धरावे ) १) जे काही उरले सुरले हिंदूं आहेत त्यावर जगातील २ बलाढय धर्म आपल्या कडे खेचू पाहत आहेत त्यावर थोडा आळा बसेल २) हिंदू काहीही खपवून घेतो या पारंपरिक समजुतीला तडा जायला मदत ३) आपलं ब्रँड ( येथे हिंदू धर्म = भारत = तेथील संस्कृती - योगापासून ते खाण्यापर्यंत सर्व आले ) वाढायला मदत एकूण काय भारत या देशात ( तरी) हिंदू या बहुसंख्य धर्माचं लोकशी कारण नसताना धवलढवळ करू नका हा संदेश जाईल गेली अनेक वर्षे हिंदूताला " ह" जरी उच्चारला तरी महापाप समजले जायचे ते आता उघडपणे बोलणे/ कला यातून हिंदू संस्कृती ची उजळं आणि प्रसार होत असेल तर काय वाईट आहे ! ( मध्यंतरी मिपावर सध्याचे चित्रपट कसे खते हिंदुत्व पसरवत आहते वैगरे आज जगातील विविध संस्कृती / धर्म सामावून घेणारे धर्म फार कमी आहेत त्यात हिंदू धर्माचा क्रमांक खूप वरती लागतो .. पण त्याची अशी हेळसांड एका ठराविक वृत्ती मुले एवढी झाली ती गाडी परत फिरत असेल तर चांगलेच आहे असे एक जन्माने हिंदू पण कर्माने अधार्मिक असलेलया माझे मत आहे आता मी अग्नोस्टिक का काय ते असल्यामुळे जरी भारतात हिंदूंचे प्रभुत्व वाढले कि नाही याने मला फरक पडला नाही पाहिजे तरी पण जर मला विचारले कि कोणाचा प्रभाव तुला वाढलेला आवडेल तर खालील प्रमाणे १) हिंदू ( पण हिंदुराष्ट्र्र नको ) २) बुद्ध ३) जैन ४) झोरॅष्ट्रियन ५) ख्रिस्ती असो तर हे झाले हिंदुत्वाच्या बाजूने आता " समविचारी " हिंदुत्ववाद्यांशी " देऊळ नको शाळा बांधा " वैगरे विषयवार भांडायला मी मोकळा "

शाम आणि गुरुजी तुम्ही दोघ भांडायला लागले तर बाकिच्यांनी कोणाकडे बघायच. लक्षात घ्या रात्र वैर्याची आहे. सर तन से जुदा च्या काळात आप आपल्यात नुसताच सद्भावना असुन चालणार नाही तर पुढे योग्य योजना असणे गरजेच आहे. कोणीतरी नेता येऊन काही तरी करेल अशी अपेक्षा ठेवुन श्रीलंकेसारखी परिस्थिती ओढवुन घेण्यापेक्षा आपल्या परीने काय करता येईल हे पहाणे जास्त चांगले आहे, त्यासाठीच ब्रेन स्टॉर्मींग व्हायला पाहीजे. आता भजपा प्रणित केंद्र सरकार मुस्लिम तुस्टीकरणापासुन त्यांच्या तृप्तीकरणा पर्यंत पोहोचला आहे. जागतीक राजकीय घडामोडीच्या पार्श्वभुमीवर अश्या तात्पुरत्या जुमल्याची गरज असेल तर माहिती नाही पण ह्यातुन हिंदु स माजाला वाईट संदेश जात आहे. त्या पेक्षा वाईट मेसेज खुद्द मु समाजाला जात आहे की त्यांनी काही केले तरीही माफ आहे. उ प्र मधल्या निवडणुकां मध्ये स्पष्ट दिसले आहे की मुस्लिम बहुल भागात उ प्र सरकारच्या योजनांचा चांगला लाभ उचलणारे मुस्ल्मिम लोक शेवटी आपल मत मुस्लिम नेत्यांनाच देतात भले ते जेल मध्ये पडलेले असु देत. अजुनही जेल मधुन निवडणुक लढवता येते ? श्रीलंकेच्या परिस्थितीची समिक्षा हिंदु समाजा कडुन होणे गरजेच आहे. कदाचीत भारताने श्रीलंकेला आपल्यात समावुन घेतल तर चिनच्या एका डावाचा खातमा होईल. पण असे बोलणे हे आजच्या बुद्धिवाद्यांच्या गळी उतरणार नाही. मिपावर तरी तुम्ही हिंदु आ हात म्हणुन बोलु शकता, तिथे म बो वर तर वारच करायला बसलेले आहेत. मि पा चा चांगला उपयोग करत आपापसातले मतभेद विसरुन कामाला लागा. आपल्या परिने परिस्थितीच आकलन करा व समाजाला मार्गदर्शन करा. आता त्याची गरज आहे.

In reply to by डँबिस००७

भागवतराव व माझ्यात तसे भांडण नाही. ते फडणवीस समर्थक आहेत व मी फडणवीस विरोधक आहे, हाच बहुतेक एकमेव मतभेदाचा मुद्दा आहे. बाकी पवार, मविआ, सेना, कॉंग्रेस वगैरे बाबतीत आमच्या मतांमध्ये फार फरक नाही.

In reply to by डँबिस००७

भांडण? माझं? काहीही. माझं लक्ष फक्त मतदान टक्केवारी वरून हिंदूत्व वाढतंय की कमी होईल होतंय यावर असतं. त्या जनरल ट्रेंडला मी महत्व देतो. कारण विवेकानंद व गुरूदेव रानडे यांनी हिंदुत्वाचे महत्व वाढत जाईल असं सांगितलेलं आहे. शिवसेना व फडणवीस हे आपलं गुरूंजीना चिडवण्यासाठी असतं. कोणि आलं गेलं तरी मला फरक पडत नाही. मी मायबोलीवरची चर्चाही आरामात वाचू शकतो. बिलकूल त्रास वगैरे काही होत नाही. अगदी कागलकरचं पण वाचू शकतो. ;) पण मग व्यग्रता वाढायला लागली की काही दिवस युट्यूबसकट सगळं बंद करून टाकतो. अजिबात चुकल्या चुकल्यासारखं होतं नाही. असो. _/\_

सुनावणी चालूच राहणार. कारण एकाच वेळी बरेच अर्ज आहेत. नाना पटोळेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन रिकामी झालेली जागा लगेच भरायला हवी होती. ते नव्या सरकारने भरली.

उद्धव ठाकरेंचे ११ खासदार शिंदे गटात सामील झाले. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीसाठी १८ पैकी फक्त ७ खासदार उपस्थित होते.

उद्या काका पवारांवर हीच वेळ आली तर? एक आपली शंका. जाम धमाल येईल. -गा.पै.

२००४ मध्ये संगमा यांनी राष्ट्रवादी वर आपला हक्क सांगितलं होता ,पवार साहेब हाय कोर्टात वाट बघत बसले ,शेवटी संगमा तृणमूल मध्ये विलीन झाले