Skip to main content

ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग २)

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 08/07/2022 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
श्री राघव यांनी म्हटल्या प्रमाणे आधीच्या धाग्यात खूप शोधाशोध करावी लागते म्हणून हा नवीन धागा. सरकार पडल्यापासून उठा आणि आठा यांना खरी जाग आलेली दिसतेय. करोना काळात खरी जनतेशी किंवा आमदारांशी संवाद साधण्याची गरज असताना दोघेही घराबाहेर पडले नाहीत. आणि आता सभा घेण्याचा दोघांनी सपाटा लावलाय. आठा म्हणे राज्याचा दौरा करणार आहेत निष्ठा यात्रा या नावा खाली. तर उठा महिला आघाडी बरोबर चर्चा करत आहेत. काल ठाण्यातले सगळ्या रिक्षावाल्यांनी ए. शिं. ना पाठींबा म्हणून उत्सव मोर्चा काढला होता. ठिकठिकाणी "होय आम्हाला गर्व आहे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री झालाय " असे फलक लागलेत. तसेच काल ठाण्यातले ६६ नगरसेवक खऱ्या शिवसेनेतून ए. शिं. च्या शिवसेना मध्ये गेलेत. आता बोला.

वाचने 20155
प्रतिक्रिया 173

प्रतिक्रिया

In reply to by राघव

ठाकरेद्वेषातून तुम्ही जे ऊध्दव ठाकरेंबद्दल लिहीलंय ते अत्यंत चुकीचे आहे. ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून केलेल्या अत्यंत ऊत्तम काम केले आहे महाराष्ट्रात त्यांची प्रतिमा ऊंचावलीय. गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसला नाहीतर त्यांचं सरकार पडणं अवघड होतं.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कोणतं चांगलं काम ते तुम्ही सांगतंच नाही कधी, कि मागच्या जुलै महिन्यात आलेल्या पुरात काहीच मदत केली नाही हे काम, कि मेट्रो ची काम खोळंबली हे?

In reply to by धनावडे

अहो सोडा, ते राजकारणी आहेत, सामान्य नागरिक नाहीत. त्यांच्याशी नका पंगा घेऊ, नाहीतर तुमची केतकी चितळे करतील. उद्या हेच ठाकरे आणि/किंवा राऊत पलटले अणि काकांना शिव्या घालू लागले तर ते लगेच वाईट होतील. सोडा त्या मुळे.

In reply to by राघव

पन्हाळ्यावर दिलेरखानानं आपल्या ६००+ माणसांचे हात-पाय तोडलेले पाहिल्यावर,?????

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चर्चा कुठल्या दिशेने नेणार त्याचा अंदाज आला. आपला पास.!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

एकाने केली तर ती गद्दारी असते सगळ्यांनी केले तर त्याला बंड म्हणतात.मा.उद्धवजींची अडचण ही आहे कि हे बंड मोडुन काढायला पण त्यांच्याकडे आता कोणी उरले नाही आहे.पुढील काळात त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे हे नक्की.

In reply to by कानडाऊ योगेशु

गद्दारीला बंडाचा मूलामा दिला तरू काही फायदा नाही. गद्दारी ही शेवटी गद्दारीच.

आत्ताची बातमी... कल्याण-डोंबिवलीतही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण, महापालिकेतील तब्बल ४० माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. शिंदे यावेळी पंतप्रधान मोदी तसंच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप याबाबतही याच दौऱ्यात चर्चा होईल.

माफिया मुख्यमंत्र्यापासून राज्याची मुक्तता केल्याबद्दल रिक्षावाला मुख्यमंत्र्यांचे आभार अशा स्वरूपाची ट्विट किरीट सोमय्या यांनी नुकतीच केली. म्हणजे उद्धव ठाकरेंना त्यांनी माफिया म्हटले. त्याविरोधात शिंदे कॅम्पमध्ये अस्वस्थता पसरली आहे अशा बातम्या आहेत. भाजपने यावेळी अजिबात कच खायला नको. महाभकास आघाडी सरकार असताना राष्ट्रवादीकडून मिळणाऱ्या लाथा हेच शिंदे कँपचे आमदार मुकाट्याने सहन करत होतेच ना? मग या भाजपकडून मिळणाऱ्या लाथाही तशाच गोड मानून त्यांनी सहन करायला हव्यात. तसेही एकनाथ शिंदेंना किंवा त्यांच्या बाजूच्या कोणाही आमदाराला काहीही म्हटलेले नाही तर त्याच आमदारांना उद्देशून विष्ठा वगैरे म्हणणाऱ्या उध्दव ठाकरेंना आणि त्याच आमदारांना बळी द्यायचे रेडे, घाण वगैरे बोलल्या जाणाऱ्या गोष्टी चालवून घेणाऱ्या उध्दव ठाकरेंना बोलले जात आहे. मग ते शिंदे कॅम्पला खुपायचे काहीच कारण नाही.

In reply to by क्लिंटन

शिंदे गटात गेलेले काही आमदार (कदाचित सगळेच) दोन्ही दगडांवर पाय ठेऊन आहेत. परिस्थितीनुसार दोनपैकी कोणत्याही बाजूला ते झुकतील.

In reply to by क्लिंटन

शिंदे आणी ईतर आमदार लवकरच फडणवीसना कंटाळून घरवापसी करतील, फडणवीसनी स्वपक्षातील लोकाना सोडलं नाही तर ह्याना सोडेल का?? सर्वांना कुचकामी करून फेकून दिलं जाईल.

किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी १०० कोटींचा घोटाळा केला असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्याविरोधात मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर १०० कोटींचा अब्रूनुसानीचा खटला दाखल केला. हा खटला मेधा सोमय्या यांनी दाखल केला असला तरी त्यामागे किरीट सोमय्या पण असणार हे वेगळे सांगायची गरज नाही. यावेळी भाजपने अजिबात कच खायला नको. भाजपावाले बहुतेक वेळा भोळ्या सांबाचा अवतार असल्याप्रमाणे आयत्या वेळेस कच खातात. केजरीवालांनी नितीन गडकरी आणि अरुण जेटली यांच्याविरोधात असेच बेताल आरोप केले होते. खटला शेवटपर्यंत चालवून केजरीवालांना तुरूंगात पाठवायची अपेक्षा पंजाबी अरुण जेटली यांच्याकडून जास्त होती. मराठी माणसापेक्षा पंजाबी लोक अशा गोष्टी जास्त धरून ठेवतात त्यामुळे गडकरी नाही तरी जेटली तरी केजरीवालांना अजिबात सोडणार नाहीत असे वाटत होते. पण कुठचे काय. दोघेही निघाले भोळ्या सांबाचे अवतार. दोघांनीही केजरीवालांना नुसत्या माफीवर सोडून दिले. संजय राऊत यांच्याविरोधात शिवडीच्या कोर्टाने वॉरंट काढले आहे. निदान सोमय्या जोडप्याने हा खटला शेवटपर्यंत चालवून संजय राऊत ला पूर्ण उघडे पाडावे ही अपेक्षा.

In reply to by क्लिंटन

गडकरींचं ऊत्पन्न आणी त्यांच्सा मुलाच्या लग्नात झालेला खर्च, तसंच अरूण जेटलींची मिळतत नसतानाची संपत्ती ह्या मागे हा प्रामाणीक आयएस अधीकारी लागला तर काय होईल हे ते दोघं जाणून असावेत.

In reply to by क्लिंटन

गडकरींचं ऊत्पन्न आणी त्यांच्सा मुलाच्या लग्नात झालेला खर्च, तसंच अरूण जेटलींची मिळतत नसतानाची संपत्ती ह्या मागे हा प्रामाणीक आयएस अधीकारी लागला तर काय होईल हे ते दोघं जाणून असावेत.

अन्यथा सत्तेची पर्वा नाही, एकनाथ शिंदे गटातील आमदाराचा भाजपला थेट इशारा https://zeenews.india.com/marathi/maharashtra/buldana-rebel-eknath-shin…

बाकी काही म्हणा फडणवीसला ऊपमुख्यमंत्री बनवून अमीत शहांनी मने जिंकली. फडणवीस बाजूला ठेऊन जर ऊद्या शिवसेना भाजप युती होनार असेल तर तिचे जोरदार सिवागत दोन्ही बाजूने होईल. फडणवीसच्या गलिच्छ राजकारणामुळे आज भाजपात ऊपरे मजा मारताहेत दरेकर विरोधी पक्षनेता, नार्वेकर विधानसभा अध्यक्ष. मूळ भाजपेयी मुनगंटीवार, खडसे, मूंडे, तावडे, बावनकूळे ह्यांच्या तोंडाला पाने पुसली गेलीत. शिवसेनेत बंडखोरा माजलीय. एका फडणवीस मूळे ना शिवसेना आनंदी आहे ना भाजपा. सवकरच अमीत शहानी भाजपचा ताबा कुणातरी हुशार नेत्याला देऊन महाराष्ट्र भाजपची स्वच्छता करावी.

शिवसेनेचे काय होईल., हे येणारा काळ सांगेल...परंतु शिवसेना पुन्हा जोमाने नक्कीच उभी राहणार.. भले पहिल्या सारख्या जागा निवडून येणार नाही.. परंतु तावून सुलाखून निघाल्यावर शिवसेना पुन्हा बहरणार.. शिवसेनेकडे आता अजून गमावण्यासारखे काही नाही.. मुंबई किंवा ठाणे पालिका पण अवघड आहे.. हे सुद्धा ते जाणतील.. राज ठाकरे बाहेर पडल्यावरहि शिवसेना अर्धी संपणार असेच बोलले जात होते.. बाळासाहेब ठाकरें नंतरहि शिवसेनेची वाट लागणार असेच बोलले जात होते..परंतु शिवसेना संपली नाही.. आताही शिवसेना संपणार नाही.. हि गद्दारी नाही तर बंड आहे उठाव आहे हे सांगितले जातेय.. पण याला बंडखोरी हि म्हणता येणार नाहि.. हि फितुरी आहे.. आणि फितुर फुटून पुढच्या पक्षाला मिळतो आणि त्याचे वजन वाढते.. पण फितूर हा फितूरच गणला जातो.. त्याला स्वतःचे अस्तित्व असे नसते, तो बांडगुळा प्रमाणे दुसऱ्याच्या छत्रछायेतच वाढतो.. पण भाजपा ला हि माहिती आहे, हे फितूर आहेत.. आणि यांचा वापरच करायचा आहे.. फितूर झालेल्या लोकांना हि माहिती आहे, आपण कश्यासाठी आपल्याला मोठं केलेल्या पक्षाला सोडतोय आणि यामागचे खरे कारण काय आहे.. त्यामुळे माझ्यासारख्या शिवसैनिक नसलेल्या माणसाला जर हे लोक संधीसाधू वाटत असतील तर सामान्य शिवसैनिका ला हि नक्कीच असे वाटणार.. यातही मतभेद असतील, पण ते व्यक्तीसापेक्ष असतील, पक्षसापेक्ष नाही... बाकी उद्धव ठाकरें ना बोललेले आवडले नाही, आमचीच खरी सेना.. आम्ही सेनेला वाचवतोय हे सगळे बोलणे म्हणजे सगळे सोंग आहे, आणि या सगळ्यांचा बोलाविता धनी भाजप आहे.. एक शिवसैनिक नसूनही, असल्या धूर्त आणि खालच्या पातळीच्या राजकारणा मुळे मी आमदारकीला यावेळेस शिवसेना उमेदवाराला मत देणार आहे, आणि माझ्यासारखे असे बरेच जण असतील, जे शिवसैनिक नसतील पण कावेबाज, धूर्त राजकारणाविरुद्ध असतील... बाकी उद्धव ठाकरें नी काम नीट केले नाही असे आणि फलाना पसरवले जातेय.. खुद्द २०१९ ला फडणवीस ने मत मागताना मागील पाच वर्षाच्या विकासा वर मत मागितले नव्हतेच.. भाषणे काढून बघा.. काश्मिर ३७० असल्या मुद्यावर मते मागितली गेलीत.. असो.. बाकी पार्टी विथ डि्फरन्स असले भंकस बोल जे २०१४ अगोदर स्वतःचीच मऊ म्हणुन घेताना बोलले होते, ते जनतेला समोर दिसलेच.. समाज पण निर्लज्जा सारखा सगळे एकसारखे म्हणण्यात धन्य मानतो.. याबाबतीत केजरीवाल मात्र खुप पुढे आहे.. पार्टी विथ डि्फरन्स फक्त तोच सध्या दाखवू शकतो.. असो, महाराष्ट्रात, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे पक्ष आहेत, ज्यांची पोहच तळागाळातील लोकांशी जोडलेली आहे, त्यांचे सामर्थ्य भले कमी ठिकाणी असेल पण जेथे आहे तेथे सामान्य लोकां पर्यंत तो पोहचलेला आहे, त्यामुळे शिवसेना संपणार हे कधीच शक्य होणार नाहि.. एकवेळ राष्ट्रवादी संपू शकेल पण शिवसेना कधीच नाही.. माझ्यासारखे पवार.. बाळासाहेब ठाकरे.. अटलबिहारी वाजपेयी.. आणि राजीव गांधी.. महात्मा गांधी.. जवाहरलाल नेहरू सगळेच नेते तितकेच आवडणारे लोक कमी असतील परंतु बाळासाहबे ठाकरेंच्या शिवसेनेला संपवून राजकारण करणारे धूर्त राजकारणी, ते लोक कधीच बरदास्त करणार नाहित.. शिवसेनाला सरळ मतदान करण्याची माझी नक्कीच पहिली वेळ असणार.. बघू.. तसेही लक्ष्मण जगताप यांना निवडणूक लढवता येईल वाटत नाही.. शरद पवार २३- २४ पर्यंत असतील का ह्याचा भरवसा मला वाटत नाही.. येणारा काळ हा bjp चा असु शकेल असे वाटते आहे.. कारण निवडणुकी अगोदरच लोकं फोडणे आणि जिंकून नाही आले कि सरकार फोडणे हि गुंडागर्दी ते नक्कीच करू शकतील, तरीही माझ्यासारखे लोक मात्र त्यांच्या विरोधात असणार आणि राहणार.. आणि काय माहित कदाचीत अजित पवार पुढील निवडणुकी नंतर मुख्यमंत्री असतील.. मागच्या वेळेस राष्ट्रवादी फडणवीस ला मिळाली होती तेंव्हा शरद पवार त्यांच्या मागे गेले असते तर राष्ट्रवादी ला मी कधीच मतदान केले नसते.. परंतु पवार यांना बदनाम करण्यातच त्यांच्या विरोधकांच्या पिढ्या गेल्यात हे सत्य आहे.. आणि शिवसेना संपेल असे वाट पाहणाऱ्यांच्या हि पिढ्या नक्कीच बदलतील.. --- गणेशा

In reply to by गणेशा

काहीही प्रशासकीय अनूभव नसलेल्या, घराणेशाहीतून पुढे आलेल्या फडणवीसला भाजपने २०१४ ला मुख्यमंत्री केले. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर आणी सांगलीत अननूभवी मुख्यमंत्र्यामुळे पुरपरिस्थीती हाताळता आली नाही व अनेक लोकाना मदत मिळाली नाही, अनेकांचे जिव गेले. भाजप प्रदेशाधक्ष चंद्रकांत पाटील ह्याना कोल्हापूर सोडून कोथरूड ह्या “सेफ” मतदार संघात पळून यावे लागले. २०१४ ते २०१९ पर्यंत केलेल्या गचाळ कारभारामूळे १२२ चे १०५ झाले. शिवसेनेसारखी भक्तम संघठना पाठीशी नसती तर १०५ च्या जागी जेमतेम ६० आमदार जिंकले असते भाजपचे. शिवयेनेचे ऊपकार मानायचे सोडून त्याच शिवसेनेला दिलेला शब्द मोडून भाजपने पाठीत खंजीर खुपसला. येणारा काळ हा bjp चा असु शकेल असे वाटते आहे.. येनारा काळ हा फक्त राष्ट्रवादीचा असनार आहे. बाकी शिवसेनेचा मतदार हा ठाकरे ब्रॅंडलाच करनार भाजपच्या वळचणीला लागलेल्या कुणालाही कुठलाही शिवसैनिक मत देनार नाही. शिवसेना जिथे नसेल तिथे राष्ट्रवादीला मतदान होईल. भाजपेयी कितीही हिंदूत्वाचं ढोंग करत फिरले तरी कटिटर हिंदू कधीहा भाजपला मत देनार नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

येनारा काळ हा फक्त राष्ट्रवादीचा असनार आहे
येस्स. खरा गेम हा बीजेपी आणि शिवसेनेचा झालाय. आणि काका पुन्हा तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे कोरडे बाहेर आलेत.

काहीही प्रशासकीय अनूभव नसलेल्या, घराणेशाहीतून पुढे आलेल्या

फडणवीसला

Fadnavis became a Corporator. 5 years later, in 1997, Fadnavis at 27 became the youngest mayor of the Nagpur Municipal Corporation and became the second-youngest mayor in the history of India.[13][14] Fadnavis is representing Nagpur in the Legislative Assembly of Maharashtra State (Vidhan Sabha) since 1999. निदान थोडं तरी वाचत चला.

In reply to by सुबोध खरे

मंत्रीपदाचा काही अनूभव होता का? सरळ महापौर वरून मुख्यमंत्री. भाजपात अनेक चांगले लोक होते याआधी नंतिरीपदं सांभाळलेले. अश्या कुणाला दिले असते तर महाराष्ट्राच आज गचाळ राजकारण करायची गरज नसती.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मंत्रीपदाचा काही अनूभव होता का? तसा तो श्री श्री आदित्य ठाकरे यांना पण नव्हता पण झालेच ना ३ खात्याचे मंत्री. श्री श्री उध्दव ठाकरे यांना तर कसलाच अनुभव नव्हता. झालेच ना मुख्यमंत्री? असा प्रश्न विचारणाच होते. पण नंतर आठवले की असे प्रश्न विचारायचे नसतात .. म्हणौन नाही विचारला .. ता.क. दोघांचे ही नाव खुप आदराने घेतले आहे. तेव्हा (राहेलेल्या) शिव सैनीकांनी माझ्या घराच्या काचा फोडायला येउ नये ही लम्र ईनंती. -- हुकुमावरुन.

In reply to by सुक्या

मंत्रीपदाचा शून्य अनुभव असूनही थेट मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान या सर्वोच्च पदावर स्थानापन्न होणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. राजीव गांधी, मनोहर जोशी, उद्धव ठाकरे, एन टी रामाराव, नवीन पटनाईक, हेमंत सोरेन, केजरीवाल ही नावे लगेच आठवली.

मान्य. त्यांचे किल्ले ढासळणार नाहीत. -- इंदिरा कॉचेही गड८०% टिकतील. शिवसेनेचे गडही अभेद्य आहेत असे तीन नेते म्हणतात ते बरोबर. . . पण . . आतले किल्लेदार बदललेत.

In reply to by कंजूस

हा. एकदम बरोबर. त्यामुळे सगळं कसं एकदम नवीन वाटतेय. :))))

In reply to by कंजूस

सेना जवळपास नामशेष झालेल्या अवस्थेत आल्याने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी व सेनेची युती होण्याची शक्यता बरीच वाढली आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात उद्धव ठाकरेंनी व्यावहारिक भूमिका घेऊन आपले पत्ते लपवून निम्म्यापेक्षा कमी जागा मान्य करून निकालानंतर आपली हुकुमाची पाने बाहेर काढली होती. भविष्यातही ते कॉंग्रेस व राष्ट्रवादीबरोबर युती करताना व्यावहारिक भूमिका घेऊन १०० पेक्षा कमी जागा मान्य करून युतीत निवडणुक लढतील असे वाटते. तसे झाले तर या तीन पक्षांच्या युतीला दोन तृतीयांश बहुमत मिळेल.

In reply to by श्रीगुरुजी

या तीन पक्षांच्या युतीला दोन तृतीयांश बहुमत मिळेल. तसे झाले तर या मविआ च्या अडीच वर्षात जे पहायला मिळाले ते पुढची ५-१० वर्षे बघावे लागेल. जितके वाटे जास्त तितकी लुट मोठी असावी लागते. देव करो तसे न होवो.

In reply to by सुक्या

तसे झाले तर सेनेचा मुख्यमंत्री न होता राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल. अजितदादा मुख्यमंत्री झाले तर प्रशासन गतिमान होईल. सुप्रिया सुळे झाल्या तर काय होईल ते आता सांगता येणार नाही.

प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या मागे शेपटी सारखं फडणवीस का फिरत असतात? अनेक राज्यात मुख्यमंत्री-ऊपमुख्यमंत्री आहेत पण असे प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या मागमागे जानारा ऊपमुख्यमंत्री मी तरी कधी पाहीला नाही. अजित पवारही अनेक वेळा ऊपमामू होते पण असं मागे मागे फिरलेलं कधी पाहीलं नाही. मुख्यमंत्र्याला काही प्रायवसी असते का नाही?

ज्यांना शेती मधले षष्प कळतं नाही त्यांना या योजनेचे कौतुक .. सुपर फ्लॉप योजना आहे..कोणत्याही जल तज्ज्ञाला विचारा

In reply to by कपिलमुनी

मी काही जलतज्ञ नाही परंतु सिंचन व पाणी संवर्धन यावर माझे अभियांत्रीकी शिक्षण झाले आहे. तेव्हा या योजनेत काय चुकीचे आहे ते समजुन घ्यायला आवडेल.

In reply to by कपिलमुनी

गरज नाही. गुगल शोध करुन मी माझी मते बनवत नाही. तुम्हीही त्रास घेउ नका. असेच रहा ... :-)

In reply to by कपिलमुनी

कृपया एखादे उदाहरण द्याल का ? नक्की काय चुकीचे आहे योजनेत ?

नव्या सरकारने वीजदरवाढ करून सामान्यांच्या कंबरड्यात चांगलीच लाथ घातली आहे. २ दिवसाआधी गमस दरवाढ करून केद्रीनेही अशीच लाथ घातली होती. चांगले सरकार नको होते ना? घ्या मग आता.

In reply to by कंजूस

व्वा. काय लाॅजीक आहे. कम्युनीस्ट दरवाढ करत नाहीत. जे दरवाढ करतात ते कम्युनीस्ट असतात. टाळ्या.

संजय राठोडांना क्लिनचीट. बच्चूकडूंपाठोपाठ आणखी एक क्लिनचीट. भाजपात जा क्लिनचीट मिळवा. भाजपात नाही आलात तर मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय यंत्रणा तुम्हाला सळो का पळो करून सोडतील. https://marathi.abplive.com/news/maharashtra/pooja-chavan-sucide-case-s…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

एक तो घोडा बोलो या चतुर. म्हणजे राठोड गिल्टी की नाही? म्हणजे गिल्टी तर इतके दिवस तुम्ही त्यांच्याबरोबर संसार का केला? अणि जर स्वच्छ तर काय चुकलं?

In reply to by टीपीके

आधी बच्चू कडू आणि आता संजय राठोड. सरकार स्थापन होऊन १० दिवस झाले तरी इंधनकर कमी करण्याचा निर्णय नाही ज्याबद्दल हे रान उठवित होते. याबाबतीत केजरीवाल अत्यंत चतुर. शपथविधी झाल्याच्या दिवशीच लोकप्रिय निर्णय जाहीर करून जनमानसात आपले स्थान पक्के करतात व निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करतात. असो. फडणवीस समर्थक या निर्णयांचेही जोरदार समर्थन करतील याची खातरी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आता प्रताप सरनाईक व भावना गवळी रांगेत आहेत. जर नवाब मलिक व अनिल देशमुख भाजपत आले तर ते सुद्धा निर्दोष सुटतील.

In reply to by श्रीगुरुजी

अजून सरदेसाई का सरदेशमुख ची क्लीन चिट बाकी आहे. अत्ता खरी पंचाईत ED आणि किरीट सोमयांची होणार आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

किरीट सोमय्यांना भाजपत विचारतंय कोण? २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या मागणीवरून सोमय्यांना उमेदवारी नाकारली होती. केवळ ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी सोमय्यांचा वापर सुरू होता. आता ठाकरे सरकार नसल्याने सध्या तरी सोमय्यांची गरज उरलेली नाही.

औरंगाबाद नामांतरावरुन शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला हे माहीतच नव्हते. अर्थात काकांची ही कोलांटीउडी अपेक्षितच आहे. शेवटच्या बैठकित घेतलेले तडकाफडकी निर्णय हे येणार्या सरकारला डोकेदुखी उत्पन्न करणारे असावेत ह्या एकाच उद्देशाने घेतले होते. घेतलेल्या काही निर्णयांचे खापर पुढे शिवसेनेवरच फुटणार व मी नाही त्यातली ही भूमिका सोयिस्कररीत्या घेतली जाणार.

आतापर्यंतच्या तिघाडी सरकारला तीन चाकाच्या रिक्षाचे सरकार म्हणत होतो आणि आता सरकार चालवायला एक खरोखरच रिक्षावाला आलाय. ह्याला काव्यात्मक न्याय म्हणावे काय?

In reply to by कानडाऊ योगेशु

सहमत. १०६ हुतात्म्यांनी गुजराती माणसाशी भांडून गुजरात पासून मुंबई घेतली, आणी आज १०६ मृतात्मे गुजराती माणसाच्या तालावर नाचतात ह्यालाही काव्यगत न्यायच म्हणावे लागेल.

In reply to by कंजूस

मुंबई गुजरातला द्यायचीय का? भाजपच्या नादी लागून ईतक्या लवकर गुजरात समर्थन चालू होईल असं वाटलं नव्हतं. मानसीक तयारी सुरू झालीय वाटतं गुजरात वाद्यांची.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आली का गाडी गुजराथी मराठी वर उदयाला जर गडकरी आले नेतेपदी आणि बाजूल समजा फडणवीस मग कोणाचं नावाने ठणाणा करणार ? पशिचम महाराष्ट्र्र विरुद्ध विदर्भ कि काय / कि काकांनी सांगून ठेवलाय पागोटे आणि पगडी अशी " काडी लावा"

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आली का गाडी गुजराथी मराठी वर उदयाला जर गडकरी आले नेतेपदी आणि बाजूल समजा फडणवीस मग कोणाचं नावाने ठणाणा करणार ? पशिचम महाराष्ट्र्र विरुद्ध विदर्भ कि काय / कि काकांनी सांगून ठेवलाय पागोटे आणि पगडी अशी " काडी लावा" गुजराथ वादि ! हायला शब्दोकोश / टूल किट मधील नवीन शब्द

In reply to by कानडाऊ योगेशु

उपमुख्यमंत्री नावाचे पद घटनेत नाही असे सांगून आपल्या ५ वर्षांच्या कारकिर्दीत मंत्रीमंडळातील कोणालाही हे पद न देणाऱ्या फडणवीसांना २०१९ मध्ये आपल्या ८० तासांच्या औटघटकेच्या सरकारात अजित पवारांना मुख्यमंत्री करावे लागले आणि आता स्वत:च उपमुख्यमंत्री पदावर बसावे लागले. हा सुद्धा काव्यगत न्यायच नव्हे का?

In reply to by श्रीगुरुजी

अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावे लागले, असे वाचावे.

In reply to by कानडाऊ योगेशु

जळगाव ग्रामीण ह्या मतदार संघात आता गुलाबराव पाटील हे सेनेचे आमदार आहेत. तेथे आधी गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादीचे आमदार होते. गुलाबराव हे नाव तसं दुर्मीळात दुर्मीळ त्यातच एकाच मतदारसंघात गुलाबराव विरूध्द गुलाबराव. हे पण काव्यगत न्यायात येत नाही योगायोगात येतं.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मी तरी ह्या दोन गुलाबरावां व्यतीरीक्त तिसरा गुलाबराव पाहीला नाहीये.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मी ह्याला काटेंकि टक्कर म्हणेल. बाकी गुलाब हे नाव असण्याबाबत. माझ्या एका मित्राच्या वडिलांचे नाव बदामराव होते आणि शाळेत पुरस्कार वितरणावेळी विद्यार्थाचे पूर्ण नाव पुकारले जात असे. तेव्हा बदामराव ह्या नावावर हशा पिकत असे.अडचण ही असे कि मित्र हुशार असल्याने बरेचसे बक्षिसे त्याला मिळत आणि दोनचार वेळेला त्याच्या नावाचा पुकारा होत असे. आणि हशा पिकत असे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मी ह्याला काटेंकि टक्कर म्हणेल. बाकी गुलाब हे नाव असण्याबाबत. माझ्या एका मित्राच्या वडिलांचे नाव बदामराव होते आणि शाळेत पुरस्कार वितरणावेळी विद्यार्थाचे पूर्ण नाव पुकारले जात असे. तेव्हा बदामराव ह्या नावावर हशा पिकत असे.अडचण ही असे कि मित्र हुशार असल्याने बरेचसे बक्षिसे त्याला मिळत आणि दोनचार वेळेला त्याच्या नावाचा पुकारा होत असे. आणि हशा पिकत असे.

In reply to by कानडाऊ योगेशु

खिक्क. बदामराव. हहपुवा. माझ्या एका मित्राच्या वडीलांचे नाव रजनिकांत आहे. हात विशेष काही नाही पण जेव्हाही मित्र त्याच्या घरी जायचे तेव्हा त्याचे वडील लूंगीतच फिरत असायचे. ह्यावरून त्याला काॅलेजमध्ये खुप चिडवले जायचे. नाव खुपच सिरीयस घेतलं असं. नंतर त्याने त्याच्या पप्पाना स्ट्रीक्ट वार्नींग दिली लूंगी न घालण्याबद्दल. असो. लोक बोंबलतील चालू घडामोडीवर हे काय? असं. बाकी बच्चू कडू हेही असंच वैशिष्टयपुर्ण नाव. कुणाचं नाव बच्चू कसं असू शकतं? बाकी मुनगंटीवार नी वडेट्टीवार हे दोन्ही वेगवेगळ्या पक्षातील लोकही गोंधळ ऊडवतात. २०१४ ला १५०० मतांनी सुनिल तटकरे रायगड मतदार संघातून हरले होते. त्यांच्याच नावाच्या दुसर्या ऊमोदवाराने ७००० मते खाल्ली होती. धुळ्यात एकदा मेनबत्ती नी दिवा ह्या चिन्हांच्या कन्फ्युजन मध्ये मेनबत्तीवीला न जिंकनारा ऊमेदवार जिंकला होता.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

२०१४ ला १५०० मतांनी सुनिल तटकरे रायगड मतदार संघातून हरले होते. त्यांच्याच नावाच्या दुसर्या ऊमोदवाराने ७००० मते खाल्ली होती.
ह्या धाग्यावर अश्या घटनांचा उल्लेख आलेला आहे. काही नावे काही व्यक्तींना विचित्र वाटतात हे खरे. माझ्यामते आपला पूर्वग्रह ह्याबाबतीत कारणीभूत असतो. माझ्या एका शिक्षकांचे नाव जितेंद्र होते. ईमेल वगैरे नुकतेच सुरु झालेले त्याकाळात त्यांनी त्यांचा ईमेल पत्ता दिला तेव्हा जितेंद्रअमुकअमुक>>@तमुकतमुक>>.कॉम असा सांगितला.तो पावेतो ह्या शिक्षकांना फक्त आडनावानेच ओळखायचो म्हणुन व तसेच जितेंद्र हे नाव त्यांच्या एकुण व्यक्तिमत्वाला साजेसे वाटले नाही म्हणुन विचारले कि तुमच्या मुलाचा इमेल पत्ता आहे का? तेव्हा ते म्हणाले माझेच नाव जितेंद्र आहे. माझा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. दुसरा गमतीशीर प्रकार मित्राच्या बाबतीत झाला. वर्गात एकजण नवीन आला होता आणि सवयीप्रमाणे आडनावाप्रमाणे आम्ही एकमेकांना ओळख्त असू. काही कारणाने ह्या मित्राला त्याच्या घरी जाऊन त्याला बोलवायचे होते. हा मित्र घरी गेला. मित्राचे नाव अशोक श्याम टिंबटिंब>> होते आणि ह्या मित्राचा घोळ झाला कि नक्की ह्या मित्राचे नाव काय? अशोक का श्याम? अशोक जुन्या वळणाचे व श्याम नव्या वळणाचे वाटल्याने ह्याने श्याम श्याम असे खालुन सायकलवरून बेंबीच्या देठापासुन ओरडायला सुरवात केली. बाहेर त्याचे वडील आले. कोण हवे आहे. ? श्याम ..आमच्या वर्गात आहे मी त्याचा मित्र. वडिलांना एकुण कल्पना आली काही न बोलता अशोकला बाहेर पाठविले. बाहेर आल्यावर त्याने सांगितले कि माझे नाव अशोक आहे आणि वडिलांचे शाम आहे. मित्राच चेहरा पाहण्यासारखा झाला तिथे. कालांतराने शहर छोटे असल्याने दोन्ही घरे कौटुंबिक मित्र झाली तेव्हा दोन्ही कुटुंबे एकत्र आलेले अस्ताना अशोकचे वडील माझ्या मित्राला " हा माझा मित्र आहे हे सगळ्या गल्लीला माहिती आहे" असे मिश्किलपणे म्हणत असत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धुळे लोकसभा २०१९ निवडणूकीत अनिल गोटे ह्यांनी फुगाहे चिन्ह घेतले होते. नंतर ६ महीन्यानी झालेल्या विधानसभेला फूगा हेच चिन्ह भाजप पुरस्कृत (शिवसेना ऊमेदवार असतानाही) अपक्ष ऊमेदवार राजवर्धन कदमबांडे ह्यांनी घेतलं. गोटे ह्यांना शिटी हे चिन्ह मिळालं. गोटेंचे फूगा चिन्ह असलेले जूने पोस्टर्स जाणून बुजुन समाज माध्यमात पसरवण्यात आले. बर्याच गोटे समर्थकांना कळालेच नाही की फुगा चिन्ह गोटेंचे आहे की कदमबांडेंचे. त्यामुळे विधानसभेला कदमबांडेंनी गोटेंची भरपुर मते खाल्ली. व गोटेंचा पराभव झाला ६ हजार मतांनी.

गोव्यात विरोधी पक्षनेते आणि कळंगूटचे आमदार मायकेल लोबो आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह काही काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार अशी चर्चा आहे. मायकेल लोबोंना काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावरून काढलेही आहे. याच मायकेल लोबोंनी फेब्रुवारी-मार्चमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मनोहर पर्रीकर हयात असताना त्यांनी पक्षातील ख्रिश्चन नेत्यांना सांभाळून घेतले होते पण त्यांच्यानंतर या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली अशाप्रकारच्या बातम्या होत्या. त्यातूनच मायकेल लोबो काँग्रेसमध्ये गेले. त्यांना त्यांची पत्नी दलायलाला शिवली मतदारसंघातून उमेदवारी हवी होती आणि त्यासाठी भाजप तयार नव्हता हे पण एक कारण होते. दिगंबर कामत सुरवातीला काँग्रेसमध्ये होते. १९९४ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी ते भाजपत आले आणि १९९४, १९९९ आणि २०२२ या तीन निवडणुका जिंकले. २००५ मध्ये भाजपच्या काही आमदारांनी बंड केल्याने मनोहर पर्रीकरांचे सरकार पडले होते त्या आमदारांमध्ये दिगंबर कामत होते.त्यांना २००७ मध्ये काँग्रेसने मुख्यमंत्री केले. आता परत ते भाजपत जाणार ही चर्चा आहे. हा सगळा प्रकार खूपच शिसारी आणणारा आहे.शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी मराठी सरदार कधी आदिलशहाकडे, कधी निजामशहाकडे आणि कधी मोंगलांकडे असायचे तसलाच हा प्रकार दिसतो. २००७ ते २०१७ या दोन विधानसभांमध्ये असे घाऊक पक्षांतर झाले नव्हते. नाहीतर १९८९ मध्ये निवडून गेलेल्या विधानसभेपासून हेच चालू आहे. मूळ संघाची पार्श्वभूमी असलेले पर्रीकर, श्रीपाद नाईक, प्रमोद सावंत वगैरे लोक कायम भाजपत राहिले आणि त्यांनी कधीच पक्षांतर केले नाही. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षातही मुळचे काही लोक आहेत. असे काही अपवाद सोडले तर बाकी सगळे आज इथे तर उद्या तिथे. रमाकांत खलप यांच्यासारख्या नेत्यानेही पक्षांतर केले आहे मग इतरांची काय कथा. या सगळ्यांना हाकलून द्यावे असे फार वाटते पण आपण करू तरी काय शकतो?

सुशील कुल्कर्णीनी राष्ट्रवादी चे नामकरण मरून ते पश्चिम-महाराष्ट्रवादी असे केले आहे. एकूणच राष्ट्रवादीचे क्षेत्रफळ पहाता योग्य नाव सुचवले आहे