प्रेरणा - प्राजुतैंची नजरा ही कविता.
डिसक्लेमर - प्रस्तुत कवीची(?) अर्थातच तेवढी लायकी नसल्याने विडंबन करतेवेळी वृत्त / छंद यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.
असतात ओळखीच्या ज्या ज्या समोर नजरा
महिना अखेर येता डसतात त्याच नजरा
रीती-रिवाज कसले, अन मित्रही कुठोनी
चुकवीत हिंडताना त्यांच्याच आज नजरा
बिनधास्त हिंडण्याचे नाहीत दिन गड्या रे
बुरखाच त्या कदाचित चुकवू शकेल नजरा
सध्या बरी घरातच वस्त्रे ती सर्व भारी
त्यांच्यात पाहिले तर धरतील आज नजरा
ती फाय फाय फाय गेली कधीच हातुन
हाती टिकू न देती साधी बिडीही नजरा
देणेकर्यांस साल्या टाळू तरी कसा मी
जिकडे पहाल तिकडे असतात त्याच नजरा
बाजार तर कधीचा मजसाठी बंद झाला
आता उधार नाही म्हणतात आज नजरा
नाजूक मंद खुळखुळ हातात चिल्लरांची
ऐकून हासती मज त्या रोजच्याच नजरा
स्वत:स वाचवाया किती कष्ट वेचतो मी
'तंगडीच तोडतो रे' म्हणती कितीक नजरा
होऊन सर्व काही निर्लज्ज रे कसा तू?
भटू सांग मज जरासे म्हणती मलाच नजरा...
- भटोबा
Taxonomy upgrade extras
वाचने
2918
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे
ओये भटेश ...
विडंबन !
झालेच
नजरफेक
भटोबा
वा! मस्त
झकास
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
विडंबन?
आवडले
मस्त
लै भारी
मस्त
मस्तच रे भटा!
भले!!