Skip to main content

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-९ } डिपर डिप्रेशन

लेखक मदनबाण यांनी रविवार, 26/07/2020 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
कोव्हिड-१९ ने जगातल्या अगदी छोट्या व्यवसायां पासुन ते मोठ्या व्यवसायां पर्यंत सर्वांनाच ठप्प केले आहे हे आपण अनुभवतच आहोत... यातले अनेक व्यवसाय कायमचे बंद होतील तर काही त्यांच्या मूळ क्षमतेने कधीच काम करु शकणार नाहीत किंवा ती क्षमता परत मिळवण्यास बराच काळ जावा लागेल. अमेरिका आणि चीन चे शीत युद्ध देखील आपण पाहत आहोत याच शिवाय अमेरिकेत येणार्‍या निवडणुका देखील या संबंधावर प्रभाव टाकत आहेत आणि यापुढे देखील त्याचा प्रभाव होताना पहायला मिळेल. [ अमेरिका युद्ध सज्जता करतो आहे का ? तो युद्ध कधी करेल ? हे प्रश्न देखील सध्या मनात उद्भवले आहेत. ] या आधीच्या दोन भागांच्या शिर्षकात सोन्याचा उल्लेख केला गेला आहे, सोने त्याच्या उच्चतम दराकडे सातत्याने सरकताना याच काळात दिसले असुन सध्या सोने ८०००० प्रती १० ग्रॅम चा दर देखील दाखवु शकेल अश्या स्वरुपाच्या बातम्या आता येत आहेत आणि जे मला अशक्य वाटत नाही. करोना व्हायरस अचानक चीन मध्ये उद्भवतो काय आणि फार कमी काळात तो जगाला विळखा घालुन मनुष्य प्राणी करत असलेले सर्व व्यवहार ठप्प करतो काय ! हे सगळ कसं अचानक आणि कुठलीही कल्पना नसताना होतं... ही स्थिती अनुभवताना भाग ७ मध्ये दिलेला कोट परत आठवतो:- The crisis takes a much longer time coming than you think, and then it happens much faster than you would have thought. :- Rudiger Dornbusch काही वर्षां पासुन या विषयावर वाचन करताना, हा विषय समजुन घेण्याचा प्रयत्न करताना आणि त्यावर चिंतन करताना मनुष्य प्राण्याच्या गोष्टी / वस्तु कनझ्युम करण्याच्या वृत्तीकडे सातत्त्याने लक्ष जात होते, ज्या ग्रहावर तो राहतो त्याच्यावर तो सातत्याने संख्येने वाढत राहतो आणि सातत्यानेच गोष्टी कनझ्युम करत राहतो. याचा वेगळ्या दृष्टीने देखील शोध घेण्याचा प्रयत्न करताना वेदात / पुराणातुन यात काही समजते का ? असा अणि इतर दृष्टीने शोध घेणे चालु असताना एक उत्तम व्हिडियो कालच पाहण्यात आला तो खाली देत आहे. जगभरात अर्थव्यवस्थेत होत असणार्‍या घडामोडी / बदल आता वेगाने घडत असल्याचे का कोणास ठावूक मला भासते ! जसा वेळ मिळेल तसे या धाग्यात भर टाकीन.

मदनबाण.....

आधीचा भाग :- जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-८ } गोल्ड रश & रिसेट ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 50462
प्रतिक्रिया 99

प्रतिक्रिया

काल जेव्हा मी वरील बातमी [ जर्मन फर्म ची ] पोस्ट केली त्या नंतर मी गुगल बाबावर अजुन वेळ घालवला असता असे लक्षात आले की ही बातमी सर्च रिझल्ट मध्ये पटकन येणार नाही असे बदल झालेले दिसले ! त्याच बरोबर एव्हरग्रांडे ने उशिरा पेमेंट केले आहे अश्या आशयाच्या पोस्ट दिसल्या. एका पोर्टल वर एका लेखाच्या प्रतिक्रियां मध्ये मला एक लेख मिळाला आहे तो इथे देउन ठेवतो. Evergrande ‘Officially’ Bankrupts Today-What it Means To You & The Final Meltdown Of The Global Financial System-Dr. Marco Metzler Interview चीन मध्ये सध्य स्थिती ही अत्यंत विस्फोटक आणि विचित्र भासते... शी जिनंपिंग महत्वाच्या ४ दिवसांच्या बैठकीत आहेत / होते ज्याचा उद्देश आयुष्य भराचे पद, माओ नंतर एका अर्थाने चीनचा नवा साम्राज्यकर्ता असे शी जिनपिंग असणार आहे. चीन मध्ये एकाच वेळी अनेक क्रायसिस घडताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात चीन मध्ये मधल्या काळात पाउस झाला आणि शहरांना वाचवण्यासाठी चीन ने काही धरणे फोडली, त्याचा परिणामस्वरुप चीन मधील अनेक प्रांत जलमय झाले, असेही म्हणतात यामुळे काही मोठ्या कोश्याच्या खाणीत पाणी गेले आणि जोडीला ऑस्ट्रेलिया विरुद्धात चीन ने प्रतिबंध लावल्याने ऑस्ट्रेलियन कोळश्याने भरलेली मोठी जहाजे चीनी बंदरांवर रिकामी न होता समुद्रातच जवळपास वर्षभर नांगर टाकुन उभी आहेत. कोळश्याचा यामुळे तुटवडा निर्माण झाला आणि चीन मध्ये यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात एनर्जी क्रायसीस आहे. याच जोडीला चीन मध्ये कोव्हीडचा मोठ्या प्रमाणात पुन्हा प्रसार झाला आहे. हे कमी म्हणुन काय चीन मध्ये हल्लीच जवळपास १० शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवुन आणले गेले आहे आणि या परिस्थितीत चीन मधल्या एव्हरग्रांडे सकट अजुन मोठे डेव्हलपर्स डिफॉल्ट होण्याच्या मार्गावर असुन चीनी बँक्स आणि इतर बँक्स ची पुंगी वाजलेली आहे.यास भरीस भर म्हणुन चीनी सरकारनेच हल्लीच नागरिकांना मोठ्या प्रमाणात अन्न-धान्याचा साठा करुन ठेवायला सांगितला आहे, करोना लॉकडाऊनच्या वेळी देखील चीन ने जे त्यांच्या नागरिकांना करायला सांगितले नाही ते त्यांनी आत्ताच का करायला सांगितले असावे ??? हे सर्व घडत असताना चीन तैवान आणि आपल्या बरोबर युद्ध स्थिती उत्पन्न करत चालला आहे, जगाचे लक्ष आणि स्वतःच्या नागरिकांचे लक्ष करोना आणि इंटर्नल क्रायसिसी पासुन विचलीत करण्यासाठी चीन यापुढे काय उध्योग करेल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एक मात्र नक्की... चीन चे जगा बरोबर असलेले आणि जगाचे चीन बरोबर असलेले संबंध आता पूर्वी सारखे राहणार नसुन आपल्या देशाला यापुढे मोठे स्थान आणि महाशक्ती आणि उत्तम मोठी अर्थव्यवस्था बनण्याची संधी निर्माण होताना दिसते. विशेष :- Warren Buffett's cash pile tops record with $149.2 billion on hand मी वरच्या एका प्रतिसादाच्या शिर्षकात Contagion हा शब्द प्रयोग केला आहे.china contagion किंवा china contagion fear असा किवर्ड सर्च आता तुम्हाला अनेक बातम्या दाखवेल. जाता जाता :- Kaisa Group Holdings Ltd;Sunac China Holdings Ltd. ;Fantasia Holdings Group Co. ;Country Garden Scenery Journey Ltd.;Wanda Properties Overseas Ltd.; HSBC ; Standard Chartered ही नावे माझ्या वाचनात / ऐकण्यात चायना क्रायसिस संदर्भात वारंवार आलेली आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अपने खिलाफ बातों को अक्सर मैं ख़ामोशी से सुनता हूँ... क्योकि जवाब देने का हक़.. मैंने वक़्त को दे रखा है !

Apple Becomes First Company to Hit $3 Trillion Market Value: The iPhone maker’s value tripled since 2018 as its sales continued to soar and it spent hundreds of billions of dollars on its own stock. Apple becomes world's first $3 trillion company as tech becomes central to post-COVID life या क्षणाला मायक्रोसॉफ्टचे बाजारमूल्य २.५ ट्रिलियन डॉलर्स एवढे दिसत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.

Shiller PE Ratio Shiller P/E Ratio: How To Value The Stock Market RBI hints at disconnect between economy and equity rally Evergrande :- Evergrande says it will abide by orders to tear down 39 structures on its flagship property project in ‘China’s Hawaii’ China Evergrande gets building demolition order; share trading halted Protesters demand money back from Evergrande

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.

काही समजतात काही नाही. पण सातत्य ठेवले आहे. तुमचं कामकाज याच क्षेत्रात आहे का? उद्यापासून कोरोना निर्बंध दूर होतील तर कारखानदारी,उत्पादन,परिवहन,पर्यटन पुर्ववत होण्यास किती महिने लागतील?

तुमचं कामकाज याच क्षेत्रात आहे का? नाही.२००७-०८ चा इकोनॉमिक क्रायसिस फार जवळुन अनुभवला,माझ्या बरोबर काम करणार्‍याला कंपनीने त्या वेळी नारळ दिला होता. तेव्हा जगात असे काय घडले ज्याचा इतका विपरित परिणाम झाला ? ते मला समजेना आणि तेव्हा पासुन या आर्थिक विषयावर वाचण्यास सुरुवात केली. उद्यापासून कोरोना निर्बंध दूर होतील तर कारखानदारी,उत्पादन,परिवहन,पर्यटन पुर्ववत होण्यास किती महिने लागतील? या प्रश्नाचे उत्तर सोप्पे नाही आणि आपण जो काळ बघतो आहोत तो फार विचित्र आहे. करोना + रशिया आणि युक्रेन प्रॉक्सी वॉर याचे भयंकर परिणाम झाले आहेत आणि होतील. दुसर्‍या महायुद्धा नंतर प्रथमच इतकी अस्थिरता आपण अनुभवत असुन रोज नव्या घडणार्‍या घटना यात भर टाकत आहेत. अगदी ताजं उदाहरण द्यायचं झाल तर पुतीन आणि त्यांचे जवळचे महत्वाचे लष्करी सहकारी न्यूक्लिअर बंकर मधुन आता ऑपरेट करत आहेत [ बहुतेक त्यांचे लोकेशन सायबेरिया असल्याचे सांगितले आहे.] एखाद्या राष्ट्राचा राष्ट्र प्रमुख जेव्हा अशी कृती करतो तेव्हा ती सामान्य स्थिती दर्शवत नाही. असो... जाता जाता :- जर तुम्ही सध्य स्थितीत आजुबाजुला पाहत असाल... आणि बातम्यांचे विश्लेषण करत असाल तर लक्षात येईल की सध्य स्थिती ही अग्नी प्रकोपाची आहे. अनेक महत्वाच्या ठिकाणी आगी लागणाच्या घटना घडल्या आहेत आणि स्फोट घडुन आले आहेत... तेव्हा आगी पासुन सांभाळुन !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chandra Official Song... :- Chandramukhi

In reply to by कंजूस

बापरे! तुम्हीच असं म्हणायला लागलात तर आमचं कसं व्हायचं? खरचं मनापासून म्हणतोय.

In reply to by शाम भागवत

फारसं करत नाही. इथे राजकीय अधिक आर्थिक असंही आहे. मागच्या महिन्यातच एक लेख वाचला की सोलर सेल आणि रिचार्ज बाटरीज यासाठी लागणरे धातू काही देशांकडेच आहेत. त्यांची मागणी वाढत जाणार तसे ते देश भाव खाणार. बोलिविया,चीन,रशिया. तेलांचे देश वेगळेच. तर ते आपल्याला माल देण्याच्या बदल्यात पैसे आणि अंतर्गत ढवळाढवळही लादतील असं वाटतंय.

Infrastructure मजबूत असेल तर देश खऱ्या अर्थाने मजबूत असतो. सिंचन व्यवस्था,रस्ते,वीज,कायदा सुव्यवस्था. दुसऱ्या देशावर कमी अवलंबून असणे. हे सर्व असणे गरजेचे आहे. पेट्रोल,डिझेल ल आता पर्यंत बायो इंधनाचा पर्याय उभा राहिला पाहिजे होता. विकास म्हणजे फक्त शहरी भकास पण अशीच कल्पना विकास ची असल्या मुळे आपला देश पण संकटात सापडू शकतो. अजून पण बेसिक infrastructure पण देशाच्या विवध भागात नाही.

या क्षणी डॉलर रुपये विनिमयदर ७७.४७ इतका दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आजवरची निच्चांकी पातळी गाठली होती - ७७.५०. स्रोतः Rupee recovers from all-time low to 77.31 from 77.50 against US dollar गेली दीड-दोन वर्षे भारतीय मा.तं. कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांच्या नोकरीबदलामुळे आर्थिक फटका बसत आहे. या पातळीवरच्या डॉलर रुपये विनिमयदरामुळे त्यापासून थोडासा दिलासा मिळत आहे.

भारताच्या इतिहासात प्रथम च भारतीय रुपयाचे इतके अमूल्य न झाले आहे. सावध ऐका पुढल्या हाका

डॉलर शी भारतीय रुपयाचा विनिमय दर २०१४ मध्ये ६० रुपयाचा आसपास होता.bjp काळात ८० ला स्पर्श करणार नक्की

८० नाही, १०० होणार. शतप्रतिशतचा नारा विसरला का? १०० पेक्षा कमी तडजोड नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

:(

परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून गुंतवणूक मोठ्या प्रमाणात काढून घेतल्याने रुपया घसरला हे समजू शकते ,परंतु चालू खात्यातील तूट वाढली तर चिंता करण्यासारखे आहे. बघू या निर्यातदार कितपत फायदा घेतात रुपयाच्या अवमूल्यनाचा.

In reply to by आग्या१९९०

खरंय. क्रूड आयात खर्च वाढेल. शिवाय रशियाने सवलतीत तेल विकायचे बंद केलंय म्हणे. पण डॉलरचा साठा सध्या चांगला आहे त्यामुळे तगून राहावयाची शक्ति थोडी वाढलीय एवढंच. पूर्वी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून गुंतवणूक काढून घेतली की बाजार जोरदार कोसळायचा. पण अजून तरी सेन्सेक्स व निफ्टी सर्वकालीन उच्चांकावरून फक्त १० टक्केच खाली आलाय. भारतीय गुंतवणूकदारांची शक्ति वाढलीय असं म्हणावसं वाटतंय. मी तज्ञ नाही. फक्त मत नोंदवलं

परदेशी गुंतवणूक एका दमात काढून घेतल्यास परदेशी गुंतवणूकदारांचे नुकसान होते. RBI च्या हस्तक्षेपाची वाट बघतात परदेशी गुंतणूकदार. रुपया स्थिर झाल्यास मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढली जाईल. ती वेळ जवळ आली आहे. मार्केट सावरण्यासाठी देशी वित्त संस्था फार गुंतवणूक करणार नाहीत. अपेक्षा फक्त सरकारी आयात निर्यात धोरण आणि निर्यातदारांची स्पर्धात्मक संधी. शेअर मार्केट मोठे करेक्शन लवकरच बघायला मिळेल.