परा मस्तच लिहितोस
क्षणभर मला 'सापेक्षता वादाचा सिद्धांत' लागोपाठ दोनद वाचल्यावर येउ शकेल तसा मठ्ठपणा आला."हो मी तिथला तंबाखुचा व्यापारी आहे, उत्तर सांगा आता."
असते रे प्लेटोनिक (ह्यापेक्षा विशुद्ध शब्द चांगला वाटतो) मैत्री
"हा माझ्या बायकोचा मित्र" अशी बायकोच्या सहकार्याची ओळख एखाद्या पार्टीत मित्र परिवाराला करुन देशील काय?
होय
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
मस्तच लिहिले हाय..बाकि
>>हा माझ्या बायकोचा मित्र" अशी बायकोच्या सहकार्याची ओळख एखाद्या पार्टीत मित्र परिवाराला करुन देशील काय
हे नवर्याला विचारुन बघायला हवे..
बरे झाले नवरा ऒफ़िस मधुन आला की पहिले त्याचे डोके खाते..:)
बाकी मी मात्र "हि माझ्या नवर्याची मैत्रिण" वगेरे ओळख करुन देउ शकणार नाहि...;)
काय रे "हा माझ्या बायकोचा मित्र" अशी बायकोच्या सहकार्याची ओळख एखाद्या पार्टीत मित्र परिवाराला करुन देशील काय?
काही प्रश्न असेच आणखी -
स्वतःच्या संदर्भात - ही माझी बायको असे म्हणाल की मी हिचा नवरा?
इतरांच्या संदर्भात - हा 'क्ष'चा नवरा अशी ओळख करून द्याल की ही 'य'ची बायको अशी ओळख करून द्याल?
या दोन्ही प्रश्नांमध्ये नात्यांचे संदर्भ बदला - बहिण-भाऊ, दीर-भावजय, मेहुणा (जीजाजी या अर्थी) - मेहुणी...
दोन्ही उत्तरांमध्ये काय फरक आहे हे इथल्या स्त्रीसभासद नक्कीच सांगतील.
स्त्री म्हणून त्या मानवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे हे कळून येते हळूच. गंमत म्हणून हा एक्सरसाईज कराच एकदा.
बाकी, कॅफेत आलेल्या किंवा कोणत्याही मुलीचा उल्लेख कन्या असा होतो तेव्हा त्या कन्या या शब्दाभोवती एक अवतरण दिसतेच हमखास!!! ;)
शिकल्या सवरलेल्या समाजाला सुद्धा 'मैत्री' ह्या नावाचे एक नाते असते हे पटते ?
खूप चांगला प्रश्न आहे रे पर्या हा! (असं मला तरी वाटतं!) अनेक भोचकांच्या अनेक "संदर्भा"तल्या एकाच प्रश्नावरून मलाही हाच प्रश्न पडायचा.
'स्पेस्ड' नावाची एक ब्रिटीश टी.व्ही. मालिका मी पहायचे. त्यात अशा अर्थाचं एक वाक्य होतं, "२१व्या शतकात मैत्र हा परिवार झाला आहे."
"हा माझ्या बायकोचा मित्र" अशी बायकोच्या सहकार्याची ओळख एखाद्या पार्टीत मित्र परिवाराला करुन देशील काय?
हे वाक्य माझ्यातरी परिचयाचं आहे.
"ह्याचा विदा काय?" मी विचारले (हा प्रश्न विचारला की मिपावरचे आपले श्रेष्ठत्व आणी जेष्ठत्व सिद्ध होते म्हणे.)
हीहीहीही मिपावरच काय, कुठल्याही 'लेक्चर'मधे संदर्भासहीत हाच प्रश्न थोडा बदलून विचार, लोकं भारी मानतात लगेच! ;-)
(मैत्रीण) अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
प्लेटॉनिक म्हणजे सखा
नॉन प्लेटॉनिक म्हणजे सख्या.
फोन केलास तेंव्हा बाजुला शेक्रेटरी होती बाबा, म्हणुन थोडक्यात आटोपले.
असो.
त्या कन्येचे म्हणशील तर सकृत दर्शनी असे वाटते की तीचे दोन अकाउंट आहेत.
एक प्लेटॉनिक दुसरा नॉन प्लेटॉनिक
तीला आलेला फोन बहुधा नॉन प्लेटोनिक चा असावा (डीस्टर्ब झाला असेल बिचारा)
आपला पत्ता कट होतो आहे का विचाराने.
निष्पाप प्रश्न -पाप प्रश्न हे 'सापेक्ष' आहे
तुम्ही असे करा आजपासुन फक्त प्लेटॉनिक प्रश्नच विचारत चला...
लेख पण नाही अन शुळ पण नाही... कसे ?
नाहितर, 'चुक्याच भाग दोन' येईल ! चालेल ?
--अवलिया
आज सकाळीच लॉगईन केल्यावर प्रभुदेवांची "एक प्रश्न विचारु का ?" अशी खरड आली.
म्हटलं च्यायला मेलं आता, मास्तर सकाळी सकाळी धोतराला पलिते लावणार. कसेबसे धीर गोळा करुन "विचारा" म्हणले त्यांना ..
काय योगायोग आहे पहा प्रभुमास्तरांनी सकाळ-सकाळ हाच प्रश्न विचारला ...
>> प्लेटॉनीक नाते म्हणजे काय?
प्रश्न तसा सोपा आहे तसा इतका अवघड आहे की नक्की व्याख्या करता येणार नाही ...
असो.
माझ्या मते,
प्लेटॉनिक नाते म्हणजे कसल्याही स्वार्थाशिवाय (पैसा वगैरे ) कसल्याही माध्यमाचा ( शरिर वगैरे ) जाणुनबुजुन अथवा मुद्दाम वापर न करता केवळ विचार अथवा फ्रिक्वेन्सी जुळते आहे म्हणुन जे निर्माण होते ते प्लेटॉनिक नाते ...
ह्यात अर्थातच कसल्या अपेक्षांचे बंधन नसल्याने अपेक्षाभंग व ओघाने येणारा दु:स्वास वगैरे गोष्टी येत नाहीत ...
नात्यांचा ओढा हा फक्त भावना, विचार शेअर करण्यासाठी असतो. इथे सुख व दु:खे दोन्हीही तितक्याच उत्कटतेने वाटली जातात, यश साजरे केले जाते व पराभव पचवला जातो ...
मात्र हे करताना कसलाही स्वार्थ अथव अंतस्थ कु-हेतु इथे असत नाही,
इट इज जस्ट नॅचरल प्रोसेस ऑफ शेअरिंग विदाउट एनी स्वार्थ ...
उदा : मी आणि माझी एक मैत्रिण. आमचे असेच मस्त जमते.
मला तिच्याकडुन काही "हवे" आहे असे अजिबात नाही, ती ही कधीच कसला हट्ट करत नसेल. आम्ही दु:ख वाटतो आणि सुख साजरे करतो. गप्पा मारताना विषयांचे बंधन कधी येत नाही आणि कंटाळवाणे कधीच होत नाही कराण कसल्या भावना नाहीत ...
आम्ही आमचे विचार एकमेकांवर लादत नाही त्यामुळे वाद हे होतच नाहीत ...
आमच्यात पटणार नाही असे बरेच मुद्दे आहेत पण तो अडसर ठरत नाही कारण मुळात त्या मुद्द्यांना पाहुन दोस्ती ही झालीच नाही. मग त्यां मुद्द्यांना कवटाळुन भांडण्यात अर्थ नाही हे आम्ही म्युच्युअली ठरवले आहे ...
( एक स्पष्ट करतो की इथे "प्रेम" नाही, म्हणजे प्रेम आहे पण सामाजीक व्याख्येत ज्याला प्रेम म्हणतात ते प्रेम नाही. मैत्रिणीचे उदाहरण अशासाठी की त्याशिवाय आजकाल कोणी बोलणे ऐकुन घेत नाही, मित्र ना, मग गेला उडत असे असते ;) )
हे एक उदाहरण झाले, इथे मैत्रिणच हवे असे अजिबात नाही.
मित्र, आई-वडील, भाऊ, बहिण अगदी कोणीही असु शकते, नात्यांना अंत नाही ...
अर्थात ह्या माझ्या संकल्पना आणि व्याख्या झाल्या पण माझा फक्त तेवढाच संबंध आहे.
>>काय रे "हा माझ्या बायकोचा मित्र" अशी बायकोच्या सहकार्याची ओळख एखाद्या पार्टीत मित्र परिवाराला करुन देशील काय?
का नाही ???
अगदी जरुर करु, अर्थात नाते तेवढे "मॅच्युअर" जरुर हवे ...
एक मैत्रिण आहे, लग्न वगैरे झाले आहे व वयाने माझ्यापेक्षा मोठ्ठी आहे बर्यापैकी. जेव्हा जेव्हा एखादा समारंभ वगैरे असतो तेव्हा आम्ही मित्र तिच्या घरी जातो. तेव्हा तिचा नवरा आमची ओळख " हा माझ्या बायकोचा दोस्त" अशीच करुन देतो.
तेव्हा ह्यात अगदी अतर्क्य आणि अनैसर्गीक काही नाही, सर्व गोष्टी "समजुतदारपणा" आणि "प्रामाणीकपणा" इथे येऊन थांबतात ...
तर तुम्ही एकदा स्वतःच आपला प्रामाणीकपणा व समजतदारपणा तपासा, मग असल्या प्रश्नांचा त्रासही होणार नाही आणि अवघडल्यासारखेही होणार नाही ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
आवडला रे डॉन्या .....
>> प्लेटॉनिक नाते म्हणजे कसल्याही स्वार्थाशिवाय (पैसा वगैरे ) कसल्याही माध्यमाचा ( शरिर वगैरे ) जाणुनबुजुन अथवा मुद्दाम वापर न करता केवळ विचार अथवा फ्रिक्वेन्सी जुळते आहे म्हणुन जे निर्माण होते ते प्लेटॉनिक नाते ...
हे वाक्य विशेष महत्वाचं आहे.
गुर्जी म्हणाले, सुरुवातीला मैत्री प्लेटॉनिकच असते. हळु हळु प्लेटॉनिक म्हणता म्हणता कधी टॉनिक बरोबर खेळ (प्ले) होतो ते कळत नाही आणि मैत्री टेमकाग्रस्त (मदन बाण झिंदाबाद) होण्याची शक्यता असते.
वाह क्या लाख रुपये की बात कही है गुर्जी.
निखळ मैत्री असते पण फार क्वचीत.
अवांतर: अजुन काय काय बोलत होती रे ती? :)
"ह्याचा विदा काय?" मी विचारले (हा प्रश्न विचारला की मिपावरचे आपले श्रेष्ठत्व आणी जेष्ठत्व सिद्ध होते म्हणे.)"
:-)
"ठाणे, पुणे, मुंबई त हे प्रमाण वेगळे असण्याची शक्यता असते.पण माझ्या अनुभवानुसार १०% मैत्री प्लेटॉनिक असतात." गुर्जींच्या एकुण टोनींगवरुन आता शाळा संपली हे मी ओळखले आणी फोन ठेवला."
शहरानुसार त्यातील घटकही बदलत असतील का हा विचार मनात येऊन गेला.
प्लेटॉनिक शब्दाला अनेक छटा आहेत व त्या कालानुसार बदलल्या आहेत- वाचा
निखळ मैत्री असतेच, फक्त ती जेव्हा एका स्त्री-पुरूषा मध्ये होते तेव्हा काही लोकांच्या कपाळा आट्या पडतात.
>>"हा माझ्या बायकोचा मित्र" अशी बायकोच्या सहकार्याची ओळख एखाद्या पार्टीत मित्र परिवाराला करुन देशील काय?
हरकत नसावी.
मी माझ्या नव-याच्या मैत्रीणींची ओळख किंवा त्यांच्यात असलेल्या मैत्री बद्दल माझ्या मनात कधीच शंका येत नाही.
निखळ मैत्री असतेच, फक्त ती जेव्हा एका स्त्री-पुरूषा मध्ये होते तेव्हा काही लोकांच्या कपाळा आट्या पडतात.
सहमत आहे, आजही एका विवाहित स्त्रीची आणि पुरूषाची मैत्री असलेली लोकांच्या सह्ज पचनी पडत नाही.
पराचा लेख तर खासच, पण छोटा डॉनचा प्रतिसाद अगदी चपखल! 'इट इज जस्ट नॅचरल प्रोसेस ऑफ शेअरिंग विदाउट एनी स्वार्थ ...' विशेष भावलं. विशुद्ध नात्याची त्यांनी केलेली व्याख्या १००% पटली. परा, विषय खरंच खास निवडला आहेस.
=D>
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
स्त्री-पुरुष मैत्री ही जेव्हा समाजमान्य नव्हती (आताही ती सर्वमान्य आहे असे नाही) तेव्हा हे नाते असायचे . पण सोयीसाठी त्याला गुरुभगिनी / भाउ असे म्हणत. म्हण्जे कसे अध्यात्मिक वाटते?
पं.नेहरु व लेडी माउंटबॅटन यांचे नाते प्लॅटॉनिक होते असे म्हणतात ब्वॉ. खरखोटं आपल्याला काय माहीत ?
असो
अवांतर-
मैत्री म्हणजे काय?
मित्र/मैत्रिण कोणाला म्हणावे?
हे ठरविण्याचे अधिकार कोणाचे? त्यासाठी निकष/पात्रता काय?
मैत्री तुटते म्हणजे काय होते?
मैत्री तुटल्यावर पुढे त्याला काय म्हणायचे?
शैत्री म्हणजे काय?
अत्रे व फडके, टिळक व आगरकर यांचे नाते मैत्रीचे कि शैत्रीचे?
अजातशत्रू कोण?
अजातमित्र कोण?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
मग कधी कधी लग्नाने जोड्लेल्या साथी दारा पे़क्षा अशा "प्लेटॉनिक " नात्याचाच जास्त आधार वाटु लागतो कींवा जास्त भावनिक जवळिक आहे असे वाटु लागते तेव्हा त्य नात्याला काय नाव द्ययचे ?
-वैदेही
To,
परीकथेतला राजकुमार.
कडबा६९
तुझ्या कथेला 'तो' प्रतिसाद दीला म्हणून हे अस काय??
आवडला नव्हता तर काढुन टाकायचा ना यार!!
आणि माझ्या सारख्या उपेक्षीत लो़कांचा प्रतिसादही वाळीत टाकायचा असतो रे...........तांदळातुन खडा आणि दुधातुन माशी काढतात ना तसा.......जस आज मी स्वःताला समजतोय...माशी आणि खड्यासारखा कुठेतरी पडलेला.
प्लीझ ह्या प्रतिसादाची खेचु नकोस .......
बाकी मला नव्हत आवडल तो प्रतिसाद देउन.पण मानसिक रुग्नांचे काही problem असतात रे.तसे माझे आहेत,आता तु मला मानसिक रुग्न समजलास तरी हरकत नाही त्या कारणाने तु 'त्या' प्रतिसादाला तरी seriously घेणार नाहीस.
(it cn make sm1 feel sory 4 me bt it does nt mean dat,i jst wrote wat i felt)
Bye,have a nice time!
TO HIDE MY TEARS I DO MY CRYING IN THE RAIN.................. हे लिहणार होतो पण आता नाही लिहणार आहे ते राहु दे
*************************************************
एक उपेक्षीत...................शान............शानबा पण नाही आणि कडबा पण नाही.
प्रतिक्रिया
खी खी खी लै
नाना
फोन
हाणा
मास्तरांच
असते निखळ मैत्री.
परा मस्तच
मस्तच
बास्स
शिकल्या
काही म्हणा
फरक
पण परवा
हो
निष्पाप
मस्त धागा आणि विषय ...
उत्तम
उत्तम प्रतिसाद
गुर्जी
लय
डॉनरावांच
प्लेटॉनिक शब्दाला अनेक छटा आहेत
प्रपंच
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
निखळ
सहमत.. असा
निखळ
प्रतिसादही जोरदार.
गुरुभगिनी
नकार मिळाल्यानंतर
मेलो !!
१+
मग कधी कधी
हाथ से छु के इसे रिश्तों का ईल्जाम ना दो ...
+१
To, परीकथेतल