✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अ.भा. मराठी साहित्य संमेलनात प्रा.डॉ. दिलीप बिरुटे यांचे भाषण.

ग
गवि यांनी
Sun, 04/24/2022 - 13:01  ·  लेख
लेख
आपल्या मिपाचे लाडके व्यक्तिमत्व प्रा.डॉ. दिलीप बिरुटे यांचे साहित्य संमेलनातील भाषण. उत्स्फूर्त, मुद्देसूद आणि खणखणीत विचार मांडल्याबद्दल सरांचे अभिनंदन. ते मिपाच्या अगदी पहिल्या दिवसापासून मिपाच्या प्रवासात सहभागी आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24053 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

कोणी या कार्यक्रमासाठी येत

बिपीन सुरेश सांगळे
Tue, 04/26/2022 - 13:40 नवीन
कोणी या कार्यक्रमासाठी येत असेल तर कळवा , ठरवून भेटू
  • Log in or register to post comments

पहिल्याच वाक्यावर दिल जिंकलंत

प्रसाद गोडबोले
Tue, 04/26/2022 - 14:02 नवीन
पहिल्याच वाक्यावर दिल जिंकलंत सर !
लेखक हा आपल्या लेखनाशी प्रामाणिक असतो. साहित्यिकांचे लेखन अतिरंजित असु शकतं , वाहावत गेलेलं असु शकतं , पाल्हाळिक असु शकतं परंतु ते लेखन खोटें असु शकत नाही असे आम्ही मानतो !!
हाच तर्क मोदीसमर्थक , हिंदुहितवादी , परंपराप्रिय लेखकांच्या लेखनाबाबतही सत्य आहे हे आपल्या लक्षात येईल तो मराठी साहित्याच्या दृष्टीने सुदिन असेल , मिसळपाव दृष्टीने एक्स्ट्रा पाव असेल ! बाकी साहित्यात शेतकर्‍यांचे चित्रण तरी होते आहे पण मध्यमवर्गीय नोकरदार माणसांचे काय ? त्यांचं दु:खं कोण मांडतंय ? त्यावर कोण परिसंवाद घेतंय ? ऑफिसमधील टेंशन्स आणि स्त्रेस् , बॉसची कटकट, गळेकापु कॉर्पोरेट स्पर्धा , ऑफिसबाहेर प्रवासात होणारा मनःस्ताप , रस्त्यात थांबुन थांबुन चिरीमिरी छापणरे आ.टी.ओ. , वाढती महागाई, राज्य आणि केंद्राच्या भांडणात केंद्राने पेट्रोल वरील टॅक्स कमी केले तरी राज्याचे वाढीव टॅक्स भरत पिळवटुण निघणारा सामान्य बाईकवाला आणि मोजक्या ५-६% इतक्या अत्यल्पसंख्य टॅक्स पेयर्स ना ओरबाडुन इनकम टॅक्स वसुल करणारी अन त्याचा काडीमात्रही लाभ त्यांना उपलब्ध्द करुन न देणारी सरकारी व्यवस्था , ह्यावर कोण बोलत आहे ? कोण साहित्य लिहित आहे ? कोण कादंबर्‍या लिहित आहे ? नोकरदार माणसाचा आक्रोश मुका आहे ! ५-६% अन तेही विखुरलेल्या मतदार संघात असलेल्या ह्या अतियल्पसंख्य नोकरदार लोकांच्या वेदना कोण लिहिणार ? कोणाला दिसततच नाहीत त्या . कारण ते पाहायला कोणालाच नाय डोळें ! असो. तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे || अवांतर : बाकी काहीही म्हणा पण एकसुध्दा शाई फेक वगैरे न झाल्यामुळे ह्यासाहित्यसंमेलनाला काही मजा आली नाही बुवा =))))
  • Log in or register to post comments

नोकरदार माणसाचा आक्रोश मुका आहे !

मुक्त विहारि
Tue, 04/26/2022 - 18:24 नवीन
सहमत आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

जय हो !

सस्नेह
Tue, 04/26/2022 - 14:13 नवीन
प्रा. डॉ. सरांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार __/\__ स्नेहा
  • Log in or register to post comments

शेतीचा वाटा व वैचारिक गफलत

गामा पैलवान
Tue, 04/26/2022 - 17:59 नवीन
श्रीगुरुजी,
भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा आता जेमतेम १४% राहिला आहे. पहिला वाटा अर्थातच सेवा क्षेत्राचा म्हणजे ५०% हून अधिक आहे. त्यामुळेच शेतीचा समावेश तृतीय श्रेणीत असावा.
माझाही हाच तर्क होता. आता यातनं काय दिसतं ते बघूया. कृषिप्रधान देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेती फक्त १४% वाटा देते , याचा अर्थ शेतीचं बहुतांश उत्पादन बांधावरच फस्त केलं जातंय. हा उंबरठा शेती कधी ओलांडणार? यासाठी काही धोरणं आखली गेलेली दिसंत तरी नाहीत. यावर जाणकारांनी अधिक प्रकाश टाकायला हवाय. यातनं आजूनेक प्रश्न उपस्थित होतो. जर शेतीचं बरचसं उतपन्न बांधावरच फस्त होतंय, तर शहरं का फुगताहेत? शहरं कधीच आकर्षित करंत नाहीत. गावाकडची हलाखी नेहमी माणसांना गावापासनं दूर शहराकडे लोटंत आली आहे. यावर कोणी म्हणेल की भारताची लोकसंख्या सतत वाढते आहे. पण मग शहरांत बऱ्यापैकी खायला मिळतं. म्हणजेच वाढत्या लोकसंख्येची भूक भागवायला अन्नोत्पादन पुरेसं आहे. पण ते गावाकडे शेतात मात्र होत नाही. मग नेमकं होतं कुठे? भारत खरंच कृषिप्रधान देश आहे का? भारतातली बहुतेक शेती कोरडवाहू म्हणजेच पावसावर अवलंबून आहे. पाऊस चांगला पडला तर त्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था बाळसं धरते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. याचा अर्थ भारत हा कृषिप्रधान देश धरायला हरकत नाही. पण मग उपरोक्त प्रश्नांची संगती कशी लावायची? कुठेतरी काहीतरी जबरदस्त वैचारिक गफलत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

बिरूटे सरांचे अभिनंदन!

जुइ
Tue, 04/26/2022 - 19:10 नवीन
सरांचा दांडग्या आभ्यासाचा भाषणात प्रत्यय येतो. बादवे निवेदकांनी त्यांच्या नावात पुणेकर असे का संबोधले असावे?
  • Log in or register to post comments

मनाला लाऊन न घेण्यासाठी.

Trump
Wed, 04/27/2022 - 00:29 नवीन
बादवे निवेदकांनी त्यांच्या नावात पुणेकर असे का संबोधले असावे?
श्रोत्यांनी वेळीच सावध होऊन मनाला लाऊन न घेण्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ

झक्कास!

सोत्रि
Wed, 04/27/2022 - 15:21 नवीन
प्राडॉ, झक्क जमून आलंय भाषण, फर्मास एकदम! - (एकदा बिरूटेसरांची भेट थोडक्यात चुकलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

प्राडॉ. बिरुटे सरांचे हार्दिक

असंका
Wed, 04/27/2022 - 15:31 नवीन
प्राडॉ. बिरुटे सरांचे हार्दिक अभिनंदन आणि मिपाचे नाव वाढवल्याबद्दल अनेक धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

बिरुटे सरांचे हार्दीक अभिनंदन

स्वधर्म
Wed, 04/27/2022 - 17:12 नवीन
भाषण अजून ऐकायचे आहे, पण प्रतिक्रिया पाहता छान झाले असणार. विषयही रोचक आहे.
  • Log in or register to post comments

आभार !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/27/2022 - 21:59 नवीन
आदरणीय जालमित्र गविसेठ. कौतुकाबद्दल आभार. एका मोठ्या लेखकाने कौतुक धागा काढावा, याचा मोठा आनंद आहे. मिपाकरांनी केलेल्या कौतुकाबद्दल मनापासून आभारी आहे. अ.भा.मराठी साहित्य संमेलनात सहभागी होऊन बोलता आलं. विचार मांडता आले. अशा विचारपिठावर बोलतांना बरीच तयारी आणि मग बोलतांना बरंच राहुन जातं, राहुन गेलं. बरंच सुटलं. असं बोलता आलं असतं. ही भर घालता आली असती, वगैरे. अजुन परफेक्ट वगैरे. अजुन शिकतोय. शिकायचं आहे, पण एकदा विचार मांडून झालं की झालं. पण, व्यक्तिगत मला संमेलनातल्या सहभागाबद्दल स्वत:ला आनंद झाला. ते एक मोठं समाधान आहे. मिपाकरांसोबत तर मिपाच्या जन्मापासून आहे, त्यामुळे मिपाकरांच्या कौतुकाचा आनंद आहे. खरं तर, एकेकाचा नामोल्लेख करून उपप्रतिसाद वाढवता येतील. सर्वांनीच केलेले कौतुक ख़ास आहे, मनापासून आवडलं. तहेदिलसे शुक्रिया. मिपाच्या अन्य धाग्यामधे तु-तू, मै मैं असूनही कौतुक केलं त्या मिपाकर दोस्तांच्या ज़िंदादिलीबद्दलही मनापासून आभार. अशा कौतुक धाग्यातही मनामनाचं ओझं घेवून मनात अढ़ी ठेवून, कडु तोंड करून यावे लागले. अशा मिपाकरांचेही आभार. आपलं सर्वांचं प्रोत्साहन, प्रतिसाद वाचून खुप आनंद झाला. आपले प्रतिसाद अजुन चांगलं बोलायला, अजुन चांगली तयारी करायला. अजुन परफेक्ट व्हायला मदत करतील यात मनात शंका नाही. आभार...! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

एक जरा वेगळी बाजू

माहितगार
Fri, 04/29/2022 - 14:50 नवीन
अशा कौतुक धाग्यातही मनामनाचं ओझं घेवून मनात अढ़ी ठेवून, कडु तोंड करून यावे लागले. अशा मिपाकरांचेही आभार.
काय हे प्राडॉसंर, मनात ठेवून, कडु तोंड वगैरेही तुमच्या कुणा मराठी टिकाकाराच्या बाबतीत असेल तर तश्या टिकाकारांना शिंगावर जरुर घ्या. पण काही मनमोकळे टिकेचे सूर येऊनही तुमचे, तुकोबा ते तात्या संस्कृतीतील मिपाकर टिकाकार मनामनाचं ओझं वगैरे घेऊन जगत असावेत हा आरोप पुन्हा पडताळण्याची आवश्यकता असावी असे मनापासून वाटते. तुकोबा ते तात्यां शिवाय मनमोकळ्या टिकेची परंपरा तुमच्या मराठवाड्यातील कुरुंदकर ते श्रॉफ सरस्वतीभूवनवाले अशीही याही देही याही डोळा याही कान पाहिली ऐकली आहे. कोकण, मराठवाडा विदर्भ पुणेरी टिकांच्या पद्धती वेगवेगळ्या असतील पुर्वीच्या पिढीतले कुरुंदकर असतील नव्या पिढीतले राजन खान वेगवेगळ्या भागतून असतील आपपर भाव न बाळगता टिका हा मराठी संस्कृतीला जागणारी मनापासून सहसा मनात न ठेवणारी असते आणि मिपाचे आपण संस्थापना पासूनचे पाईक आहाते तेव्हा हेवेसानल म्हणून तुम्हीही मनाला लावून घेऊ नये असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशा कौतुक धाग्यातही मनामनाचं

प्रसाद गोडबोले
Sun, 05/01/2022 - 12:53 नवीन
अशा कौतुक धाग्यातही मनामनाचं ओझं घेवून मनात अढ़ी ठेवून, कडु तोंड करून यावे लागले.
=)))) कसलं कौतुक , कसली अढी अन कसलं कडु तोंड ! सगळे तुमचेच विद्यार्थी आहेत सर . तुमचा हा प्रतिसाद पहा : http://www.misalpav.com/comment/1135514#comment-1135514 पाच पैकी चार राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवला , अन जिथे भाजपाला विजय मिळण्याची आशा खुद्द भाजपालाच नव्हती तिथेही काँग्र्समुक्त भारत ह्या भाजपाचा विचाराचा विजय झाला , असे असताना तुमची शब्द रचना पहा >>> लॉकडाऊनमुळे झालेले जनतेचे झालेले हाल, वाहती प्रेते, वाढती महागाई, याचा म्हणावा तसा तितका फटका भाजपाला बसलाच नाही,असे निकाल पाहता म्हणता येत नाही. =)))) ह्याला म्हणतात अढी अन कडु तोंड ! जे पेराल तेच उगवते , येवढं कळण्या इतपत तरी शेतीतील ज्ञान आहे आम्हाला #मीशेतकरी बाकी सर्वत्र राजकारण आणायला आम्हाला आवडत नाही पण साहित्य संमेलन हे राजकीय कुस्तीचाच आखाडा आहे हे हे आम्हाला नाशिक मध्ये काय झालं त्यावरुनच कळलेलें आहे . तस्मात , असोच . पुढील भाषणासाठी शुभेच्छा =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अभिनंदन आणि आभार

सन्जोप राव
गुरुवार, 04/28/2022 - 20:42 नवीन
धागा उशीरा पाहिल्यामुळे प्रतिसादही उशीरा देतो आहे. बिरुटेसरांचे हार्दिक अभिनंदन आणि माझा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

अभिणंडण बिरुटे सर.

सुरिया
गुरुवार, 04/28/2022 - 21:20 नवीन
अभिणंडण बिरुटे सर. सर तसे चांगलेच आहेत. आमच्या मोदीकांकांना कैतरी म्हणत असतात सारखे, नाहीतर तसे चांगलेच आहेत ते. आता गवि कौतुक करतात त्यांचे म्हणजे बघा. त्यांना तरी कोण आहे एकमेकाशिवाय. सतत मिपाध्यास घेतलेली माणसे ही. नजर लागावी अशी मैत्री खरोखर त्यांची. कीपीटप.
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख भाषण.

Jayant Naik
Fri, 04/29/2022 - 08:51 नवीन
खूप आवडले. आपले अतिशय अभिनंदन.
  • Log in or register to post comments

काँग्र्याच्युलेशन्स प्रा. डॉ. सर!

चांदणे संदीप
Fri, 04/29/2022 - 10:55 नवीन
प्रा. डॉ. सर, अभिनंदन! कमीत कमी वेळात अतिशय मुद्देसूद भाषण केलेत. आवडले. मला एकदा या विषयावर आपणाशी चर्चा करायची आहे. ;) लोल! सं - दी - प
  • Log in or register to post comments

दुसरी अवांतर बाजू

माहितगार
Fri, 04/29/2022 - 15:00 नवीन
केळीच्या सालावरून पाय घसरलेल्या मराठी लोकांवरच हसावे तसे ' मोकलाया दाही दिशा'ला क्षणा क्षणाला हसणार्‍या मिपामित्रमंडळी पैकी कुणी, वरील एका प्रतिसादात आलेल्या मेनुकार्डवर एक साधी प्रतिक्रीयाही अद्याप कशी काय दिलेली नाही .
  • Log in or register to post comments

अरे वा! फार अभिमान वाटला सर

प्राची अश्विनी
Fri, 04/29/2022 - 17:23 नवीन
अरे वा! फार अभिमान वाटला सर तुमचा. आणि खूप सारं कौतुक.
  • Log in or register to post comments

अभिनन्दन !

ब़जरबट्टू
Fri, 04/29/2022 - 20:02 नवीन
आपले भाषण आवडले प्रा. डॉ. सर. अभिनन्दन आणि धन्यवाद पण शेतकरी मुद्दे मान्डल्याबाबत
  • Log in or register to post comments

आभार...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/04/2022 - 11:39 नवीन
सर्वांचे मनापासून आभार...! :) _/\_ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा