चांदरात
चांदरात
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
तू स्पर्श करता जगा मी विसरले
मी हरले अन मीच जिंकले
न कळे मला कुणी कुणावर केली मात || १ ||
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
मंचकावर मी बसले कळ सोसते मुश्कील
आपल्याच दुनियेमध्ये असती आपण मश्गुल
दिवेही पेंगुळले चढत चालली चांदरात || २ ||
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
वारा पडला पडदेही पडले
रस रंग गंधही धुंद जहाले
कालची मी वेडी जणू आज टाकली मी कात || ३ ||
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
२/१/१९९८
वर्गीकरण
काय समजत
In reply to काय समजत by विसोबा खेचर
तात्या आता बघा.
तात्या, आता दिसतेय की.
छान!
लय
In reply to लय by पाषाणभेद
क्यास
शुद्धलेखन
In reply to शुद्धलेखन by अरुण वडुलेकर
चुक
छान आहे
अरे वा.. छान आहे कविता
चांदरात छान आहे!
कविता छान आहे!
In reply to कविता छान आहे! by आपला अभिजित
एका ओळीचे ध्रुपद नसावे असा नियम नाही.
चांदरात आवडली.
In reply to चांदरात आवडली. by क्रान्ति
+१
छान कविता!
ह्या ओळी...
शृंगारीक कविता
सुंदर
आपुनको
सुरेख चांदरात