चांदरात

पाषाणभेद जे न देखे रवी...
चांदरात
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
तू स्पर्श करता जगा मी विसरले मी हरले अन मीच जिंकले न कळे मला कुणी कुणावर केली मात || १ ||
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
मंचकावर मी बसले कळ सोसते मुश्कील आपल्याच दुनियेमध्ये असती आपण मश्गुल दिवेही पेंगुळले चढत चालली चांदरात || २ ||
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
वारा पडला पडदेही पडले रस रंग गंधही धुंद जहाले कालची मी वेडी जणू आज टाकली मी कात || ३ ||
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु || २/१/१९९८
वर्गीकरण
Taxonomy upgrade extras

21 टिप्पण्या 4,019 दृश्ये

Comments

विसोबा खेचर नवीन

काय समजत नाय बॉस! फक्त चौकोन-चौकोन दिसताहेत! तात्या.

पाषाणभेद नवीन

In reply to by विसोबा खेचर

तात्या आता बघा. http://www.misalpav.com/node/7489 आताही चौकोन चौकोन दिसतात का? - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

ऋषिकेश नवीन

आता वाचता येतंय.. कविता चांगली आहे. आवडली बाकी,
२/१/१९९८
कुछ ताजा ताजा आनेदो भाई ;) ऋषिकेश

पाषाणभेद नवीन

लय दिसापासुन म्या टाकायचा इचार करत हुतो. पन आज येळ आली पघा. आन त्या १९९८ च्या येळला आपल मिस्सळ तयार नव्हती ना भौ. तवाच टाकली आसती तर आपली भ्येट झाली आसती का? "आमच्या हाटेलीत जो माल तयार हाय त्योच माल भेटल" "नोकरांना दरोज पगार दिला जातो." "खारा माल त्येलात आन गोड माल तुपात क्येला जातो. " "क्यास विंचरू न ये." - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

नितिन थत्ते नवीन

In reply to by पाषाणभेद

क्यास विंचरू न ये क्यासातून हलुवार हात फिरवावा. =)) अवांतरः १९९८ मध्ये डोकीवर खूप क्यासं होती. आता हळुवार हात फिरवायला केस थोडेच राहिलेत. त्यामुळे कविता वाचायला उशीर झालासा वाटला. खराटा (रंग माझा वेगळा)

अरुण वडुलेकर नवीन

कविता चांगली आहे. पण शुद्धलेखनाकडे अधिक लक्ष द्यायला हवे. पहिल्याच ओळीत तु स्पर्श करता.... च्या ठिकाणी तू असें असायला पाहिजे होते. पुढेही हा तु अनेक ठिकाणी र्‍हस्वच झालेला दिसतो. शुद्धलेखनाला फाट्यावर मारायची क्रांति एरवी ठीक आहे.पण काव्यात या अशा बाळबोध चुका म्हणजे ग्लेन फिडिश अल्युमिनियमच्या गल्लासातून सर्व्ह केल्या सारखे वाटते.

पाषाणभेद नवीन

In reply to by अरुण वडुलेकर

धन्यवाद. चुक दुरूस्त केली आहे. बाकी आपल्यासारखी अनुभवी माणसे असतांना आम्ही काळजी घ्यायला हवी. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

प्राजु नवीन

छान आहे कविता. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आपला अभिजित नवीन

रचना, शब्द उत्तम! पण हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु || हे असे एकाच वाक्याचे ध्रुवपद खटकते. ते नियमांत बसते की नाही, हे काव्यतज्ज्ञ सांगतील. पण खटकतेय, एवढे नक्की!

टिउ नवीन

छान कविता!
२/१/१९९८
तुम्ही तर मिसळपाववर येण्याआधीपासुन सिद्धहस्त होता राव! ;-)

प्रमोद देव नवीन

मंचकावर मी बसले कळ सोसते मुश्कील आपल्याच दुनियेमध्ये असती आपण मश्गुल जरा पुन्हा लिहून पाहा. मुश्कील आणि मश्गुल हे शब्द इथे जरा उपरे वाटताहेत. बाकी कविता आवडली. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

बेसनलाडू नवीन

आवडली. पेंगुळलेले दिवे, चांदरात आणि एकंदर माहौल पाहून/वाचून माझ्या दिवे,चंद्र-तारे अता मालवू दे नव्या जीवनाची निशा जागवू दे या ओळींची आठवण झाली. (स्मरणशील)बेसनलाडू

यन्ना _रास्कला नवीन

इस्मे जादा कुझ समझता नाय पन कविता अच्चा जम्या हय. पुढ लिहिलेल वाचु नए. विंग्लिश पिक्चरामधी एकटा हिरो झोपलाय आनि त्याच कुत्र येउन तेला चाटटय अस दाखवत आनि नवीन कविता निर्मान होत हलुवार केसाना चाट तु एकदा तरी कुतरड्या. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यानी पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

मनीषा नवीन

तू स्पर्श करता जगा मी विसरले मी हरले अन मीच जिंकले न कळे मला कुणी कुणावर केली मात || १ || सुंदर !!!