✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(थू)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Fri, 04/29/2022 - 12:13
पेर्णा पाभे सरांची तू http://misalpav.com/node/50075

थू -१

तू चालते अशी वटवृक्षाचे जणू खोड ग अंगावरती भले दांडगे ओंडके जणू ल्याले ग तू हसते अशी छाती माझी धडधडे ग गडगडाटाने त्या माझ हासणं सारें लोपते ग तुझ्या नुसत्या हालचालीनेही वारा वादळी वाहतो ग येता येता तुझ्या घामाचा गंधही संगे आणतो ग तू बघते तेव्हा अंगावरती शहारा माझ्या येतो ग बघून तुला मीच कधीकधी थिजल्यासारखा होतो ग तू स्वत:ला चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता समजते ग बलाढ्य तुझ्या पुढे नाजूक माझा जीव घाबरुन जातो ग

-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-

थू -२

तू चालतो असा जणू नागोबाची चाल रं अंगावरती कळकट कपडे डोक्यावरती टक्कल रं तू हसतो तेव्हा एका नंबरी मुर्खा सारखा दिसतो रं काळ्या पिवळ्या दाता मध्ये निळी जांभळी जीभ रं तुझ्या येण्याबरोबर एक दुर्गंधी भपकाराही येतो रं त्यात सारखा तू जाता येता पाद्प्रोक्षण करतो रं तू दिसतो तेव्हाच अंगावरती लाट भीतीची येते रं तुझी उधारी तुला सांगता मीच लाजूनी जातो रं तू कोडगेश्वर दारुडा अन निर्लज्जशिरोमणी रं तुझ्या ठाई सारे दुर्गुण ठासून ठासून भरले रं

-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-

थू -३

तू धावते अशी जणू की नरभक्षक ती वाघीण ग पाहुनी तुझे ते रौद्र रुपडे अंगावर काटा येई ग तू भुंकते अशी पाठीवरती घामाच्या धारा वाहती ग गुरागुराटाने तुझ्या कित्येकांची वसने पिवळी होती ग तुझ्या येण्यानं मुले आपूला खेळ सोडूनी पळती ग पाळता पाळता तुझ्या नावाने बोंबा जोरात मारती ग तू बघते तेव्हा अंगावरती भीतीने शहारा येतो ग बघून तुला लांबूनच मी थिजल्यासारखा होतो ग तू सतत भूंकरी चावणारी पिसाळलेली कुत्री ग तुझ्या पेकाटी संधी मिळता लाथ एकदा घालेन गं

-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-

पैजारबुवा, ६१-६२-६३६४

प्रतिक्रिया द्या
5630 वाचन

💬 प्रतिसाद (10)

ह्याह्या

कॉमी
Fri, 04/29/2022 - 12:41 नवीन
&#129315 जबरदस्त, खूप हसलो!
  • Log in or register to post comments

शीर्षकात 'थू' असल्याने

माहितगार
Fri, 04/29/2022 - 15:41 नवीन
शीर्षकात 'थू' असल्याने आवर्जून उघडली नंतर थू च्या जागी कदाचित तू अभिप्रेत आहे असा संशय आल्यानंतर जरा सावधगिरीनेच वाचली :) या निमीत्ताने कोण होतास तू कोण होतीस तू ची आठवण झाली,
  • Log in or register to post comments

;);)

प्राची अश्विनी
Fri, 04/29/2022 - 17:36 नवीन
;);)
  • Log in or register to post comments

=)))))

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/29/2022 - 17:53 नवीन
=)))))
  • Log in or register to post comments

भारी! मस्त विडंबने!

श्रीगुरुजी
Fri, 04/29/2022 - 18:43 नवीन
भारी! मस्त विडंबने!
  • Log in or register to post comments

लयी डेंजर =))

Bhakti
Fri, 04/29/2022 - 18:57 नवीन
लयी डेंजर =))
  • Log in or register to post comments

व्वा! एकावर तिन तिन मजले

पाषाणभेद
Fri, 04/29/2022 - 23:55 नवीन
व्वा! एकावर तिन तिन मजले चढवले की तुम्ही! पहिले व तिसरे थू मात्र एकदम भावले!
  • Log in or register to post comments

थू....थू....थू....

रंगीला रतन
Sat, 04/30/2022 - 01:27 नवीन
थू....थू....थू.... एका कवितेची तीन विडंबने? पहिली नाय पण फूडच्या दोन आवडल्या :)
  • Log in or register to post comments

कहर =))

प्रचेतस
Sat, 04/30/2022 - 06:11 नवीन
कहर =))
  • Log in or register to post comments

दर्जा!!

तुषार काळभोर
Wed, 05/04/2022 - 08:30 नवीन
इन मीन अडीच तासात ट्रिप्पल धमाके! अफाट प्रतिभा!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा