Skip to main content

त्यांनी हिंदीत का बोलावं?

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 11/04/2022 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एक विनंती केली की वेगवेगळ्या राज्यांमधल्या असमान मातृभाषा असणार्‍या लोकांनी एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजीऐवजी हिंदी भाषा वापरावी. https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/india/people-dif… या अनावश्यक विनंतीला अहिंदी राज्यांमधे साहजिकच विरोध होतो आहे. विशेषत: दक्षिणेकडच्या राज्यांमधे. आता ज्या लोकांची मातृभाषा हिंदीच आहे त्यांना या विनंतीबद्दल काहीच आक्षेप नसणारेय.उलट त्यांचा आयता फायदाच होईल. आता प्रश्न असे आहेत. १. दोन राज्यांमधील असमान भाषिकांनी कोणत्या भाषेत एकमेकांशी बोलावं अशी विनंती गृहमंत्री का करत आहेत? लोकांनी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे हे गृहखात्याच्या अखत्यारीत येतं का? २. या विनंतीला दक्षिणेकडच्या राज्यातले लोक सकारात्मक प्रतिसाद देतील असा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? की ही विनंती हिंदीतून बोलू शकणार्‍या अहिंदी राज्यांतल्या लोकांसाठीच आहे? अशी विनंती केल्यावर ज्यांना हिंदी येत नाही ते लगेच हिंदी शिकून घेतील हा भ्रम गृहमंत्र्यांना का झाला असावा? ३. या विनंतीमागे कारण काय असावं? हिंदी पट्ट्यातल्या लोकांची सोय व्हावी? कारण हिंदी पट्ट्यातले लोक "हम तो पापी पेट के लिए आए हैं भाई" हे रडव्या चेहर्‍यानं सांगून अहिंदी भाषिकांना 'आमची सोय बघा' असंच सांगू पाहतात. हिंदीभाषिक अहिंदी राज्यातल्या भाषा शिकायला राजी नसतात. पण अहिंदी भाषिकांनी मात्र हिंदी शिकावी ही अपेक्षा बाळगतात. हे हिंदी पट्ट्यातले लोक हिंदीतर भाषा शिकणार कधी? ४. समजा दक्षिणभारतीय राज्यांनी किंवा ईशान्येकडच्या राज्यांनी एकत्र येऊन त्यांची एकच सामायिक बोलीभाषा निर्माण करुन हिंदीला कडवे आव्हान निर्माण केले तर? मग काय करतील अमित शहा? ५. इंग्रजीला अमित शाह यांचा विरोध का? इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. कमालीची ताकदवान भाषा आहे.आंतरराष्ट्रीय भाषा आहे. उपयोगाची भाषा आहे. असं असताना ती न वापरता हिंदी का वापरायची?

वाचने 108679
प्रतिक्रिया 510

प्रतिक्रिया

In reply to by सुखीमाणूस

हिंदी राष्ट्रभाषा म्हणून घटनेने निवडली आहे. अगाध ज्ञान. रचाकने अज्ञानात सुख असतं म्हणून तुम्ही तुमचं नाव सुखीमाणूस ठेवलंय का?

In reply to by सुखीमाणूस

पूर्ण चुकीची माहिती आहे. भारत या देशाला राष्ट्रभाषा नाही. हिंदी किंवा इतर कोणतीही भाषा ही भारताची राष्ट्रभाषा नाही.

In reply to by श्रीगुरुजी

काही लोक हिंदीला अतिआत्मविश्वासाने ती राष्ट्रभाषा नाही असे इतरांना ( म्हणजे ज्यांची सर्वसाधारण समज अशी आहे की हिंदी घटनादत्त राष्ट्रभाषा आहे ) उच्चरवाने सांगतात, परंतु हे अगदी सरळसोट प्रकरण नाही. ते कसे ते पाहा - भारताची कोणतीही राष्ट्रभाषा नाही - अचूक. अगदी बरोबर. परंतु - - कलम ३४३ : देवनागरी लिपीतली हिंदी ही भारतीय संघराज्याची अधिकृत राजभाषा आहे. अंक आंतरराष्ट्रीय पद्धतीचे भारतीय अंक आहेत. - कलम ३४४ : हिंदी ह्या राजभाषेसाठी आयोग व संसदीय समितीची स्थापना केलेली आहे. ही समिती दर पाच वर्षांनी भाषेशी निगडीत प्रश्नांचा आढावा घेईल आणि जरूर ते बदल सुचवेल. त्याचबरोबर पहिल्या पाच ते दहा वर्षांत शासकीय प्रयोजनांसाठी अधिकाधिक प्रमाणात हिंदी वापरली जाईल आणि इंग्रजीच्या वापरावर निर्बंध घातले जातील. - कलम ३५१ : ह्या कलमात हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश देण्यात आले आहेत. बहुसंस्कृती असलेल्या देशात अभिव्यक्तीचं मध्यम म्हणून सर्वांना समजेल अशारीतीनं हिंदीचा विकास करणं हे संघराज्याचं कर्तव्य आहे. यावरून हिंदीला भारतीय संघराज्यात महत्त्वाचं स्थान आहे आणि ती जरी राष्ट्रभाषा नसली तरी तिचा (कदाचित त्या दिशेने) विकास करणे हे संघराज्याचे कर्तव्य म्हणून सांगितले आहे. [ कदाचित त्या दिशेने ] असं मी संदिग्ध बोलत आहे कारण बाकीच्या कलमांनुसार भाषा विकासाबाबत आणि धोरणांबाबत वेगवेगळे निर्णय घेण्याचे अधिकार वितरित केले आहेत.. - कलम ३४३ (२) : घटना लागू होण्यापूर्वीपासून घटना लागू होईपर्यंत इंग्रजी ज्या शासकीय प्रयोजनासाठी वापरली जात होती तशीच ती भारतीय संघराज्यात सर्व अधिकृत कारणांसाठी पुढची १५ वर्षं अधिकृत भाषा म्हणून वापरली जाईल. - कलम ३४३ (२) : प्रशासकीय कोणत्याही प्रयोजनासाठी इंग्रजीच्या जोडीस हिंदीचा(!) वापर करायचा असेल, तर तसा तो राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे करता येईल. - कलम ३४३ (३, ४) : घटना लागू झाल्यापासून १५ वर्षांनंतर ठराविक क्षेत्रात इंग्रजीच्या किंवा देवनागरी अंकांच्या वापरासाठी संसद कायदा करू शकते. - कलम ३४४ : प्रथम ५ वर्षांनी आणि मग १० वर्षांनी भाषा विषयी प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात येईल. तीस जणांची समिती अहवाल तयार करून आयोगाकडे पाठवेल. आयोगाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती योग्य वाटेल तिथे बदल करण्याचे अध्यादेश काढतील. - कलम ३४९ : संसदेमध्ये कोणालाही भाषेसंबंधी काही बदल सुचवायचे असतील तर ते आयोगाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच सुचवता येतील. - कलम ३४८ : सर्वोच्च आणि सर्व उच्च न्यायालयामधली सर्व कारवाई संसदेच्या पुढील आदेशापर्यंत इंग्रजीत होईल. संसदेत मांडायची विधेयके, पारित केलेले नियम, अधिनियम, विधेयके इंग्रजीत प्रसिद्ध होतील. ज्या पद्धतीने कायदा, संविधान आणि त्यातल्या दुरुस्त्या, त्यांना भविष्यात न्यायालयात दिली जातील ती आव्हाने यांचा आधीच सखोल अभ्यास करून अमितभाईंनी (अर्थात टीमने) कलम ३७० रद्द केले, ते पाहता अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

पण अधिकृतरीत्या हिंदी राष्ट्रभाषा नाही हेच दिसतेय.राजभाषा असेल. प्रत्येक राज्याची स्वतची अशी अधिकृत “राज्यभाषा” आहे. अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो. अमितभाईने बिमारू राज्ये नी तियाला गुजरात जोडून वेगळं राष्ट्र मागून घ्यावे नी त्याला हिंदी राष्ट्रभाषा करावी. ईतर राज्यांच्या माथी बळजबरीने हिंदी मारू नये. देशातील एकमेव हुशार राज्य असेल तर तामीळनाडू त्यानी हिंदीला सरळ लाथाडले. तरी त्याना काही फरक पडला नाही ऊत्तरोत्तर तामीळनाडू विकासच करत आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

ज्या पद्धतीने कायदा, संविधान आणि त्यातल्या दुरुस्त्या, त्यांना भविष्यात न्यायालयात दिली जातील ती आव्हाने यांचा आधीच सखोल अभ्यास करून अमितभाईंनी (अर्थात टीमने) कलम ३७० रद्द केले, ते पाहता अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो. कलम ३७० रद्द करणे आणि हिंदी राष्ट्रभाषा करणे यात महद्अंतर आहे. ३७० वे कलम रद्द करण्यास बहुसंख्य भारतीयांचा पाठिंबा होता. परंतु त्यांच्या दृष्टीने ती प्राथमिकता नव्हती. त्यामुळे ते कलम लादणारा व रद्द न करणारा पक्ष वारंवार सत्तेत येऊ शकला. परंतु त्याचमुळे भाजपने हे कलम रद्द केल्यानंतर अत्यंत क्षीण विरोध झाला. हिंदी ही राष्ट्रभाषा करण्याचा निर्णय झाला तर अनेक राज्यातून विरोध होईल. त्याचा भाजपला निवडणुकीत तोटा होईल. भाजप कर्नाटक पाठोपाठ तेलंगणात बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात आहे. तेथे भाजपला फटका बसू शकतो. महाराष्ट्र, बंगाल व ईशान्येकडील राज्यातही विरोध होईल. मुळात हिंदी भाषिक राज्यात भाजप बराचसा संतृप्त झाला असल्याने निवडणुकीत तेथे अधिक फायदा होणार नाही. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हा निर्णय टिकणार नाही. त्यामुळे अमित शहा हे धाडस करणार नाहीत. केले तर पस्तावतील.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

ते पाहता अमितभाई हिंदीच्या राष्ट्रभाषा होण्याचा मार्ग कायदेशीर विनासायास करू शकतात यावर मी विश्वास ठेवतो.
करु देत ना राष्ट्रभाषा.. केंद्र सरकारच्या कामकाजाची अधिकृत भाषा हिंदी असेल तर मान्यही करु.. पण म्हणून अन्य भाषा संपवायच्या का ? अन्य भाषा बोलायच्या नाहीतच का ? हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही हा कायदेशीर वाद काही काळ बाजूला ठेवू .. त्याचा कायदेशीर कीस पाडून काय आहे ते कायदेपंडित सांगतीलच.. आणि हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणून प्रत्येकाने जबरदस्तीने हिंदीच बोलली पाहिजे याला काय अर्थ ? स्थानिक भाषा बोलायच्या /शिकायच्या नाहीत ? उद्या हे अमित शहा स्थानिक भाषेतून शिक्षण मग, स्थानिक भाषेतील संस्थळांचा देशातील वापर (यात मिसळपावपण आले हं) , स्थानिक भाषेतीलप्रसार माध्यमे, वृत्तपत्रे आणि सरतेशेवटी स्थानिक भाषेतून बोलायलाही बंदी घालतील.. स्थानिक भाषेतून बोलणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवतील.. मग हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणत हे सगळं पण चालवून घ्यायचं का ? स्थानिक भाषांचं अस्तित्वच नको आहे का हिंदी भाषकांना ?

In reply to by तर्कवादी

मुळात जेथे अनेक भाषा बोलल्या जातात व कोणतीही भाषा निम्म्याहून कमी जनता बोलते अशा देशात एखादी विशिष्ट भाषा "राष्ट्रभाषा" म्हणून का हवी आहे? समजा हिंदीला राष्ट्रभाषा केले तर भारतीय जनतेने काय करणे अपेक्षित आहे? सर्व भारतीयांनी हिंदी शिकायची, सर्व शिक्षणाचे माध्यम हिंदी करायचे, सर्वांनी एकमेकांशी हिंदीत बोलायचे, सर्व वाहिन्या/प्रकाशने/पुस्तके/वृत्तपत्रे इ. फक्त हिंदीतच असणार असे काही करायचे आहे का? म्हणजे ६० टक्क्यांहून अधिक असलेल्या अहिंदी जनतेने आपली भाषा ओंकारेश्वरावर दहन करून टाकायची आणि हिंदीभाषिकांना काहीच करावे लागणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

हिंदीच्या सक्तीला विरोध आहे तो याच कारणामुळे... खरंतर हिंदी भाषिक अनेक राज्यात आहेत. ते तिथली स्थानिक भाषा शिकत , त्या भाषेबद्दल आदर व आपुलकी दाखवत हळूहळू स्थानिकांच्या मनातही हिंदीबद्दल आस्था निर्माण करु शकतात.. पण "आमचीच भाषा ही श्रेष्ठ" या गंडात असलेले बहुसंख्य हिंदी भाषिक (काही सन्माननीय अपवाद नक्कीच असतील) हे करु शकणार नाहीत म्हणून सक्ती करण्याची वेळ येते..

In reply to by तर्कवादी

केंद्र सरकारच्या कामकाजाची अधिकृत भाषा हिंदी असेल तर मान्यही करु.. पण म्हणून अन्य भाषा संपवायच्या का ? अन्य भाषा बोलायच्या नाहीतच का ?
स्थानिक भाषेतून शिक्षण मग, स्थानिक भाषेतील संस्थळांचा देशातील वापर (यात मिसळपावपण आले हं) , स्थानिक भाषेतीलप्रसार माध्यमे, वृत्तपत्रे आणि सरतेशेवटी स्थानिक भाषेतून बोलायलाही बंदी घालतील.. स्थानिक भाषेतून बोलणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवतील.. मग हिंदी राष्ट्रभाषा आहे म्हणत हे सगळं पण चालवून घ्यायचं का ? स्थानिक भाषांचं अस्तित्वच नको आहे का हिंदी भाषकांना ?
स्थानिक विरुद्ध हिंदी असा रंग देऊ नये. हिंदी विरुद्ध इंग्रजी असे ते आहे. दोन भिन्नभाषिक लोकांनी परस्पर संवाद साधण्याकरिता इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे आवाहन आहे. यात सक्ती नाही. स्थानिक भाषेची गळचेपी तर अजिबात नाही. दोन मराठी भाषिकांनी मराठीत बोलू नये किंवा दोन तमिळ भाषिकांनी तमिळमध्ये बोलू नये असे सांगत नाहीयेत अमित. फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे. आपली स्थानिक भाषा + एक अजून एक भाषा (ज्यांना आपली स्थानिक भाषा येत नाही त्यांच्यासोबत दैनंदिन व्यवहारात संवाद साधण्याकरिता) अशा दोन भाषा येणे गरजेचे असेल तर ही दुसरी भाषा शिकायला सोपी अशी कोणती आहे? अर्थातच हिंदी. इंग्रजी तरी प्रयत्नपुर्वक शिकावी लागती तरी परिणामकारकरीत्या बोलता येत नाही ती नाहीच. जे हिंदी चित्रपट / दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम (मनोरंजन + वृत्त) पाहतात त्यांना हिंदी शिकावी लागतच नाही. आपोआपच येते. मला शाळेत फक्त ५ वी ते ७ वी हे तीनच वर्षे हिंदी हा एक १०० गुणांचा विषय होता. तरीही मी सहजपणे इतरांसोबत हिंदीत संवाद साधू शकतो. ५ वी १० वी इंग्रजी हा १०० गुणांचा विषय आणि पुढे महाविद्यालयात सर्वच विषय इंग्रजी भाषेतून शिकलो तरी इतरांसोबत इंग्रजीत संवाद साधताना एक अवघडलेपण वाटते. एकेक शब्द मनात अनुवाद करुन मग मनातल्या मनात काळ बरोबर आहे की नाही हे ठरवत वाक्य जुळवत बोलावे लागते आणि तरीही चूका होतात. हिंदीत बोलताना कितीही चूका केल्यात तरीही अपराधीपण वाटत नाही. इंग्रजी बोलताना एक जरी चूक झाली तरी आपल्याला फाशीची शिक्षा होईल इतके प्रचंड अपराधीपण वाटते. एक तर इंग्रजीतले ते हॅव बीन / हॅड बीन असे परफेक्ट टेन्स धरून एकूण बारा काळ, मग आता आपण प्रेसेन्ट परफेक्ट मध्ये बोलायचे की सिंपल पास्ट मध्ये की पास्ट परफेक्ट मध्ये की पास्ट कंट्यूनिअस की पास्ट परफेक्ट कंट्यूनिअस हा घोळ काही केल्या संपत नाही. पॅसिव्ह व्हॉईस / इंडायरेक्ट स्पीचमध्ये तर अजूनच दडपण येते. उच्चारांबाबत तर नवीनच गोंधळ दिसतो आहे. पूर्वी आम्ही कॉस्च्यूम, शेड्यूल, कोच असे शब्द उच्चारायचो आता तेच म्हणे कॉस्ट्यूम, स्केड्यूल, काऊच असे उच्चारले जातात. इतकंच उच्चारांकरिता वापरले जाणारे इंग्रजी शब्द प्रोनाउंन्सिएशन आणि अ‍ॅक्सेंट यांच्या उच्चारातही अनेक ठिकाणी तफावत आढळते. दक्षिण भारतीय लोकांचं एक बरं आहे ते चूकीचं इंग्रजीही सर्रास बोलतात आणि ते देखील प्रचंड आत्मविश्वासाने. त्यांचे इंग्रजी शब्दांचे उच्चार हा तर स्वतंत्र ग्रंथाचा विषय होईल. हां इंग्रजी ही लेखनाकरिता बरीच सुलभ भाषा आहे असे खात्रीने म्हणता येईल. विशेषतः आता लॅपटॉप वर टायपिंग करायचं असतं तेव्हा तर स्पेल चेक ग्रामर चेक आणि डिक्शनरी सोबत असताना तर अगदीच विल्यम शेक्स्पीअर इतकं नाही तरी शशी थरूर यांच्या तोडीचं इंग्रजी देखील अनेक भारतीय लोक लिहू शकतात. समोरच्याला आपला मुद्दा समजेल आणि तो आपल्याला उचित प्रतिसाद पाठवेल व तोही पुन्हा आपल्याला समजेल इतपत कार्यालयीन इंग्रजी वाचन लेखन बहुतेक सर्व डेस्क जॉब असणार्‍या नोकरदार मंडळींना येत असावं असा अंदाज आहे. नोकरीकरिता अर्ज, वस्तू खरेदी करिता चौकशी - प्रत्युत्तरात माहितीपत्रक दरपत्रक कोटेशन, त्यानंतर पुढे कस्टमर कंप्लेंट - रिझोल्यूशन याकरिता करावं लागणारं रिटन कम्यूनिकेशन इंग्रजीत फारच सुलभ आणि विनासायास होतं. हेच हिंदीत करायचं म्हंटलं तर प्रचंड कटकटीचं होईल. आणि तोंडी करायचं ठरलं तर नेमकं उलट म्हणजे इंग्रजीत अवघड आणि हिंदीत तूलनेने सुलभ. स्थानिक भाषिक अर्थातच सर्वोत्तम पण अनेकदा मी वस्तू महाराष्ट्रात वापरतोय आणि कंपनीचं हेड ऑफिस बेंगलोरमध्ये आहे अशा वेळी मला कन्नड येत नाही आणि विक्रेत्याला मराठी येत नाही तर इंग्रजीपेक्षा बोलायला मला हिंदी सोपी पण जर तो इंग्रजी किंवा कन्नडमध्येच बोला असं अडून राहिला तर मग मी तोंडी ऐवजी लेखीचा आग्रह धरेल. कारण इंग्रजी बोलताना चूका होऊ शकतात आणि मग पुढे त्याचा परिणाम अपेक्षित सोल्यूशन मिळण्यात होऊ शकतो. लेखीमध्ये इंग्रजीत चूक होण्याची शक्यता तूलनेने कमी आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

स्थानिक विरुद्ध हिंदी असा रंग देऊ नये. हिंदी विरुद्ध इंग्रजी असे ते आहे. दोन भिन्नभाषिक लोकांनी परस्पर संवाद साधण्याकरिता इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे आवाहन आहे.
ही सुरुवातीची पायरी आहे.. सुरवातीला असे वरवर सामान्य भासणारे, हितद्वेषी न वाटणारे आवाहन करायचे आणि मग सगळे लोक हिंदी शिकलेत की हळूहळू एकेक मुद्दा पुढे रेटायचा असा मोठा कार्यक्रम (अजेंडा) असू शकतो.
यात सक्ती नाही. स्थानिक भाषेची गळचेपी तर अजिबात नाही. दोन मराठी भाषिकांनी मराठीत बोलू नये किंवा दोन तमिळ भाषिकांनी तमिळमध्ये बोलू नये असे सांगत नाहीयेत अमित. फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे.
मुळात असे काही आवाहन करायचे कारणच काय ?लोक आपापल्या पद्धतीने मार्ग काढतातच की .. आताही दोन भिन्न राज्यातील एकमेकांची स्थानिक भाषा न जाणणारे लोक - आपापसात हिंदी बोलतच नाहीत , फक्त इंग्लिशच बोलतात असं काही नाहीये .. कधी इंग्लिशमध्ये बोलत, कधी हिंदीत संवाद साधत तर कधीअन्य कोणतीतरी भाषा बोलत किंवा एकमेकांची भाषा शिकून तोडकी-मोडकी बोलत तर क्वचित प्रसंगी एखादा दुभाषा मध्ये घेत मार्ग काढतातच .. आता तर इंटरनेटमुळे गुगल ट्रान्सलेटर सारखे अ‍ॅप वा फोनवरुन हवे ते चित्र दाखवत संभाषण करण्याची सोय उपलब्ध आहे. मला आठवते एकदा चेन्नईजवळ मी अल्पकालीन वास्तव्यास असताना घसा दुखू लागल्याने मला ओवा हवा होता तेव्हा मी ओव्याचे चित्र स्थानिक दुकानदाराला दाखवून ओवा मिळवला होता. जवळपास सर्वच राज्यात इतर राज्यातून स्थलांतर केलेले लोक आहेत... कोणतेही व्यवहार थांबलेले नाहीत. थोड्याफार अडचणी येत असतील पण व्यवहार पुढे सरकतातच. मग आता मुद्दाम आवाहन करायचे कारणच काय ? नीती आयोग वा कुठल्या आयोगाने तर म्हंटले आहे का की सगळ्या राज्यातील लोकांना एक भाषा येत नसल्याने देशाचा जीडीपी खाली घसरला वगैरे.. ? आणि आवाहन करायचेच होते तर लोकांना असेही म्हणा ना की तुम्ही दुसर्‍या राज्यात दीर्घकालीन वास्तव्यास असाल , स्थलांतरित झाला असाल तर तिथली स्थानिक भाषा आवश्य शिकून घ्या, त्या भाषेचाही आदर करा. असं आवाहन का केलं नाही अमित शहांनी लोकांना- त्यातही हिंदी भाषिक लोकांना ? विरोध हिंदी भाषेला नाहीये तर "इतर भाषिकांनी हिंदी आवर्जुन शिकावी आणि हिंदी भाषिकांनी मात्र वर्षानुवर्षे दुसर्‍या राज्यात राहून स्थानिक भाषा शिकण्यात स्वारस्य दाखवू नये, स्थानिक भाषेचा आदर करु नये " या दुटप्पी धोरणाला विरोध आहे.

In reply to by तर्कवादी

सध्या भारतीय प्रशासकीय सेवा मार्फत आयएएस दर्ज्याचे अधिकारी निवडले जातात. कालांतराने हिंदीचे प्राबल्य वाढले की निम्न दर्जाचे कर्मचारी देखील अशाच प्रकारच्या आयोगामार्फत घेण्याचे धोरण आखून राज्य पातळीवरील नोकर भरतीचे अधिकार संपवुन टाकायचे आणि हिंदी भाषिक पट्ट्यातील तरुणांना सरावाची भाषा असल्याने इतरांच्या तुलनेत त्यांना अधिक फायदा मिळेल असे बघायचे. हिंदी भाषिक पट्ट्यात सरकारी नोकरीचे आकर्षण परंपरागत आहे. नोकरीची हमी, कमी श्रम, आता तर पगार पण आकर्षक, काही ठिकाणी वरकड कमाईची संधी आणि लग्नाच्या बाजारात सरकारी नोकरीचे आकर्षण हे असे सर्व घटक आहेत. हा कावेबाजपणा वेळीच ठेचला पाहिजे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे का?? तमीळ भाषकाचा नी मराठी भाषकाचा हिंदीशी संबंध काय? आपली स्थानिक भाषा + एक अजून एक भाषा (ज्यांना आपली स्थानिक भाषा येत नाही त्यांच्यासोबत दैनंदिन व्यवहारात संवाद साधण्याकरिता) अशा दोन भाषा येणे गरजेचे असेल तर ही दुसरी भाषा शिकायला सोपी अशी कोणती आहे? अर्थातच हिंदी हे कोणी ठरवले?? तुम्हीला हिंदी सोपी वाटते म्हणून बंगाली, केरळी ईशान्येकडील राज्यानाही ती सोपी वाटते का?बरं मग सोपीच भाषा घ्यायची असेल तर गुजराती का नको?? किंवा हरयानवी किंवा राजस्थानी??

In reply to by चेतन सुभाष गुगळे

खोटे आकडे. हिंदी खुद्द हिंदी भाषीक राज्यातही बोलली जात नाही. मध्य प्रदेशात बुंदेलखंडी, बाघेलखंडी नी माळवी बोलतात, युपीत मैथीली नी भोजपुरी बोलतात, बिहारात ही भोजपुरी बोलली जाते. मग ही आकडेवारू कुठून आणलीय??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हिंदी खुद्द हिंदी भाषीक राज्यातही बोलली जात नाही. मध्य प्रदेशात बुंदेलखंडी, बाघेलखंडी नी माळवी बोलतात, युपीत मैथीली नी भोजपुरी बोलतात, बिहारात ही भोजपुरी बोलली जाते.
हा माझाच मुद्दा तुम्ही पुन्हा अधोरेखित करताय. त्यांची मातृभाषा हिंदी नाहीचे मूळी पण दुसरी भाषा म्हणून ते हिंदी बोलतात. इतकंच काय गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा या भागातही दुसरी भाषा म्हणून हिंदी बोलली जाते.
मग ही आकडेवारू कुठून आणलीय??
अर्थातच दुसरी भाषा असली तरी त्यांना हिंदी येते म्हणून त्यांचादेखील या आकडेवारीत सामावेश केलेला आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

हिंदी द्वितीय स्थानावर असूनही त्याना सरसकट हिंदी भाषाक धरलंय ह्यावरूनच ती आकडेवारी खोटीय.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

त्यांची मातृभाषा हिंदी नाहीचे मूळी पण दुसरी भाषा म्हणून ते हिंदी बोलतात. मिळतीजुळती असणे आणि बर्‍यापैकी फरक असणे हे जरा समजून घ्याल का? सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बर्‍याच लोकांना मालवणी आणि प्रमाण मराठीत बोलता येणे फार अवघड जाऊ नये. याचा अर्थ मालवणी ही मराठीपासून पूर्णत: वेगळी आहे का? ती जर पूर्णत: वेगळी असेल तर भाषावार प्रांतरचनेदरम्यान सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रात का सामील केला असेल?

In reply to by उपयोजक

मिळतीजुळती असणे आणि बर्‍यापैकी फरक असणे हे जरा समजून घ्याल का?
याचा अर्थ मालवणी ही मराठीपासून पूर्णत: वेगळी आहे का?
मिळतीजुळती, बर्‍यापैकी फरक, बर्‍यापैकी फरक हेच तीन निकष लावून तर इंग्रजी ऐवजी द्वितीय भाषा म्हणून हिंदीचा आग्रह धरला जातोय. इंग्रजी ही स्थानिय भाषांना पूर्णतः परकी आहे तर हिंदी बर्‍यापैकी जवळची. मराठीला तर खूपच जवळची.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तमीळ भाषकाचा नी मराठी भाषकाचा हिंदीशी संबंध काय?
इंग्रजीशी तरी काय संबंध? जे कॉलेजला गेलेत, इंजिनिअरींग मेडिकल सायन्स कॉमर्स वगैरे शिकलेत त्यांच्यातले सर्वच्या सर्व देखील अस्खलित इंग्रजी बोलू शकत नाहीत. इतर मंडळी जसे की शेतकरी, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, ड्रायव्हर, हमाल वगैरेंना तर इंग्रजी किती अवघड जाईल. हिंदी तूलनेने सोपीच की इंग्रजीपेक्षा.
हे कोणी ठरवले?? तुम्हीला हिंदी सोपी वाटते म्हणून बंगाली, केरळी ईशान्येकडील राज्यानाही ती सोपी वाटते का?बरं मग सोपीच भाषा घ्यायची असेल तर गुजराती का नको?? किंवा हरयानवी किंवा राजस्थानी??
लिपी आणि उच्चारण यात सुलभता आहे. हरियाणवी / राजस्थानी मध्ये बाणातला ण, मराठी आणि दक्षिणी भाषांमध्ये असलेलं ळ असली उच्चारायला अवघड अक्षरं हिंदीत नाहीत म्हणून. मी मारवाडी भाषिक जैन असून अनेकदा मला गुजराती लोकांच्या सोबत संपर्क करावा लागतो. गेली किमान पस्तीस वर्षे अधूनमधून गुजराती कानावर पडते आहे. काही शब्द समजले तरी पूर्ण वाक्य समजत नाही, स्वतः जुळवून बोलणे तर कधीच शक्य नाही. त्यामुळे गुजराती कधीच सोपी वाटली नाही. बेळगाव मध्ये तीन महिने राहिलो पण अनेकदा ऐकूनही एकही कन्नड शब्द समजला नाही. धुळ्यात दोन वर्षे राहूनही अहिराणीतले काही शब्द समजले. पूर्ण वाक्य समजणे बोलणे हे काही जमले नाही. हिंदी मात्र शेजारी आणि दूरचित्रवाणी + आकाशवाणी + चित्रपट यांच्यामुळे फारच लवकर आत्मसात केली.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे. हिंदीच का?

Official Language = राष्ट्रभाषा असे नाही तर. https://knowindia.india.gov.in/national-identity-elements/ या लायनीत राष्ट्रभाषा हिन्दी असे शिकल्याचे आठवते. आणि शालेय स्तरावर हिन्दी च्या नव्हे राष्ट्रभाषा हिन्दी च्या परिक्शा असायच्या. अजुन चालु आहेत का? सध्या Olympiad चा जमाना आहे. महात्मा गान्धी यानी दक्शिण भारतात हिन्दी प्रसार करायला विशेष प्रयत्न केले होते. https://en.wikipedia.org/wiki/Dakshina_Bharat_Hindi_Prachar_Sabha अमित शहा आता गान्धीजीन्च्या मार्गाने जात आहेत बाकी विचारान्चा विरोध असला तरी.

In reply to by सुखीमाणूस

घटनेनुसार हिंदी किंवा इतर कोणतीही भाषा ही राष्ट्रभाषा नाही. परंतु मुद्दाम हिंदीचा उल्लेख खोडसाळपणे राष्ट्रभाषा असा काही जण करतात. हिंदीच्या परीक्षा घेणाऱ्या संस्थेचे नाव खोडसाळपणे राष्ट्रभाषा प्रचार समिती असे ठेवले आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नसली तरी हिंदी हीच राष्ट्रभाषा आहे असे जनतेच्या मनावर ठसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः सुरूवातीच्या काळात हे प्रयत्न जोरदार सुरू होते. परंतु हिंदीला सुरूवातीपासूनच तामिळनाडूचा विरोध. होता. सुदैवाने आता सर्व दक्षिण भारतात, बंगालमध्ये व महाराष्ट्रातही हिंदीला विरोध होत आहे. त्यामुळेच जाहिराती, समाजमाध्यमे, आंतरजाल, कंपन्यांची मदत केंद्रे आता मराठीतूनही सेवा देतात. समोरच्याने हिंदीत सुरूवात केली तरी मी मराठीचा आग्रह धरतो व बहुतेक वेळा तो मान्य होतो. तो मान्य नाही झाला तर संभाषण बंद करतो.

आज काल कोणत्या ही भाषेचे कोणत्या ही भाषेत रुपांतर करण्याची सुविधा .पोर्टेबल उपकरण बनवणे काही अवघड नाही. हिंदी ही भाषा आहे.पण जे हिंदी ची तळी उचलत आहेत .केंद्रीय सरकार हे असले उद्योग नेहमीच करते. मग कोणत्या ही पक्षाचे असावे. त्या आडून ह्यांचा स्वार्थ असतो,मागास हिंदी भाषिक लोकांना हिंदी मान्य झाली की देश भर घाम करायला मोकळे रान मिळते. हिंदी भाषिक लोकांनी त्यांची राज्य ना राहण्याच्या लायकीची ठेवली आहेत ना रोजगार,शिक्षणाचा. ना ह्या राज्यात कायदा सू व्यवस्था चांगली. बेशिस्त राज्य आहेत सर्व हिंदी भाषिक. हिंदी सर्वांनी मान्य केली की हे सर्व पूर्ण देशाचा म्हशी चा गोठा बनवणार. विरोध त्याला आहे.

In reply to by sunil kachure

समजा हिंदी ला विरोध केला तर पूर्ण देशाचा म्हशी चा गोठा बनण्यापासून वाचेल काय ?

In reply to by sunil kachure

इंग्रजी जेव्हा कामकाजाची भाषा बनली तेव्हा मुंबईत कामचलाऊ इंग्रजी ज्ञानाच्या जोरावर मद्राशांनी (त्या काळी सरसकट सर्व दक्षिण भारतीयांना महाराष्ट्रात असेच संबोधले जाई) स्टेनो टायपिस्ट पी ए अशा नोकर्‍या पटकावल्या. शिवसेनेला मग हटाव लूंगी बजाव पूंगी अशी मोहीम राबवायची संधी मिळाली. या संधीतूनच बस्तान बांधलेली शिवसेना आता हिंदीविरोध आणि दाक्षिणात्यांबाबत पुळका दाखविते आहे.

चर्चेतून मराठी भाषिकांचा हिंदी नको हा आग्रह पोहोचला. हिंदी / इंग्रजी ला पर्याय म्हणून इतर कोणती भारतीय भाषा देता येईल काय ?

In reply to by धर्मराजमुटके

हिंदी / इंग्रजी ला पर्याय म्हणून इतर कोणती भारतीय भाषा देता येईल काय ? नकोच आहे पर्याय. पर्याय का हवा?

In reply to by श्रीगुरुजी

माझ्यासाठी देखील. भत्तर भारतीय मजूरांच्या सोयीसाठी अहिंदी भाषकांना हिंदी शिकावी हे सांगनार्यांची किव येते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आणि दक्षिणीलोक, इतर साहेब लोक यांच्याशी बोलताना इंग्रजी बोलताना खुप सोयीचे पडते या बद्दल विशेष कौतुक करायला पाहिजे. कितीही केले तरी शेवटी कष्टकरी लोक क्षुल्लकच ना !

In reply to by चौथा कोनाडा

साहेबाची चमचेगिरी करायला इंग्रजी बरी पडते यांना. म्हणजे कामचूकारपणा करुनही पगारवाढ / बढती मिळतेच. गरीब मजूराकडून काय मिळणार? फक्त प्रेमाचे दोन शब्द?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

साहेबाची चमचेगिरी करायला इंग्रजी बरी पडते यांना. म्हणजे कामचूकारपणा करुनही पगारवाढ / बढती मिळतेच. भ्रम आहे. इंग्लिशमध्ये बोलून साहेबाची चमचेगिरी करण्याचे दिवस साहेबाबरोबरच गेले. आता बढतीसाठी वेगळी कौशल्ये लागतात. गरीब मजुराकडून प्रेमाचे शब्द मिळतात हासुद्धा अजून एक भ्रम.

In reply to by चौथा कोनाडा

आपल्या देशातल्या जास्तीत जास्त लोकांना येणाऱ्या भाषेच्या दुस्वासासाठी खूप कमी भारतीयांना येणारी भाषा कवटाळायला बघणे म्हणजे फार मूर्खपणाचे वाटते. भाषा एक टूल आहे. तिचा सर्वांना उपयोग व्हायला पाहिजे, निस्ती अस्मिता धरून बसून उपयोग नाही.

In reply to by कॉमी

आपल्या देशातल्या जास्तीत जास्त लोकांना येणाऱ्या भाषेच्या दुस्वासासाठी खूप कमी भारतीयांना येणारी भाषा कवटाळायला बघणे म्हणजे फार मूर्खपणाचे वाटते. भाषा एक टूल आहे. तिचा सर्वांना उपयोग व्हायला पाहिजे, निस्ती अस्मिता धरून बसून उपयोग नाही. आक्षेप. आपल्या देशातील जास्तीत जास्त मानवी पैदास केलेल्या राज्यांची भाषा असा शब्द हवा. मग ह्या हिशेबाने

In reply to by कॉमी

आम्ही इंग्लिशला अजिबात कवटाळत नाही. मी महाराष्ट्रात सर्वत्र फक्त मराठी वापरतो. महाराष्ट्राबाहेरील अमराठी लोकांशी बोलताना इंग्लिश.

In reply to by कॉमी

Tool म्हणून योग्य भाषा वापरली जात आहे.ती हिंदी च असावी असा हट्ट का? गृहमंत्री देशातील अनेक भाषा कडे दुर्लक्ष करून हिंदी वापरा असे कसे काय सांगू शकतात? हिंदी भाषा एजेंडा हाच मुळी राजकीय आहे. एकच देश,आपल्याच देशातील. हे शब्द वापरूच नका. बाकी ज्या असंख्य भाषा आहेत त्या देशातील च भाषा आहेत ह्याची जाणीव का हीत नाही. एकमेव हिंदी हीच भाषा देशात नाही. 50% लोक हिंदी समजत नाहीत.

In reply to by sunil kachure

गृहमंत्री देशातील अनेक भाषा कडे दुर्लक्ष करून हिंदी वापरा असे कसे काय सांगू शकतात?
गृहमंत्र्यांनी स्थानिक भाषेसोबत कोणती भाषा वापरावी यावर उपदेश दिलेला. स्थानिक भाषेऐवजी नाही. मग हिंदीच का ह्याचे साधे सरळ उत्तर आहे भारतात सगळ्यात जास्त लोकांना बोलता येणारी भाषा म्हणजे हिंदी.
हिंदी भाषा एजेंडा हाच मुळी राजकीय आहे.
लोकांची सोय होत असेल तर अजेंडा असला तरी काही फरक पडत नाही. अजेंडा फोल पडायला फार कुणाला न येणारी भाषा लादली जाऊ नये. सामान्य लोकांची सोय बघावी.
एकच देश,आपल्याच देशातील. हे शब्द वापरूच नका.
हे शब्द कोणीही वापरले नाहीयेत. अमित शहांच्या सल्ल्यामध्ये सुद्धा स्थानिक भाषा प्रथम स्थानिच होत्या.
50% लोक हिंदी समजत नाहीत.
करेक्ट. भाषांची यादी आणि किती टक्के भारतीयांना ती भाषा बोलता येते हे पाहिले तर समजेल हिंदीचा सर्वात जास्त आहे. मराठी केवळ १०% लोकांना येते. इंग्लिश सुद्धा १०%.

In reply to by कॉमी

भारतात सगळ्यात जास्त लोकांना बोलता येणारी भाषा म्हणजे हिंदी. हे कोणी ठरवलं? भारतात हिंदी न समजनारे लोक जास्त आहेत. लोकांची सोय होत असेल तर अजेंडा असला तरी काही फरक पडत नाही. अजेंडा फोल पडायला फार कुणाला न येणारी भाषा लादली जाऊ नये. सामान्य लोकांची सोय बघावी. लोकांची सोय होतेय? ऊत्तर भारतीय मजूर म्हणजे लोक का? त्यांच्या सोयी साठी हिंदी का लादून घ्यावी? करेक्ट. भाषांची यादी आणि किती टक्के भारतीयांना ती भाषा बोलता येते हे पाहिले तर समजेल हिंदीचा सर्वात जास्त आहे. मराठी केवळ १०% लोकांना येते. इंग्लिश सुद्धा १०%. नीट पहा. किती लोकांना हिंदी येते ते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भारतात हिंदी न समजनारे लोक जास्त आहेत.
१. भारतात सर्व भाषांमध्ये हिंदी सगळ्यात जास्त लोकांना बोलता येते. २. भारतात हिंदी बोलता येणाऱ्या लोकांपेक्षा हिंदी न बोलता येणारी लोकं जास्त आहेत. वरकरणी विरोधाभास वाटला तरी दोन्ही वाक्यांमध्ये विरोधाभास नाहीये. दोन्ही खरी वाक्ये आहेत. भारतात हिंदी समजणार्या लोकांची संख्या- ४३.६३% आहे. अशी दुसरी कोणतीही भाषा भारतात नाही जी ४३.६३% किंवा जास्त भारतीय नागरिकांना बोलता येते. याचा अर्थ ती "सगळ्यात जास्त लोकांना बोलता येणारी भाषा आहे".
हे कोणी ठरवलं
जनगणनेमधून आलेली आकडेवारी आहे. इथे बघा. विकिपीडिया वर विश्वास नसल्यास सेन्सस वेबसाईट वरून एक्सेल फाईल डाउनलोड करा, आणि तपासा.
नीट पहा. किती लोकांना हिंदी येते ते.
आणखी काय नीट पाहायचे ?

In reply to by कॉमी

भारतात हिंदी समजणार्या लोकांची संख्या- ४३.६३% आहे. ही आकडेवारी खोटी आहे. हिंदी ईतर राज्यांवर लादण्यासाठी अशी खोटी माहीती खुद्द सरकारच पसरवते. हिंदी भाषीक राज्ये न्हणून जी काज्ये गणली जातात ची देखील हिंदी बोलत नाहीत. ईतर भारताचा प्रश्नच नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कशावरून खोटी ? तुमच्या नाजूक भावनांना धक्का बसतो म्हणून आकडेवारी खोटी होत नसते. भारत सरकारच्या अकडेवारीला खोटे म्हणायला भरपूर पुरावे लागतात. उगाच उठले आणि खोटे म्हणले असे सांगता येत नाही. काही ठळक पुरावे असतील आकडे खोटे असण्यासाजे तर द्या. बर, आकडे खोटे आहेत तर खरे आकडे द्या म्हणल्यावर तुम्ही गप्प होता.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

लोकांची सोय होतेय? ऊत्तर भारतीय मजूर म्हणजे लोक का? त्यांच्या सोयी साठी हिंदी का लादून घ्यावी?
स्थानिक भाषेनंतर, ज्यांना स्थानिक भाषा येत नाही, त्यांसाठी दुसरी भाषा कुठली असावी हे ठरवण्यासाठी ज्यांना स्थानिक भाषा येत नाही त्यांना काय बोलता येते हेच पहावे लागेल. मग जर उत्तर भारतीय लोकं जास्त प्रमाणात आहेत हे तर हिंदी वापरण्यासाठीचे आणखी एक सबळ कारण झाले. दुसरी भाषा म्हणून इंग्लिश घेतली तर ती सुद्धा १० मधल्या एका व्यक्तीलाच येण्याची शक्यता आहे. त्याउलट हिंदी १० मधल्या ४ ते ५ जणांना येण्याची शक्यता आहे. हिंदी लादून कुठे घेत आहात, व्यवहार स्थानिक भाषेतच होणार आहेत. आणि हो, ती लोकं आहेत.

In reply to by कॉमी

इंग्लिश घेतली तर ती सुद्धा १० मधल्या एका व्यक्तीलाच येण्याची शक्यता आहे. त्याउलट हिंदी १० मधल्या ४ ते ५ जणांना येण्याची शक्यता आहे. चुकीची माहीती. कुत्र डुकरासारखी मानवी पैदास तेली म्हणून युपी बिहारची भाषा देशावर लादून घ्या हे सांगणे मुर्खपणाचे आहे. हिंदी दहा मधल्या चार ते पाच जणांना यायची शक्यता आहे ही देखील चुकीची माहीती.

In reply to by कॉमी

सहज विचार केला तरी लक्षात येईल मराठी मुस्लिम पण जेव्हा कागद मातृभाषा कोणती ह्या पर्याय पुढे हिंदी किंवा उर्दू लिहतात. पण त्यांची मातृभाषा खूप वर्ष महाराष्ट्रात राहतं असल्या मुळे खरे तर मराठी असते. पण मुस्लिम धर्म बरोबर हिंदी,उर्दू भाषा असे समीकरण त्यांच्या डोक्यात असते. त्या मुळे अशा पाहणीचे अंदाज चुकीचे असतात. तेच इतर भाषिक गट विषयी पण होते. पिढ्यान् पिढ्या गुजराती भाषा असणारे दुसऱ्या राहतं राहतं असले आणि एका पॉइंट वर त्यांना गुजराती येत पण नसेल तरी ते मातृभाषा ह्या coloum समोर गुजराती च लीहणार. हे सर्व भाषिक लोकांना लागू आहे. ह्या मुळे आकडेवारी चुकीची असू शकते.

In reply to by कॉमी

भाषेचा दुस्वास करु नये हे मान्यच.. मग हे अहिंदी भाषांनाही लागू व्हावं .. हिंदी भाषिकांनी मराठी वा इतर अहिंदी भाषांना कमी लेखून त्यांचा दुस्वास करु नये.. ज्या राज्यात आपण दीर्घकाळ राहतो तेथली भाषा आपुलकीने शिकण्याचा प्रयत्न करावा. .. हिंदी भाषिक राज्यांत जावून सहसा कुणी म्हणत नाहीच की मी हिंदी बोलणार नाही वा शिकणार नाही.. पण हिंदी भाषिक इतर राज्यात -निदान महाराष्ट्रात तरी वर्षानुवर्षे राहून "क्यो सीखनी है हमे मराठी" अशी जी मग्रुरी दाखवतात त्याबद्दल आपण काय म्हणाल ?

In reply to by तर्कवादी

आज देशात अशी अवस्था आहे .जी राज्य परिपक्व विचार करून राज्याची प्रगती होण्यासाठी झटत आहेत ते शिक्षा भोगत आहेत. परिपक्व वागणे म्हणजे गुन्हा करणे आणि त्या बध्दल शिक्षा पण मिळणे अशी अवस्था आहे. 1) महाराष्ट्र सहित दक्षिण भारताने लोकसंख्या वाढ कमी करण्यासाठी योग्य दिशेने पावलं टाकली.आणि ह्या राज्यातील सुजाण नागरिक नी सहकार्य पण केले. परिणाम काय . बेशिस्त ,कायदे बिलकुल न पाळणाऱ्या राज्यातील लोकसंख्या प्रचंड वाढली आणि ह्याचे त्यांना बक्षीस म्हणून लोकसभेत जास्त प्रतिनिधित्व पण मिळेल तयारी चालू च आहे. परत ही बेशिस्त वागणाऱ्या राज्यातील वाढलेली लोकसंख्या पोसण्याची जबाबदारी पण ह्याच शिस्त पाळणाऱ्या राज्यावर च पडली. २) देशात हिंदी जास्त बोलली जाते म्हणून शिस्तीत राहणाऱ्या राज्यांवर त्यांची भाषा पण लादयाला हे तयार च आहेत. ३) ज्या राज्यांनी योजनाबध्द रीती नी राज्य इण्डस्ट्री मध्ये प्रगत व्हावीत म्हणून योजना राबवल्या ,लोकांच्या जमिनी ताब्यात घेवुन नवी मुंबई सारखी शहर वसवली. बंगलोर ,हैद्राबाद नी उद्योग धंदे वाढतील असे प्रयत्न केले. परिणाम काय. बेशिस्त राहणाऱ्या,जातीयवादी राजकारण च फक्त करणाऱ्या ,कोणत्याच शासकीय योजना पूर्ण म करणाऱ्या राज्यातील लोंढे च लोंढे ह्या राज्यात आले. चांगल्या कामाचे बक्षीस मिळते पण आपल्या देशात चांगले काम करेल त्याला शिक्षा मिळते अशी अवस्था आहे.

In reply to by तर्कवादी

पण हिंदी भाषिक इतर राज्यात -निदान महाराष्ट्रात तरी वर्षानुवर्षे राहून "क्यो सीखनी है हमे मराठी" अशी जी मग्रुरी दाखवतात त्याबद्दल आपण काय म्हणाल ? प्रचंड सहमत. आमच्याकडे मारवाडी भाडेकरू आहेत. ३ वर्षे होतील. अजूनही हिंदी बोलतात. मराठी शिकण्याचा प्रयत्न शून्य. कारण काही अडतच नाही... एकदा मुलाच्या एडमिशन बाबत बोलणं चालू असताना बोलले की हम तो बच्चे के लिये इंग्लिश मिडयम school देख रहे है. मराठी की हमे कोई जरुरत नही है. त्यांनी मुलाला कोणत्याही मिडीयम मध्ये शिकवावे पण शेवटचे वाक्य खटकले. इथे येऊन पैसा कमवा. रिसोरसेस वापरा.. पण इथली भाषा शिकू नका. हाच न्याय इतर राज्यात चालेल का. ??? लोकांनी इथे येऊ नये असे नाही. या रहा .. पण इथल्या भाषेचा आदर ठेवून बोला. शिका. भले वेळ लागेल.. परंतु २-२ पिढ्या जातात पण तरीही ते भाषा शिकण्यास उत्सुक नसतात. उलट आपणच त्यांच्याशी हिंदीत बोलावे अशी अपेक्षा....

In reply to by श्रीगुरुजी

त्यासाठी घरमालक ही तितकाच तत्वनिष्ठ लागतो. ५०० रुपये दरमहा जास्त मिळाले तर मी मराठी हे तत्त्व मेरा भारत महान ते वसुधैव कुटुंबकम असे उन्नत होते.

In reply to by सुरिया

आर्थिक फायदा दिसला की सर्व तत्व गळून पडतात. भाषा अभिमान,संस्कृती अभिमान,राज्य प्रेम . सर्व बाजूला ठेवले जाते. आणि हा गुण सर्व भाषिक लोकात आहे मराठी लोकात जरा जास्त आहे. मारवाडी, जैन मंडळी . नॉनव्हेज च्या नावाने बोट मोडत असतात. नॉनव्हेज पदार्थ आणि ते खाणारी लोक ह्यांचा द्वेष करतात. पण कित्येक लोकांची दुकान,धंद्याची जागा . अशा ठिकाणी आहेत तिथे नॉनव्हेज खाणारे आणि विकणारे पण असतात. त्यांना तिथे बिलकुल त्रास होत नाही. कारण आर्थिक लाभ तिथेच होत असतो. पण त्यांच्या सोसायटी मध्ये किंवा त्यांची लोकसंख्या ज्या भागात जास्त आहे तिथे मात्र त्यांचे नियम लागू. Ladies बार जेव्हा मुंबई मध्ये चालू होते तेव्हा त्या मुलींना खोली भाड्याने देण्यात मराठी लोक च पुढे होते. कारण थोडे जास्त भाडे मिळत होते.

In reply to by बापूसाहेब

मराठी लोकात extraordinary देश प्रेम असते .आणि खूपच हिंदी प्रेम असते. हिंदी बोलणे म्हणजे काहीतरी भूषण आहे असे काही मराठी लोकांना वाटत. त्या मुळे ह्या अमराठी लोकांस मराठी शिकण्याची गरज वाटत नाही.

In reply to by sunil kachure

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू असताना नेहरूंनी मुंबई महाराष्ट्रात असण्यास विरोध केला होता व मुंबई स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय जाहीर केला होता. तेव्हा नेहरूंना विरोध करण्याऐवजी महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे असे महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री म्हटले होते.

In reply to by तर्कवादी

एखादी भाषा न शिकणे ह्याचा अर्थ दुस्वास होत नाही. एखादी भाषा बहुतांश भारतीयांना येते (हिंदी), आणि दुसरी भाषा बहुतांश भारतीयांना येत नाही (इंग्लिश) अश्यामध्ये केवळ भावनिक कारणांसाठी पहिल्या भाषेला विरोध करणे हे चुकीचेच आहे. माझे बरेच मारवाडी आणि गुजराती मित्र आहेत. ते उत्तम मराठी बोलतात. त्यामुळे anecdotes वर विश्वास ठेवू शकत नाही. किती लोकांना वर्षानुवर्षे महाराष्ट्रात राहून मराठी बोलता येत नाही मला सांगता येणार नाही. अमिताभ बच्चन अतिशय एक टोक आहे. त्याला मराठी बोलायचे दूर, घरातून बाहेर सुद्धा पडावे लागत नाही. त्याला बाजारातून योग्य दरात भाजी आणणे सुद्धा बहुतेक जमणार नाही.

In reply to by कॉमी

माझे बरेच मारवाडी आणि गुजराती मित्र आहेत. ते उत्तम मराठी बोलतात.
माझा मुद्दा गुजराथींबद्दल नव्हताच. गुजराथी, दाक्षिणात्य लोक मराठी शिकतात आणि आवर्जुन बोलायचा प्रयत्नही करतात हे मी पाहिले आहे. मुद्दा म.प्र, उ.प्र, बिहार येथील हिंदी भाषिकांबद्दल होता. ते मराठीचा तिरस्कार करतात हे मी स्वतः अनुभवले आहे. अगदी पुण्यातले अनुभव आहेत हे. एखाद्या ५-६ जणांच्या घोळक्यात एखाद-दुसराच हिंदी भाषिक असेल आणि बाकीचे मराठी भाषिक मराठीतून अनौपचारिक गप्पा मारत असतील तरी हे हिंदी भाषिक लगेच रडका सूर लावणार "अरे आप हिंदी मे बात करो ना" जसं काही मराठी कानावर पडल्याने ह्यांच्या कानाची जळजळ होते.
अमिताभ बच्चन अतिशय एक टोक आहे
पंजाबी राजीव भाटिया (अक्षय कुमार ) हा छान मराठी बोलू शकतो.
पहिल्या भाषेला विरोध करणे हे चुकीचेच आहे.
भाषेला विरोध नाहीये... सक्तीला विरोध आहे. आणि हिंदी भाषिकांच्या मग्रुरीला विरोध आहे. भाषेला विरोध नाहीये तर आपली मराठी भाषेची अस्मिता गमावण्याला विरोध आहे.

In reply to by तर्कवादी

सक्ती म्हणजे नक्की काय म्हणताय ? प्रायमरी लँग्वेज म्हणून हिंदी वापरा अशी सक्ती सोडा,साधा सुझाव सुद्धा अमित शाह यांनी केला नाहीये.
Hindi should be accepted as alternative to English, and not to regional languages
ही शहांची थेट क्वोट आहे. ह्यातले दुसरे वाक्य हि पूर्ण चर्चा थांबवायला खरं तर पुरेसे आहे असे मला वाटते. अक्षय कुमार बोलतो तर छानच आहे. आणि मराठी शिकायची नसल्यास त्यात काही वावगे नाही हे माझे वैयक्तिक मत आहे. पण ही चर्चा त्यावर नाही असे मला वाटते. हि चर्चा सेकंडरी भाषा कोणती वापरावी ह्यावर आहे. बाकी मराठी बोलणाऱ्या लोकांवर दमदाटी होत असल्यास तेही चुकीचेच आहे.

In reply to by कॉमी

सक्ती म्हणजे नक्की काय म्हणताय ? प्रायमरी लँग्वेज म्हणून हिंदी वापरा अशी सक्ती सोडा,साधा सुझाव सुद्धा अमित शाह यांनी केला नाहीये
ओके.. अप्रत्यक्ष सक्ती (म्हणजे सध्या आवाहनाच्या .. माफ करा सुझावच्या रुपात असली तरी) कशी होवू शकते वा स्थानिक भाषेचे खच्चीकरण कसे होवू शकते ते विस्ताराने सांगतो. समजा अ नावाचा बंगाली व्यक्ती आहे - तो बंगाली प्रथम भाषा असल्याने बंगाली शिकलेला आहेच तसेच डेस्क जॉब करणारा सुशिक्षित असल्याने पोटापाण्याकरिता म्हणून इंग्लिशही शिकला आहे. आता तो तामिळनाडूतल्या अशा शहरात स्थलांतरीत होतो जेथे अनेक विविधभाषी लोक नाहीत (तसे चेन्नईतही तामिळ शिवाय कठीणच- पण असे शहर घेवू ज्यात इतर भाषिक हे चेन्नईपेक्षाही कमी असतील - मदूराई कदाचित ठीक राहील ?) तर तिथे तो ब तामिळ या व्यक्तीला भेटतो - ब ला तामिळ प्रथम भाषा असल्यामुळे येतेच पण तो ही सुशिक्षित असल्याने इंग्लिशदेखील येते. इंग्लिशमध्ये संवाद साधत अ व ब ची मैत्री होते. पण शहरात बाकी अनेकांना इंग्लिश फारशी येत नसल्याने (रिक्षावाले, विविध विक्रेते, इस्टेट एजंट ई ) अ ची अडचण होतेच आहे. मग तो ब ची मदत घेत या अडचणीतून मार्ग काढतो पण त्याचबरोबर आपल्याला इथे दीर्घकाळ वास्तव्य करायचे असल्याने थोडीफारतरी तामिळ शिकल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्याला समजते आणि तो हळूहळू ( ब च्या मदतीने किंवा इतर मार्ग वापरुन) तामिळ शिकू लागतो. पुढे तो स्वतःच्या मुलाला इंग्लिश शाळेत घालतो (आजकालच्या आसपास दिसणार्‍या प्रथेप्रमाणे तामीळनाडूतही तामिळ भाषेतून शिक्षण कमी झाले असावे असे मानून मी हे लिहिले आहे... )तिथे इंग्लिश सोबत द्वितीय भाषा तांमिळ असते पण यास अ ची हरकत नाही.. कारण त्या शहतात दीर्घकाळ वास्तव्यास रहायचे तर तामिळ यायलाच हवे हे तो जाणून आहे. म्हणूनच आपल्या शाळेत तामिळ शिकावे लागू नये म्हणून तो धडपडत नाही, शाळेवर प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष दबाव आणत नाही की आयसीएसई किंवा दुसर्‍या इंटरनॅशनल शाळांच्या मागे लागत नाही.. थोडक्यात तो हळूहळू तामिळ भाषेला आपलंसं करतो. पण यात तो कुठेही हिंदी शिकत नाही. किंवा त्याच्या सोयीकरिता अनेक स्थानिकांना (ब सारख्यां सुशिक्षितांचा अपवाद वगळता) इंग्लिश शिकावे लागत नाही.. की हिंदीही शिकावे लागत नाही .. ते अनेक स्थानिक वर्षानुवर्षे स्वतःच्या भाषेतूनच बोलतात.. ज्यांना सर्व जगाचे ज्ञान मिळवायचे नाहीये त्यांना इंग्लिशची सक्ती कुणी करत नाहीच. स्मार्टफोनची भाषाही स्थानिक लावता येते पण सगळेच अ‍ॅप स्थानिक भाषेत नसल्याने वा स्थानिक मोबाईल वापरण्यापुरते किरकोळ प्रमाणात थोडेसे इंग्लिश शिकावे लागते तितकेच हेच जर अमित शहांचे आवाहन अगदी गांभीर्याने मानायचे तर अ आणि ब ला ही स्वतःची प्रथम भाषा व इंग्लिश या बरोबरच हिंदीही शिकावी लागेल. मदुराई शहरातल्या अनेक व्यापार्यांना, सेवा देणार्‍या व्यक्तींना कधीतरी कुणी अ येणार ज्याला तामिळ येत नाही त्याच्याशी व्यवहार करण्याकरिता म्हणून हिंदी शिकावे लागेल. याउलट तो अ "मला हिंदी येतंय आणि इथे हिंदी मध्ये काम होतंय तर कशाला शिकू तामिळ" असा विचार करत तामिळ भाषा शिकण्यात रस घेणार नाही. पुढे त्याच्या मुलांना शाळेत घालताना तो इंग्लिश शाळेत घालेल आणि दुसरी भाषा म्हणूनही तामिळ असेल तरी ती टा़ळता येईल का हे बघण्याकडेच त्याचा कल असेल किंवा टाळता आली नाही तरी जेमतेम उत्तीर्ण होण्याकदे कल असेल . हळूहळू असे परभाषिक स्थलांतरित तेथे वाढू लागतील आणि त्यांच्या सोयीकरिता म्हणून अमित शहांच्या सुचनेप्रमाणे स्थानिक लोक हिंदी शिकत राहतील तर मात्र बहुतांशी स्थलांतरित मात्र तामिळ शिकणार नाहीतच. हळूहळू असे होईल की १००० लोकसंख्येपैकी समजा ७०० लोक मूळ स्थानिक असतील तर त्यातले काही विरोधक सोडलेत तरी ६५० लोक आता हिंदी शिकलेले असतील तर उरलेल्या ३०० बिगर तांमिळ स्थलांतरितांपैकी जेमतेम ५० जणांना मोडकं तोडकं तामिळ येत असेल तर २५० लोकांना अजिबात येणार नाही. तर आता ९५० लोकांना हिंदी येत असेल तर तामिळ ७५० लोकांना येत असेल .. तसेच सगळे व्यहवार हिंदी भाषेतून होवू शकत असतील तर मग हिंदी संख्यात्मक प्राबल्यही वाढेल आणि व्यावहारिक महत्वही. हळूहळू हिंदी ही व्यवहाराची मुख्य भाषा होईल व ज्या भाषेशी अर्थकारण जोडलंय त्या भाषेचं महत्व वाढून स्थानिक भाषेचं महत्व कमी होईल. शाळेत, स्थानिक व्यवहारात, सोसायटीच्या मिटींगमध्ये हे हिंदी भाषिक तामिळ पेक्षा हिंदीतच संभाषण व्हायला हवं म्हणून जोर देत राहतील... बाकी यासगळ्यामुळे अर्थकारण कसं बदलत जाईल तो वेगळा विषय.. पण आता भाषेपुरतंच लिहितोय... मुळात आपल्या भागात परराज्यातून १० लोक येणार आणि त्यांना स्थानिक भाषा येत नाही म्हणून १०० लोकांनी एक भाषा का शिकावी ? त्याऐवजी त्या १० लोकांनी स्थानिक भाषा शिकावी हे सयुक्तिक नाही का ?.. [पर्यटन क्षेत्र व पर्यटक म्हणून येणार्‍या लोकांना वगळून इतर स्थलांतरितांबद्दल मी बोलत आहे] दुसरी भाषा हिंदी की इंग्लिश असा वाद असताना .. अनेकांना दुसर्‍या भाषेची गरजच नाही.. इंग्लिशची सुद्धा नाही. आणि इंग्लिशची जी गरज आहे ती सुद्धा जगातले विविध ज्ञान मिळवण्याकरिता.. आपल्या भागात येणार्‍या परभाषिक लोकांशी संवाद साधता यावा म्हणून कुणीच इंग्लिश शिकत नाही (पुन्हा पर्यटन क्षेत्रात सेवा देणारे वगळून) तर इंग्लिशमुळे परभाषिकांशी सहज संवाद होण्याची एक शक्यता निर्माण होणे हा एक सहपरिणाम आहे उद्देश नाही..काही प्रतिसादाकांनी म्हंटले आहेच की दाक्षिणात्य लोकांचे इंग्लिश फार काही चांगले नसते , ते अनेक चुका करतात. खरेच आहे ते .. ते स्वतःची भाषा सोडून दुसर्‍ञा भाषेला विनाकारण जास्त महत्व देत नाहीतच. कोणताही स्थलांतरित असाच उठून स्थलांतर करत नाही.. कुणीतरी त्याला तिथे येण्याकरिता निमंत्रण देते तेव्हाच तो तिथे येतो ना ?मग दुसरी भाषा न येणार्‍या त्या प्रदेशात त्या स्थलांतरिताची सोय कशी करावी , मग त्याला काही काळ तरी गरजेप्रमाणे मदत पुरवावी ही पण त्या निमंत्रकाची जबाबदारी आहे.. उदा: एखाद्या कंपनीने परभाषिकाला नोकरी दिली असल्यास त्याला स्थिरस्थावर होण्यासही मदत करावी, स्थानिक भाषेचे जुजबी ज्ञान त्याला द्यावे, त्याला मदत करण्याकरिता इतर स्थानिक व दुसरी भाषा जाणणार्‍या इतर कर्मचार्‍यांना प्रोत्याहित करावे. जाता जाता: भारतातील एखाद्या राज्यातील बहुतांशी लोकांना इंग्लिश बोलता येतंय आणि तिथे इंग्लिश बोलून व्यवसाय करणं सोपं आहे म्हणून इंग्लंड, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियातून भरभरुन लोक त्या राज्यात स्थलांतरित होणार नाहीत.. !! [सकाळपासून थोडा थोडा करत हा प्रतिसाद टंकला आहे, त्यामुळे आलेल्या विस्कळितपणाबद्दल क्षमस्व]

In reply to by उपयोजक

मार्मिक! व्यवस्थित मांडलंय गणित!
धन्यवाद उपयोजक.. एकूणात मुद्दा हाच आहे की वरवर जरी अमित शहांच्या आवाहनातली मांडणी ही इंग्लिश विरुद्ध हिंदी अशी दिसत असली आणि त्यामुळे सकृतदर्शनी ती जरी स्थानिक भाषेकरिता अपायकारक वाटत नसली तरी अंतिमतः ती स्थानिक भाषा विरुद्ध हिंदी अशीच जाणारी आहे.

In reply to by कॉमी

एखादी भाषा न शिकणे ह्याचा अर्थ दुस्वास होत नाही. एखादी भाषा बहुतांश भारतीयांना येते (हिंदी), आणि दुसरी भाषा बहुतांश भारतीयांना येत नाही (इंग्लिश) अश्यामध्ये केवळ भावनिक कारणांसाठी पहिल्या भाषेला विरोध करणे हे चुकीचेच आहे.
पूर्वार्ध एकदम खरा आहे, उत्तरार्ध पटतो आहे. मारवाडी गुजराती उत्तम मराठी बोलतात हेही खरे आहे पण एक उदाहरण माझ्या शेजारीच आहे. नवरा गुजरातेतुन शिकलेला पण गेली ५ वर्षे जॉबसाठी पुण्यात आहे, बायको जन्मापासून महाराष्ट्रातील गुजराती आहे. नवरा अगदी सुंंदर मराठी बोलतो, सोसायटीत वगैरे आवर्जून मराठी बोलतो त्याउलट त्याची पत्नी कधीही मराठी बोलत नाही किंबहुन ती सदैव मराठी लोक, मराठी परंपरा, येथिल ट्राफिक वर खडे फोडत असते. तेही हिंदीतून. मला वाटते की एक सिंपल नियम करावा. सर्वच राज्यांसाठी. १ महिन्यापेक्षा जास्त वास्तव्य करायचे असेल, ड्रायव्हिंग लायसन्स इथले हवे असेल, इथली सॅलरी स्लीप हवी असेल, राशन कार्ड, आधार कार्ड, प्रॉपर्टी पेपर्स, व्हिकल आणि अप्लायन्सेस पर्चेस येथे करायचे असेल तर एक कोर्स, परिक्षा आणि सर्तिफिकेट अनिवार्य करावे. हे धोरण सर्वच राज्यांनी कठोरपणे राबवावे. त्यातून रोजगार निर्मीतीही होइल. जर्मनी, फ्रान्स ल जायला ती भास्।आ शिकायला पैसे मोजता तर ज्या राज्यात आपण पैसा कमवायला जातोय तिथली भाषा शिकायला आणि त्यासाठी पैसे खर्चायला हरकत नसावी.

In reply to by सुरिया

Switzerland चे नागरिकत्व हवे असेल तर जर्मन किंवा फ्रेंच येणे सक्तीचे आहे. नुसती भाषा येणे पुरेसे नाही तर घरात बोलताना सुद्धा ही भाषा वापरावी लागते. माझ्या एका ओळखीच्या कुटुंबाने नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. मुलांसकट सर्व जण जर्मन शिकले होते. जेव्हा काही अधिकारी घरी चौकशीसाठी आले तेव्हा मुले मराठीत एकमेकांशी बोलताना आढळले. त्यामुळे तुम्ही घरात वेगळ्या भाषेत बोलता हे कारण देऊन त्यांचा अर्ज काही काळासाठी स्थगित ठेवला गेला.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही घरात वेगळ्या भाषेत बोलता हे कारण देऊन त्यांचा अर्ज काही काळासाठी स्थगित ठेवला गेला.
फारच भयानक. घरात कोणती भाषा बोलायचे याचे पण नियम ? अवघड आहे. उद्या कदाचित घरात भारतीय पदार्थ बनविले म्हणून नागरिकत्व रद्द व्हायचे.

In reply to by श्रीगुरुजी

विषयी मी पण ऐकले आहे जे तिथे जावून आले आहेत त्यांच्या तोंडून तुम्ही गरीब असा किंवा खूप श्रीमंत तिथे तुम्हाला त्यांचे नियम पाळावेच लागणार. तुम्ही खूप श्रीमंत आहात म्हणून तुम्हाला कोणतीच वेगळी नियम भंग करून सुविधा दिली जाणार नाही. पर्यावरण विषयी तो देश खूप जागरूक आहे.

In reply to by कॉमी

खूप कमी भारतीयांना येणारी भाषा
मग संस्कृत ही राष्ट्रभाषा करावी. तिच्या इतकी राष्ट्रीय व्याप्ती अन्य कोणत्याच भारतीय भाषेची नाही.

In reply to by उपयोजक

कसं काय ? कसली व्याप्ती आलीये संस्कृतला ? Unless, कोणालाच बोलता येत नाही अश्या व्याप्ती बद्दल बोलत असाल तर योग्य आहे.