"मी वसंतराव" च्या निमित्ताने
शहर - आपलं नेहेमीचंच
स्थळ - guess करायला एकदम सोपं
दिवस - मावळलेला workday
वेळ - रात्री उशिराची
"मी वसंतराव" बघायचा योग आलेला. अगदी ऐन वेळी कशीबशी पहिल्या रांगेतली तिकिटं मिळाली. मराठी चित्रपट mid week हाऊसफुल्ल?? चित्रपट चांगला आहे हे ऐकलं होतंच पण म्हटलं कदाचित उद्या बँक हॉलिडे आहे म्हणून गर्दी असेल. अर्थात गर्दी म्हणजे तरी काय असणार? हाताच्या बोटांवर मोजण्याइतके millennials. Gen Z चा तर संबंधच नाही. अश्या गर्दीतले जवळपास निम्मे चेहरे ओळखीचेच वाटतात (कारण मी ही त्याच गर्दीचा भाग असतो).
पहिला धक्का बसतो तो पार्किंगमध्येच. मोजक्याच गाड्या. जणू काही आठ पडद्यांच्या त्या चित्रपटगृहात एकच स्क्रीन चालू असावं. तिकिट दाखवून त्या सरकत्या जिन्यावरून वर जातो आणि ती अपेक्षित गर्दी दिसतेच. हीच ती लोकं - बालगंधर्व, कट्यार, मी शिवाजीराजे भोसले किंवा नटसम्राट आवर्जून बघायला येणारी. ती इथे दिसणारच होती. हा... आणि बाजूला ही जी किशोरवयीन, तरुण आणि अमराठी लोकं आहेत ती नक्कीच RRR साठी असणार. ह्यांना कुठले झेपायला वसंतराव?
आम्ही आपले चहाचे कागदी कप घेऊन स्क्रीनच्या दाराशी पोचतोय तर ही पिलावळ पॉपकॉर्नआणि कोल्ड-ड्रिंक्स सांभाळत आमच्या पुढे. "dint get the caramel flavor yaa - cheese works for you right?" मला वाटलं स्क्रीन चुकतोय यांचा - आत गेल्यावर पोरं बावचळतील. पण हे काय? ह्या अर्ध आणि तीन चतुर्थांश - चड्डीधारी पोरा - पोरींचा ८ - १० जणांचा ग्रुप आमच्याच रांगेत येऊन बसला की. सगळे विशीच्या आसपासचे. आता मला सिनेमापेक्षा जास्त उत्सुकता ह्यांच्या प्रतिक्रियेची!
इकडे चित्रपट सुरू झाल्यानंतर दुसर्याच प्रसंगात "स्स्स्स्स्स्स्स्स", "eeeew" वगैरे प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. म्हटलं ही फिरंगी पिलं वाट लावणार सिनेमाची. पण मला पहिला गुगली पडला तो "वितरी प्रखर तेजोबल" सुरू झाल्यावर. माझ्या शेजारची ताई पलिकडल्या दादाला हळूच म्हणाली "ए sss, ऐसा एक गाना है ना? लता मंगेशकर का." अरे वा! म्हणजे "गगन सदन तेजोमय" निदान ह्यांच्या कानावरून गेलं होतं. Not bad at all. आणि पुढच्याच गाण्याला ताईने चक्क रूपकाच्या पहिल्या मात्रेला मांडीवर टाळी धरली. आता मात्र माझी उत्सुकता ताणली गेलेली की "मी वसंतराव"ह्या पोट्ट्यांना कसा वाटतोय.
पुढचे अडीच - पावणेतीन तास ही तरुण पोरं समरसून चित्रपट बघत होती. अधून मधून न कळालेल्या मराठी शब्दांचे अर्थ विचारले जात होते. त्या ७-८ जणांमधले तिघे चौघे मराठी असावेत. त्यांच्याकडून हळूच चित्रपटाची "गोष्ट" समजून घेतली जात होती. ह्यातले सगळेच काही शिकलेले गायक वादक नसतील. आणि असले तरी आजकालच्या प्रचलित संगीताच्या मानाने ही गाणी त्यांच्या comfort zone च्या बाहेर असतील असंच वाटत होतं. पण जे काही चालू होतं ते त्यांना "आवडत" होतं. जेव्हा गळ्यातून शुद्ध 'सा' लागतो तेव्हा देवळात मूर्तीसमोर उभं राहायची गरज भासतच नाही", "पिता के न होने के एहसास से मारवा गाओ, "माझं घराणं माझ्यापासूनच सुरू होतं" वगैरे वाक्यं बरोब्बर उतरत होती. ह्यांना कदाचित "पंजाबी अंगानी लावलेला केहरवा" किंवा "जयपुर घराण्याची बंदिश" किंवा "कालिंदीतट पुलिंद-लांछित सुरनुतपादारविंद जयजय" वगैरे कळत नसेलही. पण यातल्या 'घेई छंद'ची ट्रीटमेंट 'कट्यार' पेक्षा वेगळी आहे हे त्यांना समजत होतं. योग्य ठिकाणी योग्य दाद येत होती. शेवटच्या "कैवल्यगान"ची शेवटची तान संपल्यावर थिएटरातले दिवे लागून पडदा जेव्हा बंद झाला तेव्हा ही पोरं उठली. एकमेकांकडे भुवया वर करून, खालचा ओठ बाहेर काढून बघत त्यांनी चित्रपट आवडल्याची पावती दिली.
इथे मी चित्रपटाने भारावून गेलेलो असतानाच ह्या मुलांचा प्रतिसाद मला कौतुकास्पद वाटत होता. खरंतर पुण्यात सवाई असो, स्वरझंकार असो वा वसंतोत्सव, प्रेक्षकांमध्ये तरुण पिढीचा सहभाग लक्षणीय असतोच. पण एका महान शास्त्रीय गायकाच्या जीवनपटात ह्या तरुण पिढीला वाटणारं कुतुहल माझ्यासाठी pleasant surprise होतं. प्रेक्षागारात निम्म्यापेक्षा अधिक लोकं तिशीच्या आतली होती. "मी वसंतराव" त्यांना समजलाच नाही तर आवडला होता. ह्यातला कोणी वसंतरावांचा बेदरकारपणा बरोबर घेऊन गेला असेल तर कोणी त्यांची सृजनशीलता, कोणी वसंतरावांची आपल्या कलेवरची अढळ निष्ठा तर कोणी त्यांच्या आईचा खमकेपणा.
लोकांना चांगलं ऐकण्याची, चांगलं बघण्याची भूक आहे. आपल्या परंपरांबद्दल, संगीताबद्दल, संस्कृतीबद्दल अभिमान आहे आणि त्या गोष्टी समजून घेण्याची डोळस वृत्तीदेखील आहे. गरज आहे ती त्यांची ही भूक भागवणार्या content ची. बालगंधर्व असो वा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, कट्यार काळजात घुसली असो वा पावनखिंड, गाभ्रीचा पाऊस असो वा जोगवा. त्यांच्या जाणीवा उन्नत करणारा content त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवा. त्यांना आवडेल, रुचेल, पटेल अश्या पद्धतीनं ते व्हायला हवं.
आजकाल आजूबाजुला खूप जास्त निराशा, नकारात्मकता, असहायता दिसते. पण वाईट गोष्टी थांबण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे चांगल्या गोष्टी ठणकावून करणे. कारण चांगलं नेहेमी चांगलंच असतं.
© - जे.पी.मॉर्गन
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कारण चांगलं नेहेमी चांगलंच असतं.
अरे वाह
मस्त!
चांगल्या गोष्टी ठणकावून करणे....
एक वेगळाच परीक्षण.....
सुखद धक्कादायक अनुभव!
सुंदर
Jp
वा ! छान लेख.
माझं पुस्तक विकताना मला हाच
दाद पण चुकीची दिशा
मग पुलं, वपु आणि त्यांच्या
मग पुलं, वपु आणि त्यांच्या
स्मरणरंजन
अन श्रध्दा कमीच होईल की काय अशी संका वाटते . =))))
(चित्रगुप्त सोडून)
मनो,
बरेचसे असेच काही म्हणायचे
पर्फेक्ट. कुणाला अश्यात आलेली
मनो, तरूण पिढीची दाद हे थोरच.
नैराश्य येते ? स्मरणरंजन किंवा ऐतिहासिक फिक्षनात रमा.
+१
परवाच चित्रपट पाहिला थेटरात
+१
मराठी चित्रपटसृष्टी अजून चालू
जोपर्यन्त आमच्यासारखे मराठी
खरोखर सुखद अनुभव !
मी वसंतराव
खूप छान परिक्षण