Skip to main content

द काश्मीर फाइल्स

लेखक निनाद यांनी बुधवार, 09/03/2022 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
द काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या चर्चेसाठी हा धागा काढत आहे. हा चित्रपट भारतातल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष यांचे चित्रण आहे. ९० च्या दशकात काश्मिर खोर्‍यात केल्या गेलेल्या हिंदुंच्या कत्तलीचे एक डॉक्युमेंटेशन तरी करतो. आजवर असा प्रयत्न ही झालेला नाही. लेखक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदी भाषेत याची निर्मिती केली आहे. ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रमुख कलाकार अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आदी आहेत. या चित्रपटाला विरोध झाला आहे. याविरुद्ध याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता या चित्रपटाची चर्चा ही होऊ नये म्हणून दडपून टाकण्याचे प्रयत्न चालले आहेत असे दिसते. उदा: काश्मिरच्या हिंदूंचा ज्वलंत विषय असूनही कपिल शर्मा शो ने याचे प्रमोशन नाकारले आहे. आपल्याच इंडस्ट्रीतील सिनेमा असूनही विषय हिंदू विषयक असल्याने कोणत्याही खान किंवा प्रस्थापित चित्रपट कलावंतांनी द काश्मीर फाइल्सचा उल्लेख पूर्णपणे टाळला आहे. या चित्रपटाची चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे.

वाचने 94191
प्रतिक्रिया 327

प्रतिक्रिया

In reply to by Trump

त्यांना संशयाचा फायदा (benefit of doubt) मिळायला हवा. असा असेल तर आर्थिक उदारतेचं धोरण सुद्धा त्यांनी ( आणि डॉ मनमोहन सिंहांनी) एकट्याने राबवलेलं नव्हतं. मग त्यांना एकट्याना (आणि डॉ मनमोहन सिंहांना ) श्रेय कशाला द्यायचं? किंवा गोध्रा मध्ये कारसेवक हिंदूंना जाळून मारल्यामुले गुजरातेत दंगल झाली त्याचा दोष श्री मोदींना कसा द्यायचा? असं मुळमुळीत लिखाण उपयोगी नाही. नेता/ राज्यकर्ता किंवा पंतप्रधान यांनी आपण केलेल्या कृत्याची संपूर्ण जबाबदारी घेतलीच पाहिजे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

देशांतर्गत विस्थापित असे क्लासिफाय केल्यास आंतरराष्ट्रीय संस्थांना ढवळाढवळ करता येईल म्हणून केले गेले नाही. असे न्यूजलॉन्ड्रीच्या व्हिडिओत होते.

In reply to by कॉमी

देशांतर्गत विस्थापित असे क्लासिफाय केल्यास आंतरराष्ट्रीय संस्थांना ढवळाढवळ करता येईल म्हणून केले गेले नाही.
बोंबला. म्हणजे आपण किती कणाहिन होतो याची जाहिर कबुली नरसिंहराव सरकारने दिली नव्हती का? बरं एकीकडे म्हणायचे की काश्मीरमध्ये युध्दबंदी करा या संयुक्त राष्ट्राच्या ठरावाला ८-९ महिने फाट्यावर मारत आम्ही युध्द सुरूच ठेवले आणि जेव्हा घुसखोरांना एका मर्यादेपलीकडे पिटाळणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर १ जानेवारी १९४९ रोजी युध्दबंदी केली. दुसरे म्हणजे १९७१ च्या युध्दाच्या वेळेस पूर्ण अमेरिकेच्या वेस्टर्न ब्लॉकला आपण अंगावर घेतले होते. याचाच अर्थ आपण १९४८ आणि १९७१ मध्येही जगातील महासत्तांना वाटाण्याच्या अक्षता लाऊ शकत होतो. असे असताना १९९० च्या दशकात आंतरराष्ट्रीय संस्थांना (देशांनाही नाही) घाबरायचे काय कारण होते? म्हणजे आपण किती कणाहिन होतो याची कबुली दिल्यासारखे नाही का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

बोंबला. म्हणजे आपण किती कणाहिन होतो याची जाहिर कबुली नरसिंहराव सरकारने दिली नव्हती का?
हो. आणि खरोखरच कणाहीन होतो. कश्याच्या जिवावर कणा दाखवायचा? तेलासाठी अरब देश हवेत आणि पैश्याच्यासाठी युरोपियन हवेत.
असे असताना १९९० च्या दशकात आंतरराष्ट्रीय संस्थांना (देशांनाही नाही) घाबरायचे काय कारण होते?
कारण अर्थव्यवस्था आणि सोव्हीयत संघाचे विसर्जन झाल्यानंतर भारताला कोणाचाही पाठींबा नव्हता. रशियाची आर्थिक परिस्थितीसुध्दा योग्य नव्हती. (सध्याच्या युक्रेनच्या युध्दाची कारणे त्यात आहेत). ती कारणे १९९१ च्या आधी नव्हती.

आजच 'काश्मीर फाईल्स' हा चित्रपट पाहिला. १९९० साली काश्मीर खोऱ्यामधून काश्मिरी पंडितांना जुलूम - जबरदस्तीने हाकलून लावले, विस्थापित केले त्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या अगदी सुरवातीलाच ह्या चित्रपटात दाखवलेल्या घटना, प्रसंग, हत्याकांड वगैरे हे स्वतंत्र्यरित्या सत्यापित (independently verified) केले आहे हे पडद्यावर दाखवले जाते त्यामुळे ह्यातील घटना जवळजवळ ९५% सत्य असाव्यात असे धरून चालायला हरकत नसावी. काश्मीर खोऱ्यातील स्थानीय मुसलमानांनी पाकिस्तानच्या चिथावणीवरून काश्मिरी पंडितांवर जे अनन्वित अत्याचार केले त्याचे चित्रण ह्या चित्रपटात आहे. कितीतरी अश्या क्रूर घटना ह्या चित्रपटात दाखविल्या आहेत की त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते, माणूस इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो हे मनाला पटतच नाही. आज ह्या घटनेला ३२ वर्षे झाली पण काही तुरळक बातम्या सोडल्या तर काश्मिरी पंडितांवर इतके अत्याचार झाले हे निदान मला तरी त्यावेळी समजले नव्हते. १९९० मध्ये माझी गुजरातला बदली झाली आणि त्याच वेळी अडवाणींनींची रथयात्रा सुरु झाली. ह्या रथयात्रेमुळे गुजरातभर हिंदू-मुसलमान दंगे उसळले व त्याचे लोण हळूहळू देशभर पसरले. त्यावेळी ह्या बातम्या तेव्हढ्याच तीव्रतेने दाखविल्या गेल्याचे मला आठवत नाही. का हे सर्व काही राजकीय स्वार्थासाठी टोपलीखाली झाकून ठेवले गेले ? पण एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे आणि ती म्हणजे कोणताही नागरिक आपल्या मूळ स्थानापासून कोणी फक्त "येथून निघून जा" म्हणाले म्हणजे जाणार नाही. ज्यावेळी स्व:ताच्या आणि कुटुंबियांच्या जिवाची सुरक्षा नाहीशी होते, अमानुष अत्याचार झेलावे लागतात त्याच वेळी माणूस परागंदा होतो किंवा त्याला व्हावे लागते. त्यामुळे ह्या कश्मिरी पंडितांवर अत्याचार झालेच नाहीत, ते स्व:ताहून खोऱ्यातून निघून गेले हा प्रचार खोटाच आहे. मग हे ज्यावेळी घडले त्यावेळच्या राज्यकर्त्यांने हे विस्थापन, पलायन थांबविण्यासाठी काय केले ? ह्यातील दोषींना काय शिक्षा केली ? ह्याची उत्तरे आजही अनुत्तरितच आहेत असे म्हणावे लागेल ? जरी हा हिंदू-मुस्लिम संघर्ष होता, तरी काश्मीर खोऱ्यातून सगळेच हिंदू परागंदा झाले असही नाही, तेथील डोग्रा समाज बहुतांशी तेथेच राहिला. ह्या हत्याकांडात उदारमतवादी मुस्लिम देखील भरडले गेले, मग फक्त काश्मिरी पंडितांनाच का तेथून पळून निघावे लागले ? ह्या चित्रपटातील संदर्भ जर खरा मानला तर त्यात, 'दोन टक्के काश्मिरी पंडितांनी संपूर्ण प्रशासनावर कबजा मिळवला व इतरांना वर येऊ दिले नाही, त्यांच्यावर अन्याय केला,' हा मूळ मुद्दा होता. ह्यातील काय खरं? काय खोटं ? हे कसे कळणार ? ह्या घटनेनंतर आज ३२ वर्षांनी ३७० कलम रद्द करण्यात आले आहे. आता कोणताही भारतीय नागरिक काश्मीरमध्ये जाऊन राहू शकतो, स्थावरजंगम मालमता, जमीन वगैरे खरेदी करू शकतो, नोकरी धंदा करू शकतो. काश्मिरी पंडितही जाऊन आपल्या मूळ स्थानी राहू शकतात, पण प्रश्न असा आहे की अजूनही त्यांना जी अभिप्रेत किंवा अपेक्षित आहे ती सुरक्षा तेथे आहे का ? आणि जरी असली, तरी ते पुन्हा आपल्या मूळ स्थानी जाण्यास किती उत्सुक असतील ? आणि ते तेथे जाऊन करणार काय ? मग काश्मीरच्या खोऱ्यातील विस्थापित पंडितांना किंवा भारताच्या इतर नागरिकांना तेथे जाऊन राहावेसे कधी वाटेल ? ह्याचं उत्तर आहे ज्यावेळी काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित होईल, सर्वांगीण प्रगती, विकास घडून येईल, नवीन संधी उपलब्ध होतील, रोजगार निर्माण होईल. वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये उपलब्ध होतील, त्यावेळीच काश्मिरी पंडित व इतर भारतीय नागरिक काश्मीर खोऱ्यात जाऊन स्थाईक होण्याचा विचार व कृती करू शकतील. पण ज्यावेळी हे असे घडून येईल त्यावेळी काश्मीर खोऱ्यातील मूळ नागरिक अश्या 'उपऱ्यांना' खुल्या मनाने स्वीकारतील का आमच्या भूमीवर हे परकीय लोक नकोत म्हणून एक वेगळेच आंदोलन सुरु होईल ? सध्या फोफावलेला प्रांतवाद, भाषावाद, वंशवाद पाहता ही शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by सौन्दर्य

बाकी सगळं चालू द्या.. फक्त एका मुद्द्यावर बोलतो दोन टक्के काश्मिरी पंडितांनी संपूर्ण प्रशासनावर कबजा मिळवला व इतरांना वर येऊ दिले नाही, त्यांच्यावर अन्याय केला,' स्वातंत्र्य मिळाले तेव्हा valley मध्ये हिंदू 20 टक्के होते. प्रशासनावर कबजा मिळवून 2 टक्क्यांवर आले असतील तर मग मजाच आहे. डावी इकॉसिस्टम कसा narrative सेट करतेय याचे हे उत्तम उदाहरण आहे. हाच narrative आपल्याकडे ब्राह्मणांविरुद्ध पण बेमालूम सेट केला जातो आणि लोक विश्वास पण ठेवतात.

In reply to by आनन्दा

अहो पण मूळ प्रतिसादकर्त्याने "या चित्रपटातला संदर्भ" असे लिहिले आहे. आता यात कुठून आली डावी इकोसिस्टीम !?

In reply to by आनन्दा

सिनेमात अगदी सुरवातीलाच ह्यातील घटना, प्रसंग, आकडे हे independently verified केले गेले आहेत असे लिहुन येते. ह्या सिनेमातील इतर घटना आपण सत्य म्हणून पाहणार असू तर ह्याच सिनेमात हे 'दोन टक्क्यांचे' वाक्य आहे ते कसे डाव्या इकोसिस्टिमचे झाले ? आपल्यापैकी कोणीच काश्मिरी पंडित नाहीत किंवा त्यावेळेच्या घटनेचे साक्षीदार नाहीत. तत्कालीन सरकारने देखील ही वंशहत्या लपवून ठेवली असा बहुतेकांचा आक्षेप असताना सिलेक्टिव्ह स्वीकारणे बरोबर नाही असे मला वाटते.

लोकहो, दहशतवाद्यांचा रागराग करून उपयोग नाही. भारत सरकार गप्प का बसलं होतं, याची जास्त चीड आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मागील सरकारच्या चुका सध्याचे सरकारही करत आहे. पंतप्रधान सिनेमाचे कौतुक करत आहे आणि लोकांना बघायचा आग्रही करत आहेत. त्यापेक्षा सरकार प्रत्यक्ष कृती का करत नाही?

In reply to by आग्या१९९०

प्रश्न तत्वतः बरोबर आहे. मात्र मला वाटते, मोदी सरकारला ह्या विशिष्ट बाबीबद्दल कसलीही कृती करतांना अतिशय जपून पाउले टाकावी लागतील. असे पहा: जेव्हा हे प्रत्यक्ष घडून आले, तेव्हा तत्कालिन सरकारने, सदर स्थलांतर देशांतर्गत विस्थापित असे क्लासिफाय केल्यास आंतरराष्ट्रीय संस्थांना ढवळाढवळ करता येईल असे सांगून (म्हणे), त्याकडे काणाडोळा केला. नंतरच्या अनेक सरकारांनेही असेच केले. खरे तर, वर्षांनूवर्षे हे प्रकरण दडपले गेले, असे काही झालेच नव्हते, असे जनता समजू लागली. ह्याचा परिपाक असा, की त्या कालखंडानंतर जन्मलेल्यांना तर हे असे काही भीषण घडले होते, ह्याविषयी कल्पनाही नाही. वास्तविक मोदी सरकारने काही कामे अतिशय धडाडीने केली-- जसे ३७० कलम, सी.ए.ए. ची तरतूद वगैरे. ह्यांतील प्रत्येक वेळी, समाजातील ठराविक घटकांकडून ह्यांना प्रचंड विरोध करण्यात आला. ह्यांत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणारे, आंतर्देशिय पक्ष; स्वतः प्रादेशिक असले, तरी स्वतःला आंतर्देशिय समजणारे पक्ष वगैरे होतेच, पण जागातिक पातळीवरून मदत घेऊन 'आंदोलन घडवून आणणारे' अनेक अ‍ॅक्टिव्हिस्ट व त्यांची एको- व ईकोसिस्टीम्सही होत्या. तेव्हा, आता गेल्या काही वर्षांत देशांतील समाजांत दुही पसरवण्याचे, व ती रूजवण्याचे काम, काही संस्थांकडून व पक्षांक्डून रीतसर सुरू झालेले आहे. साधे, हिजाबच्या शाळेतील वापरावरील बंदीचे उदाहरण घ्या. शाळेच्या युनिफॉर्ममधे जे बसत नाही, ते विद्यार्थ्यांना वर्गांत घालता येणार नाही, इतका सरळ विषय होता, त्याला मुद्दाम धार्मिक रंग देण्यात आला. आताच केवळ ह्या चित्रपटाविषयी सुरू असलेल्या चर्चा आपण ऐकल्य/ पाहिल्या/वाचल्या असतीलच. 'हे असे काही फारसे झालेले नाही' इथपासून, 'झाले असेल, पण आता हे कशाला मुद्द्दाम उकरून काढायचे?' असे अनेक सूर आपण ऐकतो आहोत. कालच एका प्रतिष्ठित चॅनेलच्या चर्चेत, एक स्वत:ला 'काश्मिरी पंडीत म्हणवून घेणारी स्त्री 'सुमारे १०० मारले गेले, गेला बाजार आपण ५००-- अगदी १,००० पंडित मारले गेले -- असे समजले तरीही ह्याला जेनोसाईड म्हणता येणार नाही', असा वाद घालत होती. (बाईला कुणीतरी तिथल्या तिथे जेनोसाईड ह्या शब्दाची डिक्शनरीतील व्याख्या दाखवली असती तर तिची पुंगी बंद झाली असती). मुल्लांच्या इशार्‍यावर नाचणार्‍या समाजाचे सोडाच, पण अगदी हिंदू समाजांतूनही ह्याविषयीचे प्रबोधन अद्यापि झालेले नाही, अशी वस्तुस्थिती आहे. आता कुठे ह्या चित्रपटाच्या निमीत्ताने, निदान काही चर्चा तरी होते आहे. ओंकार दाभाडकरने म्हटल्याप्रमाणे, हा चित्रपट राजकीय हेतूने बनवला गेला असावा. आता थोडेफार मैदान तयार झाल्यावर, निदान चार अलिप्त ('आम्हाला काय त्याचे?') टाळक्यांत तरी वस्तुस्थितीचा थोडाफार प्रकाश पडल्यावर, मोदी सरकार काही पाऊले उचलू शकेल. अर्थात, सद्य परिस्थितीत, देशांतील मुद्दाम निर्माण केले गेलेले वातावरण, व त्याची अतिशय एकांगी चर्चा करणारी पाश्चिमत्य माध्यमे, तेथील राजकीय पक्ष व लॉबीज हे सर्व ध्यानांत घेऊनच मोदी सरकारला सदर विषयाच्या संदर्भांत पाऊले उचलावी लागतील. अगोदरच्या अनेक सरकारांच्या जाणूनबुजून अथवा नि:ष्काळजीने केलेल्या हेळसांडीचे भूत आता मोदी सरकारच्या माथ्यावर येऊन बसले आहे. त्याला उतरवणे, वाटते तितके सोपे नाही.

In reply to by प्रदीप

भाजपाचा आता एकूण सत्तेतील पंधरा पेक्षा अधिक वर्षाचा काळ झालेला आहे, जनता पक्ष, व्हीपीसिंग, वाजपेयी, आणि सध्याची शेठची आठ वर्ष. आता काश्मीरी पंडितांच्या विषयांवर राजकारण करण्यापेक्षा, चर्चा वाढविण्यापेक्षा, जात-धर्मातील दरी वाढविण्यापेक्षा, इतर पक्षांनी काहीच केले नाही हेही जवळ-जवळ आता आपल्याला समजलेले आहे, आता सर्वच वाईट गोष्टींचे खापर इतर पक्षावर फोडण्यापेक्षा, गप्पा कमी करून दमदार पाऊले टाकून सद्य सरकारने पंडितांचे पुनर्वसन केले पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण, 370 हटवण्या बाबत, CAA and NRC बाबत, स्वतःला हिंदू हितवादी समजणारी, शिवसेना कुंपणावरच बसली... शिवसेना आणि भाजप, एकत्र येणे ही, काश्मीर साठी अतिशय योग्य गोष्ट ठरेल ... राज्यात भांडा पण काश्मीरसाठी तरी एकत्र या ....

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या ह्या व ह्या संदर्भांतल्या इतरस्त्र दिलेल्या प्रतिसादांवरून, मला वाटते, तुम्ही व मी वेगवेगळ्या ग्रहांवर रहात असूं. असो.

In reply to by आग्या१९९०

प्रत्यक्ष कृती का करत नाही? म्हणजे नक्की काय करायचं? जरा स्पष्ट पणे लिहा बरं. आपण नेहमीच तोंडची वाफ दवडण्यापेक्षा एकदा काश्मीरला जाऊन या म्हणजे असे फालतू प्रतिसाद येणार नाहीत

दोन टक्के काश्मिरी पंडितांनी संपूर्ण प्रशासनावर कबजा मिळवला व इतरांना वर येऊ दिले नाही, त्यांच्यावर अन्याय केला,' हा मूळ मुद्दा होता. ह्यातील काय खरं? काय खोटं ? हे कसे कळणार ? खुप मोठा इतिहास आहे.रजनीकांत पुराणिक यांनी आपल्या नेहरंवर लिहीलेल्या पुस्तकात सोप्या भाषेत समजावून सांगीतले आहे. पुस्तक आंतरजालावर उपलब्ध आहे. त्यावेळी काश्मीर खोऱ्यातील मूळ नागरिक अश्या 'उपऱ्यांना' खुल्या मनाने स्वीकारतील का आमच्या भूमीवर हे परकीय लोक नकोत म्हणून एक वेगळेच आंदोलन सुरु होईल ? सध्या फोफावलेला प्रांतवाद, भाषावाद, वंशवाद पाहता ही शक्यता नाकारता येत नाही. शंका रास्त आहे,

काही लोकं सिनेमाचं तिकीट काढून सिनेमा बघायला जाणार नाहीत ,कारण त्यांना निर्मात्याची काळजी. हीच लोकं जास्तीत जास्त नाकरिकांनी हा सिनेमा बघायला मिळावा म्हणून अमूक राज्यसरकारने ह्या सिनेमावरील करमणूक कर माफ करावा म्हणून आग्रही आहेत. सगळे भावनेच्या भरात चालू आहे. कुठेतरी एका चित्रपटगृहात हाऊस फूलचा बोर्ड लावलेला आणि आत फक्त ३०% प्रेक्षक होते. लोकांनी झापले त्याच्या मालकाला. शक्यता दोन असू शकतात. १) निर्मात्याची काळजी घेणाऱ्यांनी तिकिटे घेतल्यासातील २) सिनेमा विरोधींनी तिकिटे हडप करून प्रेक्षकांना दूर ठेवले असेल.

द कश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त करण्यास राज्य सरकारचा नकार, अजित पवार म्हणाले “केंद्र सरकारनेच…” https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-government-denied-to-d… इतर राज्यांनी, केंद्राकडे बोट दाखवले नाही ... आलं अंगावर तर ढकल केंद्रावर, ही वृत्ती, ह्या राजवटीत जास्त बघायला मिळत आहे ....

द काश्मिर फाईल्स' चित्रपटावर बंदी घाला; खासदाराची मागणी https://www.esakal.com/desh/mp-badruddin-ajmal-has-demanded-a-ban-on-th… खरा इतिहास दाखवला तर, बंदी का घालायची?

https://youtu.be/w5UkmK2DhBI हा व्हिडिओ भाऊ तोरसेकरांचा आहे हे मुद्दामहून लिहितोय. त्यामुळे मिपाकरांना ही लिंक उघडायची की नाही हे अगोदरच ठरवता येऊ शकेल. मी ही लिंक इथे दिलीय त्याचे कारण म्हणजे त्यांनी केलेली भविष्यवाणी. त्यांचे म्हणणे असे आहे की काय बॉलीवूडवर राज्य करण्याची सद्दी हा चित्रपट संपवेल व खऱ्या अन्यायाच्या गोष्टी बाहेर काढणाऱ्या चित्रपटांची आता त्सुनामी यायला लागेल व त्यात आत्ताचे बॉलीवूड सत्ताधारी वाहून जातील. बघूया, भविष्यात काय दडलाय ते. :)

In reply to by शाम भागवत

कारण, हिंदू स्त्रीया जास्त उदारमतवादी आहेत ... “मुस्लीम नाही तर काय झालं, नमाज पठण…”, लहान मुलीचे बोल ऐकून पल्लवी जोशीला बसला धक्का .....(https://www.loksatta.com/manoranjan/the-kashmir-files-actress-pallavi-j…) हिंदू इतके कट्टर नाहीत....

In reply to by मुक्त विहारि

हिंदू इतके कट्टर नाहीत ह्या वाक्याशी पूर्ण सहमत. देशातील फक्त एका राज्यात मुस्लिम बहुसंख्य आणि हिंदू अल्प संख्याक आहेत . त्याच परिणाम म्हणून तेथील मुस्लिम लोकांनी ते राज्य च हिंदू मुक्त केले. पण देशातील बाकी राज्यात हिंदू 80% पेक्ष जास्त आहेत. तिथे मुस्लिम अगदी आनंदात त्यांचे जीवन जगत आहेत. बहुसंख्य हिंदू त्यांच्या वर कोणताच दबाव आणत नाहीत. आणि हे जगातील एकमेव उदाहरण असावे .हिंदू हे उदारमतवादी च आहेत.

‘द कश्मीर फाइल’ पाहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना ‘या’ दोन अटींवर मिळणार ‘हाफ डे’; मुख्यमंत्र्यांची घोषणा https://www.loksatta.com/desh-videsh/half-day-for-assam-government-empl…

ह्या सिनेमा मुळे दीन गोष्टी स्पष्ट झाल्या. Main stream media पण कसा एजेंडा चालवतो. काश्मीर मध्ये इतके काही होत होते तरी त्याची दखल देशातील main stream media ni घेतली नाही जगापासून ते ठरवून लपवले काश्मिरी हिंदू वर जे काही अत्याचार होत होते त्याच्या बातम्या काश्मीर मधील स्थानिक मीडिया मध्येच येत होत्या. Main stream media नी पूर्ण दुर्लक्ष त्या घटनेकडे. खूप भयंकर आहे है. Bjp नी दोन वेळा केंद्रात सत्ता स्थापन केली अनेक state मध्ये सत्ता स्थापन केली. त्या मुळे एक गोष्ट स्पष्ट झाली भारतात जिंकून येण्यासाठी अल्पसंख्याक लोकांचे फुकट लाड करण्याची गरज नाही ह्या दोन चांगल्या गोष्ट ह्या दोन घटनेतून घडल्या.

In reply to by शाम भागवत

ऐसीवर असा लेख वाचल्यावर भांगेच्या शेतात अचानक तुळस उगवलेली बघितल्यावर जसे वाटेल तसे वाटले :)

In reply to by उपयोजक

कदाचित लोक, तिकिट घेउन बघण्याची हिम्मत नसल्याने बघत नसतील. कोणताही चित्रपटगृह मालक का म्हणुन आणि किती दिवस हाऊसफुलचा बोर्ड लावेल?

बघून हिंदूंना राग आला आणि त्यातून पेटून कोणी ध्वनीप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून दररोज भोंगे लावून ५ वेळा ऐकू येणारी नमाज जरी बंद केली तरी भरुन पावलं. होणारेय का हे? मुस्लिम भोंगे काढा म्हटलं की जथ्था घेऊन येऊन दादागिरी करतात. हिंदूंना जमणारेय का हे?

In reply to by उपयोजक

हिंदू मंदिरांनी, एक वर्षभर जरी ध्वनी प्रदूषण बंद केले तरी मग इतर धर्मियांना पण ध्वनी प्रदूषण बंद करावेच लागेल .. दुर्दैवाने, आमच्या डोंबोलीत तरी, मंदिरे देखील, राजकीय पक्षांनी वाटून घेतली आहेत, असेच वाटते... पुर्वी डोंबिवलीत, इतके ध्वनी प्रदूषण होत न्हवते. आता काही विचारू नका, गणपती असो की नवरात्र, गोंगाट केल्या शिवाय, एक सण साजरा होत नाही. सध्या एक नवीन फॅड आले आहे, दहीहंडी रात्री फोडायची. सकाळ पासून ते रात्री पर्यंत, डीजे सूरूच... दहीहंडी पण राजकीय पक्षांनी, वाटून घेतली आहे की काय? असा संशय येतो ... स्वतः ला सुशिक्षित समजणार्या, पण सार्वजनिक ठिकाणी अशिक्षिता सारखे वागणार्या, डोंबिवलीत ही तर्हा असेल तर, इतर गावी तर धुमाकूळच असेल ...

In reply to by मुक्त विहारि

हिंदू मंदिरांनी, एक वर्षभर जरी ध्वनी प्रदूषण बंद केले तरी मग इतर धर्मियांना पण ध्वनी प्रदूषण बंद करावेच लागेल ..
+१

चित्रपटात खोटी कहाणी, 'द कश्मीर फाइल्स' Tax Free करणार नाही https://www.loksatta.com/desh-videsh/asaduddin-owaisi-slams-modi-govt-o… खरा इतिहासच जर, स्वीकारला जात नसेल तर, काय बोलणार? गंमत अशी की, अशा नेत्यांच्या बरोबर, "शिवसेना" युती करते.... कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, हे हिंदू हितवादी कधीच न्हवते, त्यामुळे, त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही... पण, शिवसेनेची आधीची धोरणे आणि आत्ताची वागणूक, ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे.... इंद्राय स्वाः, तक्षकाय स्वाः, असेच म्हणायची वेळ, आता आली आहे...

In reply to by मुक्त विहारि

श्रीनगरमध्ये आलात तर संपवल्याशिवाय राहणार नाही! https://www.esakal.com/manoranjan/bollywood-film-the-kashmir-files-vive… पुरावा असेल तर, इतिहास नाकारण्यात अर्थ नाही...

काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या त्या १५०० हिंदूंसाठी कोण अश्रू ढाळणार?” The Kashmir Files वरुन ओवेसींचा मोदी सरकारला सवाल https://www.loksatta.com/desh-videsh/asaduddin-owaisi-slams-modi-govt-o… ह्यांच्याच पक्षातील नेत्याने, 100 कोटी गैर मुस्लिम जनतेला ठार मारण्याची धमकी दिली होती ..... https://youtu.be/krdym7gFVvA

The Kashmir Files वरुन संतापल्या मेहबूबा मुफ्ती; मोदी सरकारवर टीका करत म्हणाल्या, “ज्या पद्धतीने…” इतके जर, काश्मीरी पंडितांवर खरोखर प्रेम आहे तर, त्यांच्या वंशजांना, त्यांच्या जमिनी परत द्या...

१९४८ जळीत फाईल्स जेव्हा हिंदूनीच हिंदू ची घरे जाळली होती,काही जणांना मारले होते, १९८४ शीख फाईल्स जेव्हा शीख लोकांना मारले होते (हे आकडे भयावह आहेत) .. लई पिक्चर स्टोऱ्या बाकी आहेत..

In reply to by कपिलमुनी

आणि काश्मीर हे कटकारस्थान आहे रागाच्या भरांत मारलेली चपराक आणि ठरवून केलेली मारहाण, ह्यांत फरक असतो... पटत असेल तर बघा, नाहीतर सोडून द्या... बाय द वे, 1948ची झळ, आमच्या काही पुर्वजांना देखील लागली पण तो उद्रेक होता आणि अशावेळी माफ करणेच उत्तम ... पण, त्याच बरोबर, दुसर्या आजोळी अख्खा गांव, आमच्या घराचे संरक्षण करायला जमला होता ... उद्रेकाच्या, चांगल्या आणि वाईट, दोन्ही बाजू बघीतल्या आहेत.....

महाविकास आघाडीत 'शिवसेने'ला काळ कुत्र देखील विचारत नाही. सर्व अधिकार भ्रष्टवादी कॉंग्रेसच्या हातात आहेत >>>> माझ्यामते सर्व अधिकार काकान्च्या हाती आहेत. राज्यात २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ, असा दावा करणाऱ्या भाजपला महाविकास आघाडीचे निर्माते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. राज्यात भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे प्रतिआव्हान त्यांनी केले. त्यासाठी आज त्यानी एक सभा घेऊन पुढच्या निवडणुकीत भाजपला कसे पराभूत करायचे याचा सल्ला आलेल्या तरुण कार्यक्र्त्याना दिला आहे.

मेहबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला सारख्या अनेक लोकानी जनतेकडून गडगन्ज सम्पत्ती कमावली आहे. त्यामुळे त्यान्चा या सिनेमावर आक्षेप असणारच. त्यानी ना मुस्लिमासाठी ना हिन्दून्साठी काही केले फक्त आणि फक्त पैसे कमावले. असे माझे मत आहे. तसे नसते तर काश्मीर मधे आज शान्तता असती.

ब्रिटिश सोडून गेले आणि भारतीय लोकात राज्य करण्याची कुवत नसल्या मुळे एका मागोमाग एक हिंसाचार उसळले. स्वार्थी वृत्ती ही भारतीय नेत्यांमध्ये खूप आहे हे मान्य च करावे लागेल. तरी ब्रिटिश आले त्यांनी एकसंघ भारत निर्माण केला.ह्या एकसंघ भू भाग नियंत्रित करण्यासाठी प्रशासन व्यवस्था निर्माण कायदे निर्माण केले,न्याय व्यवस्था निर्माण केली. ,सैन्य ,पोलिस यंत्रणा निर्माण केली. रेल्वे चालू केली. सर्व काही व्यवस्थित करून भारतीय राज्य कर्त्याना देश सोपवला. पण काय झाले . लगेच पाकिस्तान वेगळा,हिंसाचार,आणि फक्त सावळा गोंधळ. ब्रिटिश नसते आले तर आज भारताचा भू भाग एकच केंद्रीय सत्तेच्या अमलात आहे तो असता का? काही तरी वेगळाच भूगोल असता.

https://www.esakal.com/desh/omar-abdulla-false-things-in-the-kashmir-fi… -------- किती खोटे बोलणार? ------ ‘ट्रकमध्ये सीटच्या मागे लपून पळालो होतो’; The Kashmir Files पाहून अभिनेत्रीने सांगितला मन हेलावणारा अनुभव https://www.tv9marathi.com/entertainment/bollywood/the-kashmir-files-is…

'द काश्मीर फाइल्स' सिनेमा सुरू असताना 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या दिल्या गेल्या घोषणा https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood… हा सिनेमा म्हणजे एक समुद्रमंथन आहे ... सगळे मूखवटे गळून पडत आहेत ....

In reply to by मुक्त विहारि

सिनेमात एक वाक्य आहे - सरकार उनकी है तो क्या - सिस्टिम तो हमारी है! याचा प्रत्यय असा येत राहतो.

काश्मीर प्रश्न ,कश्मिर मधील हिंदू ना सुरक्षित वाटत नसेल. प्रश्न आहे तसाच राहतं असेल तर असल्या सिनेमाची काही गरज नाही काश्मीर मध्ये काय घडले किंवा आता घडतं आहे ह्याची सर्व माहिती भारत सरकार ल आहे. अनेक पक्ष केंद्रात येवून गेले . कोणीच काश्मीर चे प्रश्न सोडवले नाहीत. फक्त एक दुसऱ्या वर आरोप करण्या वतिरुक्त काही घडले नाही. त्या मुळे कोणत्याच राजकीय पक्ष नी स्वतःला निरपराध समजू नये.. हा सिनेमा जर देशात दोन धर्मात द्वेष निर्माण करून राजकीय पोळी भाजण्यासाठी असेल तर ..हा खूप मोठा प्रश्न आहे.

“बाळासाहेब ठाकरेंमुळे आम्ही शिकलो, अन्यथा…”, काश्मिरी पंडितांनी आभार मानल्याचा व्हिडीओ शिवसेना खासदाराने केला शेअर https://www.loksatta.com/trending/kashiri-pandit-students-thanks-to-bal… तेंव्हा, बाळासाहेब ठाकरे यांनी, मदत केली आहे वाचनांत आले होते आणि त्यामुळेच शिवसेने कडून अपेक्षा होत्या...आज देखील शिवसेनेने, हेच धोरण ठेवले तर उत्तम...

The Kashmir Files: काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पाकिस्तानला जबाबदार धरलं; जम्मू-काश्मीरमध्ये जे झालं ते… https://www.loksatta.com/desh-videsh/pakistan-responsible-for-ghulam-na… समाज एकत्र राहायला हवा. जात आणि धर्म न पाहता प्रत्येकाला न्याय मिळायला हवा, असं मत आझाद यांनी व्यक्त केलं आहे. -------- आझाद मैदान दंगल प्रकरणा बाबतीत, हे काही बोलले होते का? मुजफ्फरनगर दंगल प्रकरणा बाबतीत हे काही बोलले होते का? ते सोडा, नुकत्याच झालेल्या अमरावती दंगल प्रकरणाबाबतीत हे काही बोलले आहेत का? --------- बाकी , बांगलादेश आणि पाकिस्तान मधील हिंदू मंदिराच्या तोडाफोडी बद्दल काही बोलले होते का?

The Kashmir Files: “मुस्लिमांना लाज वाटली पाहिजे…”, काश्मिरी लेखकाने काश्मिरी पंडितांची माफी मागत सांगितले सत्य https://www.loksatta.com/manoranjan/the-kashmir-files-kashmiri-writer-j… आणि अजूनही काही लोकांना वाटते की, सिनेमा अतिरंजित आहे...

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'वर न्यूझीलंडमध्ये बंदी, माजी उपपंतप्रधानांकडून निषेध https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/the-kashmir-files-f… न्यूझीलंडचे माजी उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स म्हणाले, 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा सेन्सॉर करणे म्हणजे न्यूझीलंडमधील नागरिकांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणे होय. विन्स्टन पीटर्स यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांचे मत व्यक्त केले आहे. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाला सेन्सॉर करणे म्हणजे न्यूझीलंडमधील 15 मार्चच्या अत्याचाराची माहिती सेन्सॉर करणे होय.

In reply to by मुक्त विहारि

तीन वर्षांपूर्वी ख्राईस्टचर्चमध्ये मशीदीवर एका ख्रिस्ती कट्टरतावाद्याने हल्ला केला होता आणि पन्नासेक लोकांना मारले होते. त्यानंतर त्या देशाची पंतप्रधान जेसिंडा आर्डन स्वतः हिजाब घालून वावरत होती. ओबामानेही न्यू यॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या-- ग्राऊंड झीरोच्या जवळ मशीद बांधायला पाठिंबा दिला होता. ज्या देशांचे नेते असतील त्या देशांकडून काय अपेक्षा ठेवणार? हा पोलिटिकल करेक्टपणा पूर्ण जगाला- खरं तर मानवजातीलाच धोक्यात आणत आहे. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सौदीत काम करत असतांना, एक पाकिस्तानी मुस्लिम, भारतीय मुस्लिमाला म्हणाला होता की, हम नें 60 साल में, पाकिस्तान को मुस्लिम राष्ट्र बनाया, बांगलादेश में भी ऐसा ही है, आप हिंदूस्थानी मुस्लिमों ने क्या किया? अगर हम सब साथ मिल जाएँ तो दुनिया को मुस्लिम बना सकते हैं ... भारतीय मुस्लिमाने काही उत्तर दिले नाही, पण नंतर तो एकांतात मला म्हणाला की, ये सच बोल रहा हैं. हमारे कौम में भी ऐसे सोचने वाले लोग हैं... ------- माझा उदारमतवादी पणा, त्या दिवशी विरघळून गेला...

In reply to by मुक्त विहारि

सौदी सारख्या मुस्लिम देशात तुमच्या सारख्या स्वाभिमानी हिंदू नी नोकरी करायला जायला च नव्हते पाहिजे होते. एका मुस्लिम देशाच्या विकासासाठी तुम्ही तुमच्या बुद्धी चा वापर केला. हा हिंदू द्रोह च आहे. फक्त मुक्त विहिरी ह्यांच्या साठी.

In reply to by मुक्त विहारि

सौदी सारख्या मुस्लिम देशात तुमच्या सारख्या स्वाभिमानी हिंदू नी नोकरी करायला जायला च नव्हते पाहिजे होते. एका मुस्लिम देशाच्या विकासासाठी तुम्ही तुमच्या बुद्धी चा वापर केला. हा हिंदू द्रोह च आहे. फक्त मुक्त विहिरी ह्यांच्या साठी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

1) कट्टर धर्म वेडे ह्या मध्ये मुस्लिम धर्मीय ह्यांचे योगदान जास्त आहे. २) आर्थिक क्षेत्र काही लोकांनी ठरवून घेवून बाकी लोकांस कंगाल करणारे. आर्थिक क्षेत्रातील अतिरेकी. ३) काहीच लोकांच्या हितासाठी सरकार चालवणारे सत्ता वेडे सत्ता धारी. ही पण लिस्ट मोठी आहे आणि हे सर्व घटक मानव जाती साठी विनाशक च आहेत. फक्त धर्मवीर मानव जाती साठी विनाश कारी नाहीत. उलट विनाशकारी घटकांच्या यादीत धर्म वेडे शेवटच्या स्थानावर आहे. बाकी सर्व महा भयंकर आहेत.

धर्मवीर ह्या शब्द ऐवजी धर्म वेडे असे वाचावे. १) जर्मनी नी महाभयंकर युद्ध चालू त्या पाठी कारण धर्मांध पना हे नव्हते. २) अमेरिका नी जपान वर अनु बॉम्ब टाकून जगातील सर्वात मोठा विनाश घडवला त्याला कारण धर्मांध पना नव्हतं आर्थिक आणि जागतिक सत्ता होण्याचे वेड हे कारण होते. आफ्रिका सारखे देश गरिबीत जीवन जगत आहेत पण तिथे स्वार्थी आर्थिक लालची त्यांच्या majburi च फायदा घेवून त्यांची लूट करत आहेत. इथे धर्मांध लोकांचा संबंध नाही. आज रशिया आणि युक्रेन युद्ध चालू आहे प्रचंड विनाश होत आहे पैसा आणि आर्थिक अतिरेकी पना ह्या साठी सर्व चालू आहे. जगाला धर्म वेड्या लोकांपेक्षा पांढरपेशा आर्थिक हवस असणाऱ्या स्वार्थी लोक पासून जास्त धोका आहे.. भारतात पण धर्माची भीती दाखवून देशातील सर्व नागरिकांची आर्थिक लूट करण्याचे षडयंत्र चालू अशें

दि काश्मिर फाईल्स चित्रपटाने लिब्रांडुंची दातखिळ बसवली आहे. दि काश्मिर फाईल्स हा चित्रपट नसुन डॉक्युमेंट्री आहे. मुळात घटना जश्या घडल्या तश्या पेक्षा दि काश्मिर फाईल्स चित्रपटात टोन डाउन केलेल्या आहेत. ओरीजीनल घटनाक्रम दाखवला असता तर बघवला नसता हा चित्रपट. ज्या लोकांनी हे सगळ केल, त्यांना फक्त हैवानांची उपमा देता येईल. आपल्या समाजात आपल्या आजुबाजुला असे हैवान वावरत असतात व वेळ पडली तर ते त्यांचा मूखवटा फेकुन हैवानांची कृत्य करतात ह्याची जाणिव समाजाला होईल अशी आशा आहे. गिरीजा टिक्कुला जम्मु मधुन परत बोलवणारा तीच्या कॉलेज मधलाच असिस्टंट प्रोफेसर होता. बर्याच केसेस मध्ये २०-३० वर्षांच्या शेजार्यांनीच हिंदुंना गोळ्या घातल्या व त्यांची मालमत्ता हडप केली. AK47 हाताशी असताना चिनार वृक्ष कापणासाठी वापरल्या जाणार्या मोठ्या करवतीने जिवंत पणे गिरीजाला कापणारे नराधमच असु शकतात. फक्त काफीर असण गुन्हा असेल तर त्या गुन्ह्याची शिक्षा द्यायला ड्रायव्हर, शाळेतला शिपाई किंवा प्रोफेसर कोणीही सहज नराधम बनु शकतो. दि काश्मिर फाईल्स चित्रपटाने हिंदुंचे डोळे उघडावेत अशी आशा आहे !!

काश्मिर फाई्ल्स चित्रपट म्हणजे...' माकप नेते सीताराम येचुरींचं गंभीर विधान https://www.esakal.com/amp/manoranjan/bollywood-movie-the-kashmir-files… समुद्र मंथन....

द कश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर दोन गटात हाणामारी, 15 जणांना अटक https://marathi.abplive.com/news/maharashtra/two-groups-clash-in-amarav… मिळालेल्या माहितीनुसार, 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट पाहून परतणाऱ्या एका गटाने रस्त्यावर जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावरूनच दुसरा गट आणि चित्रपट पाहून आलेल्या या गटात जोरदार वादावादी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की या दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली.... --------- हा चित्रपट, सगळे मुखवटे बाहेर काढत आहे... मध्यंतरी, अमरावती शहरांत दंगल झाली होती....