Skip to main content

आनंदयात्री

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 22/03/2022 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
सरल्या साऱ्या चिंता खंती उरल्या नुसत्या खाली भिंती नाही कुणाचे उगा लोढणे दुसर्‍या साठी उगा कुढणे संपून गेले वसंत वैभव भोगत आहे शिशीराचे यौवन फणसा सारखे पिकले गरे आपण बरे,आपले काम बरे पांघरून भूत भूतकाळाचे वेध लागले भविष्याचे खेद ना खंत या भूताचा विचार आता फक्त स्वताचा आनंदयात्री या जगातील वाट चालतो अनंताची ठेऊन दृष्टी अदृष्यातील वाट पाहतो गंतव्याची
लेखनविषय:

वाचने 2607
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

आवडली,
आनंदयात्री या जगातील वाट चालतो अनंताची ठेऊन दृष्टी अदृष्यातील वाट पाहतो गंतव्याची
हे विशेष आवडले पैजारबुवा,

संपून गेले वसंत वैभव भोगत आहे शिशीराचे यौवन भिववीत नाही 'जरा', ही ही तर नांदी नवपल्लवा ची

कविता आवडली. पण , 'लागले नेत्र पैलतिरी' अशा अर्थाने जर 'वाट पहातो गंतव्याची" असेल तर ते नाही आवडले.