Skip to main content

५ राज्यातील निवडणूक निकाल

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 10/03/2022 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणून निकालांविषयी हा धागा. प्राथमिक कलचाचणीनुसार सध्याची उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजप पुढे दिसतोय, गोव्यात भाजप आणि कॉन्ग्रेसमध्ये जोरदार टक्कर दिसतेय, मगोप येथे किंगमेकर ठरणार असे दिसते, पंजाबात आप कॉग्रेसपेक्षा थोडा पुढे आहे तर मणिपूरातही भाजपने आघाडी घेतल्यासारखी दिसतेय. पुढे काय होतेय ते लवकर कळेलच.

वाचने 31941
प्रतिक्रिया 149

प्रतिक्रिया

असे वर्गीकरण कारणे अयोग्य आहे असे माझे तरी मत आहे सरकार योग्य ठिकाणी खर्च करत आहे का? दहा रुपयांची योजना आणि आठ रुपये आपसात वाटून तर घेत नाही ना? हे दोनच प्रश्न महत्वाचे आहेत. भारत संघ राज्य आहे नियम नुसार ,कायद्या नुसार महसूल कोणता कोणी गोळा करायचा ह्याचे सूत्र ठरलेले आहे. कोठून किती महसूल जमा होतो हेच सूत्र वापरायचे झाले तर महारष्ट्र मालामाल होईल. केंद्र राज्यांना पैसे देते ह्याचे पण नियम आहेत त्या नुसार च देत असणार . शेवटी महसूल हा देशाचा . केजरीवाल ज्या लोकहितवादी योजना चालवत आहेत त्याचे पैसे भारत सरकार कडून जरी येत असतील तरी ऑब्जेक्शन का असावे. दिल्ली भारतात च आहे ना.

In reply to by sunil kachure

दिल्ली भारतात च आहे ना.
गल्ली चुकली...
तिसऱ्याच राज्यातील लोक काळजी करत आहेत.हे बघून गहिवरून आलें www.misalpav.com/comment/1135542#comment-1135542

sunil kachure,
हे जीवनासाठी अती आवशक्य बाबी वर लोक मत देत नसतील आणि फालतू भावनिक प्रश्नावर लोक मत देत असतील. तर देशाचे भविष्य अंधार मय आहे . हे नक्की
तुमच्या या विधानाशी पूर्णपणे सहमत आहे. हेच बघा ना की, उत्तरप्रदेशाच्या लोकांनी २०१२ साली अखिलेश यादवास तरुण नेता म्हणून मोठ्या कौतुकाने निवडून दिलं होतं. सत्तेत आल्यावर लगेच मुझफ्फरनगरात दंगली झाल्या. जीवनावश्यक बाबींची पूर्ती करण्यासाठी लोकांचं जीवन ठिकाणावर हवं, बरोबर? पण त्याची हमी अखिलेश देऊ शकंत नाही. योगी आदित्यानाथ मात्र ती देतात. म्हणून लोकं योगींना मतं देतात. साधा हिशोब आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

२०१२ मध्ये अखिलेश यादव मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नव्हता. निवडणूक झाली तेव्हा कधीही कुठेही अखिलेशचे नाव मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून पुढे नव्हते. तर पूर्वी मुख्यमंत्री असलेले आणि पक्षाध्यक्ष असलेले मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री होतील हेच चित्र होते. पण निवडणूक जिंकल्यावर आयत्या वेळी मुलायमसिंगांनी आपल्या मुलाचे नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे आणले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चंद्रसूर्यकुमार, तुमचं बरोबर आहे. अर्थात अखिलेश हा तरुण चेहरा म्हणून वापरण्यात आला होता हे नक्की. त्याच्या जोरावर मतं मिळालेली असावीत. मुलायम काय व अखिलेश काय, दोघेही पक्के हिंदूद्वेष्टे. एक बातमी सापडली : https://www.firstpost.com/politics/akhilesh-yadav-sps-poster-boy-who-wo… आ.न., -गा.पै.

बाकी सगळे जाऊ दे पण या निकालाच्या निमित्ताने शेतकरी आंदोलनवाले ग्रामीण अर्थरेकी तोंडावर आपटले आणि आमच्यासारखे शहरी अर्थरेकी ज्या बाजूने आहेत ती बाजू जिंकली. गर्व से कहो हम शहरी अर्थरेकी है.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हा नवीन वाद निर्माण करून महानगर पालिका जिंकायच्या आहेत का? जगातील एक देश अस्थिर झाला तर पूर्ण जग संकटात येते ग्रामीण भाग योग्य स्थिती मध्ये नसतील से शहर नरक होतील आणि शहर नसतील तर ग्रामीण भाग स्मशान होईल इतके ते एकमेकावर अवलंबून आहेत. इतके किरकोळ गोष्ट समजत नसेल . जगातील सर्वात खतरनाक अतिरेकी संघटना पेक्षा bjp समर्थक म्हणून जे असे मत व्यक्त करतात ते जास्त धोकादायक आहेतं. ह्या लोकांच्या विचार समोर लादेन पण शांती प्रिय वाटावा.