Skip to main content

५ राज्यातील निवडणूक निकाल

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 10/03/2022 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणून निकालांविषयी हा धागा. प्राथमिक कलचाचणीनुसार सध्याची उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजप पुढे दिसतोय, गोव्यात भाजप आणि कॉन्ग्रेसमध्ये जोरदार टक्कर दिसतेय, मगोप येथे किंगमेकर ठरणार असे दिसते, पंजाबात आप कॉग्रेसपेक्षा थोडा पुढे आहे तर मणिपूरातही भाजपने आघाडी घेतल्यासारखी दिसतेय. पुढे काय होतेय ते लवकर कळेलच.

वाचने 31941
प्रतिक्रिया 149

प्रतिक्रिया

जी मंडळी ( सर्वसामान्य, माध्यमातील आणि प्रसिद्ध ) म्हणून दुख्खी आहेत ते "आता आप नि बघा कसे जिकंले"असे "बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना " वागतील पवारांची मॅक्स महाराष्ट्र पत्रकार परीषद बघा .. आप आप आप

सपाचा मतदार वर्ग विस्तारला आहे, पण लोकसभेत सपा यापेक्षा कमीच परफॉर्म करेल असे वाटते. राज्यात सपा केंद्रात भाजपा अशी बरीच मते असावीत. आपचे वेल्फेअर पॉलिटिक्स यशस्वी होत आहे ही आनंदाची बाब आहे. सामान्य लोकांसाठी थेट चांगली गोष्ट करणारे सरकार कधीही चांगले. आआपला फुकटे म्हणण्याआधी युपी मध्ये भाजप का जिंकली हे भक्तांनी पहावे. युपी मध्ये सुद्धा "लाभार्थी फॅक्टर" होता हे सर्व पोल्स मधून दिसले आहे. युपी मध्ये सुद्धा वेल्फेअर योजना चांगल्या प्रकारे राबवल्या गेल्या होत्या. भाजपने आपल्या उडत्या आणि तोंडाळ हिंदुत्वाला थोडासा लगाम घातला तर त्यांचा फायदा होईल असे वाटते.

In reply to by कॉमी

वेल्फेअर पॉलिटिक्स दिल्ली कदाचित चालेल ( दिल्ली तील बऱ्याच गोष्टींचा खर्च केंद्रसरकारच करते नाहीतरी ) मोठ्या राज्यात कसे होईल! आणि त्यत्साहीचाच पैसा कुठून आणणार पंजाब मध्ये हे मतदान " काँग्रेस नको " आणि भाजप शिखांना नको म्हणून आप असे वाटते "युपी मध्ये भाजप का जिंकली हे भक्तांनी पहावे. नेहमीचे जातीचे राजकारण , यादव, दलित इत्यादी लोकांनी नाकारले म्हणून हे " काँग्रेसी गांधी नेहरू गुलमानि " पण समजून घयावे

In reply to by चौकस२१२

मी म्हणतोय कि युपीत सुद्धा वेल्फेअर पोलिटिक्सने भाजपला चांगली मदत झाली आहे. (भक्त हा शब्द मायबोलीवर दिल्लीकरांना फुकटे म्हणणाऱ्यांना होता.) खर्च कोणी का करत असेना तरी यापूर्वी जे जनतेला डिलिव्हर झाले नव्हते ते आआपनेच केले ना. शिक्षण आणि आरोग्यावर पण केजरीवालांनी लक्ष दिले आहे, दिल्लीकर खुश आहेतच. पंजाबात काय होते हे पाहू.

In reply to by चौकस२१२

वेल्फेअर पॉलिटिक्स दिल्ली कदाचित चालेल ( दिल्ली तील बऱ्याच गोष्टींचा खर्च केंद्रसरकारच करते नाहीतरी ) मोठ्या राज्यात कसे होईल! आणि त्यत्साहीचाच पैसा कुठून आणणार

+१०००

दिल्ली, पुड्डूचेरी सारख्या केंद्रशासित प्रदेशात आणि गोवा, सिक्कीम सारख्या छोट्या राज्यांत (काही विशेष सवलती असल्याने) आप चे वेल्फेअर पॉलिटिक्स चालू शकते. आता पंजाब जिंकल्यावर त्यांची खरी कसोटी आहे. तिथे बहुतांश खर्च त्यांना राज्याला मिळणाऱ्या महसूलातून करावे लागणार आहेत (जे दिल्लीत करावे लागत नाहीत). इतर ठिकाणी जर असे फुकट किंवा सवलतीच्या दरात देणे शक्य असते तर काँग्रेस किंवा भाजप सारख्या अनुभवी पक्षांनी अशी खैरात वाटली नसती का? पंजाब जिंकल्याबद्दल आपचे अभिनंदन, पण आता दिल्ली मॉडेल तिथे राबवण्यासाठी पैशाचे सोंग कसे आणतात हे बघण्यात जास्त स्वारस्य आहे. स्वगत - केंद्राने केवळ पोलीस खात्याचा खर्च जरी दिल्लीच्या तथाकथित राज्य सरकारवर टाकला तर महामहिम केजरीवाल आज जी खैरात वाटत आहेत ती त्यांना वाटणे शक्य होइल का?

In reply to by कॉमी

वे. युपी मध्ये सुद्धा "लाभार्थी फॅक्टर" होता हे सर्व पोल्स मधून दिसले आहे.
इतकेच नव्हे, तर तिथे फुकट रेशनवाटपही झाले होते, असे काही यूट्यूबच्या व्हिडीयोंमाधून दिसले. मला वाटते, हा 'लाभार्थी फॅक्टर' व सुधारलेली सुरक्षा व्यवस्था, ह्या दोन्ही बाबींमुळे उत्तर प्रदेशच्या जनतेने भाजपाला भरघोस मतांनी पुन्हा निवडून दिले आहे.

म्हणाला की मी निवडूध आलो तर पाणी आणि वीज बिल अर्धे करीन तर "जनता" त्यालाच मते देईल. केजरीवालांनी हीच आइडिया केलेली. त्यांनी ओळखले की उत्तम प्रशासन ते हेच. बाकी ती बिलं अर्धी करतात, मेट्रो भाडे स्वस्त ठेवतात ते कुणाच्या जिवावर? - दुसऱ्या राज्यांच्या महसुलावर. -------------

In reply to by कॉमी

बरेच लेख येतील. त्यापैकी एक - timesofindia/india/delhi-election-results-7-reasons-why-arvind-kejriwal-led-aap-won शाळेच्या फीया, खाजगी शाळांची फीवाढ रोखणे आणि पाणी - वीज सर्व दिलंय. आताच्या पंजाब निवडणुक प्रचारातही परदेशी शिक्षणाला जाणाऱ्या मुलांचा प्रश्न मांडला होता त्यांच्या भावी मुख्यमौत्री मान यांनी ( इंडिया टुडे २१ फेब्र मुलाखती - " परदेशी शिकायला जाणारा विद्यार्थी २५ लाख रुपये डुबवतो देशाचे, तिकडेच राहतो. ते थांबवायचा प्रयत्न करणार. ") मी काही मनाला येईल ते ठोकत नाही.

In reply to by कंजूस

तुम्ही दिलेली लिंक चालत नाही. तुम्ही ठोकता असे म्हणलेच नाही. सोर्स केजरीवाल ने काय कामं केली यासाठी नाही, दुसऱ्या राज्याच्या म्हसूलातून यासाठी हवा होता.

In reply to by कंजूस

दिल्ली मध्ये मिळणाऱ्या महसूल वर केंद्र सरकार आणि काही फुकटी राज्य अवलंबून आहेत. हे सत्य असताना दिल्ली सरकार दुसऱ्या राज्यांच्या महसूल वर आणि केंद्र सरकार च्या मिळणाऱ्या देणग्या वर त्यांच्या जनतेला सुविधा देत आहे . हा नवीन च शोध म्हणायचं.

In reply to by कंजूस

बहुदा ही वातावरण निर्मिती आंतरजालावर आणि टिव्हीवर असते. ती खाली झिरपेल असे नाहीच. -- पण ह्या वेळी कोणी पुरस्कार परत करुन बडेजाव केला नाही. आंतरराष्ट्रीय माध्यमे युक्रेन-रशिया युध्दात गुंतल्याने हिंदुत्वा टेरर मध्ये रस नसावा.

BJP ल मत देवून त्यांना विजयी केले. आता परत bag भरून गैर bjp सरकार असलेल्या राज्यात पोट पाण्यासाठी जावूया. उरका लवकर. केजरीवाल ला किती शिव्या दिल्या तर त्याच्याच राज्यात पोट भरणार आहे. महाराष्ट्र ल किती नाव ठेवली तरी तिथे गेल्या शिवाय घर चलने मुशिकील आहे.

In reply to by sunil kachure

जसे काही तुमच्या आवडत्या महाराष्ट्रीयन प़क्षांचा तिकडे मुख्यमंत्री बनला असता तर तिकडच्या लोकांची तिकडेच पोटे भरली असती.

लोक काय विचार करून मतदान करतात हेच मोठे कोडे आहे योगी सरकार किंवा bjp परत निवडून येणे ह्या वर दुःख नाही. पण लोकांनी bjp ल आणि योगी ना मतदान केले असेल? १) मोदी मुळे. २) भावनिक प्रश्न जसे धर्मवाद, जाती वाद मुळे . बुरखा प्रकरण कर्नाटक मध्ये मतदान काळात च का उभे राहिले आणि आता का शांत झाले ते प्रकरण आर्थिक प्रश्न लोकांस का महत्वाचे वाटत नाहीत. उपासमार,रोजगार,शेतकऱ्यांची बिकट अवस्था. आरोग्य सेवा चे तीन तेरा. भ्रष्ट प्रशासन . हे जीवनासाठी अती आवशक्य बाबी वर लोक मत देत नसतील आणि फालतू भावनिक प्रश्नावर लोक मत देत असतील. तर देशाचे भविष्य अंधार मय आहे . हे नक्की यूपी मध्ये bjp ल लोकांनी का मत दिली असतील? त्याची कारणे काय? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे देशाचे भविष्य त्या वर अवलंबून आहे

In reply to by sunil kachure

काही लोकांना जन्मतच अंधत्व आलेले असते त्यामुळे त्यांना डोळ्यावरची झापड काढा असे सांगून उपयोग नसतो.

In reply to by sunil kachure

श्री कचुरे, तुम्ही सगळीकडे प्रतिसाद लिहीता. --------
यूपी मध्ये bjp ल लोकांनी का मत दिली असतील? त्याची कारणे काय? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे
ह्यावर लेख लिहा.

In reply to by sunil kachure

जाती वाद मुळे .? उत्तर प्रदेशात पूर्वी प्रमाणे जर लोकांनी तर सपा ज्याला यादव समाजाची मते जातात का निवडून आला ? एकीकडे म्हणता कि .. "bjp परत निवडून येणे ह्या वर दुःख नाही." आणि दुसरीकडे तेच ते रडगाणे ! लोकांच्या निर्णयावर शंका घेणे धन्य

In reply to by sunil kachure

शेतकर्यांच्या भल्यासाठी कायदे आणले तर ते परत घ्यायला लावले. मग आता मोदीला दोष का देता? शेतकर्यांना कर्ज माफी, फुकट गोष्टी मिळण्याची सवय झाली आहे. आजही प्रतिकूल परिस्थीत सुद्धा छोट्याश्या जमीनीत चांगली शेती करणारे शेतकरी आहेत. भावनिक प्रश्नांवर काही लोक मतदान करतात. एवढे बहुमत मिळत नाही. उप्र मधील सगळेच लोक मूर्ख आहेत असे म्हणायचे आहे का ? आणि जर एखाद्या उत्तर भारतीय माणसाने ठरवले की भावनिक मतदान नाही करायचे तरी तो मत कोणाला देणार? जर योगी/ मोदी ने १०० पैकी १०च चांगल्या गोष्टी केल्या असतील तर सपा/बसपा यांनी काही चांगल्या गोष्टीकरायची इच्छा सुद्धा व्यक्त केलेली नाही. ते फक्त आपल्या बिरादरीतील लोकांचे भले करण्यात गुंतलेले होते. मायावतीने तर हत्तींचे पुतळे उभे करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले. त्याचीच शिक्षा मिळाली आहे. जर संसदेत विरोधी पक्षांनी अडवणुकीचे धोरण राबवले नसते तर अनेक चांगले निर्णय/ कायदे झाले असते. आणि मग त्यांना ( विरोधकांना )कंटाळुन जनतेने भाजपला मत दिले नसते.

In reply to by सामान्यनागरिक

कशाला त्या कचरे साहेबाना उत्तर द्यायच्या भानगडीत पडताय? ते फक्त उ हा ब क ( उचल हात बडव कळफलक) आहेत

“आदित्य, उद्धव ठाकरेंना भविष्य आहे, त्यांनी फक्त…”; चंद्रकांत पाटलांचा सल्लावजा सावधगिरीचा इशारा
महाराष्ट्राच्या महाप्रवक्त्यांच्या नावाने पुरस्कार चालू करुन पहिला पुरस्कार चंद्रकांत पाटलांना द्यावा अशी मी मागणी करत आहे. कृपया अणुमोदण द्या.

सहज गंमत म्हणून घेण्यासारखे हे प्रश्न नाहीत गंभीर व्हा. सर्वांचे भविष्य त्या प्रशनाधी निगडित आहे. यूपी मध्ये bjp ल का मतदान झाले. योगी नी यूपी चे रुपांतर . प्रगत,रोजगार देणारे राज्य,स्वच्छ प्रशासन. उन्नत ग्रामीण अर्थ व्यवस्था,नियाजान बद्ध सुंदर शहर ह्या मध्ये केले आहे का? किंवा पुढे ते करतील ह्याची खात्री आहे का?

In reply to by sunil kachure

बाकीचे लोक हे प्रश्न सहज गंमत म्हणून घेताहेत हा तुमचा गैरसमज आहे. बाकीचे लोक तुमच्या पोस्ट ची चातकासारखी वाट पहात असतात. तुम्ही या लोकांना जागृत करण्यासाठी ज्ञानदान चालू ठेवावे.

Sp ल दोन नंबर ची मत मिळतात हे पण चिंताजनक आहे काँग्रेस नी ती जागा घेतली असती तर मतदार सजक आहेत ह्याचा थोडाफार तरी पुरावा मिळाला असता. बाकी पंजाब,मणिपूर ,गोवा ह्या राज्यात मतदार परिपक्व आहेतं यूपी आणि उत्तराखंड येथील मतदार अजून पण भावनिक प्रश्नावर मतदान करतात. आणि हे चिंता जनक नक्कीच आहे.

In reply to by sunil kachure

रागा यांना कुशल सल्लागार हवा आहे. बघा तिथे काही जमते का? बाकी जिथे भाजपा चे सरकार आहे तिथले नागरीक परिपक्व नाहीत. जिथे भाजपा चे सरकार आहे तिथे परिपक्व नागरीक असतात. खुश?

In reply to by सुक्या

हायला ... यांच्या नादाला लागुन मी पण कायपण लिवायला लागलो. "बाकी जिथे भाजपा चे सरकार आहे तिथले नागरीक परिपक्व नाहीत. जिथे भाजपा चे सरकार नाही तिथे परिपक्व नागरीक असतात. खुश?" असे वाचावे ..

In reply to by सुक्या

रागा यांना कुशल सल्लागार हवा हे कोणी सांगीतलं ? जर खरंच त्यांना हवा असता तर तो त्यांनी दहा वर्षांपुर्वीच आणला असता. रागा ने काही केले/ बोलले तरी त्याचे समर्थन करणारे प्रवक्ते आहेत मग सल्लागार कश्याला हवा ? उलट त्यांना अजुन हुजरेगिरी करणारे लोक हवेत. अगदी खरं बोलायचे तर देशातल्या १३० कोटी लोकांनी हेच करावे अशी त्यांची इच्छा आहे.

In reply to by sunil kachure

यूपी आणि उत्तराखंड येथील मतदार अजून पण भावनिक प्रश्नावर मतदान करतात. आणि हे चिंता जनक नक्कीच आहे. उ हा ब क उचला हात बडवा कळफलक

भाजपने देवबंद जिंकला आहे. देवबंद हा मुस्लिमबहुल मतदारसंघ आहे. या मतदारसंघात ब्रिजेश यांनी समाजवादी पक्षाच्या कार्तिकी राणा यांचा ७१०४ मतांनी पराभव केला. दारुल उलूम देवबंदच्या प्रमुखाशी संबंधित असलेले AIMIM चे बहुचर्चित उमेदवार उमेर मदनी यांना केवळ ३५०१ मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या राहत खलील यांना अवघी १०९६ मते मिळाली आहेत. या निवडणुकीच्या एक महिना आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देवबंद येथे एटीएस प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी केली होती

उत्तर प्रदेशमध्ये पक्षाने लढवलेल्या १०० जागांपैकी ९९ जागांवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने डिपोझिट गमावले! २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत, ओवेसीच्या इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने ३८ जागांवर निवडणूक लढवली होती आणि ३७ जागांवर त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. -- हैदराबादमध्ये मुस्लिम राजवट टिकवून ठेवण्यासाठी आणि भारतात एकीकरणास विरोध करण्यासाठी ब्रिटिश राजवटीत हैदराबाद संस्थानात मुस्लिम राष्ट्रवादी मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) ची स्थापना धार्मिक मुस्लिम धर्मांध सय्यद कासिम रझवी द्वारे केली गेली. हे एक इस्लामी सशस्त्र दल होते. रझाकार हे मुस्लिम फुटीरतावादी होते ज्यांनी निजामाची राजवट चालू ठेवण्याची इच्छा होती. या झवी ने जाहीरपणे हिंदूंना गुलाम बनवण्याच्या मुस्लिमांच्या अधिकाराचा आग्रह धरला होता! रझवीने हिंदूं वर गुन्हेगारी हल्ले सुरू केले होते आणि त्याच्या रझाकार फौजा महाराष्ट्रातही लुटालूट करत असत.

कोण का हरले असावेत यावर मतं मांडणारा धागा काढा. ------ माझ्या मते कांग्रेसचे रागा नेतृत्व कुणाला विश्वासक वाटत नाही. इथे महाराष्ट्रात जेव्हा थोडे कांग्रेसी निवडून आले त्यांचे कौतुक न करता प्रदेश कांग्रेस कमिटीला शाबासकी पाठवली त्यांनी. रागांना कंट्रोल खुर्चीत बसवण्याचे सोनियांचे प्रयत्न कायम असफल होत आहेत. पंजाबमध्ये सर्व सरदार शीख समान असा माझा भ्रम होता. तो इंडिया टुडे (२१ फेब्रुवारीच्या) अंकातून दूर झाला. शीख, आणि हिंदूंनी नवीन आप पार्टीला संधी द्यायचा निर्णय घेतला. ( हा प्रतिसाद फेब्रुवारी निवडणुका निकाल आणि संभाव्य कारणे असा नवा धाग्यासाठी. धागा काढा.)

In reply to by कंजूस

कांग्रेस चे जे काही लोक निवडुन येतात ते स्वतःच्या प्रभावाने येतात. प्रभाव ईतका आहे की विरोधी उमेदवाराला संधीच मिळत नाही. ते निवृत्त होण्याचीच वाट पहावी लागेल. कांग्रेस चा काही संबंध नाही. खरेतर त्यांच्या मतदार संघात राहुल गांधीला फिरकु न देण्ञाची त्यांनी काळजी घेतलीय.

आज पन्नास दिवस पूर्ण झाले. मी गेले ५० दिवस श्रीयूत कचुरे यांचा प्रतिसाद न वाचता पुढे जाऊ शकलो आहे. आता ते सहज जमायला लागले आहे. फक्त त्यांच्या प्रतिसादावर आलेला प्रतिसाद वाचून पूर्ण समाधान होते. श्री कचुरे यांनी मला या कलेत पारंगत केल्याबद्दल. _/\_

In reply to by शाम भागवत

कचुरे उर्फ राजेश उर्फ हेमंत हा 40 पैसे वाला राष्ट्रवादी चा कार्यकर्ता आहे असे माझे मत आहे. ज्या प्रकारे सकाळ वगैरे बुद्धीभेद करत असतात त्याच प्रकारे तो देखील करत असतो. दोन म्हणी सांगतो, कचुरेंचे व्यक्तिमत्व त्यातून उलगडत जाईल ताकाला जाऊन भांडे लपवणे मी नाही त्यातली नि कडी लावा आतली. मी आताशा प्रतिसदातली पहिली दोन वाक्ये वाचल्यावर सरळ सोडून देतो.

In reply to by आनन्दा

मी आताशा प्रतिसदातली पहिली दोन वाक्ये वाचल्यावर सरळ सोडून देतो.
अभिनंदन!!!! कारण प्रयत्न करूनही मला हे जमलेले नाही. मी वाचायला सुरवातच करू शकत नाही. तर.... थोडक्यात, तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन!!!! ;)

In reply to by शाम भागवत

काय आहे, मला वर नाव बघून खाली वाचायची सवय नाही. त्यामुळे मी वाचायला सुरुवात केली की कळतं की हा राजेश चा आहे. मग मी स्क्रोल करतो. ☺️

अग्रलेख : बुलडोझर योग! पहिले महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्याचा लौकिक असा की सत्तेवर असलेल्या पक्षास विधानसभा निवडणुकीत सत्ता पुन्हा मिळत नाही. https://www.loksatta.com/sampadkiya/agralekh/uttar-pradesh-niyam-yogi-a…
लोकसत्ता अग्रलेख वाचणीय आहे. भाजप का जिंकले हे सांगण्यापेक्षा, इतर का हरले ह्यावर पुर्ण लेख आहे. ---------------- श्री सरदेसाई यांचे विश्लेषण तसलेच आहे.

लोकशाही मध्ये सत्ताधारी पक्ष पेक्षा विरोधी पक्ष सक्षम असणे हे खूप महत्त्वाचे आहे .काँग्रेस चे अस्तित्व टिकणे पण खूप गरजेचे आहे यूपी मध्ये वेगवेगळे लढण्या पेक्षा सर्व विरोधी पक्षांनी एकत्र लढायला हवं होते. मतांची टक्केवारी आज नाही तर उद्या माहीत पडेलच . भले विरोधी पक्षणा जागा कमी मिळाल्या असतील पण त्यांची मतांची टक्केवारी नक्कीच वाढलेली असेल. हा माझा अंदाज

विकास हाच निवडणुकी चा मुद्धा असणारी राज्य आणि भावनेवर आरूढ होवून मतदान करणारी राज्य . असे वर्गीकरण केले पाहिजे आंध्र,तेलंगणा,तमिळ nadu,केरळ, आणि कर्नाटक सुद्धा . कधीच प्रचंड बहुमत भावना भडकावून मत मागणाऱ्या पक्षांना दिले नाही राजस्थान ,पंजाब,दिल्ली,बंगाल ही पण राज्य योग्य विचार करूनच मतदान करतात. यूपी हे खूप वेगळे राज्य आहे ह्या नोकऱ्या नकोत,वीज नको,विकास नको. फक्त धार्मिक आणि जातीय वाद च खूप आवडतो. पोट भरायला बाकी उत्तम राज्य आहेत च फक्त ट्रेन मध्ये बसायचे आणि तिकडे जायचे.

In reply to by sunil kachure

आंध्र,तेलंगणा,तमिळ nadu,केरळ, आणि कर्नाटक सुद्धा . कधीच प्रचंड बहुमत भावना भडकावून मत मागणाऱ्या पक्षांना दिले नाही
हो ना. तिकडे साड्या एकदा साड्या फेडणारा पक्ष जिंकतो तर दुसर्‍यांदा म्हातार्‍यांना रात्रीचे खसाखस ओढून नेणारा पक्ष जिंकतो. खुपच विचारपुर्वक निर्णय घेतात तिकडे.

In reply to by धर्मराजमुटके

अम्माला स्त्री मतदारांची नेहमीच साथ मिळत होती ...

In reply to by मुक्त विहारि

तमिळनाडू मध्ये लोक व्यक्ती पूजक आहेत. NTR ज्या स्मारकाजवळ अम्माचा फोटो पूजतात. असे मी चार पाच शहरात(होसुर, कोईमतूर, सालेम ETC) चौका चौकात पाहिलं. तिथे भाषा आणि पक्ष इतकंच समीकरण आहे.

In reply to by गावठी फिलॉसॉफर

दुर्दैवाने, महाराष्ट्र राज्यात देखील, आजकाल हे लोण पसरत चालले आहे... आमच्या डोंबोलीत देखील, आजकाल मोठे मोठे बॅनर लागायला लागले आहेत ...

देवबंदमधे भाजपा विजयी झाला. याचा अभ्यास झाला पाहिजे समान नागरी कायदा आणण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होऊ शकतो असे वाटते.

ते निवडणूक चाणक्य यंदा कोणत्या पक्षाच्या बाजूने होते ? त्यांचे काय विश्लेषण आहे सद्याच्या निकालांबद्दल ?

श्री प्रशांत किशोर हि व्यक्ती साहेबांसारखी फुकटची फार उदो उदो झालेली व्यक्ती आहे असे माझे मत आहे. तृणमूलसाठी गोव्याचे डावपेच रचणारे हे महाशय तेथील निकाल पाहून मी त्या गावचा नाहीच म्हणून पाठ फिरवतील याबद्दल मला अजिबात शंका नाही. कारण प्रत्येक कानाकोपऱ्यात पोस्टर लावलेलय तृणमूल काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे ( शून्य जागा मिळवून) https://timesofindia.indiatimes.com/india/wrong-pass-by-prashant-kishor…

हातरस आणि लखीमपूर खेरीमध्ये भाजपचा विजय. या दोन मतदारसंघांवर मीडिया आणि डाव्या-उदारमतवादाचे अनुयायी यांनी जास्त लक्ष केंद्रित केले होते. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अजिबात सुधारलेली नाही हे सांगण्यासाठी त्यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला होता. पण बाजी उलटलेली दिसून येते आहे. भाजपच्या अंजुला सिंग महौर यांनी हातरस मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजय मिळवून इतिहास रचला. सुमारे ५८% मते त्यांना मिळाली आहेत.

https://www.tv9marathi.com/videos/mim-leader-asaduddin-owaisi-conceded-… ओवेसींचे निरीक्षण ......आक्षेप त्या ईव्हीएमवर नाही तर लोकांच्या मेंदूत जी एक प्रकारची चिफ बसवली आहे त्याची ही चूक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. -------- हिंदू हितवादी लोक जर एकत्र येत असतील तर चांगलेच आहे की .....

निकाल लागून दोन दिवस झाले पण अजून चंद्रसूर्यकुमाराचं अभ्यासपूर्ण विश्लेषण नाही आल. लवकर लिव्हा

इकडे आहेत विश्लेषणं. इंडिया टुडे मासीक अजूनही बेस्ट. Jionews app वर फ्री डाउनलोड आहे.

इथे बऱ्याच जणांनी दिल्लीची वेल्फेअर कामे केंद्राच्या पैश्यातून होतात असे दिले आहे. दिल्लीचा महसूल किती, वेल्फेअर वर खर्च किती, केंद्राकडून किती मिळतात वैगेरे गणित मांडले तर बरे होईल.

In reply to by कॉमी

पण आपल्याला दुरून कळणार कुठून? म्हणजे दिल्लीचा महसूल कुठून किती येतो आणि कसा खर्च करतात ते. केंद्रशासित राज्य म्हणजे काय आणि त्याचे हिशोब मलाही जाणून घेण्यास आवडेल. केजरीवालांनी काय आश्वासनं दिली आणि कशी अमलात आणली ते लेख पूर्वी वाचलेले सापडले ते दिले. आता पंजाबातही हेच मॉडेल आणणार म्हटल्यावर मतदार सुखावले. महाराष्ट्रातही हेच होवो. भ्रष्टाचाराची गळती थांबली तर दोनशे युनिटस वीज आणि वीस हजार लिटरस पाणी जनतेला फुकट मिळेल. परदेशी शिक्षणाचा बाजार थांबेल. इथे घेईल त्यास प्रवेश देऊन एंजिनिअर करून ठेवले पण त्यांना सामावून घेणाऱ्या मोठ्या कंपन्या कुठे आहेत? आणि अण्णा हजारेंना उपोषण करण्याचं कारणच उरणार नाही. दिल्लीतील त्यांचा जाण्यायेण्याचा,राहण्याचा उपक्रमही प्रायोजित होता म्हणतात

In reply to by कंजूस

पण आपल्याला दुरून कळणार कुठून? म्हणजे दिल्लीचा महसूल कुठून किती येतो आणि कसा खर्च करतात ते. केंद्रशासित राज्य म्हणजे काय आणि त्याचे हिशोब मलाही जाणून घेण्यास आवडेल.
बरोबर. पण माहित नसताना दिल्ली सगळी इतर राज्यांच्या पैश्यावर चालते कसे म्हणता येईल समजत नाही. दिल्लीचा महसूल सुद्धा दणकट असणार असा अंदाज आहे.. एनिवे, इथे माहिती उल्पब्ध आहे. अगदी वरकरणी तपासावरून दिसते की एकूण उत्पन्नापैकी १७-२०% उत्पन्न केंद्राकडून येते. (Break up of state government receipts हा तक्ता पहावा.) तुलना करायची झाल्यास, उत्तर प्रदेश- १२ ते १८% महाराष्ट्र- १५-१५.५०% गुजरात- १८-२४% त्यामुळे दिल्ली इतर राज्यांपेक्षा इतर राज्यांच्या महसूलावर अवलंबून आहे असं या माहितीवरून तरी दिसत नाही. यापेक्षा वेगळे काही माझ्याकडून राहत असल्यास जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by कॉमी

दिल्लीचे पोलिस केंद्रसरकरच्या under असल्यामुळे त्यांचा पगार आणि निवृत्तीवेतन, पोलिस स्टेशन प्रशिक्षण इत्यादींचा खर्च बराच वाचत असणार. तसेच दिल्लीमध्ये ग्रामीण भाग नाही आणि हा दिल्लीसाठी advantage असेल (हा माझा अंदाज आहे).

In reply to by रात्रीचे चांदणे

वाचत असल्यास त्याचे क्वांटिफिकेशन हवे. नक्की किती वाचतो ? हा वाचलेला पगार वि. वेल्फेअर कामांवर किती खर्च झालेत इत्यादी.