Skip to main content

ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग ४

लेखक निनाद यांनी सोमवार, 21/02/2022 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
सोशल मीडिया पोस्टवरून कर्नाटकमध्ये २६ वर्षीय हिंदू कार्यकर्त्याची हत्या. अभिनेत्री कंगना रणौत आणि रवीना टंडनपासून ते भाजप नेते आणि समाजातील प्रमुख सदस्यांनी हर्षाच्या थंड रक्ताच्या हत्येबद्दल संताप व्यक्त केला आहे. रुपेश कुमारचीही झारखंडमध्ये याच मानसिकतेच्या लोकांनी हत्या केली गेली आहे. भारतात हिंदु असुरक्षित होत चालले आहेत.

वाचने 16067
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

In reply to by Trump

उदाहरणे द्या, आय एस आय हेर फुटुन भारताला मदत केल्याची.
मी केलेल्या विधानाची ढीगभर उदाहरणे जालावर विखुरलेली आहेत; बाकी I don't feed trolls.

In reply to by वामन देशमुख

धन्यवाद. कोणतीही न उदाहरणे दिल्याबद्दल. वेळ भेटला तर हे पुस्तक वाचा. The Spy Chronicles: RAW, ISI and the Illusion of Peace https://en.wikipedia.org/wiki/The_Spy_Chronicles येथे कोणता प्रतिवाद अपेक्षित आहे?
बाकी I don't feed trolls.

In reply to by Trump

येथे कोणता प्रतिवाद अपेक्षित आहे?
जगभरात कोणत्याही काळात, कोणत्याही भूप्रदेशाला वा मानवसमूहाला फंदफितुरी नवी नाही.

In reply to by निनाद

पाकिस्तानमधल्या आपल्या डीप ॲसेटची मोरारजीभई व गुजराल यांनी वाट लावली होती. पर्रिकरांचं त्या प्रकारचे बोल खूप गाजले होते. यात राजकारण न आणता विचार केला पाहिजे. यानंतर ते डीप ॲसेट निर्माण करायची प्रक्रीया सुरू झाली. यासाठी डोवाल यांच्यापेक्षा आणखी सक्षम कोण बरे असू शकेल? डोवालांना दिलेले अधिकार, त्यांचे देशप्रेम, त्यांचा फिटनेस वगैरे पाहता त्यांनी ते काम उत्तम रितीने केलेले असणार यात मला तरी शंका नाही. तसेच याचे पुरावे ते ठेवणे शक्य नाही. त्यापासून प्सिध्दी मिळावी असा विचारही त्यांच्या मनाल शिवणार नाही. कारण प्रत्येक गुप्तचरांचीती मानसिकता असते. मात्र आपण परिणामातून हे यश पाहू शकतो. आपल्यातले घरभेदी सापडणे. अतिरेक्याच्या कारवाया कमी होणे किंवा ते मारले जाणे. पाकच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आगाऊ अंदाज आल्याने तिथेही पाकिस्तानला नामोहरम करता येणे. राहता राहिला आपल्यातला घरभेद्यांचा प्रश्न. हा प्रश्न सर्वांनाच भेडसावत असतो. फक्त त्याचा उपयोग करण्यातली कुशलता ज्याची जास्त त्याला जास्त फायदा होतो. आणखी एक मुद्दा असा की, पाकिस्तानातील अनागोंदीची अवस्थापाहता,हे घरभेदी आपल्याला पाकिस्तानात जास्त मिळू शकतात. ही आपली जमेची बाजू आहे.

In reply to by शाम भागवत

कोणतेही भारतीय हेर पकडले जात नाहीयेत - हाच खरा पंचम आहे. संरक्षण आणि हेरखाते यशस्वी असण्याची व्याख्या हीच आहे की ते आणि त्यांचे ऑपरेटिव्ज कधीही पकडले जात नाहीत. २००८ मध्ये पाकी हँडलर्स पकडले गेले नाहीत - तेव्हा ते यशस्वी होते असे म्हणावे लागेल. पण असे हँडलर्स आहेत, हे भारताला उघडपणे कळले येथे ते अयश्स्वी झाले. आणि नंतर ते हँडलर्स गायब पण झाले यात भारताचे कुठे तरी यश असणार! हेरगिरी मध्ये एखाद्या देशाबद्दल असलेली शांतता हीच धोकादायक असते चीनी हेरांविषयी भरतात किंवा भारतीय मिडिया मध्ये फार कमी ऐकू येते - हा खरा धोका आहे!

In reply to by निनाद

डॉ आंबेडकर यांनी लिहुन ठेवलेले आहे कि इस्लाम धर्म हा प्रथम धर्माशी आणि नंतर राष्ट्राशी निष्ठा ठेवायला भाग पाडतो. धर्म सोडायला सांगितल्याबद्दल आयसिसच्या एका दहशतवाद्याने आपल्याच आईला सर्वांदेखत ठार मारले Islamic State militant 'executes own mother' in Raqqa https://www.bbc.com/news/world-middle-east-35260475#:~:text=An%20Islami…. धर्माच्या नावाखाली भारतात विशेषतः काश्मीर मध्ये असंख्य मुसलमान तरुणांना आय एस आय ने फूस लावली आणि भारतविरोधी कारवाया करवल्या. अशा तर्हेचा धर्माचा आधार भारताला पाकिस्तानात घेता येत नाही. कारण एकतर आपण धर्मनिरपेक्ष देश आहोत, पाकिस्तानात हिंदू लोक राहिलेच किती आहेत आणि धर्माच्या नावाखाली हिंदू तरुणांचे डोके भडकावणे तितके सोपे नाही. कारण मदरशात जसे केवळ धार्मिक शिक्षण आणि काफिर लोकांचे डोके उडवण्याची कुराण ची शिकवण मिळते तशा धार्मिक शाळा जगात कुठेच नाहीत. मदरशात शिकलेल्या ज्ञानाचा व्यावहारिक जगात काहीच फायदा होत नाही म्हणून या शिक्षणाचा तरुणांना नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी काहीच फायदा होत नाही. अशी भडकलेली माथी असणारे बेरोजगार तरुण धर्माच्या नावाखाली पैसे देऊन हेरगिरी करण्यासाठी तयार करणे हे फार सोपे आहे. याचाच आय एस आय फायदा उठवते. यासाठीच मदरशातील धार्मिक शिक्षण बंद करून तेथे आधुनिक शिक्षण देणे आवश्यक ठरते

In reply to by सुबोध खरे

बरोबर. अगदी उच्चशिक्षित मुसलमानही एकही वाईट शब्द कुराणविषयी, इस्लामविषयी बोलणार नाही, लिहीणारही नाही. किंबहना इस्लामच्या व्याख्यानुसार तो / ती मुसलामान असणारच नाही.

रशिया- युक्रेन युध्द पेटले. ह्या तिघाडी सरकारच्या काळात आणखी काय काय पहावे लागनार?? - तेच आपले विहारी : )

In reply to by अमरेंद्र बाहुबली

साधे दाऊद इब्राहीमला पकडून आणू शकत नाहीत, ते पुतिनच्या काय मागे लागणार? भिंद्रनवालेने दम दिला तरी इथल्या काही लोकांना, इंदिरा गांधी यांचे पाय पकडायला लागले होते... असो, ह्या राजवटीत मारहाण होणार ती फक्त सर्वसामान्य जनतेला.

तिघेडी सरकार कारणीभूत . हे फक्त भक्त वीहरी च म्हणू शकतात. देशाच्या विकासात कोणत्या पक्षाचे किती कार्य आहे अगदी शाळा,कॉलेज,कारखाने,मेडिकल कॉलेज,सिंचन व्यवस्था,एअर पोर्ट,जात निर्मूलन, संशोधन,आधुनिकता,सुपर कॉम्प्युटर, अणू ऊर्जा, विद्युतीकरण, एक्सपोर्ट साठी सुविधा,कमजोर वर्ग साठी योजना अशा अनेक क्षेत्रात. राजकीय पक्ष नुसार वर्ग वरी करा. Bjp कुठेच नसेल

मोहित कंबोज यांना तलवार नाचवणं पडलं महागात, पोलिसांकडून गुन्हा दाखल... https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mohit-kamboj-shows… गुन्हा केला असेल तर, नक्कीच कायदेशीर मार्गाने कारवाई केली पाहिजे... "मागुघपा" नसल्याने, मी कुणाचाही वैचारिक गुलाम नाही...

'टिपू सुलतान'चा वाद पुन्हा पेटणार?; आता शिवसेनेने केली 'ही' मागणी https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/row-between-sena-c… शिवसेनेने, असेच हिंदू हितवादी निर्णय घ्यायला हवेत.... आमच्या सारखी जुनी लोकं, परत शिशसेनेत नक्कीच येतील...

देशमुख-मलिकांनंतर आता कोणाचा नंबर? किरीट सोमय्या म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे…” https://www.loksatta.com/mumbai/kirit-somaiya-answer-who-will-be-next-l… सोमय्यांनी जाहीर केलेल्या ‘डर्टी डझन’ मधली नावे ... १. अनिल देशमुख २. नवाब मलिक ३. अनिल परब ४. संजय राऊत ५. सुजित पाटकर ६. भावना गवळी ७. आनंद आडसुळ ८. अजित पवार ९. हसन मुश्रीफ १०. प्रताप सरनाईक ११. रविंद्र वायकर १२. जितेंद्र आव्हाड --------- किरीट सोमैय्या, योग्य ते पुरावे सादर करतील, अशी अपेक्षा आहे...

श्री इम्रान खान सध्या रशियामध्ये आहेत. रशिया आणि युरोपियन यांच्यामध्ये युध्द पेटलेले असताना तिकडे ज्यायचा हेतु समजत नाही. उगाचच अमेरीकन पुरस्कृत समुहाला कायमस्वरुपी सोडणे असे प्रकार चालु आहेत असे दिसते. Energy cooperation in focus during PM Imran's meeting with Russian President Putin https://www.dawn.com/news/1676820/energy-cooperation-in-focus-during-pm…

In reply to by Trump

अमेरिका का कडून मदत मिळवत असतो. त्याच वेळी चीन कडून सुद्धा मदत मिळवत असतो. इराक युद्धात अमेरिकेला मदत पण केली आणि दुसऱ्या बाजू नी तालिबान ची पण पाठ राखण केली आता रशिया भारताचा मित्र असला तरी पाकिस्तान रशिया कडून पण काही तरी मिळवलं च.

In reply to by Trump

रशिया व अमेरिका हे स्वार्थी आहेत व ते फक्त त्यांचे उद्दीष्ट्य पूर्ण करत आहेत असे वाटते. मला वाटते की युक्रेनच्या शरणागतीनंतर अमेरिका व रशिया दोधेही विनविन सिच्युएशन मधे असणार आहेत. युक्रेनचं काहीही होवो. नविन पाईपलाईन सुरू झाली नाही पाहिजे हे उद्दीष्ट आहे अमेरिकेचे. ते साध्य झालंय. जर्मनीने नविन पाईपलाईनचा वापर सुरू करण्याची वेळ बेमुदत पुढे ठकललीय. पुतिनला पूर्विचा रशिया परत उभा करायचाय. तो एकेक प्रांत परत मिळवतोय. अमेरिका व रशिया दोघेही खूष. अमेरिका जरा जास्तच खूष. एवितेवी युक्रेन रशियाच्या घशात जाणारच होता. तर मग चांगल्या स्थितील युक्रेन ऐवजी खराब स्थितीतला युक्रेन गेला तर आणखीन बरं. त्यासाठी त्याच्या मागे असल्याचे दाखवून त्याला लढाईला प्रवृत्त करणे आवश्क होते. ते अमेरिकेला नक्की जमलेलं आहे. शिवाय युक्रेनिअन लोकं रशियनांविरूध्द आता आणखीनच संतापलेली असणार. त्यामुळे युक्रेन ताब्यात ठेवण्याची रशियाची किंमतही जास्त असणार. युध्दात जेवढी रशियाची हानी होईल तो अमेरिकेचा बोनस. ;) मधल्यामधे पाकिस्तानचा मामा बनणार आहे. रशियाचा भेटीची जबरदस्त किंमत अमेरिका पाकिस्तानकडून वळती करणार असं दिसतंय. ग्रे लिस्टमधे जातोय की काय? दोन बैलांच्या झुंझीत हे बारकूस पिल्लू कशाला मधे गेलं कुणास ठाऊक? तैवान बाबतचा रशियाचा पाठिंबा ही एक खेळी आहे हे न कळण्या इतपत चीन मूर्ख नक्कीच नाही. पण या गुगलीला इम्रानसाहेब गंडले की काय? :)

In reply to by शाम भागवत

पाकिस्तान आधीच करड्या यादीत आहे. तुम्हाला दुसरी कोणती यादी म्हणायची आहे का?
ग्रे लिस्टमधे जातोय की काय?
https://www.wionews.com/south-asia/pakistan-looks-to-exit-the-grey-list…

In reply to by Trump

:) माझी गडबड झाली. ५० दशलक्षाचा दंड अमेरिकेने एका पाकीस्तानी बॅंकेला ठोठावलाय म्हणे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे | वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे || कवी वाल्मीकीसारिखा श्रेष्ठ ऐसा |नमस्कार माझा सदगुरू रामदासा ||

In reply to by मदनबाण

पण, मागुघपा, जनतेला हे सत्य पचवणे अवघडच आहे

In reply to by मदनबाण

उगीच गैरसमज पसरवू नका. कोर्टाने अजून नवाब मलिकांना दोषी ठरविले आहे का?

तपास यंत्रणा महापालिकेच्या शिपायांवर धाड टाकतील; संजय राऊत यांची उपरोधिक टीका https://marathi.abplive.com/news/mumbai/sanjay-raut-on-income-tax-raid-… अफरातफर केली असेल तर नक्कीच ... ह्या केंद्र सरकारवर माझा तरी विश्र्वास आहे ....

“नवाब मलिक जेलमध्ये आहेत, मग अजित पवार बाहेर कसे?” असदुद्दीन ओवैसींचा सवाल! https://www.loksatta.com/maharashtra/mim-chief-asadussin-owaisi-targets… आता ह्याला कुणी धार्मिक रंग देणार का? की घरचा आहेर समजणार? की हे पण भाजपचेच कारस्थान असे म्हणायचे?

लवासा प्रकल्पाबाबत पवार कुटुंबियांवरील आरोपात तथ्य, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निकाल https://www.loksatta.com/mumbai/mumbai-high-court-judgement-on-allegati… मुंबई उच्च न्यायालयात लवासा प्रकल्पाविरोधात याचिका दाखल होती. या याचिकेत पवार कुटुंबावर गंभीर आरोप करण्यात आले होते. याची सुनावणी पूर्ण करत न्यायालयाने लवासा प्रकल्पासाठी कायद्यात केलेली दुरुस्ती योग्य असल्याचं म्हटलं. परंतु पवार कुटुंबियांनी प्रकल्प अजित गुलाबाचंद यांना मिळावा यासाठी प्रयत्न केल्याच्या आरोपांत तथ्य असल्याचेही महत्त्वपूर्ण निरिक्षण निकाल देताना नोंदवले. असे असले तरी प्रकल्प झाला असून आणि त्याविरोधातील याचिका खूपच विलंबाने दाखल करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच लवासा प्रकल्पाविरोधातील ही याचिका निकाली काढली. ------- “पर्यटन हा उद्योगाचाच भाग असल्याचे धोरण लवासानिमित्ताने तयार करण्यात आलेले नाही वा कोणासाठी तरी त्यादृष्टीने कायद्यात दुरूस्तीही करण्यात आलेली नाही. तर याबाबतचे धोरण ९०च्या दशकापासूनच अस्तित्त्वात होते. फक्त ते धोरण व शासननिर्णयाच्या पातळीवर होते आणि त्याअनुषंगानेच काही प्रकल्पांना परवानगी देण्यात आली होती. याच कारणास्तव २००५ मध्ये वटहुकुमाद्वरे संबंधित कायद्यात दुरूस्ती करून ती पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्यात आला,” असा दावा राज्य सरकारने केला होता. ही दुरूस्ती उच्च न्यायालयाने आज योग्य ठरवली...... ----- शरद पवार यांनी कायद्याचे पालन केले आहे, असेच वाटते...

तीन महिने पगार नाही, घर कसं चालवणार' ST कर्मचाऱ्याने संपवलं जीवन https://zeenews.india.com/marathi/maharashtra/st-strike-in-maharashtra-… ------- ह्या राजवटीत नक्की काय चालले आहे?

आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल; धारदार शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न https://www.tv9marathi.com/maharashtra/beed/fir-lodge-against-mla-sande… https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0… हे आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत, कदाचित म्हणूनच, केंद्र सरकारने हे षडयंत्र रचले असावे, असेही काही लोकांना वाटण्याची शक्यता जास्त आहे...

यशवंत जाधव भीमपुत्र, कुणालाही घाबरणार नाहीत: महापौर किशोरी पेडणेकर https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mayor-kishori-pednekar-su… ह्यात धर्माचा काय संबंध?

पोषण आहाराचा 281 पोते तांदूळ नाशिकमध्ये जप्त; टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रताप महिला बचत गटामुळे उघड https://www.tv9marathi.com/crime/281-bags-of-nutritious-rice-seized-in-… नाशिकमधील 13 कंत्राटदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. मात्र, ही कारवाई मागे घेण्यासाठी काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी जोर लावला होता. सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक घेतली. आमदारांच्या या भूमिकेमुळे महिला बचत गटांमध्ये तीव्र असंतोष आहे. ह्या राजवटीत नक्की काय चालले आहे?

ईडीच्या धाडींवर मुख्यमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “जणूकाही महाराष्ट्र देशातला सगळ्यात सडका…”! https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-uddhav-thackeray-targets-… साधू हत्याकांड ते नाशिक मधले तांदूळ घोटाळा प्रकरण, हे बघता, माझ्या सारख्या सर्वसामान्य जनतेला, असेच वाटते.... कर नाही त्याला डर कशाला?

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींशी साधला संवाद; पाठिंब्याचे केले आवाहन https://www.loksatta.com/desh-videsh/russia-ukraine-war-live-updates-uk… यूक्रेन बेबरवशी आहे ... चीनने आणि पाकिस्तानने देखील, उपकाराची फेड अपकारानेच केली आहे... आणि मदत करायचचीच असेल तर, आत्ताच दामदुप्पट भावाने वसुली करणे योग्य... हा देश आधी देखील भारताच्या विरोधात होता आणि नंतर देखील फिरणार ..

In reply to by कॉमी

थोडी माहिती घ्या नाही मिळाली तर सांगा .. मी नक्कीच देईन युक्रेनने आपल्याला, युरोनियम दिलेले नाही, हा पण त्यातलाच एक मुद्दा ...

In reply to by मुक्त विहारि

तो मुद्दा नव्हता, युक्रेनने भारताला मदत केली नाहीचे. दामदुप्पट घेणे म्हणजे काय घ्यायचे ? आणि इतक्या वेळ भारत रशियाच्या विरोधात का बोलत नाहीये (अमेरिका आणि युरोपचे प्रेशर असूनही) यावर तुम्ही विचार करा!

In reply to by कॉमी

*मदत करायचीच असेल तर .....* खनिज संपत्तीत वाटा, सरकारी कंत्राटे, इत्यादी मार्गाने, वसुली करायची...

In reply to by मुक्त विहारि

मदत करू शकणार नाही हे न समजायला युक्रेन चे राष्ट्र अध्यक्ष अंध भक्त आहेत काय. विहिरी च काय च्या काय असते.

“युक्रेनमधील भारतीयांना काहीही होणार नाही”, रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा मोदींना शब्द https://www.loksatta.com/desh-videsh/russian-president-putin-assure-saf… ह्या केंद्र सरकारवर माझा तरी विश्र्वास आहे ... अर्थात, अशा यशाचे श्रेय घेणारे खूप जण निघतील...

In reply to by मुक्त विहारि

ह्या केंद्र सरकारवर माझा तरी विश्र्वास आहे ... कोरोनानिधी कुठे गेला?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कारण, मला आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तींना, करोनाची लस फुकट मिळाली....

हल्ली ठराविक लोक कशावर पण आणि कोणावर पण विश्वास ठेवत आहेत.देव त्यांचे भले करो.

आज बघितले. भारताचा तिरंगा इमारतीवर लावला असेल तर रशिया त्या वर हल्ला करत नाही बस च्या पुढे तिरंगा लावला असेल तर युक्रेन आणि रशिया दोन्ही देशाचे सैनिक ती बस चेक करत नाहीत. प्रवासी लोकांची कागद पत्र,त्यांची लोक बघत नाहीत त्यांनी सैन्याचा dasta सुरक्षा पुरवतो. कारण मोदी नी दोन्ही देशांना दम दिला आहे. हे असले विचित्र,बिनडोक ,व्हॉट्स ॲप फॉरवर्ड भक्त virul करत आहेत. आणि भक्त त्यावर विश्वास ठेवून पुढे ढकलत आहेत अशी बिनडोक प्रजा जर भारतात असेल तर नेपाल पण भारतावर हजारो वर्ष राज्य करेल. फक्त त्यांनी एकदा प्रयत्न केला पाहिजे

In reply to by sunil kachure

प्रत्येकवेळा सत्यपरिस्थिती नक्की काय आहे हे ते तपासून न बघता असले काही लिहिलेच पाहिजे का? https://www.ndtv.com/education/print-indian-flag-paste-on-vehicles-emba… ही एन.डी.टी.व्ही ने दिलेली बातमी आहे म्हणजे ती चुकीची नसावी. अजून एक- किव्हमधील भारतीय दूतावासाने पुढील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात झेंड्याचा स्पष्ट उल्लेख आहे. जमल्यास वाचा आणि ते न समजल्यास पुढील ट्विटमधील नुसते फोटो बघितले तरी चालतील. त्यात जे काही दिसत आहे त्याला भारताचा झेंडा म्हणतात असे मला पामराला तरी वाटते. अर्थात तुमच्यासारख्या अंधगुलामांना * असले काही करू नका असे मी तरी अजिबात म्हणणार नाही. असलेच प्रकार अजून करा. सत्य परिस्थिती काय आहे हे समजून यायला वेळ लागत नाही आणि ते समजल्यावर आणखी काही मते आमच्या बाजूला वळतीलच. *: अंधगुलाम वगैरे शब्द वापरायला आवडले नसते पण या महाशयांनी अंधभक्त असे म्हटले आहे त्यामुळे त्यांना समजेल अशाच भाषेत उत्तर दिले तरी त्याने फार काही बिघडू नये.

शेतकर्‍यांना दिवसातून १० तास वीज मिळायला हवी म्हणून शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे. मोदी सरकार कसा शेतकर्‍यांवर अन्याय करत आहे हे लिहिण्यापूर्वी ते ठिकाण कुठचे आहे हे आधी बघा. या आंदोलनात संतप्त शेतकर्‍यांनी सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील महावितरणचे कार्यालय जाळले आहे. मागच्या शेतकरी आंदोलनाच्या वेळेस शेतकर्‍यांचे अन्नदाता वगैरे म्हणत तोंड फाटेस्तोपर्यंत कौतुक करणारे लिब्बू विचारवंत कुठे आहेत आता? की शिवसेना या नवसेक्युलर पक्षाने चालविलेल्या सरकारविरोधात हे आंदोलन असल्याने या आंदोलनाची दखल घेतली जाणार नाही?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

देशात विविध आर्थिक स्तरातील लोक अशें. जसे विविध भाषिक आहेत तस विविध आर्थिक स्तरावरील लोक आहेत हे भाषिक लोक देशात नकोत ह्या आर्थिक स्तरातील लोक देशात नको.. हे bjp मूर्ख उजवे ह्यांनी जाहीर करावे.सर्व बाहेर पडतील देशातून शेतकरी समाजाच्या अडचणी आहेत खूप प्रश्न आहेत ते सोडवणे राज्य करते म्हणून bjp चे कर्तव्य आहे.त्यांची कुवत नसेल तर ..त्यांना घृणा वाटत असेल तर सराव bjp आणि मूर्ख उजवे ह्यांनी त्यांना न आवडणाऱ्या लोकांना देश सोडायला सांगावे ..ते त्यांच्या भू भागात सहित वेगळे होतील उजव्या फालतू भारतात राहण्या साठी ते बिलकुल ustuk नाहीत

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवायला स्पाईसजेट बुखारेस्ट आणि बुडापेस्टसाठी विशेष विमाने चालवणार आहे. युक्रेनची हवाई हद्द बंद असल्याने किव्हला विमाने जाऊ शकत नाहीत. स्पाईसजेटने ऑगस्टमध्ये काबूलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवायला पण विमाने पाठवली होती. बाकी काही नाही तरी सरकारी मालकीची विमानकंपनी नसेल तर अशाप्रसंगी परदेशात अडकलेल्या भारतीयांना वाचवता येणार नाही असे कोणीतरी म्हणत होते ना? मिपावरच वाचल्याचे आठवते. कोण आहे रे तिथे असे म्हणणारे?