Skip to main content

ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग ४

लेखक निनाद यांनी सोमवार, 21/02/2022 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
सोशल मीडिया पोस्टवरून कर्नाटकमध्ये २६ वर्षीय हिंदू कार्यकर्त्याची हत्या. अभिनेत्री कंगना रणौत आणि रवीना टंडनपासून ते भाजप नेते आणि समाजातील प्रमुख सदस्यांनी हर्षाच्या थंड रक्ताच्या हत्येबद्दल संताप व्यक्त केला आहे. रुपेश कुमारचीही झारखंडमध्ये याच मानसिकतेच्या लोकांनी हत्या केली गेली आहे. भारतात हिंदु असुरक्षित होत चालले आहेत.

वाचने 15982
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

आपल्या अजून काही शंका असतील तर जरूर विचारा .... तुमच्या शंकांचे निरसन करता करता, माझेच ज्ञान वाढत पण जाते आणि आपोआप माझी तारतम्यता पण जोखता येते ...

Bjp वाले विविध गुन्हा अंतर्गत तुरुंगात असणार आहेत. .. भारतात प्रशासन,सरकार,न्यायालय दर्जा हिन आहेत असा निष्कर्ष फक्त जागतिक स्तरावर काढण्याचे बाकी आहे अशी वेळ येवू नये पाकिस्तान उत्तम प्रशासन,न्याय व्यवस्था ,उत्तम सरकार असणारा देश म्हणून नाव कमावलं आणि भारत दलदलीत रुतलेला असेल.

In reply to by sunil kachure

गुन्हा केला असेल तर नक्कीच जायला हवेत.... मग तो कुठल्याही पार्टीचा का असेना? बाय द वे, बीजेपीचे, कुठले नेते तुरूंगात जातील? काही अंदाज? कारण, तुम्हीच वरील वाक्य लिहिले आहे, मग नावे पण द्यायला हरकत नाही ...

In reply to by मदनबाण

भाऊ तोरसेकर म्हणतात त्या प्रमाणे फडणवीस नी लावलेल्या या बॉम्ब ची वात खूप मोठी आहे आणि तो कुठे आणि केव्हा फुटेल हे सांगता येत नाही.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

प्रत्येकाचे मनोरंजनाचे साधन वेगळे, मला चला हवा येऊद्या मधल्या भाऊंचे कार्यक्रम आवडतात.

हिंदू पण मुस्लिम ची कथित भीती बाळगून चुकीचे सरकार निवडून देणार नाहीत भीती चे ,इतिहास घडलेल्या घटनांचे बोजे डोक्यावर न घेता. देशाला योग्य दिशा देणारे सरकार २०२४ नंतर भारतात असेल.

In reply to by sunil kachure

उदारमतवादी हिंदू, बांगलादेश आणि पाकिस्तान मधील अल्पसंख्यांकांचे काय झाले? हे विसरून जातात ... ------- देशाला योग्य दिशा देणारे सरकार २०२४ नंतर भारतात असेल... नक्कीच....

मल्ल्या, मोदी अन् चोक्सीच्या मालमत्ता जप्तीतून बँकांना मिळाले 18 हजार कोटी https://www.esakal.com/desh/banks-received-18000-cr-from-mallya-mehul-a… हे केंद्र सरकार योग्य तो निर्णय नक्कीच घेत आहे ...

Twitter आणि Facebook च्या व्यतिरिक्त खुला, मुक्त आणि प्रामाणिक पर्याय म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ट्विटर आणि फेसबुकला पर्याय म्हणून ट्रुथ सोशल नावाचे अ‍ॅप लॉन्च केले गेले आहे . फेब्रुवारी २०२२ पर्यंत, ट्रुथ सोशल आता आयफोनसाठी उपलब्ध आहे आणि त्याची Android आवृत्ती लवकरच येत आहे. Parler आणि Gettr , Gab हे अजून पर्याय Twitter आणि Facebook ला आहेत.

In reply to by निनाद

माहिती बद्दल धन्यवाद .... ट्विटर असो किंवा फेसबुक किंवा आंतरजालीय कुठलेही सोशल नेटवर्क, ठराविक प्रकारचा अजेंडा राबवण्याची शक्यता जास्त आहे. अर्थात ही दुधारी तलवार आहे. (आपल्या कडे, असे आधीपासूनच आहे, त्यालाच मानसिक गुलामगिरी पत्करणारे घराणेशाहीचे पाईक उर्फ मागुघपा, असे नांव आहे ...)

In reply to by मुक्त विहारि

खरंय! पण ट्विटरचा सतत डावा(च) अजेंडा पाहून कंटाळा आल्यावर दुसरी किंवा तिसरी किंवा पाचवी बाजू पण पाहता येईल इतकेच!

In reply to by निनाद

तारतम्य असलेला माणूस, नाण्याची एकच बाजू, कधीच बघत नाही.. व्यक्ति तितक्या प्रकृती असतात आणि एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात. हे पटले की, एखाद्या गोष्टीचे आकलन करायला सोपे जाते....

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था- इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली निबाब खानला अटक करण्यात आली आहे. खान 2015 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता, जिथे तो ISI हँडलरच्या संपर्कात आला होता आणि त्याला १५ दिवसांचे प्रशिक्षण आणि दहा हजार रुपये देण्यात आले होते. भारतात परतल्यावर निबाब खानने आयएसआयसाठी हेरगिरी करण्यास सुरुवात केली. भारतीय लष्कराच्या स्थानिक हालचालींशी संबंधित माहिती सोशल मीडियाद्वारे निबाब खान त्याच्या हँडलरला देत होता.
  1. नोव्हेंबर मध्ये ही राजस्थानमधून तीन संशयित पाकिस्तानी हेरांना अटक झाली आहे. त्या आधी झुंझुनू मध्ये एका हेराला अटक झाली. त्याच सुमारास जयपूर मध्ये हेर पकडला.
  2. सप्टेंबरमध्ये आयएसआयला माहिती देणाऱ्या राजस्थानमधील गुप्तहेरला बेंगळुरूमध्ये अटक झाली होती.
  3. राजस्थानमध्ये अटक करण्यात आलेल्या भारतीय लष्कराची माहिती गोळा करण्यासाठी पाक हेराला काम दिले होते.
  4. जुलै मध्ये भारतीय लष्कराला भाजीपाला पुरवणार्‍या हबीब खान ला अटक करण्यात आली.
  5. मार्च २०१९ मध्ये राजस्थानच्या जैसलमेरमध्ये राहणाऱ्याला पाकिस्तानसाठी हेर म्हणून काम केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आरोपी पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या एजंटच्या संपर्कात आला होता, ज्याने त्याला भारतीय सैन्याच्या हालचालींबद्दल माहिती कशी गोळा करायची आणि कशी शेअर करायची याचे प्रशिक्षण दिले होते.
  6. इस्लामुद्दीन नावाच्या हेराला २०१६ मध्ये अटक झाली.
असे अजून किती हेर असतील? म्हणजे पाकिस्तान दिवाळखोर झालेला नाही. आय एस आय कडे अजूनही मजबूत पैसा आहे. हा पैसा ते भारतात हेरगिरी करण्यासाठी खर्च करत आहेत.

In reply to by मुक्त विहारि

भारताला फंदफितुरी नवी नाही ...
जगभरात कोणत्याही काळात, कोणत्याही भूप्रदेशाला वा मानवसमूहाला फंदफितुरी नवी नाही; (हिंदूंच्या) भारताला single out करण्याची गरज नाही.

In reply to by Trump

पाकिस्तानी आय एस आय मधुन किती हेर फुटुन, भारताला मदत केली आहे?
भारत, अमेरिका वगैरे देशांनी पाकिस्तानी भूमीवर केलेली operations उगाच यशस्वी झाली का?

In reply to by Trump

उदाहरणे द्या, आय एस आय हेर फुटुन भारताला मदत केल्याची.
मी केलेल्या विधानाची ढीगभर उदाहरणे जालावर विखुरलेली आहेत; बाकी I don't feed trolls.

In reply to by वामन देशमुख

धन्यवाद. कोणतीही न उदाहरणे दिल्याबद्दल. वेळ भेटला तर हे पुस्तक वाचा. The Spy Chronicles: RAW, ISI and the Illusion of Peace https://en.wikipedia.org/wiki/The_Spy_Chronicles येथे कोणता प्रतिवाद अपेक्षित आहे?
बाकी I don't feed trolls.

In reply to by Trump

येथे कोणता प्रतिवाद अपेक्षित आहे?
जगभरात कोणत्याही काळात, कोणत्याही भूप्रदेशाला वा मानवसमूहाला फंदफितुरी नवी नाही.

In reply to by निनाद

पाकिस्तानमधल्या आपल्या डीप ॲसेटची मोरारजीभई व गुजराल यांनी वाट लावली होती. पर्रिकरांचं त्या प्रकारचे बोल खूप गाजले होते. यात राजकारण न आणता विचार केला पाहिजे. यानंतर ते डीप ॲसेट निर्माण करायची प्रक्रीया सुरू झाली. यासाठी डोवाल यांच्यापेक्षा आणखी सक्षम कोण बरे असू शकेल? डोवालांना दिलेले अधिकार, त्यांचे देशप्रेम, त्यांचा फिटनेस वगैरे पाहता त्यांनी ते काम उत्तम रितीने केलेले असणार यात मला तरी शंका नाही. तसेच याचे पुरावे ते ठेवणे शक्य नाही. त्यापासून प्सिध्दी मिळावी असा विचारही त्यांच्या मनाल शिवणार नाही. कारण प्रत्येक गुप्तचरांचीती मानसिकता असते. मात्र आपण परिणामातून हे यश पाहू शकतो. आपल्यातले घरभेदी सापडणे. अतिरेक्याच्या कारवाया कमी होणे किंवा ते मारले जाणे. पाकच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आगाऊ अंदाज आल्याने तिथेही पाकिस्तानला नामोहरम करता येणे. राहता राहिला आपल्यातला घरभेद्यांचा प्रश्न. हा प्रश्न सर्वांनाच भेडसावत असतो. फक्त त्याचा उपयोग करण्यातली कुशलता ज्याची जास्त त्याला जास्त फायदा होतो. आणखी एक मुद्दा असा की, पाकिस्तानातील अनागोंदीची अवस्थापाहता,हे घरभेदी आपल्याला पाकिस्तानात जास्त मिळू शकतात. ही आपली जमेची बाजू आहे.

In reply to by शाम भागवत

कोणतेही भारतीय हेर पकडले जात नाहीयेत - हाच खरा पंचम आहे. संरक्षण आणि हेरखाते यशस्वी असण्याची व्याख्या हीच आहे की ते आणि त्यांचे ऑपरेटिव्ज कधीही पकडले जात नाहीत. २००८ मध्ये पाकी हँडलर्स पकडले गेले नाहीत - तेव्हा ते यशस्वी होते असे म्हणावे लागेल. पण असे हँडलर्स आहेत, हे भारताला उघडपणे कळले येथे ते अयश्स्वी झाले. आणि नंतर ते हँडलर्स गायब पण झाले यात भारताचे कुठे तरी यश असणार! हेरगिरी मध्ये एखाद्या देशाबद्दल असलेली शांतता हीच धोकादायक असते चीनी हेरांविषयी भरतात किंवा भारतीय मिडिया मध्ये फार कमी ऐकू येते - हा खरा धोका आहे!

In reply to by निनाद

डॉ आंबेडकर यांनी लिहुन ठेवलेले आहे कि इस्लाम धर्म हा प्रथम धर्माशी आणि नंतर राष्ट्राशी निष्ठा ठेवायला भाग पाडतो. धर्म सोडायला सांगितल्याबद्दल आयसिसच्या एका दहशतवाद्याने आपल्याच आईला सर्वांदेखत ठार मारले Islamic State militant 'executes own mother' in Raqqa https://www.bbc.com/news/world-middle-east-35260475#:~:text=An%20Islami…. धर्माच्या नावाखाली भारतात विशेषतः काश्मीर मध्ये असंख्य मुसलमान तरुणांना आय एस आय ने फूस लावली आणि भारतविरोधी कारवाया करवल्या. अशा तर्हेचा धर्माचा आधार भारताला पाकिस्तानात घेता येत नाही. कारण एकतर आपण धर्मनिरपेक्ष देश आहोत, पाकिस्तानात हिंदू लोक राहिलेच किती आहेत आणि धर्माच्या नावाखाली हिंदू तरुणांचे डोके भडकावणे तितके सोपे नाही. कारण मदरशात जसे केवळ धार्मिक शिक्षण आणि काफिर लोकांचे डोके उडवण्याची कुराण ची शिकवण मिळते तशा धार्मिक शाळा जगात कुठेच नाहीत. मदरशात शिकलेल्या ज्ञानाचा व्यावहारिक जगात काहीच फायदा होत नाही म्हणून या शिक्षणाचा तरुणांना नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी काहीच फायदा होत नाही. अशी भडकलेली माथी असणारे बेरोजगार तरुण धर्माच्या नावाखाली पैसे देऊन हेरगिरी करण्यासाठी तयार करणे हे फार सोपे आहे. याचाच आय एस आय फायदा उठवते. यासाठीच मदरशातील धार्मिक शिक्षण बंद करून तेथे आधुनिक शिक्षण देणे आवश्यक ठरते

In reply to by सुबोध खरे

बरोबर. अगदी उच्चशिक्षित मुसलमानही एकही वाईट शब्द कुराणविषयी, इस्लामविषयी बोलणार नाही, लिहीणारही नाही. किंबहना इस्लामच्या व्याख्यानुसार तो / ती मुसलामान असणारच नाही.

रशिया- युक्रेन युध्द पेटले. ह्या तिघाडी सरकारच्या काळात आणखी काय काय पहावे लागनार?? - तेच आपले विहारी : )

In reply to by अमरेंद्र बाहुबली

साधे दाऊद इब्राहीमला पकडून आणू शकत नाहीत, ते पुतिनच्या काय मागे लागणार? भिंद्रनवालेने दम दिला तरी इथल्या काही लोकांना, इंदिरा गांधी यांचे पाय पकडायला लागले होते... असो, ह्या राजवटीत मारहाण होणार ती फक्त सर्वसामान्य जनतेला.

तिघेडी सरकार कारणीभूत . हे फक्त भक्त वीहरी च म्हणू शकतात. देशाच्या विकासात कोणत्या पक्षाचे किती कार्य आहे अगदी शाळा,कॉलेज,कारखाने,मेडिकल कॉलेज,सिंचन व्यवस्था,एअर पोर्ट,जात निर्मूलन, संशोधन,आधुनिकता,सुपर कॉम्प्युटर, अणू ऊर्जा, विद्युतीकरण, एक्सपोर्ट साठी सुविधा,कमजोर वर्ग साठी योजना अशा अनेक क्षेत्रात. राजकीय पक्ष नुसार वर्ग वरी करा. Bjp कुठेच नसेल

मोहित कंबोज यांना तलवार नाचवणं पडलं महागात, पोलिसांकडून गुन्हा दाखल... https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mohit-kamboj-shows… गुन्हा केला असेल तर, नक्कीच कायदेशीर मार्गाने कारवाई केली पाहिजे... "मागुघपा" नसल्याने, मी कुणाचाही वैचारिक गुलाम नाही...

'टिपू सुलतान'चा वाद पुन्हा पेटणार?; आता शिवसेनेने केली 'ही' मागणी https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/row-between-sena-c… शिवसेनेने, असेच हिंदू हितवादी निर्णय घ्यायला हवेत.... आमच्या सारखी जुनी लोकं, परत शिशसेनेत नक्कीच येतील...

देशमुख-मलिकांनंतर आता कोणाचा नंबर? किरीट सोमय्या म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे…” https://www.loksatta.com/mumbai/kirit-somaiya-answer-who-will-be-next-l… सोमय्यांनी जाहीर केलेल्या ‘डर्टी डझन’ मधली नावे ... १. अनिल देशमुख २. नवाब मलिक ३. अनिल परब ४. संजय राऊत ५. सुजित पाटकर ६. भावना गवळी ७. आनंद आडसुळ ८. अजित पवार ९. हसन मुश्रीफ १०. प्रताप सरनाईक ११. रविंद्र वायकर १२. जितेंद्र आव्हाड --------- किरीट सोमैय्या, योग्य ते पुरावे सादर करतील, अशी अपेक्षा आहे...

श्री इम्रान खान सध्या रशियामध्ये आहेत. रशिया आणि युरोपियन यांच्यामध्ये युध्द पेटलेले असताना तिकडे ज्यायचा हेतु समजत नाही. उगाचच अमेरीकन पुरस्कृत समुहाला कायमस्वरुपी सोडणे असे प्रकार चालु आहेत असे दिसते. Energy cooperation in focus during PM Imran's meeting with Russian President Putin https://www.dawn.com/news/1676820/energy-cooperation-in-focus-during-pm…

In reply to by Trump

अमेरिका का कडून मदत मिळवत असतो. त्याच वेळी चीन कडून सुद्धा मदत मिळवत असतो. इराक युद्धात अमेरिकेला मदत पण केली आणि दुसऱ्या बाजू नी तालिबान ची पण पाठ राखण केली आता रशिया भारताचा मित्र असला तरी पाकिस्तान रशिया कडून पण काही तरी मिळवलं च.

In reply to by Trump

रशिया व अमेरिका हे स्वार्थी आहेत व ते फक्त त्यांचे उद्दीष्ट्य पूर्ण करत आहेत असे वाटते. मला वाटते की युक्रेनच्या शरणागतीनंतर अमेरिका व रशिया दोधेही विनविन सिच्युएशन मधे असणार आहेत. युक्रेनचं काहीही होवो. नविन पाईपलाईन सुरू झाली नाही पाहिजे हे उद्दीष्ट आहे अमेरिकेचे. ते साध्य झालंय. जर्मनीने नविन पाईपलाईनचा वापर सुरू करण्याची वेळ बेमुदत पुढे ठकललीय. पुतिनला पूर्विचा रशिया परत उभा करायचाय. तो एकेक प्रांत परत मिळवतोय. अमेरिका व रशिया दोघेही खूष. अमेरिका जरा जास्तच खूष. एवितेवी युक्रेन रशियाच्या घशात जाणारच होता. तर मग चांगल्या स्थितील युक्रेन ऐवजी खराब स्थितीतला युक्रेन गेला तर आणखीन बरं. त्यासाठी त्याच्या मागे असल्याचे दाखवून त्याला लढाईला प्रवृत्त करणे आवश्क होते. ते अमेरिकेला नक्की जमलेलं आहे. शिवाय युक्रेनिअन लोकं रशियनांविरूध्द आता आणखीनच संतापलेली असणार. त्यामुळे युक्रेन ताब्यात ठेवण्याची रशियाची किंमतही जास्त असणार. युध्दात जेवढी रशियाची हानी होईल तो अमेरिकेचा बोनस. ;) मधल्यामधे पाकिस्तानचा मामा बनणार आहे. रशियाचा भेटीची जबरदस्त किंमत अमेरिका पाकिस्तानकडून वळती करणार असं दिसतंय. ग्रे लिस्टमधे जातोय की काय? दोन बैलांच्या झुंझीत हे बारकूस पिल्लू कशाला मधे गेलं कुणास ठाऊक? तैवान बाबतचा रशियाचा पाठिंबा ही एक खेळी आहे हे न कळण्या इतपत चीन मूर्ख नक्कीच नाही. पण या गुगलीला इम्रानसाहेब गंडले की काय? :)

In reply to by शाम भागवत

पाकिस्तान आधीच करड्या यादीत आहे. तुम्हाला दुसरी कोणती यादी म्हणायची आहे का?
ग्रे लिस्टमधे जातोय की काय?
https://www.wionews.com/south-asia/pakistan-looks-to-exit-the-grey-list…

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे | वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे || कवी वाल्मीकीसारिखा श्रेष्ठ ऐसा |नमस्कार माझा सदगुरू रामदासा ||

In reply to by मदनबाण

उगीच गैरसमज पसरवू नका. कोर्टाने अजून नवाब मलिकांना दोषी ठरविले आहे का?

तपास यंत्रणा महापालिकेच्या शिपायांवर धाड टाकतील; संजय राऊत यांची उपरोधिक टीका https://marathi.abplive.com/news/mumbai/sanjay-raut-on-income-tax-raid-… अफरातफर केली असेल तर नक्कीच ... ह्या केंद्र सरकारवर माझा तरी विश्र्वास आहे ....

“नवाब मलिक जेलमध्ये आहेत, मग अजित पवार बाहेर कसे?” असदुद्दीन ओवैसींचा सवाल! https://www.loksatta.com/maharashtra/mim-chief-asadussin-owaisi-targets… आता ह्याला कुणी धार्मिक रंग देणार का? की घरचा आहेर समजणार? की हे पण भाजपचेच कारस्थान असे म्हणायचे?

लवासा प्रकल्पाबाबत पवार कुटुंबियांवरील आरोपात तथ्य, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निकाल https://www.loksatta.com/mumbai/mumbai-high-court-judgement-on-allegati… मुंबई उच्च न्यायालयात लवासा प्रकल्पाविरोधात याचिका दाखल होती. या याचिकेत पवार कुटुंबावर गंभीर आरोप करण्यात आले होते. याची सुनावणी पूर्ण करत न्यायालयाने लवासा प्रकल्पासाठी कायद्यात केलेली दुरुस्ती योग्य असल्याचं म्हटलं. परंतु पवार कुटुंबियांनी प्रकल्प अजित गुलाबाचंद यांना मिळावा यासाठी प्रयत्न केल्याच्या आरोपांत तथ्य असल्याचेही महत्त्वपूर्ण निरिक्षण निकाल देताना नोंदवले. असे असले तरी प्रकल्प झाला असून आणि त्याविरोधातील याचिका खूपच विलंबाने दाखल करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच लवासा प्रकल्पाविरोधातील ही याचिका निकाली काढली. ------- “पर्यटन हा उद्योगाचाच भाग असल्याचे धोरण लवासानिमित्ताने तयार करण्यात आलेले नाही वा कोणासाठी तरी त्यादृष्टीने कायद्यात दुरूस्तीही करण्यात आलेली नाही. तर याबाबतचे धोरण ९०च्या दशकापासूनच अस्तित्त्वात होते. फक्त ते धोरण व शासननिर्णयाच्या पातळीवर होते आणि त्याअनुषंगानेच काही प्रकल्पांना परवानगी देण्यात आली होती. याच कारणास्तव २००५ मध्ये वटहुकुमाद्वरे संबंधित कायद्यात दुरूस्ती करून ती पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्यात आला,” असा दावा राज्य सरकारने केला होता. ही दुरूस्ती उच्च न्यायालयाने आज योग्य ठरवली...... ----- शरद पवार यांनी कायद्याचे पालन केले आहे, असेच वाटते...

तीन महिने पगार नाही, घर कसं चालवणार' ST कर्मचाऱ्याने संपवलं जीवन https://zeenews.india.com/marathi/maharashtra/st-strike-in-maharashtra-… ------- ह्या राजवटीत नक्की काय चालले आहे?

आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल; धारदार शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न https://www.tv9marathi.com/maharashtra/beed/fir-lodge-against-mla-sande… https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0… हे आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत, कदाचित म्हणूनच, केंद्र सरकारने हे षडयंत्र रचले असावे, असेही काही लोकांना वाटण्याची शक्यता जास्त आहे...

यशवंत जाधव भीमपुत्र, कुणालाही घाबरणार नाहीत: महापौर किशोरी पेडणेकर https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mayor-kishori-pednekar-su… ह्यात धर्माचा काय संबंध?