Skip to main content

नवीन फसवणुकीचा प्रकार

लेखक कासव यांनी रविवार, 30/01/2022 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व नावे बदलली आहेत. दोन्ही प्रसंग खरे आहेत ------ प्रसंग १ राजेश ला एका दुपारी अचानक WhatsApp विडिओ कॉल येतो. नंबर त्याच्या मोबाईल मध्ये सेव नसतो तरी तो फोन घेतो. पलीकडून एका मुलीचा आवाज पण काळी स्क्रीन. काही दिसत नाही. राजेश तिला ओळखत नाही पण ती त्याला म्हणते ओळख. एवढ्या लवकर विसरलास ना. २ ते ३ मिनिटे असेच होते आणि शेवटी ती wrong नंबर सांगून फोन कट करते. १० मिनिटांनी एक मेसेज येतो. राजेश मोबाईल उघडतो आणि जागीच खिळून बसतो. मेसेज मध्ये एक व्हिडिओ असतो त्यात त्याचीच एक ब्लू फिल्म असते. त्याला कळते की आत्ता जो कॉल आला होता त्यातून काही क्लिप वापरून हा व्हिडिओ बनवला आहे. नंतर २ मिनिटांनी त्याला साधा कॉल येतो. त्यात एक पुरुष बोलत आहे. तो म्हणतो की तुझा हा व्हिडिओ मी सोशल करणार. तुझी माझी काही दुश्मन नाही पण मला पैसे हवेत. ५००० रुपये. ते ही आत्ताच दिले तर. नाहीतर दर तासाला ते दुप्पट होणार. २४ तासात पैसे नाही दिले तर हे सोशल होणार. आणि पोलिसांना सांगितले तर लगेचच. राजेश घाबरतो पण तो त्याच्या एका मित्राशी बोलतो आणि ते पैसे द्यायला तयार होतात. आता तो व्यक्ती पैसे बिटकॉइन मध्ये मागतो. आली आता पंचीअत. राजेश ला बितकॉइन बदल काही माहिती नाही. मग तो अजून एकाला फोन करतो. त्या मित्राकडून त्याने बिटकॉईन बदल ऐकलं असतं. तो मित्र त्याला पोलिसाला गाठण्याचा सल्ला देतो. आणि काही घाबरून होणार नाही पैसे तर द्यायचेच नाहीत असे सांगतो. धीर करून हे लोक पोलिस स्टेशन गाठतात. पोलिस म्हणतात हे नेहमीच झालं आहे. Fir करू पण हे आरोपी सापडणार नाहीत. तुमची सोशल अकाउंट बंद करा किंवा सगळे सेक्युरिटी सेटिंग चेक करा. सर्व अनोळखी माणसे ताबडतोब फ्रेंड लिस्ट मधून हटवा. आणि त्या माणसाचा परत फोन आला तर पैसे देत नाही काय करायचंय ते कर म्हना. राजेश ला परत फोन येतो. आणि राजेश पैसे देणार नाही असे सांगतो. तो माणूस खूप घाबरवत असतो तरी. राजेश परत पोलिस ना सांगतो आणि पोलिस त्याला कोणताच unknown नंबर चा फोन उचलू नको म्हणून सांगतात. ४-५ दिवस खूप फोन येतात पण हा व्हिडिओ काही शेअर होत नाही. आणि हळू हळू सगळे कॉल पण बंद होतात. --- प्रसंग २ विलास सकाळी सरकारी दवाखान्यातून COVID chi लस घेऊन येतो. साधारण संध्याकाळी त्याला एक कॉल येतो. पलीकडून आवाज येतो की मी हॉस्पिटल मधून बोलतोय आणि तुम्ही आज लस घेतली का. विलास हो म्हणतो. तो माणूस म्हणतो की तुमचं आधार कार्ड वर लसीच डिटेल अपलोड होत नाहीयेत. तर आधार नंबर परत नीट सांगा आणि एक OTP येईल तो पण सांगा. विलास सावध होतो. तो म्हणतो मी हॉस्पिटल मध्ये येतो आणि काय असेल ते तिथे पाहू. तो माणूस गयावया करतो की ह्यात खूप वेळ जाईल. त्याचे डिटेल अपलोड होत नाही तो पर्यंत पुढच्या लोकांचे पण डिटेल टाकता येत नाहीत. सॉफ्टवेअर थांबलं आहे. त्याला अजून ४२ लोकांचे डिटेल टाकायचे आहेत. आणि त्याची आई घरी आजारी आहे त्याला सगळी काम संपून पटकन घरी जायचे आहे. तरी विलास तयार होत नाही. मग तो माणूस काही ओळखी ची नावे सांगायला लागतो. ह्यांना मी माहित आहे तुम्ही त्यांना विचारा पण आत्ता मला मदत करून घरी जाऊ द्या. विलास तरी ऐकत नाही म्हणल्या वर तो थोडा चिडून बोलायला लागतो आणि सारखं आईच कारण देत बसतो. नंतर तर तो शिव्या पण द्यायला लागतो. दरम्यान विलास कॉल चालू असतानाच हॉस्पिटल मध्ये पोचतो तर तिथे अशी कोणतीच व्यक्ती नसते. सगळे लोक आपापले काम संपवून निघ्यच्या तयारीत असतात. तिथले अधिकारी विलास ला शाबासकी देऊन पोलिस स्टेशन ला घेऊन जातात. ते तिथे रीतसर तक्रार करतात. -- दोन्ही प्रसंगात माझे मित्र वाचले कारण एक जनाने मित्राचा सल्ला घ्यायचं ठरवलं आणि एक जण स्वतःच अलर्ट होता. पण अश्या लोकांचे कॉल खूपच खरे वाटतात. अगदी भाषेचा tone वगैरे आपल्याच भागातला वाटतो एवढे ते सराईत असतात. म्हाताऱ्या व्यक्ती किंवा अलर्ट नसतील तर कोणीही सहज फसू शकतो. ह्यांची जास्त पैस्याची पण अपेक्षा नसते. दिवसाला ५०००-१०००० मिळाले तरी बास. १० लोकांना ट्राय केले की एखादा तरी गळाला लागत असेल. कदाचित वाढती बेकारी करणी भूत असेल. पण ते जास्त कष्ट पण घेत नाहीत. तुम्ही त्यांना हवे तसे वागत नसाल तर ते जास्त वेळ खर्च न करता दुसरा बकरा शोधतात. सर्वांनी खूप सावध रहा. उपयोग झाला नाही तरी रीतसर तक्रार करा. सोशल मीडिया वर कमीत कमी माहिती द्या. सर्व security सेटिंग चेक करा. हवं तर मित्रांची मदत घ्या. अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. तुमचे मित्र आणि नातेवाईक ह्यांना पण सतर्क करा. अजून काही उपाय किंवा किस्से असतील तर प्रतिक्रिया मध्ये सांगा.

वाचने 24579
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

In reply to by Trump

काय कारवाई केली कोण जाणे अजूनही तसले कॉल येतात पुढे मी विजेचं बिलाचे उधारण दिले तो कॉल हा एक फार सफाईदार फसवणुकीचा प्रकार

In reply to by चौकस२१२

सहज येथे बघितले.
https://www.youtube.com/results?search_query=india+fake+call+centre+bus…
अजूनही तसले कॉल येतात पुढे मी विजेचं बिलाचे उधारण दिले तो कॉल हा एक फार सफाईदार फसवणुकीचा प्रकार
नेहमीप्रमाणे चोर-पोलिसाचा खेळ असावा.

In reply to by चौकस२१२

जमतारा मालिका भारी होती. फसवणुकीचे रॅकेट एका गावातुन कसे चालते, त्यांची यंत्रणा कशी असते, संरक्षण कसे मिळते ई. तपशील भारी दाखवले होते. पाहण्यासारखी मालिका. पाहिली नसल्यास जरूर पहा.

पर्वा तर कहर झाला या फसणूक करणाऱ्यांची डोकी कुठे चालतील इथे साधारण अशी प्रथा आहे कि विजेचे उत्पादन करणारी जरी एकाच संस्ताह असली तरी त्याचे विपणन करणार्या ३-४ कंपन्या असतात आणि तुम्ही त्यांचे कडे "ट्रान्स्फर " व्हा अश्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात आणि त्यासाठी काही ठराविक अर्ज असतात .. हे सगळे ठीक तर यावर बेतलेला एक नवीन फसवणुकीचा प्रकार फोन येतो कि तुम्हाला विजेचं बिलावर पैसे वाचव्यायचे आहेत का ? आपण म्हणतो हा हे ठीक आहे कारण असले असा कोणत्यातरी टाय ३-४ कंपनी चा फोन पण प्रत्यक्षात तसे नसते कारण तसे असते तर फॉर्म भरून पाठवा/ आणि ती कंपनी आपल्याला माहित असते हे "डील "असं scammers will ask unsuspecting customers for copies of their Jacana Energy bills, obtaining their electricity account details in the process. Scammers will then make payments to the customer's Jacana Energy account on their behalf and subsequently ask the customer to pay them a portion of the bill minus an alleged discount. Once the scammers have received the customer's payment, they will dispute their own payment made to Jacana Energy and get the payment reversed through their financial institution. This will leave the customer's Jacana Energy account outstanding and the customer potentially defrauded of a large sum of money.

कसा चालतो हे लोकांना माहीत आहे म्हणजे बँका आणि सरकार ह्यांना माहीत असणारच. १) kyc च्या नावाखाली आणि अकाउंट बंद होईल अशी भीती दाखवून अकाउंट ची माहिती मिळवून फसवणूक. २) लॉटरी लागली आहे खूप मोठ्या रक्कमेची अशी लालुच दाखवून फसवणूक. ३) क्रेडिट कार्ड, विसा कार्ड ह्यांचे पासवर्ड मिळवून फसवणूक. असे अनेक मार्गाने फसवणूक होते... फुकट मिळणाऱ्या पैशाच्या हव्यासपोटी स्वतःच फासणारी लोक . ह्यांना कोणी जबाबदार नाही त्याला ती लोक च जबाबदार आहेत. पण बाकी प्रकारात जी फसवणूक होते.ह्याला बँका आणि सरकार पण जबाबदार आहे. आपल्या ग्राहकांची सायबर security करणे हे बँका चे कर्तव्य च आहे. त्याच्या कडूनच वसुली केली पाहिजे.सरकारी यंत्रणा आध्यावत नसल्या मुळे त्यांना तांत्रिक काही कळत नाही. त्या मध्ये सरकार नी बदल केला पाहिजेत

एक दीड वर्षापूर्वीची गोष्ट . माझा मित्र घरी आला तेव्हा त्याचा चेहरा काळजीयुक्त दिसत होता . कारण विचारल्यावर म्हणाला नातवाचे प्रताप !! जरा सविस्तर सांगितलेस तर मलाही बरे वाटेल असे म्हणालो तेव्हा म्हणाला दोन दिवसापूर्वी ४००० ला टोला बसलाय. आता आणखी कितीवेळा हा बसणार या चिंतेने झोप उडाली आहे. मामला गंभीर आहे हे लक्षात आले.थोडा वेळ गेल्यावर सांगू लागला दोन दिवसापूर्वी नातवाचा PC बंदच होईना .एक नोटीस स्क्रीनवर दिसत होती . बेकायदेशीर PORN साईट्स बघितल्याबद्दल pc बंद करण्यात आला आहे. शेजारील फोटो स्कॅन करून ४००० रुपये भरल्यावर pc वापरता येईल. नातू घाबरला .पैसे भरणे त्याला शक्य नव्हते.आई वडिलांना सांगण्या इतके धैर्य नव्हते. मुकाट्याने आजोबाकडे आला. आजोबांनी म्हणजे माझ्या मित्राने पैसे भरले. नोटीस कशी दिसत होती असे विचारल्यावर म्हणाला मी काय मूर्ख आहे का ? मी नोटीस नीट पाहिली.अरे त्यांनी कोणत्या कलमाखाली हा गुन्हा आहे तेही लिहिले होते. माझा अनेक वर्षाचा अनुभव सांगत होता कि मित्राने खरोखरच मूर्खपणा केला आहे. आता त्याची भीती कशी घालवावी याचा मी विचार करू लागलो.आणि एक दिवस मला उपाय सापडला . मी रोज पोर्न साईट उघडू लागलो आणि दुसऱ्या नवीन tab वर माझे काम करू लागलो. साधारण तीन आठवड्याने माझा pc पण lock झाला . मित्राने वर्णन केले तशीच नोटीस स्क्रीनवर दिसत होती ती नोटीस बनावटआहे हे मला समजले. माझ्या mobile वर मी त्या नोटिशीचा फोटो काढला आणि माझ्या वकिलांना whatsapp वर पाठवून तो पाहण्यास फोन करून सांगितले. पाच मिनिटात वकिलांचा फोन आला. या वयात हिरोगिरी करू नका असे कठोर आवाजात सुनावले. ती नोटीस बोगस आहे कि नाही हे विचारल्यावर म्हणाले तेवढे तुम्हाले नक्कीच समजते. पण तुमचा pc ह्याक होण्याचे chancess तुम्ही वाढवून ठेवलेत. आता बँकेचे सर्व password बदला आणि असली हिरोगिरी करू नका. माझ्या मित्राला जेव्हा मी whatsapp वरील फोटो दाखवला आणि वकिलाचा नंबर दाखवला आणि त्यांना जाऊन भेटण्याचा सल्ला दिला तेव्हा तो म्हणाला ४००० रुपये अक्कलखाती जमा झाले.

In reply to by देशपांडे विनायक

पुर्वी येऊन गेलेला मराठी सिनेमा "TC.GN :Take Care Good Night" हा याच विषयावर आहे. याचे आयएमडीबी वर Rating: 7.5/10 असे आहे.

उद्या रोबोट,ड्रायव्हर लेस car,विमानांना दिशा दाखवणारी यंत्र,ह्यांना जर कोणी टार्गेट केले तर केवढे मोठे संकट निर्माण होईल

म्हणजे ऑफिस,रेल्वे स्टेशन,हॉस्पिटल ,कुठलेही जी वायफाय नेटवर्क सार्वजनिक प्रकारे वापरले जाते ते किती सुरक्षित असते. कारण काही महत्वाच्या वेबसाईट अशा सार्वजनिक नेटवर्क वर ओपन होत नाहीत. "तुमचे नेटवर्क सार्वजनिक आहे आणि ते सुरक्षेच्या दृष्टी नी धोकादायक आहे" असा संदेश त्या साईट display करतात. मोबाईल नेटवर्क आणि सार्वजनिक वायफाय नेटवर्क ह्यांच्या मध्ये सुरक्षेच्या दृष्टी नी खरंच फरक असतो का?

लॅपटॉप,मोबाईल ह्यांची स्क्रीन जेव्हा शेअर केली जाते तेव्हा दोन्ही device एकच वायफाय नेटवर्क वर कार्यान्वित असणे गरजेचे असते . तर त्याच permises मध्ये असलेली बाकी संगणकीय यंत्रणा माहिती हॅक करू शकते का? संगणक मधील बिलकुल ज्ञान नसल्या मुळे माझा हा प्रश्न साफ चुकीचा पण असू शकतो.

In reply to by sunil kachure

नाही. ते कोणत्याही नेटवर्कने जोडले गेलेले असले पाहीजेत.
लॅपटॉप,मोबाईल ह्यांची स्क्रीन जेव्हा शेअर केली जाते तेव्हा दोन्ही device एकच वायफाय नेटवर्क वर कार्यान्वित असणे गरजेचे असते .
ते कोणता संगणक हॅक झाला ह्यावर अवलंबुन आहे. जर मुख्य संगणक (सर्वर), नेटवर्क (जर राउटरचा फर्मवेअर) हॅक झाला असेल तर मग अवघड आहे.
लॅपटॉप,मोबाईल ह्यांची स्क्रीन जेव्हा शेअर केली जाते तेव्हा दोन्ही device एकच वायफाय नेटवर्क वर कार्यान्वित असणे गरजेचे असते . तर त्याच permises मध्ये असलेली बाकी संगणकीय यंत्रणा माहिती हॅक करू शकते का?
बाकी छोट्या व्हायरस, मालवेअरची इतकी भिती नसते.

आला. आज मला फोन आला. बायकोने उचलला. माझ्या वडिलांनी म्युच्युअल फंडात ५०००० गुंतवले असून मी नॉमिनी आहे. पण मी घरात नसल्याने नंतर फोन करा असं बायकोने सांगितले आहे. :)

In reply to by शाम भागवत

मुख्य म्हणजे फोन बीएसएनएल च्या लँन्डलाईनला आला. हा नंबर त्यांना कसा मिळाला काही समजत नाही. हैद्राबादहून बोलतोय म्हणे.