सर्व नावे बदलली आहेत. दोन्ही प्रसंग खरे आहेत
------
प्रसंग १
राजेश ला एका दुपारी अचानक WhatsApp विडिओ कॉल येतो. नंबर त्याच्या मोबाईल मध्ये सेव नसतो तरी तो फोन घेतो. पलीकडून एका मुलीचा आवाज पण काळी स्क्रीन. काही दिसत नाही. राजेश तिला ओळखत नाही पण ती त्याला म्हणते ओळख. एवढ्या लवकर विसरलास ना. २ ते ३ मिनिटे असेच होते आणि शेवटी ती wrong नंबर सांगून फोन कट करते.
१० मिनिटांनी एक मेसेज येतो. राजेश मोबाईल उघडतो आणि जागीच खिळून बसतो. मेसेज मध्ये एक व्हिडिओ असतो त्यात त्याचीच एक ब्लू फिल्म असते. त्याला कळते की आत्ता जो कॉल आला होता त्यातून काही क्लिप वापरून हा व्हिडिओ बनवला आहे. नंतर २ मिनिटांनी त्याला साधा कॉल येतो. त्यात एक पुरुष बोलत आहे. तो म्हणतो की तुझा हा व्हिडिओ मी सोशल करणार. तुझी माझी काही दुश्मन नाही पण मला पैसे हवेत. ५००० रुपये. ते ही आत्ताच दिले तर. नाहीतर दर तासाला ते दुप्पट होणार. २४ तासात पैसे नाही दिले तर हे सोशल होणार. आणि पोलिसांना सांगितले तर लगेचच.
राजेश घाबरतो पण तो त्याच्या एका मित्राशी बोलतो आणि ते पैसे द्यायला तयार होतात. आता तो व्यक्ती पैसे बिटकॉइन मध्ये मागतो. आली आता पंचीअत. राजेश ला बितकॉइन बदल काही माहिती नाही. मग तो अजून एकाला फोन करतो. त्या मित्राकडून त्याने बिटकॉईन बदल ऐकलं असतं. तो मित्र त्याला पोलिसाला गाठण्याचा सल्ला देतो. आणि काही घाबरून होणार नाही पैसे तर द्यायचेच नाहीत असे सांगतो. धीर करून हे लोक पोलिस स्टेशन गाठतात. पोलिस म्हणतात हे नेहमीच झालं आहे. Fir करू पण हे आरोपी सापडणार नाहीत. तुमची सोशल अकाउंट बंद करा किंवा सगळे सेक्युरिटी सेटिंग चेक करा. सर्व अनोळखी माणसे ताबडतोब फ्रेंड लिस्ट मधून हटवा. आणि त्या माणसाचा परत फोन आला तर पैसे देत नाही काय करायचंय ते कर म्हना.
राजेश ला परत फोन येतो. आणि राजेश पैसे देणार नाही असे सांगतो. तो माणूस खूप घाबरवत असतो तरी. राजेश परत पोलिस ना सांगतो आणि पोलिस त्याला कोणताच unknown नंबर चा फोन उचलू नको म्हणून सांगतात. ४-५ दिवस खूप फोन येतात पण हा व्हिडिओ काही शेअर होत नाही. आणि हळू हळू सगळे कॉल पण बंद होतात.
---
प्रसंग २
विलास सकाळी सरकारी दवाखान्यातून COVID chi लस घेऊन येतो. साधारण संध्याकाळी त्याला एक कॉल येतो. पलीकडून आवाज येतो की मी हॉस्पिटल मधून बोलतोय आणि तुम्ही आज लस घेतली का. विलास हो म्हणतो. तो माणूस म्हणतो की तुमचं आधार कार्ड वर लसीच डिटेल अपलोड होत नाहीयेत. तर आधार नंबर परत नीट सांगा आणि एक OTP येईल तो पण सांगा. विलास सावध होतो. तो म्हणतो मी हॉस्पिटल मध्ये येतो आणि काय असेल ते तिथे पाहू. तो माणूस गयावया करतो की ह्यात खूप वेळ जाईल. त्याचे डिटेल अपलोड होत नाही तो पर्यंत पुढच्या लोकांचे पण डिटेल टाकता येत नाहीत. सॉफ्टवेअर थांबलं आहे. त्याला अजून ४२ लोकांचे डिटेल टाकायचे आहेत. आणि त्याची आई घरी आजारी आहे त्याला सगळी काम संपून पटकन घरी जायचे आहे. तरी विलास तयार होत नाही. मग तो माणूस काही ओळखी ची नावे सांगायला लागतो. ह्यांना मी माहित आहे तुम्ही त्यांना विचारा पण आत्ता मला मदत करून घरी जाऊ द्या. विलास तरी ऐकत नाही म्हणल्या वर तो थोडा चिडून बोलायला लागतो आणि सारखं आईच कारण देत बसतो. नंतर तर तो शिव्या पण द्यायला लागतो. दरम्यान विलास कॉल चालू असतानाच हॉस्पिटल मध्ये पोचतो तर तिथे अशी कोणतीच व्यक्ती नसते. सगळे लोक आपापले काम संपवून निघ्यच्या तयारीत असतात. तिथले अधिकारी विलास ला शाबासकी देऊन पोलिस स्टेशन ला घेऊन जातात. ते तिथे रीतसर तक्रार करतात.
--
दोन्ही प्रसंगात माझे मित्र वाचले कारण एक जनाने मित्राचा सल्ला घ्यायचं ठरवलं आणि एक जण स्वतःच अलर्ट होता. पण अश्या लोकांचे कॉल खूपच खरे वाटतात. अगदी भाषेचा tone वगैरे आपल्याच भागातला वाटतो एवढे ते सराईत असतात. म्हाताऱ्या व्यक्ती किंवा अलर्ट नसतील तर कोणीही सहज फसू शकतो. ह्यांची जास्त पैस्याची पण अपेक्षा नसते. दिवसाला ५०००-१०००० मिळाले तरी बास. १० लोकांना ट्राय केले की एखादा तरी गळाला लागत असेल. कदाचित वाढती बेकारी करणी भूत असेल. पण ते जास्त कष्ट पण घेत नाहीत. तुम्ही त्यांना हवे तसे वागत नसाल तर ते जास्त वेळ खर्च न करता दुसरा बकरा शोधतात.
सर्वांनी खूप सावध रहा. उपयोग झाला नाही तरी रीतसर तक्रार करा. सोशल मीडिया वर कमीत कमी माहिती द्या. सर्व security सेटिंग चेक करा. हवं तर मित्रांची मदत घ्या. अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. तुमचे मित्र आणि नातेवाईक ह्यांना पण सतर्क करा.
अजून काही उपाय किंवा किस्से असतील तर प्रतिक्रिया मध्ये सांगा.
वर्गीकरण
वाचने
24579
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
प्रतिक्रिया
सोप्पा उपाय
बरोबर आहे पण
In reply to सोप्पा उपाय by प्रसाद गोडबोले
दुसर्या प्रसंगात
In reply to बरोबर आहे पण by कासव
भामट्यांचं कोलॅब्रेशन आणि
In reply to दुसर्या प्रसंगात by तर्कवादी
इथे पहिल्या प्रकारचा फ्रॉड
In reply to बरोबर आहे पण by कासव
+१
In reply to सोप्पा उपाय by प्रसाद गोडबोले
दोन दिवसा पूर्वीच
धन्यवाद
In reply to दोन दिवसा पूर्वीच by sunil kachure
यात नविन
हो बरोबर आहे पण...
In reply to यात नविन by प्रसाद_१९८२
मला एक मेसेज सतत येत असतो तो
दिल्ली कोर्टात समन्स
तिकोना ?
In reply to दिल्ली कोर्टात समन्स by बबन ताम्बे
तुमचा तर्क अगदी बरोबर आहे.
In reply to तिकोना ? by तर्कवादी
:)
In reply to तुमचा तर्क अगदी बरोबर आहे. by बबन ताम्बे
आजचा लोकमत
डेंजर आहे हे !
In reply to आजचा लोकमत by कासव
बापरे!
मेसेज मध्ये एक व्हिडिओ असतो त्यात त्याचीच एक ब्लू फिल्म असते. त्याला कळते की आत्ता जो कॉल आला होता त्यातून काही क्लिप वापरून हा व्हिडिओ बनवला आहे.पण त्याचीच ब्ल्यु फिल्म म्हणजे नक्की कशी फिल्म. कॉल करून त्यातून काही क्लिप वापरून म्हणजे नक्की काय केलं होतं?एफबी वर freind विनंती
In reply to बापरे! by तुर्रमखान
धन्यवाद!
In reply to एफबी वर freind विनंती by sunil kachure
थोडी अधिक माहिती
In reply to धन्यवाद! by तुर्रमखान
युपीए मध्ये गृहमंत्री श्री
In reply to थोडी अधिक माहिती by कासव
आपल्या विचारांत अत्यंत
In reply to युपीए मध्ये गृहमंत्री श्री by Trump
हा प्रतिसाद दुसर्या लेखाच्या
In reply to आपल्या विचारांत अत्यंत by साहना
धन्यवाद!
In reply to थोडी अधिक माहिती by कासव
सगळे क्रमांक मोबाईलमध्ये
In reply to धन्यवाद! by तुर्रमखान
भिती दाखवून पैसे उकळणे
In reply to सगळे क्रमांक मोबाईलमध्ये by Trump
थोडा गैरसमज होतोय...
In reply to सगळे क्रमांक मोबाईलमध्ये by Trump
मारूतीत नौकरी मिळेल असे सांगतात आणि
आगदी सहमत
In reply to मारूतीत नौकरी मिळेल असे सांगतात आणि by मुक्त विहारि
मजबुरीचा फायदा....
In reply to आगदी सहमत by कर्नलतपस्वी
मला २००३ मध्ये नोईडामध्ये
In reply to मारूतीत नौकरी मिळेल असे सांगतात आणि by मुक्त विहारि
एल आय सी
आमचे सासरे वारल्या नंतर, असा फोन आला होता
In reply to एल आय सी by सर्वसाक्षी
1 दाबल्यावर काय होतं?
In reply to एल आय सी by सर्वसाक्षी
Policy mature
गेल्या वर्षी मी हा अनुभव
In reply to Policy mature by sunil kachure
माझा अनुभव
ओरिजनल पॉलिसी,कॅन्सल चेक,आणि
In reply to माझा अनुभव by sunil kachure
टेलिकॉम क्षेत्रात काम करत
अजून काही भर.....
2 महिन्यापूर्वी ओलेक्स वर
अशा केसेस वाचायला मिळाल्या आहेत.
In reply to 2 महिन्यापूर्वी ओलेक्स वर by बोलघेवडा
मी डॉक्टर असल्याने मला
भारी
In reply to मी डॉक्टर असल्याने मला by सुबोध खरे
मी बायजुच्या साईट नेहमी
हे कसे घडते
टोर न्याहाळक (ब्राऊझर) https:
In reply to हे कसे घडते by sunil kachure
धन्यवाद
In reply to टोर न्याहाळक (ब्राऊझर) https: by Trump
अजून एक अनुभव
एक महत्वाचे observation.
द ओनियनने आधीच सांगितले आहे!!
In reply to एक महत्वाचे observation. by रावसाहेब चिंगभूतकर
मला पहिल्यांदा हे खरंच वाटलं.
In reply to द ओनियनने आधीच सांगितले आहे!! by Trump
द ओनियनने सांगितलेल्या बर्
In reply to मला पहिल्यांदा हे खरंच वाटलं. by रावसाहेब चिंगभूतकर
बोलण्यात जो विषय आला
In reply to एक महत्वाचे observation. by रावसाहेब चिंगभूतकर
पण जर मी बुकिंग डॉट कॉम ऍप ला
In reply to बोलण्यात जो विषय आला by गवि
एकूण..
In reply to पण जर मी बुकिंग डॉट कॉम ऍप ला by रावसाहेब चिंगभूतकर
काही माहिती मिळाली
In reply to एकूण.. by गवि
कुकीजचे माहीत आहे. तो वेगळा
In reply to काही माहिती मिळाली by sunil kachure
What's App Hack
हया बातमी मध्ये
In reply to What's App Hack by मुक्त विहारि
बातमीत स्क्रीन शाॅट दिला आहे ....
In reply to हया बातमी मध्ये by sunil kachure
मला गेल्या महिन्यात भारती अ
ठरावीक रकमेचे आमिष दाखवून....
In reply to मला गेल्या महिन्यात भारती अ by विजुभाऊ
मलाही "रिलायन्स इन्शुरन्समधुन
In reply to मला गेल्या महिन्यात भारती अ by विजुभाऊ
रिलायन्स आयूर्विमा फसवणूक
In reply to मलाही "रिलायन्स इन्शुरन्समधुन by चौथा कोनाडा
बाप रे, खतरनाक प्रकरण आहे !
In reply to रिलायन्स आयूर्विमा फसवणूक by चेतन सुभाष गुगळे
एक निरीक्षण
" जपंतारा " कॉल सेंटर-भारताचे नाव बदनाम होते
माझ्या माहीतीप्रमाणे सरकारने
In reply to " जपंतारा " कॉल सेंटर-भारताचे नाव बदनाम होते by चौकस२१२