Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user कासव
Submitted by कासव on Sun, 01/30/2022 - 00:07
सर्व नावे बदलली आहेत. दोन्ही प्रसंग खरे आहेत ------ प्रसंग १ राजेश ला एका दुपारी अचानक WhatsApp विडिओ कॉल येतो. नंबर त्याच्या मोबाईल मध्ये सेव नसतो तरी तो फोन घेतो. पलीकडून एका मुलीचा आवाज पण काळी स्क्रीन. काही दिसत नाही. राजेश तिला ओळखत नाही पण ती त्याला म्हणते ओळख. एवढ्या लवकर विसरलास ना. २ ते ३ मिनिटे असेच होते आणि शेवटी ती wrong नंबर सांगून फोन कट करते. १० मिनिटांनी एक मेसेज येतो. राजेश मोबाईल उघडतो आणि जागीच खिळून बसतो. मेसेज मध्ये एक व्हिडिओ असतो त्यात त्याचीच एक ब्लू फिल्म असते. त्याला कळते की आत्ता जो कॉल आला होता त्यातून काही क्लिप वापरून हा व्हिडिओ बनवला आहे. नंतर २ मिनिटांनी त्याला साधा कॉल येतो. त्यात एक पुरुष बोलत आहे. तो म्हणतो की तुझा हा व्हिडिओ मी सोशल करणार. तुझी माझी काही दुश्मन नाही पण मला पैसे हवेत. ५००० रुपये. ते ही आत्ताच दिले तर. नाहीतर दर तासाला ते दुप्पट होणार. २४ तासात पैसे नाही दिले तर हे सोशल होणार. आणि पोलिसांना सांगितले तर लगेचच. राजेश घाबरतो पण तो त्याच्या एका मित्राशी बोलतो आणि ते पैसे द्यायला तयार होतात. आता तो व्यक्ती पैसे बिटकॉइन मध्ये मागतो. आली आता पंचीअत. राजेश ला बितकॉइन बदल काही माहिती नाही. मग तो अजून एकाला फोन करतो. त्या मित्राकडून त्याने बिटकॉईन बदल ऐकलं असतं. तो मित्र त्याला पोलिसाला गाठण्याचा सल्ला देतो. आणि काही घाबरून होणार नाही पैसे तर द्यायचेच नाहीत असे सांगतो. धीर करून हे लोक पोलिस स्टेशन गाठतात. पोलिस म्हणतात हे नेहमीच झालं आहे. Fir करू पण हे आरोपी सापडणार नाहीत. तुमची सोशल अकाउंट बंद करा किंवा सगळे सेक्युरिटी सेटिंग चेक करा. सर्व अनोळखी माणसे ताबडतोब फ्रेंड लिस्ट मधून हटवा. आणि त्या माणसाचा परत फोन आला तर पैसे देत नाही काय करायचंय ते कर म्हना. राजेश ला परत फोन येतो. आणि राजेश पैसे देणार नाही असे सांगतो. तो माणूस खूप घाबरवत असतो तरी. राजेश परत पोलिस ना सांगतो आणि पोलिस त्याला कोणताच unknown नंबर चा फोन उचलू नको म्हणून सांगतात. ४-५ दिवस खूप फोन येतात पण हा व्हिडिओ काही शेअर होत नाही. आणि हळू हळू सगळे कॉल पण बंद होतात. --- प्रसंग २ विलास सकाळी सरकारी दवाखान्यातून COVID chi लस घेऊन येतो. साधारण संध्याकाळी त्याला एक कॉल येतो. पलीकडून आवाज येतो की मी हॉस्पिटल मधून बोलतोय आणि तुम्ही आज लस घेतली का. विलास हो म्हणतो. तो माणूस म्हणतो की तुमचं आधार कार्ड वर लसीच डिटेल अपलोड होत नाहीयेत. तर आधार नंबर परत नीट सांगा आणि एक OTP येईल तो पण सांगा. विलास सावध होतो. तो म्हणतो मी हॉस्पिटल मध्ये येतो आणि काय असेल ते तिथे पाहू. तो माणूस गयावया करतो की ह्यात खूप वेळ जाईल. त्याचे डिटेल अपलोड होत नाही तो पर्यंत पुढच्या लोकांचे पण डिटेल टाकता येत नाहीत. सॉफ्टवेअर थांबलं आहे. त्याला अजून ४२ लोकांचे डिटेल टाकायचे आहेत. आणि त्याची आई घरी आजारी आहे त्याला सगळी काम संपून पटकन घरी जायचे आहे. तरी विलास तयार होत नाही. मग तो माणूस काही ओळखी ची नावे सांगायला लागतो. ह्यांना मी माहित आहे तुम्ही त्यांना विचारा पण आत्ता मला मदत करून घरी जाऊ द्या. विलास तरी ऐकत नाही म्हणल्या वर तो थोडा चिडून बोलायला लागतो आणि सारखं आईच कारण देत बसतो. नंतर तर तो शिव्या पण द्यायला लागतो. दरम्यान विलास कॉल चालू असतानाच हॉस्पिटल मध्ये पोचतो तर तिथे अशी कोणतीच व्यक्ती नसते. सगळे लोक आपापले काम संपवून निघ्यच्या तयारीत असतात. तिथले अधिकारी विलास ला शाबासकी देऊन पोलिस स्टेशन ला घेऊन जातात. ते तिथे रीतसर तक्रार करतात. -- दोन्ही प्रसंगात माझे मित्र वाचले कारण एक जनाने मित्राचा सल्ला घ्यायचं ठरवलं आणि एक जण स्वतःच अलर्ट होता. पण अश्या लोकांचे कॉल खूपच खरे वाटतात. अगदी भाषेचा tone वगैरे आपल्याच भागातला वाटतो एवढे ते सराईत असतात. म्हाताऱ्या व्यक्ती किंवा अलर्ट नसतील तर कोणीही सहज फसू शकतो. ह्यांची जास्त पैस्याची पण अपेक्षा नसते. दिवसाला ५०००-१०००० मिळाले तरी बास. १० लोकांना ट्राय केले की एखादा तरी गळाला लागत असेल. कदाचित वाढती बेकारी करणी भूत असेल. पण ते जास्त कष्ट पण घेत नाहीत. तुम्ही त्यांना हवे तसे वागत नसाल तर ते जास्त वेळ खर्च न करता दुसरा बकरा शोधतात. सर्वांनी खूप सावध रहा. उपयोग झाला नाही तरी रीतसर तक्रार करा. सोशल मीडिया वर कमीत कमी माहिती द्या. सर्व security सेटिंग चेक करा. हवं तर मित्रांची मदत घ्या. अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. तुमचे मित्र आणि नातेवाईक ह्यांना पण सतर्क करा. अजून काही उपाय किंवा किस्से असतील तर प्रतिक्रिया मध्ये सांगा.
  • Log in or register to post comments
  • 24359 views

प्रतिक्रिया

Submitted by रावसाहेब चिंगभूतकर on Mon, 01/31/2022 - 13:19

Permalink

एक महत्वाचे observation.

एक महत्वाचे observation. परवाच एका मित्रा बरोबर ट्रिप ला जायचे बोलत होतो. बोलता बोलता हे ही बोललो की हॉटेल्स ही बुक करायला लागतील. कॉल संपल्यावर अक्षरशः काही सेकंदात booking.com चे नोटिफिकेशन आले जानेवारी मध्ये आणि फेब्रुवारी मध्ये हॉटेल्स बुकिंग करा म्हणून. परमिशन मॅनेजर मध्ये जाऊन चेक केले. Booking.com ला दोन्ही साठी, फोन आणि मायक्रोफोन, परमिशन डीनाईड आहे. त्याच्याकडून मला फारशा नोटिफिकेशन येत नाहीत. एकमेव जी आधीची सापडली ती 30 दिसेम्बर ची होती. आता बोला.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Mon, 01/31/2022 - 13:27

In reply to एक महत्वाचे observation. by रावसाहेब चिंगभूतकर

Permalink

द ओनियनने आधीच सांगितले आहे!!

द ओनियनने आधीच सांगितले आहे!!
  • Log in or register to post comments

Submitted by रावसाहेब चिंगभूतकर on Mon, 01/31/2022 - 23:27

In reply to द ओनियनने आधीच सांगितले आहे!! by Trump

Permalink

मला पहिल्यांदा हे खरंच वाटलं.

मला पहिल्यांदा हे खरंच वाटलं. गड्या आपुला नोकिया 3315 बरा.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Mon, 01/31/2022 - 23:50

In reply to मला पहिल्यांदा हे खरंच वाटलं. by रावसाहेब चिंगभूतकर

Permalink

द ओनियनने सांगितलेल्या बर्

द ओनियनने सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी पुढे सत्य झाल्या आहेत. त्यामुळे सावध
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 01/31/2022 - 13:40

In reply to एक महत्वाचे observation. by रावसाहेब चिंगभूतकर

Permalink

बोलण्यात जो विषय आला

बोलण्यात जो विषय आला त्याबद्दल जाहिरात / सजेशन हे तर अगदी कॉमन झाले आहे. त्यात नाकारता येण्यासारखे काही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by रावसाहेब चिंगभूतकर on Mon, 01/31/2022 - 23:43

In reply to बोलण्यात जो विषय आला by गवि

Permalink

पण जर मी बुकिंग डॉट कॉम ऍप ला

पण जर मी बुकिंग डॉट कॉम ऍप ला कशाचाच ऍक्सेस दिलेला नाही तर ही माहिती गूगल बुकिंग डॉट कॉम ला देतंय? This is very disturbing. आणि फक्त हे एकच ऑब्झर्वेशन नाही. या आधीही मी हे ऑब्झर्व केलंय. उदाहरणार्थ मी घरी एखादं गाणं टीव्ही वर ऐकत / गुणगुणत असेन (एखादं कडवं) आणि जर मोबाईल जवळ असेल आणि मला पूर्ण गाणं youtube वर ऐकायचं असेल तर पहिला शब्द टाइप करताच बरोबर तेच गाणं सर्च करताना पहिल्यांदा सर्च मध्ये येतं. या सगळ्यावर उपाय ठाऊक नाही, पण गूगल आपल्या आयुष्यात फार घुसखोरी करतंय असं वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 02/01/2022 - 00:14

In reply to पण जर मी बुकिंग डॉट कॉम ऍप ला by रावसाहेब चिंगभूतकर

Permalink

एकूण..

एकूण.. शूज, वॉशिंग मशीन, टॉईज, पिझ्झा असे शब्द असलेली वाक्ये पाच सहा वेळा स्मार्टफोन चालू असताना (कॉलमधे नव्हे.. नुसते सर्फिंग, तूनळी बघताना) बोलत राहायची. उदा. आय नीड न्यू शूज. चीप शूज. शूज फाटलेत. नीड स्पोर्ट्स शूज. असे म्हणत राहायचे. थोड्या वेळात (काही तास ते एक दिवस) तूनळी व्हिडिओजचे विषय पहायचे. पाचातले एक दोन किंवा तीन व्हिडिओ त्या शब्दावरुन असतील. लोकसत्ता, मटा किंवा अन्य गूगल ads एम्बेड करणारी पेजेस उघडून स्क्रोल करत जा. अन्य जाहिरातींत एक किंवा दोन बुटांच्या असतील. पूर्ण पान स्क्रोल करुन नीट बघा. समजा बूट, वॉशिंग मशीन हे अगदी सामान्य शब्द वाटत असतील तर मधेच एकदा ऑड शब्द वापरुन पहा. उच्चार स्पष्ट आणि पुन्हा पुन्हा करा. वाक्यात शब्द ठेवा आणि समोरच्या व्यक्तीशी गप्पा करा. उदा. "मला होटेल रुम हवीय", "गोव्यात हॉटेल रुम स्वस्तात" अशी वाक्ये इंग्रजीत बोला. कोणत्याही परमिशन दिलेल्या नसणे हे गृहीत धरले आहेच. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Tue, 02/01/2022 - 23:05

In reply to एकूण.. by गवि

Permalink

काही माहिती मिळाली

हे घडतं ते कुकीजमुळे तुम्ही वेबसाइटला भेट देता आणि तेथे काही क्रियाकलाप करता, ते तुमच्या ब्राउझरवर कुकीज सेव्ह करतात. आता प्रश्न असा आहे की, या कुकीज काय आहेत? कुकी हा एक छोटा प्रोग्राम आहे जो वेबसाइटला तुम्हाला विशिष्ट वापरकर्ता म्हणून लक्षात ठेवण्याची परवानगी देतो. प्रत्येक वेबसाइट हे काम करते आणि तुमचा मूड जाणून घेते. तुमच्या लक्षात आले असेल की, जेव्हा तुम्ही वेबसाइटला भेट देता तेव्हा तुम्हाला कुकीजला परवानगी देण्यास सांगितले जाते आणि तुम्ही त्याला यस करता. यामुळे होतं काय की, तुमचा इतिहास तुमच्या कुकीजद्वारे जतन केला जातो आणि नंतर जाहिरात कंपन्या तुम्हाला सहजपणे ट्रॅक करतात. कारण जेव्हा तुम्ही वेबसाइटवर जाता, तेव्हा तुम्ही तिथे कुठे क्लिक केलेत, तुम्ही किती वेळ थांबता आणि कोणत्या विशिष्ट लिंक्सवर क्लिक करत आहात, त्याचा डेटा तयार केला जातो. त्या डेटाच्या आधारे तुम्हाला सर्वत्र तो कंटेन्ट दिसतो. तुमच्या सर्व अ‍ॅक्टिव्हिटी लक्षात ठेवल्या जातात आणि त्यामुळे जाहिरात स्पेसमध्ये तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीनुसार जाहिराती दिसायला लागतात. त्याच वेळी, जर इतर कोणताही कंटेन्ट तुम्हाला हवा असेल, तर तुम्हाला फक्त मागील शोधाच्या आधारावर सामग्री मिळू लागते. जेव्हा तुम्ही एकाच प्रकारचे अधिक व्हिडीओ पाहता तेव्हा सोशल साइट्सवर तुम्हाला स्क्रीनवर अशाच प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. विशेष गोष्ट अशी आहे की, सर्व वेबसाइट्स एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि आपल्या कुकीज एकमेकांशी शेअर करतात, म्हणजेच इतर वेबसाइटलाही तुमच्या आवडीनिवडी किंवा नापसंतीची माहिती मिळते. हे आरोप फेटाळून लावले असले तरी लोकांचे संभाषण रेकॉर्ड करून डेटा तयार करून कंपन्यांना दिला जात असल्याचा आरोप अनेक कंपन्यांवर करण्यात आला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 02/01/2022 - 23:49

In reply to काही माहिती मिळाली by sunil kachure

Permalink

कुकीजचे माहीत आहे. तो वेगळा

कुकीजचे माहीत आहे. तो वेगळा भाग आहेच. तसेही incognito मोड वापरुन कुकी स्टोरेज टाळता येते. आणि अबोव्ह ऑल त्यासाठी मुळात वेबसाईट व्हिजिट किंवा सर्च ब्राऊजरमधे करावी लागते. इथे फक्त शब्द तोंडाने बोलणे असा भाग होता. तेही किवर्ड रुपात कुठेतरी शोषले जात असावेत असं मानण्याजोगे अनुभव येतात. अनेकांना आले असावेत. उदा. चिकन, फ्रेश चिकन असे शब्द चर्चेत आले, फक्त एकमेकांत बोलताना वापरले पण कुठेही चिकन या विषयावर शब्द टाईप करुन सर्च केली नाही, त्याविषयीच्या (समजा वेन्कीज, गोदरेज रियलगुड चिकन किंवा KFC) वेबसाईट्स बघितल्या नाहीत. अलेक्सा, असिस्टंट यापैकी कोणाला वापरले नाही, तरी चिकनबद्दल व्हीडीओ, जाहिराती दिसणे असे अनेकदा अनेकांना अनुभवास आले आहे. चिकन ऐवजी च्यवनप्राश, बूट, टूर, स्मार्टवाच असे वेगवेगळे शब्द मानता येतील. असे नसूही शकेल. निव्वळ योगायोग मात्र आश्चर्यकारक म्हणावा लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 01/31/2022 - 18:56

Permalink

What's App Hack

https://lokmat.news18.com/technology/do-not-share-your-otp-to-anyone-your-whatsapp-can-be-hacked-check-this-video-mhkb-663323.html
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Tue, 02/01/2022 - 02:01

In reply to What's App Hack by मुक्त विहारि

Permalink

हया बातमी मध्ये

मला ही शंका वाटते. त्या मुलीने व्हॉट्सॲप वेब लं व्हॉट्स ॲप कनेक्ट करून नंतर लोग आउट करायचे विसरली असणार आणि तो pc तिच्या ऑफिस मधील असावा ,किंवा कुठल्या सार्वजनिक ठिकाणचा. एक शका.. बाकी अमेझॉन,रेड बस हे ॲप वापरले ह्याला काही अर्थ नाही
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 02/01/2022 - 14:37

In reply to हया बातमी मध्ये by sunil kachure

Permalink

बातमीत स्क्रीन शाॅट दिला आहे ....

तो बघावा ....
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 02/01/2022 - 15:47

Permalink

मला गेल्या महिन्यात भारती अ

मला गेल्या महिन्यात भारती अ‍ॅक्सा मधून बोलतेय असे सांगून तीन चार वेळा फोन आले. ती बाइ म्हणत होती की मी म्हणे जुन्या कंपनीत असताना २०१३ मधे एक पॉलीसी उतरवली होती. त्याचा एकच हप्ता भरला (४९९९५ /- ) होता. आणि आता ती पॉलीसी लॅप्स होऊन कंपनीत जमा होणार आहे. तुम्ही जर क्लेम करत असाल तर तुम्हाला २,३७०००/- मिळतील तर कृपया कन्फर्म करा मला स्वतःला अशी कोणतीही पॉलीसी उतरवल्याचे आठवत नाही. असे साम्गितले. त्या बाईने मला कम्पनीने तुमच्याशी बरेच वेळा ईमेल ने सम्पर्क केला असे साम्गितले. नाव ,माझी जन्मतारीख ,पॉलीसी नम्बर वगैरे दिला. मात्र इमेल पत्ता थोडा चुकीचा सांगितला. ( . _ चा फरक) मी भारती अ‍ॅक्सा च्या पोर्टलवर चेक केले. तो पॉलीसी नंबर डीटेल आणि ईमेल आयडी मॅच होत नव्हते. त्या बाईने तीच्या साहेबाचा नम्बरही दिला आनि याम्च्याशी बोला असे साम्गितले. मी त्याला फोन केला नाही. त्या नम्बरही तीन चार वेळी फोन आले. यात कसला प्लॅन होता कोण जाणे. आता फोन येणे बंद झालंय
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 02/01/2022 - 16:24

In reply to मला गेल्या महिन्यात भारती अ by विजुभाऊ

Permalink

ठरावीक रकमेचे आमिष दाखवून....

पैसे लुबाडणे...
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 02/01/2022 - 17:08

In reply to मला गेल्या महिन्यात भारती अ by विजुभाऊ

Permalink

मलाही "रिलायन्स इन्शुरन्समधुन

मलाही "रिलायन्स इन्शुरन्समधुन बोलत आहे" असा फोन येतो. साधारण विजूभाऊंना तपशील सांगितले तसेच असतात. तेच अमीष असतं. मी झिडकारून टाकतो कारण मी असली पॉलिसी कधी काढलेलीच नसते. .... आणि गंमत म्हण्जे दर वर्षी किंवा ६-८ महिन्याने असा फोन येतो ... गेली ५-६ वर्षे !
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Wed, 02/02/2022 - 11:57

In reply to मलाही "रिलायन्स इन्शुरन्समधुन by चौथा कोनाडा

Permalink

रिलायन्स आयूर्विमा फसवणूक

http://beftiac.blogspot.com/2014/06/reliance-life-insurance-scandal.html http://beftiac.blogspot.com/2014/06/blog-post.html
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 02/02/2022 - 17:42

In reply to रिलायन्स आयूर्विमा फसवणूक by चेतन सुभाष गुगळे

Permalink

बाप रे, खतरनाक प्रकरण आहे !

बाप रे, खतरनाक प्रकरण आहे ! तब्बल 26,240 रू ना ठकवलं ! पुढे काही कारवाई झाली का ?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्कवादी on Tue, 02/01/2022 - 23:30

Permalink

एक निरीक्षण

आधी फेसबूकवर अ‍ॅड करुन मग मेसंजर वरुन चॅट करत व्हॉट्स अ‍ॅप नंबर मागणार्‍या मुलींमध्ये (म्हणजे मुलींच्या प्रोफाईलमध्ये) एक समान गोष्ट आढळून आली ती म्हणजे प्रोफाईलनुसार या मुलींचे व्यवसाय "ब्युटीशियन" वा ब्युटीपार्लरमध्ये काम असे नमूद केलेले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 02/03/2022 - 12:01

Permalink

" जपंतारा " कॉल सेंटर-भारताचे नाव बदनाम होते

जपंतारा नावाची मालिका पहिलाआहेत का? भारताबाहेर तर याचा एक वेगळ्या प्रकारचं त्रास हितो त्याचा त्रास भारतातील चांगली कॉल सेंटर ला पण होतो कास तर असा १) मी माइक्रोसॉफ्ट किंवा टॅक्स ऑफिस ( औस्ट्रेलयंन टॅक्स ऑफिस ) मधून बॊलतोय असे भुक्कड फोन येतात ते माझ्य सारखया भारतीयांना येतातच आणि इतर ऑस्ट्रेलियन लोकांना पण येतात ... फसवणुकीचे असतात त्यामुळे आपण वैतागलेले असतो .. एकतर कटकट आणि दुसरे असे कि या मुळे भारताची बदनामी होते आणि स्थानिक लोकांकडून "तुम्ही भारतीय असले धंदे करता अश्या प्रकारची टीका ऐकावी लागते " असा फोन आला तर कधी कधी त्यांची खेचतो काय वाटेल ते बोलत बसतो ..उगा आपल्याला अर्धवट भारतीय भाषा येतीय ,कॉल करणाऱ्याला गर्ल फ्रेंड आहे का? काहीही पण भीती हि वाटते कि जर या मागे गॅंग वैगरे असतील तर आपला पत्ता शोधून त्रास देतील का ? अशी फसवणुकीची कॉल सेंटर भारत सरकार का नाही बंद करीत ? कि फसवलेला जाणारा भारताबाहेरील आहे म्हणून जाऊदे ना असे असते ! भारताचे नाव बदनाम होते सरकार ला कळत नाही का? मागे जेवहा इस्राएल मधून बायनरी ऑप्शन चे अनेक फसवणूतिचे प्रकार चालू झाले तेवहा इस्राएल सरकार ने यावर कडक कारवाई केली होती ! २) या चिड्लेलंय अवस्थेत जर आपण एखाद्य खरंय ग्राहक सेवेला फोन केला आणि त्यांनी कॉल सेंटर जर भारतात ठेवले असेल तर आपण कधी कधी त्यांच्यावर कारण नसताना चिडतो
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on गुरुवार, 02/03/2022 - 12:12

In reply to " जपंतारा " कॉल सेंटर-भारताचे नाव बदनाम होते by चौकस२१२

Permalink

माझ्या माहीतीप्रमाणे सरकारने

माझ्या माहीतीप्रमाणे सरकारने कारवाई केली आहे.
भारताचे नाव बदनाम होते सरकार ला कळत नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 02/03/2022 - 12:17

In reply to माझ्या माहीतीप्रमाणे सरकारने by Trump

Permalink

काय कारवाई केली कोण जाणे

काय कारवाई केली कोण जाणे अजूनही तसले कॉल येतात पुढे मी विजेचं बिलाचे उधारण दिले तो कॉल हा एक फार सफाईदार फसवणुकीचा प्रकार
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on गुरुवार, 02/03/2022 - 12:28

In reply to काय कारवाई केली कोण जाणे by चौकस२१२

Permalink

सहज येथे बघितले.

सहज येथे बघितले.
https://www.youtube.com/results?search_query=india+fake+call+centre+busting
अजूनही तसले कॉल येतात पुढे मी विजेचं बिलाचे उधारण दिले तो कॉल हा एक फार सफाईदार फसवणुकीचा प्रकार
नेहमीप्रमाणे चोर-पोलिसाचा खेळ असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 02/03/2022 - 12:14

In reply to " जपंतारा " कॉल सेंटर-भारताचे नाव बदनाम होते by चौकस२१२

Permalink

जमतारा मालिका भारी होती.

जमतारा मालिका भारी होती. फसवणुकीचे रॅकेट एका गावातुन कसे चालते, त्यांची यंत्रणा कशी असते, संरक्षण कसे मिळते ई. तपशील भारी दाखवले होते. पाहण्यासारखी मालिका. पाहिली नसल्यास जरूर पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 02/03/2022 - 12:13

Permalink

विजेचं बिलावर पैसे वाचव्यायचे आहेत का

पर्वा तर कहर झाला या फसणूक करणाऱ्यांची डोकी कुठे चालतील इथे साधारण अशी प्रथा आहे कि विजेचे उत्पादन करणारी जरी एकाच संस्ताह असली तरी त्याचे विपणन करणार्या ३-४ कंपन्या असतात आणि तुम्ही त्यांचे कडे "ट्रान्स्फर " व्हा अश्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात आणि त्यासाठी काही ठराविक अर्ज असतात .. हे सगळे ठीक तर यावर बेतलेला एक नवीन फसवणुकीचा प्रकार फोन येतो कि तुम्हाला विजेचं बिलावर पैसे वाचव्यायचे आहेत का ? आपण म्हणतो हा हे ठीक आहे कारण असले असा कोणत्यातरी टाय ३-४ कंपनी चा फोन पण प्रत्यक्षात तसे नसते कारण तसे असते तर फॉर्म भरून पाठवा/ आणि ती कंपनी आपल्याला माहित असते हे "डील "असं scammers will ask unsuspecting customers for copies of their Jacana Energy bills, obtaining their electricity account details in the process. Scammers will then make payments to the customer's Jacana Energy account on their behalf and subsequently ask the customer to pay them a portion of the bill minus an alleged discount. Once the scammers have received the customer's payment, they will dispute their own payment made to Jacana Energy and get the payment reversed through their financial institution. This will leave the customer's Jacana Energy account outstanding and the customer potentially defrauded of a large sum of money.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on गुरुवार, 02/03/2022 - 12:43

Permalink

फसवणुकीचा धंदा

कसा चालतो हे लोकांना माहीत आहे म्हणजे बँका आणि सरकार ह्यांना माहीत असणारच. १) kyc च्या नावाखाली आणि अकाउंट बंद होईल अशी भीती दाखवून अकाउंट ची माहिती मिळवून फसवणूक. २) लॉटरी लागली आहे खूप मोठ्या रक्कमेची अशी लालुच दाखवून फसवणूक. ३) क्रेडिट कार्ड, विसा कार्ड ह्यांचे पासवर्ड मिळवून फसवणूक. असे अनेक मार्गाने फसवणूक होते... फुकट मिळणाऱ्या पैशाच्या हव्यासपोटी स्वतःच फासणारी लोक . ह्यांना कोणी जबाबदार नाही त्याला ती लोक च जबाबदार आहेत. पण बाकी प्रकारात जी फसवणूक होते.ह्याला बँका आणि सरकार पण जबाबदार आहे. आपल्या ग्राहकांची सायबर security करणे हे बँका चे कर्तव्य च आहे. त्याच्या कडूनच वसुली केली पाहिजे.सरकारी यंत्रणा आध्यावत नसल्या मुळे त्यांना तांत्रिक काही कळत नाही. त्या मध्ये सरकार नी बदल केला पाहिजेत
  • Log in or register to post comments

Submitted by देशपांडे विनायक on गुरुवार, 02/03/2022 - 19:20

Permalink

माझी हिरोगिरी

एक दीड वर्षापूर्वीची गोष्ट . माझा मित्र घरी आला तेव्हा त्याचा चेहरा काळजीयुक्त दिसत होता . कारण विचारल्यावर म्हणाला नातवाचे प्रताप !! जरा सविस्तर सांगितलेस तर मलाही बरे वाटेल असे म्हणालो तेव्हा म्हणाला दोन दिवसापूर्वी ४००० ला टोला बसलाय. आता आणखी कितीवेळा हा बसणार या चिंतेने झोप उडाली आहे. मामला गंभीर आहे हे लक्षात आले.थोडा वेळ गेल्यावर सांगू लागला दोन दिवसापूर्वी नातवाचा PC बंदच होईना .एक नोटीस स्क्रीनवर दिसत होती . बेकायदेशीर PORN साईट्स बघितल्याबद्दल pc बंद करण्यात आला आहे. शेजारील फोटो स्कॅन करून ४००० रुपये भरल्यावर pc वापरता येईल. नातू घाबरला .पैसे भरणे त्याला शक्य नव्हते.आई वडिलांना सांगण्या इतके धैर्य नव्हते. मुकाट्याने आजोबाकडे आला. आजोबांनी म्हणजे माझ्या मित्राने पैसे भरले. नोटीस कशी दिसत होती असे विचारल्यावर म्हणाला मी काय मूर्ख आहे का ? मी नोटीस नीट पाहिली.अरे त्यांनी कोणत्या कलमाखाली हा गुन्हा आहे तेही लिहिले होते. माझा अनेक वर्षाचा अनुभव सांगत होता कि मित्राने खरोखरच मूर्खपणा केला आहे. आता त्याची भीती कशी घालवावी याचा मी विचार करू लागलो.आणि एक दिवस मला उपाय सापडला . मी रोज पोर्न साईट उघडू लागलो आणि दुसऱ्या नवीन tab वर माझे काम करू लागलो. साधारण तीन आठवड्याने माझा pc पण lock झाला . मित्राने वर्णन केले तशीच नोटीस स्क्रीनवर दिसत होती ती नोटीस बनावटआहे हे मला समजले. माझ्या mobile वर मी त्या नोटिशीचा फोटो काढला आणि माझ्या वकिलांना whatsapp वर पाठवून तो पाहण्यास फोन करून सांगितले. पाच मिनिटात वकिलांचा फोन आला. या वयात हिरोगिरी करू नका असे कठोर आवाजात सुनावले. ती नोटीस बोगस आहे कि नाही हे विचारल्यावर म्हणाले तेवढे तुम्हाले नक्कीच समजते. पण तुमचा pc ह्याक होण्याचे chancess तुम्ही वाढवून ठेवलेत. आता बँकेचे सर्व password बदला आणि असली हिरोगिरी करू नका. माझ्या मित्राला जेव्हा मी whatsapp वरील फोटो दाखवला आणि वकिलाचा नंबर दाखवला आणि त्यांना जाऊन भेटण्याचा सल्ला दिला तेव्हा तो म्हणाला ४००० रुपये अक्कलखाती जमा झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on गुरुवार, 02/03/2022 - 19:42

In reply to माझी हिरोगिरी by देशपांडे विनायक

Permalink

ब्लॅक मिरर चा "शट अप अँड

ब्लॅक मिरर चा "शट अप अँड डान्स" नावाचा एपिसोड याच एक्झॅक्ट कल्पनेवर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 02/03/2022 - 20:55

In reply to माझी हिरोगिरी by देशपांडे विनायक

Permalink

पुर्वी येऊन गेलेला मराठी

पुर्वी येऊन गेलेला मराठी सिनेमा "TC.GN :Take Care Good Night" हा याच विषयावर आहे. याचे आयएमडीबी वर Rating: 7.5/10 असे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 02/03/2022 - 20:58

In reply to पुर्वी येऊन गेलेला मराठी by चौथा कोनाडा

Permalink

TC.GN :Take Care Good Night

  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on गुरुवार, 02/03/2022 - 20:28

Permalink

आता फक्त आर्थिक नुकसानी वर निभावत आहे

उद्या रोबोट,ड्रायव्हर लेस car,विमानांना दिशा दाखवणारी यंत्र,ह्यांना जर कोणी टार्गेट केले तर केवढे मोठे संकट निर्माण होईल
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on गुरुवार, 02/03/2022 - 20:41

Permalink

कॉमन वायफाय नेटवर्क

म्हणजे ऑफिस,रेल्वे स्टेशन,हॉस्पिटल ,कुठलेही जी वायफाय नेटवर्क सार्वजनिक प्रकारे वापरले जाते ते किती सुरक्षित असते. कारण काही महत्वाच्या वेबसाईट अशा सार्वजनिक नेटवर्क वर ओपन होत नाहीत. "तुमचे नेटवर्क सार्वजनिक आहे आणि ते सुरक्षेच्या दृष्टी नी धोकादायक आहे" असा संदेश त्या साईट display करतात. मोबाईल नेटवर्क आणि सार्वजनिक वायफाय नेटवर्क ह्यांच्या मध्ये सुरक्षेच्या दृष्टी नी खरंच फरक असतो का?
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on गुरुवार, 02/03/2022 - 20:47

Permalink

दुसरी शंका

लॅपटॉप,मोबाईल ह्यांची स्क्रीन जेव्हा शेअर केली जाते तेव्हा दोन्ही device एकच वायफाय नेटवर्क वर कार्यान्वित असणे गरजेचे असते . तर त्याच permises मध्ये असलेली बाकी संगणकीय यंत्रणा माहिती हॅक करू शकते का? संगणक मधील बिलकुल ज्ञान नसल्या मुळे माझा हा प्रश्न साफ चुकीचा पण असू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on गुरुवार, 02/03/2022 - 21:12

In reply to दुसरी शंका by sunil kachure

Permalink

नाही. ते कोणत्याही नेटवर्कने

नाही. ते कोणत्याही नेटवर्कने जोडले गेलेले असले पाहीजेत.
लॅपटॉप,मोबाईल ह्यांची स्क्रीन जेव्हा शेअर केली जाते तेव्हा दोन्ही device एकच वायफाय नेटवर्क वर कार्यान्वित असणे गरजेचे असते .
ते कोणता संगणक हॅक झाला ह्यावर अवलंबुन आहे. जर मुख्य संगणक (सर्वर), नेटवर्क (जर राउटरचा फर्मवेअर) हॅक झाला असेल तर मग अवघड आहे.
लॅपटॉप,मोबाईल ह्यांची स्क्रीन जेव्हा शेअर केली जाते तेव्हा दोन्ही device एकच वायफाय नेटवर्क वर कार्यान्वित असणे गरजेचे असते . तर त्याच permises मध्ये असलेली बाकी संगणकीय यंत्रणा माहिती हॅक करू शकते का?
बाकी छोट्या व्हायरस, मालवेअरची इतकी भिती नसते.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Sat, 02/05/2022 - 14:40

Permalink

आला.

आला. आज मला फोन आला. बायकोने उचलला. माझ्या वडिलांनी म्युच्युअल फंडात ५०००० गुंतवले असून मी नॉमिनी आहे. पण मी घरात नसल्याने नंतर फोन करा असं बायकोने सांगितले आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Sat, 02/05/2022 - 14:42

In reply to आला. by शाम भागवत

Permalink

मुख्य म्हणजे फोन बीएसएनएल

मुख्य म्हणजे फोन बीएसएनएल च्या लँन्डलाईनला आला. हा नंबर त्यांना कसा मिळाला काही समजत नाही. हैद्राबादहून बोलतोय म्हणे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com