Skip to main content

मुर्द्राक्षास...

लेखक nemake_va_mojake यांनी गुरुवार, 27/01/2022 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
मुर्द्राक्षास... मुरवि मनोहर द्राक्षालागी सुधा मधुर अन् गंध केशरी मुर्द्राक्षाची द्राक्षरसाशी अशी चालली मधुरा-मधुरी द्राक्षम् मधुरम् पाकम् मधुरम् पाकामधले केशर मधुरम् द्राक्षरसासह मधुमद मधुरम् द्राक्षाधिपतेरखिलं मधुरम् - कौस्तुभ आजगांवकर *मुर्द्राक्ष - द्राक्षाचा मुरांबा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3364
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

लोकं कविता का करतात ?

In reply to by प्रसाद गोडबोले

त्यामुळे विनोदाखेरीज उत्तराची अपेक्षा नसावी असं वाटलं. पुढे आलेलं उत्तर पुरेसं करमणूकप्रधान असल्याने हा प्रश्न सत्कारणी लागला असं समजतोय.

लोक कविता का वाचतात? माणसाच्या कानावर केस का असतात? आपल्याला सासरचे नातेवाईक का असतात? जाउ द्या ना बाळासाहेब

In reply to by Trump

मधुराष्टकम् या श्रीकृष्णस्तोत्राच्या छंदावर बेतलेलं आहे पण त्यापलीकडे काही संबंध नाही. त्या पवित्र स्तोत्राचं विडंबन वगैरे तर नक्कीच नाही. हा विषय अगदी साध्या गप्पांमधून आलेला. पाककृती व त्याविषयी ऐकून या ओळी डोक्यात आल्या. निव्वळ करमणूक म्हणून. ही कविता नाही. हलकी पद्यरचना म्हणा हवं तर

स.न.वि.नि. आपली "द्राक्षाचा मुरांबा" ही कविता मिळाली. समजावून घेण्यास तजज्ञांची मदत घेत आहे. पुढील वेळी "द्राक्षाचा मुरांबा"ची पाकॄ टाकावी विनंती ! कळावे, आवि, - द्राक्षासवकुमार मद्यार्कवाडे

In reply to by चौथा कोनाडा

सौ. मृणाल आठल्ये यांच्या फेसबुक पेज वरून - "द्राक्षारंबा" पिकलेल्या हिरव्या द्राक्षांचा मोरंबा. जसा पिकल्या आंब्याचा करतो तसाच करायचा. * २ वाट्या द्राक्षं गोड पण मऊ नसलेली वेलचीचे दाणे घालून वाफवली. पाणी न घालता. *३ वाट्या पाका साठी साखर घेतली. पाक थोडा जास्तच हवा होता. पक्का पाक केला. *त्यात केशर आणि वेलची पूड घातली. *वाफवलेली द्राक्षं पाकात घातल्यावर थोडं पाणी सुटतं. ते आटवून हव्या त्या consistency ला आल्यावर मोरंबा लगेच डब्यात काढला. *महत्त्वाची टीप---शिजवलेल्या पातेल्याच्या गरमीमुळे मोरंबा, जॅम या पदार्थांची consistency बदलते. कोरडेपणा येतो. -------------------------