✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२ (भाग ३)

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Wed, 01/19/2022 - 20:43  ·  लेख
लेख
गोव्यात प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री फिलीप नेरी रॉडरीग्ज यांनी मंत्रीपदाचा आणि आमदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर विफ्रेड डिसा या आमदारांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला आहे. हेच दोन आमदार जुलै २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. ते आता स्वगृही चालले आहेत. परवाच बघितले की २०१७ मध्ये निवडणुका झाल्यानंतर गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या ४० आमदारांपैकी २४ आमदारांनी पक्षांतर केले आहे.आता हे आणखी दोन आमदार दुसर्‍यांदा पक्षांतर करत आहेत. विधानसभेत निवडून आलेल्या ६०% आमदारांनी पक्षांतर केले असे दुसरे उदाहरण बघायला मिळणे अशक्यच वाटते. आता तरी निवडणुकीत पक्षांतर करायची शक्यता नसलेल्यांनाच लोकांनी निवडून द्यावे ही अपेक्षा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
48713 वाचन

💬 प्रतिसाद (157)

प्रतिक्रिया

नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निकाल

धर्मराजमुटके
Wed, 01/19/2022 - 21:06 नवीन
नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे १०६ पैकी ९७ निकाल हाती आले असून त्यापैकी भाजपा (३८४ ) पहिल्या क्रमांकावर असून यानंतर अनुक्रमे राष्ट्रवादी (३४४), काँग्रेस (३१६) आणि शिवसेनेचा (२८४) क्रमांक आहे. मात्र असे असूनही भाजपा सोडून इतर उरलेले पक्ष आपापसात मांडवली करुन सत्ता मिळवतील. त्यामुळे भाजपा ला केवळ जागा वाढल्या किंवा पहिला क्रमांक आला म्हणून खुश होता येणार नाही. मनसे आणि इतर पक्ष यांची काय स्थिती आहे हे आजच्या बातम्यांत नीट कळले नाही. मात्र भाजपाला आता एकंदरीतच कोणत्याही मित्रपक्षाशिवाय एकहाती सत्ता मिळविणे अवघडच दिसते आहे.
  • Log in or register to post comments

फरक

चंद्रसूर्यकुमार
Wed, 01/19/2022 - 21:22 नवीन
नगरपरीषदांचे निकाल स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवरून असतात. मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही मतदान करताना फरक करतात. तेव्हा नगरपरीषदांच्या निवडणुकांवरून विधानसभा-लोकसभेत काय होईल हे भाकित करणे धाडसाचे आहे. नगरपरीषद निवडणुकांमध्ये स्थानिक उमेदवार ओळखीचा असणे/लोकप्रिय असणे/स्थानिक पातळीवर केलेल्या मदतीमुळे त्याला मत देणे वगैरे मुद्दे अधिक प्रमाणावर येतात. ते विधानसभेला अजून कमी आणि लोकसभेला त्याहूनही कमी प्रमाणावर लागू होतात. अगदी विधानसभा-लोकसभा पोटनिवडणुक आणि राष्ट्रीय निवडणुक यातही मतदार फरक करतात कारण त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री/पंतप्रधान निवडायचा नसतो तर स्थानिक आमदार/खासदार निवडायचा असतो. मी काही भाजप आरामात बहुमत मिळवेल असे म्हणत नाहीये पण या निकालांवरून तसे होणारच नाही हे म्हणण्यायोग्य आधार आहे असे वाटत नाही.अपवाद असेल मुंबई महापालिका निवडणुकांचा. त्या निवडणुकाही स्थानिक पातळीवर लढविल्या जाणार असल्या तरी ब्रिटिश साम्राज्यात भारताचे किंवा इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात कोहिनूर हिर्‍याचे जे स्थान आहे तेच शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेतील सत्तेचे आहे. तिथे पराभव झाल्यास शिवसेनेला तो जिव्हारी लागेल आणि पक्षाच्या आत्मविश्वासावर त्यामुळे खूप परिणाम होईल.पण कुठल्याकुठल्या नगरपरीषद निवडणुकांबद्दल असेच म्हणता येईल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

नगरपरीषदांचे निकाल स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवरून असतात

धर्मराजमुटके
Wed, 01/19/2022 - 21:28 नवीन
नगरपरीषदांचे निकाल स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवरून असतात
मान्य. मात्र सांगायचा मुद्दा हा की मित्रपक्षांशिवाय कोणत्याही एका पक्षास सत्तेवर येणे अवघड आहे. त्यामुळे भाजपाला नवा आणि चांगला मित्र शोधावा लागणार आहे. मात्र शिवसेना ही त्यांची पहिली पसंत असेल तर अवघड आहे. अवांतर : मी इतकी वर्षे वर्तमानपत्रे वाचत आहे पण नगर पंचायत हा शब्द पहिल्यांदाच ऐकल्यासारखा / वाचल्यासारखा वाटतो आहे. आजपर्यंत मी नगर परिषद, जिल्हा परिषद असेच शब्द ऐकले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

पंचायत समिती तालुका पातळीवर

Trump
गुरुवार, 01/20/2022 - 00:02 नवीन
पंचायत समिती तालुका पातळीवर असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

द ग्रेट रेजिग्नेशन वेव्ह

धर्मराजमुटके
Wed, 01/19/2022 - 21:16 नवीन
कोविड काळात अनेक लोकांचे रोजगार गेले मात्र याच काळात जगात सगळ्याच ठिकाणी नोकरीचे राजीनामे देण्याचे प्रकार मोठया प्रमाणात आढळून आले असे अनेक वृत्तपत्रे सांगत आहेत. नक्की काय कारण असावे ?
  • Log in or register to post comments

२-४ मुद्दे

कासव
Wed, 01/19/2022 - 23:46 नवीन
१. कोविड मुळे नुकसानच झाले असे नसून फायदे पण झाले. खूप लोकांना घरी बसून स्व कळला. आपण उगाच इतके दिवस पैश्याच्या मागे लागत होतो हे कळले.खूप लोकांनी निवृत्ती घेऊन किंवा काम कमी करून फिरायचे आणि कुटुंबाला वेळ द्यावा म्हणून राजीनामे दिले. ह्या मध्ये सिनियर लोक जास्त असतील ज्यांचे भविष्य साठी पुरेसे अर्थाजन झाले असेल २. काही लोकांना दुसरे स्वतःच्या मनासारखे काम मग ते कमी पैश्या मध्ये का असेना ते करायचे आहे. त्यांनी राजीनामे दिले ३. स्वतःचा धंदा किंवा शेती करायची आहे म्हणून पण राजीनामे दिलेत ४. काही ठिकाणी खूप किंवा वेगळी skill असलेली माणसे मिळेनाशी झाली आहेत. अश्या वेळी उमेदवाराची bargening पॉवर वाढते आणि ते ६ - ६ महिन्यांनी जॉब बदलून जास्ती चा पगार मिळवत आहेत. अर्थात जुन्या ठिकाणी राजीनामा देऊन. ५. काही संस्थांनी स्वतःच काहीही करणा मुळे स्टाफ कमी करायचा ठरवला आहे. एवढ्या माणसाची गरज नाही म्हणून किंवा आर्थिक अडचणी म्हणून. पण राजीनाम्याचे फॅड भारतात जास्त दिसले नाही. IT मध्ये हा ट्रेंड नक्कीच होता पण बाकीच्या क्षेत्रात नाही. ही माझी मते किंवा निरीक्षणे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

नबाब मलीक आणि संजय राऊत यांना

विजुभाऊ
गुरुवार, 01/20/2022 - 08:14 नवीन
नबाब मलीक आणि संजय राऊत यांना बातम्यांमधून बाहेर फेकलंय. अनील देशमुखांना जामीन मात्र मिळत नाहिय्ये.
  • Log in or register to post comments

आपचा गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 01/20/2022 - 09:30 नवीन
आपने गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पणजीमधील वकील अमित पालेकर यांचे नाव घोषित केले आहे. त्यांनी गोव्यात अनेक गरीबांच्या केसेस कोणतीही फी न आकारता कोर्टात लढवल्या आहेत. जुन्या गोव्यात एका ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी नवी इमारत बांधायच्या निर्णयाविरोधात त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते त्यानंतर ते केजरीवालांच्या नजरेत आले. त्यानंतर त्यांना पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. Image removed. हा निर्णय जाहीर करताना केजरीवाल म्हणाले की गोव्यातील भंडारी समाजाला इतकी वर्षे गोव्यातील राजकीय व्यवस्थेत फार महत्वाचे स्थान मिळाले नव्हते आणि एका अर्थी अन्याय झाला त्याला अमित पालेकर मुख्यमंत्री झाल्यावर उत्तर मिळेल!! इतर पक्ष जातीपातीचे राजकारण करतात पण आम्ही स्वच्छ राजकारण करण्यासाठी आलो आहोत असे एकीकडे म्हणत असतानाच परत आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या जातीचा उल्लेख खटकलाच. अमित पालेकर सेंट क्रुझमधून तर मागच्या वेळचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एल्व्हिस गोम्स यांनी पक्ष सोडून थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
  • Log in or register to post comments

कैराना नंतर आता सुराना

वामन देशमुख
गुरुवार, 01/20/2022 - 09:42 नवीन
मप्र के रतलाम के सुराना गांव में डरे-सहमे हिंदुओं का छलका दर्द, कहा- मुस्लिमों से बचाए वरना छोड़ देंगे गांव
  • पंतप्रधान: श्री नरेंद्र मोदी
  • केंद्रीय गृहमंत्री: श्री अमित शहा
  • मध्यप्रदेशचे गृहमंत्री: श्री नरोत्तम मिश्रा
हे व केंद्र-राज्य शासनातील इतर लोक, भाजप, रास्वसं इ. संस्था संघटना, आणि मुख्यतः हिंदू लोक, हिंदूंच्या हिताबद्धल खरंच संवेदनशील / सक्षम आहेत का? आपली व्यक्त-अव्यक्त ध्येये साध्य करण्यासाठी सत्ता कशी राबवावी हे त्यांना माहित नाही का? --- हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.
  • Log in or register to post comments

हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.

मुक्त विहारि
गुरुवार, 01/20/2022 - 12:50 नवीन
सहमत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

... आणि आता लावण्या

वामन देशमुख
Sun, 01/23/2022 - 16:09 नवीन
ख्रिश्चॅनिटी स्वीकारण्याची जबरदस्ती : हिंदू विद्यार्थिनीची आत्महत्या पंतप्रधान: श्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री: श्री अमित शहा हे व शासनातील इतर लोक, भाजप, रास्वसं इ. संस्था संघटना, आणि मुख्यतः हिंदू लोक, हिंदूंच्या हिताबद्धल खरंच संवेदनशील / सक्षम आहेत का? आपली व्यक्त-अव्यक्त ध्येये साध्य करण्यासाठी सत्ता कशी राबवावी हे त्यांना माहित नाही का? --- हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

राजकारण हा विषय असलेल्या धाग्यावर

sunil kachure
गुरुवार, 01/20/2022 - 13:17 नवीन
एक बाब सामान असते देशापुढचे गंभीर प्रश्न हे जाती शी संबंधित असतात धर्माशी संबंधित असता त बाजूचे किरकोळ देश पाकिस्तान,बंगला देश शी संबंधित असतात. पण देशातील अनेक राज्य सर्वात गरीब देशात गणल्या जाणाऱ्या आफ्रिकन देशातील स्थिती पेक्षा वाईट स्थिती मध्ये आहेत हा कधीच राष्ट्रीय प्रश्न नसतो . शेती,कुटीर उद्योग,पशू पालन, आणि इंडस्ट्रिअल उद्योगात मोठ्या कंपन्यांन सुट्टे भाग बनवणारे उद्योग . जे स्वयं रोजगार निर्माण करतात आणि देशातील नागरिकांना गुलाम,नोकर बनवत नाहीत. त्यांच्या स्थिती विषयी कधीच चर्चा नसते. ह्या सर्वामध्ये सुधारणा करून स्वयं रोजगार मजबूत करावेत आणि जनतेला गुलमगिरी मधून मुक्त करावे. शहरात येणाऱ्या बेकार londhya ना रोजगार त्यांच्या गावात च निर्माण करावा. हे प्रश्न कधीच चर्चेत नसतात. ना पाकिस्तान ,बांगलादेश भारत ताब्यात घेणार आहे. ना मुस्लिम सर्व हिंदू ना मारणार आहे. हे सर्व कधीच अस्तित्वात नसलेल संकट आहे. पण तेच राजकारण मध्ये सर्वात चर्चित विषय अस्तात..
  • Log in or register to post comments

नक्की तुम्हाला म्हणायचे काय आहे?

Trump
गुरुवार, 01/20/2022 - 13:30 नवीन
नमस्कार सुनील, तुमचा प्रतिसाद समजला नाही. नक्की तुम्हाला म्हणायचे काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

सरळ अर्थ आहे

sunil kachure
गुरुवार, 01/20/2022 - 13:52 नवीन
जेव्हा लोकसभेची निवडणूक असते प्रसार माध्यमावर ज्या चर्चा आयोजित केल्या जातात त्या कधी देशाची आर्थिक स्थिती,देशातील गरिबी,काही राज्य वर्षांवर्ष गरीब आहेत त्याची कारणे आणि त्या वरचे उपाय. देशातील शहरांची अवस्था,रोजगाराची अवस्था,शेती ची अवस्था,बेरोजगारी,देशात असणारी प्रचंड गरिबी. ह्या विषयावर होतात का? तर बिलकुल नाही. कोणी तरी मौलाना,कोणी तरी हिंदू साधू बोलवायचे आणि फक्त धार्मिक चर्चा करत बसायचे. विधानसभा निवडणुकीत पण राज्याच्या आर्थिक धोरणं विषयी कोणीच बोलणार नाही. विज पुरवठा,सिंचन व्यवस्था,रस्त्यांची अवस्था. शहरांचे बकाल पण. ह्या वर चर्चा नाही अमक्या जातीला आरक्षण देवू,वीज फुकट देवू,कर्ज माफ करू. असले फालतू विषय अस्तात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

188 स्वामी, मिपा वर पुन्हा

रावसाहेब चिंगभूतकर
गुरुवार, 01/20/2022 - 13:57 नवीन
188 स्वामी, मिपा वर पुन्हा स्वागत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

188

प्रदीप
गुरुवार, 01/20/2022 - 15:03 नवीन
हे ते नव्हेत. इथे पूर्वापार एक आयडी नवनवे अवतार घेत आलेला आहे. सद्य अवतार त्याचाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

ही काय भानगड आहे

sunil kachure
गुरुवार, 01/20/2022 - 15:50 नवीन
१८८ चा इथे उल्लेख होत आहे.जरा समजून सांगावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

सहमत.

सुक्या
गुरुवार, 01/20/2022 - 22:53 नवीन
सहमत. लिहिण्याची पध्द्त पाहता ... हे १८८ स्वामी नवीन अवतारात आले आहेत हेच वाटते . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

आणि वाहिन्या जे खपते ते विकतात.

Trump
गुरुवार, 01/20/2022 - 15:34 नवीन
मान्य, लोकांची तितकी समज नाही, मते ह्या मुद्द्यांबर मिळत नाहीत. आणि वाहिन्या जे खपते ते विकतात. काही ठिकाणी मात्र अशी चर्चा होते.
देशातील शहरांची अवस्था,रोजगाराची अवस्था,शेती ची अवस्था,बेरोजगारी,देशात असणारी प्रचंड गरिबी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

पण देशातील अनेक राज्य सर्वात

विजुभाऊ
गुरुवार, 01/20/2022 - 13:47 नवीन
पण देशातील अनेक राज्य सर्वात गरीब देशात गणल्या जाणाऱ्या आफ्रिकन देशातील स्थिती पेक्षा वाईट स्थिती मध्ये आहेत हा कधीच राष्ट्रीय प्रश्न नसतो . याला जबाबदार कोण? स्वातंत्र्य मिळून ७ ०वर्षे झाल्यावरही हे प्रश्न अजून असावेत हीच सगळ्यात वाईट गोष्ट आहे. नबाब मलीक, संजय राऊत यांच्यावर बदाबदा बातम्या ओतणारे या बाबतीत गप्प का बसतात? हे विचारणे हे खरेतर नागरीक म्हणून आपले काम आहे. जी राज्ये मागास आहेत त्या राज्यांनी कितीतरी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्री दिले आहेत. पण त्या राज्यात उद्योग कधी आले नाहीत. आलेले उद्योग घालवण्यात त्यांच्या नेत्यांनी धन्यता मानली. तेथील जनता पोटासाठी इतर राज्यात जाते. याचा जाब ना त्या जनतेने कधी विचारला ना मिडीयाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

जगातील अर्धे गरीब फक्त पाच देशात

sunil kachure
गुरुवार, 01/20/2022 - 13:29 नवीन
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://blogs.worldbank.org/opendata/half-world-s-poor-live-just-5-countries&ved=2ahUKEwjImY397L_1AhUiTGwGHcoNDOAQFnoECCEQAQ&usg=AOvVaw0j86ZeSd85Xz1oiv6shVWz जगात असणाऱ्या गरीब लोकांपैकी अर्धे गरीब पाच देशात राहतात त्या मध्ये भारत आघाडीवर आहे. ह्या देशात पाकिस्तान नाही पण त्याची लाज आम्हाला वाटत नाही. त्या संबंधित प्रश्न राजकारण करणाऱ्या लोकांना महत्वाचे वाटत नाहीत.
  • Log in or register to post comments

'गरिबी हटाव' ही घोषणा

प्रसाद_१९८२
गुरुवार, 01/20/2022 - 13:45 नवीन
'गरिबी हटाव' ही घोषणा कॉंग्रेसने १९७१ मधे केली होती ना ! मग गेली कित्येक वर्षे कॉंग्रेस सत्तेत असून देखील भारतात इतके लोक गरिब राहिलेच कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

कॉंग्रेसने केलेल्या चुकांचे परिणाम, अद्याप आपण भोगतो आहेच

मुक्त विहारि
गुरुवार, 01/20/2022 - 14:01 नवीन
आणि पुढेही भोगावे लागतील... चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे बाहेरील शत्रु आहेतच शिवाय, काश्मीर, खालिस्तानी आन्दोलन हे अंतर्गत प्रश्र्न पण आहेतच स्वातंत्र्य मिळाल्या नंतर, लगेचच संरक्षणावर भर दिला असता तर, गोष्ट वेगळी झाली असती ... संरक्षण प्रथम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

चीन तर प्रगत झाला

sunil kachure
गुरुवार, 01/20/2022 - 14:10 नवीन
पाकिस्तान,बांगलादेश पण आर्थिक बाबतीत भारताच्या पुढे जातील आणि आपण आहे तिथेच राहू. आज चीन नी प्रचंड आर्थिक प्रगती केली आहे. आपण कुठे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

चीनला वेळीच वेसण घातली असती तर????

मुक्त विहारि
गुरुवार, 01/20/2022 - 14:17 नवीन
पाकिस्तान आणि बांगलादेश, यांची निर्मिती का झाली? शेषराव मोरे, यांनी एक ग्रंथात चांगला उहापोह केला आहे... जमल्यास जरूर वाचा ... बाय द वे, शेषराव मोरे, हे पारदर्शी चष्मा वापरतात...आमचा चष्मा भगव्या रंगाचा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

कृती विना

sunil kachure
गुरुवार, 01/20/2022 - 14:37 नवीन
वायफळ दाव्याना काही अर्थ नसतो भारताला अंतर्गत धोका बिलकुल नाही.असेल तर त्या वर अजून उपाय सापडत नसेल तर ब्रिटिश लोकांचा सल्ला घ्या. पाकिस्तान,बंगला देश सारख्या आकाराने, सामर्थ्य नी अतिशय किरकोळ देश कडून भारत असुरक्षित असेल तर chullu भर पाण्यात आत्महत्या च करावी भारत सरकार नी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

नक्षलवाद, इस्लामिक दहशतवाद ....

Trump
गुरुवार, 01/20/2022 - 15:32 नवीन
वायफळ दाव्याना काही अर्थ नसतो भारताला अंतर्गत धोका बिलकुल नाही.
नक्षलवाद, इस्लामिक दहशतवाद ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

नक्षलवाद, इस्लामिक दहशतवाद

मुक्त विहारि
गुरुवार, 01/20/2022 - 16:28 नवीन
सहमत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

भारताला अंतर्गत धोका बिलकुल नाही....

मुक्त विहारि
गुरुवार, 01/20/2022 - 16:28 नवीन
हो क्का? आपल्या प्रचंड वाचनाचा आनंद आहे... आम्ही आपले अजूनही, गोध्रा हत्याकांड, 1993 बाॅम्ब स्फोट, मुजफ्फरनगर दंगल, शीख हत्याकांड, आझाद मैदान दंगल, विसरू शकलेलो नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

मध्य रेल्वेकडून अनधिकृत घरं खाली करण्याच्या नोटिसा,

मुक्त विहारि
गुरुवार, 01/20/2022 - 14:07 नवीन
मध्य रेल्वेकडून अनधिकृत घरं खाली करण्याच्या नोटिसा, मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार श्रीकांत शिंदे यांचा विरोध. https://marathi.abplive.com/news/mumbai/notice-issued-by-central-railway-to-demolish-unauthorized-houses-minister-jitendra-awhad-mp-shrikant-shinde-tweet-1026635 बांधकाम अनधिकृत असेल तर, रेल्वेने भरपाई का द्यावी?उद्या, ह्याच न्यायाने, माझ्या जागेवर पण एखादे अनधिकृत बांधकाम उभे राहील आणि भरपाई मला द्यावी लागेल...
  • Log in or register to post comments

काँग्रेसने मंत्रिमंडळाला अंधारात ठेवत स्पेक्ट्रम कमी किमतीत विकल

मुक्त विहारि
गुरुवार, 01/20/2022 - 14:10 नवीन
काँग्रेसने मंत्रिमंडळाला अंधारात ठेवत स्पेक्ट्रम कमी किमतीत विकले”; Antrix-Devas प्रकरणावरुन अर्थमंत्र्याचे टीकास्त्र https://www.loksatta.com/desh-videsh/fm-nirmala-sitharaman-press-conference-antrix-devas-case-congress-kept-cabinet-in-dark-abn-97-2766762/ -------- कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत....हे माझे वैयक्तिक मत आहे ....
  • Log in or register to post comments

अत्याचारांपासून सोडवा, ही जमीन तुमची आहे”; पाकव्याप्त काश्मीरमधी

मुक्त विहारि
गुरुवार, 01/20/2022 - 14:13 नवीन
अत्याचारांपासून सोडवा, ही जमीन तुमची आहे”; पाकव्याप्त काश्मीरमधील कुटुंबाचे पंतप्रधान मोदींना आवाहन https://www.loksatta.com/desh-videsh/zulm-se-nijaat-dilao-pok-family-appeals-to-pm-narendra-modi-abn-97-2768323/ काश्मीर प्रश्र्न, युनोत नेल्याने, झालेले परिणाम आहेत... अर्थात, ह्याला जबाबदार म्हणजे, जवाहरलाल नेहरू....
  • Log in or register to post comments

रोहित पाटील

sunil kachure
गुरुवार, 01/20/2022 - 15:18 नवीन
ह्यांनी निवडणूक जिंकल्या नंतर जी प्रतिक्रिया दिली ती अतिशय mature होती ना कोणावर टीका,ना कोणाची लायकी काढली पण माझे शहर प्रगत असावे म्हणून पुढच्या वीस वर्षाचा विचार करून तशा योजना आखल्या जातील. शहराची प्रगती कशी होईल हीच आमची प्राथमिकता असेल. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आणि असेच नेते देशाला हवे हवेत. ह्याला gadu त्याची वाट लावू असली भाषा असणारे नको आहेत.
  • Log in or register to post comments

गृहमंत्री अमित शाह आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे यांना अटक करा”

मुक्त विहारि
गुरुवार, 01/20/2022 - 16:18 नवीन
गृहमंत्री अमित शाह आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे यांना अटक करा”; पाकिस्तानची ब्रिटन पोलिसांकडे मागणी ------- https://www.loksatta.com/desh-videsh/uk-police-received-request-to-arrest-indian-army-chief-general-manoj-mukund-naravane-and-union-home-minister-amit-shah-over-crimes-in-jk-abn-97-2769681/ ------- 370 हवे म्हणून, पाकिस्तान बोंबाबोंब करत आहे. आणि शत्रूराष्ट्राच्या ह्या मागणीला, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, विरोध करत नाही आहेत... कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, हे माझे वैयक्तिक मत आहे ....
  • Log in or register to post comments

ST कर्मचार्याच्या मुलाने, वडिलांना पगार नाही, म्हणून गळफास घेतला

मुक्त विहारि
गुरुवार, 01/20/2022 - 16:45 नवीन
एसटी संपामुळे पगार नसल्याचं सांगून वडील आंदोलनात गेल्यावर मुलाने घरात घेतला गळफास https://www.loksatta.com/maharashtra/st-workers-son-committed-suicide-scsg-91-2769819/ आता तरी, सरकारला काही जाग येईल का? छत्रपती शिवाजी महाराज, यांनी रयतेला कधीच त्रास दिला नाही...
  • Log in or register to post comments

पाकिस्तानी महिलेने इश्र्वरनिंदा केल्याने, मृत्युदंडाची शिक्षा

मुक्त विहारि
गुरुवार, 01/20/2022 - 17:01 नवीन
WhatsApp स्टेटससाठी २६ वर्षीय तरुणीला सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा https://www.loksatta.com/trending/pakistani-woman-sentenced-to-death-for-blasphemous-whatsapp-status-scsg-91-2769290/ ----- कायद्याचे असेच कठोर पालन हवे...
  • Log in or register to post comments

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा प्रयत्न;

मुक्त विहारि
गुरुवार, 01/20/2022 - 18:30 नवीन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा प्रयत्न; विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार https://www.loksatta.com/mumbai/bjp-chadrakant-patil-vigilance-committee-chhatrapati-shivaji-maharaj-forts-maharashtra-sgy-87-2769412/?utm_source=newsshowcase&utm_medium=discover&utm_campaign=CCwqGAgwKhAIACoHCAowu97zCjCnntQCMPiZNDDQrDs&utm_content=bullets हे प्रयत्न रोखण्यासाठी भाजपाच्या वतीने दक्षता समिती स्थापन करण्यात आली असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. ही समिती गडाचे वैभव अबाधित राखून सर्व गैरप्रकार हाणून पाडेल असं ते म्हणाले आहेत. ही समिती गडांना भेट देऊन गेल्या दोन वर्षात गडाचे पावित्र्य भंग करण्याचे कोणकोणते प्रयत्न झाले आहेत याची नोंद करेल अशी माहिती त्यांनी दिली आहे..... ------- अशिक्षित हिंदू असल्याने, मला तरी, भाजप शिवाय पर्याय नाही...
  • Log in or register to post comments

बेटी बचाव,बेटी पढाव

sunil kachure
गुरुवार, 01/20/2022 - 19:40 नवीन
https://www.loksatta.com/trending/rtd-ias-officer-surya-pratap-singh-slams-pm-modi-for-saying-beti-bachao-beti-patao-modi-instead-of-saying-padhao-scsg-91-2770043/lite/ ह्या योजनेचे नाव च आदरणीय पंतप्रधान विसरले.
  • Log in or register to post comments

ना पाकिस्तान ,बांगलादेश भारत ताब्यात घेणार आहे. ना मुस्लिम सर्व

स्वलिखित
गुरुवार, 01/20/2022 - 22:38 नवीन
... काल परवाच 31 वर्ष पूर्ण झालीत ...
  • Log in or register to post comments

उत्पल पर्रीकर

चंद्रसूर्यकुमार
Fri, 01/21/2022 - 18:59 नवीन
उत्पल पर्रीकरांनी आपण पणजीमधून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवार लढवायचा निर्णय जाहिर केला आहे. भाजप समर्थक आणि मनोहर पर्रीकरांविषयी आदर असलेल्या सगळ्यांनाच आज वाईट वाटत असेल हे नक्कीच. पत्रकार परीषदेत उत्पल पर्रीकर यांनी इतर कोणत्याही पक्षात जायचा संबंध नाही हे स्पष्ट केले आहे आणि आपल्या मनात भाजप आहेच फक्त पक्षाने वाईट व्यक्तीला उमेदवारी दिली आहे म्हणून पणजीतल्या लोकांना एक पर्याय देण्यासाठी हे करणे भाग आहे असे ते म्हणाले आहेत हे त्यातल्या त्यात चांगले आहे. उत्पल यांना कितपत मते मिळतील, विजय मिळेल की नाही हे सांगता येणार नाही पण समजा विजय मिळाला तरी ते आमदार म्हणून भाजपलाच पाठिंबा देतील ही अपेक्षा आहेच. भाजपने म्हापसा मतदारसंघातून मनोहर पर्रीकरांच्या मंत्रीमंडळातील उपमुख्यमंत्री (आणि पर्रीकरांचे निधन झाले त्यापूर्वी एक महिना कर्करोगानेच निधन झालेले) फ्रान्सिस डिसूझांचा पुत्र जॉशुआ डिसूझाला उमेदवारी दिली आहे. तर वाळपईमधून माजी मुख्यमंत्री (आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते) प्रतापसिंग राणे यांचे पुत्र विश्वजीत राणे यांना तर प्रतापसिंग राणे यांच्या पोरी मतदारसंघातून विश्वजीत राणेंची पत्नी देविया राणे यांना उमेदवारी दिली आहे. इतकेच नाही तर बाबूश मोन्सेराटची पत्नी जेनिफर मोन्सेराटला तळीगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. असे असेल तर मग उत्पल पर्रीकरांनाच का उमेदवारी नाकारली आहे हे समजले नाही. उत्पल पर्रीकर यांना शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

पर्रिकर ह्यांचे पुत्र

sunil kachure
Sat, 01/22/2022 - 01:06 नवीन
लोकप्रिय असतील,कोणत्याच चुकीच्या कामात सहभागी नसतील, बापा सारखेच प्रामाणिक असतील तर त्यांना bjp नी उमेदवारी का नाही दिली. जर ये भ्रष्ट असतील,त्यांची कुवत नसेल,त्यांना समाजात मान नसेल. तर ते निवडून येणार नाहीत पण त्यांनी bjp लाच समर्थन करावे ही अपेक्षा अताताई आहे. ते लोकप्रिय आहेत आणि त्यांना संधी दिली तर केंद्रीय नेतृत्व ला ते डोईजड होतील ही भीती bjp ला आहे . बाकी त्यांना तिकीट न देण्याचे दुसरे कोणतेच कारण नाही
  • Log in or register to post comments

अती म्हणजे अतीच शाहणा

sunil kachure
Sat, 01/22/2022 - 01:33 नवीन
देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच गोवा निवडणुकी चे पक्षाचे पदाधिकारी असणारा म्हणून परिकर ह्यांच्या मुलाला तिकीट मिळाले नसेल
  • Log in or register to post comments

उत्पल पर्रीकर

कपिलमुनी
Sat, 01/22/2022 - 13:04 नवीन
उत्पल पर्रीकर हे कोणत्याही दृष्टीने भाजपचे योग्य उमेदवार नाहीत. १.उच्च शिक्षित आहेत २. त्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत ३. त्यांच्याकडे गुंड पाळलेले नाहीत ४ दुर्दैवाने त्यांच्या वडिलांनी करोडो रुपयांची माया गोळा केली नाही ५ मग हे लोकांना धमकावणार कसे? आदल्या रात्री पैसे वाटणार कसे? आणि चुकून निवडून आले तरी पक्ष निधीत कॉन्ट्रीब्युशन देणार कसे ?? शिवाय महाराष्ट्र भाजपची वाढ करणारे फडणवीस सारखे नेतृत्व असताना योग्य कार्यक्रम करतीलच
  • Log in or register to post comments

+१.

अमरेंद्र बाहुबली
Sat, 01/22/2022 - 14:09 नवीन
+१. त्या पेक्षा त्यानी कोंग्रेस मध्ये जावे. काही वर्षानी त्यांच्यासाठी भाजप रेड कार्पेट अंथरेल नी केंद्रात ऊद्योगमंत्री पदही देईल. भाजपात कार्यकर्ता म्हणून सतरंज्याच ऊचलाव्या लागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

+ १

sunil kachure
Sat, 01/22/2022 - 14:26 नवीन
एकदम बरोबर .मंत्रिपद पाहिजे असेल तर .उमेदवारी हवी असेल तर via काँग्रेस असे bjp मध्ये यावं लागत काँग्रेस मध्ये प्रशिक्षण घेतल्या शिवाय bjp तिकीट पण देत नाही आणि मंत्री पद पण देत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पर्रीकरांना भाजपच्या

अमरेंद्र बाहुबली
Sat, 01/22/2022 - 15:53 नवीन
पर्रीकरांना भाजपच्या दारामध्ये भीक मागण्याची वेळ, असे शिवसेना नेते संजय राऊत का म्हणाले... https://zeenews.india.com/marathi/india/time-to-beg-for-manohar-parrikars-son-at-bjps-doorstep-sanjay-raut/602813?fbclid=IwAR1yws-X07kTsBXi2H0U6lwqnur-DLop3betthj_bsJDYntONI4pFVy02Qs
  • Log in or register to post comments

या वर्षी भारताच्या

निनाद
Mon, 01/24/2022 - 04:51 नवीन
या वर्षी भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना, लेखक टी. ए. सिन्हा यांनी आदिवासी नायक बिरसा मुंडा यांच्या जीवनावर अंकिता वर्मा सह-लेखिके बरोबर एक पुस्तक लिहिले आहे. 'लिजेंड ऑफ बिरसा मुंडा' हे पुस्तक आदिवासी क्रांती आणि बिरसा मुंडा यांच्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा आढावा घेते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले. भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटीश आणि ख्रिश्चन मिशनर्‍यांविरुद्ध केलेल्या क्रांतीने झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागात राहणाऱ्या आदिवासींच्या जीवनात चैतन्य आणले होते. त्यांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग केला आणि चाईबासा मिशनरी स्कूलमधून बाहेर पडले. बिरसैत या नावाने ओळखली जाणारी धार्मिक चळवळ ख्रिश्चन मिशनरी आणि जमीन मालक असलेल्या 'डिकस' किंवा अत्याचारी लोकांविरुद्ध केंद्रित होती. त्यांनी आपल्या आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध धैर्याने लढा दिला. त्याच्या धार्मिक चळवळीत सामील झालेल्यांपैकी अनेक असे मुंडा होते ज्यांनी पूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. पण त्यातला फोल पणा लक्षात आल्यावर त्यांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग केला आणि ते परत हिंदू बनले. बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात इ.स १८९५ साली लढा उभारला. इंग्रजांनी त्याला अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला. ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला. वणी गडाला जातांना आदिवासी नायक बिरसा मुंडा यांचे एक स्मारक महाराष्ट्रात उभारलेले दिसते. शीर्षक: 'द लीजेंड ऑफ बिरसा मुंडा' लेखक: तुहिन सिन्हा आणि अंकिता वर्मा प्रकाशक: मंजुल पब्लिकेश्न्स पृष्ठे: ४०० किंमत: रुपये ४९९
  • Log in or register to post comments

छान माहीती.

सुक्या
Tue, 01/25/2022 - 02:00 नवीन
छान माहीती. टाटा स्टील मधे काम करत असताना रांची / दुमका / चाईबासा वगेरे ठिकाणी खुप भ्रमंती झाली. गावोगावी बिरसा मुंडा यांचे पुतळे आहेत. मला ते आदेवासी नायक आहेत हे माहीत होते परंतु भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान होते हे माहीत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

स्वदेशी विकसित रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र

निनाद
Mon, 01/24/2022 - 05:43 नवीन
DRDO मॅन-पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड मिसाईल (MPATGM) ची यशस्वी चाचणी केली. स्वदेशी विकसित रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र कमी वजनाचे आहे आणि ते पोर्टेबल लाँचरमधून सोडले जाते. यामुळे शत्रू रणगाड्यांना युद्धात मोठा दणका बसणार आहे. हे फायर-अँड-फॉरगेट अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्र किमान २०० ते ३०० मीटर आणि कमाल ४ किमी अंतरावर मारा करू शकते. हे पुर्णपणे आत्मनिर्भर भारत योजनेनुसार भारतात बनलेले क्षेपणास्त्र आहे. या प्रगतीमुळे भारताने इस्रायली स्पाइक (ATGM) घेण्याचा पुर्वी केलेला एक मोठा करार रद्द केला. या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची निर्मिती भारत डायनॅमिक्स लिमिटेड द्वारे भानूर , तेलंगणा येथे केली जाईल.
  • Log in or register to post comments

मोदी सरकारने स्वयंपूर्णतेच्या

सुबोध खरे
Mon, 01/24/2022 - 10:24 नवीन
मोदी सरकारने स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करताना अशी अनेक कंत्राटे रद्द केलेली आहेत हि अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कारण या कंत्राटात मिळणारे कमिशन यासाठी सरकारी बाबूंपासून राजकारणी, लष्करी अधिकारी आणि संरक्षण उत्पादन खात्यातील अनेक लोकांचे लागेबांधे जुळलेले असतात. भारतीय तंत्रज्ञान निकृष्ट आहे हे सिद्ध करायचे आणि मग त्याजागी शस्त्रास्त्रे आयात करायची हा प्रकार गेली काही दशके चालू होता. जो देश मंगळावर यान पाठवू शकतो, उपग्रह पाठवू शकतो, आंतरखंडीय क्षेपणास्त्रे बनवू शकतो त्याला ४ किमी टप्पा असलेले क्षेपणास्त्र बनवता येणार नाही का? बऱ्याच वेळेस दिल्लीतील ल्युटेन्स वाल्यानी आपल्या शास्त्रज्ञांचे हात बांधलेले होते. त्यातून उत्तम काम करणाऱ्या शास्त्रज्ञाला बढती देण्याऐवजी तो आपल्याला वरचढ होईल या भीतीने वरिष्ठ लोक त्याला काम करू देत नाहीत. सारखे काड्या घालणे, मूळ काम सोडून इतरच कामला त्याला जुंपणे, असे झाल्याने काही कालावधीनंतर हाच हुशार शास्त्रज्ञ नोकरी सोडून जातो आणि त्याला उच्च पगारावर नोकरी देण्यात त्याच क्षेत्रात काम करणाऱ्या परदेशी कंपन्या टपून बसलेल्या असतात. त्यांचे अशा हुशार अभियंत्यांवर बारकाईने लक्ष असते. यात दिल्लीतील अनेक जणांचे साटे लोटे आहेत. अनेक वेळेस प्रामाणिक लष्करी अधिकारी सुद्धा यात अनवधानाने सामील होतात. एक चक्षुर्वैसत्यं उदाहरण देतो आहे विराट हि विमानवाहू नौका भारताच्या नौदलात १९८७ साली समाविष्ट झाली. १९९० मध्ये तेथे तात्पुरता (काही काळासाठी) मी प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. नौकेसाठी आणि त्यावरील हॅरियर या विमानासाठी असलेली अनेक उपकरणे आणि आयुधे इंग्लंड मधून आलेली होती आणि तशीच उपकरणे (दुसरा सेट) भारतातूनहि विकत घेतली. स्क्रू पिळण्यासाठी एक विशिष्ट पकड मला दाखवत एक नौसैनिक म्हणाला सर हि बघा इंपोर्टेड पकड आणि हि भारतीय पकड यात फरक बघा. अर्थात त्यात फरक होताच. हाप्रश्न मी माझ्या वैमानिक अभियंता मित्राला विचारला. त्यावर तो म्हणाला इंग्लंड मधून आणलेली पकड हि २०० पौंडाला आणली आहे आणि हि भारतीय पकड निविदा काढून सर्वात स्वस्त कंत्राट देणार्याकडून विकत घेतलेली आहे. २०० पौंड म्हणजे १६ हजार रुपये ( तेंव्हा पौंडाचा भाव ८० रुपये होता) १६ हजार रुपये आणि १८० रुपये याच्या दर्जात अर्थात फरक येणारच. पण हि गोष्ट सामान्य नौसैनिकास कशी समजेल? मी मित्राला विचारले तेंव्हा तो म्हणाला कि भारतीय माल घ्यायचा असेल तर L १ लाच (lowest quotation) द्यायला लागते. त्यामुळे वरपासून खालपर्यंत सर्वच आयात मालाचा आग्रह धरतात. दिल्लीतील लोक त्यात मिळणाऱ्या मलिद्यासाठी आणि माझ्यासारखे प्रामाणिक लोक २०० कोटीचे विमान एखाद्या तकलादू उपकरणामुळे खराब होऊ नये म्हणून. जोवर उच्च दर्जासाठी या प्रक्रियेत L १ (lowest quotation) बदल करत नाहीत किंवा त्याला अपवाद करता येत नाही तोवर भारतीय माल म्हणजे खराबच किंवा कमी दर्जाचा या मनोवृत्तीत बदल होणार नाही. इसरो किंवा अणुशक्ती या खात्यात तंत्रज्ञान विकत घेताच येत नाही तेथे भारतीय शास्त्रज्ञांनी दैदिप्य्मनरीतीने काम केलेले आहे. याचा अर्थ भारतीय माणसे कुठेही कमी पडत नाहीत. त्यातून अनेक वर्तमानपत्रे भारतीय मालाबद्दल लष्कर साशंक आहे अशा तर्हेच्या बातम्या मधून मधून पसरवत असतात. अर्थात त्यात त्यांचे बोलविते धनी यांचा स्वार्थ असतो इस्रायली स्पाईक या एका क्षेपणास्त्राची किंमत ४६ लाख आहे तर संपूर्ण भारतीय बनावटीच्या man-portable anti-tank guided missile ची किंमत अंदाजे १० लाखाच्या आसपास येईल. याचा अर्थ एका इस्रायली क्षेपणास्त्राच्या ऐवजी आपण ४ ते ५ क्षेपणास्त्रे वापरू शकतो. याचा दोन्ही बाजूनी अर्थ लावता येईल. १) मुळात पाचपट क्षेपणास्त्रे तयार ठेवा आणि थोडी फार फुकट गेली तरी चालतील २) काही लोक असेही म्हणून शकतात कि ऐन युद्धाच्या वेळेस अत्यंत अचूक क्षेपणास्त्र जास्त चांगले. परंतु एकंदर भारतीय क्षेपणास्त्रांची अचूकता आणि कार्यक्षमता पाहिल्यास इस्रायली क्षेपणास्त्रांपेक्षा ती कमी अचूक असतील असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. कदाचित भारतीय क्षेपणास्त्रे जास्त अचूक आणि जास्त घातक असावीत असा प्राथमिक अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा