Skip to main content

सिंधूताई सपकाळ

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 05/01/2022 04:44 या दिवशी प्रकाशित केले.
अनाथांची एक माय आता राहिली नाय जाता सिंधू सपकाळ गहिवरला खूप काळ असंख्य अन्याय साहिले अपमानांचे धग दाहिले मग मागे नाही पाहिले उपेक्षितांना आयुष्य वाहिले जग वंदू वा नि नींदू होते निराधार जे हिंडू झाली करुणा-सिंधू अनाथाची मान बिंदू एके दिसी दारावर कोण? ना चिट्ठी नाही फोन लिन -दीन ते डोळे दोन पती पापाचे फिटे ना लोन ज्याने केले निराधार उन्मत्त होता जो भ्रतार त्याचाही केला उद्धार विकलांगा दिला आधार झाली जितेपणीच आख्यायिका राखेतून उठता समाज नायिका कीर्ती झाली गुणगान गायिका गौरवू त्या अनाथ आधारदायिका
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2924
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

कविता आवडली. समयोचित रचना. भावपुर्ण श्रध्दांजली.

छान. कधी भेटण्याचा किंवा प्रत्यक्ष बोलण्याचा योग आला नाही. पण त्यांच्या कार्याबद्दल ऐकुन होतो. अशा माणसांकडुन स्फुर्ती मिळते. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रध्दांजली!!

कविता आवडली. माईस भावपूर्ण श्रद्धांजली._/\_

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Maai Bappa Vithala