✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शुभेच्छा २०२२

अ
अनुस्वार यांनी
Sun, 01/02/2022 - 14:05  ·  लेख
लेख
या नव्या वर्षात मोरासारखं जगायला शिकायचं. कितीही नितांतसुंदर गोष्ट आपल्याला गवसली तरी त्यावर आपली मालकी अनंतकाळ नाही याचं भान तसंच ठेवायचं. शक्यतो ती मालकी योग्य वेळी आपणहून सोडायची. मोरपीस किती सुंदर असतात! कधी एखादा हाती लागला तर आपण हावरटा सारखे जपून ठेवतो तो ठेवा. मोराकडे तर गुच्छच असतो तशा‌ पिसांचा. त्या मनमोहक पिसाऱ्याचा करायचा तो वापर तोही करतोच. पण नंतर त्या‌ पिसाऱ्याचा गुलाम होत नाही.‌ हिवाळ्याच्या सुरूवातीला सगळे मोरपीस झाडून टाकायला सुरुवात होते. मग निसर्ग अशा निर्लोभी जीवांना 'ते' सौंदर्याचं दान दरवर्षी देतो‌. तुमच्याकडे अशी मोरपंखी माणसं, आठवणी, वस्तू इ.इ. बरंच काही असेल. त्या टाकून द्या असं नाही सुचवत आहे.‌ पण त्यात 'अडकून पडायचं' मात्र टाळा. कुणीही प्रचंड आवडती किंवा नावडती व्यक्ती मनात आणा. त्याची/तिची खरी किंमत/महत्त्व याचा अंदाज लावायला जमतोय का? नाही ना. इतरांचेही तुमच्या बाबतीत असेच होत असेल. म्हणून कुणाचे राग-प्रेम सदैव एकाच साच्यात बसवून नाही स्वीकारायचे. आपण सगळे एकाच कुंडीतले जीव आहोत. कुणी माती, कुणी काटा, कुणी गुलाब तर कुणी अत्तर! तेव्हा मोराला लक्षात ठेवायचं. संकटांचा मुसळधार पाऊस कोसळत असेल तर आपल्याकडचं सर्वोत्तम जगासमोर उघडं करून मनसोक्त नाच करायचा. आणि गरज संपली की 'ते' उत्तम दुसऱ्या कुणाला सुपूर्द करायचं. नाच विसरायचा नाही. लोभ धरायचा नाही. आयुष्याला कवटाळायचं आणि मनसोक्त हसायचं. कारण 'सुखाचा सदरा' नेसायला पैशांच कापड लागत नाही. नूतन वर्षाभिनंदन :-)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
1509 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

लेख अगदी मोराच्या

आनन्दा
Mon, 01/03/2022 - 08:11 नवीन
लेख अगदी मोराच्या पिसार्यासारखा आहे!!
  • Log in or register to post comments

:-)

अनुस्वार
Mon, 01/03/2022 - 17:51 नवीन
आभार, आनन्दा जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा