मोबाईल फोनच्या वापराने कर्करोग होतो का नाही ? भयंकर पेचात टाकणारा हा प्रश्न ! आजकाल प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा कारण जगातील बहुसंख्य लोक आता ‘मोबाईलधारी’ झालेले आहेत. मग काय आहे या त्रस्त करणाऱ्या प्रश्नाचे उत्तर ? जरा थांबा. न्यायालयात उलट तपासणी घेणारा वकील जेव्हा गुळूमुळू किंवा मोघम उत्तर देणाऱ्या साक्षीदाराला ‘हो’ का ‘नाही’ असे खडसावून विचारतो तसे मला किंवा शास्त्रज्ञांना विचारू नका ! कारण, आजच्या घडीला तरी या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ या दोन पर्यायांच्या मध्ये कुठेतरी आहे.
उत्तर समजण्यासाठी जगात आजपावेतो झालेल्या संबंधित संशोधनाचा थोडक्यात आढावा घेतो. या लेखातील माहिती ही अधिकृत वैद्यकीय संस्थळावरून घेतलेली आहे, वृत्तपत्रातील बातम्यांवरून नाही.
या विषयावर १९९० पासून आजपर्यंत अनेक देशांत ३० मान्यताप्राप्त संशोधन अभ्यास झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष अगदी टोकाचे उलट सुलट आहेत. त्यामुळे आपणच काय पण शास्त्रज्ञ सुद्धा अगदी गोंधळात पडले आहेत, हे नक्की. वाचकांचा कमीत कमी गोंधळ व्हावा असा प्रयत्न करत या विषयाचे थोडक्यात खालील मुद्दे मांडतो.
१) मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या लहरी या ‘ RF रेडिएशन’ प्रकारच्या असतात.
२) या लहरींमुळे होऊ शकणाऱ्या कर्करोगाच्या संशोधनाचा मुख्य झोत आपला मेंदू व लाळग्रंथी यांवर आहे.
३) मोबाईल प्रचंड प्रमाणात वापरणाऱ्या लोकात मेंदूचा ‘ glioma’ हा रोग होण्याची शक्यता खूप आहे.
४) बरेचसे अभ्यास हे 2G फोन लहरींच्या संदर्भातले आहेत. काही अभ्यासामध्ये प्रयोगशाळेत ‘सेल कल्चर’ चा वापर झाला तर काहींमध्ये प्राण्यांवर प्रयोग झाले.
५) या फोनलहरी कर्करोगकारक (carcinogenic) आहेत की कर्करोगसहाय्यक (cocarcinogenic) या बाबतीत संशोधकांमध्ये खूप मतभेद आहेत. दोन्ही गट आपापल्या मतावर ठाम आहेत. अगदी आस्तिक व नास्तिक याप्रमाणे !
६) मोबाईलच्या शोधापूर्वी कर्करोग होण्याची जी कारणे प्रस्थापित झाली आहेत त्यामध्ये जनुकीय बदल (mutations) व अनेक प्रकारच्या रसायनांशी जवळचा व दीर्घकालीन संपर्क आणि विविध प्रकारची रेडीएशन ही महत्वाची आहेत. तंबाकूचे सेवन हे त्यापैकी एक उदाहरण.
७) त्यामुळे, शरीरात अयोग्य जनुकीय बदल झालेल्या एखादा माणूस जर दीर्घकाळ तंबाकूचे सेवन करीत असेल( किंवा अन्य रेडीएशन च्या संपर्कात असेल) आणि जोडीला त्याला मोबाईलचेही व्यसन जडले असेल तर त्याला कर्करोग होण्याची शक्यता अधिक आहे यावर बऱ्याच संशोधकांचे एकमत दिसते.
८) ‘मोबाईल मुळे कर्करोग होतो’ या विधानापेक्षा ‘ शरीरात अगोदरच असलेली कर्करोगपूरक परिस्थिती मोबाईलमुळे अधिक रोगपूरक होते’ हे विधान अधिक मान्य होण्यासारखे आहे.
९) असे संशोधन प्राण्यांपेक्षा अधिकाधिक प्रमाणात थेट माणसांवर होणे आवश्यक आहे. परंतु, सध्या त्याला एका कारणाने मर्यादा येत आहेत.
संशोधन करताना माणसांचे २ गट करावे लागतात. एक गट अति मोबाइलचा वापर करणाऱ्यांचा तर दुसरा अजिबात मोबाईल न वापरणाऱ्यांचा. आता बघा, पहिला गट मिळणे अगदी सोपे आहे कारण सध्या ‘मोबाईल-अतिरेकी’ अगदी पोत्याने सापडतील. पण, अजिबात मोबाईल न वापरणारी माणसे खरेच दुर्मिळ आहेत ! प्रयोगापुरती तयार करायची म्हटली तरी त्याना दीर्घकाळ ( १०-२० वर्षे !) मोबाईलविना जगावे लागेल.
अहो, माणूस एकवेळ दारू-सिगरेट सोडेल हो, पण मोबाईल, छे काहीतरीच काय !
१०) तेव्हा सध्या एवढे करता येईल की ज्या व्यक्ती कर्करोगजन्य घटकांच्या संपर्कात आहेत (उदा. तंबाकू किंवा अन्य रेडीएशन) आणि मोबाईलचा अतिरेकी वापर करीत आहेत त्यांच्यावर दीर्घकाळ देखरेख व संशोधन करावे लागेल कारण गाठी तयार करणाऱ्या कर्करोगाची (solid tumors) वाढ ही संथ असते.
अलीकडे मोबाईल मुळे आपल्या आकलनशक्तीवर होणाऱ्या परिणामांवर बरेच संशोधन चालू आहे.
तर वाचकहो,
अशी आहे ‘मोबाईल व कर्करोग’ या वादग्रस्त गृहीतकाबाबतची आजची परिस्थिती. समाजात यावर मतांतरे असणारच. शास्त्रीय वादविवादही झडत राहणार. कुठलाही ठोस निष्कर्ष काढणे सोपे नसणार. पण, मोबाईलचे व्यसन लागू न देता त्याचा मर्यादित वापर करणे आपल्या सगळ्यांच्याच हिताचे आहे यात शंका नाही.
****************************************
मिसळपाव
प्रतिक्रिया
मोबाइल टॉवरचा त्रास होतो हे
मोबाइल टॉवरचा त्रास होतो हे ह्या बातमीवरुन दिसते
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/man-wins-fight-against…
बातमीशी सहमत आहे . अजून काही
In reply to मोबाइल टॉवरचा त्रास होतो हे by मराठी_माणूस
बातमीशी सहमत आहे . अजून काही असे दावे वाचले आहेत.
माहितीबद्दल आभार.
आजच पेप्रात की कुठे तरी वाचलं की मोबाइल वापरामुळे कर्करोग होतो एक सेकंदभर गपगार आणि दुस-या क्षणी असल्या संशोधनाच्या बातम्या थोतांड असतात म्हणून सोडूनही दिलं.
दर दोन दिवसाला कोणत्या तरी परदेशी यूनवर्सिटीत असे संशोधन झाले अन तसे संशोधन झाले, परदेशी डॉक्टर तज्ञाची टीम ने असे केले आणि तसे केले आणि अमुक अमुक निष्कर्ष काढले. अरे शांततेने जगु द्या ना भो...!
सुरुवातीला टीव्ही आला तेव्हाही अशा बातम्या यायच्या, मधे ते पेजर होते तेव्हाही अशा बातम्या, कंप्यूटरच्या अतिवापरामुळे यो होतं आणि त्यों होतं, आता मोबाइलच्या अतिवापरामुळे असं होतं आणि तसं होतं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणाम होतात एवढं मात्र कळतं.
अवांतर : मोबाइलच्या अति वापरामुळे कर्करोग होतो की नाही ते सांगता येणार नाही, पण दृष्टी मात्र कमी होत असावी असे वाटते.
-दिलीप बिरुटे
(मोबाइलचं व्यसन असलेला)
धन्यवाद, दिलीप बिरुटे !
धन्यवाद, दिलीप बिरुटे !
रेडियो लहरी आणि कर्करोग
कुमार१,
माझ्या माहितीप्रमाणे फिरस्त्या (=मोबाईल) मधले जे रेडियो असतात त्यातनं बाहेर पडणाऱ्या लहरींची शक्ती अत्यल्प असते. त्यातून कर्करोग होत नाही. मात्र तरंगस्तंभ ( = मोबाईल टॉवर्स) असतात त्यांतून बाहेर पडणारं प्रारण (=रेडियेशन) बरंच जास्त असतं. हे खरं घातक व कर्करोगजन्य असतं. कारण की स्तंभास असंख्य फिरस्ते जोडले गेलेले असतात. म्हणून एकेक फिरस्त्याचं प्रारण कमी शक्तीचं असलं तरी सगळ्यांची बेरीज बरीच होते.
आ.न.,
-गा.पै.
गा पै, सहमत आहे.
गा पै, सहमत आहे.
सम्यक
बर्यापैकी सम्यक लिहिले आहे.
पण
आअपण मोबाईल वा परला नाही तरीही आपण आजूबाजूचे फोन , टौवर टा ळू शकत नाही. ऑफि स मधे एका फ्लोअर वर २५० फोन्स असतात.
अगदी बरोबर.
In reply to पण by nanaba
अगदी बरोबर.
सहमत आहे
सहमत आहे
गेल्या २० वर्षात आपला टीव्ही
गेल्या २० वर्षात आपला टीव्ही, संगणक आणि मोबाइल यांचा वापर खूप वाढला. त्यातून जे 'प्रदूषण' होते त्याला आता वैज्ञानिकानी "electropollution" असे नाव दिले आहे. या प्रदूषणाचे दुष्परिणाम हे संवेदनशील व्यक्तींमध्ये होउ शकतात. त्यामध्ये २ प्रमुख आजारांचा समावेश आहे:
१. आपली आकलनशक्ती (cognition) कमी होणे आणि
२. अल्झायमर आजार
भविष्यात या संशोधनातून यावर अधिक प्रकाश पडेल.
नवे पुस्तक
महाराष्ट्रात ‘मोबाईल टॉवर ग्रीव्हन्स फोरम’ची स्थापना करणारे आणि ‘मोबाइल फोन व टॉवर रेडिएशनचे दुष्परिणाम आणि उपाय’ या पुस्तकाचे सहलेखक मिलिंद बेंबळकर यांचं ‘5G वायरलेस तंत्रज्ञान - दुष्परिणाम आणि उपाय’ हे नवं पुस्तक लवकरच ई-बुक स्वरूपात प्रकाशित होत आहे.
या पुस्तकातील दोन प्रकरणांचा हा संपादित अंश इथे
टावर सानिध्य महत्त्वाचे.
इथे लहरी जोरदार असतात. म्हणजे इमारतीवर टॉवर असेल तर आजुबाजूच्या घराकडेही प्रभाव असतो.
मायक्रोवेव्ह ?
असे संशोधन 'मायक्रोवेव्ह ओव्हन' विषयी झाले आहे का ? असल्यास कृपया कळवावी.
मायक्रोवेव
In reply to मायक्रोवेव्ह ? by सौन्दर्य
या विषयावर बरच काही उलट-सुलट वाचायला मिळेल. बरेच समज-गैरसमज पसरले आहेत.
मायक्रोवेव्हमध्ये अन्न शिजवताना मायक्रोवेव उपकरणाचे दार व्यवस्थित सीलबंद असेल तर तो किरणोत्सर्ग बाहेर येत नाही. तसेच थोडाफार जरी बाहेर पडला तरी त्याची किरणोत्सारी ताकद बरीच कमी असते. याचा प्रभाव त्या उपकरणापासून दोन इंच अंतरापर्यंत मर्यादित राहतो.
या प्रकारचे उपकरण जर निर्दोष आणि मानकाप्रमाणे बनवलेले असेल तर त्यापासून धोका नाही. उपकरणात बिघाड झाल्यास काही प्रमाणात किरणोत्सर्ग बाहेर पडेल.
https://www.cancer.net/blog/2021-03/can-using-microwave-cause-cancer
https://www.who.int/news-room/questions-and-answers/item/radiation-micr…
लिकी मावे
In reply to मायक्रोवेव by हेमंतकुमार
लिकी मावे
मावेच्या आत मोबल्या ठेवून कॉल करायचा, मोबल्याने कॉल पीक अप केला तर मावे लिक करतो असे समजायचे असे कोठेतरी वाचल्याचे स्मरते.
खरे खोटे मावे जाणे.
वा !
In reply to लिकी मावे by चामुंडराय
😀 😀
मावे ?
In reply to लिकी मावे by चामुंडराय
हे मावे प्रकरण काय आहे हे समजेपर्यंतच डोक्यातून करंट लीक झाला, लेकिन अब समझ मे आया. प्रयोग करून पाहीन म्हणतो.
अभ्यासपूर्ण लेख : दुवा
युनायटेड किंगडममध्ये 5Gसंबंधीचे कोणतेही निर्णय नागरिकांच्या संमतीने घेण्यात आलेले नाहीत. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे
<strong>निर्णय नागरिकांच्या संमतीने </strong> म्हणजे काय?
In reply to अभ्यासपूर्ण लेख : दुवा by हेमंतकुमार
निर्णय नागरिकांच्या संमतीने म्हणजे काय?
त्या
In reply to <strong>निर्णय नागरिकांच्या संमतीने </strong> म्हणजे काय? by Trump
लेखाचे शीर्षक बरोबर वाटत नाही.
त्यांना म्हणायचे आहे ते खालील वाक्यात स्पष्ट होते :
उच्चरक्तदाब ?
मोबाईल फोनचा अधिक प्रमाणात वापर आणि त्यामुळे नव्याने उच्चरक्तदाब जडण्याची शक्यता, या विषयावरील एक मोठे संशोधन इथे प्रकाशित झाले आहे
त्यामध्ये सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांवर अभ्यास केलेला दिसतो.
अशा प्रकारे उच्च रक्तदाब जडण्याची शक्यता 12 टक्क्यांनी वाढते असा तिथला निष्कर्ष आहे.
तूर्त या संशोधनाला एक गृहीतक इतपत म्हणता येईल असे मत बरेच तज्ञांनी व्यक्त केले आहे.
नेहमीप्रमाणेच या विषयावर भरपूर उलटसुलट मते व्यक्त झालेली आहेत.
रक्तदाब.. हं.
In reply to उच्चरक्तदाब ? by हेमंतकुमार
रक्तदाब.. हं.
कोणतीही एक गोष्ट आणि रक्तदाब यांच्यात कार्यकारणभाव सहज establish करता येऊ शकेल. सर्वच गटांत रक्तदाब असलेले लोक भरपूर असणार. प्रत्येक गटात चार पाच टक्के कमी किंवा जास्त प्रमाण असणार.
त्यात मोबाईलचा जरा कमी वापर करणाऱ्या गटात दोन टक्के कमी आढळले तर statistically significant असे म्हणून टाकावे.
पुस्तक वाचणारे, न वाचणारे.
IIT चे विद्यार्थी , अन्य कॉलेजचे विद्यार्थी
सरकारी नोकरी, खाजगी नोकरी
....
....
अनेक संशोधने शक्य.
होय ,
In reply to रक्तदाब.. हं. by गवि
अगदी बरोबर..
अभ्यास खूप मोठ्या समूहावर झाला आहे आणि अधिकृत वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झालेला आहे म्हणून दखल घेतली इतकेच.
लगेच कुठलाही अंतिम निष्कर्ष काढायचा नाही.
Compared with mobile phone
In reply to होय , by हेमंतकुमार
Compared with mobile phone non-users, mobile phone users were younger, more likely to be smokers, had higher BMI, lower SBP levels, higher frequency of family history of hypertension, and lower usage of cholesterol-lowering medications and glucose-lowering medications
मला मेडिकल ज्ञान नसले तरी असे
In reply to Compared with mobile phone by सुबोध खरे
मला मेडिकल ज्ञान नसले तरी असे वाटते की वरील निष्कर्षात को रिलेशन असेलही पण कॉजेशन दिसत नाही.
+१
In reply to मला मेडिकल ज्ञान नसले तरी असे by गवि
तूर्त दोन घटकांमधला काहीसा संबंध एवढेच म्हणता येईल. तसेच जीवनशैलीतील इतर घटकांचाही परिणाम विचारात घ्यावा लागेल.
कार्यकारण भाव नाही हे खरे
+/-
वरील संशोधनावरचे काही महत्त्वाचे आक्षेप असे आहेत:
१. हा पूर्वलक्षी प्रकारचा अभ्यास आहे. अशा अभ्यासामध्ये मूळ मुद्द्यावर परिणाम करणारे अन्य बरेच घटक मोजलेले नसू शकतात.
२. मोबाईल वापरकर्त्यांजवळील फोनमधले तंत्रज्ञान हे कमी अधिक विकसित प्रकारचे होते काय, याचाही उलगडा झाला पाहिजे. त्यानुसार विद्युतचुंबकीय लहरींच्या प्रमाणातही फरक पडू शकतो.
३. सदर संशोधन फक्त मध्यमवयीन गौरवर्णी युरोपीय वंशाच्याच लोकांवर झालेले आहे.
…..
सवांतर:
मधुमेह, हृदयविकार, उच्चरक्तदाब, कर्करोग इत्यादी दीर्घकालीन आजार हे आरोग्याशी संबंधित अनेक घटकांच्या एकत्रित परिणामातून होत असतात.
सुरक्षाकवच क्रीम
मोबाइल रेडिएशनपासून सुरक्षाकवच
कर्करोगाचे कारण अजून कळलेले नाही.
चिंता हे प्रौढांसाठी ठीक वाटते पण मुलांना का होतो?
मुलांमध्ये कर्करोग
In reply to कर्करोगाचे कारण अजून कळलेले नाही. by कंजूस
चांगला प्रश्न.
प्रौढांच्या तुलनेत मुलांवर झालेले संशोधन तुलनेने बरेच कमी आहे. तरीसुद्धा खालील काही कारणे देता येतात :
१. जन्मताच प्रत्येक माणसात कर्करोगास अनुकूल असलेली जनुके असतात. ज्या मुलांमध्ये अशा जनुकांना बिघडवणारे बदल आनुवंशिकतेने येतात तिथे कर्करोगाची शक्यता वाढते.
२. गुणसूत्रांमधील बिघाड : उदाहरणार्थ डाऊन सिंड्रोमच्या मुलांमध्ये सामान्य मुलांपेक्षा कर्करोग होण्याची शक्यता सुमारे 15 पट अधिक असते.
३. विविध प्रकारचे किरणोत्सर्ग : बाळ गर्भावस्थेत असताना जर काही कारणांमुळे त्याच्या आईचे एक्स-रे अथवा CT तपासण्या वारंवार कराव्या लागल्या तर.
४. काही बालकांच्या बाबतीत काही आजारांमध्ये तान्हेपणीच या तपासण्या कराव्या लागतात
तपासण्या कराव्या लागतात.
In reply to मुलांमध्ये कर्करोग by हेमंतकुमार
१)त्या टाळाव्यात.
२) रोग किती पसरला आहे हे पाहायला परत परत चाचण्या याही टाळायला हव्यात.
३)माझ्याकडे/पद्धतीत औषध नाही म्हणजे जगात दुसऱ्या पद्धतीत कुठेही नसणार हा हेका सोडायला हवा. हा अलोपथीचा मोठा दोष आहे.