Skip to main content

कोणती बाईक घ्यावी?

लेखक संदीप डांगे यांनी मंगळवार, 25/10/2016 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रो! मी गेले कित्येक वर्षे दुचाकी फारशी चालवली नाहीये, वीसेक वर्ष आधी लुना (ब्रह्मे फेम), राजदूत (300-400 किमी) नंतर बजाज प्लॅटिना (500 किमी), होंडा सीबीआर 250 (100 किमी), स्टारसिटी(100 किमी), ऍक्टिवा (100 किमी) अशी अनुभव गंगाजळी आहे, होंडा युनिकोर्न घेणार होतो, फायनल झाले होते, त्याच दिवशी बाळराजे येण्याची चाहूल लागली आणि पूर्वीच ठरवल्यानुसार कि पत्नीस अशा अवस्थेत बाईकचे धक्के नको म्हणून प्लॅन बदलून लांसर घरी आणली, ;) आताशा एक बाईक असावी अशी गरज भासत आहे, पण दुचाकीबद्दल विचारच टाकून दिल्याने बरीच वर्षे ह्या क्षेत्रातले फॉलोअप घेतलेले नाहीत, त्यामुळे माहिती न के बराबर! तसेच आता बाजारात इतके ऑप्शन्स आलेत कि गोंधळायला झाले आहे. तस्मात बाईकविषयी चांगली माहिती असलेल्या मिपाकर मित्रांना सल्ला मागतो आहे, मदत करावी. माझी उंची 5'6", वजन 94 kg (पाच वर्षांपासून अगदी मेंटेन आहे, एक ग्राम इकडे तिकडे नाही). ;) माझी गरज: शहरात फिरायला, सामान वगैरे आणायला. खेड्यापाड्यातल्या कसल्याही रस्त्याला (माझ्या वजनासकट) सांभाळून घेणारी, लॉंग हायवे ड्राइव्ह ला आरामदायक बजेट: बजेटचे नक्की नाही, परवडत नसल्यास थोडं थांबायची तयारी आहे, अगदीच दीडदोन लाखवालीही नकोय, नैयेत माझ्याकडे, ;) मायलेजपेक्षा कम्फर्ट, पॉवर व स्टाईलला महत्त्व देतो. मेंटेनन्स मध्ये रडवणारी नको. बजाज अवेंजर मनात बसलीये, थोडीशी चालवली होती, बुलेटची इच्छा फार पण अभी टेम नै आया वैसा! बाकी नवीन तत्सम गाड्यांची माहिती नाही तेव्हा त्या देखील ट्राय करण्यास हरकत नाही, कृपया मार्गदर्शन करा... (विंग्रजी शब्दांबद्दल माफी)

वाचने 87317
प्रतिक्रिया 270

प्रतिक्रिया

अव्हेंजर ==>> FLG ==> Feel Like God !!!!!!!!!!!! मी अव्हेंजर वापरली आहे 3 वर्ष 23287KM कुठलाही धोका नाही दिला अव्हेंजरनि प्रति लिटर 42 ते 45 ची सरासरी होती 3 वर्षात कुठलाही काम नाही काढलं. ज्यांनी गाडी वापरली नाही त्यांनी कंमेंट करूच नये ना दिसण्या बदल ना गाडी वळण घेण्यासाठी लागणाऱ्या जागे बदल.. मी अव्हेंजर पुणे नासिक आणि मुंबई या शहरात ऑफिस टाईमिंग ला फिरवली आहे काही प्रॉब्लेम नाही येत... फक्त 3 दिवस गाडी च्या ride postiion सोबत जुळवून घेण्या साठी आता बुलेट वापरतो आहे... ह्या बदल सांगतो थोड्या वेळात रॉयल एनफिल्ड हिमालयन ही आहे माझी नवीन गाडी.....

सो फायनली फायनल!!! कमी चारा खाणारी, आखुडशिंगी, बहुदुधी,

एकशिंगी

Bike सर्वच मार्गदर्शक मित्रांचे अनेक धन्यवाद! योग्य चर्चा झाली व चांगले सल्ले मिळाले, एव्हन्जर कडे असलेला कल बदलून गरजेपुरतं असावं ह्याकडे येत युनिकोर्न वर स्थिरावला! आता जरा सिरीयस नोटवर येऊयात का? जसे सल्ले पटापट दिले तसे सगळ्यांनी दोन-दोन हजार रुपये अकौंटला ट्रान्सफर करा बघू, तुमच्या सहकार्याने होईन आमची गरिबांची बैक! म्होट्टा फ्लेक्स लावून आभार मानल्या जातील... ;) =)) परत एकदा धन्यवाद मित्रांनो, गाडी घेतल्यावर पेढे आधी तुम्हालाच मिळतील!!! :)

In reply to by संदीप डांगे

सर्वच मार्गदर्शक मित्रांचे अनेक धन्यवाद! योग्य चर्चा झाली व चांगले सल्ले मिळाले, एव्हन्जर कडे असलेला कल बदलून गरजेपुरतं असावं ह्याकडे येत युनिकोर्न वर स्थिरावला!
जोर्दार हाबिणंदण.
एव्हन्जर कडे असलेला कल बदलून गरजेपुरतं असावं ह्याकडे येत युनिकोर्न वर स्थिरावला!
गरजेपुरतं ह्या शब्दाबद्दलं जोर्दार णीषेद. युणिकॉर्ण इझ दी बेष्ट पॅकेज. आता गाडी येईल तेव्हा प्रथमहाती अण्भव नक्की लिहा. ===== अवांतर- दिलेल्या सल्ल्याची फीज झाली ५०००. तुम्हाला दोन द्यायचे. एक करा मलाचं तीन चा चेक पाठौन द्या. =))

In reply to by संदीप डांगे

युनिकॉर्न म्हणजे मस्तच! येंजॉय यौर राईड! जाता जाता, उगाचच सल्ला: उत्तम दर्जाचे हेल्मेट असु द्या नेहमी सोबत :)

चेक पाठवणार होतो पण फ्लेक्स वरच्या फोटो साठी सोन्याची जाड साखळी, टकाटक गॉगल्स नसल्याने क्षमस्व. आमचे गाव पुणे नाहीं

माझे प्रश्न १) अतुत्तम सस्पेन्शन असलेली स्कूटर कोणती? जी पुण्यातील खड्यातून देखील तुमच शरीर व्यवस्थित अखंड ठेवेल. २) मोटरसायकलवरुन कुटुंबवत्सल होण्यासाठी स्कूटरवर शिफ्ट झालेले कोण कोण आहेत? ३) स्कुटर बॅलन्सिंग च्या दृष्टीने असुरक्षित वाटते का? ४) एम ८० गाडी आता मिळते का? त्याच डिझाईन मधे उत्तम सस्पेन्शन असलेली मोटोस्कूटर कुणी काढली आहे का?

युनिकॉर्नची निवड केल्याबद्दल अभिनंदन. अगोदरच प्रतिसाद द्यायचा होता पण सवड मिळाली नाही. अकरा वर्षांपूर्वी मी स्वकमाईतून पहिली गाडी घेतली ती होती होंडा युनिकॉर्न. ती गाडी अजुनही सुस्थितीत आहे. माझा धाकटा भाऊ ती वापरतो. अंदाजे सव्वा लाख किमी चालली असावी. अजुनही त्याला दुसरी गाडी घेण्याची गरज वाटत नाही. मी ही गाडी घेतली तेव्हा भारतातल्या तरुणाईला पल्सरचे फार वेड होते. माझ्या मते भारतात बेशिस्त व आक्रमक दुचाकी गाड्या चालवण्याची संस्कृती रुजवण्यात बजाज पलसर या गाडीचा मोठा वाटा आहे. त्या काळी या गाडीचा हॉर्नही इतका कर्कश असायचा की रस्त्यावरचे इतर दुचाकीस्वार दचकून अपघाताची शक्यता निर्माण व्हायची. या धाग्यावर बहुसंख्येने होंडा युनिकॉर्नला समर्थन मिळत आहे हे पाहून समाधान वाटले.

जावा येतेय overdrive.in/news/2017-jawa-350-ohc-and-660-vintage-launched-in-czech-republic/

In reply to by वेल्लाभट

लुक इतका इंप्रेसिव्ह नाहीये. बाकी ओएचसी इंजिन आहे ३३० चे ते ठिक आहे पण असा रोडस्टर ऑर कॅफे रेसर लुक घ्यायचा असेल तर ह्या दोन अडीच लाखापेक्षा एन्फिल्डची काँटीनेंटल जीटी बेस्ट ऑप्शन आहे. रेट्रो डीझाईनला एवढा डिमांड नाहीये भारतात जेवढा बुलेटने उचलला. बुलेट पाह्यलेली/घ्यावी/वापरावी असे वाटणारी पिढी अस्तंगत होण्याआधी नवीन बुलेट आली. मध्यंतरात काही बुलेटवेड्यानी आणि पोलीसआर्मीवाल्यानी ती क्रेझ जिंदा ठेवली. त्यामुळे नवीन बुलेट आरामसे मार्केट ओढली. नॉर्मल १५० सीसी चे पाउण एक लाखाचे बजेट थोडे स्ट्रेच करुन बुलेट मिळतीय तेंव्हा तो शौक जड जात नाही. जावा/यझदी वापरलेली पिढी मात्र नाहीये अ‍ॅक्टिव्ह सध्या. त्यामुळे कुतुहल किंवा अपेक्षा नाहीच शिवाय दोन अडीच लाखाला ३३० सीसी अन चांगला लुक असलेली ६६० सीसी चार पाच लाखाला कोणी घेणार नाही. जावा यझदीचा प्लस पॉइंट होता टूस्ट्रोक पॉवर आणि सोबत असलेली सिंप्लीसिटी. आता तोच युएसपी नाहीये आणि त्या युएसपीचे कौतुक राहिलेले नाही.

In reply to by अभ्या..

जावा/यझदी वापरलेली पिढी मात्र नाहीये अ‍ॅक्टिव्ह सध्या
गेल्या रविवारी एक ग्यांग बघितली आमच्याइथे. येझदी आणि राजदूत वाले होते सगळे. ड्युअल एक्झॉस्ट. कल्ला!

In reply to by वेल्लाभट

मी स्वतः वापरलेली आहे यझदी घरातील. २०१० पर्यंत होती काकाची. पण बाईक बद्दल प्रेडिक्शन कधीच चुकलेले नाहीत. ही मॉडेल्स चालणार नाहीत. महिंन्द्रा आणतेय म्हनल्यावर तर बिल्कुल नाही. जुन्या जावा, आरडी ३५० ची क्रेझ चालेल कदाचित पण ती पॉवर फोरस्ट्रोकला आणने शक्य नाही. टूस्ट्रोक आता लीगली बंदच आहे.

नमस्कार मंडळी येत्या काही महिन्यात WFH संपून रोज ऑफिसला जाणे सुरू होईल असे दिसते. तसेच काही महिन्यात माझी आताची बाईक Hero Honda CD Dawn वयाची १५ वर्षे पुर्ण करेल. बाईक अजूनही मस्त चालते. आता सहसा दूरचे प्रवास होत नाहीत पण तरी नुकताच एक 400+ किमीचा प्रवास केला. इतके वर्षात परफॉर्मन्सचा काही प्रॉब्लेम नाही. पण आता थोडे व्हायब्रेशन वाढले आहेत असे वाटते. सिल्वर रंगातली CD Dawn दुर्मिळ , दिसायचीही छान पण आता जुणेपणा जाणवू लागला. आणि तसेच ही बाईक ईलेक्ट्रीक स्टार्ट नाही. त्यामुळे १५ वर्षे पुर्ण करताना पुन्हा पासिंग करण्याऐवजी नवीन बाईक घ्यावी असा विचार करतोय. मग नवीन घेत आहेच तर थोडे अपग्रेड करावे असाही विचार आहे. शाईनचा विचार करत होतो. पण माझ्या मित्रांपैकी कुणाकडे शाईन नाही.. पण काही ऐकीव मतांनुसार शाईनला काही प्रॉब्लेम्स आहेत (नक्की काय ते मला अजून समजले नाही) , गाडीचा खप तर प्रचंड आहे.(दुवा) १२५ सीसीमध्ये दुसरा पर्याय सुपर स्प्लेंडर दोन्ही गाड्यांबद्दलची मते जाणून घ्यायला आवडेल. किंवा 10 PS च्या आसपास पॉवर असलेल्या आणखी कोणत्या बाईकचा विचार करता येईल ? तरी मिपाकर मंडळींनी मार्गदर्शन करावे. अधिक माहिती : - माझी उंची कमी असल्याने सीटची उंची कमी असावी (८०० मिमी च्या आसपास असणे गरजेचे आहे ) - मुख्यतः शहरात (पिंपरी-चिंचवड) चालवणे असेल पण छोट्या मोठ्या सोलो-रोड ट्रिप्स शक्य आहेत (१-२ वर्षांतुन एक) - राईड मुख्यतः सिंगल सीट पण काहीवेळा (फक्त शहरात) पत्नीसोबतही - त्यामुळे दोघांना नीट बसता येईल इतके लांब सीट असणे गरजेचे आहे. - वर्षाकाठी ४-६ हजार चालवणे होईल (कमीच पण जास्त नाही) - मायलेजबद्दल फार अपेक्षा नाहीत ४५ - ५० सुद्धा चालेल. - इतकी वर्षे CD Dawn सवय असल्याने कमी वजनाची बाईक घेण्याकडेच कल आहे (बाईकचे वजन १२० किलोच्या आसपासच असावे फार जास्त नको ) - मेन्टेनन्स सुलभ व शक्यतो वर्षातुन एकदाच करावे लागावे ही अपेक्षा. - बाकी आधुनिक स्टाईल वगैरे फारशी आवडत नाही. तिरपे, उतार असलेले सीट तर अजिबात नको. त्याउलट CD Dawn, CD 100 SS , स्प्लेंडर+ , TVS Radeonयांचे लुक्स मला अधिक आवडतात . पण रंग व ग्राफिक्स उठावदार असलेले आवडेल . शाईनचे लुक्स तसे नसले तरी तिचे रंग आकर्षक आहेत आणि मला हव्या त्या पॉवर व वजन गटात सर्वाधिक खपाची बाईक असल्याने माझा कल शाईनकडे अधिक आहे. तर CD Dawn च्या इतक्या वर्षातील प्रचंड reliability मुळे हीरोच्या सुपर स्प्लेंडरचाही विचार करतो आहे.

In reply to by तर्कवादी

डोळे मिटून शाईन घ्या. मी युनिकॉर्न सुचवली असती पण ती गाडी फार उंच आहे. शाईन डिस्क ब्रेक (आणि सेल्फ स्टार्टर) सहित घ्या. जास्त सुरक्षित आहे. अन्यथा कोणतेही होंडाचे इंजिन असलेली गाडी घ्या. पेट्रोल इंजिनात होन्डाचा हात धरणारे कुणी नाही. बजाज किंवा टीव्ही एस ची इंजिने तेवढी मुलायम नाहीत. माझी युनिकॉर्न केवळ १३ वर्षे झाली आणि (मुंबईत असल्यामुळे) बॉडी गंजली म्हणून मी विकली. आता डॉमिनार ४०० आहे पण युनिकॉर्नची सर नाही

In reply to by तर्कवादी

मंडळी मी धागा वर आणल्यापासून बरीच चर्चा सुरु आहे. पण मला Shine व SP 125 (शक्यतो BS VI) बद्दल विस्ताराने जाणून घ्यायचे आहे. इथे कुणाकडे असल्यास कृपया सविस्तर रिव्ह्यू टाकावा ही विनंती सध्या मी Shine व Radeon या दोन बाईक्सचा जास्त विचार करतोय पण अजून दोन्हींचीहि टेस्ट राईड घेतली नाहीये. धन्यवाद.

In reply to by तर्कवादी

मंडळी , माझ्या प्रश्नावरील प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद. Shine व Radeon हे दोनच पर्याय होते तरी बरेच दिवस गोंधळ कायम राहिला. Radeon च्या देखण्या रुपाने भुरळ पाडली होती आणि बाईकची उंची कमी असल्याने हाताळायलाही अधिक सोपी असा विचार होता. दोन वेळेस टेस्ट राईडही घेतली. पण शेवटी अधिक पॉवरच्या Shine कडे पारडे झुकले आणि काल Shine घेतली. बुकींगच्या वेळेसच पुर्ण पैसे भरले आणि अक्सिस मॅट ग्रे या २०२२ मध्ये उपलब्ध झालेल्या नवीन रंगातली शाईन आठवडाभराने म्हणजे काल आणली. २०२२ मध्ये साईड स्टँड इंडीकेटर , सेन्सर आणि कट ऑफ (म्हणजे साईड स्टँड खाली केलेले असेल आणि बाईक चालू करुन गिअरमध्ये टाकली तर ती बंद होते) हे नवीन पैलू दिले गेलेले आहेत.

नविन बाईक निर्णयाबद्दल अभिनंदन !
त्यामुळे १५ वर्षे पुर्ण करताना पुन्हा पासिंग करण्याऐवजी नवीन बाईक घ्यावी असा विचार करतोय.
दुसर्‍या कुणाला विकणार असाल तर लवकर विका, बरी किंमत मिळू शकते. आरटीओ नियमानुसार ट्रान्सफर करून घ्यायला विसरू नका. आणि स्क्रॅप करणार असाल तर .... नियमाप्रमाणे स्क्रॅप करणार का ? प्रोसिजर समजून घ्यायला आवडेल. आणि .... तुमच्या लाईफस्टाईलला आणि चार्जींगच्या सोयीला झेपत असेल तर वीजबाईक घ्या, भविष्य तेच आहे !

In reply to by चौथा कोनाडा

बहूधा कुणाला तरी विकेन आणि ट्रान्सफर केली जातेय याची खात्री करेनच किंवा मग एक्स्चेंज ऑफर चांगली असल्यास तसे करेन. माझ्या मते सुस्थितीत असलेली बाईक स्क्रॅप करणे योग्य योणार नाही - अशी चांगली बाई़क (वा कोणतीही चांगली वापरात येवू शकणारी वस्तू) स्क्रॅप करणे म्हणजे पर्यावरणाची हानी. इलेक्ट्रीक बाईकचा पर्याय नको आहे - कारणे अनेक - इलेक्ट्रीक बाईक खरं तर उपल्ब्ध नाहीच.(निदान मला तरी माहित नाहीत) ज्या आहेत त्या स्कूटर आहेत. आणि मला स्कूटर नकोय, आवडत नाही. हे सर्वात महत्वाचे कारण - पण समजा इलेक्ट्रीक बाईकचे एखादे मॉडेल असेल तरी किंमत , एका चार्जिंगमध्ये किती चालणार (रेंज) , चार्जिंगची सोय करावी लागणे (फ्लॅटमध्ये राहणार्‍यांना हे कठीण) , बाहेरगावी फिरायला गेल्यास तिथे चार्जिंगची सोय मिळणे, बॅटरीचे आयुष्य आणि बॅटरीची किंमत ई अनेक गोष्टी आहेत. सध्या तरी इलेक्ट्रीक वाहन हा तितकासा आकर्षक पर्याय वाटत नाही. रे

In reply to by तर्कवादी

माझ्या बजाज पल्सर ला जून २०२० मध्ये १५ वर्षे झाली, त्यात २०१९-२० मी भारतात नव्हतो आणि मग आता परत आल्यावर कोव्हीड मुळे रि-पासिंग राहून गेले आणि आता करायला जावे तर ग्रीन टॅक्स भरून, मूळ गावी (जिथे RTO नोंदणी झाली आहे तिथे ) जाऊनच करावे लागेल अशी ३-४ जणांकडून माहिती मिळाली. हे नक्की तसेच आहे काय ? असल्यास, तेवढा उपद्वव्याप आता करावा लागणार आहे. काही तरी सोपीकरण झाले पाहिजे राव :-)

In reply to by रश्मिन

मला वाटते तुम्ही त्याच राज्यात असाल आणि सध्याच्या पत्त्याचे पुरावे असतील तर तुम्हाला सध्या राहता तिथल्या RTO मध्ये रि-पासिंग करता यायला हवे. तुम्ही स्वतः याबद्दलचे नियम वाचून पडताळून बघा हे बरे. लोक अनेकदा अचूक माहिती देतातच असे नाही.

In reply to by रश्मिन

काही तरी सोपीकरण झाले पाहिजे राव :-) ज्या शहरातील आरटीओत गाडीचे रजिस्ट्रेशन झाले तेथेच जाऊन ग्रीन टॅक्स भरावा लागतो, ह्यासाठी गाडी तेथे घेऊन जावे लागते (गाडी तपासात नाहीत). मी गाडी न नेता फक्त चासी आणि इंजिनच्या नंबरवर कागद ठेऊन पेन्सिलने खरडून रितसर पैसे भरून काम करून घेतले. नवीन गाडी घेण्यापेक्षा स्वस्तात पडते.

In reply to by आग्या१९९०

मला वाटते, या अधिवेशनात याबद्दल नवीन मसुदा आलाय. संपूर्ण भारतात कुढेही नोंदणी झालेली असली तरी आता कुढूनही याबाबतची कामे होणार आहेत. बेंगलोरला घेतलेल्या गाडीची कामे पुण्यातूनही करता येणार. हे कुठे वाचले ते आठवत नाही. अन्यथा लिंक नक्की दिली असती.

In reply to by शाम भागवत

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२ लोकसत्ता विश्लेषण वाहन नोंदणीसाठी न्यू इंडिया सीरीज 'BH' मार्क लाँच: समजून घ्या कसे असेल नोंदणी स्वरूप
हां. इथे वाचलं होतं. हे सगळं नव्याने होणाऱ्या नोंदणीच्या संदर्भात दिसतंय.

कोणती बाईक घ्यावी - २०२१ असा नवा धागा काढावा ही विनंती. पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलंय. जवळजवळ सगळ्या मोटारसायकली अन स्कुटरांची नवी व्हर्जन आल्याने "ही नको, ती चांगली " यात फरक पडला असणार. अवांतर : माझी युनिकॉर्न १०+ वय, आणि ७५०००+ किमी होऊनही अजून झक्कास आहे. वर्षाला पाच हजार किमी चालवणे = इलेक्ट्रिक गाडी घेणे व्यवहारिक नाही. तुमच्या ज्या गरजा/क्रायटेरिया आहेत, ते बरेच सुस्पष्ट आहेत.
- माझी उंची कमी असल्याने सीटची उंची कमी असावी (८०० मिमी च्या आसपास असणे गरजेचे आहे ) - मुख्यतः शहरात (पिंपरी-चिंचवड) चालवणे असेल पण छोट्या मोठ्या सोलो-रोड ट्रिप्स शक्य आहेत (१-२ वर्षांतुन एक) - राईड मुख्यतः सिंगल सीट पण काहीवेळा (फक्त शहरात) पत्नीसोबतही - त्यामुळे दोघांना नीट बसता येईल इतके लांब सीट असणे गरजेचे आहे. - वर्षाकाठी ४-६ हजार चालवणे होईल (कमीच पण जास्त नाही) - मायलेजबद्दल फार अपेक्षा नाहीत ४५ - ५० सुद्धा चालेल. - इतकी वर्षे CD Dawn सवय असल्याने कमी वजनाची बाईक घेण्याकडेच कल आहे (बाईकचे वजन १२० किलोच्या आसपासच असावे फार जास्त नको ) - मेन्टेनन्स सुलभ व शक्यतो वर्षातुन एकदाच करावे लागावे ही अपेक्षा. - बाकी आधुनिक स्टाईल वगैरे फारशी आवडत नाही. तिरपे, उतार असलेले सीट तर अजिबात नको. त्याउलट CD Dawn, CD 100 SS , स्प्लेंडर+ , TVS Radeonयांचे लुक्स मला अधिक आवडतात . पण रंग व ग्राफिक्स उठावदार असलेले आवडेल . शाईनचे लुक्स तसे नसले तरी तिचे रंग आकर्षक आहेत आणि मला हव्या त्या पॉवर व वजन गटात सर्वाधिक खपाची बाईक असल्याने माझा कल शाईनकडे अधिक आहे. तर CD Dawn च्या इतक्या वर्षातील प्रचंड reliability मुळे हीरोच्या सुपर स्प्लेंडरचाही विचार करतो आहे.
स्प्लेंडरचं सध्याचं चालू वर्जन आणि शाइन हे दोन्ही पर्याय तुम्हाला सर्वात सुटेबल वाटत आहेत.

In reply to by तुषार काळभोर

कोणती बाईक घ्यावी - २०२१ असा नवा धागा काढावा ही विनंती
जुन्या धाग्यावर जुनी माहिती राहिलंच पण नवीन माहितीही पोस्ट करता येईलच ना असा विचार करुन मी जुन्या धाग्यालाच पुनरुज्जीवीत केले.
स्प्लेंडरचं सध्याचं चालू वर्जन आणि शाइन हे दोन्ही पर्याय तुम्हाला सर्वात सुटेबल वाटत आहेत.
म्हणजे सुपर स्प्लेंडर म्हणायचंय की स्प्लेंडर+?

In reply to by तर्कवादी

१२५ असल्याने स्प्लेंडर+
जुन्या धाग्यावर जुनी माहिती राहिलंच पण नवीन माहितीही पोस्ट करता येईलच ना असा विचार करुन मी जुन्या धाग्यालाच पुनरुज्जीवीत केले.
ते पण ठीकच म्हणा. पण ९५प्रतिसाद झाल्याने लवकरच नवे प्रतिसाद दुसर्‍या पानावर जातील. वर जे दिसतील ते २०१६चे. अजून काही वर्षांनी कोणी धागा उघडला तर जुनेच प्रतिसाद दिसतील.

redeon कम्युटर प्रकारात सध्या ही बाईक सर्वोत्तम आहे. सर्वात लांब कंफर्टेबल सीट आहे. उत्तम पिकअप आहे. रात्रीसाठी लाईट उत्तम आहे.

In reply to by कपिलमुनी

होय.. या बाईकचे लुक्स मला खूप आवडलेत. पण रिव्ह्यूज कसे आहेत माहीत नाही. शिवाय पॉवर थोडी कमी आहे (8.19 PS) मी टेस्ट राईड तरी नक्की घेईन.

In reply to by तर्कवादी

अत्रुप्त आत्मा यांच्याकडे ही गाडी आहे , माझ्या अंदाजे वर्षभर तरी वापरत असावेत. त्यांच्याशी सपर्क करून विचारू शकता

In reply to by कपिलमुनी

सध्या स्थितीत तीन वर्ष झालेली आहेत. ही गाडी मजबूत आणि आरामदायक आहे. शंभर ते 110 च्या स्पीडने पळू शकते. नऊ वेळा अवरेज चेक केलेल आहे. माझं चालवण रफटफ आहे. मला कायम 58 ते 63 च्या दरम्यान एवरेज मिळाले आहे. लाईट उत्तम आहे. सस्पेन्शन चांगली आहेत. परंतु मला या गाडी चा खरा परफॉर्मन्स कंपनीची फ्री-सर्वीस संपल्यावर मी एका खाजगी गॅरेजमध्ये तीचे रेग्युलर सर्विसिंग केल्यानंतर आला. चालवायला अतिशय कॉन्फिडन्ट आहे. जुनी cd हंड्रेड एस एस (जुन्या 4-stroke आवाज वाल्या सायलेन्सर ची) ज्यांनी चालवलेली आहे, त्यांनाच या गाडीची मजा झटकन कळू शकते. पळायला अजिबात त्रास देत नाही. त्या मनाने या सेगमेंटच्या इतर गाड्या पळताना काही वेळा दम टाकतात, तस हीचं होत नाही . कमी पावर असली तरी टीव्हीएस चा घोडा आहेच हिच्या मध्ये,तो दणदण पळतोच.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आपल्या प्रतिसादामुळे माझे या बाईककडे कल वाढला आहे. आपण डिस्क ब्रेक घेतली आहे की ड्रम ब्रेक ?
पळायला अजिबात त्रास देत नाही. त्या मनाने या सेगमेंटच्या इतर गाड्या पळताना काही वेळा दम टाकतात, तस हीचं होत नाही . कमी पावर असली तरी टीव्हीएस चा घोडा आहेच हिच्या मध्ये,तो दणदण पळतोच.
नवीन BS VI मॉडेलमध्येही तोच परफॉर्मन्स मिळेल अशी आशा आहे.

पुरी येथे आहेत. फार छान वाटते. आवाज नाही. पण विठ्ठला मंदिर, हंपी येथल्या मोठ्या गाड्या जरा उंउंउं ( गुरुजींचा ऊं ऊं वेगळा) असा आवाज करतात.

In reply to by जेम्स वांड

माझ्या कडे आहे गेली ४ वर्षे. महा शक्ती आणि सुरक्षा. ड्युएल चॅनेल ए बी एस आहे. स्लिपर क्लच असल्यामुळे वेगात चुकून खालचा गिअर पडला तरी काहीही होत नाही. टयूबलेस जाड एम आर एफचे टायर आहेत. पावसाळ्यात ब्रेक दाबला तर गाडी अजिबात न घसरता जागेवरच उभी राहते. वेग प्रचंड येतो. माझि १२० च्या वर जायची हिम्मत झालेली नाही. या वेगाला सुद्धा गाडी रस्ता पकडून असते. पण एवढा वेग आपल्या शरीराला झेपणारा नाही. या वेगाला सुद्धा गाडीला अजून भरपूर शक्ती बाकी असते. हेडलॅम्प मोटारसायकल मध्ये सर्वात उत्तम आणि स्वच्छ पांढरा प्रकाश सर्वदूर पर्यंत जाणारा आहे. दोनच कमतरता १) ऍव्हरेज २५-२७ च मिळते ( अर्थात माझे चालवणे शहरातच आहे) २) इंजिन आवाज करते. ( लोकांना ठणाणा करण्यात धन्यता माननार्यांच्या यादीत मी नाही) या अगोदर युनिकॉर्न होती. तिच्या इतके मुलायम इंजिन असलेली गाडी दुसरी नाही. केवळ १२ वर्षे झाली आणि बॉडी मुंबईच्या पावसात आणि दमट हवेत गंजली म्हणून विकली. पण आजही पहिले प्राधान्य युनिकॉर्नलाच.

In reply to by सुबोध खरे

बरंय प्रकरण, पण एव्हरेज वर हाय कंबखत झालं म्हणायला, आवाजाशी सहमत, आजकाल केटीएमवाल्या निब्बा निब्बी गॅंग्जनं जीव नकोसा केलाय रस्त्यानं पादरा पीर पीर आवाज करत गाड्या हाणत. त्यामानाने नवीन रॉयल एनफिल्ड रिफाईंड वाटल्या. थंडरबर्ड एक्स सिरीज नंतर त्यांनी जवळपास कात टाकली आहे म्हणायला हरकत नाही.

In reply to by सुबोध खरे

मुंबईत पूर्व दृतगती मार्ग, पश्चिम दृतगती मार्ग, पूर्व मूक्त मार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू आणि अशा अनेक मार्गांवर फक्त चारचाकी वाहनांनाच परवानगी आहे. त्यामुळे बरेचदा असे होते की जिथे कारने १५ ते २० मिनीटांत जाता येईल तिथे पोचायला या अतिवेगवान दुचाकींना दीड तासांहूनही अधिक कालावधी लागतो. अशा परिस्थितीत मुंबईत अनेकांनी डॉमिनॉर ४०० या साठ ते सत्तर हजारांत आणि रेनेगेडे कमांडो तीस ते चाळीस हजारांत पुनर्विक्री करिता उपलब्ध आहेत. अशीच एखादी डॉमिनॉर ४०० किवा रेनेगेडे कमांडो विकत घ्यायचा विचार चालू आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

मुंबईत अनेकांनी डॉमिनॉर ४०० या साठ ते सत्तर हजारांत आणि रेनेगेडे कमांडो तीस ते चाळीस हजारांत पुनर्विक्री करिता उपलब्ध आहेत.
ह्या गाड्यांची मूळ किंमत आणि ही किमत बघूनच ठरवा की. कशाला तपशील लागतेत? तुमचा ओव्हरॉल सिंहिणीपासून आजचा अ‍ॅटिट्युड बघता ही बाईक सर्वात उत्तम आहे. xl

In reply to by सुरिया

अकरा महिन्यांच्या आयडीने माझा अ‍ॅटिट्यूड ठरवायची आणि माझ्याकरिता वाहन सुचवायची गरज नाही. मी १३ वर्षांहून अधिक काळ बुलेट ३५० तीही फक्त किकस्टार्ट (जुनी उजव्या पायात गिअर लिव्हर असणारी) चालविली आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

रेनेगेडे कमांडो ३०० आणि डॉमिनॉर ४०० या दोन्ही चालवून पाहिल्यात. रेनेगेडे जास्त व्हीलबेस मुळे यूटर्न घ्यायला अवघड आहे हे सोडलं तर जास्त त्रासदायक वाटली नाही. डॉमिनॉर मात्र फारच जड आणि जास्त शक्तिशाली वाटली पण नियंत्रणात ठेवण्यास अवघड वाटल्याने तिच्या इंजिनाच्या २५ टक्के ताकद देखील मला वापरता येणार नाही असे जाणवले. माझ्या आग्रहाखातर माझ्या सोबत टेस्ट ड्राईव्ह घेणारे माझे पोलिस दलातील मित्र जे माझ्याहून सहा वर्षे तरूण आणि रोज २ तास व्यायाम करुन फिट आहेत त्यांनी डॉमिनॉर केवळ काही सेकंदात ९५ किमी वेगाने चालविली पण मी मात्र १० मिनीटांनंतरही ताशी ७० किमी पेक्षा अधिक वेग गाठू शकलो नाही. I don't think it's my cup of a tea or say mug of bear.

In reply to by सुबोध खरे

फिटनेस आणि डॉमिनर चालवणे याचा काहीही संबंध नाही. फुंकर मारली तरी उडून जातील असे टिनपाट तरुण सुद्धा बुलेट चालवताना दिसतात. बाकी डॉमिनार केवळ स्वस्त मिळते म्हणून मुळीच घेऊ नका. एकतर त्याचे ऍव्हरेज २५ च्या आसपास आहे. दुसरे म्हणजे शहरात चालवण्यास ती कठीण आहे.(रेनेगेड इतकी वाईट नसली तरी). वजन भरपूर आहे आणि सहज वळत नाही. त्या ऐवजी होंडा युनिकॉर्न घ्या. सर्व बाबतीत उत्तम पडेल. माझ्याकडे होंडा युनिकॉर्न होती आणि सध्या डॉमिनार आहे. डॉमिनार सहज १५० ताशी किमी पर्यंत जाते. मी आतापर्यंत १२० पर्यंत नेली आहे त्यापुढे नेण्याचे धैर्य झाले नाही. परंतु १२० वेगाला सुद्धा गाडी अगदी स्थिर आणि सुरक्षित वाटते

In reply to by सुबोध खरे

दुसरे म्हणजे शहरात चालवण्यास ती कठीण आहे.(रेनेगेड इतकी वाईट नसली तरी). वजन भरपूर आहे आणि सहज वळत नाही.
मला रेनेगेडे तुलनेने जास्त सुलभ वाटली (यूटर्न वगळता). सहज वळत नाही हा माझाही अनुभव पण मला वाटले की फक्त मलाच जमत नाही की काय? इतके लोक चालवतात ते कसे काय?
बाकी डॉमिनार केवळ स्वस्त मिळते म्हणून मुळीच घेऊ नका. एकतर त्याचे ऍव्हरेज २५ च्या आसपास आहे.
अ‍ॅव्हरेजची चिंता नाहीये. कारण वर्षांतून तीन किंवा चार लांब अंतराचे प्रवास करायचे आहेत. त्यावेळी चारशे ते पाचशे किमी एका दिवसात ही व कमी वेळ खर्चून इतकीच अपेक्षा आहे. बाकी वाहनाचा रोज वापर करायची गरज नाही. त्यामुळेच सुरुवातीला च खरेदी किंमत जास्त देऊन अधिक रक्कम गुंतविण्याची इच्छा नाही.
डॉमिनार सहज १५० ताशी किमी पर्यंत जाते. मी आतापर्यंत १२० पर्यंत नेली आहे त्यापुढे नेण्याचे धैर्य झाले नाही. परंतु १२० वेगाला सुद्धा गाडी अगदी स्थिर आणि सुरक्षित वाटते
हीच अपेक्षा आहे बुलेट १२० ला फाटल्यासारखा आवाज काढायची. तेल गळती आणि इतरही समस्या अनुभवास आल्याने १२० क्रूझिंग करता आले नाही. ते जर डॉमिनॉर पूर्ण करीत असेल तर आळेफाटा - अहमदनगर सारख्या काही सुनसान रस्त्यांवर ही हौस वर्षातून चार पाचदा भागवायची इतकीच इच्छा आहे.

In reply to by सुबोध खरे

मुंबईत पूर्व दृतगती मार्ग, पश्चिम दृतगती मार्ग, पूर्व मूक्त मार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू आणि अशा अनेक मार्गांवर फक्त चारचाकी वाहनांनाच परवानगी आहे. त्यामुळे बरेचदा असे होते की जिथे कारने १५ ते २० मिनीटांत जाता येईल तिथे पोचायला या अतिवेगवान दुचाकींना दीड तासांहूनही अधिक कालावधी लागतो.
ही माहिती मला मुंबईतील एका रेनेगेडे मालकानेच दिली. या कारणानेच तो ती फक्त शिर्डीला जायला वापरतो असे त्याने सांगितले.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

रेनेगेड या गाडीचे उत्पादन बंद झाले आहे आणि त्याचे सुटे भाग सहजासहजी मिळत नाहीत. एकंदर या गाडीची स्थिती डामाडौलच आहे. हे वाचून घ्या https://www.financialexpress.com/auto/bike-news/um-motorcycles-shutting…

In reply to by सुबोध खरे

लिंकमध्ये दिलेला लेख वाचून तूर्तास रेनेगेडे विकत घेण्याचा विचार रद्द करीत आहे. बरीच शोधाशोध केल्यावर येझदी रोडस्टर हा एक चांगला पर्याय वाटला पण सेकंड हँडमध्ये मिळत नाही आणि नवीन वाहनाकरिता रु.२लाख चाळीस हजार इतके खर्च करावे लागत आहेत. वार्षिक पाच ते सहा हजार किमी वापराकरिता इतकी रक्कम खर्च करण्यापेक्षा मग मुंबई पासिंग जुनी डॉमिनॉरच विकत घ्यावी का असा विचार करत आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

हरकत नाही. शक्यतो ओळखीतून मिळते का ते पहा म्हणजे उत्तम. सर्व्हिस चेकअप आणि काही दुरुस्त्या आधी करून घ्याव्या लागतीलच !

In reply to by प्रचेतस

वरती म्हणल्याप्रमाणे थंडरबर्ड एक्स फॅमिलीनंतर रॉयल एनफिल्डनं वजन, रंग, सेफ्टी, राईट क्वालिटी इत्यादी सगळ्या परिमाणात कात टाकली आहे निव्वळ, कॉंटिनेंटल जीटी अन हिमालयनचा आपला एक क्लास आहे राव. हिमालयन परवडत नसेल पण फील हवा असेल तर हिरो मोटरकॉर्पची एक्स-पल्स भारी आहे एकदम. आता तर ती २२० सीसी (स्टँडर्ड करीजमा सेटप) मध्ये आणल्यापासून उत्तम वाटू लागली आहे ती पण.

In reply to by जेम्स वांड

२२० सीसी ? माझ्या माहितीनुसार २०० सी सी आहे ,सध्या ४ व्होल्व चे इण्जिन आणले आहे, गीयर रेशो शोर्ट केला आहे. नवीन अपडेट मस्त आहे xpulse

In reply to by कपिलमुनी

बेसिक डिस्प्लेसमेंट २२३ सीसी असावी करीजमा प्रमाणे, पण मी कन्फर्म नाही, नवीन asthetic डिझाईन लैच सुबक अन सुंदर आहे