नमस्कार मंडळी,
नोव्हेंबर महिन्यातील ताज्या घडामोडींच्या धाग्याच्या गाभ्यात भविष्यात तृणमूल काँग्रेस विरूध्द काँग्रेस हा छुपा किंवा उघड संघर्ष होईल असे म्हटले होते. तसे होताना काही प्रमाणात दिसत आहे. मागच्या आठवड्यात ममता बॅनर्जी दिल्लीला गेलेल्या असताना सोनिया गांधींना भेटणार का हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर- "मी कशाला सोनियांना भेटू? दिल्लीला आल्यावर सगळ्यांनी सोनियांना भेटलेच पाहिजे असा नियम आहे का?" असे उलटे प्रश्न ममतांनी पत्रकारांना विचारले. तसेच राज्यसभेत १२ विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खार्गे यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला तृणमूलचा कोणी प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही.
त्याप्रमाणेच गोवा विधानसभा निवडणुका ममता बॅनर्जींनी मोठ्या प्रतिष्ठेच्या केल्या आहेत असे दिसते. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो त्यांच्या पक्षात सामील झाले आहेत. त्यानंतर गोव्यात ममतांनी पोस्टर-फ्लेक्सचा धुमधडाका लावला आहे अशा बातम्या आहेत. मागच्या महिन्यात त्या गोवा भेटीला गेल्याही होत्या. तेव्हा विजय सरदेसाईंच्या गोवा फॉरवर्ड पक्षाशी तृणमूल आघाडी करायचे संकेत मिळाले होते. पण गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई आपल्या पक्षाच्या अन्य दोन आमदारांसह काल दिल्लीत राहुल गांधींना भेटले आणि गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-गोवा फॉरवर्ड ही आघाडी होणार असल्याची घोषणा झाली. यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिगंबर कामत तसेच कर्नाटकातील काँग्रेस नेते आणि गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडुरावही उपस्थित होते.
ममतांचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता त्यांना आघाडीत इतरांबरोबर जुळवून घेणे वगैरे प्रकार जमतील असे वाटत नाही. आपले म्हणणे ऐकून घेणारे मित्रपक्ष मिळाल्यास त्याला ममतांची ना असेल असे वाटत नाही पण आघाडीचा धर्म वगैरे गोष्टी त्यांना झेपणार्यातला आहेत असे वाटत नाही. काल त्यांनी मुंबईत येऊन शिवसेना नेत्यांचीही भेट घेतली. शिवसेना-तृणमूल आघाडी झाली तरी त्यामुळे फार फरक पडणार्यातला नाही. शिवसेनेचे बंगालमध्ये बळ शून्य आणि तृणमूलचे महाराष्ट्रातील बळ शून्य. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र आले तरी त्यामुळे फार काही फरक पडेल असे नाही. २०२४ मध्ये सगळ्या विरोधी पक्षांची आघाडी स्थापन झाली तरी त्यात काँग्रेस नसेल तर ती आघाडी मोदींना आव्हान देण्याइतकी सक्षम नसेल हे पूर्वीच लिहिले आहे. अशी आघाडी झाली तरी त्यात राज्यपातळीवरील पक्षांची आघाडी असेल. पण हे नेते आणि हे पक्ष त्या त्या राज्यात मते फिरवू शकले तरी राज्याबाहेर त्यांची ताकद शून्य आहे. उदाहरणार्थ द्रमुकचे स्टालिन किंवा देवेगौडा उत्तर प्रदेश, गुजरात वगैरे राज्यात दहा मते तरी प्रभावित करू शकतील का? बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर ममतांना विरोधी पक्षांचे नेतृत्व करायची स्वप्ने पडायला लागलेली आहेत असे दिसते आणि त्या मार्गात काँग्रेसचा अडसर त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे काँग्रेसचे खच्चीकरण करणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. लुईझिनो फालेरो, मुकुल संगमा वगैरे माजी मुख्यमंत्री त्यांच्या पक्षात सामील झाले आहेत. ममतांनी अधिक आक्रमक नेतृत्व दिल्यास इतरही काही काँग्रेस नेते तृणमूलमध्ये जाऊ शकतील. बहुतेक ही गोष्ट लक्षात आल्याने राहुल गांधी आणि काँग्रेसही परिस्थिती सावरायच्या मागे लागलेले दिसत आहेत असे वरकरणी वाटते. बघू पुढे काय होते ते.

वाचने
25181
प्रतिक्रिया
179
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यामुळे काँग्रेसचे खच्चीकरण करणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे.
विधानसभा निवडणुका
In reply to त्यामुळे काँग्रेसचे खच्चीकरण करणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. by तुषार काळभोर
भारतीय लोकशाही ???
In reply to त्यामुळे काँग्रेसचे खच्चीकरण करणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. by तुषार काळभोर
व्वा !!!
तृणमूल-आप
In reply to व्वा !!! by जेम्स वांड
आपची दाने
In reply to तृणमूल-आप by चंद्रसूर्यकुमार
गोव्यातील एकही तृणमूल प्रविष्ट नेत्यांची छवी ह्या पोस्टरवर नाही
In reply to व्वा !!! by जेम्स वांड
युपीए संपली
काँग्रेस आणि ममता यांच्यात
In reply to युपीए संपली by चंद्रसूर्यकुमार
ममता-पवार भेटीमुळे काँग्रेस अस्वस्थ!; 'भाजपला पराभूत करायचं असेल
इकडे गोव्यात काहीही चालू आहे
आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन
सुधारणा
In reply to आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन by चंद्रसूर्यकुमार
गुजरातचे मुख्यमंत्री लुटीसाठी मुंबईत- श्री.रा.रा.संजय राऊत
बंगालची उतरती कळा
In reply to गुजरातचे मुख्यमंत्री लुटीसाठी मुंबईत- श्री.रा.रा.संजय राऊत by चंद्रसूर्यकुमार
काँग्रेस संपणे
काँग्रेस कशी का असेना
पण बॉटमलाईन ही की काँग्रेस स्वतःच आत्मनाश करण्यावर ठाम आहे, घराणेशाही, नेतृत्वहीन असणे, तरुण तुर्क अन म्हातारे अर्क विसंवाद, प्रश्न न विचारण्याचे दरबारी कल्चर इतके सगळे असल्यावर वरील सगळे काय बोलावे
समजा
वाट बघा...
In reply to समजा by इरसाल
क्षेत्रीय क्षत्रप
डाव्या आणि उदारमतवादी हिंदुची
अशा वेळी, काही लोकं गप्पच बसतात
In reply to डाव्या आणि उदारमतवादी हिंदुची by Trump
गडकरी आणि गडकरी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ज़रूरी तो नहीं के शायरी वो ही करे जो इश्क में हो, ज़िन्दगी भी कुछ ज़ख्म बेमिसाल दिया करती है।वरिष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन...
मदनबाण.....
हिंदू मंदिरावर टॅक्स
पाकिस्तानात श्रीलंकेच्या नागरिकाला ठार मारून रस्त्यावर जाळलं
“वीर सावरकरांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच आहोत”; संजय राऊत
राजू शेट्टींचे रडगाणे
नवीन तीन कृषि कायद्याने ह्या
In reply to राजू शेट्टींचे रडगाणे by चंद्रसूर्यकुमार
:)
In reply to नवीन तीन कृषि कायद्याने ह्या by आग्या१९९०
विकास पुरूष केजरीवालांसारखा
In reply to :) by चंद्रसूर्यकुमार
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to विकास पुरूष केजरीवालांसारखा by अमरेंद्र बाहुबली
(मध्यस्थांची साखळी मोडणे,
:)
In reply to (मध्यस्थांची साखळी मोडणे, by आग्या१९९०
काही नाही कायदा बीजेपी सरकार
In reply to :) by चंद्रसूर्यकुमार
सहमत आहे ....
In reply to काही नाही कायदा बीजेपी सरकार by धनावडे
ज्या अर्थी आपण कांदा
In reply to :) by चंद्रसूर्यकुमार
पूर्णविराम
In reply to ज्या अर्थी आपण कांदा by आग्या१९९०
नेमकी हिच गोष्ट टळावी आणि
In reply to पूर्णविराम by चंद्रसूर्यकुमार
कायदा व अंमलबजावणी
In reply to नेमकी हिच गोष्ट टळावी आणि by आग्या१९९०
पण सुस्त सरकारी बाबूंच्या
In reply to कायदा व अंमलबजावणी by प्रदीप
कुठे ??
In reply to (मध्यस्थांची साखळी मोडणे, by आग्या१९९०
वसीम रिझवी यांनी सोडला इस्लाम धर्म....
जातं
In reply to वसीम रिझवी यांनी सोडला इस्लाम धर्म.... by मुक्त विहारि
त्यागी
In reply to जातं by कपिलमुनी
कुठेही जात मधे आनायलाच हवी का?
In reply to जातं by कपिलमुनी
कागदोपत्री
In reply to कुठेही जात मधे आनायलाच हवी का? by सुक्या
ज्यांना जात दाखवुन फायदा करुन
In reply to कागदोपत्री by जेम्स वांड
असं बघा
In reply to ज्यांना जात दाखवुन फायदा करुन by सुक्या
जौ दे. आम्ही पडलो सुधारणावादी
In reply to असं बघा by जेम्स वांड