Skip to main content

बस करा वृद्धांचे फालतू लाड

लेखक कोंबडी प्रेमी यांनी मंगळवार, 16/11/2021 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
वृद्ध माणसे आणि त्यातून स्त्रिया हे जे सहानुभूतीचे धनी होतात हे पुष्कळदा डोक्यात जाऊ लागलंय . ६५ ७० च्या पुढचे पुष्कळसे वृद्ध हल्ली अत्यंत एककल्ली हट्टी आहेत. वय वाढलं कि लोक हट्टी होतात हा का कोण जाणे उगीचच रुजलेला एक विचार आहे. जो माणूस चाळीशीत मृदू भाषी आहे तो पुढे जाऊन ओरडेश्वर होऊ शकत नाही. पण उभी हयात जमदग्नी असलेले लोकं वृद्धपणी वयाचा आडोसा घेऊन अजेंडा रेटतात हे संतापजनक आहे. आपली आजारपणे, स्वभावदोष, शारीरिक घटती शक्ती, मानसिक भित्या, विस्मरण वगैरेंचे हे लोक पुरेपूर वापर करून घेताना दिसतात. ह्या वृद्धांना स्वतःच वृद्धत्व पुरेपूर वसूल करताना काहीही संकोच नाहीये. आणि हल्ली अशी भरपूर उदाहरणे दिसत आहेत. स्वतःचा पैसा हक्क अधिकार वगैरेंबाबत १०० टक्के जागरूक आहेत (आणि तसे असावेत सुद्धा) पण आपल्यामुळे समोरच्याला त्रास होऊ नये हि अजिबात जाणीव नाही. मुले बाळे नसलेले एकेकटे वृद्ध जरा इतरांशी जुळवून घेतात परंतु ते तेवढंच. स्वतःच्या मोठेपणा पायी जवळच्यांना यथेच्छ वापरून घेणारे वृद्ध हे एक अनिष्ट पायंडा पडत आहेत. अशाने पुढच्या पिढ्या आपल्या वडील पिढीशी एक व्यावहारिक करार करून एक नाजूक नाते कोरड्या पातळीवर नेऊन ठेवतील
आज फेसबुक वर एक पोस्ट वाचली आणि त्यातील एक वाक्य मनात रुतून बसले आहे बहुतेक रिलेशनशिप्समधे एक थम्ब रुल असतो. चूक एकाची असते, भोगावं मात्र दुसऱ्यालाच लागतं - आणि जग अपेक्षा सुद्धा दुसऱ्याकडूनच करतं. "समजून घे, दुर्लक्ष कर, तो तसाच आहे, सोडून देत जा...वगैरे वगैरे...!"
काय वाटतंय कसे हाताळायचे हे वृद्ध ??
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 30611
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

In reply to by चित्रगुप्त

पीलू लै ग्गोड. तुमचा तर काही प्रश्नच नै. लंबर एक. आपण फॅन आहोत तुमचे. बाकी, मागील चित्रांचा पसाराही आवडला. विशेषतः असो. :) -दिलीप बिरुटे (चित्रगुप्त फॅन क्लब सदस्य) :)

मूळ लेख आणि प्रतिक्रिया वाचल्यावर काही टोकाच्या भूमिका जाणवतात आणि ह्या भूमिका हि मूळ समस्या आहे ! वै म
  • मी माझा स्वतंत्र
  • माझा कुणावर भार नाही
  • (तरुण असेल तर ) मी सगळ्यांना फाट्यावर मारतो
  • (वृद्ध असेन तर) मी माझी सोय लावली आहे ...मुलांना काडीचं करावं लागणार नाही सरळ वेगळा संसार मांडायला सांगीन
  • कुटुंबाला माझी गरज असेल तर येतील झक मारत
  • वृद्धापकाळ म्हणजे फक्त त्यांना समजून घ्या त्यांना सहानुभूतीची गरज आहे, का ? तर तुम्ही पण एक दिवस वृद्ध व्हाल
  • तरुण आहात का ? मग तुम्ही बेदरकार असणे स्वाभाविक आहे आणि तसे असाल तर तुम्हालाच फाट्यावर मारले पाहिजे
  • तुम्ही समोरच्याचे ऐकून घेत आहात का ?? मग घ्या कि ऐकून झाला त्रास तुम्हाला तर करा सहन कारण समोरच्याचा स्वभाव आहे तो ..तो बदलणार नाही कारण बदल तुम्ही स्वतः मध्ये घडवायचा असतो !!!
पण मुळात एका घरात २ किंवा जास्त पिढ्या ज्या पूर्वी राहत असत त्या हल्ली का राहू शकत नाहीत ? एक निरीक्षण असे कि गुजराती, मारवाडी शीख मुसलमान समाजांमध्ये घरात २ ३ पिढ्या संयुक्त कुटुंबे वगैरे सहज नांदतात ...आपल्या कडे काय प्रॉब्लेम येतो ??
डॉ खरेंचे प्रतिसाद मननीय !

खूप लोकांना माझ्या comments वाचून त्रास झाला (हे मला आज एका मित्राचा WA message आला तेव्हा समजलं), त्याबद्दल मी मनःपूर्वक दिलगीर आहे. मी मिसळपाव नियमित पाहात नाही म्हणून मला पत्ताच नव्हता आजपर्यंत. हे माझ्या हलगर्जीपणामुळे झाले. आत्ता बघितले तर माझे शेवटचे वाक्य 'बाकी नवीन पिढीबद्दल तक्रारी करीत राहणं हे आहेच', मग पुढचा भाग edit केला आहे. खरे तर त्यानंतर मी २-३ वाक्ये काहीशी - काहीशीच, कारण माझ्याकडे आता तो मजकूर नाही - खालीलप्रमाणे लिहिली होती. 'पण काय करावे, सांभाळून घ्यायलाच हवे, बरे वाईट, कमी अधिक असतेच. आपल्याकडे काही हिटलरचे राज्य नाही, काहीतरी जालीम उपाय करायला (नशीब!). तो म्हणाला असता... ' असे काहीतरी. मग पुढे ५-६ वाक्ये असावीत. गोची अशी आहे, की काय राहिले होते, काय उडाले, आणि काय edit झाले हे आता मला सांगता येणार नाही. त्या पोस्टमार्टेमला काही अर्थही नाही म्हणा. झाले असे, की मी तो मजकूर इकडून तिकडून टाईप करून (म्हणजे अर्धा मेलमध्ये, अर्धा नोट्स, इ. मराठीत टाईप करणे हा माझ्यासाठी त्रासदायक प्रकार आहे अजून) कॉपी-पेस्ट केला, आणि कधी नव्हे ते review न करता प्रकाशित करून टाकला. त्या भानगडीत ही वाक्ये गायब झाली. आणखीही काही गेली, शेवटची. But that cannot be an excuse. Self review cannot under any circumstance be bypassed. BTW, I am sixty nine, so I cannot be accused of carrying a chip on my shoulder against old people

सरसकटीकरण टाळलं जायलाच हवंय पण सगळीकडून ... मी लिहिलंय ते अलीकडे ऐकलेल्या पाहिलेल्या वाचलेल्या उदाहरणांवरून ! ह्यात कुणाला सत्यांश नाहीच असे म्हणायचे असेल तर अलाहिदा माझी मूळ चिंता पुन्हा मांडतो
अशाने पुढच्या पिढ्या आपल्या वडील पिढीशी एक व्यावहारिक करार करून एक नाजूक नाते कोरड्या पातळीवर नेऊन ठेवतील बहुतेक रिलेशनशिप्समधे एक थम्ब रुल असतो. चूक एकाची असते, भोगावं मात्र दुसऱ्यालाच लागतं - आणि जग अपेक्षा सुद्धा दुसऱ्याकडूनच करतं. "समजून घे, दुर्लक्ष कर, तो तसाच आहे, सोडून देत जा...वगैरे वगैरे...!"

शेवटी ? -दिलीप बिरुटे (वृद्ध ) :)

'बस करा वृद्धांचे फालतू लाड' हे शीर्षक लैच भडक आणि डोक्यात जाणारे आहे, संपादन करुन त्याची तीव्रता कमी करायला हवी. जसे काही शासकीय नियम आणि कायद्यांमुळे प्रचंड लाड सुरु आहेत आणि त्याचा अतिरेक झालाय अशा स्वरुपाचे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुपचं असंवेदनशील शीर्षक आहे.माझ्यापेक्षा माझ्या ६ वर्षाच्या मुलीच्या जेवणाच्या सवयी तिच्या आजीलाच माहिती आहे. लहानपणी आपल्या आईवडिलांना जर "बस करतो ह्या पोटच्या पोरांचे फालतू लाड "असे म्हटले असते तर..उगाच वाटले.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"शीर्षक लैच भडक आणि डोक्यात जाणारे आहे, " या पहिल्या भागाशी सहमत ... , ,पण यात शासन आणायची काहीच जरुरी नवहती !

In reply to by चौकस२१२

>>>>पण यात शासन आणायची काहीच जरुरी नवहती ! का बरं ? तुम्हाला कोणा फेकाफेकी करणा-या आणि इच्छा नसतांना 'हम करे सो कायदा' अशा पद्धतीने बेजवाबदार वागणा-या प्रवृत्तीची आठवण झाली काय ? तसे वाटत असेल तर, तसा समज करून घेऊ नये, माझा तसा कोणताही उद्देश नव्हता. खुलासा संपला. -दिलीप बिरुटे

द फंक्शन अँड नॉट द रिलेशन हे उपयोगी होईल. त्यांची एखादी गोष्ट पटत नसेल तर नाही म्हणून सांगता आले पाहीजे. आणि तुम्ही वृद्ध झाल्यावर तसंच करु नका आणि त्यांच्याशी ते वृद्ध असल्याप्रमाणे वागू नका :P माझी आज्जी तिच्या सगळ्या मुलांपेक्षा आणि नातवांपेक्षा ही शार्प आहे , ९३ वय.