वृद्ध माणसे आणि त्यातून स्त्रिया हे जे सहानुभूतीचे धनी होतात हे पुष्कळदा डोक्यात जाऊ लागलंय .
६५ ७० च्या पुढचे पुष्कळसे वृद्ध हल्ली अत्यंत एककल्ली हट्टी आहेत.
वय वाढलं कि लोक हट्टी होतात हा का कोण जाणे उगीचच रुजलेला एक विचार आहे. जो माणूस चाळीशीत मृदू भाषी आहे तो पुढे जाऊन ओरडेश्वर होऊ शकत नाही. पण उभी हयात जमदग्नी असलेले लोकं वृद्धपणी वयाचा आडोसा घेऊन अजेंडा रेटतात हे संतापजनक आहे.
आपली आजारपणे, स्वभावदोष, शारीरिक घटती शक्ती, मानसिक भित्या, विस्मरण वगैरेंचे हे लोक पुरेपूर वापर करून घेताना दिसतात. ह्या वृद्धांना स्वतःच वृद्धत्व पुरेपूर वसूल करताना काहीही संकोच नाहीये. आणि हल्ली अशी भरपूर उदाहरणे दिसत आहेत. स्वतःचा पैसा हक्क अधिकार वगैरेंबाबत १०० टक्के जागरूक आहेत (आणि तसे असावेत सुद्धा) पण आपल्यामुळे समोरच्याला त्रास होऊ नये हि अजिबात जाणीव नाही.
मुले बाळे नसलेले एकेकटे वृद्ध जरा इतरांशी जुळवून घेतात परंतु ते तेवढंच. स्वतःच्या मोठेपणा पायी जवळच्यांना यथेच्छ वापरून घेणारे वृद्ध हे एक अनिष्ट पायंडा पडत आहेत.
अशाने पुढच्या पिढ्या आपल्या वडील पिढीशी एक व्यावहारिक करार करून एक नाजूक नाते कोरड्या पातळीवर नेऊन ठेवतील
आज फेसबुक वर एक पोस्ट वाचली आणि त्यातील एक वाक्य मनात रुतून बसले आहे बहुतेक रिलेशनशिप्समधे एक थम्ब रुल असतो. चूक एकाची असते, भोगावं मात्र दुसऱ्यालाच लागतं - आणि जग अपेक्षा सुद्धा दुसऱ्याकडूनच करतं. "समजून घे, दुर्लक्ष कर, तो तसाच आहे, सोडून देत जा...वगैरे वगैरे...!"काय वाटतंय कसे हाताळायचे हे वृद्ध ??
वाचने
30611
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोभस अहोभाग्य
In reply to नातवंडांनातर आजी-आजोबा 'हवेच' असतात by चित्रगुप्त
वाह मस्त..!
In reply to नातवंडांनातर आजी-आजोबा 'हवेच' असतात by चित्रगुप्त
टोकाच्या भूमिका !!
- मी माझा स्वतंत्र
- माझा कुणावर भार नाही
- (तरुण असेल तर ) मी सगळ्यांना फाट्यावर मारतो
- (वृद्ध असेन तर) मी माझी सोय लावली आहे ...मुलांना काडीचं करावं लागणार नाही सरळ वेगळा संसार मांडायला सांगीन
- कुटुंबाला माझी गरज असेल तर येतील झक मारत
- वृद्धापकाळ म्हणजे फक्त त्यांना समजून घ्या त्यांना सहानुभूतीची गरज आहे, का ? तर तुम्ही पण एक दिवस वृद्ध व्हाल
- तरुण आहात का ? मग तुम्ही बेदरकार असणे स्वाभाविक आहे आणि तसे असाल तर तुम्हालाच फाट्यावर मारले पाहिजे
- तुम्ही समोरच्याचे ऐकून घेत आहात का ?? मग घ्या कि ऐकून झाला त्रास तुम्हाला तर करा सहन कारण समोरच्याचा स्वभाव आहे तो ..तो बदलणार नाही कारण बदल तुम्ही स्वतः मध्ये घडवायचा असतो !!!
पण मुळात एका घरात २ किंवा जास्त पिढ्या ज्या पूर्वी राहत असत त्या हल्ली का राहू शकत नाहीत ? एक निरीक्षण असे कि गुजराती, मारवाडी शीख मुसलमान समाजांमध्ये घरात २ ३ पिढ्या संयुक्त कुटुंबे वगैरे सहज नांदतात ...आपल्या कडे काय प्रॉब्लेम येतो ??मी दिलगीर आहे
सरसकटीकरण
काय ठरलं.
शीर्षक..
बरोबर
In reply to शीर्षक.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"शीर्षक लैच भडक आणि डोक्यात
In reply to शीर्षक.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
का ?
In reply to "शीर्षक लैच भडक आणि डोक्यात by चौकस२१२
सी
वर आणतोय
ए ए डाऊनलोड भौ...
In reply to वर आणतोय by एकुलता एक डॉन