सध्या मी काय पाहतोय ? भाग ८
डोर... २ स्त्रियांची कहाणी. दोन वेगळ्या स्त्रिया, वेगळ्या ठिकाणी राहणार्या... एकमेकांना भेटतात कारण त्यामागे एक डोर म्हणजे बंध... हा बंध भावनांचा आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गरजेचा.नागेश कुकनुर दिग्दर्शित २००६ सालचा हा चित्रपट असुन यात श्रेयस तळपदे ने सहज आणि सुंदर अभिनय केला असुन ज्या दोन मुख्य स्त्रियांची ही कहाणी आहे, त्या भुमिका आयेशा टाकिया आणि गुल पनाग यांनी साकारल्या आहेत.
आयेशा टाकिया ने देखील तिची व्यक्तिरेखा तितक्याच निरागसतेने साकारली आहे. ती या चित्रपटात फारच सुरेख दिसली आहे. :) तिला पहिल्यांदा मी Shake It Daddy Mix मधल्या Nahin Nahin या रिमिक्स गाण्यात पाहिले होते.
डोर हा मल्याळम चित्रपट Perumazhakkalam चा रिमेक आहे. राजस्थान, तिथले वातावरण आणि संगीत [ ज्याचा उल्लेख मी भाग ६ मध्ये केला होता, ज्यामुळे हा पाहिलेला चित्रपट मला परत आठवला. ] फार सुंदर वाटते.
हा चित्रपट निदान एकादा तरी पहावा असा असुन यात स्त्रियांच्या भाव-भावना अत्यंत सुंदरपणे चित्रित केल्या आहेत, ज्यामुळे मला तो अधिक आवडला.
---
--
-
या धाग्यात प्रतिसाद देणार्यांना माझी विनंती आहे की प्रतिसादात व्हिडियो देताना width="360" ठेवा म्हणजे धागा उघडण्यास जड होणार नाही.
आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ७
मदनबाण.....
प्रतिक्रिया
फॅमेली मॅन चे दोन्ही सिझन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दस्तक और आवाज तो कानों के लिए है...जो रुह को सुनाई दे उसे खामोशी कहते है...काल जय भिम चित्रपट पाहिला,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रफ़्तार कुछ इस कदर तेज़ हुई है जिन्दगी की, कि सुबह का दर्द शाम को पुराना हो जाता है।Yashi & Jolo Chips ! :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shodhu Mee Kuthe... :- Naav Mothan Lakshan Khotanअय्यो श्रद्धा... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ज़रूरी तो नहीं के शायरी वो ही करे जो इश्क में हो, ज़िन्दगी भी कुछ ज़ख्म बेमिसाल दिया करती है।सध्या लेविसन वूड ह्या अफलातून
Hellbound
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jhimma - Title SongPagination