आज आपल्या मिसळपावचा दिवाळी अंक तुमच्यासमोर ठेवताना मनात विलक्षण मिश्र भावना आहेत. त्यात सर्वात वरचढ 'भीती' आहे. ललित लेखन हा माझा प्रांत नाही, हे मला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे माझं नाव संपादक म्हणून सुचवलं गेलं, त्या वेळी पहिला विचार आला तो संपादकीय कसं लिहायचं! त्यामुळे या भावना विसकळीत असणार आहेत.
*
'दिवाळी अंक' या शतकाहून अधिक परंपरा असलेल्या मराठी साहित्य प्रकाराला मागील दहा-पंधरा वर्षांत ऑनलाइन परिमाण लाभलं. वाढते खर्च आणि घटती वाचकसंख्या याने एकीकडे छापील अंकांचा व्यवसाय अडचणीत येत असताना मागील दशकभरात केवळ ऑनलाइन असलेल्या दिवाळी अंकांनी बाळसं धरलं. आणि आता ऑनलाइन दिवाळी अंक चांगलेच रुजले आहेत. पुढील काही वर्षांत ऑनलाइन दिवाळी अंक हा मुख्य प्रवाह झाल्यास आश्चर्य वाटणार नाही आणि या प्रवाहाच्या उगमाशी मिसळपाव दिवाळी अंक आहे, हा अभिमान नेहमीच असेल. मिसळपाव या 'मराठी अभिव्यक्ती-मराठी संस्कृती'ला वाहिलेल्या संस्थळाचा हा बारावा दिवाळी अंक. बारा वर्षांत मिसळपावच्या दिवाळी अंकाने चौफेर विषय हाताळले. रहस्यकथा, विज्ञानकथा, शतशब्दकथा, प्रेमकथा, ऐतिहासिक लेख, चित्रपट परीक्षण, पुस्तक परीक्षण, विनोदी लेखन असे विविध प्रकार मिसळपावच्या दिवाळी अंकात नेहमीच असतात. काही वेळा अंकाला थीम अथवा विषय होते, तर काही वेळा पूर्णपणे मुक्त विषयांचे दिवाळी अंक होते. दोन्ही प्रकारांत लेखकांचा आणि वाचकांचा उदंड आणि भरघोस प्रतिसाद लाभला आणि त्यामुळे ऑनलाइन दिवाळी अंकांचा जेथे उल्लेख होतो, तेथे 'मिसळपाव दिवाळी अंक' हा एक आदरयुक्त उल्लेख नक्कीच असतो.
*
यंदाचा अंक मुक्त स्वरूपाचा आहे. अतिशय वैविध्यपूर्ण विषयांवर लेख, कविता अंकात आहेत. व्यंगचित्रे आहेत, पाककृती आहेत. कथा आहेत. या वेळी मिपाच्या सदस्यप्रिय लेखकांबरोबरच काही नवीन सदस्य आहेतच. मिसळपाव हे संस्थळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे याची प्रचिती यावी, असा भरभरून प्रतिसाद लेखकांनी दिला. त्याशिवाय काही वाचनमात्र सदस्यही या दिवाळी अंकात लिहिते झाले आहेत. मिसळपाव परिवारात त्यांचं हार्दिक स्वागत! त्यांनी लिहितं राहावं, या शुभेच्छा..
*
हा दिवाळी अंक पूर्णत्वास नेण्यास अनेकांचे हातभार लागले आहेत. पडद्यामागे दिवसरात्र कामं चालू होती. घराची दिवाळी तयारी, उद्योग-व्यवसाय-नोकरीतील कर्तव्य असं सगळं सांभाळून सर्वांनी नेटाने हा दिवाळी अंक वाचनीय, देखणा आणि संग्राह्य होईल याची काळजी घेतली. या सगळ्यांच्या कष्टाचं आणि प्रयत्नांचं फलित म्हणजे मिसळपाव दिवाळी अंक-२०२१. हा अंक साकार होण्यात ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घेतला, त्यांची नावं (अकारविल्हे) -
गवि
चिनार
जव्हेरगंज
टर्मीनेटर
तुषार कठाळे (मुखपृष्ठ)
नीलकांत
पियुषा
प्रचेतस
प्रशांत
प्रा डॉ दिलीप बिरुटे
महासंग्राम
संदीप चांदणे
सस्नेह
सुधांशुनूलकर
ज्ञानोबाचे पैजार
यांचे आभार मानणं हा त्यांच्या मिसळपाववरील प्रेमाचा उपमर्द होईल. त्यामुळे या मंडळींचं कौतुक! लेखन पाठवलेल्या सर्व लेखकांचे मनःपूर्वक धन्यवाद. तुमच्याशिवाय अंक पूर्ण होणं अशक्य होतं. आणि वाचकहो, तुमचे प्रतिसाद व प्रेम यामुळे दर वर्षी दिवाळी अंकाची तयारी करायला ऊर्जा मिळते.
मिसळपाव दिवाळी अंक चमूतर्फे हा दिवाळी अंक मी तुमच्या हाती सोपवतो...
धन्यवाद ..
दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचायला सुरुवात केली आहे, २
वाचायला सुरुवात केली आहे, २ लेख वाचून झाले आणि आता वाचन थांबवू नये असं वाटतय.
अंकासाठी मेहनत घेणार्या सर्व लेखक, लेखिका, कवी, कवयित्री, चित्रकार, संपादक मंडळ यांचे आभार
सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
(काही लेख हे 'साहित्य संपादक' आयडीने प्रकाशित झाले आहेत)
अगदी हेच लिहायला आलो होतो
In reply to वाचायला सुरुवात केली आहे, २ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अगदी माझ्या मनातले लिहीलेत
पाहुण्या लेखक/लेखिकांचे धागे 'साहित्य संपादक'
In reply to वाचायला सुरुवात केली आहे, २ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पाहुण्या लेखक/लेखिकांचे धागे तूर्तास 'साहित्य संपादक' आयडीने प्रकाशित झाले आहेत. सदस्यत्व तयार झाल्यावर लवकरच त्यांची नावे अपडेट केली जातील.
धन्यवाद.
सुंदर अंक !
अंकासाठी मेहनत घेणार्या सर्व लेखक, चित्रकार, सजावटकार व संपादक मंडळ यांचे आभार !!
आभार आणि दिपावलीच्या हार्दिक
आभार आणि दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्वांचे अभिनंदन, आभार,
सर्वांचे अभिनंदन, आभार, धन्यवाद.
अनुक्रमणिकेची लिंक कुठाय?
@ तुषार,
@ तुषार,
साधे सोपे सरळ संपादकीय दुर्मिळ असते. शीर्षकापासून ते आभारवचनांपर्यंत साधेपणा असलेले आणि अजिबात शब्दबंबाळ नसलेले संपादकीय आवडले.
अंक सिद्ध करण्यासाठी राबणाऱ्या संपूर्ण चमूचे अभिनंदन आणि सर्वांना दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा.
आता पुढे २-३ दिवस अंक वाचणार निवांत !
दिवाळी अंकातील प्रत्येक लेख
दिवाळी अंकातील प्रत्येक लेख वाचून मग प्रतिक्रिया देईन.
एक सूचना आहे. वेगवेगळ्या लेखांच्या स्वरूपात दिवाळी अंक असण्याऐवजी एका पीडीएफ स्वरूपात सर्व लेख एकत्र असावे.
माझ्यासाठी असा दिवाळी अंक
माझ्यासाठी असा दिवाळी अंक नवीन आहे. पण छान वाटतंय. यात सहभागी होता आलं, लिहीता आलं याचा आनंद आहे .धन्यवाद.
छान संपादकीय
वाह सुंदर सुरुवात. मला अनुक्रमणिका पेज वरुन संपादकीय दिसत नव्हते म्हणून मग आडमार्गाने इथे पोहचलो. त्याचे सार्थक झाले.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा
देखणा अंक
दिवाळी अंक अगदी सुबक झाला आहे. छापील अंक हातात धरल्यासारखं वाटलं. संपादक आणि समितीचे आभार.
आता अनेक दिवस वाचन फराळ मिळणार..
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
संपादकीय आवडले
साध्या सोप्या शब्दांत थेट भावना व्यक्त केलेले संपादकीय आवडले अन भावले.
संपादकपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल तुषार यांचे अभिनंदन.
दिवाळी अंकाचे काम करणार्या सर्व स्वयंसेवकांना मनापासून धन्यवाद.
आता निवांतपणे अंकाचा आस्वाद घेतो
सहजसुंदर असे संपादकीय. अगदी
सहजसुंदर असे संपादकीय. अगदी मनापासून उतरलेलं.
सहमत.
In reply to सहजसुंदर असे संपादकीय. अगदी by प्रचेतस
सहमत.
नूलकरकाकांचे या आणि
नूलकरकाकांचे या आणि आतापर्यंतच्या सर्व अंकांतले योगदान अतिशय मोठं मोलाचं आहे. इतक्या प्रचंड कंटेंटचं मुद्रितशोधन एकहाती पूर्ण करणं, आणि तेही वेळेत, हे खरंच शिवधनुष्य आहे. टर्मिनेटर यांनी प्रत्येक लेख सजवला आणि त्याला अंगडेटोपडे घालून तीट लावून पेश केला. इतर सर्वांनी त्यांचा त्यांचा भाग उत्तम सांभाळला . मग ते मुखपृष्ठ बनवणे असो किंवा लेखकांचा पाठपुरावा आणि संकलन.
हे सर्वजणांनी अगदी निरपेक्षपणे केलं हा सर्वात विलक्षण भाग. अशा टीमसोबत (विशेष काही काम न करता चार सल्ले देण्याच्या मिषाने का होईना ;-) ) नुसते असण्यातही कितीतरी आनंद मिळतो.
धन्यवाद.
वरती अनिन्द्य साहेबांनी
वरती अनिन्द्य साहेबांनी म्हंटल्या प्रमाणे
'सादगी में सुंदरता' म्हणतात त्याची प्रचिती आली 👍:
उत्तम संपादन
सुटसुटीत आनि सहज , खूप आवडले.
अंकासाठी लिखाण करणार्या आणि
अंकासाठी लिखाण करणार्या आणि त्यास सहाय्य करणार्या सर्व मंडळीचे विशेष कौतुक आणि अभिनंदन !
मदनबाण.....
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा !
नरक चतुर्दशी पहाट .
संपादक ,
संपादक मंडळ ,
मुखपृष्ठ ,
अंक सजावट ,
मुद्रित शोधन ,
संकलक ,
सर्व लेखक ,
या साऱ्यांनी घेतलेल्या कष्टाचं प्रतिबिंब अंकात उमटलं आहे . अभिनंदन ! त्याची पोचपावती वाचक देतीलच .
खूप सुरेख आणि भरगच्च अंक आहे .
सुरेल !
वाचकांना एवढा मोठा अंक उपलब्ध होणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे . अंक उत्कुष्ट या वर्गवारीत मोडतो .
सध्याच्या एकूण अंधाऱ्या नकारात्मक वातावरणात एक आशादायी प्रकाश देणारा दीप , असं मी या अंकाचं वर्णन करिन .
अन या अंकाची दखल, फक्त मुद्रित माध्यमाची दखल घेणारी सर्व प्रकारची, जाणती मंडळीही घेतील अन योग्य प्रकारे घेतील अशी आशा !
अंक सावकाशीने वाचावा लागणार .
पुन्हा एकदा साऱ्यांचे खूप कौतुक अन आभार .
शुभ दीपावली !
मस्त झालाय अंक.
मस्त झालाय अंक. वाचतोय.
सर्व टीमचे अभिनंदन.
अतिसुंदर.
मुखपृष्ठ - संपादकीयापासून शेवटपर्यंत यंदाचा दिवाळी अंक उत्कृष्ट झालेला आहे. सर्वांचे अभिनंदन.
अभिनंदन!
साधे सरळ संपादकीय आवडले. अंक अगदी नेटका आणि विविधतापूर्ण झाला आहे. या अंकासाठी काम करणार्यांचे मनापासून आभार.
मला तळाकडच्या दोन-चार कथा
मला तळाकडच्या दोन-चार कथा दिसत नाहीत, access denied येतंय, काय भानगड आहे?
आवडलं
आवडलं. धन्यवाद.
छान झालाय अंक
वाचताना मजा येत आहे.
ह्या अंकासाठी लिहिणार्या, आणि ते लिखाण आम्हा वाचकांपर्यंत पोहोचवणार्या सगळ्या चमूला माझ्यातर्फे धन्यवाद.
ह्या अंकाच्या यशासाठी झटणार्या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन! अंक संग्राह्य झालाय.
अंक भन्नाट सुंदर आहे.
बहुतेक लेख वाचून झालेत, कमेंटा देखिल दिल्यात.
कारण .... अंक भन्नाट सुंदर आहे. हे संपादकीय देखिल सुरेखच !
💖
अंकासाठी मेहनत घेणार्या सर्व लेखक, चित्रकार, सजावटकार व संपादक मंडळ यांचे आभार !!
संपादकीय.....
तुषार काळभोर जी, आपले व सपांदकीय मंडळाचे अभिनंदन. अंक आवडला. सर्व लेखक लेखीकांचे अभिनंदन आणी आमची दिवाळी गोड केल्याबद्दल धन्यवाद.
संपादकीय.....
तुषार काळभोर जी, आपले व सपांदकीय मंडळाचे अभिनंदन. अंक आवडला. सर्व लेखक लेखीकांचे अभिनंदन आणी आमची दिवाळी गोड केल्याबद्दल धन्यवाद.
सगळा अंक वाचला! मस्त झाला आहे
सगळा अंक वाचला! मस्त झाला आहे एकदम!!

दिवाळी अंकासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन आणी आभार!!!