आज आपल्या मिसळपावचा दिवाळी अंक तुमच्यासमोर ठेवताना मनात विलक्षण मिश्र भावना आहेत. त्यात सर्वात वरचढ 'भीती' आहे. ललित लेखन हा माझा प्रांत नाही, हे मला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे माझं नाव संपादक म्हणून सुचवलं गेलं, त्या वेळी पहिला विचार आला तो संपादकीय कसं लिहायचं! त्यामुळे या भावना विसकळीत असणार आहेत.
*
'दिवाळी अंक' या शतकाहून अधिक परंपरा असलेल्या मराठी साहित्य प्रकाराला मागील दहा-पंधरा वर्षांत ऑनलाइन परिमाण लाभलं. वाढते खर्च आणि घटती वाचकसंख्या याने एकीकडे छापील अंकांचा व्यवसाय अडचणीत येत असताना मागील दशकभरात केवळ ऑनलाइन असलेल्या दिवाळी अंकांनी बाळसं धरलं. आणि आता ऑनलाइन दिवाळी अंक चांगलेच रुजले आहेत. पुढील काही वर्षांत ऑनलाइन दिवाळी अंक हा मुख्य प्रवाह झाल्यास आश्चर्य वाटणार नाही आणि या प्रवाहाच्या उगमाशी मिसळपाव दिवाळी अंक आहे, हा अभिमान नेहमीच असेल. मिसळपाव या 'मराठी अभिव्यक्ती-मराठी संस्कृती'ला वाहिलेल्या संस्थळाचा हा बारावा दिवाळी अंक. बारा वर्षांत मिसळपावच्या दिवाळी अंकाने चौफेर विषय हाताळले. रहस्यकथा, विज्ञानकथा, शतशब्दकथा, प्रेमकथा, ऐतिहासिक लेख, चित्रपट परीक्षण, पुस्तक परीक्षण, विनोदी लेखन असे विविध प्रकार मिसळपावच्या दिवाळी अंकात नेहमीच असतात. काही वेळा अंकाला थीम अथवा विषय होते, तर काही वेळा पूर्णपणे मुक्त विषयांचे दिवाळी अंक होते. दोन्ही प्रकारांत लेखकांचा आणि वाचकांचा उदंड आणि भरघोस प्रतिसाद लाभला आणि त्यामुळे ऑनलाइन दिवाळी अंकांचा जेथे उल्लेख होतो, तेथे 'मिसळपाव दिवाळी अंक' हा एक आदरयुक्त उल्लेख नक्कीच असतो.
*
यंदाचा अंक मुक्त स्वरूपाचा आहे. अतिशय वैविध्यपूर्ण विषयांवर लेख, कविता अंकात आहेत. व्यंगचित्रे आहेत, पाककृती आहेत. कथा आहेत. या वेळी मिपाच्या सदस्यप्रिय लेखकांबरोबरच काही नवीन सदस्य आहेतच. मिसळपाव हे संस्थळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे याची प्रचिती यावी, असा भरभरून प्रतिसाद लेखकांनी दिला. त्याशिवाय काही वाचनमात्र सदस्यही या दिवाळी अंकात लिहिते झाले आहेत. मिसळपाव परिवारात त्यांचं हार्दिक स्वागत! त्यांनी लिहितं राहावं, या शुभेच्छा..
*
हा दिवाळी अंक पूर्णत्वास नेण्यास अनेकांचे हातभार लागले आहेत. पडद्यामागे दिवसरात्र कामं चालू होती. घराची दिवाळी तयारी, उद्योग-व्यवसाय-नोकरीतील कर्तव्य असं सगळं सांभाळून सर्वांनी नेटाने हा दिवाळी अंक वाचनीय, देखणा आणि संग्राह्य होईल याची काळजी घेतली. या सगळ्यांच्या कष्टाचं आणि प्रयत्नांचं फलित म्हणजे मिसळपाव दिवाळी अंक-२०२१. हा अंक साकार होण्यात ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घेतला, त्यांची नावं (अकारविल्हे) -
गवि
चिनार
जव्हेरगंज
टर्मीनेटर
तुषार कठाळे (मुखपृष्ठ)
नीलकांत
पियुषा
प्रचेतस
प्रशांत
प्रा डॉ दिलीप बिरुटे
महासंग्राम
संदीप चांदणे
सस्नेह
सुधांशुनूलकर
ज्ञानोबाचे पैजार
यांचे आभार मानणं हा त्यांच्या मिसळपाववरील प्रेमाचा उपमर्द होईल. त्यामुळे या मंडळींचं कौतुक! लेखन पाठवलेल्या सर्व लेखकांचे मनःपूर्वक धन्यवाद. तुमच्याशिवाय अंक पूर्ण होणं अशक्य होतं. आणि वाचकहो, तुमचे प्रतिसाद व प्रेम यामुळे दर वर्षी दिवाळी अंकाची तयारी करायला ऊर्जा मिळते.
मिसळपाव दिवाळी अंक चमूतर्फे हा दिवाळी अंक मी तुमच्या हाती सोपवतो...
धन्यवाद ..
दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!
वाचने
16375
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचायला सुरुवात केली आहे, २
अगदी हेच लिहायला आलो होतो
In reply to वाचायला सुरुवात केली आहे, २ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पाहुण्या लेखक/लेखिकांचे धागे 'साहित्य संपादक'
In reply to वाचायला सुरुवात केली आहे, २ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सुंदर अंक !
आभार आणि दिपावलीच्या हार्दिक
सर्वांचे अभिनंदन, आभार,
@ तुषार,
दिवाळी अंकातील प्रत्येक लेख
माझ्यासाठी असा दिवाळी अंक
छान संपादकीय
देखणा अंक
संपादकीय आवडले
सहजसुंदर असे संपादकीय. अगदी
सहमत.
In reply to सहजसुंदर असे संपादकीय. अगदी by प्रचेतस
नूलकरकाकांचे या आणि
वरती अनिन्द्य साहेबांनी
उत्तम संपादन
अंकासाठी लिखाण करणार्या आणि
मदनबाण.....
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या
मस्त झालाय अंक.
अतिसुंदर.
अभिनंदन!
मला तळाकडच्या दोन-चार कथा
आवडलं
छान झालाय अंक
अंक भन्नाट सुंदर आहे.
💖
अंकासाठी मेहनत घेणार्या सर्व लेखक, चित्रकार, सजावटकार व संपादक मंडळ यांचे आभार !!संपादकीय.....
संपादकीय.....
सगळा अंक वाचला! मस्त झाला आहे