Skip to main content

आजही श्वासात आहे.. लागतो काही सुगावा

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 21/04/2009 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा प्रसन्न शेंबेकर यांची सुरेख रचना पाहतो श्वासात कोठे.. लागतो काही सुगावा आजही श्वासात आहे लागतो काही सुगावा काल तू होतीस प्याली सांगतो आहे पुरावा अंगणापर्यंत आता वारुणीचा वास जातो काल मी बहुतेक गेलो ह्याच वाटेने असावा? ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का? "सोड दारू" ही म्हणावे ग्लास ही हाती धरावा ती म्हणाली "माग ना रे... तू, मला सोडून काही" (ग्लास तू भरशील तेव्हा चेहरा माझा दिसावा! ) काय अंधारून आले माझिया डोळ्यांसभोती भास नाही रे तुझा तो पेग पतियाळी असावा लागले थोडे जळाया यातना झाल्या मला ही पायलो मी काल ज्याला, ब्रँड तो माझा नसावा वाटते काही कवींना एकदा हे ही घडावे एकदा "केश्या"स या पण चांगला कोणी धुवावा
लेखनविषय:

वाचने 4562
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

हा हा हा हा ! मस्त ! **** पतियाळी = पटियाला पुर्वी (१९४७ च्या आधी) पटियाला व नाबा ही दोन संस्थाने होती पंजाब मध्ये, पटियाला खुप मोठे संस्थान व नाबा खुप लहान संस्थान पण भावा भावांचे होते व त्याच्या मधील नाते देखील सुमधुर होते त्यामुळे पटियालाचे महाराज व नाबाचे महाराज रोज पार्टीला एकत्र बसत, नाबाचे महाराज हे पॅग खुप मोठा (९० एमएल च्या वर) भरत तर पटियालाचे महाराज एकदम छोटा पॅग भरत त्यामुळे जेव्हा पटियालाचे महाराज नाबा महाराजांचा पॅग भरत तेव्हा ते म्हणत, नाबा तेरा छोटासा पर पॅग तेरा पटियालासा ! थोडेसं नवीन !

In reply to by दशानन

अवांतर :-पटीयाला पॅग बद्दल ची माहिती दिलीत त्याबद्दल मंडळ आपलं आभारी आहे... :-) अतीअवांतरः-विडंबन अगदीच पटीयाला झालये....;-) (१२० X ३००) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

In reply to by दशानन

उत्खनक धन्यवाद, विडंबन तर झक्कासच पण सोबत ही माहितीही पुरवल्याबद्दल दशाननरावांचे अनेक आभार!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

लैच कडक .. एकदम पहिल्या धारेचे हो ;) राजेंचे विशेष आभार ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

मजा आली! रात्री पिताना परत वाचु! -सँडी काय'द्याच बोला?

ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का? "सोड दारू" ही म्हणावे ग्लास ही हाती धरावा एक नंबर. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का? "सोड दारू" ही म्हणावे ग्लास ही हाती धरावा लागले थोडे जळाया यातना झाल्या मला ही पायलो मी काल ज्याला, ब्रँड तो माझा नसावा अशक्य जमलेले आहे! =))