आमची प्रेरणा प्रसन्न शेंबेकर यांची सुरेख रचना पाहतो श्वासात कोठे.. लागतो काही सुगावा
आजही श्वासात आहे लागतो काही सुगावा
काल तू होतीस प्याली सांगतो आहे पुरावा
अंगणापर्यंत आता वारुणीचा वास जातो
काल मी बहुतेक गेलो ह्याच वाटेने असावा?
ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का?
"सोड दारू" ही म्हणावे ग्लास ही हाती धरावा
ती म्हणाली "माग ना रे... तू, मला सोडून काही"
(ग्लास तू भरशील तेव्हा चेहरा माझा दिसावा! )
काय अंधारून आले माझिया डोळ्यांसभोती
भास नाही रे तुझा तो पेग पतियाळी असावा
लागले थोडे जळाया यातना झाल्या मला ही
पायलो मी काल ज्याला, ब्रँड तो माझा नसावा
वाटते काही कवींना एकदा हे ही घडावे
एकदा "केश्या"स या पण चांगला कोणी धुवावा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4596
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहाहा
जबरी 'दारू'काम!
(फटाकडा)बेसनलाडू
डब्बल
नुसता पतियाळी नाही, हा तर डब्बल पतियाळी झालाय.
हाहाहाहा....
गुर्जी जबरा!
मूळ गझल अन् हे विडंबन, दोन्ही अप्रतीम वठले आहेत!
राघव
मस्त
मजा आली
हा हा हा हा
हा हा हा हा !
मस्त !
****
पतियाळी = पटियाला
पुर्वी (१९४७ च्या आधी) पटियाला व नाबा ही दोन संस्थाने होती पंजाब मध्ये, पटियाला खुप मोठे संस्थान व नाबा खुप लहान संस्थान पण भावा भावांचे होते व त्याच्या मधील नाते देखील सुमधुर होते त्यामुळे पटियालाचे महाराज व नाबाचे महाराज रोज पार्टीला एकत्र बसत, नाबाचे महाराज हे पॅग खुप मोठा (९० एमएल च्या वर) भरत तर पटियालाचे महाराज एकदम छोटा पॅग भरत त्यामुळे जेव्हा पटियालाचे महाराज नाबा महाराजांचा पॅग भरत तेव्हा ते म्हणत, नाबा तेरा छोटासा पर पॅग तेरा पटियालासा !
चित्र उपलब्ध नाही
थोडेसं नवीन !
वा वा !!
In reply to हा हा हा हा by दशानन
अवांतर :-पटीयाला पॅग बद्दल ची माहिती दिलीत त्याबद्दल मंडळ आपलं आभारी आहे... :-)
अतीअवांतरः-विडंबन अगदीच पटीयाला झालये....;-)
(१२० X ३००)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
उत्खनक धन्यवाद, विडंबन तर
In reply to हा हा हा हा by दशानन
उत्खनक धन्यवाद, विडंबन तर झक्कासच पण सोबत ही माहितीही पुरवल्याबद्दल दशाननरावांचे अनेक आभार!
मस्त
मस्त
धन्यवाद!!
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार
जबरी
खरच पटीयाला झालय विडंबन.
प्रो. आंबोळी
लैच कडक ..
लैच कडक .. एकदम पहिल्या धारेचे हो ;)
राजेंचे विशेष आभार !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
मस्तच............
खुपच जबराट कविता झाली आहे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
मजा
मजा आली!
रात्री पिताना परत वाचु!
-सँडी
काय'द्याच बोला?
ही दुहेरी
ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का?
"सोड दारू" ही म्हणावे ग्लास ही हाती धरावा
एक नंबर.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
मस्तच सुगावा!
धमाकेबाज मद्यडुंबन!
चतुरंग
मस्त.
मस्त.
सुधीर कांदळकर.
एकदम मस्त दारूकरी........
सुहास
आज "मै॑ या तो वो"
ह्याला म्हणतात विडंबन!
ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का?
"सोड दारू" ही म्हणावे ग्लास ही हाती धरावा
लागले थोडे जळाया यातना झाल्या मला ही
पायलो मी काल ज्याला, ब्रँड तो माझा नसावा
अशक्य जमलेले आहे! =))
__/\__ =)))))) कहर ! =))
__/\__ =)))))) कहर ! =))