Skip to main content

चालू घडामोडी - घटलेले सरासरी आयुर्मान आणि प्रदूषण

लेखक Pratham यांनी शुक्रवार, 03/09/2021 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
२ दिवसांपूर्वी संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवलानुसार उत्तर भारतातील(दिल्ली, ऊ.प्र.,बिहार,हरयाणा इ) राज्यांतील नागरिकांचे सरासरी आयुर्मान हवा प्रदूषणा मुळे ९ वर्षांनी कमी होत आहे व विविध श्वसनाविषयी आजार होत आहेत. तर महाराष्ट्र, म. प्र. या राज्यात ते प्रमाण २.५ ते ३ वर्षे इतके आहे. रस्ते अपघात,कर्करोग,आत्महत्या यांच्यामुळे होणाऱ्या मृत्यू पेक्षा प्रदूषणामुळे होणारे अकाली मृत्यू चे प्रमाण जास्त आहे. पण आपल्या नाकर्त्या राज्यकर्त्यांना त्याची काही तमा नाही. आणि आपण नागरिक म्हणून योग्य मागण्या करत नाही असे मला वाटते. मी पंढरपूर येथे राहतो व दिवसातून कमीत कमी एकदा तरी घराबाहेर पडावे लागते. पंढरपुरात कुठेही जावा तुमच्या नाका तोंडात धूळ आणि धूर गेल्याशिवाय राहणार नाही(आता मास्क मुळे ते होणार नाही). गावातून १-२ तास फिरून आले की डोळे लाल होतात. आपली आयुष्याची गुणवत्ता कधी आणि कशी सुधारणार? हे माझे पहिलेच आणि थोडके लेखन आहे तरी चुका झाल्या असल्यास क्षमस्व. आणि लेखात काही तांत्रिक चुकी असल्यास नक्की दुरुस्त करण्यास सुचवावे. धन्यवाद.

वाचने 12234
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया