✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ५ )

म
मदनबाण यांनी
Wed, 08/25/2021 - 18:44  ·  लेख
लेख
बुडत्याचा पाय खोलात ? क्लिप :-
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
49954 वाचन

💬 प्रतिसाद (181)

प्रतिक्रिया

यापेक्षाही अजून एक भयंकर घटना

श्रीगुरुजी
Sat, 08/28/2021 - 10:19 नवीन
यापेक्षाही अजून एक भयंकर घटना १९९३ मध्ये घडली ज्याचा उल्लेख सर्व माध्यमे टाळत असतात कारण तेव्हा त्यांच्या लाडक्या पक्षाचे सरकार केंद्रात होते. सप्टेंबर १९९३ मध्ये ७-८ पाकिस्तानी अतिरेकी काश्मीरमधील हजरतबाल मशिदीत घुसल्यानंतर तातडीने लष्कराने मशिदीला सर्व बाजूने वेढा घालून अतिरेक्यांना आत अडकवून ठेवले. मशिदीत आत एकही नागरिक नव्हता. त्यामुळे कोणाच्याही जिवाला धोका नव्हता. अतिरेक्यांनी शरण येण्यास नकार दिल्याने लष्कराने मशिदीची वीज व पाणी तोडले. त्याविरुद्ध काही पाकिस्तानप्रेमी ढोंगी पुरोगामी सर्वोच्च न्यायालयात गेले व सर्वोच्च न्यायालयाने वीजपुरवठा पूर्ववत करून अतिरेक्यांना अन्नपाणी पुरविण्याचा अत्यंत विचित्र आदेश दिला. त्यामुळे नाईलाजाने लष्करालाअतिरेक्यांना अन्नपाणी पुरवावे लागले. अतिरेकी आत अडकले होते, पळून जाण्याची सुतराम शक्यता नव्हती व एकाही नागरिकाचा जीव धोक्यात नव्हता. परंतु २-३ महिन्यांनतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान व हिमाचल प्रदेश या ४ राज्यांची निवडणुक होती. मुस्लिम मते जाऊ नयेत यासाठी अतिरेक्यांना सुखरूप पाकिस्तानातला जाऊन देण्याचा अत्यंत संतापजनक आदेश नरसिंहरावांनी लष्कराला देऊन अतिरेक्यांना सोडून दिले. १९९९ मध्ये अपहरण केलेल्या विमानात १७० नागरिक होते. त्यातील एकाला अतिरेक्यांनी मारून टाकले होते व दुसऱ्याला जखमी केले होते. जवळपास ७-८ दिवस प्रवाशांना विमानातून बाहेर जाऊन दिले नव्हते. विमानातील सर्व टॉयलेट्स तुडुंब भरली होती व नंतर विमानातील दिसेल त्या रिकाम्या जागेवर प्रवाशांना नैसर्गिक विधी करावे लागले. त्यामुळे विमानात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. कंदाहारमध्ये विमानाला तालिबानी रणगाड्यांंनी वेढा घातल्याने कोणत्याही प्रकारची सुटकेची कारवाई करणे जगातील कोणत्याही देशाला अशक्य होते. अशा परिस्थितीत अतिरेक्यांच्या मागण्या मान्य करणे किंवा १७० प्रवाशांचा जीव जाऊ देणे हे दोनच पर्याय शिल्लक होते. अतिरेक्यांनी सुरूवातीला १० कोटी डॉलर्स व ४० अतिरेक्यांना सोडण्याची मागणी केली होती. नंतर अजित डोवलांनी बऱ्याच वाटाघाटी करून ही मागणी फक्त ३ अतिरेकी सोडण्यावर आणली. प्रवाशांच्या सुटकेसाठी जसवंतसिंह आपला जीव धोक्यात घालून कंदाहारला जाऊन सर्व प्रवाशांना सुखरूप परत घेऊन आले. १७० नागरिकांचे जीव वाचविणे याला गुडघे टेकले म्हणणे हे अत्यंत निर्बुद्ध व महामूर्ख असल्याचे लक्षण आहे. अर्थात जे असा आरोप करीत आहेत त्यांनी आपला मूर्खपणा वारंवार सिद्ध केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

अतिरेक्यांना सोडून दिल्याच्या

श्रीगुरुजी
Sat, 08/28/2021 - 10:39 नवीन
अतिरेक्यांना सोडून दिल्याच्या अजून काही घटना १९९१-९२ या काळात घडल्या आहेत. १९९१ मध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक दोराईस्वामींचे काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी अपहरण केल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी ७ अतिरेक्यांना नरसिंहरावांनी सोडले होते. १९९२ मध्ये गुलाम नबी आझादांच्या मेव्हण्याचे अपहरण केल्यानंतर नरसिंहरावांनी एका कट्टर अतिरेक्याला सोडले होते. https://www.google.com/amp/s/wap.business-standard.com/article-amp/news-ians/terror-trail-v-the-politics-of-abduction-in-kashmir-ians-exclusive-119051100133_1.html परंतु नरसिंहरावांंच्याच काळात एच एम टीचे महाव्यवस्थापक खेरा व इतर दोघांच्या अपहरणानंतर अतिरेक्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने त्यांनी तिघांनाही मारून टाकले होते. १९९५ मध्ये काश्मीरमधील ६ परदेशी पर्यटकांचे अपहरण करून शेवटी मागच्या पूर्ण होत नसल्याने त्यांना मारण्यात आले होते. जर १९९९ मध्ये ३ अतिरेक्यांना सोडले धसते तर सर्व १७० प्रवाशांना मारून टाकले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

कशाला अकलेचं दिवाळं जाहीर

सुबोध खरे
Sat, 08/28/2021 - 11:28 नवीन
कशाला अकलेचं दिवाळं जाहीर ऐकलेल्या टिनपाट लोकांना उत्तरे देण्यात आपला अमूल्य वेळ फुकट घालवताय? त्यांचा वैचारिक बद्धकोष्ठ बरं होणार आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

प्रदीप यांनी उत्तर दिल्यानंतर

श्रीगुरुजी
Sat, 08/28/2021 - 13:59 नवीन
प्रदीप यांनी उत्तर दिल्यानंतर त्यात मी थोडी भर टाकली इतकंच. अन्यथा या हऱ्यानाऱ्यांच्या बाष्कळ बरळीकडे मी फारसे लक्ष देत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आयला, खर कि काय?

नावातकायआहे
Sat, 08/28/2021 - 12:58 नवीन
भाजप राज्यातून नामशेष होनार आहे.>>> कडकड टाळी , शिट्यांचा दणका आणि १०१ तोफांची सलमी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

फडणवीस नेता, चं.पा अध्यक्ष,

अमरेंद्र बाहुबली
Sat, 08/28/2021 - 13:01 नवीन
फडणवीस नेता, चं.पा अध्यक्ष, कृपाशंकर ऊपाध्यक्ष. विरोधात पवार आणी ठाकरे :) भाजपची वेळ जवळ येऊन ठेपलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

४ महापालिकांंची मुदत संपून

श्रीगुरुजी
Fri, 08/27/2021 - 16:45 नवीन
४ महापालिकांंची मुदत संपून बराच काळ लोटलाय व अजून १० महापालिकांंची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपतेय. पुढील वर्षभर तरी निवडणुक होणे अवघड दिसतंय. त्यासाठी कोरोना, इतर मागासवर्गीयांसाठी असलेले रद्द झालेले मतदारसंघ अशी कारणे दिली जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

खरंय.

शाम भागवत
Fri, 08/27/2021 - 17:01 नवीन
खरंय. तसंच व्हावं अशी इच्छा आहे. शिवसेनेने असंच काही बाही करत आपले मरण पुढे पुढे ठकलत राहावे हे नैसर्गिक आहे. कारण तसं झालं तरच जास्त चांगल्या रितीने व भक्कम धृविकरण होईल. या साठीच मी भाजपाला अनायासे मिळालेली संधी असं म्हणतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पण निवडणुक पुढे जाणे हे

श्रीगुरुजी
Fri, 08/27/2021 - 17:35 नवीन
पण निवडणुक पुढे जाणे हे राष्ट्रवादी-कॉंग्रेससाठी त्रासदायक ठरेल कारण या १४ पैकी बहुतेक सर्व महापालिकेत भाजप किंवा शिवसेनेची सत्ता आहे आणि जोपर्यंत निवडणुक होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी-कॉंग्रेसला या महापालिकात सत्तेत परत येण्याची संधी मिळणार नाही. विशेषतः पिंपरी-चिंचवड, पुणे, सांगली अशा महापालिकेत आपण पुन्हा सत्तेत परतू अशी राष्ट्रवादीला आशा आहे. सोलापूर, अमरावती महापालिका परत जिंकू अशी कॉंग्रेसला आशा आहे. त्यामुळे निवडणुक पुढे ढकलण्याच्या निर्णयाला हे दोन पक्ष विरोध करतील असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

यालाच तर अंतर्विरोध म्हणतात

शाम भागवत
Fri, 08/27/2021 - 17:55 नवीन
यालाच तर अंतर्विरोध म्हणतात ना? हाच तर धृविकरणाचा पाया आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मुंबई महानगर पालिका.

Rajesh188
Fri, 08/27/2021 - 17:46 नवीन
मुंबई महानगर पालिका निवडणूक फक्त प्रांतीय मुद्द्यावर होते. मराठी लोकांचे पक्ष म्हणून परप्रांतीय कधीच सेने ला मत देत नाहीत परप्रांतीय द्वेष पूर्ण वागून मराठी लोकांची सत्ता बरखास्त करण्यात आघाडीवर असतात आपले अती बुद्धिवान ,नेक देशप्रेमी (देश दर्जा वर फक्त ह्यांचा द्वेष केला जातो तरी हे मी भारतीय पाहिले असले खूळ बाळगून असतात) मुंबई नगरपालिका सेने च्या हातात राहिले ह्याला महत्वाचे कारण bjp बरोबर ची युती. गुजराती ,मारवाडी हा समाज bjp व्यक्तिरिक्त कोणालाच मत देत नाही. अगदी उद्योगपती पण वेळ काढून मतदान करतात. गुजराती,मारवाडी, ह्यानीची bjp मुळे मत आणि सेने मुळे मराठी मत ह्याच्या जोरावर सहज मुंबई जिंकली जाते. आता bjp शी युती न करता सेना निवडणुकीत उभी राहिली तर मुंबई मध्ये नकीच जागा कमी येतील. काँग्रेस राष्ट्रवादी मुळे मुस्लिम मत,आणि अगदी थोडीफार उत्तर भारतीय मत मिळतील. पण महाराष्ट्र ची निवडणूक खूप वेगळ्या मुद्द्यावर लढली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

MMS हा bjp च B गट आहे

Rajesh188
Fri, 08/27/2021 - 17:52 नवीन
ही bjp ला मदत करण्यासाठी च निवडणूक लढवता. तो BJP च B गट आहे.गुप्त समजोता असण्याची शक्यताच जास्त आहे. मुस्लिम मतांचे विभाजन झाल्या मुळे bjp ला. निवडणूक जिंकणे सोपे जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

ह्यावोळी मुंबई पालिका निवडणूक

अमरेंद्र बाहुबली
Fri, 08/27/2021 - 17:55 नवीन
ह्यावोळी मुंबई पालिका निवडणूक सरळ सेनेचे मराठी मावळे विरूध्द भाजपचे गुज्जू योध्दे होणार आहे. सेनेला काॅंग्रेस आणी राष्ट्रवादीची साथ असेल तर भाजपला धुळीस मिळवायला कितीसा वेळ लागेल??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

फडणवीस वेगळा विदर्भ झाल्या

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/26/2021 - 23:19 नवीन
फडणवीस वेगळा विदर्भ झाल्या शिवाय लग्न करनार नव्हते. आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही असं सांगून राष्ट्रवादीशी युती करनार नव्हते. अजित दादाना चक्की पिसायला पाठवनार होते (पिसींग पिसींग) फडणवीस नेहमी खरं बोलतात, त्यामुळे त्यानी ऊध्दव ठाकरेना वचन दिले नसावे. सत्य हरिश्चंद्राचा आधूनीक अवतार म्हणजे फडणवीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९

गडकरींना निवडणूकीत न हरवल्यास

जॅक द रिपर
Mon, 08/30/2021 - 01:25 नवीन
गडकरींना निवडणूकीत न हरवल्यास नाना पटोले राजकारणातून संन्यास घेणार होते, तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

BJP

Rajesh188
गुरुवार, 08/26/2021 - 21:49 नवीन
Bjp कडे 7 वर्ष सत्ता असून सुद्धा ती सामान्य लोकांचा विश्वास जिंकू शकले नाहीत यूपी ,बिहार मधील कौल हा भावनिक असतो मग त्यांना काही ही चालते . सुशांत पण चालतो,राज ठाकरे पण चालतो. Upsc साठी हिंदी च हवी हे पण चालते. हिंदुत्व पण चालते. त्या राज्यात विकास वर कधीच मतदान होत नाही. देशातील प्रगत राज्यात bjp ल कधीच यश मिळाले नाही. प्रगत राज्यातील लोक प्रॅक्टिकल आहेत भावनिक फालतू मुद्द्यावर ते मतदान करता नाही. BJP उत्तम कार्य करत आहे हे तेव्हाच सिद्धहोईल जेव्हा bjp दक्षिण भारत ,महाराष्ट्र पंजाब,ह्या राज्यात यश संपादन करेल. केरळ मध्ये bjp जेव्हा बहु मत मिळवेल तेव्हाच हे सिद्ध होईल bjp देश हितासाठी उत्तम पक्ष आहे
  • Log in or register to post comments

देशातील सर्वात सुशीक्षीत

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/26/2021 - 22:34 नवीन
देशातील सर्वात सुशीक्षीत राज्य केरळ मध्ये भाजपचा एकही आमदार नाही. ;) पण राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. जिथे शिक्षण असते तिथे भाजप नसते. युपी बिहार ला त्यामुळेच भाजपेयी लोकांचा शिक्षणाचा टक्का वाढू देत नसावेत, लोक शिकले तर आपला पत्ता साफ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

ISIS मध्ये भरती होणार्यामध्ये

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 08/26/2021 - 22:46 नवीन
ISIS मध्ये भरती होणार्यामध्ये ही देशातील सर्वात सुशीक्षीत राज्य केरळ आघाडीवर आहे. कदाचित तिथे भाजप नसेल म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हो..दोन महिलान्च( हिन्दू आणि

रामदास२९
Fri, 08/27/2021 - 16:00 नवीन
हो..दोन महिलान्च( हिन्दू आणि ख्रिश्चन) धर्मान्तर(फसवून).. त्यान्ना अफगाणिस्तान( किन्वा ईसिस) मध्ये नेलेल आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

ईसाीस कडे बोट दाखवलं म्हणजे

अमरेंद्र बाहुबली
Fri, 08/27/2021 - 16:06 नवीन
ईसाीस कडे बोट दाखवलं म्हणजे तिथले लोक भाजपला ओळखून आहेत हे खोटं ठरतं का?? केरळी हिंदू शिकलेले असल्याने त्याना भाजप हा ढोंगी हिंदूत्ववादी पक्ष आहे हो पक्क माहीतीय. महाराष्ट्रातील हिंदूंच्या डोक्यात ही हळूहळू प्रकाश पडू लागलाय. १२२-१०५ पुढील निवडणूकीत ६० ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

एकदम खरे आहे तुमचे ...

सुक्या
गुरुवार, 08/26/2021 - 23:55 नवीन
एकदम खरे आहे तुमचे ... त्यामुळे केरळ मधे खुप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. सुजलाम सुफलाम आहे. खुप मोठया प्रमाणात उद्योग आहेत. दळनवळन चान चान आहे ... कंम्युनिस्ट सरकार असल्यामुळे तिथे सर्व धर्म समभाव आहे ... तिथला युवक रोजगारासाठी आजीबात बाहेर जात नाही ... उप्र मधे कसे सारे बाहेर जातात ... मुंबैला ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

पास ह्यावर ...

रामदास२९
Fri, 08/27/2021 - 14:56 नवीन
पास ह्यावर ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

BJP

Rajesh188
गुरुवार, 08/26/2021 - 21:49 नवीन
Bjp कडे 7 वर्ष सत्ता असून सुद्धा ती सामान्य लोकांचा विश्वास जिंकू शकले नाहीत यूपी ,बिहार मधील कौल हा भावनिक असतो मग त्यांना काही ही चालते . सुशांत पण चालतो,राज ठाकरे पण चालतो. Upsc साठी हिंदी च हवी हे पण चालते. हिंदुत्व पण चालते. त्या राज्यात विकास वर कधीच मतदान होत नाही. देशातील प्रगत राज्यात bjp ल कधीच यश मिळाले नाही. प्रगत राज्यातील लोक प्रॅक्टिकल आहेत भावनिक फालतू मुद्द्यावर ते मतदान करता नाही. BJP उत्तम कार्य करत आहे हे तेव्हाच सिद्धहोईल जेव्हा bjp दक्षिण भारत ,महाराष्ट्र पंजाब,ह्या राज्यात यश संपादन करेल. केरळ मध्ये bjp जेव्हा बहु मत मिळवेल तेव्हाच हे सिद्ध होईल bjp देश हितासाठी उत्तम पक्ष आहे
  • Log in or register to post comments

अफगणिस्तानचा पुढचा पन्तप्रधान

रामदास२९
गुरुवार, 08/26/2021 - 22:29 नवीन
अफगणिस्तानचा पुढचा पन्तप्रधान राष्ट्रवादीचा किन्वा शिवसेनेचा झाला तरच सिध्द होईल की हे दोन्ही उत्तम पक्ष आहेत.. .. शेवटी सगळ साहेबान्च्या धोरणामुळेच ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

भाजपचा करा, नाहीतरी अफगाणींशी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/26/2021 - 22:38 नवीन
भाजपचा करा, नाहीतरी अफगाणींशी भाजपचे जुने संबंध आहेत. अफगाणींपुढेच गुडघे टेकून हाफीज सईद ला भाजपने सोडले होते. कडी निंदा फेम राजनाथसींग स्वत गेले होते सोडायला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९

आता वेळ आली आहे आफ्रिकेची मदत घ्यायची

गॉडजिला
गुरुवार, 08/26/2021 - 22:44 नवीन
सगळया तालिबानी वर एकदा जुजू मॅजिक केले की बघाच... जूजू तुम्हाला सोडणार नाही म्हणावं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

माहित नसेल तर बोलू नये.. उगाच

रामदास२९
Fri, 08/27/2021 - 12:35 नवीन
माहित नसेल तर बोलू नये.. उगाच बोलायच म्हणून बोलायच नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अच्छा?? अतिरेकी सोडले हे खोटं

अमरेंद्र बाहुबली
Fri, 08/27/2021 - 12:57 नवीन
अच्छा?? अतिरेकी सोडले हे खोटं आहे?? बरं मग भाजपची लाज राखायला आणी तुमच्या समाधानासाठी आपण अतिरेक्याना गोळ्या घातल्या असं मानू??? किती ते अंधळं समर्थन???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९

कडी निंदा फेम राजनाथसींग स्वत

रामदास२९
Fri, 08/27/2021 - 14:54 नवीन
कडी निंदा फेम राजनाथसींग स्वत गेले होते सोडायला
.. राजनाथसिन्ह गेले होते का जसवन्तसिन्ह .. चूकिचे सन्दर्भ देऊन दुसर्यान्ना आन्धळं समर्थन म्हणत असाल तर विषयच सम्पला ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ओके. माय मिस्टेक. पण

अमरेंद्र बाहुबली
Fri, 08/27/2021 - 15:03 नवीन
ओके. माय मिस्टेक. पण अतिरेक्यांपुढे बूळचट भाजप सरकारने गुडघे टेकले हे तरी खरं ना??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९

ओके. माय मिस्टेक पण

अमरेंद्र बाहुबली
Fri, 08/27/2021 - 15:04 नवीन
ओके. माय मिस्टेक पण अतिरेक्यांपुढे बूळचट भाजप सरकारने गुडघे टेकले हे तरी खरं ना??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९

हो.. चूक ती चूक.. त्याला

रामदास२९
Fri, 08/27/2021 - 15:53 नवीन
हो.. चूक ती चूक.. त्याला सोडायचीच वेळ आली होती तर हाल हाल करून सोडायला पाहिजे होता.. हे त्याला मन्त्रान्बरोबर विमानातून घेऊन गेले ती मोठी चूक अजून.. सिमला कराराच्या वेळेला (पोलादी महिला कोन्ग्रेसच्या) त्यानी काश्मिर प्रश्न सोडविला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

अफगाणींपुढे गुडघे टेकले, हफीज

श्रीगुरुजी
Fri, 08/27/2021 - 15:06 नवीन
अफगाणींपुढे गुडघे टेकले, हफीज सईदला सोडले, राजनाथ सिंह गेले होते . . . बिनडोकपणाचा कळस! कणभरही माहिती नाही आणि समजण्याची अक्कलही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९

अतिरेक्यांपुढे गुडघे टेकले

अमरेंद्र बाहुबली
Fri, 08/27/2021 - 16:09 नवीन
अतिरेक्यांपुढे गुडघे टेकले,मसूद अजहर ला सोडले, जसवंत सिंग गेले होते. चूक सुधारली. पण मुळ मुद्दा हा आहे की भाजपच्या बूळचट नेत्यानी अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून ३ अतिरेकी सोडले. आता ह्यावर बोलनार का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तुमच्या अकलेचा सगळीकडे उजेड

जॅक द रिपर
Mon, 08/30/2021 - 01:26 नवीन
तुमच्या अकलेचा सगळीकडे उजेड पाडत फिरु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

गोपयस्फोट करावा

चौकस२१२
Wed, 09/01/2021 - 04:17 नवीन
१२५ + प्रवासी कसे सोडायचे? हा प्रश्न होता.. कांग्रेस असती तर त्यांनी काय वेगळे केल असत? तुम्हाला वाटतंय तेव्हा हि हि गोष्ट लाजिर्वाणीचं वाटली होती, वाटलं होता सोड्याचेच होते तर एखादे जर्जर आजाराचे इंजेकशन आधी देऊन मग सोडायचे ! पण खरी परिस्थिती काय होती कसे कळणार? त्या वेळचं काँग्रेस नेत्यांनी किंवा आजचे मोदीविरोदही "शोध पत्रकारांनि हि माहिती काढावी आणि गोपयस्फोट करावा आणि हो अगदी खरे कि तालिबान काही भारतावर चाल करून येत नाहीयेत पण त्यांचाच उपद्रव भारताला होणार आणि त्यांची साथ घेऊन "बॅड तालिबान" "गुड तालिबान " वॉर मत करून पाकिस्तान मार्गे भारताविरुद्ध कराव्या चालू ठेवणार .. या शिवाय तेथील भारताचे गुड विल विसरले जाणार .. त्यामुळे भारताला त्रास दायक आहेच .. हा हे खरे कि त्याचा संबंध गल्लीतील निवडणुकीशी लावण्याचाच मंत्रचळे पण कोणी करू नये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आजचा शोध

चौकस२१२
Wed, 09/01/2021 - 04:21 नवीन
आजचा शोध , १८८ द्वारे देशातील प्रगत राज्यात bjp ल कधीच यश मिळाले नाही. गुजराथ संपूर्ण मागासलेल राज्य आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

Bjp ची लोकप्रियता कमी होत आहे

Rajesh188
गुरुवार, 08/26/2021 - 22:47 नवीन
He कबूल करा .उगाच स्वप्नात राहू नका. सामान्य लोकांचे जीवन जगणे bjp नि मुश्किल केले आहे.लोकांचा आक्रोश ह्यांच्या कानात अजुन जात नाही. भ्रमात आहेत सर्व.
  • Log in or register to post comments

खरय.. सगळी यन्त्रणा राणे,

रामदास२९
Fri, 08/27/2021 - 12:39 नवीन
खरय.. सगळी यन्त्रणा राणे, भाजपा च्या मागे लावली.. तरी सामान्यान्ना भाजपा त्रास देत आहे.. तेव्हा करोना कुठे होता.. का फक्त मन्दिर उघडी करायला असतो तो.. आणि भाजपाची लोकप्रियता २०१४ पासून कमीच होत आहे.. सगळ साहेबान्च्या धोरणामुळे .. :) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

तालीबानी भारतात आले तर? काय

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 08/26/2021 - 22:52 नवीन
तालीबानी भारतात आले तर? काय होईल विचार करा ह्या साठीच मोशा पाहीजे छाप फोरवर्ड समर्थक करताहेत. अर्थात बुध्दी आणी ह्या समर्थकांचा काही संबंध असेल असं वाटत नाही. भारतीय सैन्य हे जगातील पाचव्या नंबरचं प्रबळ सैन्य आहे. ते तालीबानी बाजारबूनग्याना क्षणात धुळीस मिळवेल. त्यामुळे समर्थकानी घाबरून जाऊ नये. तालीबानी काही ईथपर्यंत पोहोचनार नाहीत, ऊगाच बिपी वाढवून घेवू नये. ;) (अर्थात ह्या साठी राज्यकर्ते प्रबळ हवेत. पुन्हा भाजप नेत्यानी तालीबान्यांसमोर गुडघे टेकले तर??) तालीबानी आणी भाजपेयी बरोबरच सत्तेवर येतात. ;)
  • Log in or register to post comments

तालीबानी भारतात आले तर? काय

गॉडजिला
Fri, 08/27/2021 - 20:58 नवीन
तालीबानी भारतात आले तर? काय होईल विचार करा
जो कोणी तालिबानी भारतात आले तर हा विचार करतं असेल त्याला महान म्हणावे लागेल... हे म्हणजे आपले सैन्य त्यांच्या समोर पायघड्या पसरून त्यांचे स्वागत करेल असाच अर्थ होतो. कोणाचीही सरकार असेल तरी हे होणार नाही पण सरकार कमकुवत असेल तर मात्र आपल्याला डोकेदुखी देण्या इतपत कारवायांत त्यांचा सहभाग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नक्की वाढेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

डिसइन्फॉर्मेशन मोहिमा

निनाद
Fri, 08/27/2021 - 10:03 नवीन
FULL INTERVIEW with Yuri Bezmenov: The Four Stages of Ideological Subversion (1984) युरी बेझमेनोव्ह ची ही मुलाखत जरूर ऐका. डिसइन्फॉर्मेशन मोहिमा राबवायच्या आणि शत्रुदेशाला हैराण कसे करायचे याचे व्यवस्थित विवेचन हा देतो आहे. आयुष्यभर त्याने यावर काम ही केले आहे. हे कार्य ४ टप्प्यात केले जाते.
  1. डिमोरलायझेशन
  2. अस्थिरता
  3. संकट- अराजकता
  4. अराजकतेचे सामान्यीतेचेआणि मग लष्करी ताबा
हे व्यवस्थितपणे घडतांना दिसते आहे. १९६०साली हे प्रकार साम्यवाद्यांनी सुरू केले ते आज त्याची फळे चाखत आहेत.
  • Log in or register to post comments

डिमोरलायझेशन

गॉडजिला
Fri, 08/27/2021 - 10:34 नवीन
डिमोरलायझेशन अस्थिरता संकट- अराजकता अराजकतेचे सामान्यीतेचेआणि मग लष्करी ताबा
सध्या हा चाळा दुसरेच सेठ लोकं करत आहेत त्याचे काय ? पहिले दोन टप्पे पार पडले आहेत उरलेले दोन केंव्हा पार पाडतील त्याची वाट पहायची का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

बीजिन्ग चे शेठ, त्याचा गुलाम

रामदास२९
Fri, 08/27/2021 - 12:43 नवीन
बीजिन्ग चे शेठ, त्याचा गुलाम ईस्लामाबाद आणि भारतातले डावे हस्तक.. पण ते कधीही यशस्वी होणार नाहीत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

भारतात लसीकरणाला पात्र

रात्रीचे चांदणे
Fri, 08/27/2021 - 19:53 नवीन
भारतात लसीकरणाला पात्र असलेल्या एकूण लोकसंख्येच्या 50% लोकांना करोना लसीचा कमीत कमी एक डोस तरी मिळाला आहे. करोना रुग्ण संख्या वाढत असतानाही केरळ सरकारने बकरी ईद साठी lockdown च्या नियमांमध्ये सवलत दिली होती त्यामुळे केरळ ची करोना वाढती होती. त्यानंतर ओनम आणि मूहरम साजरी करण्यासाठी केरळ सरकार ने 5 दिवसाची सुट्टी जाहीर केली. सध्या भारताच्या एकूण करोना रुग्णसंख्येपैकी 60-70% रुग्ण हे फक्त केरळधीलच आहेत. अर्थातच प्रमुख वर्तमानपत्रांनी onum effect? म्हणून दोष फक्त ओनमलाच दिला आहे.
  • Log in or register to post comments

युपी, गुजरात ने ही खरी

अमरेंद्र बाहुबली
Fri, 08/27/2021 - 20:01 नवीन
युपी, गुजरात ने ही खरी आकडेवारी द्यावी. आकडे लपवले म्हणजे रूग्ण घटले असे नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

फायदा.

शानबा५१२
Fri, 08/27/2021 - 20:26 नवीन
होय बाहुबली भाउ, आणि कुठल्या फार्मा कंपनीला तिथे, त्या परीसरात जास्त फायदा होईल ह्याचाही अंदाज येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

साधी गोष्ट आहे

Rajesh188
Fri, 08/27/2021 - 21:03 नवीन
फेल प्रशासन यूपी,बिहार चे आहे.सर्वात बकवास आरोग्य व्यवस्था यूपी,बिहार ची आहे.प्रती व्यक्ती सर्वात कमी डॉक्टर यूपी,बिहार मध्ये आहेत.अशिक्षित लोकांची संख्या दोनी राज्यात आहेत.गरिबी दोन्ही राज्यात आह. प्रति व्यक्ती डॉक्टर्स यूपी,बिहार मध्ये केरळ पेक्षा कमी आहे. अशिक्षित,जातीयवादी,गरीब,भ्रष्ट यूपी बिहार पेक्षा केरळ ची स्थिती नक्कीच अती उत्तम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

@अमरेंद्र बाहुबली,

शाम भागवत
Fri, 08/27/2021 - 20:53 नवीन
@अमरेंद्र बाहुबली, शिवसेनेला फायदा झाला आहे यात वादच नाही. आत्तापर्यंत जे जे पवार साहेबांबरोबर गेले त्यांचा फायदाच झालेला आहे. पण तो तात्कालीन असतो. काळानुसार वेगाने बदलायची पवारांची खासीयत आहे. त्यामुळे त्यांचे मित्र व शत्रू सतत बदलत असतात. त्यांच्यात असलेली लवचिकता भल्या भल्यांना झेपत नाही. ती त्यांची राजकारणाची पध्दत आहे. पाच दशके या पध्दतीने ते यश मिळवत राहीले आहेत. कोणाला ती आवडो अथवा न आवडो. ज्यांना ती पध्दत आवडत नसेल त्यांनी ती वापरू नये. त्यासाठी पवारांना शिव्या देण्याची मला बिलकूल जरूरी वाटत नाही. हीच पध्दत न झेपल्याने त्यांच्या बरोबर गेलेले नंतर मागे पडतात. शिवसेनेला व मुख्यत्वेकरून शिवसैनिकांना पवारांचा हा वेग झेपणार नाही असं मला वाटते. असं अनेकांना आत्तापर्यंत जमलेले नाही.या आधारावर मी माझी मते मांडली होती व त्यामुळे याचा फायदा भाजपाला होईल अस म्हटलं होतं. माझा कोणावरच राग नाही. महाराष्ट्राचे भले व्हावे एवढीच इच्छा आहे. असो. थांबतो.
  • Log in or register to post comments

कार्यकर्त्यांनी कुटुंब आणि धन

शानबा५१२
Fri, 08/27/2021 - 21:01 नवीन
कार्यकर्त्यांनी कुटुंब आणि धन ह्याला महत्व द्यावे मग नकोस कार्य करावं लागेल का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा