✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ३)

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
गुरुवार, 08/19/2021 - 20:14  ·  लेख
लेख
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. तालिबानने बल्ख प्रांतातील एका जिल्ह्याची गव्हर्नर सलीमा मझारीला ताब्यात घेतले आहे. अफगाणिस्तानात तीन जिल्ह्यांच्या स्त्री गव्हर्नर आहेत/होत्या. त्यापैकी सलीमा एक आहे. तिने तालिबानविरोधात हातात बंदूकही घेतली होती. तीच तालिबान्यांच्या ताब्यात गेल्यामुळे तिची ते हरामखोर काय अवस्था करतील ही काळजी वाटतेच. त्याबरोबरच एक स्ट्रॅटेजी म्हणून तालिबानी तिला सुखरूप सोडतील का? कारण मग जगभरातले सगळे जमात-ए-पुरोगामी विचारवंत 'बघा आम्ही सांगत होतो की हे तालिबान २.० आहे' असे दावे करायला लागतील. तेव्हा त्या कारणाने तालिबानी तिला सोडतील ही पण शक्यता अगदी नाकारण्याजोगी नसावी. बघू पुढे काय होते ते.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
43540 वाचन

💬 प्रतिसाद (160)

प्रतिक्रिया

वाटाणा

टवाळ कार्टा
Fri, 08/20/2021 - 16:34 नवीन
वाटाणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

माहिती काढण्यात

चौकस२१२
Fri, 08/20/2021 - 17:03 नवीन
स्वस्त इंधन देशात असावे आणि त्या साठी सर्व ताकत , आयडिया , नवीन इंधन प्रकार सरकार नी शोधणे अपेक्षित आहे. राजेश १८८ , दर वाढी चे समर्थन नाही पण जो देश इंधन आयात करतो त्यावर हि परिस्थिती / बंधन काय असतात हे जरा समजवून घयावे आणि मग टीका करावी म्हणूनच इतरही म्हणत आहेत कि कोणता पक्ष मोठया टक्केवारीने हे दर कमी करू शकेल असे वाटत नाही ? "काह्ही करून किंमत कमी ठेवा " म्हणजे कृत्रिम रित्या मग त्यासाठी कराच्या मिळकतीतून जी घट होईल ती कमी कशी करायाची? यावर उपाय ? कासावरील तरी खर्च कमी करावा लागेल टीका करणे नेहमीच सोपे असते प्रश्न समजवून घेणे जास्त अवघड असते राजेश १८८ आपण जो वेळ यावर घालता तो थोडा माहिती काढण्यात घालवा ... उदाहरण मी काही दिवसनपूर्वी सगळ्यानं विचारले होते कि ६ महिन्यातील पेट्रोल दर कमी जास्ती माहिती मांडा .. ४-५ जणांनीच तसदी घेतली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

त्या धाग्यावर प्रतिसाद दिला नाही

कंस
Sat, 08/21/2021 - 01:26 नवीन
कारण त्या धाग्यावर फक्त ह्या वर्षाचं ट्रेण्ड विचारला होता आणि ते मिस लिडिंग होत. US मधे average petrol प्राइस ($ प्रती गॅलन) जून 2014 मध्ये 3.766 जून 2015 मध्ये 2.885 . . . जून 2019मध्ये 2.804 जून 2020 मध्ये 2.170 जून 2021 मध्ये 3.157 भारतात काय आहे ट्रेण्ड 2014 पासून आजपर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

मागे मी एक प्रश्न विचारला

सुक्या
Fri, 08/20/2021 - 23:14 नवीन
मागे मी एक प्रश्न विचारला होता तुंम्हाला .. तिथे पळ काढला .. पुन्हा तेच विचारतो .. भ्रष्टाचार होत असताना दिसला तेव्हा तुम्ही किती वेळा तक्रार केली संबंधीत विभागात ? गेला बाजार भ्रष्टाचार विरोधी विभागात? काही पोलीस कंप्लेंट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

ट का

सुबोध खरे
Fri, 08/20/2021 - 21:26 नवीन
ट का हे असले प्रश्न विचारायचे नसतात. त्याची उत्तरे मिळणार नाहीत. राजस्थान, महाराष्ट्रात छत्तीस गड किंवा पंजाब मध्ये पेट्रोल चे भाव कमी का नाहीत? याचे हि उत्तर मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्या

कंस
Fri, 08/20/2021 - 21:54 नवीन
तीन राज्यात केंद्र सरकार टॅक्स घेत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्या तीन राज्यांनी त्यांचा

टवाळ कार्टा
Sat, 08/21/2021 - 03:39 नवीन
त्या तीन राज्यांनी त्यांचा स्वतःचा टॅक्स बंद केलाय का? #वाटाणा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंस

मागे श्री चौकस२१२ यांनी

सुक्या
Fri, 08/20/2021 - 23:10 नवीन
मागे श्री चौकस२१२ यांनी "पेट्रोल दरवाढ एक एक सर्वेक्षण " हा धागा काढला होता. (http://misalpav.com/node/49058). यात जगात कुठे , किती दरवाढ झाली आहे व त्याची भारतातील दरवाढीशी तुलना करणे हा त्या धाग्याचा उद्देश होता. तिथे राजकीय चर्चा नको असे सांगीतल्यामुळे बर्‍याच लोकांचा हिरमोड झाला. त्या धाग्यावर खुप प्रतीक्रिया येतील असे मला वाटले होते परंतु जगात जे सगळीकडे दर वाढत आहेत तेच भारतातही होत आहे असे दिसल्यावर कोल्हेकुई करणार्‍यांची तोंडे बंद झाली. माझ्या मते जर नीर-क्षीर-विवेक वापरुन तुलना केली तर जगात सगळीकडेच गॅस, पेट्रोल दर वाढले आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. चलन विनिमय तफावत / कर्मचारी वर्गाचा वाढत जानारा पगार हा त्या दराचा घटक आहे. बाकी केंद्र सरकारचा कर (यातला काही भाग राज्यांना जातो) जास्त आहे हे नक्की. पण राज्ये ही आपला कर लावतात. त्यामुळे दरवाढ ही फक्त आणी फक्त केंद्र सरकार मुळे होते हे ग्रुहीतक मुळात चुकीची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

माझ्या मनातले बोललात

चौकस२१२
Sat, 08/21/2021 - 07:26 नवीन
माझ्या मनातले बोललात " काहीही करा पण सरकार वर टीका करा" हि ज्यांची वृत्ती आहे ते या प्रश्नाला सामोरे जाणार नाहीत येथे ऑस्ट्रेलियात पेट्रोल मे मध्ये $१.३३ प्रति लिटर पासून आज $१,७० पर्यंत गेले आहे ( दर गुणिले रु ५२) रस्त्यावर जाळपोळ, पंतप्रधान बदल असलल काह्ही आरडाओरडा नाही, बर सौदी किंवा ब्रुनेई सारखे येथील नागरिक आणि सरकार गर्भ श्रीमंत नाही ,,, शिवाय सरकार वर टीका कार्याला मोकळीक हि आहे शिवाय प्रचंड पैसे शिक्षण, वैद्यकीय सेवा , दलन वळण यावर सरकार करते .. ठीक आहे कि सरासरी उतप्पन जास्त आहे पण सरकार वरील आर्थिक दबाव पण खूप आहे पंप वर जो पोऱ्या येथे काम करतो त्याला कमीत कमी ताशी १५०० रु एवढे वेतन दयावे लागते ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

अच्छा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 08/21/2021 - 10:40 नवीन
>>>>ऑस्ट्रेलियात पेट्रोल मे मध्ये $१.३३ प्रति लिटर पासून आज $१,७० पर्यंत गेले आहे ( दर गुणिले रु ५२)रस्त्यावर जाळपोळ, पंतप्रधान बदल असलल काह्ही आरडाओरडा नाही. अच्छा. भाजपच्या सद्य मंत्र्याच्या, मागील सरकारच्या विरोधातल्या डिझेल पेट्रोल गॅस दरवाढीच्या बोंबा मारत असलेल्या व्हीडीयो लिंका देऊ की शोधता तुम्हीच. लै आरडा- ओरडा करायचे बघा. आपल्या ओस्ट्रेलियातील महागाईची झळ तुम्हाला तितकी बसत नसेल हो पण आम्हा भारतीयांना थेट खिशावर ही झळ बसत आहे. त्यामुळे भारतियांचा आरडा-ओरडा तर होणारच. बाकी हमे हमारे हाल पर छोड़ दो सेठ. आपण मजेत राहावे भारतीयांच्या वाढत्या महागाइचा, बसना-या झळीचा आणि आमच्या आंधळ्या-बही-या-मुक्क्या केंद्र सरकारचा आपण तान घेऊ नये असे मिपाकर मित्र म्हणून सुचवावे वाटते. -दिलीप बिरुटे (महागाइने त्रस्त एक भारतीय) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

सर्जीकल स्ट्राईक चाललीय.

सुबोध खरे
Sat, 08/21/2021 - 09:38 नवीन
सर्जीकल स्ट्राईक चाललीय. जनतेची रसद पुरवठालतोडला जातोय सर्जिकल स्ट्राईक सर्जिकल प्रिसिजन असे मूळ इंग्रजी शब्द आहेत त्यांचा अर्थ शोधून पहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काही गोष्टी चा गंभीर पने विचार करायलाच हवा

Rajesh188
Fri, 08/20/2021 - 15:28 नवीन
सेना ही मराठी लोकांच्या हिता साठी स्थापन झाली .bmc त्याच्या कडे मराठी लोकांनी दिली. ग्राउंड रिॲलिटी काय आहे फेरीवाले जास्तीतजास्त पर प्रांतीय त्यांचे रक्षण कोणी केले bmc मधील संमबांधित अधिकारी वर्गाने,पोलिस नी,नगर सेवकाने . सर्व मराठी मराठी लोकांनी फूट पथ,ताब्यात घेवून धंदे उभे कराव्यात म्हणून सेनेनी पक्ष आणि पालिका ह्याचा वापर केला नाही. झोपपट्टीतील लोकांना सुविधा देणारे कोण. सेने चेच नगर सेवक,bmc चेच मराठी अधिकारी.झोपडपट्टी निर्माण करणारे कोण पर प्रांतीय गुंड. कोर्टाने नी पण मत व्यक्त केले घुसखोर लोकांना घर देणारे मुंबई हे एकमेव शहर देशात आहे. Bjp हिंदू वादी पक्ष पण काम. Atrocity कायदा कोर्टाने विचार पूर्वक सुधारला होता.कारण त्याचा भयंकर गैर वापर होत आहे .त्या कायद्या मुळे मूळचे हिंदू पण आताचे धर्म परिवर्तन केलेले आणि हिंदू धर्मीय ह्यांच्या मध्ये भिंत उभी राहिली. मतभेद वाढले. कोर्टाचा निर्णय बदलून bjp नी हिंदू चा पहिला विश्वास घात केला. आणि त्या नंतर अनेक निर्णय त्यांनी हिंदू लोकांना कमजोर करणारे केले. लोक महामूर्ख बनली ज्यांनी ह्यांना निवडून दिले
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
Fri, 08/20/2021 - 15:31 नवीन
+१ थापा मारणे, खोटं पण रेटून बोलणे ह्यावरच भाजपचा जुमला ऊभा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

जुमल्यावर....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 08/21/2021 - 11:51 नवीन
नुसती सत्ताच आणली नाही तर टिकवून पण ठेवली. दररोज काही तरी नवी थाप. प्रत्यक्षात जनतेच्या पदरात काहीही पडणार नाही. सरकार काही बोलत नाही करीत नाही पण दिवस उजाडला की मीडिया आणि मोंदीयाळीच्या थापांचा नुसता चिवचिवाट नव्हे तर उच्छाद असतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

+१

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/23/2021 - 13:11 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसली

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 08/23/2021 - 17:21 नवीन
बावळट जन्ता आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तालिबान संकटावर

Rajesh188
Fri, 08/20/2021 - 15:53 नवीन
तालिबान संकटावर भारतीय मीडिया त्यांची मूळ लायकी दाखवत आहे. हिंदी आणि मराठी मीडिया जे दाखवत आहे ते बघून मीडिया इतकी मूर्ख असेल तर भारत सरकार किती मूर्ख असेल असा प्रश्न जगातील देशांना पडेल.
  • Log in or register to post comments

भारत सरकारचं समजू शकतो

अमरेंद्र बाहुबली
Fri, 08/20/2021 - 16:24 नवीन
भारत सरकारचं समजू शकतो अशिक्शीत लोकानी बनलंय. पण मिडीया?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मीडिया

प्रदीप
Fri, 08/20/2021 - 16:58 नवीन
अशिक्शित्नाहेअसेम्हनयचेकातुम्हला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कुंथण्याचेही श्रम न करता जो

जॅक द रिपर
Sat, 08/21/2021 - 02:43 नवीन
कुंथण्याचेही श्रम न करता जो कुठेही घाण करतो त्याला अनकुथ असे म्हणतात - पु लं देशपांडे.
  • Log in or register to post comments

सईद सलाहुद्दिनने भारतावर हल्ले करायला तालिबानची मदत मागितली

चंद्रसूर्यकुमार
Sat, 08/21/2021 - 08:40 नवीन
हिजबुल मुहाजिदीनचा म्होरक्या सईद सलाहुद्दिनने भारतावर हल्ले करायला तालिबानची मदत मागितली आहे. https://www.wionews.com/india-news/hizbul-mujahideens-chief-syed-salahuddin-seeks-support-from-taliban-to-attack-india-407272 भारतातले पुरोगामी विचारवंत तालिबान आता कसे बदलले आहे (तालिबान २.०) म्हणून स्तुतीसुमने उधळण्यात गर्क आहेत आणि त्याचबरोबर एक दहशतवादी त्याच तालिबानची मदत मागत आहे. म्हणजे दहशतवादी आणि पुरोगामी विचारवंत एकाच बाजूला आहेत म्हणून सामान्य लोकांना हे ढुढ्ढाचार्य विचारवंत देशद्रोही वाटायला लागले तर त्यात सामान्य लोकांची काही चूक आहे असे वाटत नाही. तसे झाल्यास हेच विचारवंत परत 'बघा आम्ही मोदीविरोधी म्हणून हे 'भक्त' आम्हाला देशद्रोही म्हणतात' अशी उलटी कोल्हेकुई करण्यातही पुढे असतील.
  • Log in or register to post comments

तालिबान विरूद्ध लढाई

Rajesh188
Sat, 08/21/2021 - 09:54 नवीन
भारताला जर तालिबान पासून वाचवायचे असेल तर काय विशेष प्रयत्न सरकार करणार आहे. त्या साठी फक्त घोषणा बाजी चालणार नाही तर खूप लांबचा विचार करून मास्टर प्लॅन सरकार कडे असायला हवा. तसे काही प्रयत्न मोदी सरकार करत आहे का? कोणत्या ही परकीय आक्रमण विरूद्ध तेव्हाच लढले जावू शकते जेव्हा स्वतःच्या देशातील अंतर्गत सुरक्षा मजबुत असते. बाहेरील शत्रू पेक्षा घरभेदी खूप खतरनाक असतात. बिभीषण श्री राम ना मिळाले नसते तर अतुलनीय ताकत असलेल्या रावणा चा पराजय अशक्य होता. भारताने घरभेदी शोधून त्यांचा बंदोबस्त प्रथम करायला हवा. मग हे घरभेदी भ्रष्ट सरकारी कर्मचारी,भ्रष्ट राजकीय नेते ,असे सर्व स्तरावरील असू शकतात. भ्रष्टाचार मुक्त भारत पहिला सरकार नी करून दाखवावा. छ्त्रपती नी सुद्धा घरभेदी लोकांचाच पहिला बंदोबस्त केला होता .
  • Log in or register to post comments

थापाथापीचं सरकार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 08/21/2021 - 10:27 नवीन
सध्याचं भारतीय सरकार निव्वळ थापा मारण्यावर सुरु आहे. सोबत मंद अनुयायी आहेतच १५ ऑगष्ट २०२१ ला काय काय थापा मारल्या यावेळी तर पाहिलंही नाही. एक चांगलं व्यंगचित्र आलंय, वेळ मिळालं की टाकतो, घरगुती गॅसचे भाव वाढलेत, डिझेल पेट्रोलची वाढती महागाई त्यावर सरकार काही करेना, सातत्याने विविध उपयोगाच्या जीवनावश्यक वस्तुंची महागाइ वाढत आहे. त्यावर काही करायचं-बोलायचं सोडून सरकार आणि मीडिया आता फोकस त्या तालीबानी आणि त्यावर. सामान्य नागरिकांचे जीवन-मरणाच्या प्रश्नावर कधी बोलणार हे सरकार. जनतेने मोदी सरकारच्या धोरणा विरुद्ध महागाई विरुद्ध रस्त्यावर उतरुन आंदोलने करणे गरजेचे आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

भुके कंगाल

Rajesh188
Sat, 08/21/2021 - 10:38 नवीन
महागाई,भ्रष्ट कारभार,बेरोजगारी ह्या मुळे नागवलेली भुके कंगाल जनता तालिबानी आक्रमणाचा कसा विरोध करेल. हा यक्ष प्रश्न आहेच.
  • Log in or register to post comments

६० हजार बुणग्यांच्या

सुबोध खरे
Sat, 08/21/2021 - 10:52 नवीन
६० हजार बुणग्यांच्या तालिबानचा विरोध करायला १५ लाख भारतीय लष्कर व्यवस्थित पुरेल. बाकी जनतेतील विद्रोही आणि फितूर देश विरोधी लोकांचा बंदोबस्त करणे हे लष्कराचे काम नाही जिकडे तिकडे पाहावे ते फुरोगामी तालिबानने अमेरिकी लष्कराचा साफ पराभव केला म्हणून भु भु : कार करताना दिसत आहेत. प्रत्यक्ष अमेरिकी लष्कराने २००१ मध्ये दोन आठवड्यात तालिबानचा साफ पराभव केला होता हे विसरून उगाच त्यांचा बागुलबुवा उभा केला जात आहे. अमेरिका तेथे केवळ तेथील खनिजांसाठी आली होती. ते प्रकरण एकंदर कटकटीचे आहे म्हणून त्यांनी अफगाणिस्तान सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. तालिबान ने पराभव केला म्हणून नव्हे. कोणत्याही युद्धात तालिबान कधीही अमेरिकी सैन्याच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही. टिनपाट लोक केवळ बायकांवर आपली सत्ता गाजवण्याच्याच लायकीचे आहेत. भारताला तालिबानची भीती अजिबात नाही. परंतु तालिबानच्या नादाला लागून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी काश्मीर मध्ये परत कुरबुरी सुरु करतील का याचा विचार होणे आवश्यक आहे. भारतातील काही अत्यंत नालायक राजकारणी आणि त्यांचे हलकट अनुयायी केवळ श्री मोदींना विरोध म्हणून ३७० कलम रद्द करण्याची मागणी करत आहेत अशा घरच्या भेदी लोकांना शोधून रस्त्यावर बडवले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

डॉक्टर साहेब

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 08/21/2021 - 11:16 नवीन
>>>>>भारतातील काही अत्यंत नालायक राजकारणी आणि त्यांचे हलकट अनुयायी केवळ श्री मोदींना विरोध म्हणून ३७० कलम रद्द करण्याची मागणी करत आहेत अशा घरच्या भेदी लोकांना शोधून रस्त्यावर बडवले पाहिजे. डॉक्टर साहेब, अशा कोणत्याही हानामारीवर आपला विश्वास नाही. पण आपल्या भावनेशी पहिल्यांदा सहमत व्हावे लागत आहे. बाकी, काय नवीन पाऊस पाणी ठाण्यात. लैच वेडा पाऊस हे तुमचा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

Taliban Culture": Six Held In

सुबोध खरे
Sat, 08/21/2021 - 10:57 नवीन
Taliban Culture": Six Held In Ujjain For Raising Pro-Pakistan Slogans https://www.ndtv.com/india-news/taliban-culture-six-held-in-ujjain-for-raising-pro-pakistan-slogans-2515290
  • Log in or register to post comments

ही वृत्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य मध्ये येत नाही

Rajesh188
Sat, 08/21/2021 - 11:17 नवीन
उघड देशाविरुद्ध घोषणा देणे हा देशद्रोह च आहे .ह्याला अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणता येणार नाही. मोक्का सारख्या कडक कायद्यांनी अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे(देशविरोधी घोषणा देणे हे पण त्या कायद्यात समाविष्ट करून). कमीत कमी एक दोन वर्ष तरी जामीन सुद्धा मिळाला नाही पाहिजे.
  • Log in or register to post comments

ही वृत्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य मध्ये येत नाही

Rajesh188
Sat, 08/21/2021 - 11:17 नवीन
उघड देशाविरुद्ध घोषणा देणे हा देशद्रोह च आहे .ह्याला अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणता येणार नाही. मोक्का सारख्या कडक कायद्यांनी अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे(देशविरोधी घोषणा देणे हे पण त्या कायद्यात समाविष्ट करून). कमीत कमी एक दोन वर्ष तरी जामीन सुद्धा मिळाला नाही पाहिजे.
  • Log in or register to post comments

https://pudhari.news

अमरेंद्र बाहुबली
Sat, 08/21/2021 - 13:18 नवीन
https://pudhari.news/international/24970/अफगाणिस्तानातून-मोठी-बातमी-काबूल-विमानतळावरुन-१५०-भारतीयांचं-अपहरण/ar
  • Log in or register to post comments

ही बातमी खरी असेल तर.

Rajesh188
Sat, 08/21/2021 - 14:40 नवीन
तालिबान जगासमोर वेगळेच बोलत आहेत आणि प्रत्यक्षात वेगळेच वागत आहेत. त्यांना त्यांची प्रतिमा सुधारायची असती तर विमानतळ वर गोळीबार,किंवा आता भारतीय नागरिकांचे अपहरण केलेच नसते. किंवा तालिबानी हे गटागटा मध्ये विघुरलेले आहेत आणि त्यांच्या वर केंद्रीय नेतृत्वाचे नियंत्रण नाही. ज्या गटा ला जसे वाटते तसा तो गट वागत आहे. तालिबानी फौज चे काम बेशिस्त पने चालू आहे असा पण निष्कर्ष काढता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हामीद करझाई

चंद्रसूर्यकुमार
Sat, 08/21/2021 - 13:41 नवीन
तीन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हामीद करझाई यांची तालिबानच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन नवे सरकार स्थापन करण्याविषयी चर्चा केली. आणि करझाईंना भेटणारा कोण होता? तर कुप्रसिध्द हक्कानी नेटवर्कमधला अनस हक्कानी. एक गोष्ट समजत नाही. २००१ मध्ये तालिबानला हाकलल्यानंतर अमेरिकेच्या पाठिंब्यावर हामीद करझाई अध्यक्ष झाले होते आणि ते २०१४ पर्यंत त्या पदावर होते. त्यामुळे ते खरं तर तालिबानच्या हिटलिस्टवर पाहिजे होते. पण तसे झालेले दिसत नाही. रशियनांनी अफगाणिस्तानातून माघार घेण्यापूर्वी महंमद नजीबुल्लांना अध्यक्षपदावर बसवले होते. रशियन परत गेल्यावरही सोव्हिएट युनियन अस्तित्वात असेपर्यंत नजीबुल्लांना मॉस्कोचा पाठिंबा होता. १९९६ मध्ये तालिबानी काबूलमध्ये घुसल्यावर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्या नजीबुल्लांना ठार मारले आणि त्यांचा मृतदेह काबूलमध्ये चौकात टांगून ठेवला होता. नजीबुल्ला १९९२ मध्ये सत्तेतून पायउतार झाल्यानंतर अफगाणिस्तानात विविध वंशांच्या लोकांमध्ये यादवी चालू होती त्या दरम्यान अध्यक्ष होते बुर्‍हानुद्दिन रब्बानी. नजीबुल्ला अफगाणिस्तानातून पळून जाऊ शकले नाहीत पण रब्बानी तिथून निसटण्यात यशस्वी झाले. ते २००१ पर्यंत निर्वासित सरकार चालवत होते. तालिबान्यांना रब्बानींना लगेच मारता आले नाही पण २०११ मध्ये म्हणजे ते अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर १० वर्षांनंतर तालिबान्यांनी रब्बानींनाही ठार मारले. अशा स्थितीत करझाई आरामात काबूलमध्येच आहेत आणि तालिबान्यांना भेटतात हा प्रकार शंकास्पद वाटतो.
  • Log in or register to post comments

‘Bengal police ignored

मदनबाण
Sat, 08/21/2021 - 21:12 नवीन
‘Bengal police ignored complaints of victims, no FIR in 60% cases’: Calcutta HC orders court-monitored CBI probe in post-poll violence cases चला, खेला होबे च्या तांडवा नंतर निदान न्यायालयाने तरी दखल घेतली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Misirlou Acapella
  • Log in or register to post comments

ही तुलना होणे गरजेचे आहे

Rajesh188
Sun, 08/22/2021 - 02:47 नवीन
दहशत वाद मुळे किती लोकांना जीवन जगणे मुश्किल झाले ? भांडवलदार लोकांनी केलेल्या लुटी मुळे किती लोकांचे जीवन नरक झाले? भ्रष्ट सरकारी कारभार मुळे किती लोकांच्या आयुष्याची वाट लागली? भ्रष्ट नेत्यांमुळे देशाचे जास्त नुकसान झाले की दंगली,अतिरेकी,परकीय देशांच्या मुळे किती लोकांचे नुकसान झाले? फालतू दावे करणाऱ्या संशोधक ,डॉक्टर मंडळी नी लोकांचे किती नुकसान केले?. काळाबाजार,भेसळ,नकली औषद,निर्माण करणाऱ्या लोकांनी किती लोकांचे जीवन धोक्यात आणले? हे सर्व आकडे खरे जाहीर झाले तर मानव जातीचे दुश्मन सभ्य समजतं आहोत तोच वर्ग आहे हे अनुमान निघेल. कटू आहे पण सत्य आहे
  • Log in or register to post comments

होय मित्रा

गॉडजिला
Sun, 08/22/2021 - 02:53 नवीन
आता लाल बावटा हाती घेणेच श्रेयस्कर… तो पर्यन्त आपण डब्यातील अंब्याचे न्लोणचे अन स्पेगेतिवर ताव मारुन घेउ. अन संध्याकाळि बर्गर राजा मधे बसुन ठरवु काय काय केले पाहिजे ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

उत्तर प्रदेशचे माजी

श्रीगुरुजी
Sun, 08/22/2021 - 08:07 नवीन
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. ते द़न वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १९९२ मध्ये अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी स्थानावर बळजबरीने बांधलेली मशिद उध्वस्त करण्यात त्यांची मोठी कामगिरी होती. ते त्या काळात मुख्यमंत्री असल्यानेच ती मशीद पाडणे शक्य झाले होते. मशीद पाडेपर्यंत पाडणाऱ्या सेवकांना अजिबात अडवू नका असे त्यांनी पोलिसांना आदेश दिले होते व त्यामुळेच मशीद संपूर्ण पाडता आली होती. आम्हीच मशीद पाडली असे मुंबईत घरात लपून बसलेले काही जण दावा करतात व मशीदपतनाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु मशीद पाडण्याचे श्रेय फक्त भाजप, विश्व हिंदू परीषद, बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडेच आहे. इतर कोणाचाही त्यात सहभाग नव्हता.
  • Log in or register to post comments

कल्याणसींग ग्रेटच. सरकार

अमरेंद्र बाहुबली
Sun, 08/22/2021 - 12:10 नवीन
कल्याणसींग ग्रेटच. सरकार पणाला लावून त्यानी हे सगळं केलं. बजरंग दल, विहींपही ह्यात असतील. पण भाजपचे कार्यकर्ते असताल असं वाटत नाही. कंधार ला अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून हाफिज सईद ला सोडनारे, कारगील वेळी भिऊन सैन्याला सिमापार करू न देणारे नेते भाजप मध्ये असतील तर कार्यकर्ते बाबरी सारख्या प्रकरणा सहभागी असतील असं वाटत नाही अर्थात क्रेडीट घ्यायला भाजप सर्व ठिकाणी पुढे असतेच पण ग्राऊंड लेवलला त्यानी पळ काढलेला असतो. मागे धारावी झोपडपट्टी आम्ही करोनामुक्त केली म्हणून भाजप कार्यकर्ते नाचत होते पण प्रत्यक्शात ते सरकारी अधीकार्यांचे फोटो होते. अगदी काल परवा ही बंगाल मध्ये आपल्या कार्यकर्त्याना वार्यावर सोडून भाजप नेत्यानी पळ काढला नंतर भाजप कार्यकर्तयांचे हाल कुत्र्याने खाल्ले नाही. ह्या ऊलट वेळोवेळी रस्त्यावर ऊतरनारा शिवसेने सारखा पक्श ह्यात नसावा हे लाहन मूलालाही पटनार नाही. ह्यात अडवाणीं सारख्या नेत्याने रथयात्रा काढून वातावरण निर्मीता केली ह्याचं श्रेय त्याना द्यायलाच हवं. पण प्रत्यक्श बाबरी पतन आणी भाजप ह्यांचा संबंध असावा हे भाजपचा ईतीहास पाहता खरं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आपले अज्ञान वारंवार उघडे पडत

श्रीगुरुजी
Sun, 08/22/2021 - 12:18 नवीन
आपले अज्ञान वारंवार उघडे पडत आहे. बाबरी मशीद पतन सुरू असताना तेथे कोण कोण उपस्थित होते, कोणाकोणाला अटक झाली होती व कोणाकोणांवर २०१९ पर्यंत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू होता त्याची माहिती घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कोर्टात काय सिद्ध झाले

Rajesh188
Sun, 08/22/2021 - 12:26 नवीन
कोर्टात काय सिद्ध झाले त्याचा पण अभ्यास करा.आरोपी नी आरोप फेटाळून लावले आणि कोर्टनी त्यांना निर्दोष सोडले .कारण त्या कृत्यात ते सहभागी च नव्हते असे आरोपी नी कोर्टाला पटवून दिलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

एकदोन नेते ऊपस्थीत होते. आणआ

अमरेंद्र बाहुबली
Sun, 08/22/2021 - 12:28 नवीन
एकदोन नेते ऊपस्थीत होते. आणआ ते पुराव्या अभावी सुटले ही. मी कार्यकर्त्यांबद्दल बोलतोय. ते विहींप। बजरंग दल, शिवसेना अश्या धर्माभीमानी संघटनेचे असतील. सत्ता मिळवण्यासाठी हिंदूत्वाचा वापर करानार्या भाजपचे नसावेत. भाजप कार्यकर्ते आणी हिंदूधर्माभिमानी कार्यकर्ते ह्या दोन पुर्ण वेगवेगळ्या गोष्टा आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

त्या नंतर उसळलेल्या

Rajesh188
Sun, 08/22/2021 - 12:40 नवीन
दंगलीत हिंदू तर्फे प्रतिकार करायला पण BJP कार्यकर्ते मुंबई मध्ये पण हजर नव्हते.सेने नी सर्व जबाबदारी स्वतः वर घेतली होते.सेने चे नेते स्वतः रस्त्यावर येवून प्रतिकार करत होते. Bjp चे कार्यकर्ते आणि नेते घरात बसले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

+१

अमरेंद्र बाहुबली
Sun, 08/22/2021 - 12:45 नवीन
+१ सेनेने मुंबई वाचवली म्हणतात ते ऊगाच नाही. भाजपचे कार्यकर्ते आणी नेते लपण्यात आणी पळण्यात आघाडीवर असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

पळपुटे म्हणा ना सरळ

Rajesh188
Sun, 08/22/2021 - 12:51 नवीन
मराठी भाषेत चांगले चांगले शब्द असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

जो पर्यंत राहुल गांधी,

रात्रीचे चांदणे
Sun, 08/22/2021 - 12:44 नवीन
जो पर्यंत राहुल गांधी, दिगविजय सिंग सारखे नेते देश पातळीवर व राजेश188, अमरेंद्र बाहुबली, सारखे कट्टर समर्थक मिपापातळी वर भाजपा जवळ आहेत तो पर्यंत भाजपाला देशात पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आलात ना वयक्तिक??? अर्थात

अमरेंद्र बाहुबली
Sun, 08/22/2021 - 12:50 नवीन
आलात ना वयक्तिक??? अर्थात तुमच्या सारख्यांकडीन काहीतरी माहीतीपुर्ण प्रतिसाद येतील अशी अपेक्शआ ठेवणं म्हणजे भाजप कडून विकासाची अपेक्षा ठेवण्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

मिपावरील अशा समर्थकांचं

श्रीगुरुजी
Sun, 08/22/2021 - 13:49 नवीन
मिपावरील अशा समर्थकांचं अज्ञान वारंवार उघडं पडून हसं होतंय. परंतु ते चौथ्या प्रकारातील असल्याने त्यांना हे समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

पुन्हा एकदा अज्ञानाचे जाहीर

श्रीगुरुजी
Sun, 08/22/2021 - 13:51 नवीन
पुन्हा एकदा अज्ञानाचे जाहीर प्रदर्शन केलंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कोठारी बंधू हे नाव कधी कानावर

जॅक द रिपर
Sun, 08/22/2021 - 19:25 नवीन
कोठारी बंधू हे नाव कधी कानावर पडलंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

राम कुमार आणि शरद कोठारी

Rajesh188
Sun, 08/22/2021 - 19:59 नवीन
ह्यांनी बाबरी मशीद वर प्रथम भगवा फडकवला.आणि पोलिस गोळीबार मध्ये ह्यांचा मृत्यू झाला. म्हणतात आरएसएस चे कार्यकर्ते होते दोघे बंधू.ज्यांनी उन्माद निर्माण केला ती bjp ची नेते मंडळी आणि त्यांचे कुटुंबीय मात्र तिथे कोणी हजर नव्हते. उन्माद पसरविणारे गायब आणि सामान्य कार्यकर्ते गोळीबार मध्ये मृत्यू मुखी पडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक द रिपर

+१ बजरंग दल चे कार्यकर्ते

अमरेंद्र बाहुबली
Sun, 08/22/2021 - 20:18 नवीन
+१ बजरंग दल चे कार्यकर्ते होते. पण श्रेय भाजप लाटायला पाहतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा