✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही

स
साहित्य संपादक यांनी
Sat, 06/26/2021 - 10:53  ·  लेख
लेख
छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत. या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही) धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत. PRASHANT प्रशांत Terminator 1 गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र -टर्मीनेटर Judgement Day देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य - टर्मीनेटर
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
101952 वाचन

💬 प्रतिसाद (288)

प्रतिक्रिया

या धाग्यात आलेले फोटो स्पर्धेच्या फोटोंपेक्षा जास्त आवडले .

कंजूस
Tue, 07/20/2021 - 18:56 नवीन
हो. कारण मुक्त विषय. आपला फोटो कोणत्या विभागात टाकायचा या संभ्रमामुळे येत नाहीत. आपले घरातले फोटो हे एक आठवण म्हणून काढतो. दहा/ वीस वर्षांपूर्वी अमुक कसे दिसत होते. लहान मुले मोठी झाल्यावर त्यांना खूप आवडतात.
  • Log in or register to post comments

निसर्ग गर्दीत, शहरातही शोधता येतो

श्रीगणेशा
Wed, 07/21/2021 - 10:56 नवीन
हैदराबाद मधील माझ्या सोसायटीतील हे सुंदर फूल (फूलझाडाचं नाव माहिती नाही) Image removed.
  • Log in or register to post comments

अमेरिकेतली देवळे

श्रीरंग_जोशी
Mon, 07/26/2021 - 08:05 नवीन
मी या धाग्यावर अगोदर प्रकाशित केलेल्या फोटोजवरच्या प्रतिक्रियांसाठी आपणा सर्वांना धन्यवाद. अमेरिकेतल्या काही देवळांचे मी काढलेले फोटोज: देमॉइन आयोवा येथील देऊळ Image removed. Image removed. शिकागो येथील स्वामीनारायण मंदीर Image removed. शिकागो येथील श्री वेंकटेश्वरा मंदीर Image removed. ओरलँडो, फ्लोरिडा येथील देऊळ Image removed. मिनेसोटातले कम्बोडियन मंदीर Image removed.
  • Log in or register to post comments

फोटो छान पण...

सुमो
Mon, 07/26/2021 - 11:37 नवीन
फेसबुक वरुन इथे दिलेले फोटो काही दिवसातच दिसेनासे होतात. शक्य असल्यास इतर फोटो होस्टिंग साईट वरून फोटो द्यावेत. या धाग्याच्या पाचव्या पानावर तुम्ही आणि चंद्रसूर्यकुमारांनी दिलेले फोटो गायब झालेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सहमत सुमो.

कंजूस
Mon, 07/26/2021 - 13:08 नवीन
फेसबुक यासाठी उपयोगाचे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Mon, 07/26/2021 - 19:27 नवीन
सुमो साहेब - या माहितीसाठी मनःपूर्वक धन्यवाद. फेसबुकद्वारे फोटो मिपावर करण्याबाबतच्या समस्येविषयी प्रथमच कळले. माझे फ्लिकरवर पेड सबस्क्रीप्शन असल्याने यापुढे त्याचाच वापर करीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो

साहेब नको

सुमो
Wed, 07/28/2021 - 11:12 नवीन
फक्त सुमो म्हणा प्लीज. 🙏 फेसबुक फोटो लिंक डेट स्टँप्ड असते. त्यामुळे दिसेनाशी होते काही काळानंतर. तुमचे दोन तीन फोटोज आवडले म्हणून सेव्ह करून घेतले होते. ते इथे देतोय. १. Image removed. २. Image removed. ३. Image removed. 👍 मिपावर मी बर्‍याचवेळी रोमात असतो म्हणून तेव्हा प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

श्रीरंगा,चेक कर. फ्लिकरवर

कंजूस
Wed, 07/28/2021 - 14:54 नवीन
पूर्वी ( फ्री अकाउंटला) हाई रेझलूशनचे फोटो चढवता येत. म्हणजे याचसाठी वापरले जायचे. पण दोन वर्षांपूर्वी smugmug ने घेतल्यापासून फ्री स्टोरेज १००० फोटो केलंय. आणि शेअरिंगचा फोटो लहानच ( १००-१५० केबीचा )जातोय असं वाटतं. आणि याहूमेल वेगळं होऊन ते Verizon ने घेतलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

बरोबर

श्रीरंग_जोशी
Wed, 07/28/2021 - 23:13 नवीन
तुमची माहिती बरोबर आहे. फ्लिकरने अनलिमिटेड स्टोरेज दिला आहे. वर्षाला $५० घेतात. गेल्यावर्षी एकदम तीन वर्षांचे शुल्क भरल्यास १० टक्के सुट अशी ऑफर होती. गेल्या अडीच वर्षांपासून माझे फ्लिकर अकाउंट पेड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

सुरेख.....!

तुषार काळभोर
Mon, 07/26/2021 - 16:04 नवीन
प्रत्येक फोटोत फ्रेमिंग आणि प्रकाश अतिशय छान आहे. प्रत्येक फोटो अतिशय देखणा आहे. अवांतर शंका: हवा इतकी स्वच्छ दिसत आहे की अगदी फोटोत ते जाणवतंय. हवेतील तरंगणारे कण भारतापेक्षा बऱ्याच कमी प्रमाणात असल्याने असे असावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Mon, 07/26/2021 - 19:29 नवीन
धन्यवाद तुषार. >> हवेतील तरंगणारे कण भारतापेक्षा बऱ्याच कमी प्रमाणात असल्याने असे असावे का? कदाचित हो. मला नेमके कारण ठाऊक नाही. पण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात धूळ उडू नये यासाठी प्रयत्न केले जातात असे निरिक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

कॅमेरा

तुषार काळभोर
Wed, 07/28/2021 - 21:52 नवीन
He सगळे फोटो कोणत्या कॅमेऱ्याने काढले आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

कॅमेरे

श्रीरंग_जोशी
Wed, 07/28/2021 - 22:38 नवीन
शिकागोच्या एसव्ही मंदीराचा सोनी इरिक्सन च९०५ या फोननी काढला होता. बाकी बहुतेक देवळांचे सोनी नेक्स ५ एन या मिररलेस कॅमेर्‍याने काढले आहेत. फॉल सीझनचे व फुलांच्या उद्यानाचे फोटोज व वरचा बीचचा फोटो आयफोन एस इ (२०२०) ने काढले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

Imgur वापरा.

कंजूस
Mon, 07/26/2021 - 13:10 नवीन
सोपे आहे आणि लिंक लहान असते.
  • Log in or register to post comments

मागच्या रविवारीच

प्रचेतस
Wed, 07/28/2021 - 15:48 नवीन
मागच्या रविवारीच राजगुरुनगरच्या पश्चिम भागात फिरायला जाणे झाले. तिथे काढलेली काही छायाचित्रे Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे!

तुषार काळभोर
Wed, 07/28/2021 - 17:39 नवीन
पावसाळ्यात सह्याद्रीची हीच खासियत असते. कुठेही जा, एकदम हिरवेगार गालिचे असतात सर्वत्र. (हे राजगुरूनगरच्या पश्चिमेस म्हणचे चास धरणाच्या आजूबाजूला का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो, चासच्या पुढे, मंदोशीच्या

प्रचेतस
Wed, 07/28/2021 - 17:46 नवीन
हो, चासच्या पुढे, मंदोशीच्या थोडं अलीकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

पण ...

कंजूस
Wed, 07/28/2021 - 20:29 नवीन
थंडरबोल्ट नाही थंडरबोल्ड कठंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तिथे नव्हती नेली.

प्रचेतस
गुरुवार, 07/29/2021 - 09:52 नवीन
तिथे नव्हती नेली. ती इथे आहे. :) Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

व्वा, हिरवा कंच सुंदर निसर्ग

चौथा कोनाडा
Wed, 07/28/2021 - 22:06 नवीन
व्वा, हिरवा कंच सुंदर निसर्ग ! झकास फोटो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अहाहा

श्रीरंग_जोशी
Wed, 07/28/2021 - 23:14 नवीन
हिरवेगार अन नयनरम्य फोटोज पाहून पुण्याभोवतीच्या किल्ल्यांवर पूर्वी केलेल्या भटकंतीच्या आठवणी जाग्या झाल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मृगजळ

चौकस२१२
गुरुवार, 07/29/2021 - 04:38 नवीन
एवढा पाऊस होऊन सुद्धा उन्हाळ्यपर्यंत रखरखाट असतो.. झाडे लावलीच जात नाहीत सरकारी जमिनीवर? काय प्रश्न आहे कोण जाणे इतकी दशके ,,,नाही शतके झाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

फारच छान क्लिक्स

सुमो
गुरुवार, 07/29/2021 - 10:59 नवीन
चौथा फोटो विशेष आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चुकलं.

कंजूस
Wed, 07/28/2021 - 20:30 नवीन
थंडरबर्ड*
  • Log in or register to post comments

सुर्यास्तानंतरचे दृश्य

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 07/29/2021 - 07:55 नवीन
काही वर्षांपूर्वी एका तळ्यानिनारी टिपलेले हे सुर्यास्तानंतरचे दृश्य. Image removed. बाकी या धाग्यावरच्या प्रतिसादांमधले उत्तमोत्तम फोटोज पाहून व चर्चा वाचून माझ्या तीन वर्षांपूर्वीच्या धाग्याचे स्मरण झाले - छायाचित्रण कलेचा आस्वाद.
  • Log in or register to post comments

खूपच सुरेख फोटो आहे हा.

प्रचेतस
गुरुवार, 07/29/2021 - 09:52 नवीन
खूपच सुरेख फोटो आहे हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

व्वा, श्रीरंग_जोशी, सुंदरच !

चौथा कोनाडा
गुरुवार, 07/29/2021 - 17:47 नवीन
व्वा, श्रीरंग_जोशी, सुंदरच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 07/29/2021 - 19:26 नवीन
धन्यवाद प्रचेतस व चौथा कोनाडा साहेब. या फोटोला आम्ही राहतो त्या गावच्या सिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या वेबसाइटवर स्थान मिळाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

व्वा, श्रीरंग !

चौथा कोनाडा
Fri, 08/27/2021 - 12:55 नवीन
व्वा, श्रीरंग !

⭐

हार्दिक अभिनंदन !

🏆

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

वाह

कंस
गुरुवार, 08/26/2021 - 21:42 नवीन
सुंदर फोटो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

आयफोन फोटोग्राफी अवॉर्ड्स २०२१

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 07/29/2021 - 08:01 नवीन
खालील दुव्यावर यंदाच्या आयफोन फोटोग्राफी अवॉर्ड्सचे विजेते फोटोज पाहता येतील. 2021 iPhone Photography Awards: Take a look at these stunning winning photos
  • Log in or register to post comments

माझ्या घराभोवती दिसणारे प्राणी

श्रीरंग_जोशी
Mon, 08/02/2021 - 09:48 नवीन
रेड फॉक्स Image removed. Image removed. हरिण Image removed. Image removed. हरिणी व तिची दोन पाडसं यांचा व्हिडिओ मध्यंतरी एक coyote पण दिसला होता. गवताआड झ्टकन जागा बदलत असल्याने त्याचा फोटो काढू शकलो नाही.
  • Log in or register to post comments

समृद्ध परिसर आहे तुमचा.

प्रचेतस
Mon, 08/02/2021 - 12:13 नवीन
समृद्ध परिसर आहे तुमचा. हे कोल्हे, कायोटी माणसांवर हल्ले करतात का कधी? की घाबरट असतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Mon, 08/02/2021 - 20:15 नवीन
धन्यवाद, प्रचेतस. हे कोल्हे (रेड फॉक्स) व कायोटी दोन्हीही माणसाची चाहूल लागताच दूर पळतात. रेड फॉक्स आकाराने पण लहान असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

फोटो आवडले

गोरगावलेकर
Tue, 08/03/2021 - 15:04 नवीन
खूप सुंदर परिसर दिसतोय तुमच्या आजूबाजूचा
  • Log in or register to post comments

जागतिक फोटोग्राफी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

टर्मीनेटर
गुरुवार, 08/19/2021 - 23:40 नवीन
सर्व मिपाकरांना जागतिक फोटोग्राफी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ॲम्बी व्हॅली जवळच्या परीसरातला निसर्ग. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

फोटोज आवडले

श्रीरंग_जोशी
Fri, 08/20/2021 - 00:17 नवीन
अ‍ॅम्बी व्हॅलीच्या भोवतालचा परिसर प्रेक्षणीय आहे. १४ वर्षांपूर्वी मी काढलेले काही फोटोज. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

वाह! हे फोटोजही सुंदरच आहेत.

टर्मीनेटर
Fri, 08/20/2021 - 00:52 नवीन
वाह! हे फोटोजही सुंदरच आहेत. पावसाळ्यात सह्याद्रीचे रूप खूप वेगळे आणि नेत्रसुखद असते हेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा