चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग २)
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे पुढचा भाग काढत आहे.
अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. देशातील चार महत्वाच्या शहरांपैकी कंदाहार आणि हेरात तालिबान्यांच्या ताब्यात गेली आहेत. मझार-ए-शरीफही जवळपास गेल्यातच जमा आहे असे दिसते. पुढील तीन महिन्यांमध्ये काबूलही पडेल अशी भिती पाश्चिमात्य माध्यमांनी वर्तवली आहे. अशा परिस्थितीत काबूलमधील आपल्या दूतावासावर हल्ले करू नयेत अशी विनंती अमेरिकेकडून तालिबानला केली गेली आहे. http://www.uniindia.com/washington-calls-on-taliban-to-spare-us-embassy-as-fight-for-kabul-nears/world/news/2475419.html एका दहशतवादी संघटनेला असा बाबापुता करून केलेली विनंती अमेरिकेसारख्या महासत्तेला शोभते का? असो.
मला वाटते की पूर्ण जगात शापित देश असा कोणता देश असेल तर तो अफगाणिस्तान आहे. एकेकाळी बौध्द संस्कृती त्या भूमीत बहरली होती. पण तिथेच जवळपास गेल्या हजारेक वर्षांपासून काही वर्षे वगळली तर सतत अस्थिरता, सतत हिंसाचार यांचेच साम्राज्य राहिले. गझनीचा महंमद, महंमद घोरी पासून अहमदशाह अब्दालीसारखे क्रूरकर्मे तिथे सत्तेत होते. अलीकडच्या काळात रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांच्या साठमारीत अफगाणिस्तान या सुंदर देशाची मात्र पूर्ण वाताहत झाली. हे सगळे बघून खरोखरच वाईट वाटते.
अफगाणिस्तानात पूर्ण लोकसंख्येत लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. तालिबान राज्यात शाळांमध्ये आधुनिक शिक्षण मिळायची तर शक्यताच नाही. मग या मुलांच्या मनात तेच दहशतवादाचे प्रशिक्षण भरवले जाऊन भविष्यात परिस्थिती अधिकाधिक चिघळत जाणार का ही भिती वाटते. आणि अफगाण स्त्रियांविषयी काही बोलायलाच नको. घराबाहेर पडायचे नाही, पडायचेच असले तर नवरा, भाऊ, बाप किंवा मुलगा यांच्याबरोबरच पडायचे, शिक्षण मिळायचा संबंधच नाही, घरकाम करत बसायचे आणि मुले काढत आणि सांभाळत बसायची, जरा चेहर्यावरचा बुरखा बाजूला झाला तर भर चौकात चाबकाचे फटके पडणार का या भितीच्या सावटाखाली वावरायचे.. खरोखरच भयानक. आणि या परिस्थितीतून मार्ग निघायची शक्यता अजिबात नाही.
असले प्रकार बघितले की भारतातल्या अनेक गोष्टी आपल्याला आवडत नसल्या तरी आपण किती सुदैवी आहोत हे जाणवते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कर्माची फळं भोगत आहेत
ह्रदयद्रावक.
अफगाणिस्तानाचे भौगोलिक महत्व मोठे आहे तरी
प्रत्यक्ष त्या देशातुन काहीच
तेच तर...
ह्यावर्षी सर्वात जास्त काळेधन
भुजबळ साहेब, स्पॅम प्रतिसाद
असे लोक अत्यंत चिवट असतात.
रावसाहेब चिंगभूतकर
आपल्याला सुद्धा ईनो, जेलुसिल,
भाजपला अडचणीत आणणारे प्रतिसाद
एका वेळेस अधिकतम ३० सदस्य हजर असलेल्या...
मिपावरील सर्वात “संस्कारी”
सर्वात जास्त काळेधन जमा झाले
आधि कुतुहल वाटायचे
आधीच इथे फारसे लोक balansd
चिंगुजी
स्थिर सरकार आणि शांतता.
अफगाणिस्तानात अमेरिका पुन्हा
अमेरिका सैन्य पाठवणार आहे
पण आपल्या लष्करे तैय्यब्बा ची
आपले अज्ञान वारंवार उघड करू
साॅरी गुरूजी. अस कायदा.
मौजमजेसाठी अविवाहित मुलींनी शरीरसंबंध ठेवण्यापर्यंत भारतीय समाज
काबूलही पडले
+१
एकूणच अफगाण मधील स्थिती बघता
भिती आहे की आज अफगाणिस्तान-
अहमदशहा मसूद ताजिक वंशाचा
मोदी ना सांगा
भारताला धोका
विचारवंत
स्टार ऑफ डेव्हिड!
तालिबान
गॉड आणि गन वृत्ती झिंदाबाबाद !
विभाजन स्मृति दिवस Partition Horrors Remembrance Day
गांधी चे अहिंसा तत्व हिंदू नी आत्मसात केले होते काय
गदारोळ
जुना लेख
भारतात स्मारक
छान
नाही
विभाजन विभीषिका स्मृति दिवसाला काँग्रेसने विरोध दर्शवला
योग्यच झाले.
दुर्दवी असले तरी विभाजन झाले
दुर्दवी असले तरी विभाजन झाले हे योग्यच झाले...होय परंतु ज्या भयप्रद पद्धतीने त्यात हिंदू मारले गेले ते अनावश्यक होते.राष्ट्रीय हायड्रोजन मिशन + सीएनजी नळ जोडणी
सध्या भारतातील विभागवार वायू
विभाग % खप टक्केवारी वायू वितरण नळ जोडणी व्यवस्था असलेली राज्ये वायू वितरण नळ जोडणी व्यवस्था नसलेली राज्ये पश्चिम ५३% गुजरात, महाराष्ट्र गोवा उत्तर २६% दिल्ली, उ.प्रदेश, हरियाणा, राजस्थान पंजाब, जम्मु काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड मध्य ३% मध्य प्रदेश छत्तीसगड दक्षिण १४% तमिळनाडू आन्ध्र प्रदेश केरळा, कर्नाटका पूर्व शून्य! एकही राज्य नाही! बिहार, प. बंगाल, झारखंड, उडिसा उत्तर पूर्व ४% आसाम, त्रिपुरा मेघालय, सिक्कीम अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपुर, नागप्रदेशसंदर्भः https://www.pngrb.gov.in/Hindi-Website/pdf/vision-NGPV-2030-06092013.pdf यात पुढे जाऊन सुधरणा होईल यात शंका नाही.ग्रीन हायड्रोजन
ग्रीन हायड्रोजन
ग्रीन हायड्रोजन