Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आशु जोग on गुरुवार, 08/05/2021 - 17:18
महाराष्ट्रातला बौद्ध धर्म
महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्माबाबत मला काही शंका आहेत. महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जो बौद्ध धर्म फॉलो करतात तो नेमका कसा आहे ? तिबेट, चीन, जपान इथल्या बौद्ध धर्माशी त्याचा कितपत संबंध आहे ? नसेल तर तसे का ? महाराष्ट्रातले बौद्ध कुठल्या पंथाचे आहेत वज्रयान की महायान ? गौतम बुद्धांनी योग साधनेविषयी खूप चिंतन केले होते आणि ते अनुयायांना सांगितलेही होते. त्याबाबत महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मीयांचे मत काय आहे ! बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा साधनेचा, अध्यात्माचा एक मार्ग होता की राजकीय / सामाजिक विचारधारा होती. बाबासाहेबांच्या अनुयायांची बाबासाहेबांवर श्रद्धा होती म्हणून बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. बाबासाहेबांनी इतर कुठला धर्म दिला असता तर तोही अनुयायांनी स्वीकारला असता त्यामुळे लोकांना बौद्धधर्म पटला म्हणून त्यांनी तो स्वीकारला असे म्हणता येत नाही. बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा जर तात्कालिक परिस्थितीवरचा एक उपाय असेल तर पुढे काही वर्षांनी बाबासाहेबांचे अनुयायी पुन्हा आपल्या मूळ धर्माकडे, पंथाकडे वळतील का ? गौतम बुद्धांच्या किंवा अशोकाच्या काळात तो धर्म जगात सर्वत्र गेला. पण महाराष्ट्रात पोचला नाही. असे का ! गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक हे जन्माने क्षत्रिय होते का आणि राजघराण्यातले होते का , स्वतः गौतम बुद्ध हयात असताना आणि सम्राट अशोकाचे राज्य असताना महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मियांची किंवा त्यांच्या पूर्वजांची स्थिती नेमकी कशी होती ?
  • Log in or register to post comments
  • 44301 views

प्रतिक्रिया

Submitted by चौकस२१२ on Sun, 08/08/2021 - 09:51

Permalink

दोन्ही बाजूने डमरू!

रॉबर्ट नाव घेवून ख्रिस्ती संस्थेकडून आर्थिक मदत आणि हिंदू जात कागदावर दाखवून सरकारी मदत दोन्ही फायदे. हे खरंच आहे का? असेल तर अयोग्य आहे, कायदा याला परवानगी देतो? हिंदू धर्मातील जातीची भलावण करीत नाही पण जे हिंदू धर्म सोडून गेलेत आणि त्याचे कारण जात व्यवस्था हे देतात यांना एक प्रश्न सतत विचारावासा वाटतो - तुम्ही हिंदू धर्मातील अन्यायामुळे चिडून धर्म सोडला तर मग ज्या धर्मात जात हा प्रकारचं मान्य नाही तिथे जात का लावता ? म्हणजे जो हिंदू दलित चिडून ख्रिस्ती झाला त्याने हिंदू दलितांना मिळणार्या सोयींन्वरील हक्क पण सोडून दिला पाहिजे ! दोन्ही बाजूने डमरू का वाजवता .. नाहीतर हिंदू धर्म तरी सोडायचा नवहता ! ख्रिस्ती मराठा, ख्रिस्ती ब्राम्हण हि काय भानगड? चालूगिरी नुसती
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sun, 08/08/2021 - 14:21

Permalink

जात व ओळख

सौंदाळा,
बौध्द किंवा कोणताही धर्म बदललेले लोक रोटी-बेटी व्यवहार करताना आपल्या जुन्या धर्मातील जातीप्रमाणेच करतात अशी बरीच उदाहरणे पाहिली आहेत.
भारतात जात हीच सामाजिक ओळख आहे. याचं कारण की भारतात लोकं स्वत:ची ओळख म्हणून जातच लावतात. वैयक्तिक ओळख हा प्रकार भारतात जवळजवळ नाहीच. जी काही ओळख आहे ती समूह म्हणूनंच असते. हे चांगलं की वाईट हा भाग वेगळा. सांगायचा मुद्दा असा की जात बदलून नवी जरी घेतली तरी ओळख जुनीच लावावीशी वाटते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sun, 08/08/2021 - 14:48

Permalink

बौद्ध हा रूढ अर्थाने धर्म नाही

Rajesh188,
धर्मांतरित बौध्द सोडून मुळ बौध्द धर्मीय लोकांची लोकसंख्या 1% पण नाही त्याची काय करणे असावीत.
याचं कारण माझ्या मते असं की, बौद्ध हा रूढ अर्थाने धर्म नाही. जरी तथाकथित विद्वानांनी कितीही कंठशोष केला तरी बौद्ध हा धर्म नाही. कारण की त्यात स्मृतीच नाही. सर्वसामान्य लोकांना आचरता येईल असं काहीही नव्हतं. ना कसले सामाजिक नियम होते. नियम जरूर होते, पण ते सदस्यांसाठी होते, उर्वरित समाजातल्या लोकांसाठी नव्हते. बौद्ध हे विशेषण भिख्खु, श्रमण, इत्यादींना लावण्यासाठी आहे. गृहस्थी माणूस बौद्ध नसतो. आंबेडकरांनी बौद्ध म्हणून जी काही ओळख दिली आहे त्यात उपासनेचा काहीही संबंध नाही. ती एक सामाजिक सोय आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Sun, 08/08/2021 - 15:07

In reply to बौद्ध हा रूढ अर्थाने धर्म नाही by गामा पैलवान

Permalink

जरी तथाकथित विद्वानांनी

जरी तथाकथित विद्वानांनी कितीही कंठशोष केला तरी बौद्ध हा धर्म नाही
बरोबर ती उपासना/साधना पद्धती आहे... पण त्याचा प्रसार व प्रचार साम, दाम, दंड, भेद न करता इतका व्यापक झाला की पुढे त्याला आपोआप धर्माचे स्वरूप प्राप्त झाले. मग ते पिढीजात होणारे आचरण असो की त्यामार्गातील इतर साधक असोत त्यांच्या योगदानातून तो विशाल अन व्यापक बनला म्हणुन तो लोकांनी लोकांसाठी बनवलेला लोकांचा धर्म म्हणुन विस्तारीत झाला
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sun, 08/08/2021 - 15:36

In reply to जरी तथाकथित विद्वानांनी by गॉडजिला

Permalink

काहीही हं ....

गॉडझिला, काहीही हं! तुम्ही जे काही सांगताहात त्याला काही ऐतिहासिक आधार आहे का? की आपलं उगीच काहीतरी ठोकून देताय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Sun, 08/08/2021 - 16:00

In reply to काहीही हं .... by गामा पैलवान

Permalink

काहीतरी ठोकून देताय?

काहीतरी ठोकून देताय?
लूक हू इज अक्युजिंग xD xD xD
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Sun, 08/08/2021 - 16:27

In reply to काहीतरी ठोकून देताय? by गॉडजिला

Permalink

बुध्दाने मार्ग दिला

मार्गदर्शक आचरणाची तत्वे दिली, बुध्दाने मार्ग सांगितला तो आचरणात आणायचा की नाही हे त्याने साधकांवर सोपवले. सुरुवातीला त्याला माहित होते त्याला जे सापडले ते जगात त्याक्षणी कोणाला चटकन समजणार अथवा मान्य होणार नाही म्हणुन त्याने त्यातल्यात्यात अभ्यासू व ज्ञानी म्हणुन त्याचे जुने गुरू बंधूजवळ सर्वप्रथम आपले ज्ञान खुले केले प्राथमिक शंका नंतर त्यांना तो मार्ग पटला, अनुयायी झाले बुध्दाकडे त्यांच्या ज्ञानवअ वस्थेमुळे लोक आकर्षित होउ लागले ज्यांनी विचारलं त्यांना बुध्द उपदेश करत गेले सुरुवातीला तात्कालिक समाजस्थिती नुसार त्यांना स्त्रिया हा मार्ग अनुसरू शकतील याची खात्री न्हवती पण नंतर त्यांनी त्यात सुधारणा केली व स्त्रियांनाही हा मार्ग उपलब्ध केला... पुढे महायान सारख्या बाबी त्यांच्या शिष्यांनी स्थापित केल्या आज दलाई लामा पुढील दलाई लामा एक स्त्री सुध्दा असु शकते असेही विधान करतात. बुद्धाने धर्म पसरावा म्हणुन लढाया केल्या नाहीत, त्यांचा मार्ग लोकांनी आपणहोऊन स्वीकारलेला मार्गच राहिला सदैव... अगदी बाबासाहेबांनी देखिल त्याचा स्वीकार केला अन सम्राट अशोकाने देखिल थोडक्यात माणसांनी मांनसांसाठी निर्माण केलेला माणसांचा धर्म हेचं त्यांचे विस्तारीत स्वरुप आहे. :) जे मानसिक क्रियांचा अभ्यासातून आत्मिक शांतता व प्रगती याची खात्री देते. जगातील कोणत्याही धर्म, लिंग विचारसरणी असणाऱ्या व्यक्तीने आत्मिक शांतता व आत्मिक प्रगती यासाठी तूर्त जो मार्ग तो वापरत आहे जितका वेळ त्यासाठी देत आहे त्याच्या एक टक्का वेळजरी त्याच्या मूळ श्रध्दा न सोडता बुध्दाने सांगीतलेल्या क्रियांचा अभ्यास केला तर मिळणारी आत्मिक लाभ हे काईकपट आहेत हे याचे रेफरन्स आजूबाजूला, जालावर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतः अनुसरून मिळू शकतात
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Mon, 08/09/2021 - 02:17

In reply to बुध्दाने मार्ग दिला by गॉडजिला

Permalink

माणसांनी माणसांसाठी निर्माण केलेला माणसांचा धर्म ?

गॉडझिला,
थोडक्यात माणसांनी मांनसांसाठी निर्माण केलेला माणसांचा धर्म हेचं त्यांचे विस्तारीत स्वरुप आहे. :) जे मानसिक क्रियांचा अभ्यासातून आत्मिक शांतता व प्रगती याची खात्री देते.
हे नक्की कुठे लिहिलंय? की तुमचं मत आहे? काहीही का असेना, हे जर खरं असेल तर बौद्ध हा पारंपारिक हिंदू धर्माचं अंग बनून जातो. त्याला वेगळा दाखवायचा खटाटोप कशासाठी? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Mon, 08/09/2021 - 05:30

In reply to माणसांनी माणसांसाठी निर्माण केलेला माणसांचा धर्म ? by गामा पैलवान

Permalink

उगाचच बुधः धर्मीयांशी वाद

गा पै , अहो मुळात धर्म असले नसेल काय फरक पडतो... आता त्यावर चर्चा करून ? बुद्ध धर्म आज एक मोठा धर्म आहे, हिंदूंचं जवळची विचारसरणी ह्यातील हिंदूंचाच फायदा बघा ना ! २ अब्राहमीक धर्म हिंदूंना आणि बुद्धांना गिळल्यालं बसेल आहेत ते जास्त गंभीर आहे .. यावर जास्त विचार व्हावा असे वाटते , उगाचच बुधः धर्मीयांशी वाद कशाला घालताय पूर्व आशियात बरेचदा मला असा अनुभव आला कि वरकरणी ख्रिस्त नावे धरण करणारे चिनी वंशाचे मलेशियन किंवा सिंगापोर चे नागरिक मुळात बुद्ध असतात आणि जेवहा मी त्यांना मी हिंदू हे सांगतो तेव्हा एक प्रकारचे कुतूहल आणि आदराची भावना असते ... सामूहिक शत्रू कोण याची नकळत उच्चारणी होते !
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Mon, 08/09/2021 - 14:06

In reply to माणसांनी माणसांसाठी निर्माण केलेला माणसांचा धर्म ? by गामा पैलवान

Permalink

तर बौद्ध हा पारंपारिक हिंदू

तर बौद्ध हा पारंपारिक हिंदू धर्माचं अंग बनून जातो. त्याला वेगळा दाखवायचा खटाटोप कशासाठी?
गा.पै., मुळात बौद्धधर्म असा काही धर्म नाही त्यामुळे तो हिंदू धर्माचं१ अंग असणं किंवा नसणं ह्याला काही अर्थ नाही. वेगळेपणाबद्दल बोलायचंच झालं तर, बुद्धाने त्याच्या शिकवणूकीतून समतेचा पुरस्कार केला, सर्व माणसे सारखी आणि समान! हिंदूधर्मातल्या स्मृतींमधल्या 'जन्माधारित वर्णव्यवस्थेच्या' अगदी वेगळी शिकवणूक होती ती. इथे बुद्धाच एक वेगळेपण दिसतं. आ.न., - (अधार्मिक) सोकजी -------------------------------------------------------------------------------------- १ हिंदू धर्मासाठी धर्मग्रंथाऐवजी स्मृती, ही सोय म्हणून वापरण्याचा प्रयत्न आवडला :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुमित्रा on Mon, 08/09/2021 - 03:40

In reply to बौद्ध हा रूढ अर्थाने धर्म नाही by गामा पैलवान

Permalink

त्रिपीटका, पंचशील

" सर्वसामान्य लोकांना आचरता येईल असं काहीही नव्हतं." - What??????!!!!! गा.पै., तुम्ही कोणी बौद्ध ओळखीचे असतील, त्यांच्या घरी किंवा बाहेर एखाद्या कार्यक्रमाला गेला असाल तेव्हा दर वेळेस त्रिसरण, पंचशील ऐकले असतील ना? पंचशील commoners साठी beginner's manual type आहे : "१.मी जीवहत्या करणार नाही, २.चोरी करणार नाही, ३.व्यभिचार करणार नाही, ४.खोटं बोलणार नाही, ५.मादक पदार्थांचं सेवन करणार नाही " हे सगळं अकुसल कम्म, ज्याला हिंदू परिभाषेत पाप म्हणतात, त्यापासून दूर रहाण्यासाठी. नंतर कुसलकम्म, (पुण्य मिळवून देणारी कामं) , त्यांची खूप सारी सुत्त ( हिंदूंमध्ये ज्याला प्रार्थना म्हणतात) आहेत. हे सगळी सुत्त सुद्धा to the point, precise आहेत. भाषांतर वाचलं की कुसलकम्म कोणकोणती आहे पटकन कळतं. ज्यांना कुतुहल आहे त्यांनी मंगलसुत्त /mangalasutta google search करून बघावं. "बौद्ध हे विशेषण भिख्खु, श्रमण, इत्यादींना लावण्यासाठी आहे. गृहस्थी माणूस बौद्ध नसतो" - गृहस्थी माणूस बौद्ध असतो. गृहस्थांची आणि भिक्खूंची बौद्ध धम्म दीक्षा आणि पाळायचे नियम वेगवेगळे असतात. "जरी तथाकथित विद्वानांनी कितीही कंठशोष केला तरी बौद्ध हा धर्म नाही. कारण की त्यात स्मृतीच नाही" त्रिपीटका (=विनय पीटका, सुत्त पीटका, अभिधम्म पीटका) हे बुद्ध धम्माचे मुख्य ग्रंथ आहेत. तुम्ही exactly कशावरून म्हणालात की नियम नाही, स्मृती नाहीत म्हणून?
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Mon, 08/09/2021 - 07:04

In reply to त्रिपीटका, पंचशील by सुमित्रा

Permalink

+१

माहितीपूर्ण प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Mon, 08/09/2021 - 13:24

In reply to त्रिपीटका, पंचशील by सुमित्रा

Permalink

प्रतिवाद करणारा छान प्रतिसाद

प्रतिवाद करणारा छान प्रतिसाद ! @सुमित्रा, एक वेगळा लेख येऊ द्यात ह्या मतमतांतराचं खंडन करणारा. अवांतरः १९८८ साली बाळ गांगल यांनी महात्मा फुले यांच्यावर अतिशय अश्लाघ्य भाषेत २ लेख लिहिले होते. साप्ताहिक सोबतमध्ये ग.वा.बेहरे यांनी ते छापले होते. तेव्हा गांगलांच्या लेखांचे सप्रमाण खंडन करणारे लेख हरि नरके यांनी सकाळ, म.टा., लोकसत्ता आदींमधून लिहिले. हरि नरके तेंव्हा विद्यार्थीदशेत होते. लोकांकडून लेखांची प्रशंसा झाली आणि यावर पुस्तक लिहिण्याची मागणी झाली. त्यातून त्यांनी "महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन" हे पुस्तक लिहिले ! अस्सल सोने नेहमी तावून सुलाखून उजळते !
  • Log in or register to post comments

Submitted by सुमित्रा on Mon, 08/09/2021 - 16:05

In reply to प्रतिवाद करणारा छान प्रतिसाद by चौथा कोनाडा

Permalink

चौथा कोनाडा

प्रयत्न करेन. ते असं आतून यावं लागतं ना :-)
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Mon, 08/09/2021 - 21:09

In reply to चौथा कोनाडा by सुमित्रा

Permalink

येईल, येईल नक्की येईल, आणि

येईल, येईल नक्की येईल, आणि अगदी मनापासुन येईल ! कदाचित थोडा वेळ लागेल, वाचन करावं लागेल. जाणकार लोकांशी बोलावं लागेल, काही ठिकाणांना भेटी द्याव्या लागतील अन ते ही होऊन जाईल !
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Mon, 08/09/2021 - 14:39

In reply to त्रिपीटका, पंचशील by सुमित्रा

Permalink

+१

सुंदर प्रतिसाद...
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Mon, 08/09/2021 - 11:57

Permalink

प्रतिज्ञा

आंबेडकरांनी धर्म जशाच्या तसा स्विकारला नव्हता, त्यात २२ प्रतिज्ञा अ‍ॅड केलया होत्या. चर्चेत त्याचा उल्लेख नसल्यचे आश्चर्य वाटले. 1.मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 2.राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 3.मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 4.देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही. 5.गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो. 6.मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही. 7.मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. 8.मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही. 9.सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो. 10.मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. 11.मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. 12.तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन. 13.मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. 14.मी चोरी करणार नाही. 15.मी व्याभिचार करणार नाही. 16.मी खोटे बोलणार नाही. 17.मी दारू पिणार नाही. 18.ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन. 19.माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो. 20.तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. 21.आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. 22.इतःपर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 08/09/2021 - 12:51

In reply to प्रतिज्ञा by कपिलमुनी

Permalink

मुळ बुद्ध धर्मात

मुळ बुध्द धर्मात नसलेल्या गोष्टी बाबासाहेबांनी नवीन बुद्ध धर्मात निर्माण केल्या असे म्हणावे लागेल. फक्त हिंदू धर्माचे देव मानू नका असे गौतम बुद्ध ह्यांनी सांगितले नाही तर ईश्वर हा अस्तित्वात नाही.ह्या जगाचा निर्माता कोणी नाही असे सांगितले आहे. हिंदू पासून काही तरी वेगळे असावे म्हणून हिंदू देव देवता मानू नका . ईश्वर ,निर्माता न मानणारा जगातील एकमेव धर्म म्हणजे बौध्द धर्म. इसवी सन पूर्व स्थापित झालेला म्हणजे २३०० वर्ष पूर्वी. तेव्हा विज्ञान कशाला म्हणतात हे पण माहीत नसेल . लोक आदिवासी जीवन जगत असतील. बौद्ध धर्म हा विज्ञान वादी आहे म्हणजे नक्की काय हे मला अजून पण समजत नाही. चीन पासून जपान पर्यंत भले बौध्द धर्मीय असतील पण त्यांच्या प्रथा ,रीतिरिवाज वेगवेगळे आहे. एक धर्म म्हणून एक सारखी संस्कृती ,रिती रीवज असेल पाहिजेत पण तसे नाही. आणि सर्वात कळीचा प्रश्न बौध्द धर्माचा उगम भारतात झाला,चक्रवर्ती सम्राट अशोक बौध्द धर्मीय होता . असे मानले येत राजसत्ता च्या जोरावर पूर्ण देशभर बौध्द धर्मीय लोक असायला हवी होती. पण तसे घडले नाही. बाबासाहेबांनी हिंदू दलित लोकांना बौध्द धर्म दिला नसता .तर भारतात बोध्द धर्मीय लोकांची संख्या फक्त काही लाखात असती. हा धर्म इथे वाढला नाही ह्याची नक्की काय कारणे आहेत. आणि असे नसेल तर हिंदू धर्मात सांगितलेल्या कथा पण सत्य च असल्या पाहिजेत. हिंदू धर्म त्या पेक्षा पुरातन आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 08/09/2021 - 12:55

In reply to मुळ बुद्ध धर्मात by Rajesh188

Permalink

चूक सुधारून

माझ्या वरील पोस्ट मधी शेवटचा para तिसऱ्या para chya खाली असला पाहिजे होता . नजर चुकीने तो शेवटी गेला.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Mon, 08/09/2021 - 13:49

In reply to प्रतिज्ञा by कपिलमुनी

Permalink

=))

बौद्ध धर्म हा विज्ञान वादी आहे म्हणजे नक्की काय हे मला अजून पण समजत नाही.
जाऊ द्या हो, सगळं समजलच पाहिजे असं थोडीच आहे! - (विज्ञानवादी साधक) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by सुमित्रा on Mon, 08/09/2021 - 15:51

In reply to प्रतिज्ञा by कपिलमुनी

Permalink

बरोबर

विशेषतः पारमितांचा मुद्दा खूप महत्वाचा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Mon, 08/09/2021 - 12:10

Permalink

मला १३ ते १८ बऱ्याच प्रमाणात

मला १३ ते १८ बऱ्याच प्रमाणात जमताहेत असं वाटतं. :) बाकी सर्व चर्चेला पास.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 08/09/2021 - 13:11

Permalink

कृपया दोन तीन पुस्तके

वाचून चर्चा करावी.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 08/09/2021 - 14:24

Permalink

मुळात धर्म

मुळात धर्म ह्या विषयावर चर्चा करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. कोणता ही ही धर्म असू ध्या त्यांची स्थापना तीन हजार वर्षा पेक्षा जास्त पुरातन नाही. मानवाला पृथ्वी वर येवून लाखो वर्ष झाली आहेत.आणि जीवसृष्टी का करोडो आणि पृथ्वी ल अब्जो वर्ष झाली आहेत. पृथ्वी ची निर्मिती,जीव सृष्टी ची निर्मिती,माणसाची निर्मिती ह्या विषयी पुर्ण सत्य अजुन तरी कोणालाच नाहीत नाही. सर्व अंदाज आहेत. माणसाने भाषा कधी शिकली काही माहीत नाही माणूस बोलायला कधी लागला. काही माहीत नाही सर्व जीव सृष्टी मध्ये माणूस वेगळा ,बुध्दी मन का. काही माहीत नाही. माणूस हा पृथ्वी वर निर्माण च झाला नाही ही शक्यता खूप जास्त आहे. जंगलात राहताना स्वा अस्तित्व साठी टोळ्या, थोडे प्रगत झाल्यावर स्व अस्तित्व टिकवण्यासाठी समूह. हे बाकी प्राणी मात्रार्त पण आहे. आणि वर्चस्व टिकवण्यासाठी एक समान समाज आणि नंतर धर्म. हीच चढती कमान आहे. मानवी जीवन सुखी होण्यासाठी च दोन अडीच वर्ष पूर्वी थोडे समजदार झाल्यावर लिखाण झाले ते म्हणजे धर्म ग्रंथ. प्राणी हत्या अमान्य. मनुष्य हत्या अमान्य . चोरी करणे अमान्य . खोटे बोलणे. अमान्य. हिंसा अमान्य . व्यसन अमान्य. ही समान तत्व सर्व धर्मात आहेत. कारण दोन किंवा तीन हजार वर्षापूर्वी . वरील गोष्टीचं मानव जातीचा विनाश करण्यास कारणीभुत ठरल्या असत्या. आता कोणतेही धर्माचे पालन करते असू ध्या. धर्मांनी सांगितलेल्या कोणत्याच चांगल्या गोष्टी पाळत नाहीत . फक्त द्वेष करण्यासाठी च धर्म वापरला जातो. बुद्ध धर्म विज्ञान वादी आहे भारतीय बौध्द धर्मीय सांगतात . पण भारतीय बौद्ध खऱ्या आयुष्यात बिलकुल तसे नाहीत. कोणत्याच संशोधनात त्यांचे कोणतेच स्थान नाही. चीन ,जपान चा आधार घेणे चुकीचे आहे. चीन ,जपान चा बौध्द धर्म वेगळा आहे. भारतीय बौद्ध धर्मीय लोकांनी फक्त हिंदू देव देवतांची पूजा करू नये हेच एकमेव वाक्य लक्षात ठेवले आहे. बाकी बुद्धांनी दिलेल्या शिकवणी शी त्यांचे काही देणेघणे नाही.. स्पष्ट लिहल्या बद्द्ल क्षमस्व पण हीच अवस्था आहे. आणि बाकी धर्मीय लोकांची पण काही वेगळी अवस्था नाही. धर्म त्याची शिकवण कधीच बुडाली आहे. आता फक्त वर्चस्वाला का किंमत आहे. जसे जंगलात वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्राणी टोळ्या निर्माण करून हिंसा करतात. हीच तुलना योग्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुमित्रा on Mon, 08/09/2021 - 15:48

In reply to मुळात धर्म by Rajesh188

Permalink

You are getting personal

You are making personal remarks about भारतीय बौद्ध समाज. Not good. Hating people in wholesale because of their clan/creed/gender/race is not good :-)
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 08/09/2021 - 15:58

In reply to You are getting personal by सुमित्रा

Permalink

सुमित्रा

मी आता अस्तित्वात असलेल्या सर्च धर्मा विषयी लिहले आहे कोणत्या एका धर्मा विषयी नाही. कृपया माझी पोस्ट नीट वाचावी.
  • Log in or register to post comments

Submitted by गुल्लू दादा on Mon, 08/09/2021 - 20:19

In reply to मुळात धर्म by Rajesh188

Permalink

राजेश

लोक कसे वागतात हा तुमचा दृष्टीकोन झाला. सगळ्या धर्मात सापडतात असले नग. इथे धर्माची शिकवण काय आहे हे महत्वाचे आहे. लोक आचरणात आणतात की नाही हा वैयक्तिक प्रश्न झाला. बौद्ध धर्माची शिकवण खूप उच्च आहे. समानता आहे, भेद नाहीत, अंधश्रद्धा, भोंदूगिरी याला थारा नाही अजून काय हवंय? तुम्ही जे वर सरसकटीकरण केलंय ते योग्य नाही. या प्रतिसादाने तुमचे मतपरिवर्तन करण्याचा अजिबात मानस नाही पण थोडा तरी विचार करून तुम्ही प्रतिसाद द्यावा असे वाटते. दुसऱ्यांचा आदर केल्याने आपला पण होतं असतो. बाकी तुम्ही तुमच्या मनाचे राजे आहातच.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 08/09/2021 - 14:44

Permalink

ह्या जगाचा कोणी निर्माता नाही

हे वाक्य च विज्ञाना च्या व्याख्येत बसत नाही. निर्माता नाही हे सिद्ध करा सर्व शंका दूर करा. आणि नंतर दावे करा. अजुन पर्यंत १,टक्का पण माहिती विश्व निर्मिती विषयी माणसाला माहीत नाही. माणूस म्हणजे तरी कोण एक प्राणी त्याचा मेंदू तो पण निसर्गाने च दिला आहे . तो भव्य दिव्य कधीच शोधून काढू शकणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Mon, 08/09/2021 - 16:01

In reply to ह्या जगाचा कोणी निर्माता नाही by Rajesh188

Permalink

असो, परीक्षा आता जवळ आलीय...

उतारा पूर्ण केला का ? की दिवाळी आधीच सुट्टी मिळाली म्हणून टाईमपास चालू आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by उन्मेष दिक्षीत on Mon, 08/09/2021 - 17:27

In reply to ह्या जगाचा कोणी निर्माता नाही by Rajesh188

Permalink

>> माणूस म्हणजे तरी कोण एक प्राणी त्याचा मेंदू तो

>>पण निसर्गाने च दिला अहो मग त्याच मेंदूने निर्माता शोधला असावा , भव्य दिव्य कधीच शोधून काढू शकत नाही म्हणून त्याने निर्मात्याची कल्पना केली असावी असं वाटत नाही का ?
  • Log in or register to post comments

Submitted by सुमित्रा on Mon, 08/09/2021 - 16:35

Permalink

rajesh188 आपणही आपली पोस्ट नीट वाचावी

rajesh188 तुमच्या पोस्ट मध्ये "पण भारतीय बौद्ध खऱ्या आयुष्यात बिलकुल तसे नाहीत. कोणत्याच संशोधनात त्यांचे कोणतेच स्थान नाही." "भारतीय बौद्ध धर्मीय लोकांनी फक्त हिंदू देव देवतांची पूजा करू नये हेच एकमेव वाक्य लक्षात ठेवले आहे. बाकी बुद्धांनी दिलेल्या शिकवणी शी त्यांचे काही देणेघणे नाही.." तुम्हीच लिहिलंय ना? ह्याला personal remark म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 08/09/2021 - 17:25

In reply to rajesh188 आपणही आपली पोस्ट नीट वाचावी by सुमित्रा

Permalink

त्या महान व्यक्तीला

त्या महान व्यक्तीला गांभिर्याने घेऊ नका. मी ते नाव दिसले की लगेच प्रतिसाद न वाचता पुढे स्क्रोल करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सुमित्रा on Wed, 08/18/2021 - 02:44

In reply to त्या महान व्यक्तीला by श्रीगुरुजी

Permalink

श्रीगुरूजी सांगितल्याबद्दल धन्यवाद, यापुढे तसेच करण्यात येईल :-)

हतबुद्ध करून सोडतात त्यांचे रिप्लाय :D
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Wed, 08/11/2021 - 06:24

In reply to rajesh188 आपणही आपली पोस्ट नीट वाचावी by सुमित्रा

Permalink

personal remark???

मी राजेश यांचे बरेच प्रतिसाद मनावर घेत नाही परंतु त्यांनी वरील जो प्रतिसाद दिलाय त्यात काही विचार कारण्यासारखेच मुद्दे आहेत असे वाटते सुमित्रजी आपण म्हणता कि त्यांनी सरसकटीकरण केलाय ... तसे हे करू नये हे तत्व म्हणून जरी योग्य असले तरी एकूण प्रत्यक्षात काय घडतंय त्यावर प्रकाश टाकणे हा हेतू असावा असे त्यांच्या या वाक्यातून वाटते ते वाक्य म्हणजे ""भारतीय बौद्ध धर्मीय लोकांनी फक्त हिंदू देव देवतांची पूजा करू नये हेच एकमेव वाक्य लक्षात ठेवले आहे." एक संदर्भ देतो भाऊ कदम या प्रसिद्ध कलाकारावर तो गणपती साजरा करतो म्हणून केली गेलेली टीका आठवा... चहू बाजूने हिंदूंच्या चालीरीती असतांना जर अगदी ख्रिस्ती भारतीयांवर // पारशानयानवर त्याचा परिणाम होतो नव बुद्ध न वर झाला तर त्यात अशचर्य ते काय? पण ते काहींना आवडले नाही याचे कारण हे असावे हे जर समजले ... तर मग हे लक्षात येईल कि अशी तेढ अजून का आहे - बुद्धीकरण हे मुळातच महाराष्टरात एक निषेध या कारणाने झाले - भाऊ सारखान्याची ओढाताण अशी होत असणार कि एकीकडे त्यांचे हधर्मगुरू / राजकारणी सांगणार कि हिंदूचे काह्ही घेऊ नका आणि दुसरीकडे वर्षानूवरचाई परंपरा एकदम सोदाणे हि अवघड मुळात अनेक दलितांनी हिंदू धर्म सोडून बुद्ध धर्म स्वीकारलं तो त्या सगळ्यांना अगदी एकदम उपरती झाली एकदम कि बुद्ध धर्म किती चांगला असे समजणे चुकीचे ठरेल , धर्मांतर झाले ते बुद्धिमान पुढारी / नेता ( आंबेडकर) यांनी केलं म्हणून अँड वरील म्हणण्याप्रमाणे एक निषेध म्हणून उत्तम बुद्ध धर्म पालन करण्यासाठी हिंदूंशी भांडण केलेच पाहिजे असे नाही ... तसे असते तर सगळं थाई किंवा जपानी समाज हिंदूंशी भांडत असता महाराष्ट्रात जे चालते त्याला इतर ऐतिहासिक संधर्भ आहेत म्हणून असे सरसार्क्टिकारण दोन्ही बाजूने होते असे मला वाटते
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 08/09/2021 - 16:56

Permalink

लेखक काय म्हणतात

त्यावर चर्चा करावी. मी एका बौद्ध धर्मियांच्या लग्नाला गेलो होतो. कोणतीही हिंदु विधि नव्हती.
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Mon, 08/09/2021 - 18:45

Permalink

बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध

बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा जर तात्कालिक परिस्थितीवरचा एक उपाय असेल तर पुढे काही वर्षांनी बाबासाहेबांचे अनुयायी पुन्हा आपल्या मूळ धर्माकडे, पंथाकडे वळतील का ?
हे काही नीट समजले नाही बुवा. 'तात्कालिक' परिस्थिती कोणती ? आणि मूळ पंथात/धर्मात परत जाण्यात फायदे काय? का जातील ? (Assuming पंथात परत जाणे चा अर्थ स्वतःचा टॅग "बौद्ध" काढून "मू.ध/प" असा लावणे इतकेच अपेक्षित आहे. नसल्यास काय अपेक्षित आहे स्पष्ट झाले तर बरे होईल.)
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Mon, 08/09/2021 - 18:59

Permalink

उलट प्रश्न

धर्म बदलून काय फायदा झाला?
  • Log in or register to post comments

Submitted by घोरपडे on Mon, 08/09/2021 - 20:35

Permalink

धर्म बदलून बदल होत नाही ..

प्रथम आपण काही वास्तव पाहू १) हिंदू धर्मा मध्ये कुठीही जातीचा उल्लेख नाही . २) भारतात प्रथम जातीचा उल्लेख हा मुघलांनी केला . नंतर डच , फ्रेंच , नंतर इंग्रजांनी तर जाती व्यवस्था पाडली. ३) भारतातील सर्वाधिक राजे हे मागास वर्गीयच होते आणि राजकारभार हे उच्चावर्णीय करत असत (भाषेचे आणि लिखाणाचे ज्ञान असल्यामुळे ).. त्यामुळे भारतात जातीव्यवस्था होती याला काही पुरावा नाही. वरील नुसार जात व्यवस्था हि इंग्रजांनी फोडो, तोडो आणि राज्य करो यासाठी वापरून राज्य केले, हे आता इतक्या वर्षात तरी डोक्यात फिट बसलेले असेल . पुढे इंग्रजांनी आणलेली जाती व्यवस्था काँग्रेस ने राजकारणासाठी वापरून खात पाणी घातले .. आता मूळ मुद्याकडे वळूया . १) आंबडेकर हे ज्योतीबांना गुरु मनात -- पण ज्योतीबांनी , संभाजी महाराजांन प्रमाणेच धर्म बदलला नाही -- उलट धर्मातील काही गोष्टी समकालीन योग्य नव्हत्या त्या बंद करण्यास भाग पाडले. २) आंबडेकरांना संस्कृत वाचता येत नव्हती ( हे त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे ) त्यामुळे त्यांनी कधीच मूळ हिंदूंची धर्म ग्रंथ वाचले नाही -- त्यामुळे त्याना हिंदू धर्मा बद्दल काही ज्ञात नव्हते . ३) जसे सचिन ने फक्त क्रिकेट बद्दल बोलावे पण राजकानाबद्दल नको -- कि जे सचिन करतो , पण आंबडेकरांनी नेमकी तीच चूक केली आणि समस्त समाजाला पुन्हा एकदा संकटात टाकून निघून गेले . ४) पूढचा प्रश्न असा आहे कि - लोकांनी धर्म बदलून प्रगती केली आहे का ? याचे वास्तव उत्तर नाही असे आहे .. ५० वर्षांपूर्वी समस्त समाजाची जी परिस्थिती होती तीच आज आहे ( काला पर्यतवे बदल सोडले तर - जसे कि सर्व जण मोबाईल वापरतात ). ५) जसे काही हिंदू धर्मातील कनिष्ट लोकांनी ख्रिचन धर्म स्वीकारला - पण त्यांना अद्याप ख्रिश्चनांच्या मूळ चर्चमध्ये प्रवेश दिला जात नाही , तसाच नवं बौद्धांचे हि आहे .. त्यांना मूळ बौद्ध काही ठिकाणी प्रवेश नाकारतात . ६) त्यामुळे धर्म बदलून पण मूळ प्रश्न हे तसेच राहतात -- उदा . माझ्या गावातील काही कनिष्ठ लोकांनी ६० वर्षापुर्णी ख्रिचन धर्म स्वीकारला पण त्याची परिथिस्ती अजून पण बदलली नाही ,उलट SC च्या कोट्यातील सर्व सुविधा वापरून मूळ SC लोकांना प्रॉब्लेम केला आहे .ह्या लोकांचे आणि आमचे घनिस्ट संबंध आहेत ..पण हल्ली हे लोक रविवारी उपास करू लागलेत हे पाहून मला त्यांची किंवा यायला लागली आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Mon, 08/09/2021 - 20:37

In reply to धर्म बदलून बदल होत नाही .. by घोरपडे

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Tue, 08/10/2021 - 04:02

In reply to धर्म बदलून बदल होत नाही .. by घोरपडे

Permalink

:)

१८८ ला आजकाल जबरदस्त काँपेटीशन मिळते आहे ..
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Tue, 08/10/2021 - 06:46

In reply to धर्म बदलून बदल होत नाही .. by घोरपडे

Permalink

आज बऱयाच दिवसांनंतर खळखळून

आज बऱयाच दिवसांनंतर खळखळून हसलो. खुप मनोरंजन झालं! - (हसून हसून ठार झालेला) सोकाजी एक वैधानिक इशारा: उच्च प्रतीचा असला तरीही गांजासेवन शरीराला अपायकारक असतं!
  • Log in or register to post comments

Submitted by रावसाहेब चिंगभूतकर on Tue, 08/10/2021 - 18:38

In reply to धर्म बदलून बदल होत नाही .. by घोरपडे

Permalink

आंबडेकरांना संस्कृत वाचता येत

आंबडेकरांना संस्कृत वाचता येत नव्हती
आंबेडकरांना ज्या भाषा येत होत्या त्यात संस्कृत सुद्धा होती.
समस्त समाजाला पुन्हा एकदा संकटात टाकून निघून गेले
यात त्यांची चूक आहे असं वाटत नाही. नवबौद्ध हे हिंदू दलितांपेक्षा जास्त चांगल्या स्थितीत आहेत. पण त्यांचा राजकीय उत्कर्ष झाला नाही. हे होणारच होतं. नेता महान असला तरी पाठीराखे तितके हुशार, चतुर असतीलच असं नाही. किंबहुना तसे ते नसतातच.
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Wed, 08/11/2021 - 00:09

In reply to धर्म बदलून बदल होत नाही .. by घोरपडे

Permalink

> २) आंबडेकरांना संस्कृत

> २) आंबडेकरांना संस्कृत वाचता येत नव्हती ( हे त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे ) त्यामुळे त्यांनी कधीच मूळ हिंदूंची धर्म ग्रंथ वाचले नाही -- त्यामुळे त्याना हिंदू धर्मा बद्दल काही ज्ञात नव्हते . आंबेडकरांना संस्कृत येत नव्हती आणि त्यामुळे त्यांना हिंदू धर्माबद्दल ज्ञान नव्हते तर मिसळपाव वरील विद्वानांनी अष्टाध्यायी कोळून प्याली आहे का ? आपणाला किती संस्कृत येते आणि आपण किती वेदाभ्यास केला आहे. आपल्या तर्काप्रमाणे बहुतेक भारतीयांना हिंदू धर्माचे ज्ञान नाही. हिंदू धर्म इस्लाम प्रमाणे पोथीनिष्ठ नाही त्यामुळे त्यांच्या पुस्तकांत काय आहे ह्यापेक्षा कुलाचार, परंपरा इत्यादींवरून धर्म म्हणजे काय हे ठरते. इतक्या महान हिंदू धर्मांत मुघल सारख्या मागासलेल्या लोकांनी "जात" घुसडली आणि मूर्ख हिंदूंना त्याचा प्रतिकार करता आला नाही. ? माझ्या मते जात ह्या विषयावर हिंदू समाज विनाकारण डिफेन्सिव्ह होत आहे. > ४) पूढचा प्रश्न असा आहे कि - लोकांनी धर्म बदलून प्रगती केली आहे का ? सहमत आहे. नवबौद्ध मंडळींच्या जीवनात विशेष मोठा बदल घडून आला आहे असे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 08/18/2021 - 22:14

In reply to धर्म बदलून बदल होत नाही .. by घोरपडे

Permalink

भारत देशात संस्कृत ही

भारत देशात संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते असे वाचल्याचे आठवते यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकेल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Wed, 08/18/2021 - 22:50

In reply to भारत देशात संस्कृत ही by चौथा कोनाडा

Permalink

राष्ट्र भाषा

राष्ट्र भाषा म्हणजे सर्व सरकारी व्याहार त्या भाषेतून होणार. सरकारी कामकाज,सरकारी सूचना,कोर्टाचे काम .संस्कृत भाषा चा प्रसार आणि प्रचार ब्रिटिश नी केला नाही. त्या मुळे खूप कमी लोकांना त्या भाषेचे ज्ञान होते आणि भारत हिंदू राष्ट्र व्हावे अशी आंबेडकर ह्यांची बिलकुल इच्छा नसावी हे धर्म परिवर्तन केल्या मुळे अगदी स्पष्ट आहे. फाळणी होणे हे हिंदू हिताचेच आहे हे गांधी जी किंवा बाकी काँग्रेस नेत्यांनी ओळखले होते. अतिशय उच्च बुध्दी चातुर्य वापरून तो हेतू त्यांनी साध्य केला कोणताच दोष स्वतः कडे म घेता.
  • Log in or register to post comments

Submitted by सुमित्रा on Mon, 08/09/2021 - 22:13

Permalink

घोरपडे

तुमच्या "धर्म बदलून बदल होत नाही .. " या प्रतिसादातला एकूण एक मुद्दा चुकीचा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गुल्लू दादा on Mon, 08/09/2021 - 22:55

In reply to घोरपडे by सुमित्रा

Permalink

सहमत

सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by घोरपडे on Tue, 08/10/2021 - 16:18

In reply to घोरपडे by सुमित्रा

Permalink

can you please prove it ?

can you please prove it ?
  • Log in or register to post comments

Submitted by कॉमी on Tue, 08/10/2021 - 16:41

In reply to can you please prove it ? by घोरपडे

Permalink

ऐसा कैसा चलेगा राव...

ऐसा कैसा चलेगा राव... पहिला तुम्ही प्रुव्ह करायला पाहिजे
  • Log in or register to post comments

Submitted by रावसाहेब चिंगभूतकर on Tue, 08/10/2021 - 18:33

In reply to ऐसा कैसा चलेगा राव... by कॉमी

Permalink

मी यावर शोधायचा प्रयत्न केला.

मी यावर शोधायचा प्रयत्न केला. निदान गूगल ला तरी काही सापडत नाही. पण जे कळलं त्यावरून बुद्धिझम आणि निओ बुद्धिझम या दोन वेगवेगळ्या शाखा आहेत. आंबेडकरांनी बुद्धिझम ची फक्त principles घेतली. त्यांनी तो धर्म पूर्णपणे आत्मसात केला नाही, कारण बुद्धिझम हा कर्म, निर्वाण आणि मंत्र याशी संबंधित आहे. आंबेडकरांनी तयार केलेला निओ बुद्धिझम (नवयान) हा राजकीय धर्म आहे. हा थोडक्यात सांगायचे तर मूळ बुद्धिझम पेक्षा जास्त मानवता वादी, जास्त प्रॅक्टिकल आहे. यात बुद्धिझम चा भाग असलेल्या गूढ गोष्टी नाहीत. मला आधी हाच प्रश्न होता की मूळच्या बौद्ध लोकांशी नवबौद्धांचा संघर्ष का झाला नाही. पण ते आता वाचल्यावर लक्षात आलं की नवयान हा मूळ बुद्धिझम चं एक छोटंसं, प्रॅक्टिकल, कोरडं मॉडेल आहे. मूळ बौद्धांना कदाचित त्यात इंटरेस्ट पण नसावा आणि कदाचित त्यांचा नवबौद्धांशी फारसा संपर्क ही नसावा आणि त्यामुळेच संघर्ष ही नसावा. यावर एखादे analysis असेल तर वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com