Skip to main content

महाराष्ट्रातला बौद्ध धर्म (शंका)

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 05/08/2021 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातला बौद्ध धर्म
महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्माबाबत मला काही शंका आहेत. महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जो बौद्ध धर्म फॉलो करतात तो नेमका कसा आहे ? तिबेट, चीन, जपान इथल्या बौद्ध धर्माशी त्याचा कितपत संबंध आहे ? नसेल तर तसे का ? महाराष्ट्रातले बौद्ध कुठल्या पंथाचे आहेत वज्रयान की महायान ? गौतम बुद्धांनी योग साधनेविषयी खूप चिंतन केले होते आणि ते अनुयायांना सांगितलेही होते. त्याबाबत महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मीयांचे मत काय आहे ! बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा साधनेचा, अध्यात्माचा एक मार्ग होता की राजकीय / सामाजिक विचारधारा होती. बाबासाहेबांच्या अनुयायांची बाबासाहेबांवर श्रद्धा होती म्हणून बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. बाबासाहेबांनी इतर कुठला धर्म दिला असता तर तोही अनुयायांनी स्वीकारला असता त्यामुळे लोकांना बौद्धधर्म पटला म्हणून त्यांनी तो स्वीकारला असे म्हणता येत नाही. बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा जर तात्कालिक परिस्थितीवरचा एक उपाय असेल तर पुढे काही वर्षांनी बाबासाहेबांचे अनुयायी पुन्हा आपल्या मूळ धर्माकडे, पंथाकडे वळतील का ? गौतम बुद्धांच्या किंवा अशोकाच्या काळात तो धर्म जगात सर्वत्र गेला. पण महाराष्ट्रात पोचला नाही. असे का ! गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक हे जन्माने क्षत्रिय होते का आणि राजघराण्यातले होते का , स्वतः गौतम बुद्ध हयात असताना आणि सम्राट अशोकाचे राज्य असताना महाराष्ट्रातल्या बौद्ध धर्मियांची किंवा त्यांच्या पूर्वजांची स्थिती नेमकी कशी होती ?

वाचने 44872
प्रतिक्रिया 126

प्रतिक्रिया

In reply to by कपिलमुनी

विशेषतः पारमितांचा मुद्दा खूप महत्वाचा आहे.

मुळात धर्म ह्या विषयावर चर्चा करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. कोणता ही ही धर्म असू ध्या त्यांची स्थापना तीन हजार वर्षा पेक्षा जास्त पुरातन नाही. मानवाला पृथ्वी वर येवून लाखो वर्ष झाली आहेत.आणि जीवसृष्टी का करोडो आणि पृथ्वी ल अब्जो वर्ष झाली आहेत. पृथ्वी ची निर्मिती,जीव सृष्टी ची निर्मिती,माणसाची निर्मिती ह्या विषयी पुर्ण सत्य अजुन तरी कोणालाच नाहीत नाही. सर्व अंदाज आहेत. माणसाने भाषा कधी शिकली काही माहीत नाही माणूस बोलायला कधी लागला. काही माहीत नाही सर्व जीव सृष्टी मध्ये माणूस वेगळा ,बुध्दी मन का. काही माहीत नाही. माणूस हा पृथ्वी वर निर्माण च झाला नाही ही शक्यता खूप जास्त आहे. जंगलात राहताना स्वा अस्तित्व साठी टोळ्या, थोडे प्रगत झाल्यावर स्व अस्तित्व टिकवण्यासाठी समूह. हे बाकी प्राणी मात्रार्त पण आहे. आणि वर्चस्व टिकवण्यासाठी एक समान समाज आणि नंतर धर्म. हीच चढती कमान आहे. मानवी जीवन सुखी होण्यासाठी च दोन अडीच वर्ष पूर्वी थोडे समजदार झाल्यावर लिखाण झाले ते म्हणजे धर्म ग्रंथ. प्राणी हत्या अमान्य. मनुष्य हत्या अमान्य . चोरी करणे अमान्य . खोटे बोलणे. अमान्य. हिंसा अमान्य . व्यसन अमान्य. ही समान तत्व सर्व धर्मात आहेत. कारण दोन किंवा तीन हजार वर्षापूर्वी . वरील गोष्टीचं मानव जातीचा विनाश करण्यास कारणीभुत ठरल्या असत्या. आता कोणतेही धर्माचे पालन करते असू ध्या. धर्मांनी सांगितलेल्या कोणत्याच चांगल्या गोष्टी पाळत नाहीत . फक्त द्वेष करण्यासाठी च धर्म वापरला जातो. बुद्ध धर्म विज्ञान वादी आहे भारतीय बौध्द धर्मीय सांगतात . पण भारतीय बौद्ध खऱ्या आयुष्यात बिलकुल तसे नाहीत. कोणत्याच संशोधनात त्यांचे कोणतेच स्थान नाही. चीन ,जपान चा आधार घेणे चुकीचे आहे. चीन ,जपान चा बौध्द धर्म वेगळा आहे. भारतीय बौद्ध धर्मीय लोकांनी फक्त हिंदू देव देवतांची पूजा करू नये हेच एकमेव वाक्य लक्षात ठेवले आहे. बाकी बुद्धांनी दिलेल्या शिकवणी शी त्यांचे काही देणेघणे नाही.. स्पष्ट लिहल्या बद्द्ल क्षमस्व पण हीच अवस्था आहे. आणि बाकी धर्मीय लोकांची पण काही वेगळी अवस्था नाही. धर्म त्याची शिकवण कधीच बुडाली आहे. आता फक्त वर्चस्वाला का किंमत आहे. जसे जंगलात वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्राणी टोळ्या निर्माण करून हिंसा करतात. हीच तुलना योग्य आहे.

In reply to by Rajesh188

You are making personal remarks about भारतीय बौद्ध समाज. Not good. Hating people in wholesale because of their clan/creed/gender/race is not good :-)

In reply to by सुमित्रा

मी आता अस्तित्वात असलेल्या सर्च धर्मा विषयी लिहले आहे कोणत्या एका धर्मा विषयी नाही. कृपया माझी पोस्ट नीट वाचावी.

In reply to by Rajesh188

लोक कसे वागतात हा तुमचा दृष्टीकोन झाला. सगळ्या धर्मात सापडतात असले नग. इथे धर्माची शिकवण काय आहे हे महत्वाचे आहे. लोक आचरणात आणतात की नाही हा वैयक्तिक प्रश्न झाला. बौद्ध धर्माची शिकवण खूप उच्च आहे. समानता आहे, भेद नाहीत, अंधश्रद्धा, भोंदूगिरी याला थारा नाही अजून काय हवंय? तुम्ही जे वर सरसकटीकरण केलंय ते योग्य नाही. या प्रतिसादाने तुमचे मतपरिवर्तन करण्याचा अजिबात मानस नाही पण थोडा तरी विचार करून तुम्ही प्रतिसाद द्यावा असे वाटते. दुसऱ्यांचा आदर केल्याने आपला पण होतं असतो. बाकी तुम्ही तुमच्या मनाचे राजे आहातच.

हे वाक्य च विज्ञाना च्या व्याख्येत बसत नाही. निर्माता नाही हे सिद्ध करा सर्व शंका दूर करा. आणि नंतर दावे करा. अजुन पर्यंत १,टक्का पण माहिती विश्व निर्मिती विषयी माणसाला माहीत नाही. माणूस म्हणजे तरी कोण एक प्राणी त्याचा मेंदू तो पण निसर्गाने च दिला आहे . तो भव्य दिव्य कधीच शोधून काढू शकणार नाही.

In reply to by Rajesh188

>>पण निसर्गाने च दिला अहो मग त्याच मेंदूने निर्माता शोधला असावा , भव्य दिव्य कधीच शोधून काढू शकत नाही म्हणून त्याने निर्मात्याची कल्पना केली असावी असं वाटत नाही का ?

rajesh188 तुमच्या पोस्ट मध्ये "पण भारतीय बौद्ध खऱ्या आयुष्यात बिलकुल तसे नाहीत. कोणत्याच संशोधनात त्यांचे कोणतेच स्थान नाही." "भारतीय बौद्ध धर्मीय लोकांनी फक्त हिंदू देव देवतांची पूजा करू नये हेच एकमेव वाक्य लक्षात ठेवले आहे. बाकी बुद्धांनी दिलेल्या शिकवणी शी त्यांचे काही देणेघणे नाही.." तुम्हीच लिहिलंय ना? ह्याला personal remark म्हणतात.

In reply to by सुमित्रा

त्या महान व्यक्तीला गांभिर्याने घेऊ नका. मी ते नाव दिसले की लगेच प्रतिसाद न वाचता पुढे स्क्रोल करतो.

In reply to by सुमित्रा

मी राजेश यांचे बरेच प्रतिसाद मनावर घेत नाही परंतु त्यांनी वरील जो प्रतिसाद दिलाय त्यात काही विचार कारण्यासारखेच मुद्दे आहेत असे वाटते सुमित्रजी आपण म्हणता कि त्यांनी सरसकटीकरण केलाय ... तसे हे करू नये हे तत्व म्हणून जरी योग्य असले तरी एकूण प्रत्यक्षात काय घडतंय त्यावर प्रकाश टाकणे हा हेतू असावा असे त्यांच्या या वाक्यातून वाटते ते वाक्य म्हणजे ""भारतीय बौद्ध धर्मीय लोकांनी फक्त हिंदू देव देवतांची पूजा करू नये हेच एकमेव वाक्य लक्षात ठेवले आहे." एक संदर्भ देतो भाऊ कदम या प्रसिद्ध कलाकारावर तो गणपती साजरा करतो म्हणून केली गेलेली टीका आठवा... चहू बाजूने हिंदूंच्या चालीरीती असतांना जर अगदी ख्रिस्ती भारतीयांवर // पारशानयानवर त्याचा परिणाम होतो नव बुद्ध न वर झाला तर त्यात अशचर्य ते काय? पण ते काहींना आवडले नाही याचे कारण हे असावे हे जर समजले ... तर मग हे लक्षात येईल कि अशी तेढ अजून का आहे - बुद्धीकरण हे मुळातच महाराष्टरात एक निषेध या कारणाने झाले - भाऊ सारखान्याची ओढाताण अशी होत असणार कि एकीकडे त्यांचे हधर्मगुरू / राजकारणी सांगणार कि हिंदूचे काह्ही घेऊ नका आणि दुसरीकडे वर्षानूवरचाई परंपरा एकदम सोदाणे हि अवघड मुळात अनेक दलितांनी हिंदू धर्म सोडून बुद्ध धर्म स्वीकारलं तो त्या सगळ्यांना अगदी एकदम उपरती झाली एकदम कि बुद्ध धर्म किती चांगला असे समजणे चुकीचे ठरेल , धर्मांतर झाले ते बुद्धिमान पुढारी / नेता ( आंबेडकर) यांनी केलं म्हणून अँड वरील म्हणण्याप्रमाणे एक निषेध म्हणून उत्तम बुद्ध धर्म पालन करण्यासाठी हिंदूंशी भांडण केलेच पाहिजे असे नाही ... तसे असते तर सगळं थाई किंवा जपानी समाज हिंदूंशी भांडत असता महाराष्ट्रात जे चालते त्याला इतर ऐतिहासिक संधर्भ आहेत म्हणून असे सरसार्क्टिकारण दोन्ही बाजूने होते असे मला वाटते

त्यावर चर्चा करावी. मी एका बौद्ध धर्मियांच्या लग्नाला गेलो होतो. कोणतीही हिंदु विधि नव्हती.

बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा जर तात्कालिक परिस्थितीवरचा एक उपाय असेल तर पुढे काही वर्षांनी बाबासाहेबांचे अनुयायी पुन्हा आपल्या मूळ धर्माकडे, पंथाकडे वळतील का ?
हे काही नीट समजले नाही बुवा. 'तात्कालिक' परिस्थिती कोणती ? आणि मूळ पंथात/धर्मात परत जाण्यात फायदे काय? का जातील ? (Assuming पंथात परत जाणे चा अर्थ स्वतःचा टॅग "बौद्ध" काढून "मू.ध/प" असा लावणे इतकेच अपेक्षित आहे. नसल्यास काय अपेक्षित आहे स्पष्ट झाले तर बरे होईल.)

प्रथम आपण काही वास्तव पाहू १) हिंदू धर्मा मध्ये कुठीही जातीचा उल्लेख नाही . २) भारतात प्रथम जातीचा उल्लेख हा मुघलांनी केला . नंतर डच , फ्रेंच , नंतर इंग्रजांनी तर जाती व्यवस्था पाडली. ३) भारतातील सर्वाधिक राजे हे मागास वर्गीयच होते आणि राजकारभार हे उच्चावर्णीय करत असत (भाषेचे आणि लिखाणाचे ज्ञान असल्यामुळे ).. त्यामुळे भारतात जातीव्यवस्था होती याला काही पुरावा नाही. वरील नुसार जात व्यवस्था हि इंग्रजांनी फोडो, तोडो आणि राज्य करो यासाठी वापरून राज्य केले, हे आता इतक्या वर्षात तरी डोक्यात फिट बसलेले असेल . पुढे इंग्रजांनी आणलेली जाती व्यवस्था काँग्रेस ने राजकारणासाठी वापरून खात पाणी घातले .. आता मूळ मुद्याकडे वळूया . १) आंबडेकर हे ज्योतीबांना गुरु मनात -- पण ज्योतीबांनी , संभाजी महाराजांन प्रमाणेच धर्म बदलला नाही -- उलट धर्मातील काही गोष्टी समकालीन योग्य नव्हत्या त्या बंद करण्यास भाग पाडले. २) आंबडेकरांना संस्कृत वाचता येत नव्हती ( हे त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे ) त्यामुळे त्यांनी कधीच मूळ हिंदूंची धर्म ग्रंथ वाचले नाही -- त्यामुळे त्याना हिंदू धर्मा बद्दल काही ज्ञात नव्हते . ३) जसे सचिन ने फक्त क्रिकेट बद्दल बोलावे पण राजकानाबद्दल नको -- कि जे सचिन करतो , पण आंबडेकरांनी नेमकी तीच चूक केली आणि समस्त समाजाला पुन्हा एकदा संकटात टाकून निघून गेले . ४) पूढचा प्रश्न असा आहे कि - लोकांनी धर्म बदलून प्रगती केली आहे का ? याचे वास्तव उत्तर नाही असे आहे .. ५० वर्षांपूर्वी समस्त समाजाची जी परिस्थिती होती तीच आज आहे ( काला पर्यतवे बदल सोडले तर - जसे कि सर्व जण मोबाईल वापरतात ). ५) जसे काही हिंदू धर्मातील कनिष्ट लोकांनी ख्रिचन धर्म स्वीकारला - पण त्यांना अद्याप ख्रिश्चनांच्या मूळ चर्चमध्ये प्रवेश दिला जात नाही , तसाच नवं बौद्धांचे हि आहे .. त्यांना मूळ बौद्ध काही ठिकाणी प्रवेश नाकारतात . ६) त्यामुळे धर्म बदलून पण मूळ प्रश्न हे तसेच राहतात -- उदा . माझ्या गावातील काही कनिष्ठ लोकांनी ६० वर्षापुर्णी ख्रिचन धर्म स्वीकारला पण त्याची परिथिस्ती अजून पण बदलली नाही ,उलट SC च्या कोट्यातील सर्व सुविधा वापरून मूळ SC लोकांना प्रॉब्लेम केला आहे .ह्या लोकांचे आणि आमचे घनिस्ट संबंध आहेत ..पण हल्ली हे लोक रविवारी उपास करू लागलेत हे पाहून मला त्यांची किंवा यायला लागली आहे .

In reply to by घोरपडे

आज बऱयाच दिवसांनंतर खळखळून हसलो. खुप मनोरंजन झालं! - (हसून हसून ठार झालेला) सोकाजी एक वैधानिक इशारा: उच्च प्रतीचा असला तरीही गांजासेवन शरीराला अपायकारक असतं!

In reply to by घोरपडे

आंबडेकरांना संस्कृत वाचता येत नव्हती
आंबेडकरांना ज्या भाषा येत होत्या त्यात संस्कृत सुद्धा होती.
समस्त समाजाला पुन्हा एकदा संकटात टाकून निघून गेले
यात त्यांची चूक आहे असं वाटत नाही. नवबौद्ध हे हिंदू दलितांपेक्षा जास्त चांगल्या स्थितीत आहेत. पण त्यांचा राजकीय उत्कर्ष झाला नाही. हे होणारच होतं. नेता महान असला तरी पाठीराखे तितके हुशार, चतुर असतीलच असं नाही. किंबहुना तसे ते नसतातच.

In reply to by घोरपडे

> २) आंबडेकरांना संस्कृत वाचता येत नव्हती ( हे त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे ) त्यामुळे त्यांनी कधीच मूळ हिंदूंची धर्म ग्रंथ वाचले नाही -- त्यामुळे त्याना हिंदू धर्मा बद्दल काही ज्ञात नव्हते . आंबेडकरांना संस्कृत येत नव्हती आणि त्यामुळे त्यांना हिंदू धर्माबद्दल ज्ञान नव्हते तर मिसळपाव वरील विद्वानांनी अष्टाध्यायी कोळून प्याली आहे का ? आपणाला किती संस्कृत येते आणि आपण किती वेदाभ्यास केला आहे. आपल्या तर्काप्रमाणे बहुतेक भारतीयांना हिंदू धर्माचे ज्ञान नाही. हिंदू धर्म इस्लाम प्रमाणे पोथीनिष्ठ नाही त्यामुळे त्यांच्या पुस्तकांत काय आहे ह्यापेक्षा कुलाचार, परंपरा इत्यादींवरून धर्म म्हणजे काय हे ठरते. इतक्या महान हिंदू धर्मांत मुघल सारख्या मागासलेल्या लोकांनी "जात" घुसडली आणि मूर्ख हिंदूंना त्याचा प्रतिकार करता आला नाही. ? माझ्या मते जात ह्या विषयावर हिंदू समाज विनाकारण डिफेन्सिव्ह होत आहे. > ४) पूढचा प्रश्न असा आहे कि - लोकांनी धर्म बदलून प्रगती केली आहे का ? सहमत आहे. नवबौद्ध मंडळींच्या जीवनात विशेष मोठा बदल घडून आला आहे असे नाही.

In reply to by घोरपडे

भारत देशात संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते असे वाचल्याचे आठवते यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकेल का ?

In reply to by चौथा कोनाडा

राष्ट्र भाषा म्हणजे सर्व सरकारी व्याहार त्या भाषेतून होणार. सरकारी कामकाज,सरकारी सूचना,कोर्टाचे काम .संस्कृत भाषा चा प्रसार आणि प्रचार ब्रिटिश नी केला नाही. त्या मुळे खूप कमी लोकांना त्या भाषेचे ज्ञान होते आणि भारत हिंदू राष्ट्र व्हावे अशी आंबेडकर ह्यांची बिलकुल इच्छा नसावी हे धर्म परिवर्तन केल्या मुळे अगदी स्पष्ट आहे. फाळणी होणे हे हिंदू हिताचेच आहे हे गांधी जी किंवा बाकी काँग्रेस नेत्यांनी ओळखले होते. अतिशय उच्च बुध्दी चातुर्य वापरून तो हेतू त्यांनी साध्य केला कोणताच दोष स्वतः कडे म घेता.

तुमच्या "धर्म बदलून बदल होत नाही .. " या प्रतिसादातला एकूण एक मुद्दा चुकीचा आहे.

In reply to by कॉमी

मी यावर शोधायचा प्रयत्न केला. निदान गूगल ला तरी काही सापडत नाही. पण जे कळलं त्यावरून बुद्धिझम आणि निओ बुद्धिझम या दोन वेगवेगळ्या शाखा आहेत. आंबेडकरांनी बुद्धिझम ची फक्त principles घेतली. त्यांनी तो धर्म पूर्णपणे आत्मसात केला नाही, कारण बुद्धिझम हा कर्म, निर्वाण आणि मंत्र याशी संबंधित आहे. आंबेडकरांनी तयार केलेला निओ बुद्धिझम (नवयान) हा राजकीय धर्म आहे. हा थोडक्यात सांगायचे तर मूळ बुद्धिझम पेक्षा जास्त मानवता वादी, जास्त प्रॅक्टिकल आहे. यात बुद्धिझम चा भाग असलेल्या गूढ गोष्टी नाहीत. मला आधी हाच प्रश्न होता की मूळच्या बौद्ध लोकांशी नवबौद्धांचा संघर्ष का झाला नाही. पण ते आता वाचल्यावर लक्षात आलं की नवयान हा मूळ बुद्धिझम चं एक छोटंसं, प्रॅक्टिकल, कोरडं मॉडेल आहे. मूळ बौद्धांना कदाचित त्यात इंटरेस्ट पण नसावा आणि कदाचित त्यांचा नवबौद्धांशी फारसा संपर्क ही नसावा आणि त्यामुळेच संघर्ष ही नसावा. यावर एखादे analysis असेल तर वाचायला आवडेल.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

फक्त एवढंच म्हणेन की निओ बुद्धिझम आणि त्रिपिटकांमधला बुद्धिझम खूप जास्त वेगळा नाहीये. मी तिबेट्/थाई (मूळ बौद्ध) यांच्या बुद्धिझमशी थोडी परीचित आहे . मूळ तत्त्वज्ञानाचा उगम सगळ्यांचा सारखा असल्यामुळे सन्घर्ष झाला नसावा. वेगळेपणा तुम्हाला कशात दिसेल तर तो पूजा/वंदना/भक्ती express करायच्या पद्धतीमध्ये. सुत्तपठणाच्या चालींमध्ये. असं माझं आत्तपर्यंतचं निरीक्षण आहे. (म्हणजे explicitly अभ्यास नाही केलेला. ) "आंबेडकरांनी बुद्धिझम ची फक्त principles घेतली....." - मी Buddha and His Dhamma सगळ्यात आधी वाचलं आणि नंतर वेस्टर्नांनी लिहिलेली त्रिपिटकांची इंग्लिश भाषांतरं वाचली. म्हणजे अजून दोनच वाचली आहेत. तिसरं सुरू आहे. (तसं माझं वाचन आणि अभ्यास खूप प्रचंड नसला तरीही काही गोष्टी ठामपणे सांगू शकते, कारण सगळ्या त्रिपिटकांमध्ये खूप सुसूत्रता आहे. ) एकंदरीत असं वाटलं की Buddha and His Dhamma म्हणजे त्रिपिटकांचा अगदी अगदी अर्क आहे. ते वाचून, आंबेडकरांनी एका आयुष्यात किती किती पायाभूत आणि प्रचंड मोठी कामं केली आहेत, हे पुन्हा एकदा लक्ष्यात आलं. "यात बुद्धिझम चा भाग असलेल्या गूढ गोष्टी नाहीत." - मला तरी एकच मोठा फरक सापडला, बुद्धांनी कर्म आणि निर्वाणाविषयी जे सांगितलं, त्याचा अर्थ आंबेडकरांनी 'जास्त मानवता वादी, जास्त प्रॅक्टिकल' दृष्टीने लावला आहे. जरी त्यांनी थेरवादातला अर्थ जसाच्या तसा उचलला असता तर तेव्हाच्या brand new बुद्धिस्ट लोकांच्या मनात चांगलाच गोंधळ झाला असता. मी आत्ताही इथे थेरवादिन अर्थ लिहित नाहीये कारण की मागचा पुढचा संदर्भ न देता मी उगीच इथे काही लिहिलं तर त्याचा काही फायदा होणार नाही. तो विषय स्वतः अभ्यास करून किंवा माझ्या टीचर सारख्या भारी टीचर कडून समजून घेण्यासारखा आहे. निओ बुद्धिझम शब्द शोधल्याबद्दल धन्यवाद. हे माहिती होतं कि काहीतरी फरक आहे, पण त्याला खरंच वेगळं नाव द्यायचं असा कधी विचार नव्ह्ता केला. प्रत्येक गोष्ट सुस्पष्ट असलेली केव्हाही चांगली :-)

धर्म म्हणजे एका ठराविक नियमावलीत(श्रद्धा,रीतिरिवाज,चालितित्ती) राहणार लोक समूह म्हणजे धर्म अशी व्याख्या करता येईल. प्रतेक धर्माची पण काही विचारधारा नियमावली असते. आणि ती नियमावली त्या धर्मातील किती लोक पाळतात ह्याला असाधारण महत्व आहे. समजा बुद्ध धर्माची विचारधारा खूप अती उत्तम आहे पण धर्म बांधव त्या धर्मातील विचारधारा पाळत च नाही किंवा कमी लोक पाळतात तर फक्त धर्म चांगला असून काय फायदा. तसेच हिंदू धर्म खूप महान आहे जीवनातील सर्व ज्ञान त्या मध्ये आहे पण हिंदू धर्मीय लोकांना ते ज्ञान माहीतच नाही ,धर्माचे कोणतीच विचारधारा हिंदू धर्मीय लोकातील सर्व लोक पाळत नाहीत तर फक्त हिंदू धर्म ची विचारधारा खूप great आहे ह्याला काय अर्थ आहे. हेच लॉजिक बाकी सर्व धर्मांना लागू आहे. धर्माची सर्व विचारधारा ,नियम,रीतिरिवाज,चालीरीती किती धर्म बांधव पाळतात ह्या वर च त्या धर्माचे यश अवलंबून असते. चोरी करू नका. खोटे बोलू नका हिंसा करू नका.ही समान तत्व सर्व धर्मात आहेत किती लोक ह्या तत्वांचे पालन करतात. उत्तर आहे नगण्य.धर्म हे आता राजकीय फायद्यासाठी,स्व फायद्यासाठी,आर्थिक फायद्या साठी वापरण्याचे हत्यार आहे.बाकी काही नाही. समूहाची वर्चस्व वादाचे स्वप्न धर्म पूर्ण करतात. आणि समूहात आपण सुरक्षित आहोत असे व्यक्ती ल वाटते. प्राचीन मंदिर,लेणी,विविध वास्तू ह्या राजसत्ते नी उभारल्या आहेत.लोकांनी नाही. राजसत्ता त्याच विचारधारेला किंमत देते जी विचारधारा त्यांचे सिंहासन भक्कम करते. आता पण तीच स्थिती आहे काही बदल झालेला नाही.

व्यक्ती स्वतंत्र चा.प्रतेक व्यक्ती ही युनिक असते तिचे स्वतःचे अस्तित्व असते त्या वर धर्म बंधन टाकत असेल तर तो धर्म हा निकृष्ट आहे असे म्हणायला काही हरकत नाही. मी हिंदू आहे पण माझा हिंदू धर्म मी चुरचाध्ये गेलो म्हणून मला बहिष्कृत करत नसेल तर माझा हिंदू धर्म हा अती उत्तम आहे मी बौध्द धर्मीय आहे पण मला गणपती घरी बसवायची इच्छा आहे आणि मी घरी गणपती बसवला म्हणून मला बहिष्कृत केले गेले तर माझा धर्म हा ग्रेट नाही.आणि माझ्या विचार स्वातंत्र्य चा मान राखला गेला तर माझा बौध्द धर्म ग्रेट आहे. ह्या चाचणीत कोणता धर्म अग्रेसर आहे ह्याचे उत्तर च कोणता धर्म अती उत्तम आहे हे ठरवेल. धर्म नी व्यक्ती स्वतंत्र वर अती क्रमन करू नये.

सम्राट अशोक ह्यांनी बौध्द धर्म स्वीकारला आणि त्यांच्या प्रयत्नांनी ची त्या धर्माला सुवर्ण काळ त्या वेळी बघायला मिळाला.धर्माचा विस्तार झाला राजसत्ता पाठिंबा होता हे कारण असावे त्या मागे. पण बौध्द धर्म भारतात मात्र रुजला नाही ,विस्तारला ह्याला जबाबदार पण सम्राट अशोक च होते असे वाचनात आले आहे. सम्राट अशोक हा एक न्यायप्रिय सहिष्णू सम्राट होता त्यांनी सर्व धर्मांना समान सुरक्षा दिली ,सामान वागणूक दिली. सम्राट अशोक ज्यांच्या अती सहिष्णू स्वभाव मुळे बौध्द धर्म पेक्षा बाकी धर्म भारतात पसरले. असा पण त्यांच्या वर आरोप होतो. सम्राट अशोक हे केंद्रस्थानी असतील असे कोणतेच उस्तव भारतात बौध्द धर्मीय मोठ्या प्रमाणात साजरे करत नाहीत. सहिष्णू पना मुळे धर्म संकटात येतो हे सत्य च आहे. हिंदू धर्मीय लोकांनी सुद्धा जास्त सहिष्णू राहणे हिंदू धर्मासाठी धोक्याची घंटा असेल. हेच इतिहास मधून शिकले पाहिजे. आपण ज्याला अशोक चक्र म्हणतो ते अशोक चक्र नाही तर धम्म चक्र आहे .असे पण वाचनात आले आहे. हिंदू,मुस्लिम,ख्रिस्त धर्मीय लोकांकडून विरोध होवू नये म्हणून ते अशोक चक्र आहे असं युक्तिवाद केला गेला होतं

दुसऱ्या महा युद्ध चा सर्वात मोठा फायदा म्हणजे भारताला आणि त्या बरोबर अनेक देशांना स्वतंत्र मिळाले . दुसरे महायुध्द झाले नसते आणि ब्रिटिश सत्तेची सर्व गुर्मी कोणी उतरवली नसती तर आज पण अनेक देश पारतंत्र्यात च असते. भारतात कठोर विरोध ब्रिटिशांना झालाच नाही त्यांच्या सेवेत भारतीय च होते आणि तेच स्वतंत्र लढ्यात सहभागी असणाऱ्या लोकांवर अन्याय करत होते. गांधी ,किंवा काँग्रेस च्या लुटपूटी च्या विरोधाला ब्रिटिश satte नी कधीच भीक घातली नसती.

मला स्वत:ला गौतम बुध्दांचे विचार सर्वाधिक पटले असले, तरी बौध्द धर्म भारतात इतका का पसरला नसावा, हा प्रश्न पडला होता. त्याबाबत, आंबेडकरांचा एक लेख वाचल्याचे आठवते, पण आत्ता नेमका संदर्भ मिळत नाही. जगातील त्यातल्या त्यात सर्वाधिक तर्कसुसंगत, विज्ञानवादी (म्हणजे पहिल्यांदा श्रध्देची मागणी करून नंतर पारलौकिक लाभाचा न वायदा करणारा) आणि नैतिक विचार बुध्दाने सांगितला, असे वाटते. याच विषयावर आनंद करंदीकरांचा एक व्हिडीओ जिज्ञासूंसाठी: https://www.youtube.com/watch?v=eGjY-NhbCKQआनंद करंदीकर :- बौद्ध धर्म आणि सनातनी हिंदू

गॉडजिला (अभ्यासू विद्यार्थी) सोकाजी धर्मराजमुटके चौकस२१२ सुमित्रा गामा पैलवान Rajesh188 कपिलमुनी रावसाहेब चिंगभूतकर अशा सर्वांचेच प्रतिसाद माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारे आहेत

In reply to by आशु जोग

संग्रहणीय आहेत

In reply to by आशु जोग

आशु जोग, साहना, गा.पै. यांनी मनमोकळेपणाने आणि प्रेमाने सुस्पष्ट मुद्दे/प्रश्न विचारल्यामुळे चर्चा योग्य वळणे घेत राहिली. Well done, we all! It was a very nice experience to hear from learned people of मिपा.

चौकस२१२,
२ अब्राहमीक धर्म हिंदूंना आणि बुद्धांना गिळल्यालं बसेल आहेत ते जास्त गंभीर आहे .. यावर जास्त विचार व्हावा असे वाटते , उगाचच बुधः धर्मीयांशी वाद कशाला घालताय
नेमक्या याच कारणासाठी मी बौद्धांशी संवाद साधू इच्छितो. त्याचं काय आहे की बुद्ध वेगळा दाखवला की बौद्ध धम्म हा पारंपरिक हिंदू धर्माहून वेगळा आहे असा तथाकथित सिद्धांत मांडता येतो. मग हळूच बुद्धाच्या जोडीस येशू आणून बसवायची सोय होते. बुद्धास मध्ये घालून भालचंद्र नेमाडे उघडपणे म्हणताहेत कॅथलिक पंथाने बौद्ध तत्त्वं उसनी घेतली आहेत : https://www.aksharnama.com/client/article_detail/4434 अशा रीतीने येशूचा चंचुप्रवेश झाला की बुद्धांना उर्वरित हिंदूंपासून अलग पाडणं उत्तरोत्तर सोपं होत जाईल. हे टाळायचं असेल तर बुद्धांना विचारप्रवण करणं हा मार्ग आहे. आ.न., -गा.पै

In reply to by गामा पैलवान

त्यासाठी आंबेडकरी बौद्ध जनतेने Buddha and His Dhamma हे अवश्य वाचावं, त्याचा group study करावा. (मी एकटीने वाचलं, २-३ वेळेस वाचावं लागलं तेव्हा कळलं. ) आणि तिथेच न थांबता, त्रिपिटकांचा ही अभ्यास जरूर करावा.

In reply to by गामा पैलवान

हो सहमत ... बौद्धांशी संवाद संवाद साधने महत्वाचे आहे .. बुद्धास मध्ये घालून भालचंद्र नेमाडे उघडपणे म्हणताहेत कॅथलिक पंथाने बौद्ध तत्त्वं उसनी घेतली आहेत : नेमाडे यांना कोणतरी सांगितले पाहिजे कि एकदा वाटिकाणास जाऊन पोप महाशयांना हे ऐकवा.. मग बघावे काय उत्तर मिळते ते ! नेमाडेंचे विधान हुकलंय !

विचारवंत ही जी जमात आहे त्यांचे एकमेव काम असते बुद्धिभेद करून चुकीच्या गोष्टी पण कशा बरोबर आहेत हे लोकांच्या मनावर बिंबवणे. हिंदू हा धर्म नाही असा विचार लोकांत पसरवून लोकं मध्ये भ्रम निर्माण करण्याचे उद्योग काही लोक करत आहेत. त्या साठी हवी तशी धर्माची व्याख्या करण्यात ह्यांना काहीच लाज वाटत नाही. पण हिंदू धर्म हा पुरातन धर्म आहे. रीतिरिवाज,परंपरा नी लोकांना एकत्र बांधून ठेवले आहे. ते काही विचारवंत लोकांच्या काव्या ना बळी पडणार नाहीत.

In reply to by Rajesh188

नालंदा विद्यापीठात भारतात उगम पावलेल्या विवीध विचारसरणीवर असे ३० लाख ग्रंथ जाळले तेंव्हां तेथून बौध्द लोक चीन वगेरे ठिकाणी पळून गेले अन भारतातून बुध्द धर्म खऱ्या अर्थाने लोप पावला... हे विद्यापीठ इस्लामी आक्रमकांनी जाळले, ब्रिटिशांनी न्हवे. बुध्द तत्वज्ञान सर्वात आधूनीक, प्रगत आणि सर्वमान्य विचारसरणी म्हणून हजारो वर्षे होती... भारतात उगम पावलेल्या विवीध पंथांचे एकमेकात वादविवाद, जय पराजय होत होते पण त्यानी कधीही एकमेकांचे समूळ उच्चाटन अग्रेसिवपणे केले नाही. उदा. आजही वारकरी पंथ भारतात अस्तित्वात आहे आणि उपासनेची विचारसरणी जरी वेगळी असली तरी त्यांच्या संतांच्या समाध्यांना अभिषेक वैदिक पद्धतीने रोज होतात आणि संतांचा तसा उपदेश नाहीं म्हणून त्यांचा मार्ग अनुसरणारे कोणीही त्यावर वाद निर्माण करत नाही, भलेही या संताना प्रसंगी आयुष्यात वैदिकता अनुसरनार्या अथवा न अनुसरणार्या काही लोकांचा बराच त्रास झाला तरीहि सर्वच विचार सरणीचे लोक पराकोटीच्या सामंजस्यानेच राहतात कारण मार्ग विवीध असले तरी अंतिम ध्येय सर्वांचे समान होतें व राहील हीच बाब त्याकाळी लागू होती व हे सर्व विवीध मार्गांचे लोक हिंदूच होत. अगदी अफगाणिस्तानात पर्वताच्या आकाराच्या बुध्दमूर्ती तालिबानने तोफा डागून फोडेपर्यंत म्हणजेच विसाव्या शतकपर्यंत अफगाणिस्तान मुस्लिमबहुल असून देखील अस्तित्वात होत्या यावरून हिंदु म्हणजे काय आणि त्याला सुरुंग कोणाकडून व कसा लागला हे स्पष्ट होते.

आशु जोग, लेख रोचक आहे. हे वाक्य विशेष दखलपात्र वाटलं :
According to Ambedkar, the real objective of a religion should be the spiritual development of individuals:
स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट हवी होती तर मग हिंदू धर्म सोडायचाच कशाला? नारायण गुरूंनी केरळात हिंदू धर्मात राहूनंच दलितांच्या हिताच्या सुधारणा राबवल्या होत्या. हा भक्तीमार्ग आंबेडकरांना का अंगिकारावासा वाटला नाही, हा प्रश्न उद्भवतो. नारायण गुरु यांचं कार्य आंबेडकरांना बऱ्यापैकी समकालीन होतं. त्यामुळे आंबेडकरांना या कार्याचं मूल्यमापन करणं सहज शक्य होतं. पण ते का केलं नाही, हा प्रश्न आहे. लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

१. स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट: स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट हवी होती म्हणून आंबेडकरांना धर्मांतर करायचंच नव्हतं. ते का करायचं होतं ते त्या लेखात आलं आहे:
Ambedkar thus argued that there was no hope for Untouchables to live a respected life within Hinduism. The only way they could escape from their caste bondage was to renounce it.
२. हिंदू धर्मांतर्गत दलितांच्या हिताच्या सुधारणा: त्याच लेखात आलेलं विवेचन, जे होणं शक्य नव्हतं.
His conclusion in Annihilation of Caste was that castes being mainly part of the rules of the Hindu religion, which were sourced from the Dharmashastras (Smritis and Puranas), could not be annihilated unless the Dharmashastras were destroyed.
- (धर्मातीत स्पिरिच्युअल) सोकाजी

In reply to by सोत्रि

सोकाजी, नेमकी हीच तर विसंगती आहे. स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट हवीये, तर तसं मॉडेल नारायण गुरूंनी हिंदू धर्मात उपलब्ध करवून दिलं आहे. मग ते मॉडेल न स्वीकारता आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला. बौद्ध नामे जो नवा धर्म स्वीकारला, त्यात अनुयायांची स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट कितीशी झाली? कोणी काही आढावा घेतलाय का? तुमच्या वरील प्रतिसादात उल्लेख्लेक्या इंग्रजी लेखात बौद्ध धर्मांतरामागे सामाजिक कारणं ( no hope for Untouchables ) असल्याचा उल्लेख आहे. मग नेमकं कारण काय धर्मान्तरामागे? अध्यात्मिक की सामाजिक? की दोन्ही? आणि धर्मांतराच्या अध्यात्मिक आणि सामाजिक दोन्ही फलनिष्पत्त्या काय आहेत? मला वाटतं या दोन मुद्द्यांवर नवबौद्धांकरवी सखोल चर्चा झाली पाहिजे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बाबासाहेबांनी धर्मांतर अद्ध्यात्मिक कारणामुळे केलं असं वाटल्यास विसंगती वाटू /दिसू शकते. पण बाबासाहेबांनी धर्मांतर फक्त सामाजिक/राजकिय उद्दीष्टांसाठी केलं होतं. माझ्या मर्यादित अभ्यासानुसार कुठेही अद्ध्यात्मिक उद्दिष्ट हे प्राइम ऑब्जे़टीव्ह नव्हतं. अद्ध्यात्मिक कारण हे बाय-प्रॉडक्ट होऊ शकतं पण ते उद्दिष्ट अजिबात नव्हतं. तसं कोणी साधार दाखवून दिल्यास I stand to be corrected. अस्पृश्यांना शिक्षणात आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी त्यांना समान संधी उपलब्ध होण्याची गरज होती आणि हिंदू धर्मात राहिल्यान ते शक्य होणार नाही हे त्यांच ठाम मत होतं. जन्म जरी हिंदू म्हणून झाला असला तरी हिंदू म्हणून मरणार नाही असं त्यांनी ठरवलं होतं. त्यासाठी सामाजिक विषमता असलेल्या हिंदू धर्माला पर्याय म्हणून समता आणि बंधूता ह्यावर आधारित असलेल्या 'बौद्ध धर्माचा' (??) त्यांनी स्विकार केला. आता, त्या धर्मांतराच्या सामाजिक फलनिष्पत्तीबद्दल टिप्पणी करणं तुम्ही म्हणता तसं नवबौद्धांवरच सोडून देऊ. - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

सोकाजी,
बाबासाहेबांनी धर्मांतर अद्ध्यात्मिक कारणामुळे केलं असं वाटल्यास विसंगती वाटू /दिसू शकते.
एकदम खरंय. इंग्रजी लेखातल्या या वाक्यास नेमका आधार कोणता ते शोधावं लागेल :
According to Ambedkar, the real objective of a religion should be the spiritual development of individuals
अर्थात, हे नवबौद्धांनी करायला पाहिजे. बौद्ध धर्म स्वीकारणं अध्यात्मिक कारणासाठी की सामाजिक कारणासाठी की दोन्हींसाठी यावर नवबौद्धांना विचारमंथन करावंच लागेल. अन्यथा त्यांची नवबौद्ध म्हणून जी ओळख आहे ती पुसट होत जाईल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

Should be=normative claim. एखादी गोष्ट आयडियली कशी असावी, ह्याबद्दल नोरमेटिव्ह दावे असतात. हौएव्हर, आंबेडकरांना हे रियल धार्मिक ऑब्जेक्टिव्ह खऱ्या आयुष्यात कुठेच दिसले नसावे. किंवा स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट ह्या गोष्टीआधी emancipation जास्त महत्वाचे वाटणे साहाजिकच आहे, नाही का ? त्यामुळे त्यांच्या सुयोग्य धर्माच्या कल्पनेवरून धर्मांतराच्या मूळ उद्दिष्टावर गडबडून जाण्याचे कारण नाही. मूलतः सामाजिक कारणच. बाबासाहेबांच्या नोरमेटिव्ह मताने धर्मपरिवर्तनाचे उद्दिष्ट तेच असावे, असे दिसत नाही. उदा- नोरमेटिव्ह क्लेम- सर्व सरकारांनी गांजा लीगल करावा. (एका ज्यूईश व्यक्तीचे मत.) =\= नाझी जर्मनीतून तो व्यक्ती पळून गेल्यास त्याचे कारण "नाझीन्नी गांजा लीगल केला नाही म्हणून." थोडक्यात- एका ओबवियस नोरमेटिव्ह क्लेम वरून तितक्याच ओबवियस धर्मांतराच्या कारणावर कन्फ्युज होण्याचे काही कारण नाही.annihilation of cast मध्ये कारण सुस्पष्ट आहे.

In reply to by सोत्रि

पण बाबासाहेबांनी धर्मांतर फक्त सामाजिक/राजकिय उद्दीष्टांसाठी केलं होतं. माझ्या मर्यादित अभ्यासानुसार कुठेही अद्ध्यात्मिक उद्दिष्ट हे प्राइम ऑब्जे़टीव्ह नव्हतं. अद्ध्यात्मिक कारण हे बाय-प्रॉडक्ट होऊ शकतं पण ते उद्दिष्ट अजिबात नव्हतं. हो असच वाटतंय अर्थात हे वरवरच्या अभ्यासातून... साधे कारण स्पष्ट शब्दात सांगायचे तर " हिंदू धर्मात आपल्यावर जातीवयस्थेमुळे अन्याय होत राहिला आणि होत राहणार .. मग अप्लाय समाजाने १) धर्मच सोडला आणि आपण निधर्मी म्हणून घोषित केलं तर? २) धर्म सोडायचा तर मग दुसरा कोणता धर्म घयावा , रूढी परंपरेत अडकलेलंय समाजाला काय "पचेल" आणि इतर हिंदू समाजाशी फार तेढ होणार नाही ?....तर अगदीच फारकत नको म्हणून बुद्ध धर्म .. असा विचार केला गेलं असावा इस्लाम स्वीकरणायचे त्यांचं मनात असावे असे वाटत नाही.. हा कदाचित ख्रिस्ती होऊ शकेले असते ! यातील त्यांनी क्रमांक २ चा पर्याय निवडला मग रेव्ह टिळक यांनी धर्मांतर केलं ते कसे पाहता येईल ? ते बहुतेक अद्ध्यात्मिक कारणामुळे असावे ... त्यांच्या बाबतीत तर "अन्याय" हे कारण नसावे ! अर्थात चिंताजनक बाब रेव्ह टिळकआचे धर्मांतरं नसून आंबेडकरांचे धर्मांतर मानावे लागेल .. संख्येच्या दृष्टीने हिंदू समुदायाला त्याचाच जास्त धक्का बसला असणार !

In reply to by चौकस२१२

तर अगदीच फारकत नको म्हणून बुद्ध धर्म .. असा विचार केला गेलं असावा
असं वाटणं हे, काहीतरी करायचं म्हणून बौद्ध धर्मात धर्मांतर केलं, इतकं सुलभीकरण होऊन अतिशयोक्त होतंय. १९३६ साली त्यांनी धर्मांतर करणार असं ठरवून घोषणा केली आणि १९५६ साली धर्मांतर केलं, म्हणजे तब्बल २० वर्षांनी. त्या काळात त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास (comparative religion study) केला होता. त्यामुळे बौद्ध शिकवणींवर आधारित धर्म स्विकारण्याची त्यांची वैचारिक बैठक इतकी सोपी आणि सुलभ नव्हती. हा आंबेडकरांचा निबंध त्यांची वैचारिक बैठक स्पष्ट करतो: https://drambedkarbooks.com/2015/05/31/buddha-and-future-of-his-religio… - (अभ्यासू) सोकाजी

सुमित्रा,
तुम्ही exactly कशावरून म्हणालात की नियम नाही, स्मृती नाहीत म्हणून?
पहिल्याप्रथम, विलंबाने उत्तर देतोय म्हणून क्षमस्व. नियम नाहीत असं मी कुठेही म्हटलेलं नाही. नियम आहेत, पण ते सामान्य लोकांसाठी नसून सदस्यांसाठी आहेत. सामान्य गृहस्थी माणसाच्या चटकन आवाक्यात असेल असं काहीतरी हवं ना? यासंबंधी buddhist law वर गुगलून बघितलं तर पहिला लेख हा सापडला : https://www.encyclopedia.com/religion/encyclopedias-almanacs-transcript… या लेखातही हे विधान आलंय :
Scholars have also presumed that Buddhism did not have an obvious relationship to secular legal systems because of its distinction between lay and monastic populations ....
बौद्धधर्माचा कायद्यावर बराच प्रभाव पडला आहे. मात्र तरीही सामान्य जनतेला आचरणात आणता येईल या हेतूने पद्धतशीर लेखन झालेलं दिसून येत नाही. असं लेखन अस्तित्वात असलं तरी ते भारताबाहेरचं असेल. भारतात तरी झाल्याचं दिसून येत नाही. या अर्थी बौद्ध धर्मात स्मृती नाही, असं मला म्हणायचं आहे. आ.न., -गा.पै.