✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भटकंती व खादाडी २

व
विसोबा खेचर यांनी
Sat, 09/22/2007 - 01:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9372 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

ग
गुंडोपंत Sat, 09/22/2007 - 11:46 नवीन

अंबिका

सकाळी सकाळी गार हवेत मस्त पैकी पांडवलेण्याला चढून यावे. मग गाडी काढून थेट तसेच पंचवटी कारंज्यावर जाऊन, अंबिका रेस्टॉरंट मध्ये मिसळ साठी नंबर लावाठी. दाटीवाटीमधे बसून, खास सावजी मसाला असलेली मिसळ समोर येते. सोबत कांदा कोथिंबीर, शेव. ताजे, खमंग वासाचे पाव! घास घेतल्यावर आवाज फुटणे बंदच! फक्त "रस्सा", "तर्री " असे घशातल्या घशात पुटपुटणे! काही फालतू लोक इथे जास्तीची शेवही मागवतात, पण त्यात काही अर्थ नाही! इथे फक्त'काळा रस्सा व तर्री 'मागणारे ष्टँडर्ड असतात. एकदा आमच्या एका एकारांत मित्रवर्याने येथे दही मागताच, सगळे हॉटेल स्तब्ध होवून आमच्या कडे बघायला लागले होते! त्याला गप्प बसून नाक पुसत खाण्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. ही स्वर्गीय मिसळ संपेपर्यंत भलेभले स्वर्गीय होतात!!! बोलायचं कामच नाही...! मग कारंज्यावरचा पांडे मिठाई च्या शेजारी असलेल्या टपरीवरचा चहा गरम चहा... हे खाल्ल्यावर बरेच लोक अर्ध्यातासाने वगैरे बोलूही शकतात असे ऐकुन आहे! मी मात्र मिसळ गरम चहा व त्यावर एकशेवीस तिनशे लावली की तासभर फारसे न बोलणेच योग्य धरतो. या वेळी खाणे हा बोलण्याचा प्रकारच नाही; हे ध्यानात येते हो! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/23/2007 - 13:38 नवीन

नाष्ट्याची सोय !

औरंगाबादला बाबा पेट्रोल पंप नावाचा बस स्टॊप आहे. इथेच "गणेश इडली वडा सेंटर" नावाचे एका अण्णाचे प्रसिद्ध हॊटेल आहे. सकाळी नाष्ट्याला आणि दिवसभर इथे तोबा गर्दी असते, हा आहे 'उक्मा '(१० रुपये) ( मला दोन वाट्या भरुन लागतात) त्याच बरोबरइथे इडली वडा (१२ रुपये),उत्तप्पा (१२ रुपये),शिरा( १० रुपये), मसाला डोसा १५ रुपयात मिळतो. मराठी माणूस कामाची सुरुवात इथूनच करतो ! :) Image removed. ( खोब-याची चटणी लहान वाटीत तर उकमा मोठ्या वाटीत.) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 09/23/2007 - 13:41 नवीन

मस्त

बरोब्बर भूकेच्या वेळी तुम्ही प्लेट आणलीत पुढे बिरूटेसाहेब. चॉकलेट पुडींग खाऊन वेळ मारून नेतोय. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
य
यन्ना _रास्कला Mon, 06/08/2009 - 09:36 नवीन

फोटु

येवडा छान =P~ त म बिरयानी कस्ली भन्नाट फक्कड लागत आसेल. /:) खायाला हवी बुव्वा. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 06/08/2009 - 09:39 नवीन

मार्ग

आज काल पट्ठे बापुराव मार्ग म्हणतात का? अगदी समर्पक नाव. बिर्याणी वादातीत.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 06/08/2009 - 09:57 नवीन

क्या बात है !

मटण बिर्याणी अप्रतिम दिसतेय... योगायोगाने आज आमच्या घराजवळच्या 'अभिरूची'मधे मटण बिर्याणी खाऊन आलो आणि आता हा धागा बघतोय :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा