अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री डॉनल्ड रम्सफेल्ड यांचे २९ जून २०२१ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.
त्यांनी प्रशासनिक जबाबदारीची पदे सांभाळायला सुरवात रिचर्ड निक्सन अध्यक्ष असताना १९६९ मध्येच केली. त्यानंतर अध्यक्ष झालेल्या जेराल्ड फोर्ड यांनी त्यांना सुरवातीला १९७४ मध्ये व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ आणि १९७५ मध्ये संरक्षणमंत्री म्हणून नेमले. १९७७ मध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाचे जिमी कार्टर अध्यक्ष झाल्यानंतर रम्सफेल्ड जी.डी.सर्ल या खाजगी औषध कंपनीचे सी.ई.ओ बनले. १९८१ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे रॉनाल्ड रेगन अध्यक्ष झाल्यानंतर १९८३ मध्ये अध्यक्षांनी त्यांना इराकमध्ये सद्दाम हुसेनला भेटायला पाठवले होते. त्यावेळी इराण-इराक युध्द चालू होते आणि इराक अमेरिकेचा मित्रदेश होता आणि सद्दाम हुसेन अमेरिकेचा महत्वाचा साथीदार होता.
डॉनल्ड रम्सफेल्ड यांना जॉर्ज डब्ल्यू बुश अध्यक्ष झाल्यावर २००१ मध्ये परत एकदा संरक्षणमंत्री म्हणून नेमले गेले. २००२-०३ मध्ये इराकमध्ये अतिसंहारक शस्त्रे आहेत म्हणून बुश प्रशासनाने खोटारडेपणा केला. त्यात परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल यांच्याबरोबरच संरक्षणमंत्री डॉनल्ड रम्सफेल्ड हे पण त्या खोटारडेपणात होते. २० वर्षांपूर्वी ज्या सद्दाम हुसेनला रम्सफेल्ड भेटले होते तोच माणूस किती नालायक आहे याचा प्रचार करण्यात ते पुढे होते. बुश २००४ मध्ये दुसर्यांदा निवडून आले. दुसर्या टर्ममध्ये त्यांनी परराष्ट्रमंत्री पदावर कॉलिन पॉवेल यांच्याऐवजी कॉन्डोलिझा राईसना नेमले पण डॉनल्ड रम्सफेल्डना संरक्षणमंत्रीपदावर कायम ठेवले. २००३ चे इराक युध्द अमेरिकन जनतेत खूप अलोकप्रिय ठरले. २००४ मध्ये अध्यक्षीय निवडणुक झाली तेव्हापर्यंत तितकी प्रतिक्रिया आली नव्हती पण २००५-०६ मध्ये अनेक अमेरिकन सैनिकांचा इराकमध्ये हकनाक बळी गेल्यानंतर ती प्रतिक्रिया जास्त उमटली. २००६ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाला आणि त्याबद्दल इराक युध्दाची घोडचूक जबाबदार ठरविण्यात आली. त्यानंतर रम्सफेल्ड यांना संरक्षणमंत्रीपदावरून काढण्यात आले. कॉलीन पॉवेल यांनी नंतरच्या काळात इराक युध्द आणि त्यावेळी केलेला खोटारडेपणा ही चूक होती असे निदान तोंडदेखल्या तरी म्हटले पण रम्सफेल्ड यांनी ते पण म्हटले होते असे वाटत नाही.
बुश प्रशासनाच्या पहिल्या टर्ममध्ये ९/११ आणि नंतर भारतात संसदभवनावर हल्ला आणि त्यानंतर कालुचक हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान युध्द होईल असे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळेस बुश प्रशासन भारताला 'संयम ठेवा' हा उपदेशाचा डोस पाजत होते. तसे करण्यातही डॉनल्ड रम्सफेल्ड पुढे होतेच. ९/११ नंतर आणि भारत-पाकिस्तान युध्द होईल असे वातावरण असताना रम्सफेल्ड भारतात आले होते. त्यावेळी परराष्ट्रमंत्री जसवंतसिंगांशी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जसवंतसिंग फारसे खुषीत दिसत नव्हते असे टिव्ही चॅनेल्सवर बघितल्याचे आठवते. म्हणजे कदाचित संयम ठेवा हा 'दम' रम्सफेल्ड यांच्याकडून दिला गेला असावा ही शक्यता आहे.
डॉनल्ड रम्सफेल्ड कितीही नालायक असले तरी त्यांची एक गोष्ट मला आवडायची असे नसले तरी भावायची. आपण अमेरिकेसारख्या महासत्तेच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये सत्ताधारी आहोत हा एक प्रकारचा अहंकार किंवा दर्प म्हणा असा त्यांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवायचा त्यामुळे त्यांचे बोलणे नेहमीच एकदम 'डॉमिनेटिंग' किंवा खरं तर 'बुलिंग' करणारे असायचे.
असो. डॉनल्ड रम्सफेल्ड यांच्या निधनामुळे अमेरिकेच्या इतिहासातील नालायक मंत्र्यांपैकी एक अध्याय संपला. आता हेनरी किसिंजरचा नंबर कधी लागतो ते बघायचे. बांगलादेशात याह्याच्या अत्याचारांना पाठीशी घालून लाखो लोकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या निक्सन आणि किसिंजर यांच्यासाठी नरकात जागा कायमस्वरूपी आरक्षित केली गेली असेल असे नेहमी वाटते. रम्सफेल्डही फार वेगळे नव्हते.

वर्गीकरण
वाचने
53588
प्रतिक्रिया
171
मिसळपाव
प्रतिक्रिया
राजेशभाऊ, बेअरिंग सुटतंय..
In reply to BJP नी स्वबळावर निवडणूक लढवी by Rajesh188
खरंय, उजवीकडे सरकायलेत.
In reply to राजेशभाऊ, बेअरिंग सुटतंय.. by आनन्दा
राजेश जी. बाकी काही ही असो..
In reply to मला वाटतं हिंदू ना उत्तम जाणीव आहे by Rajesh188
महाराष्ट्रात पडद्याआड बऱ्याच
महाराष्ट्रात पडद्याआड बऱ्याच
शक्यता कमी आहे . . . मोदी व
भाजप महाराष्ट्रात सध्या
In reply to शक्यता कमी आहे . . . मोदी व by सुक्या
भाउ
यांच्यात अनिल थत्ते पण हवा.
In reply to भाउ by माईसाहेब कुरसूंदीकर
सहमत, मी ही ह्या दोघांचे
In reply to भाउ by माईसाहेब कुरसूंदीकर
थोडेफार सहमत
In reply to भाउ by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to थोडेफार सहमत by प्रदीप
यातील १-२ चित्रफिती
In reply to भाउ by माईसाहेब कुरसूंदीकर
अनिल थत्तेची भाकिते -
युट्यूबवरील व्ह्यू
In reply to अनिल थत्तेची भाकिते - by श्रीगुरुजी
पाकिस्तानी रिऍकशन"
In reply to युट्यूबवरील व्ह्यू by चंद्रसूर्यकुमार
आधीच्या भाकितांनंतर केवळ ३
In reply to अनिल थत्तेची भाकिते - by श्रीगुरुजी
कही अगदी सामान्य पत्रकार असतात
मुख्यमंत्र्यांनी जनतेला
न्यायालय निर्णय देवून तर मोकळे झाले
In reply to मुख्यमंत्र्यांनी जनतेला by श्रीगुरुजी
पूरग्रस्त भागातील दौरा
एक सारखे आहेत.
In reply to पूरग्रस्त भागातील दौरा by Rajesh188
पेट्रोल दरवाढ आणि किमान ५०
In reply to एक सारखे आहेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकदाची सद्य केंद्रातली बला
In reply to पेट्रोल दरवाढ आणि किमान ५० by गॉडजिला
अच्छा !
In reply to एकदाची सद्य केंद्रातली बला by गॉडजिला
धन्यवाद.
In reply to अच्छा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जनतेच्या नजरेत सक्षम भासेलअसा पर्याय इतरांनी निर्माण करायला विरोधकांनी प्रयत्न केले पाहिजेत... बिजेपी ने ते २०१४ मधे केले म्हणुन मनमोहन सिंग यांना मोदी एक पर्याय म्हणुन निवडले गेले. बंगालमध्ये दीदींना पर्याय मोदी ठरू शकले नाहीत कारण ते दिल्लीत असतात बंगालमधे नाही... आताही मोदींना दिल्लीत सक्षम पर्याय कोण उभे आहेत ते जनतेवर जो पर्यंत ठसत नाही तो पर्यंत जनता थोड्या फार चांगल्या गोष्टीसाठी सत्ताधार्यांच्या घोडचूकाही पाठीशी घालतिलच... काँग्रेनेही मोदी टीका करून त्यांना मोठे केलें तीच ऊर्जा जर त्यांनी मोदींना गुजरातमधे सक्षम पर्याय असे एखाद्याला ठस्वायला वापरली असती तर मोदींना वेळीच प्रबळ विरोधक तयार झाले असतेकही तरीच काय
In reply to एकदाची सद्य केंद्रातली बला by गॉडजिला
तुम्हाला पर्याय कोणीच नसल्याने
In reply to कही तरीच काय by Rajesh188
हा हा हा...
In reply to तुम्हाला पर्याय कोणीच नसल्याने by गॉडजिला
बर्नॉल लावत चला हो...

माल्या . .