डोंगर-दऱ्या भटकायला सुरूवात केल्यापासून जवळपास एक तप होत आलंय. या ११-१२ वर्षांत, कित्येकदा गडकोटांवर पौर्णिमेला चांदण्या रात्रीपासून ते अमावस्येला चांदण्यानी गच्च भरलेल्या आभाळाखाली मुक्काम केला. अगदी भल्या पहाटेपासून ते रात्रीच्या किर्र अंधारात कित्येकदा जंगलातून भटकलो. कित्येक अनवट जंगलवाटा धुंडाळल्या, परंतू आजतागयत जंगली श्वापदांचा सामना प्रत्यक्षात कधीही झाला नव्हता. नाही म्हणायला, रायगडावर नगारखान्यापासून वाघ दरवाज्याकडे जाणाऱ्या वाटेवर एका 'विशिष्ठ' पावलांचे ठसे पाह्यले होते, पण ते तेवढंच.!!
आजची सकाळ मात्र सगळ्या गोष्टींना अपवाद ठरली. रात्री अचानक ठरलं आणि पहाटे सहा वाजता घराजवळच्या संजय गांधी नॅशनल पार्काचा एक भाग असलेल्या, मामा-भाचे डोंगराच्या पायथ्याला पोचलो. पायथ्यापासून चढायला सुरूवात केल्यानंतर, जवळपास तासाभराने डोंगराच्या माथ्यावर पोचलो. वर पोचल्यानंतर डोंगराच्या धारेने उजवीकडे चालत गेल्यानंतर एका टेकडीवर 'हजरत बदरूद्दीन शाह कादरी उर्फ मामु सरकार' यांचा दर्गा होता. त्या टेकडीवर जाण्यासाठी परवानगी मिळण्याचा अनुभव फारच वाईट होता आणि त्याबद्दल इथे कथन न केलेलंच बरं. खरं तर टेकडीवरील दर्गा पाहण्यापेक्षा, तिथून संपूर्ण ठाणे शहराचा नजारा दिसेल या आशेने वर गेलो, पण डोंगरांच्या खालच्या बाजूला धुक्याची दाट चादर पसरली असल्यामुळे अगदी दहा फूटावरचेही काही दिसत नव्हते. तिथे निराशा झाल्याने पुन्हा खाली आल्यानंतर, तिथल्या ट्रस्टच्या आॅफीसमागील जंगलात जाणारी पायवाट पकडून आम्ही पाच जण चालू लागलो. पुढे अर्थातच मी होतो.
त्या वाटेने पुढे गेल्यानंतर, आणखी दोन वाटा समोर आल्या, त्यापैकी उजवीकडील वाट आणखी पुढे जंगलात गेली होती ती बहुधा येऊरच्या दिशेने खाली उतरत असावी, तर डावीकडची वाट एका छोटीश्या टेकडीकडे जात होती, जिथे शेवटपर्यंत कारवीचे रान माजलेले दिसत होते. कारवीची ती झाडेही जवळपास सात-आठ फूट उंच वाढलेली होती. उजवीकडे आत जंगलात जाण्यापेक्षा, डावीकडच्या टेकडीवर चढून पुढे बोरीवलीचा परिसर दिसेल या आशेने मी, कारवीच्या रानाखालून डावीकडची वाट पकडून चढू लागलो. वाट व्यवस्थित वर टेकडीवर जात असल्याचे पाहून इतर चौघांना हाका मारून बोलवून घेतले आणि पुढे वर जाऊ लागलो. माझ्या पाठी चुलत भाऊ नजरेच्या टप्प्यात मा्े होता आणि त्याच्याही बरंच पाठी इतर तिघे जण.
टेकडीच्या शेवटावर पोचलो अगदी तिथवर कारवीची झाडे माजली होती. डोक्यावर वाढलेल्या झांडामुळे काही दिसेना, म्हणून तिथल्या एका भल्या मोठ्या दगडावर पाय ठेवून पलीकडचे काही दिसते का ते बघायला गेलो, तो समोर पाच-दहा फूटावर एक पिवळं धम्मक 'धूड' लपून बसलं होतं. मी भावाशी संवाद साधत दगडावर पाय ठेवून खाली बघायला आणि माझ्या आवाजामुळे आणि दगडावर उभे राहण्यामुळे बिचकलेल्या त्या जनावरने माझ्याकडे बघत समोरच्या झाडीत झेप घ्यायला अगदी एक वेळ झाली.! बस्स !! तिथून आल्या पावली जो काही मागे पळालो, पुढे भावाच्या “अरे काय झालं?" प्रश्नाला उत्तर द्यायलाही तोंडातून शब्द फूटत नव्हते. पुन्हा त्याने विचारल्यानंतर, त्राण गेलेल्या पायातून पळता पळता, अगदी घाबरलेल्या स्थितीतून तोंडातून शब्द बाहेर पडला “बिबट्या!"
वाचने
14176
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
बापरे.. साताठ ठोके चुकले
बाप रे...!
वा,
सुंदर अनुभव...
तांब्या
In reply to सुंदर अनुभव... by गॉडजिला
कपिलमुनी
In reply to तांब्या by कपिलमुनी
:)
In reply to तांब्या by कपिलमुनी
=))
In reply to तांब्या by कपिलमुनी
गॉडजिला
In reply to सुंदर अनुभव... by गॉडजिला
धडकी
हा अनुभव घेतलाय महाबळेश्वर ला
जर्द काही...
हं
In reply to जर्द काही... by तुषार काळभोर
थोडा घोळ झाला बहूतेक
In reply to जर्द काही... by तुषार काळभोर
आईशप्पथ ! एक नंबर किसना !
किसनद्येव अन कपिलमुनी धन्य
बाप रे ! बाप रे बाप !
🐆
:०
आज म्हणजे २६ जूनला?
__/\__
असाच एक अनुभव .......
खतरनाक.
In reply to असाच एक अनुभव ....... by सौन्दर्य
नामस्मरणाची ताकत
In reply to खतरनाक. by गॉडजिला
ख्या ख्या ख्या .
In reply to नामस्मरणाची ताकत by प्रसाद गोडबोले
अरेच्च्या , इतक्या लवकर विसरलात की काय ?
In reply to ख्या ख्या ख्या . by गॉडजिला
अरे हे होय
In reply to अरेच्च्या , इतक्या लवकर विसरलात की काय ? by प्रसाद गोडबोले
हे राम...!
In reply to खतरनाक. by गॉडजिला
बोलती बंद!
अरेच्च्या , इतक्या लवकर
चर्चा भरकटलीय
आम्ही लहानपणी शाळेत असताना