माझ्यातली दोन मनं
अगदी सख्खे शेजारी
एक वेडं , तर एक शहाणं !
वेड्याच्या हाती तलवार
तर शहाण्याच्या ढाल !
वेडं वाट चुकत असतं
नको तिथं धावत सुटतं
शहाणं वाट शोधून काढतं
योग्य जागी नेऊन सोडतं !
वेडं सतत घाईतच असतं
संयमाशी पटतच नसतं
शहणं मात्र शांत असतं
धिराच फळ त्याला हवं असतं !
वेडं मन हट्टाला पेटतं
धगधगत्या श्वासांनी काळीज पेटवतं
शहाणं त्याला जवळ घेतं
समजूतीच्या ओलाव्याने त्याला शांत करतं !
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3666
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
स्वताच्या मनातल द्व॑द साध्या भाषेत कविताबद्ध केलय.छान..
कविता छान आहे..
काय खर नाय बाबा लग्न म्हणजे एव्हढा ताप असतो का रे ???
In reply to कविता छान आहे.. by मराठमोळा
आवडली
मस्त!
खासच!
धन्यवाद.
छान!
छान.
दोन्ही कविता मस्त.
झकास कविता आणि .......