Skip to main content

सख्खे शेजारी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 17/04/2009 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यातली दोन मनं अगदी सख्खे शेजारी एक वेडं , तर एक शहाणं ! वेड्याच्या हाती तलवार तर शहाण्याच्या ढाल ! वेडं वाट चुकत असतं नको तिथं धावत सुटतं शहाणं वाट शोधून काढतं योग्य जागी नेऊन सोडतं ! वेडं सतत घाईतच असतं संयमाशी पटतच नसतं शहणं मात्र शांत असतं धिराच फळ त्याला हवं असतं ! वेडं मन हट्टाला पेटतं धगधगत्या श्वासांनी काळीज पेटवतं शहाणं त्याला जवळ घेतं समजूतीच्या ओलाव्याने त्याला शांत करतं !
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3666
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

छान !! जागु तुमची सिंपलशी कविता छान आहे .. भावली.

नवरा-बायको दोन जणं एकाच घरात सख्खे शेजारी एक वेडं , दुसरं महावेडं ! वेड्याच्या हाती लाटणं तर महावेड्याचं हसणं ! वेडं पैसे उडवत असतं महावेडं कमवुन आणत असतं वेडं ताट वाढुन ठेवतं तेव्हा महावेडं हॉटेलात असतं ! वेडं सतत संशय घेत असतं महावेड्याशी पटतच नसतं महावेडं मात्र भोळं असतं वेड्याचं प्रेम त्याला हवं असतं ! वेडं मग हट्टाला पेटतं सोडचिठ्ठीने काळीज पेटवतं महावेडं त्याला जवळ घेतं प्रेमाच्या मायेने परत घरा खेचुन आणतं ! आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

आवडली कविता :B :B :B बाकरवडी :B :B :B

खास, अगदी खास कल्पना! कविता खूप खूप आवडली. :) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

दोन्ही कविता मस्त आहेत. अभिनंदन जागु आणि मराठमोळे साहेब. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री, सुहास, मराठमोळा,बाकरवडी, क्रांती, प्राजू तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मराठमोळा तुमची कविता आवडली.

जागु कविता आवडली. ममो तुमचीही कविता छान आहे. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

जागू,कविता खूप छान आहे.

तेवढाच झकास कवितेतलाच प्रतिसाद. वाहवा....... सुधीर कांदळकर.